Nokia X2 02 : माहीती हवी आहे

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
9 Apr 2012 - 11:01 pm
गाभा: 

Nokia X2 02 : या मोबाइलबद्दल माहीती हवी आहे

कुणाचा स्वतःचा अनुभव असेल तर उत्तम.

असे ऐकले आहे की हा मोबाइल मेसेज उघडू जाता हँग वा रीस्टार्ट होतो

कुणाला काही माहीत असेल तर सांगितले तर बरे होइल

खाली या मोबाइलच्या रिव्ह्यूच्या लिंक दिल्या आहेत

http://discussions.europe.nokia.com/t5/Xseries/X2-02-Restart-Problem/td-...

http://discussions.europe.nokia.com/t5/Xseries/X2-02-Restart-Problem/td-...

http://discussions.nokia.co.in/t5/Xseries/X2-02-Restart-Problem/td-p/128...
http://www.gsmarena.com/nokia_x2_02-4354.php

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

9 Apr 2012 - 11:16 pm | तुषार काळभोर

hmmmm

अँग्री बर्ड's picture

9 Apr 2012 - 11:56 pm | अँग्री बर्ड

Nokia X2 02 हा संस्कृती , समाज वर्गवारीत मोडतो ? तरीही प्रत्येक मोबाईल बद्दल स्वतःची मते असतात, एखाद्याचे जे मत GALAXY Y बद्दल असते ते माझे असेलच असे नाही. तुम्ही घ्या तो फोन आणि त्याचा अभिप्राय नंतर मागाहून सांगा आम्हाला.

"मोबाइल मेसेज उघडू जाता हँग वा रीस्टार्ट होतो" हे खर आहे. :-(
या वर कंपनीने उपाय काढला आहे. नोकिया गेलरीत गेलात तर अवघ्या काही मीनीटात ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टाल करुन देतात. मी हाच फोन वापरत आहे. नविन ऑपरेटिंग सिस्टम इनस्टॉलेशन नंतर अजिबात त्रास नाही उत्तमरीत्या चालु आहे. :-)

५० फक्त's picture

10 Apr 2012 - 4:17 pm | ५० फक्त

*** *** : या आयडि बद्दल माहीती हवी आहे

अनुभव सगळ्यांनाच आहे.

असे ऐकले आहे की हा आयडि धागा टाकुन गायब होतो वा प्रतिसादाला प्रतिसाद देत नाही.

कुणाला काही माहीत असेल तर सांगितले तर बरे होइल

खाली या आयडिच्या लिखाणाच्या लिंक दिल्या आहेत

अन्या दातार's picture

10 Apr 2012 - 4:24 pm | अन्या दातार

लिंक्स दिसत नाहीत. :(

त्या गायब झाल्या, त्या आयडि सारख्याच. पाहिलं ना जे म्हणतोय त्याचा अनुभव आला ना, की या आयडिचा अन प्रतिसादाचा काही संबंध नाही.

आशु जोग's picture

10 Apr 2012 - 8:22 pm | आशु जोग

जयपाल

>>या वर कंपनीने उपाय काढला आहे. नोकिया गेलरीत गेलात तर अवघ्या काही मीनीटात ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टाल करुन देतात. मी हाच फोन वापरत आहे. नविन ऑपरेटिंग सिस्टम इनस्टॉलेशन नंतर अजिबात त्रास नाही उत्तमरीत्या चालु आहे.<<

हा चांगला फीडबॅक आहे

स्व:अनुभवाहुन सांगतो की फक्त आयफोन बेस्ट....बाकी सगळे ओके. अमेरीकेत लोकांना नोकीया माहीत नाही.

अन्या दातार's picture

13 Apr 2012 - 1:34 am | अन्या दातार

स्व:अनुभवाहुन सांगतो की फक्त आयफोन बेस्ट....बाकी सगळे ओके

बर! ठिक आहे. पण लेखकाला नोकिया फोनबद्दल माहिती हवी आहे. आयफोनबद्दल नकोय. त्याविषयी बोलाल का जरा?

अमेरीकेत लोकांना नोकीया माहीत नाही.

सदर लेखक भारतात राहतात. अमेरिकेतल्या लोकांना काय माहिती आहे, अन काही नाही याच्याशी देणे-घेणे नसावे. भारतात एकेकाळी नोकियाफोन्सना अतिप्रचंड मागणी होती, जी सध्या कमी झाली आहे.

एकवेळ आयफोन तुटेल, पण नोकियाचे फोन्स अज्जिबात तुटणार नाहीत. हा माझा स्वानुभव अमेरिकेतल्या लोकांना माहिती आहे काय?

मृत्युन्जय's picture

13 Apr 2012 - 12:29 pm | मृत्युन्जय

एकवेळ आयफोन तुटेल, पण नोकियाचे फोन्स अज्जिबात तुटणार नाहीत. हा माझा स्वानुभव अमेरिकेतल्या लोकांना माहिती आहे काय?

मेल्या शांत हो की जरा. अमेरिकेतल्या लोकांना अमेरिकेबाहेर जग असते हेच माहिती नसते तर बाकीचे काय माहिती असणार?

आशु जोग's picture

23 Sep 2014 - 12:04 pm | आशु जोग

नोकीया X2-02 सर्व प्रकारे गरजा पूर्ण करणारा ठरला.
उत्तम मुजिक क्वालिटी, कंप्यूटरशी सूसंगत हेडफोन.

महत्त्वाचे म्हणजे कीपॅड आहे. त्यामुळे इतरांपेक्षा टायपिंग स्पीड लय भारी मिळतो. मोबाईल दोन हाताने पकडावा लागत नाही.
स्क्रीनकडे न पाहताही ऑपरेट करता येतो. चुकून कोणतीही की दाबली गेली असे होत नाही
बॅटरीही ओक्के आहे.
ध्वनिमुद्रणाची क्वालिटी जब्बरदस्त
एफ रेडीयो-हेडफोन न लावता, अँटेना न लावता लागू शकते... २ जी सपोर्ट आहे

डुअल सिम, एफ एम ट्रान्समिटर(आपला मोबाईल हेच एक रेडीयो केंद्र)

कंजूस's picture

23 Sep 2014 - 1:33 pm | कंजूस

पण व्हिडीओ गचाळ आहे QCIF AT 10f/s .मला ऐफेम रेकॉर्डीँगसाठी हवा होता. तीन महिन्यांपूर्वी शोधला होता नाही मिळाला. कार्बनचा K20+घेतला

एफ एम ट्रान्समिटर(आपला मोबाईल हेच एक रेडीयो केंद्र)
याचा काय उपयोग ? कोणी याचा उपयोग केला आहे का ? तुमचे रेडियो केंद्र किती जण ऐकु शकतात ? त्याची प्रसारण क्षमता { किती अंतर } असते ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

आशु जोग's picture

23 Sep 2014 - 3:42 pm | आशु जोग

घरात, गाडीमधे
वायर न वापरता साध्या रेडीयोवर गाणी ऐकता येतात.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2012 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार

सदर लेखक भारतात राहतात. अमेरिकेतल्या लोकांना काय माहिती आहे, अन काही नाही याच्याशी देणे-घेणे नसावे.

सदर प्रतिसादक अमेरिकेत राहतात. भारतातल्या लोकांना काय माहिती हवी आहे आणि काय नाही याच्याशी त्यांना देणे-घेणे नसावे.

कळाले का तुला हे प्रतिसादाचे रसग्रहण ? तुम्ही इंडियन्सना....

असो..

आशु जोग's picture

13 Apr 2012 - 3:37 pm | आशु जोग

आपल्या सार्‍यांच्या अनुभवाच्या आधारे खात्री करून घेतली

हा फोन उत्तम आहे

बरे

यातली फीचर्स बाकी कशातच नाहीत

--

असलीच फीचर्स तर किम्मत गगनचुम्बी

कौन्तेय's picture

14 Apr 2012 - 7:18 pm | कौन्तेय

कुणीही भारतीयाने कितीही महागातला वा स्वस्तातला फोन घेताना त्यात देवनागरी वा आपल्याला हवे ते भारतीय भाषिक लेखन / वाचन होते की नाही याची खातरजमा करून मगच तो घ्यावा हे आवाहन मे बहुतेक मोबाइल फोनचे मूल्यांकन करणार्‍या साइट्सवर यथाउपस्थिती करत असतो.
शुभवार्ता ही की तुम्ही निवडलेल्या या फोनची कार्य-प्रणाली सिम्बियन एस४० असल्याने यात देवनागरी लेखन - वाचन सुविधा असण्याची शक्यता ९९% आहे. प्रत्यक्ष दुकानात उभे राहून त्यातील ब्राउझरवर लोकसत्ता वा सामना वा इतर कुठलीही मराठी साइट उघडून बघा (मिसळपावही का नको?). आणि एसेमेस पाठवताना वा लेखन भाषा सेट करताना त्यात भारतीय भाषा दिलेल्या आहेत वा नाहीत हेही पाहून घ्या. कळफलकावरच देवनागरी अक्षरे दिलेली असतील तर प्रश्नच मिटला.
मराठी एसेमेस पाठवण्यासाठी नोकियाने दिलेल्या देवनागरी कळफलकापेक्षा चांगला, फोनेटिक (इंग्रजी स्पेलिंगनुसार देवनागरी लिहिणारा) कळफलक असलेला indisms हा प्रोग्राम वापरावा. मजा येते. हे इंडीएसेमेस प्रकरण अशाही हस्तसंचांवर वापरता येते की ज्यांच्यावर मूलत: देवनागरी वा भारतीय भाषा दिसत नाहीत.

आशु जोग's picture

16 Apr 2012 - 2:21 pm | आशु जोग

यामधे प्लेलिस्ट बनवणे अतिशय अवघड आहे

चालू बंद करताना हा फोन उगाचच वायब्रेट होतो.
गरज नसताना कुणी डीवाइस वायब्रेट झालं की डोक्यात जातं.

नोकियावाल्याला विचारले तर म्हणाला, "वायब्रेट कंपल्सरी आहे"

हेडफोनचा जॅक मोबाइलमधे लॉक होत नाही, एक्स्प्रेस म्युजिकसारखेच

त्यामुळे अधुन मधुन हेडफोन अकारण मोबाइलपासून वेगळा होतो, निघतो

आणि गाणी मोबाइलमधून मोठ्याने गळायला लागतात.

चार्जिंग होताना, गाणी वाजवताना फोन उगाच गरम होतो.

कुणी इन्स्ट्रुमेंट अकारण गरम झालेलंही आम्हाला पटत नाही

आर्य's picture

16 Apr 2012 - 3:46 pm | आर्य

Nokia X2 हा फोन मी माझ्या बायकोला, तिच्या वाढदिवसाला भेट दिला ....
आज पर्यंत फक्त पश्चाताप करतोय ........... आणि त्या दादर नोकिया केअरची तर .....रा***भा*****मा***

लोअर परेल क्रोमा मधुन फोन घेतला......दुसर्‍या दिवशी चार्जीग करताना फोन हँग.... मेसेज ... "बॅटरी नॉट फुल्ली चार्जड" आणि फोन हँग..... हाच प्रकार अनेकदा झाला .....फोन हँग- मग काय बॅट्री काढा आणि परत चालु करा. ह्या प्रकारात चार्ज होत आलेली बॅटरी रिकामी ......हि तकरार घेऊन क्रोमात गेलो तर त्यांनी दादर नोकिया केअरचा रस्ता दाखवला. पहिल्यांदा सॉफ्टवेर अपडेट केले.....दुसर्‍यांदा बॅटरी दिल्लीला पाठवली (१५ दिवसांची निश्चिंती) बॅटरी बदलुन दिली आणि सांगीतले आता प्रॉब्लेम येणार नाही . तिसर्‍यांदा परत बॅटरी दिल्लीला - बॅटरी परत आली आणि सांगीतले प्रॉब्लेम नाही. पण Nokia X2 चा खेळ कुठे थांबतोय .........आणि त्यात फोन बायकोला दिलेला ..... मनस्ताप , डोकेदुखी, रोज ते नोकिया केअरची दिसायचं.... विचारु नका बायको म्हणायला लागली 'चांगल्या भावनेने भेट दिली नाही ' .........आता काय बोंबला....... मग माझी सटकली आणि ते दादर नोकिया केअर शिंगावर घेतले .....बेकार एकवले .....हँडसेट बॅटरी आणि सगळा डबाच दिल्लीला पाठवायला सांगीतला......... १५ दिवसांनी फोन आला....या कलेक्ट करायला .......अहो आश्चर्यम् ........फोन जैसे थे.........कोर्टात जायचा विचार केला होता पण शेवटी .......माझा एका मित्राने दुरुस्त करुन दिला. त्याने काय केले माहित नाही पण आता Nokia X2 चालू आहे. हे बाकी खरे .........चालू बंद करताना हा फोन उगाचच वायब्रेट होतो, हेडफोनचा जॅक मोबाइलमधे लॉक होत नाही .....वगैरे..

कंजूस's picture

23 Sep 2014 - 7:48 pm | कंजूस

एफएम आणि साउंड ऑडिओ रेकॉर्डीँग चांगले असेल तर किती उपयोग होतो ते सामान्य माणसासाठी साधा फोन इथे मिपावरच वाचा.

आता नवीन NOKIA X2वर लिहा.