<< अजब न्याय निवाडा >>

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
16 Apr 2012 - 2:34 pm
गाभा: 

लोकहो,

नुकताच हायकोर्टाने दिलेला एक निकाल माझ्या वाचनात आला. या निकालाची बातमी लोकसत्तेमध्ये मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली.

मला हा निकाल केवळ पुरुषविरोधीच नाही तर अत्य़ंत आचरट वाटतो. अत्यंत काळजीपूर्वक विचार केला तर या निकालाद्वारे असा संदेश मिळतो की
-आर्थिकदृष्या कंगाल (म्हणजे गरीब) जनतेला प्रजोत्पादन आणि natural bond च्या निर्मितीसाठी सेक्स उपभोगता येणार नाही.
- यात फक्त पुरुषाला सेक्स नाकारला गेला आहे असे मला वाटत नाही. तर स्त्रीला पण सेक्स पासून वंचित ठेऊन न्यायालयाने काय साधले?
- स्त्री आपली जबाब्दारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरली तर हाच न्याय स्त्रिला लागू होईल का?
- उद्या एखाद्या स्त्रीने चंद्रावर जाण्याचा हट्ट धरला आणि तो पूर्ण करण्यास नवरा असमर्थ ठरला तर न्यायालय स्त्रीची बाजू घेणार का?

प्रतिक्रिया

आज ही बातमी वाचनात आल्यावर अचंबित झालो होतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल / टिप्पणी ही एकप्रकारे कायदाच असते. बातमीत अधोरेखित केलेल्या विधानाचा व्यत्यास केल्यास असा अर्थ काढला जाऊ शकतो की स्त्रीच्या अन्नपाण्याची / पैशाची सोय लावली की मग सेक्स "घेणे" हा त्याचा हक्क बनतो..

समजा असा उलटा अर्थ लावला जाऊ शकत नाही असं धरु.. म्हणजे, स्त्रीच्या गरजा पुरवल्या की पुरुषाला जबरदस्तीने सेक्स मिळवता येणार नाही तर त्यानंतरही ते तिच्या संमतीवरच अवलंबून राहील.. असं जर असेल तर या बातमीतल्या निकालातील विधानांची खास अशी कोणतीच गरज राहात नाही, कारण एकदा "संमतीवर अवलंबून" आहे म्हटल्यावर बाकीच्या गोष्टी संदर्भहीन बनतात..

कोणी असं म्हणू शकेल की हा शाब्दिक खेळ आहे किंवा अनर्थ केला जातोय. पण कायदेशीर वक्तव्यांचा असा अर्थ पुढील खटल्यांत जरुर लावला जाऊ शकतो.

हेही कळतंय की कोर्टाचं विधान हे निम्नस्तरातल्या वर्गाला जास्त लागू आहे, पण शेवटी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं विधान हे साधं जनरलाईज्ड विधान म्हणून घेता येणार नाही हे खरंच. तुम्ही या विषयावर लिहाल असा अंदाज होताच.

या बातमीत मला पुरुषविरोधापेक्षाही स्त्रीलाच त्रासदायक ठरु शकेल असा पायंडा कायदेशीररित्या पडण्याची भीती वाटते.

हे फक्त हाय कोर्ट आहे. त्याचा निकाल सुप्रिम कोर्ट बदलु शकते.

सर्वसाक्षी's picture

16 Apr 2012 - 3:27 pm | सर्वसाक्षी

पतीचे उत्पन्न आणि जागेचा आकार पत्निला लग्नाआधी माहिते असावा असे अनुमान आहे कारण फसवणुकीच्या तक्रारीचा उल्लेख नाही. म्हणजेच उत्पन्न व जागा या दोन्ही गोष्टींची पूर्ण कल्पना असताना विवाह झाला होता. नवर्‍याचे उपन्न व जागा हे लग्नात मान्य असताना नंतर त्या विषयी तक्रास कसली आणि न्यायालयाने ते ग्राह्य कसे धरले? ३००० रुपये हे उत्पन्न तुटपुंजे तर त्यातले १००० बायकोला दिल्यावर उरलेले त्या नवर्‍याच्या कुटुंबाला पुरतील का? जर बायको आपखुशीने व नवरा गुन्हेगार वा छळ करत नसताना घरी परत आली तर पोटगी कशाबद्दल?

लोचा आहे. उद्या बायकोने घर लहान आहे आणि पगार कमी आहे असे म्ह्टले तर या वयात काय करावे या चिंतेने मी ग्रासलो आहे.

ता. क. - इतक्या कमी आर्थिक स्तरातली स्त्री उच्च न्यायालयात लढु शकते? शंकेला वाव आहे. अगदी वकिलाने फुकट केस घेतली तरी आज घरुन कोर्टात जा ये करायची तर दिवसाला किमान १०० रु खर्च आहे. कागदपत्रांचा खर्च वेगळा.

यकु's picture

16 Apr 2012 - 3:34 pm | यकु

मला वाटत नाही की हायकोर्टाच्या आदेशानुसार कुणी सेक्ससाठी अपात्र असतानाही आवेग रोखू शकेल!
कोर्ट भंजाळलं की काय?

आली रे आली आता पुरुषांची बारी आली :(

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2012 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

अविवाहीत
परा

आम्ही लोकसत्ता वाचत नाही, तरी ही तुर्तास " वैयक्तीक प्रश्न . पास "

धन्यवाद !

चिगो's picture

16 Apr 2012 - 6:02 pm | चिगो

एवढेच नव्हे, तर पत्नीची योग्यरीत्या देखभाल करण्यास, तिच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यास आपण समर्थ आहोत हे पतीने सर्वप्रथम सिद्ध करावे आणि नंतरच पत्नीकडून वैवाहिक सुखाची अपेक्षा ठेवावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

लोकसंख्या वाढ रोखण्याचा अतिशय अभिनव मार्ग काढल्याबद्दल न्यायालयाचे अभिनंदन... :-)

आता "मुझे नौलक्खा मंगा दे रे" ह्या टायपातली गाणी आणि ज्वेलर्स, तनिष्क, डी-बियर्स इ.च्या जाहिराती बायकोच्या कानी- डोळी पडु नयेत, ह्यासाठी प्रयत्न करावा.. ;-)

तिमा's picture

16 Apr 2012 - 6:45 pm | तिमा

'छपरी पलंग (आनि तो बी 'रा जा चा') आनून दिल्याबगर लगीन करनार न्हाई', असं मैनावती सुद्धा म्हणाली होती.
संदर्भः 'विच्छा माझी पुरी करा'

पैसा's picture

16 Apr 2012 - 7:11 pm | पैसा

लग्न म्हणजे संस्कार, किंवा मनाचं मीलन नाही तर विक्रीचा करार आहे असं आता समजायचं का? आणि आतापर्यंत असे शारीरिक संबंध नाकारणे हे मानसिक छळाचं आणि घटस्फोटाचं कारण समजलं जात असे त्याचं काय झालं?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2012 - 7:11 am | अत्रुप्त आत्मा

तो अ-न्याय मूर्ती कुठच्यातरी मनोरोगाने पछाडलेला असावा... त्याशिवाय इतका बिनडोक निर्णय देणं शक्य नाही

सहज's picture

17 Apr 2012 - 7:47 am | सहज

"तो" नक्की का? गुगला की जरा राव!!

पण लोकसत्तामधले इंटर्प्रिटेशन व युयुत्सु यांची ह्या विषयावरची मते ह्या डेडली काँबिनेशनच्या एकत्रीत मतप्रदर्शनावर आपले मत देण्याआधी जर खरे निकालपत्र दिसले व जी वक्तव्य केली गेली आहेत त्याचे संदर्भ नेमके कळले तर बोलण्यात अर्थ आहे.

बाकी न्यायमूर्तींवर असे वैयक्तीक आरोप, निकालाची असभ्य भाषेत नालस्ती हे कायद्यात चालते का? जाणकारांनी प्रकाश पाडावा?

जाता जाता यशस्वी पुरुषाची ही व्याख्या आठवली - A successful man is one who makes more money than his wife can spend. :-)

चलो ह्या निमित्ताने आता पुरुष अजुन यशस्वी व्हायच्या प्रयत्नात देशाचीही प्रगती होईल. :-)

नितिन थत्ते's picture

17 Apr 2012 - 8:14 am | नितिन थत्ते

>>पण लोकसत्तामधले इंटर्प्रिटेशन व युयुत्सु यांची ह्या विषयावरची मते ह्या डेडली काँबिनेशनच्या एकत्रीत मतप्रदर्शनावर आपले मत देण्याआधी जर खरे निकालपत्र दिसले व जी वक्तव्य केली गेली आहेत त्याचे संदर्भ नेमके कळले तर बोलण्यात अर्थ आहे.

सहमत आहे. मध्यंतरी अश्याच एका निकालाच्या निमित्ताने चर्चेत मी देखील घाईघाईत मतप्रदर्शन केल्याचे आठवले.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2012 - 9:08 am | अत्रुप्त आत्मा

@"तो" नक्की का? गुगला की जरा राव!!>>> धागाकर्त्यानी दिलेल्या माहितीनुसार इतकाच निष्कर्ष काढता येतो... ;-)

निकालाची असभ्य भाषेत नालस्ती हे कायद्यात चालते का

खुद्द कोर्ट रुम मध्ये हे चालते. आणि हे स्त्रीने केले तर तिला ते पूर्ण माफ असते. न्यायालयाच्या अपमानाकरता एखादी स्त्री तुरुंगात गेली असे अद्याप ऐकले नाही.

अरुंधती रॉय यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा झाली होती ना?

अपवाद म्हणजे नियम नव्हे.

सहज's picture

17 Apr 2012 - 11:56 am | सहज

निदान ह्या निमित्ताने तुमच्या कानावर तरी पडले की एक स्त्री न्यायालयाच्या अवमानाबद्दल तुरुंगात गेली. हेही नसे थोडके!

बादवे अजुन एक केस अगदी तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत पुढे काय झाले माहीत नाही पण निदान न्यायालयाने चक्क बाईला एक नोटीस तर दिली हेही ऐतिहासिकच ना? :-)

असो.

कपिलमुनी's picture

17 Apr 2012 - 10:08 am | कपिलमुनी

अशी सरकारने केली आहे ..या हिशोबाने १८०० रु महिना जगायला पुरेसे आहेत..
आता न्यायालय म्हणतय ३००० रु. कमाइ असेल तर .................................

एकत्रित निष्कर्ष भयंकर आणि विनोदी ( एकाच वेळेस) आहेत

मृत्युन्जय's picture

17 Apr 2012 - 11:21 am | मृत्युन्जय

पुर्ण निकाला वाचल्याशिवाय मतप्रदर्शन करणे एरवी चुकीचे आहे. पण जेवढे संदर्भ मिळाले आहेत त्यावरुन असे नम्रपणे नमूद करु इच्छितो की त्या न्यायाधिशाचे डोके फिरलेले आहे किंवा त्याला अथवा तिला लग्नसंस्थेबद्दल काडीमात्र माहिती नाही.

मुख्य गोष्टी विचारात घ्या:

१. न्यायमूर्ती म्हणतात पत्नीला पोसता येत नसेल तर पतील लैंगिक सुखाची अपेक्षा करता येणार नाही. लग्नाची बायको ही काही बाजारात बसलेली वेश्या आहे का की पैसे हातात ठेउन कपडे उतरवायला सांगायचे. लग्न आणि तदनुषंगाने येणारे वैवाहिक सुख (मानसिक + शारिरिक) हे इतके उघडे नागडे आहे काय? त्याला काही वैचारिक बैठक नाही काय?

२. स्त्री मुक्तीच्या जमान्यात पत्नीला पोसणे हे पतीचे कर्तव्य आहे असे सांगुन न्यायाधीश महोदय (अथवा श्रीमती जे काय असेल ते प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे लिहित बसत नाही) नक्की काय सांगु इच्छित आहेत. आजही पती म्हणजे बाहेर जाउन पैसे कमावणार आणि पत्नी चूल मूल करत त्याने पैसे कमावण्याची वाट बघत घरी बसणार अशी परिस्थिती आहे काय? त्याने ते कमावले की पत्नी त्याच्या सगळ्या इच्छा पुर्ण करणार अशी परिस्थिती आहे काय?

३. माननीय न्यायाधिश महोदय म्हणतात की पतीकडे केवळ १२५ स्क्वे फूटाचे घर आहे आणि त्याचे मासिक उत्पन्न केवळ ३००० रुपये आहे त्यामुळे त्याने पत्नीने त्याच्याकडे येउन राहण्याची इच्छा व्यक्त करणे अयोग्य आहे. न्यायाधीश महोदयांना हे माहिती नाही काय की याहुन लहान घरांमध्ये भारतातील लाखो कुटुंबे राहतात आणि याहुन कमी मिळकतीत संसार करतात. लग्नापुर्वी ही माहिती त्या नवर्‍याने लपवुन ठेवली असेल किंवा त्या बाईची दिशाभूल केली असेल तर समजु शकतो पण लग्नाआधीपासून तिला जर हे माहिती असेल तर आधी काय तिची अक्कल शेण खायला गेली होती काय आणी असा निकाल देताना न्यायाधीश महोदयांची अक्कलही तिच्या अक्कलेबरोबर गेली होती काय?

४. किमान किती स्क्वे फूटाचे घर आणि किमान किती मासिक उत्पन्न असल्याशिवाय लग्न करु नये यावर न्यायसंस्था काही प्रकाश् टाकु शकते काय? असा काही कायदा न्याय्या आणि ग्राह्या असु शकतो काय? असा कायदा झाल्यास किती लोक लग्नापासुन वम्छित राह्तील याचा न्यायमूर्तींनी विचार केला आहे काय?

५. किमान स्क्वे फूटाचे घर असणे आणि किमान मासिक मिळकत असणे या अटी केवळ पुरुषाला लागू आहेत काय? असे असल्यास हा जेंडर बायस नाही काय? म्हणजे अजुनही नवर्‍याने कमवावे आणि बायकोने पोरे जन्माला घालुन ती वाढवावीत असा काही संदेश माननीय न्यायमूर्तींना द्यायचा आहे काय?

६. मासिक ३००० रुपये हा पगार बायकोला पोसण्यास अपुरा आहे असे न्यायमूर्तींचे म्हणणे आहे. तेच न्यायमूर्ती त्या तुटपुंज्या ३००० तील १००० घटस्फोट मागणार्‍या बायकोला कसे द्यायला लावू शकतात? उरलेल्या २००० त त्या नवर्‍याने आणि त्याच्या आई वडीलांनी अश्या (किमान) तिघांनी गुजराण करणे अपेक्षित आहे काय? म्हणजे तिघांसाठी २००० आणी एकीसाठी १००० असा न्याय आहे काय?

७. लैङिक सुख हे पैशावर अवलंबुन असेल तर वेश्याव्यवसाय आणि लग्नसंस्था यात नक्की काय फरक उरला आहे? नवर्‍याकडे पैसे उरले नाही म्हणुन बायकोने त्याला सोडुन द्यावे काय?

असो. याकडे केवळ युयुत्सुंचा अजुन एक धागा आला हो असे बघुन मजा बघण्यात अर्थ नाही. न्यायसंस्था सध्या बिनडोक निर्णय देते आहे याकडे डोळसपणे बघणे गरजेचे आहे असे मला वाटते

चिगो's picture

17 Apr 2012 - 12:52 pm | चिगो

जबरा प्रतिसाद, मृत्युंजय.. सगळेच मुद्दे भारी आहेत.

न्यायसंस्था सध्या बिनडोक निर्णय देते आहे याकडे डोळसपणे बघणे गरजेचे आहे असे मला वाटते

ह्या वाक्यासाठी टाळ्या आणि अनुमोदन..

शिल्पा ब's picture

17 Apr 2012 - 8:40 pm | शिल्पा ब

अगदी १००% अनुमोदन आहे.

एकतर्फी निकाल..

बाकी मृत्युन्जय.. सगळे मुद्दे सडेतोड आहेत.
जग हळूहळू फेमिनिस्ट होत आहे काय?

विसुनाना's picture

17 Apr 2012 - 6:28 pm | विसुनाना

न्यायमूर्तींनी घटनेतील कोणत्या कलमांचा किंवा कोणत्या कायद्याचा किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकालाचा आधार घेऊन हा निकाल दिलेला आहे हे पहाणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा हा निकाल तर्कसंगत आणि नैसर्गिक न्यायाला धरून असलेला न ठरता ती न्यायमूर्तींची मनमानी आहे असे खेदाने म्हणावे लागेल.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2012 - 2:09 am | सुधीर१३७

सदर संपूर्ण लेख हा केवळ वर्तमानपत्रातील बातमीवर आधारित असून त्यावर व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे एकांगी व न्यायालयाची नाहक बदनामी व अवमान करणारी आहेत. बातमी देणार वार्ताहराने निकालातील फक्त "बातमी" करण्याजोगी बाब उल्लेखलेली आहे हे संपूर्ण बातमी वाचली असता दिसून येते.

बातमी व लेख वाचल्यावर पक्षकारांची नावे व निकाल तारीख नसल्याने निकालपत्र शोधण्यास वेळ लागला. मिपाकरांच्या माहितीसाठी निकालातील मह्त्त्वाचा भाग पुढे देत आहे. ...... तो वाचल्यावर बातमी व लेख एकांगी व विपर्यस्त असल्याचे दिसून येईल.

"The parties had an arranged marriage. The husband claims to be a helper of a tailor. the wife claims that he has grament shop himself.

The husband has sought to show that the wife has without reasonable cause left the matrimonial home and hence is not entitled to any maintenance. This is on the footing that the claim of the wife of demand for dowry is wholly dishonest and must be fully rejected. That is what the learned Judge has been impressed with.

Counsel on behalf of the husband drew my attention to the first reply of the wife to the notice of the husband calling her back to her matrimnial home, the FIR filed by the wife under section 498-A of the IPC and the petition for claiming maintenance. Counsel on behalf of the husband has argued that in each of these thwe wife has made different allegations and hence her allegations deserve rejection. he has also argued, and that has been held by the learned Judge also, that if the allegations were true the wife would have made those allegations in a complaint letter or in a criminal complaint or otherwise prior to her first reply.

It has been the case of the wife that at or about the time of the marriage also certain demands were made. Those demands were met. Fresh demands were made even thereafter. The demands continued constraining her to leave the matrimonial home. After which she refused to return to her matrimonial home.

It is endemmic in our country and of which judicial notice is required to be taken, that new fresh and further demands of dowry at various times of mariage continue to be made as an abhorrent custom. These demands first made are met if they are reasonable. They cannot be continued to be made and met.

Under this scenario the case of the husband and the wife are required to be seen to judge whether the wife left matrimonial home upon sufficient and just cause.

The husband called her back to the matrimonial home by his notice of demand. The wife did not desire to return to the matrimoniale in view of her contentions. Hence when the notice was received she has imediately replied it. In that first reply she has stated how the mother of the husband was not satisfied with the articles given by the parents of the wife at or about the time of the marriage. She has also stated that immediately after the marriage there were demands of dowry by way of house accommodation and a Hero Honda motor cycle. She has mentioned about the various gifts of gold and silver given at the time of marriage. She has further stated that her parents had undertaken marriage expenses and given Rs. 75,000/- in cash for busines purpose to the husband together with household articles.

In complaint under S. 498-A of the IPC the FIR contained under clause 12 also shows the demand for motor cycle and a new house. The reply to the notice and the FIR are, therefore, similar. No new case has been made out after the first reply.

In the petition for maintenance the wife has set out the marriage expenses. She has quantified the marriage expenses at Rs. 2 lacs. She has also set out that Rs. 75,000/- was given in cash as dowry. She has enumerated the gold, silver and copper articles which include utensils. These contentions are, therefore, also consistent with the reply to the demand notice and the FIR. The petitioner-wife, however, further states that even after these articles were given at the time of the marriage, further demands were made after the marriage. That was in a sum of Rs. 1 lac from the parents of the petitioner. The petitioner states that Rs. 20,000/- were given upon the assurance that the wife would not be ill-treated, but she was continued to be abused. the Petition has set out the particulars of the domestic violence in para 10 of the petition. This is alleged to be at the influence of the parents of the husband. This shows the expansion of demands after the earlier demand of motot cycle and residential accommodation.

The argument of the counsel on behalf of the husband that inconsistent pleas have been taken is, therefore, not correct.

These contentions would be better appreciated if the usband's own case is seen. the husband claims that he is not a tailor and he does not own a shop but is only a helper with a tailor. His position as a husband is, thefore, precarious. He claims that he earns only Rs. 3000/-. It is common knowledge even the peons earn more than this today. the husband is hardly eligible to marry, to keep a wife, to make a family and even more ineligible to demand that his wife returns home when he claims to earn only Rs. 3000/- p.m. In this scenario the demand of the husband would have also to be considered. He claims that he never demanded dowry and would not demand in future. Without the wife's assitance, it is easy to see that he can hardly make ends meet for himself as also his wife much less for his future family.

The husband claims that he lives in a alarge family with his mother, father, younger brother and one unmarried sister. The husband who is present in court instructs his counsel to state that his house is 125 sq. ft. in area. In this economic position, the husband claims and wants the court to believe, that he never called upon his wife to procure him another residence. It may be mentioned that if the husband seeks to have the company of his wife and to make a family he would not only deserve but need another accommodation. He seems to make no efforts to obtain it himself and hence his wife could be the only source from where he could get that most essential need.

In these circumstances, the case of the wife that he made the dowry demands as alleged by her stand to reason given the endemic situation in our country for demand of dowry which drove the legislature to pass the anti dowry act 3 decades ago.

In this situation it is to be seen whether refusal of the wife to live with the husband and to return to her matrimonial home would be justified. It does not require much research to conclude that under the aforesaid circumstances she would be justified in living away from the matrimonial home which she has been constrained to leave and demand maintenance. Similarly in this scenario the husband, who has desired the company of his wife and has demanded the same under the legal notice, must be obligated to first show that he can maintain the wife, to start maintaining the wife and then to claim his conjugal as well as his any other rights."

या परिस्थितीत न्यायमूर्तींनी काढलेले उद्गार वाचणे आवश्यक आहे. संदर्भ सोडून वाचल्यास वाटेल ते व वाटेल तसे अर्थ काढता येतील. महत्त्वाचे म्हणजे प्रकरण निकालासाठी पुन्हा कनिष्ठ न्यायालयात पाठविण्यात आलेले आहे. या प्रकरणातील कोणत्याही पक्षकारांशी माझा काहीही, कसलाही संबंध नाही. पक्षकारांची नआहे.व प्रकरण नंबर देण्याचे मी टाळलेले आहे.

शिल्पा ब's picture

19 Apr 2012 - 2:31 am | शिल्पा ब

<<सदर संपूर्ण लेख हा केवळ वर्तमानपत्रातील बातमीवर आधारित असून

हीच तर माननीय युयुस्तुंची खासियत आहे.

युयुत्सु's picture

19 Apr 2012 - 7:27 am | युयुत्सु

तो वाचल्यावर बातमी व लेख एकांगी व विपर्यस्त असल्याचे दिसून येईल.

आपण ही बाब लोकसत्तेच्या पण निदर्शनास आणून दिली असेल अशी आशा करतो...

आम्ही लोकसत्ता वाचत नसल्याने त्याची गरज वाटत नाही.

युयुत्सु's picture

19 Apr 2012 - 8:12 am | युयुत्सु

मात्र पती तसेच सासरच्या अन्य मंडळींवर तिने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे नमूद करून तिला पतीचे घर सोडण्याची काहीही गरज नसल्याचे कुटुंब न्यायालयाने निकालात म्हटले होते.

आपण उद्धृत केलेल्या निकालात वरील मुद्द्याचा वरच्या कोर्टाने काय विचार केला याचा काहीही उल्लेख दिसत नाही. की वरील मजकूर बातमीदाराचे कवित्व मानायचे.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2012 - 2:12 pm | सुधीर१३७

वर दिलेल्या निकालपत्राच्या भागात याबाबतही न्यायमूर्तींनी विवेचन केले आहे. पत्नीची केस खोटी असल्याचा पतीचा दावा न्यायमूर्तींनी खोडून काढला आहे व त्यासाठी सामान्य माणसालाही पटतील अशी योग्य कारणेही दिली आहेत. पूर्वग्रह सोडून वाचल्यास समजून येईल.

युयुत्सु's picture

19 Apr 2012 - 8:47 am | युयुत्सु

न्यायालय समोर असलेल्या (मांडलेल्या) परिस्थिती आणि पुराव्यांचा विचार करून निर्णय देते तसेच सामान्य नागरिक समोर आलेल्या माहितीच्या आधारे आपले मत बनवतात.

या केस मध्ये समोर आलेली आणखी एक बाजू अशी की रु ३००० इतका पगार असताना आणि १२५ स्क्वे फूचे घर असताना या स्त्रीचे कुटुंबीय लग्नाला तयार कसे झाले? समोर आलेल्या निकालपत्रात कुठेही या स्त्रीने आपण फसवले गेलो, असा आरोप केल्याचा उल्लेख नाही.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2012 - 2:43 pm | सुधीर१३७

|>>>>>>>>>

या केस मध्ये समोर आलेली आणखी एक बाजू अशी की रु ३००० इतका पगार असताना आणि १२५ स्क्वे फूचे घर असताना या स्त्रीचे कुटुंबीय लग्नाला तयार कसे झाले? समोर आलेल्या निकालपत्रात कुठेही या स्त्रीने आपण फसवले गेलो, असा आरोप केल्याचा उल्लेख नाही. |>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

वरील निकालपत्रात दोघांचेही म्हणणे काय आहे ते दिलेले आहे. पत्नी पतीबद्दल तो दुकान मालक असल्याचे सांगत आहे, तर पती तो नोकर असल्याचे सांगत आहे. घराच्या आकाराबद्दल तिची काहीही तक्रार नाही असे दिसते. हुंड्याच्या दिलेल्या रकमेबद्दल ती सांगत आहे, वारंवार केल्या गेलेल्या मागण्यांबद्दल ती सांगत आहे. हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून तिने घर सोडल्याचे सांगत आहे.
न्यायालयानेही मुळात घर लहान आहे म्हणून तक्रार केलेली नाही; तर समोर दिसत असलेल्या परिस्थितीत पत्नीचे म्हणणे ग्राह्य मानले आहे व ते अशा प्रकरणात संयुक्तिक आहे. जर छळ केला नसता तर, घर सोड्ण्याची वेळ्च आली नसती. व प्रत्येक व्यक्तिने विवाह करण्यापूर्वी आपण आपली जबाबदारी पार पाडू शकतो का हे तपासणे गरजेचे आहे असा निकालाचा मतितार्थ आहे.

आपण या प्रकरणातील पतीची बाजू सत्य असल्याचे समजून चालले आहात. वरील निकालपत्राच्या भागाचे नीट वाचन केल्यास न्यायालयास पतीच्या म्हणण्याबद्दल शंका आहे, हे लक्षात येईल.

अवांतरः न्यायालयामध्ये पोटगी मागण्यास येणा-या स्त्रिया व परिस्थिती असूनही पोटगी देण्यास टाळणारे पुरुष याबाबत मोठा ग्रंथ लिहिला जावू शकतो.

न्यायालयामध्ये पोटगी मागण्यास येणा-या स्त्रिया व परिस्थिती असूनही पोटगी देण्यास टाळणारे पुरुष याबाबत मोठा ग्रंथ लिहिला जावू शकतो.

शिक्षण आणि धडधाकट हात पाय असलेल्या स्त्रीया पोटगी मागायला येतात तेव्हा मला त्यांची कीव वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2012 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा

@शिक्षण आणि धडधाकट हात पाय असलेल्या स्त्रीया पोटगी मागायला येतात तेव्हा मला त्यांची कीव वाटते.>>> इथे शिक्षण आणी धडधाकट हातपाय असण्याचा पोटगी प्रकरणाशी(पोटगी मागण्या न मागण्याशी) काय संमंध...? का अशिक्षित आणी अपंग स्त्री करताच,पोटगीची वेळ आल्यास पोटगी न्याय्य/कायदेशीर मानावी असे तुंम्हास वाटते...?

रेवती's picture

19 Apr 2012 - 7:28 pm | रेवती

पोटगी हा कायदेशीर हक्क असल्याने त्याचा हात पाय धड असण्याशी संबंध नाही.
संसार चालू असताना, नवरा नोकरी करत असताना, स्वत:चे करियर सोडून धडधाकट नवरा व त्याच्या धडधाकट, घरात मदत न करणार्‍या नातेवाईकांना तिने तिन्हीत्रिकाळ गिळायला घातलेले असू शकते. अनेक वर्षांनंतर तिच्या नोकरीची शक्यता हळूहळू संपत आलेली असू शकते. अशावेळी पोटगी ही हवीच.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2012 - 9:31 pm | सुधीर१३७

+१..................

युयुत्सु's picture

19 Apr 2012 - 5:20 pm | युयुत्सु

हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून तिने घर सोडले की घर आणि नव-याला सोडण्यासाठी हुंड्याच्या छ्ळाचा बनाव वकीलाच्या मदतीने रचला याबद्दल मी अजूनही साशंक आहे.

बाकी लोकसत्ता वाचल्या शिवाय बातमी विपर्यस्त असल्याचे आपल्याला कसे काय कळले, हे ही मला कोडेच आहे असो.

तरीही मूळ निकाल पत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहे.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2012 - 9:42 pm | सुधीर१३७

>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>> हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून तिने घर सोडले की घर आणि नव-याला सोडण्यासाठी हुंड्याच्या छ्ळाचा बनाव वकीलाच्या मदतीने रचला याबद्दल मी अजूनही साशंक आहे.

<<<<<<<<<<<<<< नव-याने पोटगी टाळण्यासाठी ३००० रु. नोकरीचा बनाव रचल्याचा न्यायालयास संशय आहे........... (याचसाठी पूर्वग्रह ठेवू नका असे सांगितले .... अर्थात पालथ्या घड्यावर पाणी ...............) :wink:

>>>>>>>>>>>>>
>>>>>>>> बाकी लोकसत्ता वाचल्या शिवाय बातमी विपर्यस्त असल्याचे आपल्याला कसे काय कळले, हे ही मला कोडेच आहे असो.

<<<<<<<<<<<<<<<<< आम्ही वाचत नाही अर्थात ती बातमी आपण लिंक दिल्याने वाचूनच प्रतिक्रिया दिली यावर विश्वास ठेवण्यास हर्कत नसावी...........

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2012 - 7:32 pm | परिकथेतील राजकुमार

'घटस्फोट झाल्यास पोटगी मिळेल का नाही' हे मुलीच्या पत्रिकेवरून लग्न जुळवताना कळू शकते काय ?

यकु's picture

19 Apr 2012 - 7:34 pm | यकु

ठ्ठो!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))

यावर युयुत्सु आणि घाटपांडे काकांचे मत काय आहे ते वाचण्‍याची उत्सुकता आहे.

युयुत्सु's picture

19 Apr 2012 - 7:49 pm | युयुत्सु

'घटस्फोट झाल्यास पोटगी मिळेल का नाही' हे मुलीच्या पत्रिकेवरून लग्न जुळवताना कळू शकते काय ?

ते केपीवाले सांगू शकतील. आम्ही केपीवाले नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2012 - 7:52 pm | अत्रुप्त आत्मा

@'घटस्फोट झाल्यास पोटगी मिळेल का नाही'
हे मुलीच्या पत्रिकेवरून लग्न जुळवताना कळू शकते काय ? >>>

या प.रा.ला धरा रे कुणितरी ;-) भयंकर संचारलाय सद्ध्या धाग्याधाग्यावर ;-)

सुधीर१३७'s picture

19 Apr 2012 - 9:33 pm | सुधीर१३७

पत्रिकेवरून नसेल कळत तर "नाडी" बघा.............................. :wink: