गाभा:
नका रे घालू काशी अशी कवितांची
जरी भीकही मिळे तया प्रतिसादांची
एकास झाले की ते दुसर्यासही होते
कपाळावर हात मारुन घ्यावेसे वाटे
ही चारोळी आपल्या एका मिपाकराकडून ६ - ७ मिनिटांपूर्वी ऐकली. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे त्या कवीचा पत्ता असेल तर कृपया देवू शकाल का?
प्रतिक्रिया
30 Mar 2012 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार
http://balmipabharati.abweb.in/index1.htm
ही घ्या बालमिपाभारतीची लिंक. इथे शोधा म्हणजे सापडेल.
१ल्या सदस्या पासुनच्या सर्व कविता मिळ्तील.
30 Mar 2012 - 4:44 pm | धन्या
इथे अनुक्रमणिका किंवा तत्सम कोणतीही लिंक नाही :(
30 Mar 2012 - 4:58 pm | पैसा
ती लिंक कोणी दिलीय ते आधी बघा हो वाकडेबुवा!
30 Mar 2012 - 5:16 pm | धन्या
मी ते आधी नीट वाचलंच नव्हतं. ती लिंक पमीने दिली आहे असं गृहीत धरलं होतं. :)
कृ. ह. घ्या.
30 Mar 2012 - 5:12 pm | सुहास झेले
हा हा हा .... ;)
30 Mar 2012 - 5:20 pm | सूड
छ्या ब्वॉ नाही ओळखता येत. तुम्हीच नाही ना केलीत ??
30 Mar 2012 - 5:23 pm | धन्या
मी कुठून लिहणार इतकी चांगली चारोळी.
- संध्यानंद गुगळे
30 Mar 2012 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार
आणि ही चारोळी मिटरमध्ये देखील बसत नाही.
चंद्रशेखर गोखल्यांच्या सल्ला का घेत नाही तुम्ही ? ते माझ्या फेसबुकमध्ये आहेत. शोधले की सापडतील.
टिनपाटबाजा
30 Mar 2012 - 5:40 pm | धन्या
टिनपाटबाजा साहेब , चंद्रशेखर गोखले म्हंजे मी माझा वाले ना.
अहो मी माझा मी एक वेळा नाही तर तब्बल ८ वेळा वाचल आहे मागे. अतिशय मस्त.
खुप म्हंजे खुप सुंदर होत मी माझा .
आपण स्वता तेच नाही आहात ना.
30 Mar 2012 - 5:44 pm | यकु
अरारारा!!!!
बस्स झालं रे धन्या
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आज नक्की मरणारे हसून हसून..
30 Mar 2012 - 5:47 pm | परिकथेतील राजकुमार
धन्या राव अशी चंगो हे महान चमत्कार आहेत.
मी आपला हिरवा टोळ आहे.
२०१३ ला १८ पुरी होणार.
30 Mar 2012 - 9:39 pm | रमताराम
पर्या 'हिरवा' आहे ही लेटेस्ट न्यूज आहे.
30 Mar 2012 - 5:43 pm | सूड
>>मिटरमध्ये देखील बसत नाही.
लिटरमध्ये बसते का बघा बरं !! चारोळी होणं महत्त्वाचं, कशात बसते ते बघायचं नाही. ;)
दूजा गवांर
===०===०===०====०===०===०
इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!!
30 Mar 2012 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार
सचिन तेंडूलकर यांची ग्रीप चुकीची आजही आहे. पण रमाकांत आचरेकरानी ती तशीच असू दे असा सल्ला त्याला दिला होता म्हणे
पुअर फुटवर्क असणारा वीरू दोन त्रिशतके काढू शकतो . हे झाले चमत्कारी पुरूष !
आपले सर्वांचे असे नाही हो !
कविची ग्रीप ( म्हणजे चांगल्या कवितेची संकल्पनाच) पहिल्यापासून चुकीची होउ नये म्हणून हा उपदव्याप व आनंद ही !
30 Mar 2012 - 5:54 pm | धन्या
बराब्बर... आमचो तात्या सरपंच सांगून गेलंय हा, धू म्हणला का धुवायचा... तसाच आसा हा. चारोळी झाली का तिचा आस्वाद घ्यायाचा. बाकी काय ईचारुचा नाय. मीटरमदी बसाया तो काय बायीमानसाच्या ब्लावजाचा कापड आसां?
31 Mar 2012 - 1:33 am | विश्वनाथ मेहेंदळे
__/\__
31 Mar 2012 - 10:13 am | जेनी...
इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!!
__________________________________
भारिये आत्त वाचलं :D
कुठे भेटलं हे वाक्य ..प्रेरणेच नाव तरि द्या कि राव :P
31 Mar 2012 - 5:18 am | पिवळा डांबिस
===०===०===०====०===०===०
इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!!
ज ब रा!!!!
:)
_/\_
30 Mar 2012 - 9:30 pm | अत्रुप्त आत्मा
@संध्यानंद गुगळे >>>
30 Mar 2012 - 9:41 pm | रमताराम
ओ धनाजीराव म्हातार्याला टोमणे नसतात मारायचे, ते बायकांसाठी राखीव ठेवा राव. मेट्रोसेक्शुअल असण्याच्या जमान्यात देखील टोमणे राखीव गटातच आहेत. म्हातार्याला डायरेक सांगायचे 'थेरड्या ही थेरं शोभत नाहीत हां तुला'. ;)
31 Mar 2012 - 4:41 am | सुहास..
थेरड्या ही थेरं शोभत नाहीत हां तुला !
छ्या, अर्ध्या सारख नाही जमत, अर्ध्या मोड >> म्हातारबुवा , गेल्या की गौर्या आता, बस करा की ;)
धन्या साठी : आता ही चारोळी कोण रे , त्या दिवशी तु ती तमीळ अंजळळ्ळी ( मराठीत अंजली ) का काय तरी म्हणत होतास ना ;)
31 Mar 2012 - 11:11 am | धन्या
आन्ना, येम माटलाडतुनाडू रे? नाकू तमीळ अंजळळ्ळी तेलिदा. ;)
31 Mar 2012 - 5:33 am | पिवळा डांबिस
हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का?
असा मी असामी मोड ऑन< "ते च्यारोळिचा कवी कोन ते आमाला कसाला विच्यारते? आमी काय च्यारोळि घरी बनवते काय? ते मिपावर च्यारोळिचे घाऊक अने ठोक सर्वव्यापी बेपारी बसल्येय, त्येला विचार, त्येला विचार नी!!!!"> असामी मोड ऑफ
:)
-शा डांबिसजी पिव्वळजी
31 Mar 2012 - 7:46 am | ५० फक्त
मीटर मध्ये न का बसेना अन लिटर मध्ये सुद्धा न का बसेना, पण सगळ्या चारोळी वाल्यांना सिक्स सिटर मध्ये बसवणारी हाय ही चारोळी.