गाभा:
हल्ली काय झालंय कळत नाही. विडंबनाची कळ येते पण एकदा विडंबनाला बसलं की होत मात्र काहीच नाही. कधी होतंय होतंय म्हणता काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं.
कविसंम्मेलन वटी घ्या असं एका हितचिंतकाने सुचवलं पण काहीच फरक पडला नाही. एकाने घाबरगुटीका घ्यायचं सुचवलं, म्हणाला भयरसातली विडंबनं नीट होतील. पण जैसे थे.
विडंबन नीट व्हावं म्हणून आपण काय करता ? मला दिवसाला नाही तरी किमान आठवड्यास एक विडंबन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. कृपया काही उपाय सुचवा.
प्रतिक्रिया
29 Mar 2012 - 12:01 pm | प्यारे१
प्रेरणा कुठं आहे रे सूड???? ;)
29 Mar 2012 - 12:02 pm | प्रचेतस
मांजराचं नाव प्रेरणा आहे काय?
29 Mar 2012 - 12:07 pm | सूड
मा. वल्लीसर विषय भरकटवू नये. येथे गंभीर चर्चा अपेक्षित आहे.
29 Mar 2012 - 12:21 pm | प्रचेतस
गंभीरपणेच विचारतोय हो सूड साहेब. कारण विडंबनाला प्रेरणा लागतेच. ती मांजराकडूनच मिळालीय का ते मांजरच प्रेरणा नावाचे आहे हाच प्रश्न आहे.
29 Mar 2012 - 12:05 pm | स्पा
रात्री गरम पाण्यातून एक "टल्ली" वटी किवा "तृप्त आत्मासव" घेत चला त्वरित फायदा होईल
29 Mar 2012 - 12:19 pm | सूड
फेणेसाहेब म्हातारी मरेल, पण काळ सोकावेल त्याचं काय ?
29 Mar 2012 - 12:59 pm | अत्रुप्त आत्मा
@एक "टल्ली" वटी किवा "तृप्त आत्मासव" घेत चला त्वरित फायदा होईल >>> ह्यांनी स्वतः घेतलं आहे...म्हणुनच अत्ता ह्यांच्या नावाचं झालय... इ-डंबन ;-)
आधी होता स्पांडू अता झाला मन्या फेणे
यापुढे काय होइल,भगवंता...कोण जाणे..? :-p
29 Mar 2012 - 1:17 pm | कवितानागेश
अच्छा अच्छा, म्हंजे मन्या फेणे हे स्पांडूचे विडंबन आहे काय?
फारच विचित्र झालय मूळ आय्डी पेक्षा! :)
29 Mar 2012 - 12:09 pm | चिरोटा
ह्यांना विचारा. मराठी विडंबन असे केमिस्टला सांगा.
कायम चूर्ण
विडंबन पूर्ण
29 Mar 2012 - 12:11 pm | निश
सूड साहेब त्यासाठि पुढील गोष्टि लागतिल.
ज्यांचि काही स्वताच नव करायचि प्रतिभा नष्ट झाली आहेत असे लेखक किंवा कवी.
त्यांना जे वाईट आहेत असे वाटतात असे दुसर्यांचे लेख व कविता. (एक महत्त्वाच जो दुसर्याच्या कवितेवर व लेखावर चांगला हात मारु शकतो तो विडंबन कार अस कुठेतरी वाचलेल होत.)
विडंबन कार हा घरी बहुतेक बायकोच्या व ऑफिसात बॉसच्या जाचाला त्रासलेला असतो कीवा असावा म्हंजे विडंबन अधिक चांगले होत असही वाचल होत कुठेतरी.
कंपुबाज माणस जास्त विडंबन चांगल करु शकतात.
हो मग मस्त होत विडंबन.
29 Mar 2012 - 12:14 pm | निश
सूड साहेब, तुम्हि एक चांगले लेखक आहात.
कशाला विडंबन करता आहात.
मस्त लेखमाला लिहा वाचायला मजा येते.
29 Mar 2012 - 12:26 pm | स्पा
सूड साहेब, तुम्हि एक चांगले लेखक आहात.
कशाला विडंबन करता आहात.
मस्त लेखमाला लिहा वाचायला मजा येते.
=))
=))
=))
29 Mar 2012 - 12:46 pm | वपाडाव
अगदी अगदी हेच स्पावड्या ????
29 Mar 2012 - 12:36 pm | रमताराम
तुम्ही काहीही लिहिलेत तरी ते 'सुडंबन'च असणार. (कायच्याकाय पीजे मारण्याची ही आजची दुसरी वेळ. हे राम.)
विडंबन नीट व्हावं म्हणून आपण काय करता ? मला दिवसाला नाही तरी किमान आठवड्यास एक विडंबन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही.
हा हा हा. तुमच्या 'काव्यकोष्ठा'वर लवकर उपाय सापडो ही सदिच्छा.
29 Mar 2012 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार
शक्यतो वाचकांना पिड पिड पिडणार्या आणि जिलब्यांचा रतीब घालणार्या सदस्याच्या लेखनाचे विडंबन पाडल्यास ते चांगलेच उचलून धरले जाते असा अभ्यास आहे. कवितांचे विडंबन सध्या कॉमन झाले असल्याने, पाकृ अथवा कलादालनातल्या धाग्यांचे विडंबन हटके असेल व त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असे सुचवतो. (स्पावड्याच्या लेखाचे 'मिपाछाप राडे' किंवा इतर लेखविडंबनासाठी 'बेवडा भाग १- ५००' , 'चोर आणि दरोडेखोर' , 'पराची खरच आंतरजालावरती गरज आहे का?', 'घाणेरीतील चण्या मण्या' , 'कच्ची दाबलेली' इ. इ. विषयाला हात घातल्यास उत्तम.)
बाकी सध्या तुम्ही पुण्याचे पाणी पित असल्याने इतर काही सांगण्याची आवश्यकता नाहीच.
आणी हो, विडंबन पाडताना शक्यतो ज्याची वयाबरोबरच बुद्धी देखील वाढली आहे अशा सदस्याचेच लेखन निवडा, अन्यथा तो रुसेल आणि जिकडे तिकडे भोकाड पसरत बसेल.
29 Mar 2012 - 1:07 pm | मी-सौरभ
अश्या अजून आणुभवी लोक्सच्या मार्गदर्शनाचि गरज आहे.
@ सूडः चांगल विडंबन असं वाटून होत नाही ते नको असतं तेव्हाच आवाज करत बाहेर पडतं ;)
29 Mar 2012 - 1:08 pm | निश
परा साहेब, एकदम सहमत .... हे हे हे
29 Mar 2012 - 12:56 pm | वपाडाव
हा धागा पदार्पणादिवशीच द्विशतक करेल असं नाही का वाटत रे सुडक्या?
उत्तर 'हो' असेल तर मग उचल बोटं अन लाव कळफलकाला !!!!
29 Mar 2012 - 1:10 pm | मी-सौरभ
ह्यालाच 'परा'चा कावळा करणे म्हणतात का हो गणपा भौ?
29 Mar 2012 - 1:21 pm | पैसा
जिलब्या पचवायला शिकलास की सगळी विडंबनंच लिहायला लागशील!
29 Mar 2012 - 1:34 pm | अत्रुप्त आत्मा
@मला दिवसाला नाही तरी किमान आठवड्यास एक विडंबन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. कृपया काही उपाय सुचवा. >>>
पोटदुखीवर काहितरी जालिम औषध शोधा...
मग विडंबने पडतील बदा बदा...बदा बदा... ;-)
ए...अता मी सुरवात केलीये हां.... या बरं लवकर आता... भर घालायला ;-)
कालच्या सारखं करायचं नै हां.... ;-)
29 Mar 2012 - 6:36 pm | पक पक पक
पादा पण नांदा.... ;)
29 Mar 2012 - 1:35 pm | इरसाल
पुर्व तयारी:-
१. आपलीच ** करणार असे प्रतिसादक हेरावे.
२.खवोखवी गवगवा करावा. तरीही लक्ष दिले नाही तर आपण पाडलेल्या ***चे सुत्र चिकटवावे.(खवीत)
३.शक्यतो आधी ज्याने आपल्याला खुन्नस दिलेय त्याला "बैलाचा डोळा " करावे. यात आपल्या लेखावर/कवितेवर्/पाकृवर्/फोटोवर्/विडंबनावरसुध्हा इतके प्रतिसाद येत असताना *ने काडी केली किंवा प्रतिसादच दिला नाही यांनाही सामील करावे.
तयारी :-
दरवेळेस जसा ए+ दर्जा किंवा १०० प्रतिसाद मिळत नाही त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस/प्रत्येक गोष्टीवर उत्कृष्ट विडंबन पण होत नाही. म्हणुन......
१.मिसळपावाचे मुख्य पान उघडल्यावर, उंदराला हातात धरुन डोळे मिटावे अंदाजाने फिरवुन थांबावे. जिथे त्रिकोण्या थांबलेला असेल त्याचे विडंबन पाडावयास घ्यावे.
२.ऑफीसमधे समजा मजबूत छपाइ झाली तर्/घरी बायकोने तासले/कंपूत मित्रांनी ***** तर मिसळपाव उघडताखेरीज जो सापडेल त्याचे श्राद्द घातल्यागत विडंबन करावे.
३.अरे व्वा ! हा/ही नवा प्राणी दिसतोय ....मग कितिही चांगला लेख/कविता इ.इ. असले तरी बळच आपले जळते शेपुत कोंबावे. पण एक लक्षात असु द्यावे कि हे शेपुट कधी कधी बेचकीत अडकु शकते. तेव्हा " विडंबन नको पण शेपटी सोडव " असा प्रकार होतो. आणी ह्या ह्रुद्य वेळेस ज्यांच्या सांगण्यावरुन शेपटी दिली ते ...................गांपापजा.
29 Mar 2012 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा
अत्यंत मार्मिक/इरसाल प्रतिक्रीयेवर हसुन हसुन मेल्या गेलो आहे...
@जिथे त्रिकोण्या थांबलेला असेल त्याचे विडंबन पाडावयास घ्यावे.>>>
@मिसळपाव उघडताखेरीज जो सापडेल त्याचे श्राद्द घातल्यागत विडंबन करावे.>>>
@ एक लक्षात असु द्यावे कि हे शेपुट कधी कधी बेचकीत अडकु शकते.>>>
@तेव्हा " विडंबन नको पण शेपटी सोडव " असा प्रकार होतो.>>>
@आणी ह्या ह्रुद्य वेळेस ज्यांच्या सांगण्यावरुन शेपटी दिली ते ...................गांपापजा. >>> हा अनुभव आंम्ही कालच घेतला... अता मात्र पुरते सावध रहाणार आहोत.... इरसालमामांचे धन्यवाद :-)
29 Mar 2012 - 1:58 pm | प्रचेतस
29 Mar 2012 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा
हा बघा कालच्या अन्याभौंच्या इडंबना मागचा ब्याकिंग इंचार्ज,तिथे साथ देतो सांगुन,आग लावण्याचं षडयंत्र रचणारा अग्यावेताळ---अता हिते गडाबडा लोळतोय ;-)
29 Mar 2012 - 2:36 pm | अन्या दातार
बघा भटजीबुवा, चिंचवडात बसून तुम्हाला कात्रजचा घाट दाखवलान वल्लीने! अन आता मजा घेतोय
29 Mar 2012 - 2:49 pm | प्रचेतस
बास हो बास.
मला नोकरीवरून काढून टाकतील हो आता.
वाईट्ट हसतोय.
29 Mar 2012 - 2:53 pm | अत्रुप्त आत्मा
@मला नोकरीवरून काढून टाकतील हो आता. >>> टाकलच पाहिजे... ;-)
दुष्ट...दुष्ट...दुष्ट... अग्यावेताळ
29 Mar 2012 - 3:01 pm | सूड
मा. वल्ली कृपया धाग्याचा खरडफळा करु नये. आपण चर्चा भरकटवण्याचा सकाळपासून प्रयत्न करीत आहात.
29 Mar 2012 - 3:04 pm | पैसा
मा सूड, मा मन्या आणि मा. वल्ली यानी मा. भटजीना दिलेल्या @@@@@
29 Mar 2012 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
@मा सूड, मा मन्या आणि मा. वल्ली यानी मा. भटजीना दिलेल्या @@@@@ >>> अगदी बरोब्बर विश्लेषण
अवांतर:- यात काय अजुन करायचं डोंबलं ;-) जाऊ दे
उघडः- या आणी त्या धाग्याचा उतारा हवा असलेल्यांनी हिकडे या- http://www.misalpav.com/node/21175 ;-)
29 Mar 2012 - 3:04 pm | प्रचेतस
आपण धागाच खरडफळा करण्याच्या उद्देशाने टाकलात हो.
बाकी आपला उद्देश साध्य झालाय असे नमूद करावेसे वाटते. ;)
29 Mar 2012 - 3:20 pm | सूड
आपण धागाच खरडफळा करण्याच्या उद्देशाने टाकलात हो.
अरेरे !! काय हा आ-रोप !! हे ऐकण्याआधी धर-तिला, कंप का सुटला नाही.
29 Mar 2012 - 3:27 pm | स्पा
>>>>>हे ऐकण्याआधी धर-तिला, कंप का सुटला नाही.
मेलो मेलो =)) =))
29 Mar 2012 - 2:39 pm | वपाडाव
असल्या प्रतिसादांच्या वर डिस्क्लेमर देत जा...
संमंना विनंती आहे. असले प्रतिसाद असतील तर त्यावर डिस्क्लेमर देणे अनिवार्य करावे.
29 Mar 2012 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा
@असल्या प्रतिसादांच्या वर डिस्क्लेमर देत जा... >>> हां आपलीच वाट बघत होतो... ;-)
बघा हो बघा अन्याभौ... हे तुमच्या इडंबन पाडायला लावण्याच्या कटाचं बीज
सगळ्यात शेवटी कसे (अजुनही) साळसुदपणे अवतरलेत आता... ;-)
अशी घडली घटना ;-) >>>
29 Mar 2012 - 1:38 pm | गणपा
अरे काय ते बुड खाजवल्यागत कळफळक घाशितय रे.
काय एक चांगला गुरू बिरू पकड की रे.
29 Mar 2012 - 2:28 pm | सूड
ते ठीकै, पण मी पाडलेली विडंबनं बघून गुरुचे केस कुरळे झाले तर ?
29 Mar 2012 - 1:51 pm | निनाद मुक्काम प...
विडंबन लिहिण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात ज्या सदस्याचे तुम्ही विडंबन करणार आहात त्या विषयी आकस,हेवा ,लोभ , द्वेष ह्यापैकी कोणताही एक विकार प्रबळ असला पाहिजे.
जुने स्कोर सेटल करणे किंवा अजून कोणालातरी ते करू देणे ही भावना मनात खदखदत असेल तर विडंबनाचे फदफद निर्माण होतो.( आळूचे फदफद जेव्हढे अवीट चवीचे असते तेवढेच हे विडंबन सुद्धा असते.)
मात्र नुसते विडंबन लिहून भागात नाही राव
बाजार उठवला , किंवा + १ श्या पद्धतीच्या प्रतिक्रिया हमखास देणारे कंपूबाज मित्र व प्रकरण अंगांशी शेकातंय असे वाटत असतांना अवांतर किंवा अवांतर करणारे निष्णात तज्ञ मार्ग दर्शक सुद्धा तुमच्या पाठीशी हवेत.
आणि तुमची खव मात्र सतत जागृत हवी.
कविता आपल्याला झेपत नाही त्यामुळे त्यांची विडंबने दूरच राहिली.
सदर प्रतिसाद हा गद्य विडंबन कसे करावे ह्यासाठी आहे.
29 Mar 2012 - 2:39 pm | नगरीनिरंजन
अर्धकच्च्या कविता खाऊ नका.
चांगल्या जमलेल्या तंतुमय कविता चावून चावून खाव्यात.
कविता खाल्ल्या खाल्ल्या विडंबनास जाऊन बसू नये, कितीही कुंथले तरी होणार नाही.
कविता खाऊन झाली की तासभर दुसरे काहीही खाऊ नये, आकाशाकडे डोळे लावून कविता पचवत पडून राहावे, अधूनमधून रवंथ केला तरी हरकत नाही.
अशी व्यवस्थितपणे कविता पचली की मन गुबारून येते आणि कवितेच्या शब्दांचे किंवा तत्सम भासणार्या शब्दांचे ढेकर येऊ लागतात.
बराच वेळ असा ग्रहणवायू सोडला की कधीतरी अचानक कळ येते आणि तुमान (पेनाची हो) काढल्या काढल्या फॉक्कन* विडंबन होते आणि जीवाला थंडावा मिळतो.
*शब्दश्रेयाव्हेरः ब्रिटीश ऊर्फ मिथुन काशिनाथ भोईर.
29 Mar 2012 - 3:07 pm | सर्वसाक्षी
नीट= थेट (पाणी/ सोडा/ अन्य पेय इत्यादीचे मिश्रण न करता)
विडंबन = पंचनामा, समकाव्य/ समलेखन, परनिर्मित्याधारीत प्रतिभापूर्ण निर्मिती
29 Mar 2012 - 3:30 pm | यकु
विडंबक होण्यासाठी आधी लक्ष्यित काव्याविषयाशी नाद-अर्थ-गेयतानुसंधान साधणारी दृष्टी (हा खालचं विडंबन केल्याचा प्रादुर्भाव!) विकसीत करावी - म्हणजे त्या काव्यविषयाशी मैत्री करावी. इच्छित विडंबनात आपल्याला हवा तो एकच एक अर्थ टाकण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नये - कारण शब्दांतून तुम्हाला जो अर्थ अपेक्षित असेल तोच सगळ्यांना दिसेल असे नाही; कशातही काहीही पहाण्याची लोकांकडे शक्ती असते. तात्पर्य विडंबन करताना अर्थाच्या बाबतीत डोके ठिकाणावर नसल्यासारखे सुयोग्य शब्द वापरावेत. करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असे वाटले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे, विडंबन होणे महत्त्वाचे.
या पार्श्वभूमीवर एक प्रात्यक्षिक
----------------------------------------------------------------------------------
व्युत्क्रमी परिकर्म
स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन।
मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥
दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन।
वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥
वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन।
स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥
प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन।
लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥
----------------------------------------------------------------------------------
विडंबकार्पण
कवि-पीडन कच्चा खर्डा विषचाचणी फॉक्कन।
जित्त्या शब्दक्रिया कवि-रविचे घोटीव त्वचा सोलन।।
कायम बिघाड बॉलमशेखी काव्यसूत्रनर्तन।
काव्यकाश्मी भीती न काही गोडगोड शिकरण॥
बैठनिकखुद चक्रम कर्मी बदाबदा उखडन ।
काव्यांकन दोष लेखांतरी जरी करी कविशोधन।।
शब्दवेधक काव्यापसंचय हळूच वायूविजन।
काव्यरसावर जठरजाळूनी करि मग विडंबकार्पण ।।
29 Mar 2012 - 6:14 pm | प्रास
अस्सल प्रात्यक्षिक सादर केलंत ब्वॉ! सूडरावांची त्यांना पडलेल्या (अनावश्यक) प्रश्नाबद्दल उत्तम शिकवणी घेतलीत म्हणा ना....
नुकतंच नामबदल केला आहे म्हणून म्हणतो एखादा 'मरदिनी' नावाचा डू-आयडी का नाही सुरू करून घेत? ;-)
29 Mar 2012 - 6:20 pm | यकु
>>>>'मरदिनी' नावाचा डू-आयडी
---- हॅहॅहॅ
=)) =)) =)) =))
सुडोबास दृष्टांतु दिधला हो ;-)
29 Mar 2012 - 11:16 pm | बॅटमॅन
यक्कुशेठ, ____/\____!!!!!!!!!
आपण इतके तेज तर्रार हलवाई आहात हे माहिती नव्हतं ;)
29 Mar 2012 - 6:00 pm | निवेदिता-ताई
भारीच.......