लहानपणीचा उन्हाळा लै भारी असायचा. शाळेला सुट्टी. सकाळी ७ वाजता शेतातल्या आंब्यांचा 'ब्रेकफास्ट' करायचा आणि क्रिकेट खेळायला पळायच! ११.३०-१२ ला घरी येऊन मस्त थंड पाण्यानी आंघोळ करायची. नंतर आमरस-पोळी वर यथेच्छ ताव मारायचा! दुपारी परत बैठे खेळ. गोट्या, चिंचोके, पत्ते. ४ वाजता परत घरी येऊन काहीतरी (बहुदा थंड दही-भात आणी शेन्ग्दाण्याची चटनी ) खायच आणि परत पळायच क्रिकेटखेळायलाअगदी संध्याकाळी ७ पर्यंत. काय दिवस होते ते!
त्यावेळी आमच्याकडे आजोबा त्यांच्या खोलीत खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून घेत असत उन्हाळ्यात. दुपारच्या झोपेआधी त्यापडद्यांवरपाणी मारले जाई. अहाहा! काय मस्त सुगंध सगळ्या घरभर दरवळायला लागायचा! कधी कधी आजोबांच्या त्या खोलीतझोपायला मिळे.अशी गाढ आणी मस्त झोप लागायचे म्हणून सांगू. पूर्ण खोलीत अंधार झालेला. वाळ्याचा तो सुगंध आणी वर पंखा.
खरच, हरवले हो ते दिवस.
असो. हा सगळा लेखन प्रपंच एवढ्या साठी की उन्हाळा सुरू झाला आहे आणि मी विचार करतोय की ह्या उन्हाळ्यात वाळ्याचे पडदेआणायचे. पुण्यात खूप शोधले पण कुठेच मिळाले नाही. तुमच्यापैकी कुणाला माहीत आहे का पुण्यात वाळ्याचे पडदे कुठे मिळतील?असल्यास कृपया सांगावे.
प्रतिक्रिया
27 Mar 2012 - 7:17 pm | यकु
कलियुग हो, घोर कलियुग!
वाळ्याच्या पडद्यांचा पत्ता कोण विचारतंय तर अन्तू बर्वा ! अन्तूशेठ, दुपारच्या पारीस थंडगार हवा देणारी तुमची बाग काय सदभटाला विकली काय? :p
27 Mar 2012 - 7:25 pm | अन्तु बर्वा
पोफळीची बाग म्हणजे एयर कंडीशन हो! काय! आमचा कंट्री विनोद हो क्रूरसिंगबापु!
दिवसभर तर आम्ही एयर कंडीशन मधेच बसलेले असतो हापीसात. तेंव्हा आम्हाला वाळाच हवा!
27 Mar 2012 - 7:33 pm | किचेन
पुण्यात बऱ्याच ठिकाणी वाळ्याचे पडदे मिळतात.गणपती चोव्कातून समाधानच्या चोवकाकडे चालत गेलात तर उजव्या हाताला एक दुकान आहे.वाल्याचे पडदे बाहेरपण लावलेले असतात तुम्हाला ते लगेच सापडेल.आणखीन एक आहे मंडई कडून जिलब्या गणपतीकडे चालत येताना रस्त्याच्या डाव्या बाजूला काही दुकाने आहेत.पुना शुगर डेपोच्या समोर.
27 Mar 2012 - 7:50 pm | अन्तु बर्वा
धन्यवाद! या वीकेन्ड्ला नक्की जातो.
27 Mar 2012 - 7:33 pm | प्राध्यापक
अन्तूशेठ,
पुण्याच्या तुळशिबागेत जरा जाउन या,तिथे काय मिळत नाहि ?
27 Mar 2012 - 7:48 pm | रेवती
हो. तिथे मिळतील पण फसवणूक होऊ नये म्हणून सावध असावे लागेल.
27 Mar 2012 - 7:51 pm | अन्तु बर्वा
तुळशी बागेत चौकशी केली होती मी पण मिळाले नाहित.
28 Mar 2012 - 12:24 am | योगप्रभू
नवे नवे आणले तेव्हाचा उन्हाळा वाळ्याच्या मंद सुगंधात मस्त गेला. नंतर पावसाळ्यात ते पडदे काढून नीट बांधून लॉफ्टवर ठेऊन दिले. पावसाळ्यात आपोआप त्यात कसलेसे कीडे झाले. पुन्हा हिवाळ्यात ते काढून ऑक्टोबर हीटमध्ये उन दिले. मग उन्हाळा आल्यावर परत लावायला गेलो तर गवत आणि भुसा पडायला लागला. वासपण अजिबात येत नव्हता. ती कटकट झाली आणि सरळ टाकून दिले. सध्या कूलर वापरतो आहे. कूलर टँकच्या पाण्यात खसच्या अत्तराचे थेंब टाकले, की वाळ्याच्या पडद्याचा फील. पण त्या कूलरचा रात्रभर आवाज येतो. ती एक वेगळी कटकट. एसी बसवावा म्हणेपर्यंत त्याच्या किंमती पाच हजारांनी वाढल्यात. मायबाप वीजखात्याने वाढीव भारनियमनाची घोषणा केलीय.
एकूण काय जिंदगी आणि आम्ही, दोघंबी भिकार** :)
28 Mar 2012 - 1:49 am | पक्या
दरवर्षी नविन घेतेलेले बरे. पडदे साठवून ठेवले हे पहिल्यांदाच ऐकले.
28 Mar 2012 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार
पक्याशी सहमत. (काय दिवस आलेत च्यायला !)
वाळ्याचे पडदे हे उन्हाळा संपला की त्यांचे देखील आयुष्य संपले असे समजून फेकुन द्यावेत. नको तिथे काटकसर करायचे किडे करु नयेत* अन्यथा पडद्यात किडे पडतात.
*हे भटुकडे कधी सुधारायचे काय माहिती.
28 Mar 2012 - 2:32 pm | आदिजोशी
वाळ्याच्या पडद्या आडून जातीवाचक टिका करणार्या पर्याचा निषेध निषेध निषेध !!!
28 Mar 2012 - 3:50 pm | योगप्रभू
राजाच्या घरी रोजच दिवाळी. राजकुमारांना काय होतंय सांगायला, म्हणे फेकून द्या.
आडनावातही पाच अक्षरांची उधळण. मग असंच होणार. देशस्थांच्या वाईट सवयी लागल्यात पोट्ट्यांना :)
28 Mar 2012 - 2:41 pm | अन्तु बर्वा
एक शन्का आहे. इथे कुणीतरी म्हटल्यासारखे कूलर च्या पाण्यात वाळ्याच्या अत्तराचे थेम्ब टाकणे बेटर की वाळ्याचे पडदे आणावेत?
28 Mar 2012 - 3:20 pm | परिकथेतील राजकुमार
अहो कुलर वैग्रे सगळे हुच्चभ्रुचे नखरे आहेत बघा. तुम्ही फक्कडसे वाळ्याचे पडदे आणून टाका पाहू. येता येता सदाशिवपेठेतून या, म्हणजे मी पण येतो सोबतीला आणि २ पडदे खरेदी करून टाकतो.
28 Mar 2012 - 4:11 pm | अन्तु बर्वा
उत्तम! ह्या आठ्वडी अन्ताला करुन टाकु खरेदि.
28 Mar 2012 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार
यायच्या आधी व्यनी करा, म्हणजे आम्ही तयारी करून ठेवू.
28 Mar 2012 - 4:34 pm | मी-सौरभ
USSP वाल्यांनी तयारी करुन ठेवतो म्हटलं आहे म्हंजे धोका होऊ शकतो.
सावधान!!
28 Mar 2012 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार
मिळाला मौका मारा चौका.
का उगाच माझ्या विषयी गैरसमज पसरवतो आहेस बाबा ? दुपारची एखाद बिअर सूटली असती फुकटात, ती पण सूटायची नाही. ;)
28 Mar 2012 - 6:40 pm | मी-सौरभ
भेटा तुमच्या लाडक्या पूनम मधे. बसूया :)
ढिसक्लेमर
: आमी आमचं मत आमच्या एका दोस्ताला आलेल्या स्वाणूभवावरुन बनवलं आहे.
28 Mar 2012 - 7:10 pm | अन्तु बर्वा
अरेरे! पराला सव्वाशेर बघायचा चानस गावला अस्ता की हो.... पार बोळा फिरवला तुम्ही त्यावर.
28 Mar 2012 - 3:07 pm | सर्वसाक्षी
मग हे धोके लक्षात घ्या
१) साचलेल्या पाण्यात डास वाढतात = डेंग्यु, मलेरिया
२) कूलरच्या पाण्यात रात्री गुंगीचे औषध टाकुन घरातील सर्वांना बेशुद्ध करुन घरफोडी होऊ शकते
३) घरचे बाहेरगावी गेले असता कूलर काढुन त्या भगदाडातून चोर आत शिरु शकतात
28 Mar 2012 - 3:35 pm | योगप्रभू
<<१) साचलेल्या पाण्यात डास वाढतात = डेंग्यु, मलेरिया>>
....डास वाढायला पाणी साचायला तर पाहिजेना. इथे रोज कूलरमध्ये पाणी टाकावे लागते. पहाटेपर्यंत टँक ड्राय होतो.
<<२) कूलरच्या पाण्यात रात्री गुंगीचे औषध टाकुन घरातील सर्वांना बेशुद्ध करुन घरफोडी होऊ शकते>>
....शक्य आहे. मात्र कूलर वापरणार्यांची आर्थिक लायकी चोर ओळखून असतात त्यामुळे ते अशा घरांकडे टाईमपास करायला फिरकत नाहीत. अरे! चोरांनाही काही स्टेटस आहे की नाही?
<<३) घरचे बाहेरगावी गेले असता कूलर काढुन त्या भगदाडातून चोर आत शिरु शकतात >>
.... आता फिक्स्ड कूलर बसवण्याची गरज नाही. खोलीपुरता थंडावा देणारे आणि चाके असलेले पोर्टेबल कूलर बाजारात आहेत. मुलांना गाडीगाडी खेळायला त्यांचा उपयोग होतो.
28 Mar 2012 - 3:31 pm | विजुभाऊ
पहिला प्रतिसाद मान्य.
दुसरा प्रतिसाद अवघड आहे
तिसरा अमान्य.
28 Mar 2012 - 3:55 pm | अन्तु बर्वा
वस्ताद हो विजुभाऊ वस्ताद! कोर्टात साक्शिदार म्हणुन नाव काढाल!
28 Mar 2012 - 11:59 pm | इरसाल
लोक आय्डी पण बदलायला लागलेत. म्हण्जे फ्याड हो....
29 Mar 2012 - 11:45 am | अंतु बर्वा
च्यामारी मला आधी वाटलं माझा आय्डी ह्याक झाला की काय? पण नंतर पाह्यलं ह्यो तर येगळाच "अन्तु" बर्वा दिसतोय...