कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो

छो.राजन's picture
छो.राजन in काथ्याकूट
29 Mar 2012 - 10:56 pm
गाभा: 

मी गेले १५ वर्ष भारता बाहेर राहत आहे. Ankle ची शस्त्रक्रिया अमेरिकेत करून recover होण्या
साठी दादर / पुण्याला ५ महिने राहिलो. वेळ municipal निवडणुका ची होती.रोज पापर वाचून मन चलबिचल व्हायचे. पेपर मदगे रोज १०-१२ लोक कार / मुन्किअप्ल truck च्या धडकेने मरतात आहेत. कुठे तेथे KEM / Saasson हॉस्पिटल मध्ये रोग्या ना साधी उशी सुधा मिळत नाही. पण इकडे
माझ्या देश्वासियान कडे खूप पैसा आहे. election ला आणि ब्राष्ट नेत्यान पुन्हा निवडून द्याला. आजून रोज loudspeekar वगेरे वेगळेच. कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो?
हीच काय जीवन जगण्याची पद्धत आहे?

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

29 Mar 2012 - 11:12 pm | सर्वसाक्षी

राजकारणात जायच, निवडुन यायच तर पैसा गुंतवावाच लागतो. एकदा निवडुन आलं की हजारपटीने वसुली हमखास.

पैसा कुठुन येतो? आपणच देतो - कर रुपाने:)

अहो लाऊडस्पीकरचे काय घेऊन बसलात फारच नगण्य खर्च आहे तो. राजकारणी फारच मोठे, एकदा मामुली सरकारी नोकरांची मालमत्ता पाहा. डोळे फिरतील.

छो.राजन's picture

29 Mar 2012 - 11:42 pm | छो.राजन

सहमत, लौद्स्पीकेर चे उधहरण झाले. सर्वसामान्य जनतेला शांततेने जागून देत नाही हि यंत्रणा. आपणच काही तरी केले पाहिजे. शेवटी आपलाच पैसा आहे तो. आपण निवडून देलेल्या भ्रष्ट नेत्य्याची मिरवणूक देल्ही च्या कोर्टातून पुण्याच्या ऐरपोर्त वरून बघितली आहे.आणि लोह्गओन ऐर्पोर्त वर व्हील चेर वरून हा तमाच्षा ३ तासबघून मनात खूप चीड आले धन्यवाद त्या मत दात्या ला

दादा कोंडके's picture

29 Mar 2012 - 11:56 pm | दादा कोंडके

हीच काय जीवन जगण्याची पद्धत आहे?

श्रीमंत लोकांच्या गरीब देशात हे असं आहे...

योग्यवेळी बाहेर गेलेली लोकं सुखी आहेत. एक माणूस म्हणून 'क्वालीटी लाइफ' जगताहेत. हा, पण मग दर सात-आठ महिन्यांनी नॉस्टॅल्जीक व्हायला होइल, पण त्याला इलाज नाही. :)

प्रचंड लोकसंख्या, खालावलेली नितीमत्ता, स्त्रियांचं कमी होणारं प्रमाण, आर्थिक विषमता, नैसर्गीक संपत्तीचा र्‍हास यामुळे फार नाही, पुढच्या १०-१२ वर्षात अनागोंदी माजून भारताचे तुकडे होतील. ग्रीनकार्ड नाही तर नाही त्यातल्या त्यात चांगल्या तुकड्यात उरलेलं आयुक्ष जावं म्हणजे म्हसोबा पावला. :)

छो.राजन's picture

30 Mar 2012 - 2:31 am | छो.राजन

दादांना मनाचा मुजरा,
अगदी थोरल्या दादा सारखं बोललात. थोडक्या शब्दात सगळ काही सांगितलं.
ग्रीन कार्ड च सवाल नाही. देश्या बाहेर राहून पर देशात नागरिकत्व पत्करून सुधा आपल्या जन्म दात्या देशाची काळजी वाटते. अप्ला पैसा ठीक हातात अहे का?

नितिन थत्ते's picture

31 Mar 2012 - 8:54 am | नितिन थत्ते

>>पुढच्या १०-१२ वर्षात अनागोंदी माजून भारताचे तुकडे होतील.

काय राव !!! या भविष्यवाणीवर चर्चिलपासूनचे लोक गेली ६०-६५ वर्षे पैजा लावताहेत. ;)

दादा कोंडके's picture

31 Mar 2012 - 2:31 pm | दादा कोंडके

काय राव !!! या भविष्यवाणीवर चर्चिलपासूनचे लोक गेली ६०-६५ वर्षे पैजा लावताहेत.

मागच्या ६०-६५ वर्षात नकाशात दाखवता येण्यासारखे तुकडे झाले नसतील पण 'अखंड भारत वर्ष', 'मेरा भारत महान' वगैरे कवी कल्पनांचा कचरा झाला आहे असं नाही वाटत?

एकूणच या बाबतीत आशावादी लोकांचा खरच हेवा वाटतो. :(

दादाची परत एकदा आठवण आली.

अमितसांगली's picture

30 Mar 2012 - 8:49 am | अमितसांगली

निवडणुकीतील गैरप्रकार, भ्रष्टाचार हे शब्द आता सामान्य भारतीयांसाठी गुळगुळीत झाले आहेत.

संपत's picture

30 Mar 2012 - 10:20 am | संपत

आम्ही आमच्या देशाचे पाहून घेऊ हो.. तुम्ही नका जीवाला फार त्रास करून घेऊ. तुम्ही १५ वर्षांपूर्वी देश सोडून गेलात. १५ वर्षांमध्ये देशात निदान काही बाबतीत तर सुधारणा झालीच आहे. पुढेही होत राहील..

छो.राजन's picture

30 Mar 2012 - 11:49 pm | छो.राजन

आम्ही वर्षातले पाच महिने भारतात राहतो. पण नवीन युवा पिढी ने काही तरी बदल करायला पाहिजे.
जे चालले आहे ते काह्रे ठीक नाही. तुम्ही आणि आम्ही सगळेजण सारखे पण जरा आत्मपरीक्षण करयला हवे.

मी-सौरभ's picture

30 Mar 2012 - 10:27 am | मी-सौरभ

काका,
तुम्ही कविता करता का?
टाका ना एखादी ....

(तुमच्या लिखाणाचा फॅण)

प्यारे१'s picture

30 Mar 2012 - 10:35 am | प्यारे१

रंग दे बसंती आठवला. माधवन काहीतरी म्हणत अस्तो मरण्याआधी.

विजुभाऊ's picture

30 Mar 2012 - 10:49 am | विजुभाऊ

संपत यांच्याशी सहमत आहे.
लोकांकडुन कर रूपाने पैसा मिळतो.
डेफिसिट बजेट च्या नावाखाली नसलेला पैसा खर्च करता येतो.
ब्राष्ट नेत्यन आजून कय हव्य
पेपरमदगे कय यत त्य पेकषा जे यत न्है ते बरच कही अस्तं.
इथले देश्वासीय कसे जग्तात याची चिंता १५ वर्षांपेकाषा भैर र्‍हैलेल्यानी करणे हाच एक मोठ्ठ्थ्ठ्ठ्ठा विनोद आहे.
इतके जोरात विनोदु नका भौ

छो.राजन's picture

30 Mar 2012 - 9:06 pm | छो.राजन

जरी गेली काही वर्षे बाहेर राहत असलेली लोकां काहीच अधिकार नाही? बाहेर राहून भारतात गुंतवणूक करतात. जेव्ह्ना व्यक्ती घरा बाहे पडते तेंव्हा काही तरी विचारा ला नवी दिशा मिळते. जरूर आपण भले मी पा वर गेले काही वर्ष असाल पण प्रतसाद जरा जपून आणि विचार पुर्वक देण्ने असे वाटते.

पैसा's picture

30 Mar 2012 - 11:07 am | पैसा

मिसळपाववर तुमच्या पहिल्या लेखाचं स्वागत. तुम्हाला मराठी टाईप करायला जरा प्रॉब्लेम येतो आहे असं वाटतं. त्यासाठी मदत http://www.misalpav.com/node/1312 इथे आहे.

एवढ्या वर्षांत तुम्ही सलग फारसे भारतात राहिला नव्हतात असं समजते. पण उपचारानंतर रिकव्हरीसाठी भारतात का रहावं लागलं? फार वैयक्तिक होत नसेल तर सांगाल का? अमेरिकेत आणि भारतात रहाण्याचे फायदे तोटे वेगवेगळे आहेत.

(हे सगळं तुम्ही खरेच नवीन आयडी आहात असं समजून लिहीत आहे. नाहीतर पूर्ण प्रतिसाद रद्द समजावा. :))

चिंतामणी's picture

31 Mar 2012 - 10:24 am | चिंतामणी

>>>एवढ्या वर्षांत तुम्ही सलग फारसे भारतात राहिला नव्हतात असं समजते. पण उपचारानंतर रिकव्हरीसाठी भारतात का रहावं लागलं? फार वैयक्तिक होत नसेल तर सांगाल का?

या बद्दल समजून घ्यायला आवडेल.

काय करणार. असे वाटले होते कि जास्त आराम भारतात मिळेल पण तसे काही होण्या ऐवजी. जास्तच त्रागा आणि वैताग.वेळ चुकली होती बहुतेक, election ची वेळ होती ती.

मोझेस's picture

30 Mar 2012 - 6:53 pm | मोझेस

ईथेच आपल्या लोकांचे चुकते. साठ आणि सत्तरच्या दशकात सुशिक्षित लोक राजकारणांत गेले नाहित. त्याने काय झाले ?
भ्रष्टाचार प्रचंड वाढला

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार

पण 'छोटा राजन' नावाचे (पक्षी : व्यक्तीचे) आकर्षण वाटणार्‍याने हे असले प्रश्न विचारणे आणि उपदेश करणे बघून अंमळ मौज वाटली.

चांगला विचार करून डिसेंबर २०११ मध्ये माझ्या शहरात नगर परिषदेची निवडणूक लढविली. चांगल्या १५ दिवस रजा टाकली. हे १५ दिवस सर्व जवळून पहिला. रात्री लोक उशिरा पर्यंत जागी असत, का तर कुणी उमेदार पैसे वाटायला येईल म्हणून. येथे गरीब सुद्धा गरिबाला लुटत आहे, साक्षात कृष्णाचा राज्यामध्ये सुद्धा लोक गरीब होते असे म्हणतात, मग अशा मूर्ख आणि जराही लायक नसलेल्या राजकारणी लोकांच्या राज्यामध्ये काय अवस्था होईल.

काय करणार, मागच्या प्रतिसाद वरून जास्त लिहावेसे वाटत नाही. ज्यांनी अनुभवला नाही, आपल्या गावातून बाहेर पडून भारत वेगळ्या दृष्टीकोनातून बघितला नाही, आणि पर देशात राहून बहरतीय एकॉनोमिला मजबूत करायला बघतात त्यांना हे विनोद लोक विनोदी म्हणून हसतात. देव त्यांचे भले करो. आणि अजून कृपाशंकर, कलमाडी नको होऊ देत.

एकाच षटकात (पक्षी: धाग्यात) सहा विनोदी षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगच्या तोडीचाच आहे, व्वा!

१. शस्त्रक्रिया अमेरिकेत करून recover होण्या साठी दादर / पुण्याला ५ महिने राहिलो.

अशक्य खपल्या गेले आहे. :D

२. पेपर मदगे रोज १०-१२ लोक कार / मुन्किअप्ल truck च्या धडकेने मरतात आहेत

पेपर मध्ये कार आणि म्युनसिपालीटीचा ट्रक धडका मारतो :D

३. रोज पापर वाचून मन चलबिचल व्हायचे

अहो रीकव्हर व्हायला आला होतात ना, मग एकदा वाचल्यावर कशाला पेपर परत परत वाचलात

४. पण इकडे माझ्या देश्वासियान कडे खूप पैसा आहे. election ला आणि ब्राष्ट नेत्यान पुन्हा निवडून द्याला.

नाही हो पैसा आम्हा निवासी देशवासियांकडे नाहीयेय तो त्या भ्रष्ट नेत्यांकडेच आहे, आणि तुमची गुंतवणून त्यांच्याच प्रोजेक्ट्मध्ये होत असते पैलतीरावरून :D

५. आजून रोज loudspeekar वगेरे वेगळेच.

मराठी टाईप न करता येणे समजू शकतो पण 'loudspeekar'... फुटलो आहे :D

६. हीच काय जीवन जगण्याची पद्धत आहे?

काय कल्पना नाय ब्वॉ!

- (आज 'मोकलाया दाही दिशा' परत वाचावे असे वाट्णारा) सोकाजी

छो.राजन's picture

31 Mar 2012 - 12:17 am | छो.राजन

सोत्रीजी,
एक गोंव्या च्या फेनी चा रेसिईपे टाकून द्या.

सोत्रि's picture

31 Mar 2012 - 12:38 am | सोत्रि

गोव्याच्या नाही पण 'मिपाच्या फेणी'ची ही घ्या रेसिपी:
http://www.misalpav.com/node/21202

सुहास..'s picture

31 Mar 2012 - 4:51 am | सुहास..

या गरीबांच्या लोहगावात !!

पेपर काय वाचता ! ( मॅन्युपेलेटेड सर , बाकी बिसलरी ची बाटली नीट किमतीत मिळाली ना , का घेतले एखाद्याने दोन रू. जास्तीचे )

राजकारण, समाजकारण सगळं शिकवतो ...अ‍ॅन्कल च नाय , मानेवरील भाग ही जरा पॉझिटिव्ह विचार करायला शिकेल !!

अवांतर : या स्साल्या कधे-मधे भारतात येणार्‍या छा-छु लोकांसाठी कायतरी विचार केला पाहिजे मालकांनी, किमान यांना हे तरी सांगा की , या संस्थळाचा तरूण मालक, दिवसरात्र, नक्षलवाद्यांशी भिडत असतो ते .

मराठी_माणूस's picture

31 Mar 2012 - 10:15 pm | मराठी_माणूस

इथे एक प्रतिसाद दिला होता त्याचे काय झाले हे ?

दादा कोंडके's picture

31 Mar 2012 - 10:46 pm | दादा कोंडके

बहुतेक हा शब्द फक्त कवितेतच वापरता येतो. गद्य प्रतिसादात वापरायला बंदी आहे! ;)

मराठी_माणूस's picture

1 Apr 2012 - 9:28 am | मराठी_माणूस

अचुक निरिक्षण

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Mar 2012 - 7:26 pm | निनाद मुक्काम प...

राजकारण म्हंजे गजकरण
असे पूर्वी मोठे साहेब म्हणायचे.
हे जगभरात सर्वत्र चालते.

बाकी अमेरिकन राजकारणी स्वतःच्या देशात पैशाचा जो अपव्यय करते त्याचे काय. २००० अण्वस्त्रे ५ पिढीची विमाने आणि अर्ध्या युरोपियन देशाहून मोठा
मोठे संरक्षण बजेट कशासाठी ? पाकिस्तानला दहशत वादाशी लढायला आर्थिक मदत. आता ह्याच मदतीने पाकिस्तान दहशतवादी निर्माण करते.

एवढे करून अफगाण व इराक विएतनाम मध्ये सुपडा साफ.

स्वगत( पिंडा बरोबर म्हणाला
होता. अमेरिकेला शिव्या घ्यातल्या शिवाय मिपावर .....)