भारत चीन : अमेरिकेचा आगाऊपणा

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in काथ्याकूट
2 Feb 2012 - 10:39 am
गाभा: 

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे संचालक जेम्स क्लीपर यांनी भारताची चीन शी लढण्याची तयारी असल्याची बातमी करून विनाकारण खळबळ माजवली आहे. आमच्या घरात आम्ही कसली तयारी करतो आहे आणि काय करतो आहे हे आमच्या परवानगी शिवाय जगभर बोंबलून सांगण्याची यांना काय आवश्यकता आहे ? भारतचे धोरण स्पष्ट आहे. सामंजस्याचे आहे. कुठल्याच शेजाऱ्याशी कुरापत काढून देशवासियांना विनाकारण युद्धाच्या खाईत लोटण्याचा भारताचा इतिहास नाही. कुणी कुरापत काढली तर संरक्षण करण्याचे सामर्थ्य ठेवणे या पलीकडे आम्हाला काही करायचे नाही. आपले अन्य प्रश्न देशाला महत्वाचे वाटतात हे स्पष्ट दिसते आहे. स्वत:च्या घरात लागलेली आग विझवायचे सोडून नस्ते उचकविण्याचे रिकामे धंदे हे करतात कशाला ? आता यातुन ही यांना कोणता धंदा करायचाय ?

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Feb 2012 - 12:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तुम्ही एक फारच मनाला लावुन घेता बॉ!

तुम्ही एक फारच मनाला लावुन घेता बॉ!

तस काही नाही हो ,ह सग्ळा २६ जानेवारीचा हँग ओव्हर आहे..... ;)

चिरोटा's picture

2 Feb 2012 - 12:07 pm | चिरोटा

हे क्लीपर स्वतःला समजतात तरी कोण? खबरदार भारताविषयी अवा़क्षर काढाल तर.

क्लिपरला हिवतापाने हुडहुडी भरली असून तो थरथर कापू लागला असून आहे असे आमच्या व्हाईट हाऊस सूत्रांकडून समजते.
;)

स्पा's picture

2 Feb 2012 - 12:24 pm | स्पा

ए अमेलिका
हात ...
आमच्या शुधील दादाला घाब्लावटेश,,,
बागुल बुवा कडे नेईन तुला

सुहास झेले's picture

2 Feb 2012 - 12:42 pm | सुहास झेले

=)) =)) =))

कवितानागेश's picture

2 Feb 2012 - 2:38 pm | कवितानागेश

:D

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Feb 2012 - 1:05 pm | पुण्याचे वटवाघूळ

सुधीर काळेंना बोलवा रे कोनीतरी.

चीनी सायबर चाच्यांनी यांच्या सिलीकॉन व्हॅलीतील गुपीतं पळवली तेव्हा हे जेम्स क्लीपर कुठे होते ? ;)
सध्या हिंदुस्थानी वायुदलासाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे त्यांना 126 Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA)मिळणार आहेत. :) Dassault ने बाजी मारली आणि युरोफायटरला हे कंत्राट मिळवता आले नाही.
संदर्भ :-- http://www.thehindu.com/news/national/article2847987.ece

जाता-जाता :---
आपल्या देशाची युद्ध करण्याची क्षमता किती आणि कशी होती त्याची छोटीशी झलक कारगिल युद्धात मिळाली.या युद्धात वापरली गेलेल्या Bofors howitzer ला लागणारे 155 mm चे तोफगोळे कमी पडले आणि आयत्या वेळी साउथ आफ्रिकेतुन आयात करावे लागले ! T-72 and 130mm medium gun ammunition देखील कमी पडला आणि हिंदुस्थानी लष्कराचा दुबळेपणा अख्या जगा समोर उघड झाला. :(

मदनबाण's picture

28 Mar 2012 - 1:43 pm | मदनबाण

ताजी बातमी :---
परकीय आक्रमणाला थोपवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा दारुगोळा नाही ! इति :- जनरल व्ही के सिंह
कारगिल युद्धाच्या धड्यातुन आपला देश काहीही शिकला नाही हे याचे जिवंत उदाहरण ! :(

संदर्भ :- http://starmajha.newsbullet.in/india/34-more/14614-2012-03-28-06-41-51

http://www.dnaindia.com/india/report_dna-exclusive-gen-vk-singh-tells-pm...

मदनबाण's picture

4 Apr 2012 - 11:44 am | मदनबाण

ताजा कलमः---

सध्या हिंदुस्थानात लष्कर आणि सरकार यात काही आलबेल दिसत नाहीये.
हिंदुस्थानी लष्कराद्वारे उठाव होउ शकतो काय ? असा प्रश्न मला पडला आहे ! कुठल्या घडामोडींचे काय परिणाम होतील हे येणार्‍या काळात कळेलच पण आज इंडियन एक्स्प्रेस मधे आलेली बातमी मात्र अस्वस्थ करणारी वाटते !

The January night Raisina Hill was spooked: Two key Army units moved towards Delhi without notifying govt

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2012 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या बाण्याला आवरा रे कोणीतरी. नाहीतर बॉर्डरवर तरी द्या पाठवून. ;)

वेचक वेचक धागे सारखा वर काढत असतो नालायक माणूस.

सुधीर मुतालीक's picture

6 Apr 2012 - 10:41 am | सुधीर मुतालीक

१००% अमेरिकेतल्या शस्त्र विक्रेत्यांचा हा धंदा करायचा डाव आहे. सामान्यजन याला बळी पडु नयेत म्हंजे झाले. आनंद महिन्द्रांची प्रति़क्रीया बोलकी आहे - अशा बातम्या तयार करून भारतीय उद्योगांची वाट लावत रहातात.

मोझेस's picture

4 Apr 2012 - 4:04 pm | मोझेस

' हिन्दुस्थानी लश्कराचा ' ... हा मुद्दा नसून अमेरीकेने भारताच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करू नये हे प्रोटोकोल
अमेरीकेला माहित नाही काय? अमेरीकाचा शस्त्रे निर्यातीत ३०% भाग आहे, म्हणून अमेरीकन नेत्यांना जागतीक
न्यायालयात खेचले पाहिजे ' असे एखाद्या भारतीय नेत्याने विधान केले तर चालेल का?

मोझेस's picture

4 Apr 2012 - 4:06 pm | मोझेस

' हिन्दुस्थानी लश्कराचा ' ... हा मुद्दा नसून अमेरीकेने भारताच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करू नये हे प्रोटोकोल
अमेरीकेला माहित नाही काय? अमेरीकाचा शस्त्रे निर्यातीत ३०% भाग आहे, म्हणून अमेरीकन नेत्यांना जागतीक
न्यायालयात खेचले पाहिजे ' असे एखाद्या भारतीय नेत्याने विधान केले तर चालेल का?

विजुभाऊ's picture

2 Feb 2012 - 2:53 pm | विजुभाऊ

गेले कित्येक वर्षे नवी संरक्षण सामग्री विकसीत केलेली नाही. बोफोर्स प्रकरणामुळे विकत घेण्याचे निर्णय घेतलेले नाहिय्येत.
कशाने लढणार आहेत कोण जाणे.
चिनची क्रिकेट टीम सुद्धा नाहिय्ये................. नाहितर धोनीके धुरंधर बॅट बॉल ने लढले असते फ्रेंडली म्याच मधे हरले असते

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Feb 2012 - 3:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

चिनची क्रिकेट टीम सुद्धा नाहिय्ये................. नाहितर धोनीके धुरंधर बॅट बॉल ने लढले असते फ्रेंडली म्याच मधे हरले असते

सध्या तिथेही शंका वाटतेय. :(

भारतानं टायफून फायटर विकत न घेता रफालेच्या विमानांना पसंती दिली, कारण विमानांच्या तंत्रज्ञान हस्तांतरास तयारी, कमी किंमत आणि अशी विमाने इतर देशांकडे नसणे, तसेच युरोफायटरएवढी तगडी नसली तरी रफाले तोडीस तोड ठरु शकतील असा त्यात भारताचा फायदा आहे.
यांच्या मित्राच्या तोंडाला पाने पुसली गेली म्हणून आता ओरडायला लागले भारत युद्धाची तयारी करतोय म्हणून. यांची युरोफायटर विमाने काय फुले उधळणार आहेत काय युद्धात (होणार नाहीच, पण जर कधी झाले तर)?
श्रीयुत कॅमेरुन पण रफाले विमाने विकत न घेण्‍याबद्दल भारताला समजाऊन सांगू असे म्हणत आहेत.

आनंदी गोपाळ's picture

2 Feb 2012 - 11:50 pm | आनंदी गोपाळ

नांव सुधीर असलं म्हणून काय झालं?
असल्या विषयांत आसक्ती फक्त सुधीर काळे काका दाखवू शकतात.
उगा स्वामित्वहक्कभंग वै भानग्डित पडु नका.
अमेरिका, चीन इ. लेख लिहीण्याचा अधिकार फक्त काळेकाकांचा आहे असे म्हणणारा,
आनंदी गोपाळ

सुधीर मुतालीक's picture

3 Feb 2012 - 12:28 pm | सुधीर मुतालीक

एक डाव माफ करा गोपुदादा. पुन्या अशी चूक न्हाई हौ देनार.
चुकून फुडल्या येळंला अमेरिका चीन ल्हिलच तर नाव सुधीर काळे असं ल्हिऊ.
आपलं नाव न्हाई सांगनार.