नमस्कार मंडळी!
माझ्या चुलत भावाला युजीसी ची नेट (National Eligibility Test (NET)) जुन २०१२ ची परिक्षा द्यायची आहे. या नेट चे अधिकृत संकेतस्थळ हे आहे. तसेच या लिंकवर अधिक माहिती आहे आणि या लि़ंकवर फॉर्म कसा भरावा असली माहिती आहे.
या युजीसी च्या नेट परिक्षेच्या जुन २०१२ या दरम्यान होणार्या?परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात. वर उल्लेखलेल्या अधिकृत संकेतस्थळावर २०११ च्या परिक्षांचे वेळापत्रक किंवा तत्संबंधीत तारखा आहेत. त्या अर्थातच जुन्या व झालेल्या परिक्षांच्या आहेत. फॉर्म कसा भरावा या संकेतस्थळावरदेखील २०१२ संबंधी कोणतीही घोषणा नाही. त्यांच्या ईमेल पत्यावर २०१२ च्या परिक्षेबद्दल विचारणा केल्यास सरकारी खाक्याप्रमाणे उलट उत्तर अर्थातच आलेले नाही. त्यांचा संकेतस्थळावर दिलेला फोन नंबर देखील लागत नाही. हे संकेतस्थळ तयार करणार्या खाजगी संस्थेलाही ईमेल करून झालाय.
या अनधिकृत संकेतस्थळावर मात्र जुन २०१२ ला होणार्या परिक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे.
आपल्यापैकी कुणी या परिक्षेसाठी तयारी करत आहे काय? ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत काय आहे? तसेच हा अर्ज ऑनलाईन भरून त्या त्या भागातील टेस्ट सेंटर्स कडे जमा करावा लागतो काय? त्या टेस्ट सेंटर्सच्या यादीमध्ये केवळ वेगवेगळ्या विद्यापिठांची नावे आहेत. मग त्या विद्यापिठाकडे (आपल्या भागात पुणे विद्यापिठ) ह्या अर्जाच्या छायाप्रती द्याव्या काय?
पुणे विद्यापिठाची सेट परिक्षा असते. त्या संकेतस्थळावरदेखील २०१२ च्या परिक्षांची अजून अधिकृत घोषणा नाही.
या काथ्याकुटाचा उद्देश नेट परिक्षेच्या तारखा-मुदत यासंबंधी विचारणा जरी असला तरी सरकारी संकेतस्थळांवर माहिती कितपत अद्ययावत असते याविषयी चर्चा करण्याचा देखील आहे.
प्रतिक्रिया
10 Apr 2012 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>आपल्यापैकी कुणी या परिक्षेसाठी तयारी करत आहे काय ?
मी तरी नाही.
>>>>तसेच हा अर्ज ऑनलाईन भरून त्या त्या भागातील टेस्ट सेंटर्स कडे जमा करावा लागतो काय ?
हो. अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर एक प्रत विद्यापीठातील नेट-सेट विभागात जमा करावी लागते.
>>>त्या टेस्ट सेंटर्सच्या यादीमध्ये केवळ वेगवेगळ्या विद्यापिठांची नावे आहेत. मग त्या विद्यापिठाकडे (आपल्या भागात पुणे विद्यापिठ) ह्या अर्जाच्या छायाप्रती द्याव्या काय ?
माझ्या माहितीनुसार अर्ज कोणत्याही विद्यापीठात सादर करता येतो. आणि परिक्षा केंद्र देशातल्या कोणत्याही विद्यापीठाचे (परिक्षा अर्जावरील केंद्राची यादी असते त्यापैकी एक) केंद्र निवडता येते.
नेट परिक्षेची जाहिरात येऊन गेली आहे. म्हणजे जुन २०१२ च्या परिक्षेसाठीच्या तारखा निघून गेल्या आहेत. [ पाहा दुवा ]जुनची परिक्षा संपल्यानंतर नव्याने जाहिरात येईल. आणि अर्ज भरुन देण्याबद्दल अधिकृत माहितीही तिथेच युजीसीच्या संकेतस्थळावर अगदी अद्यावत असते असं माझं व्यक्तिगत मत आहे. तिथेच वेळापत्रकही उपलब्ध होईल.
आपल्या भावाला परीक्षेसाठी एका मिपाकराच्या हार्दिक शुभेच्छा. :)
मी दिलेली माहिती बरोबर असली तरी माझ्याच माहितीवर विसंबून राहू नये, ही नम्र विनंती. अधिक काही अद्यावत माहिती कळाली तर इथे डकवीनच.
-दिलीप बिरुटे
10 Apr 2012 - 9:08 pm | मोदक
व्यनी केला आहे.
10 Apr 2012 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, माहिती त्यांनी सार्वजनिक ठिकाणी विचारली आहे तर माहिती जर सार्वजनिक दिली तर बरी राहील असे वाटते. [आग्रह नाही] :)
वेळापत्रकाची माहिती आहे काय तुमच्या व्यनीत ? ( अर्ज भरतांना परीक्षा कधी आहे हे अर्जावर सांगितलेले असते असे काही तरी आठवते)
-दिलीप बिरुटे
11 Apr 2012 - 2:26 am | मोदक
पहिल्या कंसाशी सहमत आणि दुसर्या कंसाला अनुमोदन. ;-)
12 Apr 2012 - 8:53 am | मोदक
नेट परीक्षांचे दोन प्रकार आहेत.
१) CSIR UGC NET - फक्त सायन्स विषयांसाठी
२) UGC NET - फक्त आर्ट्स, कॉमर्स आणि एन्व्हारमेंटल सायन्स.
CSIR UGC NET ची माहिती CSIRHRDG.RES.IN वर मिळेल.
UGC NET ची जुनच्या परीक्षेची अॅड या महिन्यात साधारण दुसर्या आठवड्यात येणे अपेक्षीत आहे.. साईट चेकवत रहा (अॅड दोन महिने आधी येते.)
CSIR UGC NET ची जुनच्या परीक्षेची शेवटची तारीख १२ मार्च २०१२ होती.
पुणे विद्यापिठाच्या सेट परीक्षांची अॅड साधारणपणे ३ / ४ महिने आधी येते.. परीक्षांच्या तारखा फिक्स नसतात.. साईट चेकवत राहणे हा एकच उपाय आहे.
UGC ची लिंक पण वेळोवेळी चेकवत रहा.. रोजच्या वर्तनमानपत्रात पण अॅड येते.
काही अधीक माहिती लागली तर फोनव.
21 Apr 2012 - 2:00 am | पाषाणभेद
फारच उपयुक्त माहिती मिळाली. मोदक आणि बिरूटे सरांचे आभार.
आमच्या येथील एका मोठ्या (!!) शैक्षणीक संस्थेत ही माहिती विचारली असता तेथील प्राध्यापकांनाही ही माहिती मिळालेली नव्हती.
सरकारी संकेतस्थळे कधीही अद्ययावत नसतात हे आताच्या उदाहरणांवरून समजले. अधिकृत संकेतस्थळांवरही जी माहिती मिळाली नाही ती येथे मिळाली!
21 Apr 2012 - 2:02 am | पाषाणभेद
(सदरहू उप-प्रतिसाद धागा वर आणण्यासाठी नसून महत्वाची माहीती देण्याकरता दिलेला आहे.
गेल्याच आठवड्यात युजीसी चे संकेतस्थळ अद्ययावत केले गेले आहे. त्यानुसार जुन २०१२ मधील नेट (UGC NET Exam) च्या तारखा खालील प्रमाणे आहेत:-
Application Submission End Date : Monday; Apr. 30, 2012
Last date for receiving the documents* at the test center : Monday; May 07, 2012
Examination Date : Sunday; June 24, 2012
खाली काही सुचना देत आहे. त्यात इंग्रजी अक्षरे जाणूनबुजून टाकत आहे जेणेकरून आंतरजालावर शोध घेणार्या मराठी विद्यार्थ्यांना शोध घेणे सोपे जावे.
UGC NET (फक्त आर्ट्स, कॉमर्स आणि एन्व्हारमेंटल सायन्स) साठी अर्ज करणार्या उमेदवाराने ही साईट काळजीपुर्वक वाचावी. त्यातील सुचना एका कागदावर छापुन घेतल्यास उत्तम.
१)UGC NET साठी Online अर्ज करण्याआधी आपला Photo योग्य आकारात Scan करावा. (Scan your passport (PP) size photograph in JPEG format. Make sure it should be 206 X 240 Pixel dimension (w*h) and less than 300kb.)
२) State Bank मध्ये आपल्या category नुसार शुल्क भरावे. (Open: Rs. 450/- OBC: Rs. 225/-, PH: Rs. 110/- इत्यादी.) (The candidates are required to download the Bank Challan Performa from the UGC website and then deposit the requisite test fee in any branch of State Bank of India along with the bank charges (commission) of Rs.20/-.)
३) अर्ज Online भरावा लागतो. त्या अर्जाच्या दोन Copies आणि Attendance Slip (one copy) and Admission Card (one copy) यांची प्रिंट काढून त्यावर पुन्हा आपले फोटो डकवून, बँकेचे चलन जोडून व दोन पाकीटे आपल्या नावपत्यासह तुमच्या भागातील विद्यापिठाकडे पाठवावे. (UGC Delhi येथे पाठवू नये.) अर्जावर जोडलेल्या फोटोवर आपली क्रॉस सही व गॅझेटेड ऑफीसरची सहीशिक्का असला पाहीजे.
४) योग्य वेळात आपल्याला Attendance Slip व Admission Card विद्यापिठाकडून मिळेल. न मिळाल्यास विद्यापिठात (UGC नव्हे तर तुम्ही अर्ज पाठविलेल्या Test Center मध्ये)चौकशी करावी.