भर दुपारी बारा वाजता शनिवारवाड्यापाशी अत्रुप्त आत्म्याची वाट बघत उभा होतो. ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्याने तसे थोड्याश्या उशिरानेच आत्माजी हजर झाले. कसबा पेठेतील प्राचीन शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिराला भेट देण्याचा आजच्या भटकंतीचा उद्देश होता. साततोटी हौद चौकापासून अगदी जवळच हे मंदिर आहे.
त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गणेशपट्टीच्या वर शिल्पसमृद्ध कमान कोरलेली असून सर्वात वरील बाजूस शेषशायी भगवान विष्णू कोरलेला आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर यक्ष, किन्नर, गंधर्व, मोर, पोपट, भैरव, गजांतलक्ष्मी, मर्कटे अशी अनेक मांगल्यसूचक शिल्पे कोरलेली आहेत.
१. त्रिशुंड गणपती मंदिराची दर्शनी बाजू
२ व ३. चौकटीच्या बाजूस कोरलेले द्वारपाल
४. चौकटीवरील कमान
५. काही नक्षीदार शिल्पे
६. हत्तीशिल्प
७ व ८. भारवाहक यक्ष व गंधर्व प्रतिमा
इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत. हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचे चित्रीकरण करणारे हे शिल्प असावे असा काही अभ्यासकांचा कयास आहे. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली लवकरच हिंदुस्थानात इंग्रज आपला पाय रोवतील जणू याची भविष्यवाणीच ह्या शिल्पाद्वारे व्यक्त केलेली आहे. हे शिल्प बहुतेक १७५७ नंतर कोरलेले असावे.
९. एकशिंगी गेंड्याचे एकमेवाद्वितीय असे शिल्प
१०. डाव्या बाजूस कोरलेला गेंडा
११. उजव्या बाजूस कोरलेला गेंडा
मंदिराच्या दर्शनी बाजूच्या डाव्या कोपर्यात रखुमाईचे शिल्प तर डाव्या बाजूच्या प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठ्लाचे शिल्प कोरलेले आहे. तसेच पुढे जाता एका चौकटीत नटराजाची अतिशय देखणी मूर्ती कोरलेली दिसते.
१२ व १३. विठ्ठल रखुमाई
१४. नटराजाची अतिशय रेखीव मूर्ती
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू हंसाचे रूप घेऊन अंत शोधायला गेला तर ब्रह्माने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
१५. अद्भूत शिवलिंग
१६. शिवलिंग अधिक जवळून
हे सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच कंबरभर पाणी असते.
गर्भगृहाच्याही दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून वर नक्षीदार कमान आहे. त्याच्यावर तीन शिलालेख कोरलेले आहेत. पैकी दोन संस्कृतात असून एक फारसी भाषेत कोरलेला आहे. पहिल्या शिलालेखात मंदिराच्या स्थापनेचा काल व रामेश्वराची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसर्या शिलालेखात गीतेतील नमनाचा श्लोक कोरलेला आहे तर फारसी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असलेले नमूद केले आहे.
१७. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवरील गजांतलक्ष्मी शिल्प
१८. कमानीवरील संस्कृत आणि फारसी शिलालेख
गाभार्यात गेलो. नावाप्रमाणेच गणेश मूर्तीला तीन सोंडा आहेत. कदाचित ही दत्तस्वरूपातील गणेशमूर्ती असावी म्हणूनही मंदिराच्या बांधणीत ब्रह्मा, विष्णू, शंकराच्या संदर्भातील शिल्पे येथे बरीच कोरलेली दिसतात.
एकमुख, तीन सोंडा आणि सहा हात अशीरचना असलेली ही मयुरारूढ मूर्ती मूळची काळ्या पाषाणातील असून आता पूर्णपणे शेंदूरविलेपीत आहे. सत्व, तम आणि रजोगुणांनी युक्त असलेला ह्या गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता बसलेली आहे. हातात परशू, अंकुश आदी आयुधे आहेत.
मूर्तीच्या पाठीमागच्या भिंतीवर अतिशय रेखीव अशी शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली असून त्यावरील कमानीवर देखणे गणेश यंत्र कोरलेले आहे.
१९. त्रिशुंड गणपती
२०. त्रिशुंड गणपती
२१. गणेशमूर्तीच्या पाठीमागील बाजूस कोरलेला शेषशायी श्रीविष्णू
२२. त्यावर कोरलेले गणेशयंत्र
२३. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२४. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२५. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
मंदिराला शिखर नसल्याने बर्याच काळपर्यंत हे तसे दुर्ल़क्षितच होते. शिखराच्या जागी स्वर्गमंडपासारखे सपाट वर्तुळाकार छत आहे. पण हल्ली मंदिराची चांगली निगा राखली जातेय.
गणेशाचे दर्शन घेऊन मी आणि अत्रुप्त आत्मा बाहेर पडलो ते आता पुढच्या टप्प्यात पुण्यातली अशीच काही दुर्लक्षित पण शिल्पसमृद्ध मंदिरे बघण्याचे मनावर घेऊनच.
पण आता आमची पावले वळली ती मात्र जुन्याबाजाराकडे.
प्रतिक्रिया
4 Apr 2012 - 8:29 pm | निनाद मुक्काम प...
अवर्णीय
खरच हेरीटेज
4 Apr 2012 - 8:32 pm | यकु
व्वा!
मंदीराची ओळख उत्कृष्ठ!
वल्ली शब्द संपले.
4 Apr 2012 - 8:47 pm | किसन शिंदे
जबराट रे वल्ली!
मंदिराची छान ओळख करून करून दिली आहेस.
(अवांतर: दिवाळीचा आकाशकंदील अजुनपर्यंत का काढला नसावा ब्वाॅ?)
4 Apr 2012 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा
वल्ली,माहिती छान लिहिली आहे... शिवलिंगाचे फोटो जबर्या येणार हा कयास खरा ठरला... :-)
बाकिचेही झ्याक टिपले गेलेत.. येक नंबर झालय काम..
तसेच पुल टाकल्याबद्दल धन्यवाद...:-)
अता थोडिशी आमची मंदिर व्यवस्थेविषयी भर:-तिथे जोशी नावाच्या एक आजिबाई ह्या मंदिराची देखभाल करतात...त्यांनी सांगितलं,की ६१सालच्या पुरापासुन हे मंदिर त्यांच्या कडे सांभाळायला आलं आहे...त्या स्वतः सर्व साफसफाई,झाडपुस,देवाचा नैवेद्य करणे ही कामं करतात..पण अजुनही मंदिराच्या डागडुजी साठी कुणाकडुन काही मिळत नाही, मंदिर तसं आडबाजुला,म्हणजे आत,आणी अप्रसिद्ध असल्यामुळे उत्पन्न फारसं नाही,त्यामुळे आत खराब होत चाल्लेली फरशी वगैरेंसाठी पैसे नाहित....तसच बाहेरचा उंबर जोत्यातनं मुळासह आत घुसायच्या बेतात आला आहे...(तळघरात पाणी असल्यामुळे...) तो ही तोडायला हवा आहे..पण.... !
आपल्या अश्या जुन्या गोष्टींकडे पाहायला आमच्या शिवाजी ट्रेल सारखी संघटना असायला हवी असं राहुन राहुन मनात येत होतं.. :-(
4 Apr 2012 - 9:07 pm | नरेंद्र गोळे
वल्ली,
सुंदर शिल्पाकृतींनी नटलेल्या सुरेख मंदिराचे, चोखंदळपणे निवडलेले आणि अत्यंत कौशल्याने चौकटबद्ध केलेले फोटो आवडले. आम्ही अनेकदा पुण्यास जातो. मात्र कधीही कुणी याबद्दल बोलल्याचे ऐकलेले नाही.
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू हंसाचे रूप घेऊन अंत शोधायला गेला तर ब्रह्माने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.>>>>> असेच एक शिल्प वेरूळलाही आहे.
मात्र तिथे मी ऐकलेली कथा अशी विष्णू वराह रूप घेऊन पाताळात गेला. थांग लागत नाही म्हणून परत आला. ब्रम्हा हंस रूपाने आकाशात गेला आणि परत येऊन थांग लागला असे खोटेच सांगू लागला. तेव्हा शिवाने रागावून ब्रम्हदेवाच्या पूर्वी पाच (चारही दिशांना चार आणि ऊर्ध्व दिशेला एक) असलेल्या शिरांपैकी ऊर्ध्व दिशेच्या शिराचा शिरच्छेद केला.
असो.
एकशिंगी गेंड्याचे शिल्प मात्र आजवर इतरत्र पाहण्यात आलेले नाही.
4 Apr 2012 - 9:13 pm | रेवती
कधी ऐकले नव्हते याबद्दल. नविन माहिती.
4 Apr 2012 - 9:46 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच मस्त! अप्रतिम! तळ्घरात पाणी कुठून येतं ते?
4 Apr 2012 - 9:55 pm | प्रचेतस
तळघरात जिवंत झरा आहे. दर गुरुपौर्णिमेला त्यातील पाणी उपसून तळघर स्वच्छ करून दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं.
4 Apr 2012 - 10:23 pm | मृगनयनी
वल्ली'जी.. थॅन्क यु वेरी वेरी मच!!!! :) :)
आम्ही लहानपणी या गणपतीला नियमित जायचो.. त्यास "त्रिसोंड्या गणपती" म्हणण्याची पद्धत आजही वाडा संस्कृतीत / जुन्या पुणेकरांमध्ये रुढ आहे.
नन्तर नन्तर फक्त गणपतीच्या दिवसात एखाद्या दिवशी याचा नम्बर लागायचा.. पण आपण जितक्या पारखीपणे मन्दिरातल्या कोरीव मूर्ती - चित्रांचे सौंदर्य टिपलेले आहे.. ते केवळ अप्रतिम!!! :)
5 Apr 2012 - 5:30 pm | किचेन
हो तळघरात जिवंत झरा आहे.आणि मी अस ऐकलय कि दर गुरुपौमिमेला त्याच पाणी कलसावरून वाहत.एकदोनदा बघायलाही गेले होते पण खूप गर्दी होती,काही दिसलं नाही.
पत्ता जरा दितेलमध्ये सांगायला हवा होता.कारण तुमच्या चित्रांवरून वाटेल हे मंदिर अक्ख्या पुण्यात वर्ल्ड फेमस आहे.पण मंदिराच्या शेजारून गेल तरी पत्ता लागत नाही.
6 Apr 2012 - 12:02 am | सुहास..
किचेन ला दितेलमध्ये पत्ता सांग !
बाकी लेख, फोटो , माहीती ..नेहमीप्रमाणे ..इंडियान वल्ली स्टाईल !
6 Apr 2012 - 1:22 pm | प्रचेतस
मंदिराचा पत्ता:
कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुलानंतर उजव्या बाजूस आहे. कमला नेहरू हॉस्पिटलच्या जवळच. पण खुद्द कसब्यातील लोकांनाही ते फारसे माहित नसल्याने तसे विचारतच जावे लागते.
7 Apr 2012 - 8:39 am | चौकटराजा
आपण खजुराहो, कोनार्क,बेलूर, सोमनाथ पूर, माउंट अबू, हलेबीड, हंपी,पत्तडकल , बदामी, ऐहोळे जेसलमेर मंदोर, अवंतीपुरा सगळे बघून आलो व या देवळाला विसरलो या बद्द्ल शरम वाटली पण कसबा पेठ करानाच हे फारसे माहित नाही हे वाचून शरम पळाली.पण पापविमोचनार्थ हे ठिकाण लवकरात लवकर पहाणेत ये ईल.
वल्ली बुवा ! सलाम !
11 Apr 2012 - 2:37 pm | किचेन
मला मंदिर कुठे आहे ते माहित आहे.मी मिपाकरांना कलावं म्हणून पत्ता टाका अशी सूचना केली.मंदिर ज्या भागात आहेत तो रस्ता थोडा शांत आहे.मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे आणि रस्ता पूर्व- पश्चिम असा आहे.त्यामुळे आपण मंदिराशेजारून गेलो तरी कळत नाही.ह्या मंदिराच्या बाहेर टिपिकल हार फुल घेऊन बसलेल्या बायका पण नाहीत.
पण अनेक कसबा सोमवार-मंगळवार पेठेतल्या लोकांना हे मंदिर माहित नाही हे सत्य आहे.
6 Apr 2012 - 11:41 am | पैसा
दाखवलात का आपला पुणेरी बाणा?
4 Apr 2012 - 11:37 pm | मोदक
सुंदर वर्णन रे...
एक सूचनावजा विनंती, इथेच थांबू नको.. एक चांगली लेखमाला तयार करण्याचे सामर्थ्य आहे तुझ्या लेखणीत. पुढचे भागही येवूदेत.
5 Apr 2012 - 12:03 am | ५० फक्त
मस्त रे, एकदम मस्त. कधीतरी जाईन इथं, फोटो नेहमीप्रमाणेच जबरदस्त आणि माहिती देखील, आम्ही गेलो असतो तर नक्षीचे दगड म्हणुन परत आलो असतो झालं.
5 Apr 2012 - 9:15 am | प्यारे१
मोदकाला आणि दुसर्या मोदकाला +११११.
वाचताना क्षणभर मिलींद गुणाजीचं भटकंती मधलं निवेदन त्याच्याच आवाजात ऐकतोय असं वाटलं.
फारच देखणं उतरलंय सगळं....
उद्या एखादा 'माननीय' देवळाचा शेजार पाजार 'विकत' घेऊन देवळाचा 'जीर्णोद्धार' करेल तेव्हा 'च' देऊळ 'सुरक्षित' होईल असे खेदाने नमूद करावेसे वाटते. :(
5 Apr 2012 - 5:13 am | सानिकास्वप्निल
मस्त फोटो आणी छान माहिती दिलीत तुम्ही :)
5 Apr 2012 - 7:44 am | स्पा
अप्रतिम फोटो....
मस्तच रे वल्ली
सुट्टीचा छान सदुपयोग चाललाय
5 Apr 2012 - 9:10 am | वपाडाव
मित्रांनो, लगेच कुच केल्या जाइल... अन फटू इथे अपलोडव्ण्यात येइल...
5 Apr 2012 - 10:04 am | पियुशा
फोटु अन माहीती छानच :)
5 Apr 2012 - 10:04 am | मदनबाण
हा लेख परत एकदा वेळ मिळताच शांतपणे बसुन वाचीन...
सर्व फोटो मस्त आहेत...
भगवान विष्णुची शेष शैया पाहुन, जालावर वाचन करताना कंबोडियातील अंकोरवाट (Angkor Wat) येथील ही मुद्रा पाहिली होती ती आठवली !
Anantasayana Vishnu:-
(चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.)
5 Apr 2012 - 10:31 am | मुक्त विहारि
मस्त माहिती दिलीत...
धन्यवाद...
5 Apr 2012 - 10:43 am | साबु
मजा आली वाचताना...
5 Apr 2012 - 10:49 am | अमोल केळकर
सुरेख मंदिर .
अमोल केळकर
5 Apr 2012 - 10:51 am | लीलाधर
वल्ल्या खरच अप्रतिम आणि सुरेख वर्णन नेहमीच्याच शैलीत आणि फोटो पण फारच अप्रतिम आले आहेत :)
5 Apr 2012 - 10:58 am | मनराव
एकदम झक्कास माहिती.....
5 Apr 2012 - 11:18 am | बॅटमॅन
वा! अप्रतिम देवळाची अप्रतिम माहिती!!!! वल्लीशेठ जियो _/\_
5 Apr 2012 - 11:25 am | निश
वल्ली साहेब , एक अप्रतिम लेख.
माझ्या आजोबांकडुन गोडसे गुरुजी म्हणायचे त्याना. अलिबागला रहायचे, त्यांच्या कडुन ऐकायचो लहानपणी ह्या मंदिराबद्दल.
दर महिन्याला पुण्याला येहुनही आज पावेतो त्या मंदिरात जाणे झाले नव्हते. पण आज तुमच्या मुळे मंदिराचे फोटो बघायला मिळाले.
मस्त आजोबांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मस्त खरेच मस्त फोटो.
10 Apr 2012 - 9:02 am | वपाडाव
शब्द जपुन अन जागच्या जागी वापरा हो निशसाहेब....
10 Apr 2012 - 6:55 pm | निश
वपाडाव साहेब, नक्कीच माझि चुक झाली त्या वाक्यात.
आजोबांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या एवढच म्हणायच होत मला.
मस्त लेख आहे अस म्हणायच होत मला.
5 Apr 2012 - 3:51 pm | प्रास
लगे रहो वल्लीशेठ!
अप्रतिम फोटो आणि अत्यंत सुसंगत वर्णन. आवडलं एकदम भाऊ.....
5 Apr 2012 - 4:13 pm | अमृत
मंदीर आणि वृत्तांत दोन्ही.
अमृत
5 Apr 2012 - 4:36 pm | मी-सौरभ
सहमत
5 Apr 2012 - 7:17 pm | अन्या दातार
सहमत.
5 Apr 2012 - 4:57 pm | नि३सोलपुरकर
वल्ली शेट,
सुरेख वर्णन .
मागच्याच आठवड्यात सहपरिवार भेट दिली होती..
खरच अप्रतिम आणि सुरेख वर्णन ,जाणकारा बरोबर अश्या ठिकाणी भेट देण्याची मजा काही और असते.
अवातर : भटजी बुवा हेवा वाटतो तुमचा..
5 Apr 2012 - 6:57 pm | शुचि
आज सकाळी सकाळी मेजवानी मिळाली. फार म्हणजे फारच सुरेख छायाचित्रे आणि वर्णन. खरोखर अप्रतिम.
5 Apr 2012 - 11:51 pm | धनंजय
छान.
फारसी शिलालेखात तारीख ११६७ (म्हणजे सन १७५४) अशी दिली आहे का?
(संस्कृतच नीट वाचता येत नाही, आणि मी फारसी वाचायला चाललो आहे...)
6 Apr 2012 - 1:26 pm | प्रचेतस
फारसी शिलालेखाचे संपूर्ण वाचन माझ्यापाशी नाही त्यामुळे त्यातील तारखेबद्दल सांगता येणार नाही पण त्यात हे स्थान गुरुदेवदत्तांचे आहे असा उल्लेख मात्र नक्कीच अहे.
6 Apr 2012 - 11:07 am | सर्वसाक्षी
वल्लीशेठ,
माहिती बद्दल धन्यवाद. आई वडिल येत्या मंगळवारी कसब्याच्या गणपतीला जाणार आहेत, त्यांना त्रिशुंड गणेशाचेही दर्शन घ्यायला सांगेन. पुण्याला आलो की मीही दर्शनाला जाईन.
चांगली माहिती आणि फोटो, धन्यवाद.
6 Apr 2012 - 12:51 pm | पिंगू
छ्या. काही उपयोग नाही माझा. कसबा पेठेत राहत असून सुद्धा मला हे मंदीर माहित नाही.. :(
- पिंगू
6 Apr 2012 - 1:09 pm | प्यारे१
एक चुल्लू पानी ले...
पानी ज्यादा ठंडा या गरम ना हो...
उस्स चुल्लू को साफ रक्खे..
उसमें डुबकी लगाये...
पाच मिनीट अंदर ही रहे...
पाच मिनीट से पेहले बाहर ना आए..
आपकी डिश तय्यार. ;)
6 Apr 2012 - 2:38 pm | पिंगू
सध्या पाण्याचा दुष्काळ पडलाय रे... ;)
- पिंगू
10 Apr 2012 - 9:01 am | वपाडाव
तु कसब्यात कुठं राहतोस? याचं उत्तर खवत डकव...
6 Apr 2012 - 3:14 pm | सुहास झेले
वल्लीशेठ, अप्रतिम फोटो आणि वृत्तांत...... :) :)
6 Apr 2012 - 3:21 pm | आत्मशून्य
मस्त.
6 Apr 2012 - 4:20 pm | प्रकाश घाटपांडे
खास वल्ली टच असलेले लेखन! आवडले.
6 Apr 2012 - 4:23 pm | स्मिता.
मंदिराचे वर्णन आणि फोटो आवडले.
6 Apr 2012 - 4:28 pm | मृत्युन्जय
पुण्यात असुनही कधी बघितलेले नव्हते. तुला कश्या रे माहिती असतात एवढ्या सगळ्या गोष्टी? सलाम तुला आपला.
7 Apr 2012 - 9:51 am | स्पा
तुला कश्या रे माहिती असतात एवढ्या सगळ्या गोष्टी?
उगाच नाही त्याला पुणीयाना अर्रर हे आपल.. इंडियाना जोन्स म्हणत
7 Apr 2012 - 8:49 am | चौकटराजा
भारतात अनेक प्रकारचे प्राणी , अक्राळ विक्राळ चेहरे यांचा वावर शिल्पात दिसून येतो. पण गेंडा हा प्राणी पाहिल्याचे स्मरत नाही.
या देवळातील सर्वात वेगळी अशी हीच गोष्ट वाटते.
7 Apr 2012 - 9:38 am | झकासराव
जबरदस्त नजर देता तुम्ही वाचकाना. :)
7 Apr 2012 - 9:50 am | स्पा
३ सोंड असलेला गणपती पहिल्यांदाच पहिला..
सहीच
7 Apr 2012 - 11:11 pm | चिगो
आमचा गेंडा ह्या मंदीरात शिल्पबद्ध केलेला असल्याने विशेष आवडल्या गेले आहे.. ;-)
हे पटतंय..
अतिशय सुरेख ओळख, वल्लीशेठ.. तुमच्या नजरेनी लेणी, शिल्पे आणि मंदीरे बघायला शिकावे म्हणतो.. अशी दुर्लक्षित पण अतिशय सुंदर, शिल्पांनी नटलेली मंदीरे असतात ज्यांच्याकडे नजरच जात नाही लोकांची.. नागपुरला मॉरीस चौक टी पॉईन्ट ला एक शिवमंदीर आहे जुने, ज्याच्यावर दशावतारांची लघुशिल्पे आहेत. रोज हजारो लोक जातात त्याच्याजवळून, पण कुणाला आवर्जून थांबतांना बघितलं नाहीये..
अत्यंत माहितीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद..
11 Apr 2012 - 6:45 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि माहिती, दोन्ही आवडले.
स्वाती
11 Apr 2012 - 10:00 pm | मोदक
हेरीटेज पुणे: भाग २ ची वाट पाहत आहे.
11 Apr 2012 - 10:58 pm | अन्या दातार
मी पण
(रच्याकने, आता भटजींना घेऊन मंदिरात जा, पण जरा वेगळ्या कारणासाठी ;) )
11 Apr 2012 - 11:51 pm | प्रचेतस
तसेच एखादे सुंदर मंदीर मिळाले तर लवकरच. :)
12 Apr 2012 - 7:23 am | अत्रुप्त आत्मा
@तसेच एखादे सुंदर मंदीर मिळाले तर लवकरच. >> तुमची रायगड स्वारी अटोपली की, सोमवार/मंगळवार पेठेत हल्ला करुया... तिकडे लै लै जुनी शंकराची मंदिरं आहेत... :-)
16 Apr 2012 - 11:39 am | मोदक
मारुती मंदीरे तेवढी टाळा हो...
(अजून काही वर्षे तरी.. :-D)
17 Apr 2012 - 6:44 am | अत्रुप्त आत्मा
@अजून काही वर्षे तरी.. >>> का...?का...? आंम्ही आयुष्यभर टाळू ;-)
13 May 2012 - 12:09 pm | आदित्यराजे
गुगल नकाशावर अंकित करून इथे वाटाल काय कोणी ? पुण्यातली फारशी माहिती नाही हो ! कसबा पेठेतली तर नाहीच नाही
:(
14 May 2012 - 8:43 pm | kamalakant samant
लेख छानच आहे.
तळघरात कोणाची समाधी आहे ते लिहीले असते कि॑वा त्याबद्दल अधिक माहिती
दिली असती तर बरे झाले असते.
तिथे समाधी आहे असे म्हणतात.
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
7 May 2014 - 8:04 pm | सह्यमित्र
ह्या मन्दिरा बद्दल वाचून फार आनन्द झाला. अनेक वर्षे ह्या भागात घालविली आहेत. मन्दिर खूप सुन्दर आहे. हा भाग पूर्वी गोसवीपुरा म्हणुन प्र॑सिद्ध होता. येथे एक छोटे भुयार आहे (आत आल्यवर लगेच उजव्या बाजुला) हे गणेश मूर्ति च्या बरोबर खाली एक समाधी आहे तेथे जाते. भुयारात साधारण १ फूट पाणी असते. हे भुयार दर वर्षी गुरुपौर्णिमेला उघडतात. एरवी ते बन्द असते. हे मन्दिर हेमाड्पन्ती शैलीत बान्धले आहे.
एक छोटीशी दुरुस्ती, हे मन्दिर कसबा पेठेत नसून सोमवार पेठेत आहे.
7 May 2014 - 10:14 pm | प्रचेतस
धन्यवाद.
मात्र हे मंदिर हेमाडपंती शैलीत नाही. राजस्थानी, माळवा अशा मिश्र शैलींमध्ये आहे.
7 May 2014 - 9:58 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर !!
8 May 2014 - 12:26 am | एस
विशेषतः एकशिंगी गेंड्याचे शिल्प फारच आवडले... धन्यवाद इतक्या सुंदर लेखाबद्दल वल्ली!
8 May 2014 - 12:58 am | लॉरी टांगटूंगकर
वर काढणार्याला धन्स... बाकी अॅज युज्वल झकास धागा.