कुत्रेकुई, पळता भुई, झोप जाई!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
26 Mar 2012 - 1:38 pm
गाभा: 

एका बातमीनुसार हायकोर्टाने म्हटल्याचे आठवते की झोप हा माणसाचा मुलभूत हक्क आहे.
म्हणून रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी केली आहे.
पण, रस्तोरस्ती भटकणाऱ्या कुत्र्यांबद्दल कोर्टाची आणि महानागरपालीकांची भूमिका काय आहे?
रात्री कामावरून घरी परत येणारया नागरिकांना, लहान मुलांना चावणे, त्यांचेवर भुंकणे, त्यांच्या वाहनामागे पळणे, तसेच रात्रभर कुत्र्यांचा घोळका एकत्र येवून कर्कश्य आवाजात मोठ्ठ्याने भुंकणे असे प्रकार अनेक शहरातील वेगवेगळ्या परिसरात वाढले आहेत.
त्यामुळे नागरिकांची झोप हैराण झाली आहे.
या भटक्या कुत्र्यांना काही गेटच्या आत राहून भुंकणारी पाळीव कुत्रीही साथ देत असतात.
पाळीव कुत्र्यांचे मालक कुत्र्यांना बाहेरच्या गेटजवळ बांधून स्वतः गाढ झोपतात आणि ती कुत्री इतर लोकांवर भुंकून त्यांची रात्र खराब करतात.
तसेच पाळीव कुत्र्यांचे सुशिक्षित मालक त्यांना सकाळी रस्त्यावर फिरायला नेतात आणि त्यामुळे कुत्रे रस्ते खराब करतात.
त्यांना समाजीक जाणीव का नाही?
प्राणी दया एवढी महत्त्वाची आहे काय की त्यापुढे एखाद्या नागरिकाचा प्राण, रोजची रात्रीची झोप आणि शहरांची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची नाही???
या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास कोठे करता येईल?
कुणाला माहीत असल्यास कळवावे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

26 Mar 2012 - 2:11 pm | कपिलमुनी

कोल्हेकुई चालू असते काही जणांची..
काही आय डी भुंकत असतात ...
दुर्लक्ष करायचे

पैसा's picture

26 Mar 2012 - 2:21 pm | पैसा

अखिल भारतीय स्तरावर आहे असं दिसतंय. आमच्या म्युनिसिपालिटीत चौकशी/तक्रार केली तर "एका माणसाला भटके कुत्रे पकडायचं कॉण्ट्रॅक्ट दिलंय, पण आम्ही आजपर्यंत त्याला पाहिलं नाही." असं उत्तर मिळालं.

आता आम्ही कायदा म्हणजे दगड आणि काठी हातात घेतली आहे.

खिशात एक बेचकी आणि काही दगड बाळगावे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2012 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा

@खिशात एक बेचकी आणि काही दगड बाळगावे.>>> मेलो...मेलो... हा गंपा मेला भारी खट्याळ आहे

कवितानागेश's picture

26 Mar 2012 - 2:47 pm | कवितानागेश

मी नाई घाबरत कुत्र्यांना.... ;)

-वाघाची मावशी

भारतातले नाही तर निदान मुंबई-पुण्यातले सर्व भटके कुत्रे मनेका गांधीच्या ताब्यात सोपवणं हा एक उत्तम उपाय आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2012 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

'यथा प्रजा तथा श्वान' असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

ब्राझील की अर्जेंटीना, निटसे आठवत नाहि पण तेथे अशी कुत्री वाढल्याने, सरकारतर्फे ठार मारण्यात येत होती..
भारतात मात्र असे अजुन काही ऐकिवात नाही. पिसाळलेले कुत्रे असेल तर ग्रांपचायत किंवा महानगरपालिका तत्सम ठिकाणी तक्रार केल्यावर लोक येत असतील असे वाटते.
पण आमच्यायेथे ग्रांपचायती मध्ये जाण्याचे कष्ट घेण्यापेक्षा सरळ पावातुन विष देवुन खात्मा केला जायचा अश्या कुत्र्यांचा..
आणि मग कधी कधी पिसाळलेल्या कुत्र्याची मालकीनच पिसाळल्या सारखी अंगावर धावायची आजुबाजुच्या लोकांवर....

बाकी प्राणी दया.. अमक आणि फलान माणसाने माणसाच्या सोयीप्रमाणे केले आहे..
त्याला गाईपासुन उत्पन्न आणि आहार मिळतो म्हणुन ती देवता .. त्याला वराहापासुन घाण वाटते म्हणुन ती निषिद्ध ..
कोंबडी स्वस्तात मिळते म्हणुन चविष्ट .. त्यामुळे कोंबड्या .. शेळ्या .. बकर्या मारल्यावर जर प्राणी मारल्याप्रकरणी अटक/ कारवाई होत नसेल तर कुत्री.. गाढव मारल्यावर काय फरक पडेल असे वाटत नाही..

गेल्या काही दिवसातील धागे पहाता मिपा हे तक्रार निवारण केंद्र होते आहे का ?
१. वि.एस.एन.एल च्या तक्रारी
२. रेल्वेच्या तिकीटाच्या तक्रारी
३. भटके कुत्रे ( कहर )

असे असेल तर आपापल्या तक्रारी नोंदवा
माझ्या # २

१. घड्याळाचा गजर जेंव्हा हवा तेंव्हा होत नाही :आजकाल गजर कधीही वाजतो.
२. बिनसाखरेचा गाजर हलवा कुठे मिळेल ?

मन१'s picture

27 Mar 2012 - 1:09 pm | मन१

२. बिनसाखरेचा गाजर हलवा कुठे मिळेल ?

ठाउक नाय ब्वॉ. पण बिनगाजराचा गाजर हलवा पुण्यात नक्कीच मिळेल.

सुधीर's picture

26 Mar 2012 - 11:43 pm | सुधीर

अवांतरः साउथ कोरिया आणि चायना मधे कुत्रे खातात. अगोदर मला विचित्र वाटायचं. पण नंतर एका कोरियन मैत्रिणीने सांगितलं की, त्याच्यांकडे कुत्रा या प्राण्याला "प्रामाणिक प्राणी" नाही तर इतर शेळ्या मेंढ्यांप्रमाणे अन्न म्हणून वाढवलं जातं आणि त्याचप्रमाणे पाहीलं जातं. (नुकतचं वाचलं इशान्य भारतातही हे खाल्लं जातं)
एक्सपोर्टच्या बिझनेस चा विचार करू शकता. (ह. घ्या.)

किचेन's picture

27 Mar 2012 - 12:53 am | किचेन

रात्री कामावरून घरी परत येणारया नागरिकांना, लहान मुलांना चावणे, त्यांचेवर भुंकणे, त्यांच्या वाहनामागे पळणे, तसेच रात्रभर कुत्र्यांचा घोळका एकत्र येवून कर्कश्य आवाजात मोठ्ठ्याने भुंकणे असे प्रकार अनेक शहरातील वेगवेगळ्या परिसरात वाढले आहेत.

असे प्रकर शहर वाढल्याने वाढले आहेत.पाळीव प्राण्यासाठी शौचालय बांधले जावे या मागणीसाठी तुम्ही लढायला हरकत नाही.तुमचा लढा यशस्वी झाला तर मिपाकडून शाल आणि नारळ मिळेलच.

शाल आणि नारळ मिळेलच.

एक दुरुस्ती : महावस्त्र आणि श्रीफळ.

विजय_आंग्रे's picture

27 Mar 2012 - 10:35 am | विजय_आंग्रे

>>नुकतचं वाचलं इशान्य भारतातही हे खाल्लं जातं<<

इशान्य भारतात, आदिवासी लोकांमध्ये एक प्रथा आहे. त्यांच्या कोणत्यातरी दैवीकार्यात पुजा झाल्यावर ते देवाला दाखविलेला नैवेद्य एका "काळ्या कुत्र्याला" खाऊ घालतात. व नंतर त्या कुत्र्याला चक्कर येई पर्यंत गोल फिरविले जाते. कुत्र्याला भोवळ(चक्कर) आल्यावर, ते कुत्र उलट्या करु लागतो मग ते ओकलेल अन्न प्रसाद म्हणून वाटले जाते. :shock: गुवाहटीच्या पुढे खेट्री या गावी हा प्रकार आम्ही स्वतः पाहीला आहे.

कुत्र्यांचा त्रास होऊ नये म्हणून काही उपाय -

१) दुर्लक्ष करणे
२) कानात कापसाचे बोळे घालणे
३) शक्यतो बाहेर न जाता घरीच रहाणे.
४) दुर्लक्ष करूनही कुत्री मागे लागली तर दगड , काठी इ. शस्त्रे वापरून प्रतिकार करणे.
५) विपश्यना शिबिराला जाणे.-- त्या योगे मनः शांती लाभून सगळ्याच त्रासांपासून मुक्ती मिळते (असे म्हणतात..).

भुंकणार्‍या कुत्र्याची तक्रार करायला मात्र मुळीच जाऊ नये. कारण जर मालक / मालकीणीच्या ओळखीपाळखी असतील तर कुत्री नाहीत तर तुम्हीच भुंकत होता असे चार पाच साक्षीदारांच्या सहाय्याने सिद्ध केले जाऊ शकते.

आणि भटक्या कुत्र्यांबाबत कोणालाच काही करणे शक्य नाही, कारण एका गल्लीतील सगळी पकडून पुढ्च्या गल्लीत कॉर्पोरेशनची गाडी जाई पर्यंत, इकडे त्यांची नविन पिढी तयार झालेली असते.

हुप्प्या's picture

29 Mar 2012 - 12:11 am | हुप्प्या

भटका कुत्रा हा निव्वळ भुंकून वा चावूनच उपद्रव देतो असे नव्हे तर त्याच्या द्वारे लेप्टोस्पायरोसिस सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो. माझ्या ओळखीच्या एका माणसाच्या पायाला जखम झाली होती. तो मुंबईच्या पावसाच्या पाण्यात चालत गेला आणि लगेच लेप्टोने आजारी पडला. आणि काही दिवसात मरण पावला. बाकी धडधाकट असणारा असा माणूस अशा रोगाने मरतो हे फारच धक्कादायक होते.
पण भटके कुत्रे, उंदीर, घुशी अशा प्राण्यांमुळे हा रोग होऊ शकतो. तेव्हा जपून.

डास, ढेकूण, झुरळे, उंदीर मारले तर सरकार काही म्हणत नाही. माणूस खाण्याकरता प्राणी (गाय सोडून) मारतो तेव्हाही काही नाही. मग केवळ कुत्र्याकरता जास्तीचा कळवळा का?

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 Mar 2012 - 9:09 am | पुण्याचे वटवाघूळ

कुत्र्यांचा घोळका एकत्र येवून कर्कश्य आवाजात मोठ्ठ्याने भुंकणे असे प्रकार अनेक शहरातील वेगवेगळ्या परिसरात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांची झोप हैराण झाली आहे.

अहो एवढ्या कारणावरून कुत्र्यांना ठार मारायला निघालात तर कुत्र्यापेक्षा अनेक पटींनी प्रगत (आणि विचार करू शकत असलेल्या) अशा मनुष्य जमातीत जन्माला येऊनही गणेशोत्सव आणि गरब्याच्या वेळी, कोणा संतमहंतांच्या/देवदेवतेच्या जयंतीच्या दिवशी लाऊडस्पीकरवरून धांगडधिंगा करत असलेल्यांना काय शिक्षा द्यावी बरे? (गणेशोत्सवातील विसर्जनाची मिरवणूक २४ पेक्षा जास्त तास चालते आमच्या पुण्यात. ती काही १० नंतर बंद नसते. त्या काळात लक्ष्मी रोडवरील कोणाला हृदयविकाराचा झटका दुर्दैवाने आला तर तिथे रूग्णवाहिकाही वेळेत पोहोचू शकणार नाहीत अशीच परिस्थिती असते.इथे माणूस मेला तरी चालेल पण आमच्या देवभक्तीचे प्रदर्शन झालेच पाहिजे हा अट्टाहास). फारशी अक्कल नसलेल्या आणि विचार करायची क्षमता नसलेल्या कुत्र्यांना भुंकले आणि आपली झोपमोड झाली म्हणून ठार मारायला निघत असाल तर त्याच न्यायाने अशा मनुष्यप्राण्यांचे काय करायला हवे? त्याच न्यायाने अशा सगळ्यांना ताबडतोब ठार मारायला हवे- इतकेच काय तर अशी मंडळी पुढचे दहा जन्म तरी मेलेलीच म्हणून जन्माला यायला हवीत.