पिपात मेल्या ओले उंदीर
असे आणलेसंच कसे, बघितल्याविण
फुकट मिळाले म्हणुनी आणशी
न बघता तू, बुद्धिहीन
बीळ सोडुनी सांग कसे ते
पिपात (या) आले ओले होऊन?
दिवस सांडला बोंबलत फिरण्यात
या गिळायला, आता हातपाय धूऊन
अंगात ना काही शक्ती आहे,
डोक्यात ना कुणी युक्ती आहे.
पोरींवरती लहरी डोळे
फेकशी पण
मधाळ स्मित;
त्या ओठांवरचे, ते ही
बेकलाइटी, बेकलाइटी!
रागाने करीसी पिंप आडवे,
पिपात(ले) उंदीर पळाले! पळाले!
बा. सी. मर्ढेकर
------------------------------------------------------------
उंट - विंदा करंदीकर
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच ’जागी’.
रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
---------------------------------------------------------------------------
वेडी....... विंदांची कविता......
एका ढगाला कुशीत घेऊन झोपली,तेव्हा तिला गर्भ राहिला.
पुढे सर्व सुरळीत झाले.आपल्या घरातील मातीचे मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.
वाटेत तिला गाढव भेटले,तिने त्याची समार्म्भपूर्वक पूजा केली.
धुपाटण्यांतला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,
"ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्यें?
पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढें जाते."
नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली;आणि म्हणाली,
"आता मी कूणाचे काही लागत नाही,पौर्णिमीवढेहि".
पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आह.े)
वेडीला वीज झाली;आपले स्तन विजेला देऊन
वेडी आपली पुढे गेली;वाटेमध्ये विदूषक भेटला;
राजा भेटला,राणी भेटली;’अ’ भेटला,’ब’ भेटला;
पण वेडी शहाणी होती;तिने कोणालाच ओळखले नाहीं.
------विं. दा. करंदीकर.
प्रतिक्रिया
30 Mar 2012 - 1:41 pm | सांजसंध्या
रस्त्यात कोणसा आंधळा गातो - बा.भ.बोरकर
या कवितेचाही अर्थ समजत नाही आहे.
30 Mar 2012 - 1:43 pm | प्रचेतस
चौकटराजांना विचारा.
30 Mar 2012 - 2:07 pm | कपिल काळे
<<मधाळ स्मित;
त्या ओठांवरचे, ते ही
बेकलाइटी, बेकलाइटी! >>
(बेकलाइट म्हणजे थर्मोसेटींग प्लास्टीक असते. उष्णतेचा वापर केल्यानंतर ते पाहिजे तो आकार धारण करते . घरातले स्विचेस वगैरे बेकेलाइटचे बनलेले असतात.
बेकेलाइट स्मित ही शब्द योजना कृत्रिम हास्यासाठी केलेली आहे.
एवढाच अर्थ सध्या सांगू शकतो.
30 Mar 2012 - 2:09 pm | ५० फक्त
असा अर्थ सांगण्यात काय अर्थ आहे, काहीती बक्षीस बिक्षीस ठेवा की मग बघु, उगा फुकाचं कामाला लावताय का सगळ्यांना.
30 Mar 2012 - 2:14 pm | यकु
वर दिलेल्या तिन्ही कवितांबद्दल धन्यवाद.
पिपात मेले ओल्या उंदीर सोडली तर कोणतीच वाचलेली नाही. पिपात मध्ये काही फेरफार केले आहेत काय? काहीतरी बदलल्यासारखं वाटतं आहे.
कवितांमध्ये जो दिसतो आहे त्यापेक्षा वेगळा, लिहित बसावे एवढा मोठा अर्थ दिसत नाही.
30 Mar 2012 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार
हा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. माझे नवीन धागा उघडायचे कष्ट वाचवलेत.
काही दिवसांपूर्वी मी देखील पल्याडच्या संस्थळावरती असाच दोन गाण्यांचा मराठी भावानुवाद अथवा अर्थ मागितला होता. मात्र शर्टात निराशा पडली. आशा करतो की ह्या धाग्याच्या निमित्ताने माझी चिंता दूर होईल.
तर गाणी आहेत :-
१) हिप्स डोंट लाय..
२) हू द फ# इज अॅलिस...
30 Mar 2012 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा
पास...
30 Mar 2012 - 4:16 pm | सुकामेवा
पिपांत मेले बद्द्ल इथे वाचा,
मी असे कुठेतरी वाचले होते कि मर्ढेकरांनीमी पिपांत मेले हि कविता हिटलरनी ज्यू लोकांना ज्या प्रकारे gas चेम्बरमधी मारले त्या वर केली होती, आता संदर्भ सापडत नाही मिळाला कि डकवतो
30 Mar 2012 - 4:22 pm | गवि
माझ्या वाचण्यात फार्फार जुन्या "कट्टा" अनियतकालिकाच्या एका अंकातली एक कविता आली होती.. तिचा अर्थ आधी लावायचा प्रयत्न करुया का?
आलीया भोगासी असावे सादर..
शनिवारवाड्यासमोर भादर..
म्हशी..
फाटकीच माझी पिवळी चादर..
नर्गिसांची मुलगी होती मदर..
इंडिया..
स्टेप बाय स्टेप गेल्यास शेवटास शरदिनीतैंच्या कविताही उलगडतील कदाचित..
30 Mar 2012 - 4:23 pm | यकु
गोंधळ, गोंधळ :~ :~
क्षीरसागरांनी लिंक दिलेल्या लोकसत्ताच्या पानावर ही आहे:
पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण;
मधाळ पोळे;
ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!
30 Mar 2012 - 4:25 pm | सांजसंध्या
पंकज क्षीरसागर धन्यवाद या लिंकबद्दल.
30 Mar 2012 - 4:27 pm | सांजसंध्या
यक्कु
क्षीरसागरांनी दिलेली कविता बरोबर आहे. हे विडंबन असावे.. लक्षात नाही आले. क्षमस्व
30 Mar 2012 - 4:33 pm | गवि
मी काय म्हणतो.. केवळ कवितेच्या शीर्षकाने ती शोधून चोप्य पस्ते करण्याच्या प्रकारात आपण ज्या कवितेचा अर्थ समजावून घेण्यासाठी विचारणा करत आहोत ती कविता आपण पूर्ण वाचली तरी आहे का अशी रास्त शंका उपस्थित होते..
ठीक आहे.. आता सर्वांच्या प्रतिसादातून काय अर्थ समजतो पाहू...
बादवे : पिपातल्या कवितेची तर पुलंच्या काळापासून विडंबनं पडत आहेत..
त्याचे अनेक अर्थ युद्धातल्या ज्यूंच्या हत्येपासून ते स्त्रीपुरुषसंबंधांपर्यंत लावून झाले आहेत..
"हॉटेल कॅलिफोर्निया" किंवा "अमेरिकन पाय" या गीतासारखंच..
30 Mar 2012 - 4:42 pm | प्रास
जौ द्या ओ गवि, होते गल्लत एखाद्या/दीची. गल्लत झाली की चोप्य-पस्तेचीही चूक होणारच की! इतकं का म्हणतो मी मनाला लाऊन घ्या....? ;-)
30 Mar 2012 - 4:38 pm | सांजसंध्या
केवळ कवितेच्या शीर्षकाने ती शोधून चोप्य पस्ते करण्याच्या प्रकारात आपण ज्या कवितेचा अर्थ समजावून घेण्यासाठी विचारणा करत आहोत ती कविता आपण पूर्ण वाचली तरी आहे का अशी रास्त शंका उपस्थित होते..
ही कविता गेली कित्येक वर्षे माहीत आहे. आता शोधून घेताना फसगत झाली.
30 Mar 2012 - 4:40 pm | सांजसंध्या
वेडी या कवितेचा अर्थ पाडगावकरांनी अर्थ सांगितलेला आहे असं आताच कळालं. कुणाकडे असेल तर पहा
30 Mar 2012 - 4:51 pm | अनुप ढेरे
ही कविता बहुदा शहरात राहणार्या लो़कांवर आहे. पिंप म्हणजे शहर आणि उंदिर म्हणजे त्यातले लोक.
30 Mar 2012 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार
ही कविता बहुदा मिपावरती नांदणार्या सदस्यांवरती आहे. पिंप म्हणजे मिपा आणि उंदिर म्हणजे त्यातले सदस्य.
30 Mar 2012 - 5:31 pm | पैसा
तुम्ही अजून मिपाचे मेंबर आहात ना?
30 Mar 2012 - 5:03 pm | सांजसंध्या
अनुपजी
असं वाटतंय..
30 Mar 2012 - 5:30 pm | धन्या
कविता चुकीची चिकटवलीत ते चिकटवलीत, निदान प्रतिसाद तरी जागच्या जागी देत जा हो. :)
30 Mar 2012 - 8:53 pm | सांजसंध्या
हम्म..
30 Mar 2012 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाव वर एकदा या विषयावर चांगला काथ्या कुटला होता. ”मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर - दुसऱया महायुध्दातील ज्युंच्या हत्यांकांडांचा संदर्भ” पाहा इथे काही हाती लागतं का !
-दिलीप बिरुटे
30 Mar 2012 - 11:58 pm | सांजसंध्या
डॉ. छान चर्चा आहे ती
30 Mar 2012 - 5:27 pm | यकु
प्रा. डॉ. नीं दिलेल्या दुव्यावरील चर्चा मस्त आहे.
स्वत:लाही अर्थ लागणार नाही अशा कविता करायच्या आणि वाचकांचा छळवाद मांडायचा ही प्रथा मराठी कविंमध्ये फार जुनी आहे असे दिसते.
त्या चर्चेत कुणा समिक्षकाने तर 'मर्ढेकरांच्या चार कवितांवर* अश्लीलतेचा आरोप करुन खटला दाखल केला गेला तेव्हा त्यांनी त्यांच्या बचावात त्या कवितांचा खरा अर्थ सांगितला.. मर्ढेकरांवर त्यांच्या सगळ्याच कवितांसाठी खटले दाखल करायला हवे होते म्हणजे वाचकांचा छळवाद थांबला असता ' वगैरे कहर केला आहे ;-) आपल्याला अर्थातच आवडला ;-)
* त्या अश्लील कविता कुठल्या ते विचारु नये, माहित नाही ;-)
30 Mar 2012 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार
हे म्हणजे हर्षद मेहताला शेअर्स माहिती नाहीत असे म्हणल्यासारखे झाले.
30 Mar 2012 - 5:35 pm | धन्या
म्हणजे यकुला मर्ढेकरांच्या "त्या" कविता माहिती असाव्यात असं म्हणायचंय का तुला?
30 Mar 2012 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
नुसत्या माहितीच नसतील, तर तशा काही कविता यक्कुने करून देखील बघितल्याचा आम्हाला संशव आहे.
30 Mar 2012 - 5:41 pm | यकु
____/\____ !!!
बास.. बास!!
आता काही बोलू नकाच ;-)
आम्ही जे काही केलंय ते जगजाहीर केलंय हो.
30 Mar 2012 - 5:44 pm | धन्या
मग "त्या" कविता का प्रकाशित केल्या नाहीत?
करा प्रकाशित. सामान्य वाचकांना दुर्बोध वाटल्या तर कुणी तरी चंदया किंवा नंद्या "त्यांचा अर्थ सांगा" म्हणून मिपावर धागा काढेलच ;)
30 Mar 2012 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार
पण नंदू तर रसग्रहणाचा राजा आहे ना ?
30 Mar 2012 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार
पण नंदू तर रसग्रहणाचा राजा आहे ना ?
30 Mar 2012 - 6:16 pm | धन्या
पराशेठ, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही "हाच नंदया" आणि "हाच चंदया" आयडींबद्दल बोलतोय जे आपली मराठीतील नावाजलेल्या कवींचे काव्य समजून घ्यायची ओढ अनावर होऊन धागे काढतात.
तुम्ही म्हणत असलेल्या नंदूचा आमच्या घारे नावाच्या दोस्ताने नियमांच्या चौकटीत राहून बेंडबाजा वाजवला आहे. :)
30 Mar 2012 - 6:19 pm | परिकथेतील राजकुमार
घारे ह्यांना आमचे धन्यवाद सांगावेत.
31 Mar 2012 - 1:59 pm | सांजसंध्या
काही प्रतिक्रियांबद्दल न बोललेलंच बरं आहे. ग्रेसजींच्या जाण्यानंतर त्यांच्याबद्दल दुस-याच दिवशी आलेल्या काही हीन प्रतिक्रियांना उद्देशून मी फक्त वाईट वाटलं इतकंच म्हटलेलं होतं. त्यामुळे काहींच्या भावना दुखावल्याचं स्पष्ट दिसून येतंय. प्रतिक्रिया कुठे टंकायची यापेक्षा कुणाचा उल्लेख एकेरी होतो, कुणाबद्दल मृत्यूनंतर काय बोललं जातं तिथं संवेदनशीलता दाखवली असती तर छान झालं असतं. हे शेवटचं.
31 Mar 2012 - 4:06 pm | चौकटराजा
सांजसंध्या ताई, ग्रेस यांचा उल्लेख एखाद्याने ए असा केला असेल तरी खूप रागावून घेउ नका .त्यांचे काही चाहते काही वेळेला त्यांचा उल्लेख
एकेरी करतात असे माझे निरिक्षण आहे. मी स्वत" ओपी नय्यर या संगीत काराचा 'वेडा' चाहता आहे. १९६५ पासून आजतागायत एकही दिवस
असा नाही की मी त्यांचे एक तरी गाणे गुणगुणलो नाही की ऐकले नाही. पण मला आठवते १९८० पर्यंत ओपीने हे गाणे काय मस्त केले आहे हे
असे आम्ही चाहते एकमेकात म्हणत असू व हे लेखातही येत असे. ( संदर्भ- यादोंकी बारात लेखक शिरीष कणेकर ) . नय्यर बाबा जसे सत्तरीच्या
पुढे गेले तसे त्याना 'बाबुजी" अशा गौरवाने मी संबोधू लागलो. आदर महत्वाचा. खरे तर त्यांच्या निर्मितीच्या संदर्भात अधिक महत्वाचा.
म्हणतात ना Men are mortal creations are not ! .