शंभर वर्षातून एखाद्याच वेळेला साजरे करण्यासारखे काही क्षण असतात, त्यापैकी एक म्हणजे सचिनची सेंचुरीची सेंचुरी. त्यासाठी काहीतरी भन्नाट पेय नको का? पण आपले लाडके कॉकटेलाचार्य सोत्रि सध्या दारूचा बारच्यामागची आपली जागा सोडून वेगळेच बार उडवण्याच्या मोहिमेवर आहेत. तेव्हा म्हटलं आपण चान्स मारून घ्यावा. म्हणून 'सेंचुरी धमाका' हे नवीन कॉकटेल सादर करत आहोत. हे कॉकटेल काहींना भन्नाट आवडतं आणि ते भरभरून प्रतिसाद देतात. आणखीन इतरांना ते कॉकटेल वाईट वाटलं नसलं तरी आधीच्यांचे प्रतिसाद आवडत नाहीत, मग ते त्यांना तसं सांगतात. त्यांची एकमेकांत चर्चा रंगते आणि प्रतिसादांची सेंचुरी हा हा म्हणता गाठली जाते. म्हणून हे नाव.
या कॉकटेलचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे एक स्फोटक विषय. स्त्री-पुरुष, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, निवासी-अनिवासी, पुणेकर-इतर, एक संस्थळ - दुसरं संस्थळ असे जनमत दुभागणारे विषय हवेत. ते विषय आधीच खूप वेळा वापरून घेतले गेले आहेत याची चिंता करू नये. दारूप्रमाणेच या विषयांची नशाही दरवेळी नवीन चढते. व्होडका बऱ्याच वेळा प्यायली आहे म्हणून आपण ती पुन्हा प्यायची नाही असं करतो का? खरं तर म्हणूनच तिची वेगवेगळी कॉकटेलं करून प्यायली की जरा तेवढाच बदल होतो.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आत्यंतिक साळसूदपणा. स्क्रूड्रायव्हरमध्ये घातलेल्या ऑरेंज ज्यूसप्रमाणे त्यामुळे अल्कोहोलची जळजळीत चव सुसह्य होते. त्यासाठी काहीही विधानं करण्याऐवजी प्रश्न विचारणं सोयीस्कर ठरतं. त्या प्रश्नाचे शब्द योग्य प्रमाणात आले पाहिजेत. खरडवह्यांतून किंवा व्यनिंतून - 'साला, पेटणार आहे बघ वडवानल!' असं स्वतःला गुदगुल्या होत असलेल्या स्वरात जरूर लिहा. पण लेखात मात्र गंभीरतेचा आव आला पाहिजे. तुम्हाला काही क्षण उच्चभ्रूच समजलं जाण्याचाही किंचित धोका पत्करावा लागेल इतपत गंभीर. म्हणजे उदाहरणार्थ 'हे हरामखोर अनिवासी इतके का माजलेले आहेत?' असा सरळ प्रश्न विचारला तर कॉकटेलची मजा जाते. त्याऐवजी 'अनिवासी भारत सोडून गेल्यामुळे त्यांची महाराष्ट्राशी असलेली सांस्कृतिक नाळ तुटते का?' असा उच्चभ्रू शब्दांत, स्वतःला खरोखरच त्या माहितीत रस असल्याप्रमाणे प्रश्न विचारावा. मग कोणीतरी लिहितंच 'हे साले अनिवासी, सिटिझन होतात आणि आपल्याच माजी देशवासीयांवर गोळ्या घालू म्हणून खणखणीत आवाजात शपथ घेतात.' जर कोणी लिहायला तयार नसेल तर आपल्याच मित्राला असली भडकाऊ कॉमेंट टाकायला सांगायची. मग कोणी तरी पिडांसारखा मातब्बर नागरिकत्व आणि जीवनपद्धती यांमधला फरक सांगायला गदा फिरवत धावून येतो. स्वतःला काहीच टोकाची विधानं करावी न लागता शांतपणे धाग्यावरचे प्रतिसादांचे चौकार, षटकार वाढताना बघायचे. अगदी शून्य ची पानं फाडून टाकलेल्या पुस्तकाने खेळलेल्या बुक क्रिकेटसारखे.
सामान्य कॉकटेलला ज्याप्रमाणे थंडावा देण्यासाठी बर्फाची जरूर असते, तशीच या कॉकटेललाही काहीतरी सुसंबद्ध भासणाऱ्या लिखाणाची गरज असते. उदाहरण देऊन सांगतो. मार्गारिटामध्ये आइस्ड आणि फ्रोझन असे दोन प्रकार असतात. एकात बर्फाचे मोठे तुकडे असतात, दुसऱ्यात ते कॉकटेल ब्लेंडरमधून बर्फासकट काढल्यामुळे अगदी पेयाशी एकजीव झालेला बर्फाचा भुगा असतो. (नक्की कुठचं आइस्ड आणि कुठचं फ्रोझन हे माहीत नसलं तरी फरक पडत नाही). तसंच तुम्हाला दोन पद्धतीने ते लेखन करता येतं. एक म्हणजे साळसूद प्रश्न - यात विषयाची मांडणी आणि तदनुषंगिक प्रश्न येतात. दुसरी पद्धत म्हणजे एखादी ढोबळ रूपककथा लिहिणं. राजा-प्रधान, अमात्य-विदूषक, एक राज्य आणि दुसरं राज्य वगैरे घिसीपिटी रूपकं वापरली की झालं. मग तुमच्या साळसूदपणाच्या ऑरेंज ज्यूसची चवही जिभेला थंडगार लागते. वाचकांनी ही रूपकं चुकीची इंटरप्रिट केल्यामुळे प्रतिसादांत आणखीनच कल्ला होतो हा बोनस!
सर्वात शेवटी गार्निशसाठी एक डिस्क्लेमर भुरभुरवावा. म्हणजे पेयातली सगळी कडवट चव निघून जाते.
हा लेख निव्वळ कॉकटेलचंच वर्णन म्हणून घेणे, व त्यात इतर अर्थ शोधू नयेत, व शोधलेच आणि समजा काही विचित्र साम्यं सद्यपरिस्थितीशी किंवा व्यक्तीशी सापडलीच तर तो कर्मधर्मसंयोग समजावा, आणि तेवढे कष्ट घ्यायचे नसतील तर सगळ्यांनीच हलक्याने घेणे. आणि अर्थातच मी हे सांगण्याचं काम केलेलं आहे कारण माझं मन स्वच्छ आहे, मला कोणाच्या कुरापती काढायच्या नाहीत हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे.
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 8:44 pm | प्रास
सचिनच्या सेन्च्युरीनिमित्ताने बनवलेल्या सेंचुरी धमाका ('वडवानल' स्पेशल) कॉकटेलचा स्वाद अगदी जळजळीत झालेला आहे. कित्येक वाक्यांमध्ये कोणाला, कुठे जळजळ झाली असावी याचा व्यवस्थित अंदाज करता येतोय.
बाकी घासकडवींना इथे पुन्हा लिहिते झाल्याचे पाहून आनंद झाला.
21 Mar 2012 - 4:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हेच म्हणतो. या निमित्ताने का होईना, गुर्जी दर्शन देते झाले हे काय कमी आहे. गुर्जी, नवीन घरी गेलात तरी माहेर समजून इथे आलात तरी चालेल मध्ये मध्ये. कुणीही तुम्हाला माहेरवाशीण म्हणून डिवचणार नाही :-)
19 Mar 2012 - 8:46 pm | सोत्रि
गुर्जी, त्रिवार दंडवत!!!
पहिला दंडवत ह्या पोटंट कॉकटेलसाठी ! _/\_
च्यायला, एकापेक्षा एक पोटंट (जहाल) कॉकटेलं ट्राय केली पण ह्या 'सेंचुरी धमाका'ची सर कुठल्याही कॉकटेलला नव्हती हे साळसूदपणे कबूल करतो.
क ड क ! ह्यासाठी हा दुसरा दंडवत!! _/\__/\_
आणि गार्निशिंगसाठी तिसरा दंडवत _/\__/\__/\_
- ('सेंचुरी धमाका' चढलेला) सोकाजी
19 Mar 2012 - 8:47 pm | स्मिता.
आमच्या इथल्या काही परम स्नेह्यांचं अतिशय आवडतं कॉकटेल आहे हे! त्यातल्या त्यात गेल्या १-२ महिन्यांपासून तर जास्तीत जास्त लोकांना ते आवडायला लागल्याचं दिसून येत आहे.
या भन्नाट कॉकटेलची पाकृ इथे देवून मात्र तुम्ही त्याचं ग्लॅमर कमी केलंत! आता प्रत्येकच जण हे कॉकटेल बनवायला लागला / लागली तर काय मजा?
19 Mar 2012 - 8:52 pm | विजुभाऊ
विहीर समुद्र वडवानल आणि कॉकटेल............. अरेच्चा हे एका नव्या पुस्तकाचे टायटल झाले की
19 Mar 2012 - 9:16 pm | राजेश घासकडवी
अवांतर करून विषय भरकटवण्याच्या प्रयत्नाबद्दल तीव्र निषेध. तुम्ही लेखाखालचं डिस्क्लेमर वाचलं नाहीत का?
19 Mar 2012 - 9:21 pm | पैसा
फोटो दिल्याशिवाय आम्ही याला रेसिपी म्हणणार नाही!
(मला वाटलं सोकाजीचा आणखी एक धागा आहे का काय!)
19 Mar 2012 - 9:36 pm | सोत्रि
अगदी सहमत. जर रेसिपीचा फोटो आला असता तर मी साष्टांग दंडवत घातला असता, अगदी त्या शेंडीधारी साधूच्या फोटोसकट :)
- (अजुनही 'सेन्चुरी धमाका'च्या तारेत असलेला) सोकाजी
स्वगतः सोक्या, पैसातैला त्या मुघल सैनिकांना जसे संताजी धनाजी दिसायचे सगळीकडे तसा सोक्या दिसायला लागलाय की काय? ;)
20 Mar 2012 - 8:10 am | बंडा मामा
सतत कसल्यातरी उपमांचा प्रतिमांचा आधार घेऊन उगाच मिपाला हिणवणे पुरे आता. तुम्हाला नाही आवडत इकडे तर इथे येण्याची सक्ती नाही ना. तो तुमचा समुद्र असेल चांगला तर तिकडेच पोहा ना. इकडे उगाच तिकडच्या लिंका घेउन लोकांना फोडायला कशाला येता. असले लेखन इथुन काढून टाकावे अशी माझी संपादकांना विनंती आहे.
अदिती, राजेश आणि मुक्तसुनित ह्यांनी आजकाल जे काही चालवले आहे त्याने खराच वात आला आहे. शेवटी न राहवल्याने हे लिहित आहे.
20 Mar 2012 - 10:21 am | धन्या
ऐसीचा दुवा फाफॉमध्ये बुकमार्क केला आहे. वाचेन नंतर निवांत.
सध्या हा वडवानल काय करतो त्याची दुरुन मजा घ्यावी म्हणतो. ;)
20 Mar 2012 - 11:05 am | छोटा डॉन
काल खरे तर गुर्जींचा हा लेख पाहुन भरुन आले का काय अशी अवस्था झाली ( मागे एकदा पर्याने पार्टीचे बील दिले होते तेव्हा असेच झाले होते ) आणि लेख वाचलाच नाही. म्हटलं कॉकटेलप्रमाणे निवांत आस्वाद घ्यावा, ती काय गडबडीने घटाघटा प्यायची गोष्ट नाय, असो.
आज एकदम सबुरीत सीप-बाय-सीप करत हा लेख वाचला, गुर्जींना एकुणातच कॉकटेल अजुन बरेच काही शिकण्यासारखे आहे हे जाणवले (सोकाजींचा क्लास लावायला हरकत नाही, आजकाल त्यांना बर्याच गोष्टी चांगल्याच जमु लागल्या आहेत, असो ) ;)
नाय हा, गुर्जी तुम्ही चूकत आहात.
अस्सल दर्दी मनुक्ष (बेवडा नव्हे, असो) असं चवीला वगैरे कंटाळत नाही, बाकी कॉकटेल वगैरे करुन पिणे हौस म्हणुन ठिक असले तरी नेहमीच्या बैठकीत त्यात नेहमीचा सोडा, थम्सप चा प्यॅक्क आणि सोबत शेव-चिवडाच बरा लागतो.
अजुन एक, अहो दारुच्या चवीला 'जळजळीत' म्हटल्याचे पाप कुठे फेडाल हो ?
दारु जळजळीत आहे हा अपप्रचार ज्यांना ती सोसत नाही तेच लोक करतात, मिसळीचे तसेच आहे बघा, सोसत नसेल तर भयंकर शॉट लागतो ;)
असो, बाकी लेख मजेदार वाटला, आता आम्ही बर्यापैकी निवृत्त झालो असल्याने आम्ही आपलं साईडला उभारुन हातात पेप्सी/कोक वगैरे घेऊन कॉकटेलचे एकेक अविष्कार बघत बसण्यात समाधान मानु.
बाकी अजुन एक गंमत सांगु का गुर्जी, हा कॉकटेल वगैरे जो प्रकार आहे ना त्याला बरीच पथ्यं आणि साधनसामुग्री लागते, पिताना बराच पेशन्स लागतो, पिऊन झाल्यावर 'मला आता चढली आहे' असे म्हणुन दंगा करायची सोय रहात नाही कारण तशी कॉकटेलची संस्कृती नाही.
नेहमीच्या दारुला अशी काय अट नाय, सापडेल तो पेला, मिळेल ते सोडा/थंप्सप/पेप्सी आणि सोबत जे काय उपलब्ध असेल ते शेवचिवडा ह्यात माणुस पार सातव्या आस्मानाला जातो, म्हणुन ह्याची लोकप्रियता जास्त आहे.
अर्थात 'मास आणि क्लास' हा पुरातन वाद आम्हाला ज्ञात असल्याने इथे आम्ही पुर्णविराम देतो.
चियर्स !!!
- छोटा डॉन
20 Mar 2012 - 11:37 am | श्रावण मोडक
काय डान्राव, तुम्हीबी ना... हुच्चच. अवं, ही नेहमीच्या दारूनंतरची काक्टेलची सपनं. आता सपनं म्हंजेबी फुडचं लिवलंच पायजेल का? तुम्ही हे वाचलासा न्हैत काय -
तवा, हलक्यानं घ्यावी... नीट घ्यावी... सिप बाय सिप घ्यावी...
तुमी घ्या डान्राव... घ्या... ब्लेंडर्स घ्या... आपन अजून मागवू की...
20 Mar 2012 - 12:13 pm | छोटा डॉन
श्रामो, आम्हाला जे म्हणायचे आहे ते व्यवथित म्हटलो आहोत.
मुळात 'सोसल तेच आणि सोसल तेवढेच घ्यावे' हा मानवी जीवनाचा एक बेसिक रुल आहे. आम्हाला जे सोसते त्याच्याशीच आम्ही जवळीक साधत असतो.
मागे कुणीतरी एक आम्हाला येऊन म्हणाले 'डॉन्या शिंच्या, किती दिवस हे असले थर्डक्लास बेवडी दारु पित बसणार. चल, जरा तुला ५-श्टार कॉकटेल पाजतो (मेक्सिकन का फ्रेंच असं कायतरी सांगत होता, असो, तो चर्चा मुद्दा नाही )'. अगदीच अपमान (आमचा नव्हे, समोरच्याचा ) नको म्हणुन आम्ही काही वेळ त्याच्या बैठकीला बसलो. खरं सांगु का मोडक, आपल्याला नाय आवडली साला कॉकटेल, अहो एक ग्लास उगाच घोट-घोट पित बसायचा ह्याची आम्हाला काही मज्जा नाही वाटली. सोबत चकण्याचीही बोंबाबोंब होती, आम्ही 'साल्या, भेळ किंवा भाजलेले पापड नाहीत का?' अशी विचारणा केली तर तर त्याने कुत्सित नजरेने आमच्याकडे पाहुन आमचा अपमान केला. असो, वेळ साजरी करायची म्हणुन आम्ही तो अपमान चीज आणि कॉकटेलबरोबर गिळुन टाकला पण कॉकटेल हा आपला प्रांत नाही ह्याचीही खुणगाठ बांधली.
दुसरा एक मित्र आला आणि म्हणाला 'चल साल्या तुला थर्रा पाजतो', पहिल्या धारेची आहे असे काहितरी सांगत होता. शक्यतो अपमान करायला नको ह्या तत्वानुसार आम्ही त्यालाही बैठकीला सोबत केली. पण खरं सांगु का श्रामो, हे थर्रा वगैरे भयंकर प्रकरण आहे, अहो माणुस त्या तारेत एवढा लक्कास होतो आपल्याला दुसरे आयुष्य आहे हेच तो विसरतो. अशा दारुचा काय उपयोग ?
असो, शेवटी एवढी आवर्तने झाल्यावर आम्ही बॅक टु बेसिक्स आलो.
आता आमचे एकंदरीत बरे चालले आहे, एकाला हाक मारल्यावर दहा जण सोबत प्यायला येतील अशी चांगली कंपनी जमली आहे, प्रथेप्रमाणे काव्यशास्त्रविनोद का काय म्हणतात ते तसे करत आम्ही 'सोशलाईझ' ही होत आहोत, आम्हाला ते सोसतेही हा मुळ फायदा. असो, तात्पर्य काय की सोसल ते घेतल्याने आम्ही सध्या मजेत आहोत.
प्याक्क भरा, चियर्स !!!
- छोटा डॉन
20 Mar 2012 - 1:38 pm | श्रावण मोडक
धिस इज कॉल्ड कल्चरल डिफरन्स, यू सी, डॉन. सम पीपल आर हायब्रो... सम आर नॉट. रेस्ट (कारण दोन 'काही' मिळवले तरी समष्टी होतेच असं नाही) ऑफ द पीपल आर इन बिटवीन, अँड इट्स युनिव्हर्सल दॅट दे आर सँडविच्ड बीटवीन दीज हाय अँड लो ब्रोज (माईंड यू, ब्रोज!)!!
प्लीज रिपीट! विथ पापड अँड पीनट्स टू. अँड, येस, शल वी आस्क फॉर फ्रेंच फ्राईज? (फ्राय, फ्राय, द डिश वुईल बी टेस्टी फॉर शुअर)!
20 Mar 2012 - 2:12 pm | स्मिता.
आज दुपारच्या जेवणासोबत काय घेतलंत?
20 Mar 2012 - 2:25 pm | प्यारे१
चोता दोन राव,
चला दोन दोन मारु. :)
नंतर करा चर्चा बिर्चा. मोक्काळ येळ आसतोय लोकांकडं!
- सध्या सोबर पण एक्दम खुश प्यारे ;)
20 Mar 2012 - 8:12 pm | राजेश घासकडवी
प्रत्यक्ष डान्रावांचे प्रतिसाद आले हे बघून आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. आमच्या लेखावर 'गुर्जी तुम्हारा चुक्याच' म्हणायला का होईना, पण रिटायरमेंटमधून बाहेर आलात. साइडलाइनवरून आत येऊन दोन चार किका मारल्यात....पंढरीचा विठोबा चालत आला दारी, पायावर धाडधाड आपटणारी डोकी आणि भटजींची गर्दी बाजूला सारून! धन्य झालो मी.
आता काय सांगू तुम्हाला? त्यांचा क्लास लावायलाच गेलो होतो पण बघतो तर काय, बारच्या मागनं ते गायब! वेगळीच कॉकटेलं बनवत होते. स्त्री-पुरुष समानता काय आणि जलायशयांचा अभ्यास काय... माझं मत ऐकाल तर आजकाल ते भलत्या नादी लागले आहेत. वारुणीची गाथा त्यांनी स्वतःच हाताने इंद्रायणीत बुडवून चांगदेवासारखं वाघावरून फिरताहेत. (इथे दोन संत मिक्स झाले असतील, पण भावना समजून घ्या.) म्हणून म्हटलं क्लास वगैरे काही आपल्या नशीबात नाही. तेव्हा आपण मनानेच करावं एक कॉकटेल.
हा हा हा... पथ्यं वगैरे आपली पेश्शालिटी. आता सोकाजी विचार करत असतील, "गुर्जींनी कॉकटेलं लिहायला घेतल्याबद्दल मीदेखील 'कॉकटेलची पथ्ये' असा धागा काढावा का..."
या विधानाबद्दल प्रचंड धन्यवाद. एकंदरीतच लेखातल्या 'वाचकांनी ही रूपकं चुकीची इंटरप्रिट केल्यामुळे प्रतिसादांत आणखीनच कल्ला होतो हा बोनस!' या वाक्यानुसार तुम्ही मोठ्ठा बोनस दिलेला आहे. नाहीतर साला हा लेख नऊ प्रतिसादांतच मरत होता बघा. ;)
मात्र हा मास आणि क्लास वाद आम्हाला बिलकुल ठाऊक नाही. जरा तुमचा क्लास जॉइन करावा म्हणतोय. ;)
20 Mar 2012 - 1:30 pm | वपाडाव
डान्राव, आजपासुन मी एकलव्य अन तुम्ही द्रोणाचार्य...
20 Mar 2012 - 1:39 pm | धन्या
आम्ही आपलं भाबडेपणाने ते खर्याखुर्या मिसळीचं उदाहरण समजलो. (उदा. भटजीबुवांच्या मंगलाची मिसळ. ;) )
20 Mar 2012 - 2:13 pm | छोटा डॉन
>>आम्ही आपलं भाबडेपणाने ते खर्याखुर्या मिसळीचं उदाहरण समजलो.
म्हणजे काय ?
धन्याशेठ, आम्ही खर्याखुर्या मिसळीबाबतच बोलत आहोत की हो, माझा प्रतिसाद मिसळपाव.कॉमवर आहे म्हणुन मिसळीचा संदर्भ घेतला, बाकी उदाहरण खर्या मिसळीचेच आहे. तुम्हाला काय वाटले ? ;)
तुम्ही शँपल म्हणुन 'मामाची मिसळ' असे म्हणत आहात ते आमच्या दृष्टीने 'सोसेल तेवढे' ह्या गटात येते.
इथेही रामनाथची मिसळ, काटाकिर्रची मिसळ, मामाची मिसळ, बेडेकर मिसळ अशा अनंत कॅटेगिरी आहेत, आपण सोसेल ते आणि सोसेल तेवढे घ्यावे, क्काय ?
आमच्या ह्या विधानाची काही आंतरजालीय मित्र जरुर साक्ष काढतील.
तूर्तास विषय मिसळीचा नसल्याने इथेच थांबतो, उदाहरण हे मिसळीचेच आहे सांगण्यासाठी ४ वाक्ये खरडली.
- छोटा डॉन
20 Mar 2012 - 3:07 pm | धन्या
आणि दारु पिणे या विषयावरील आपले अधिकारयुक्त स्वरातील आपले भाष्य वाचून आमचा ऊर भरुन आला.
हा कॉकटेलचा वडवानल असाच पेटत राहून त्याच्या धगीतून काहीतरी भव्य-दिव्य अन तेजस्वी निर्माण होवो. ;)
आपलाच,
कधीकाळी किंगफिशर माईल्डच्या कटींग चहाइतक्याच प्राशनाने विमान हवेत जाणारा,
धन्याशेठ मल्ल्या.
20 Mar 2012 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा
@भटजीबुवांच्या मंगलाची मिसळ.>>> बाप रे..! माझी कुण्णीही मंगला आणी तिची मिसळही नाही... ;-) मी मंगला टॉकिज जवळच्या मिसळीचा मात्र नक्की आहे :-)
20 Mar 2012 - 1:39 pm | मी-सौरभ
धाकटा एकलव्य :)
20 Mar 2012 - 11:36 am | धोणी
अतिशय भिकारचोट लेख..
असे लेख उडवून टाकायला हवेत.. आणि अशी लोकही
जाऊन घाण करा न तिकडे ..
21 Mar 2012 - 4:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे
बरे झाले तुम्ही सांगितलेत. मिपाचे संपादक मंडळ आणि सरपंच तुमच्याच मताची वाट बघत होते (असे आतल्या गोटातून कळले).
कसे आहे ना, कि तुमच्यासारख्या एखाद्या मान्यवर आयडी चा पाठींबा मिळाला की बरे पडते अशा actions घ्यायला... ;-)
20 Mar 2012 - 12:00 pm | स्पंदना
तर परवा काय झाल, मी अन माझा छोटा स्विमिंग पूलवर बसलो होतो. नुकतच स्विमिंग झाल्यान तो माझ्या शेजारी बसलेला. तिथच एक स्वतःला मैत्रीण म्हणवणारी अन जिची मुलगी माझ्या छोट्याच्याच क्लास मध्ये आहे, अशी आई बसलेली. सहज विचारणा झाली तिच्या कडुन या आठवड्याचे स्पेलिंग बघितले का? अवघड होते ना? मी म्हंटल नाही ग. काही विशेष नव्हते. अच्छा! तुझा मुलगा कोणत्या लेव्हल मध्ये आहे? माझी मुलगी सिल्वर मध्ये आहे. मी पिल्लुला विचारल, बाळा कोणत्या लेव्हलची स्पेलिंग केली तु? गोल्ड! किती स्कोअर केले? १० आउट ऑफ १०. मी नुसती हसले. आता ही शहाणी तशी हीची मुलगी ही दिड शहाणी. पिलुन विचारल तुला किती पडले, उत्तरा दाखल पोरगी माझ्या मुलाला मारु लागली. पिलु ही परतुन लगवु लागला, तशी ही आई ओरडली,' ऋतु! मेरी बच्ची को मत मार । मी म्हंटल पण ती मारतेय ना? तशी फिदी फिदी हसत म्हणाली "वो लडकी है ना । उसका चलता है । ल्लेकिन ऋतु ने नही मारना चाहिये।
नाही उगा आठवण झाली हो मानभावी लोकांची म्हणुन. तुम्ही तुमच पिण चालु ठेवा.
20 Mar 2012 - 4:13 pm | बॅटमॅन
स्त्री-पुरुष समानता का काय म्हणतात त्याचा बोर्या वाजला बघा इथे तोदेखील एका स्त्रीकडूनच.
20 Mar 2012 - 5:10 pm | स्पंदना
ते कस काय बुवा? मी समजले नाही. मला फक्त एव्हढच सांगायच आहे की आपण मारल तर चालत पण दुसर्यान हात जरी उअगारला तरी माणस लगेच तत्वज्ञान सांगायला सुरु करतात, आता तुम्ही माझ लिखाण समजला नसाल तर तस विचारा, पण हे असे गंभीर , स्त्री पुरुष समनतेचे का काय ते आरोप नका करु.
20 Mar 2012 - 6:44 pm | धन्या
मग
तुमच्या मते याचा अर्थ काय ते सांगा.
20 Mar 2012 - 6:52 pm | वपाडाव
अबे **न्या, आपलं ते बाब्या अन दुसर्याचं ते कार्ट ही म्हण शिकला न्हैस का साळंत...
20 Mar 2012 - 8:34 pm | धन्या
तू मला **न्या च्या ऐवजी उघडपणे दवन्या असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. आता देतो आम्ही दवनिय प्रतिसाद कधीकधी. काय करणार. ;)
अपर्णातैंकडून उत्तराच्या अपेक्षेत. :)
21 Mar 2012 - 5:29 am | स्पंदना
अर्थ होय!
अर्थ हाच, मी, माझ, मला अन माझ्या साठी, अगदी थोडक्यात सांगायच तर माझीच लाल! ( मी माझ्या बद्दल नाही , इंसिडंट बद्दल बोलतेय. ( अन खर सांगायच तर वरच्या मेन लेखा बद्दल दिलेला तो एक शाल जोडीतला आहे. फार चपखल बसला))
मला स्त्री पुरुष समानतेचा कधी प्रश्नच पडत नाही कारण मी स्वतःला ना वरचढ समजते ना कमी. पण भेटतात काही जण स्त्री अथवा पुरुष असल्याचा कांगावा करणारे. आता इथे त्या मातेला फक्त स्वतःच्या पोरीन मारल तरी चालत, पण तिला कुणी मारु नये अस वाटत होत.म्हणुन "लडकी ". अन खाली वपा म्हंटल्या प्रमाणे, आपला तो बाब्या...हे ही होत.
माझा त्या नंतरचा माझ्या चिरंजीवाला उपदेश " ऋत्स! यु शुड नॉट रेज युअर हँड, बट किक हर बेटु! "मातोश्रींच तोंड न मार खाता ही सुजल!" क्या सिखा रही है?" बोलते. मी म्हंटल "जीना सिखा रही हुं ।"
तर धनाजीराव, मला स्वतःला स्त्री म्हणुन भावना थोड्या वेगळ्या असतील, पण स्त्रीत्वाचा गंड नाही आहे. माझ्या कमेंट वाचताना त्या एका व्यक्तीच्या म्हणुन घेतल्या जाव्यात. काय असत, एक पुरुष जसा स्त्री शी बांधलेला असतो तशी स्त्री ही पुरुषाशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधलेली असते. प्रश्न असतो, तो , ही नाती तुम्हाला काही शिकवतात की नाही याचा. अन त्या शिकवणीवरुन तुम्ही बाहेर भिन्नलिंगी व्यक्तींशी कसे वागता. आता एक स्त्री म्हणुन, एखादी पोरगी माझ्या मुलाला मारत असताना, माझ्यातली माता रिअॅक्ट होते. हे सार रिलेटीव्ह असत. कुणा बद्दल ममता, कुणा बद्दल प्रेम, अन कुणा बद्दल द्वेषही , त्या त्या व्यक्तीच्या वागण्या वरुन असावा. स्त्री वा पुरुष असण्या वरुन नाही.
आय होप धिस इज इनफ.
21 Mar 2012 - 5:55 am | राजेश घासकडवी
ताई तुमचे प्रतिसाद, तुमची शिकवण खूप आवडली. तुमच्या मुलाची गोल्ड लेव्हल त्यातही दहापैकी दहा मार्क असतील तर सिल्व्हर लेव्हलच्या मुलीच्या आईकडून का ऐकून घ्यावं? तिची जागा दाखवूनच द्यावी.
पण या लेखावर ते अवांतर नाही का वाटत? मला वाटतं अदितीच्या किंवा सोकाजींच्या लेखावर हे प्रतिसाद एकदम फिट बसले असते. इथे त्यांचा नक्की संबंध कळला नाही. या लेखात असं वातावरण तापवणाऱ्या लेखांची थोडी गंमत सांगितली आहे इतकंच.
21 Mar 2012 - 6:16 am | स्पंदना
>>>ताई तुमचे प्रतिसाद, तुमची शिकवण खूप आवडली. तुमच्या मुलाची गोल्ड लेव्हल त्यातही दहापैकी दहा मार्क असतील तर सिल्व्हर लेव्हलच्या मुलीच्या आईकडून का ऐकून घ्यावं? तिची जागा दाखवूनच द्या>>>>>
माझ्या मुलान त्याला मिळालेल्या मार्क्सचा वर्गाच्या बाहेर अजिबात विचार करता कामा नये, अन त्या बद्दल मुजोरपणा तर अजिबात नको! मी त्याला शिकवल ते हेच की आपल काही चांगल दिसल की माणस आपल्याला कोनत्या ना कोणत्य प्रकारे खाली दाखवायला बघतात, तेंव्हा जरुर विरोध करणे, नुसता विरोध नाही, परत मान वर काढायला भिती वाटली पाहिजे असा बंदोबस्त करणे. पण स्वतः ,बस आपल्या वाटेने चालणे, दुसर्यांच्या यशाचा वा अपयशाचा फारसा विचार नको.
आता तुमचा लेख. वरिल बाकिच्या प्रतिसादावरुन तुम्ही खुप दिवसांनी लिहिता आहात. मग हाच विषय का? की गरम है लोहा मार दे हाथौडा? तुम्ही या सवंग विषया पेक्षा खुप छान लिहिता. जे काही सुरु आहे ते तुम्हाला पण माहित आहेच तेंव्हा तसेच प्रतिसाद येणार, त्याला माझा इलाज नाही. अन हा विषय गमतीचा उरलेला नाही, चिड येतेय लोकांना. दुसर काही चांगल लिहा. जरुर कौतुक होइल.
पु. ले. शु.
21 Mar 2012 - 7:21 am | राजेश घासकडवी
ताई तुमचा काहीतरी गैरसमज झाल्यासारखं वाटतंय. नक्की काय विषय आहे अशी तुमची समजूत आहे? तुम्ही आधीच्या इतरांनी लिहिलेल्या लेखांशी या लेखाची गल्लत करत आहात असं दिसतंय. तशी गल्लत अनेकांनी केलेली आहे.
अहो, त्या प्रवृ्त्तीचीच चेष्टा आहे इथे. शंभरी गाठणारे धागे कसे लिहिले जातात याचं वर्णन आहे. सोकाजींना थोड्या कोपरखळ्या आहेत. त्या त्यांनी योग्य त्या स्पिरिटमध्ये घेतलेल्या आहेत. ते तशा स्पिरिटमध्ये घेतील याची खात्री होतीच. प्रश्न असा आहे की लोहा गरम का होतो उगीचच्या उगीच? विचार करा.
21 Mar 2012 - 9:28 am | धन्या
सहमत. पब्लिक काहीच कारण नसताना गरम होतं आणि अगदी हमरीतुमरीवर येऊन प्रतिसाद दयायला लागतं.
लहानपणापासून एक वाक्य कानावर पडत आलंय, "तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही आणि किर्तनाने तो सुधारला नाही". इथं जालावर ** आपटून कुणाला सामाजिक क्रांती आणण्याची स्वप्नं पडत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे. अगदीच राहवत नसेल तर आपण आपले विचार मांडावेत आणि पुढचं लोकांना ठरवू दयावं. कारण तेच, "पब्लिक सब जानती हैं." त्यानंतरही कुणी हमरीतुमरीवर आलाच तर तीच त्यांची पातळी आहे असं समजून शांत बसावं. त्या पातळीवर जाऊन प्रत्त्युत्तर करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही.
असो. नुकताच घडलेला एक किस्सा सांगतो. नेहमीप्रमाणेच आम्ही काही खादाड मिपाकर झ पुलाजवळच्या एका उपहारगृहात गेलो होतो. गप्पांमध्ये बोलता बोलता मनोबाने एक लाख मोलाचा प्रश्न विचारला, "जेव्हा आंतरजाल नव्हतं तेव्हा रिकामचोट लोक काय करायचे?"
अधिक बोलण्याची गरज नसावी. :)
21 Mar 2012 - 5:05 pm | स्पंदना
अन माझ्या एक्सप्लनेशन्च काय? मी कधी इतक टंकत नाही. तुम्ही वाट पहाता आहात म्हणुन टंकल त्याच काय?
21 Mar 2012 - 7:42 pm | धन्या
नजरचुकीनं राहून गेलं.
या प्रतिसादाच्या खाली असलेला प्रतिसाद पाहा.
21 Mar 2012 - 7:39 pm | धन्या
मुळात बॅटमनचा
हा प्रतिसाद आणि त्यानंतरचा माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता. ते तुमच्या मैत्रिणीसाठी होतं जिने "वोह लडकी हैं, उसका चलता हैं" असे उद्गार काढले.
तुमचा गैरसमज झाला असावा (किंवा जाणूनबुजून तुम्ही ते तुमच्यावर ओढून घेतलं असावं. ;) )
22 Mar 2012 - 4:45 am | स्पंदना
>>अपर्णातैंकडून उत्तराच्या अपेक्ष>>>>
हे जे तुम्ही लिहिलय ते तुम्ही माझ्या मैत्रीणीसाठी लिहिल आहे का?
की हा सारा उपद्व्याप मनोबाच्या तोंडातली शिवी देण्यासाठी ?
20 Mar 2012 - 12:13 pm | वपाडाव
आजकाल याची फारच जास्त गरज भासत आहे.

त्यांचे काम थोडे कमी करावे म्हणुन म्हटलं एखादी मुल्यवान नसेना का
पण उपयुक्त अशी भेट संपादकांना द्यावी.
मायबाप संपादकांच्या कष्टात थोडीशी मदत.
सढळ हाताने अन दिलदार मनाने स्वीकारावी.
.
.
.
अन हे आपल्या आप्त-स्वकीयांसाठी.

दे घुमाके.
.
20 Mar 2012 - 1:32 pm | सुहास..
बाकी
धर्म-संस्कृतीचे रक्षक म्हणवणार्यांचे, कॉकटेल फेस्टीवल मधले आया-बहीणी, लहान-सहान लेकरांसकट हातात कॉकटेलचे ग्लास धरून फोटो असते तर अजुन मजा आली असती ;)
20 Mar 2012 - 1:37 pm | मी-सौरभ
वरच्या प्रतिसादातून पुरेशी प्रचिती संबंधितांना आली असेलच.
आमचा _/\_ घ्यावा तुम्हाला
20 Mar 2012 - 2:51 pm | प्यारे१
फा....रच्च शार्प-नर म्हणायचं की हे.... ;)
-अतृप्त आत्म्याने झपाटलेला प्यारे१
20 Mar 2012 - 3:52 pm | बॅटमॅन
कोटी लै आवडली शार्प-नर ची :)
20 Mar 2012 - 5:33 pm | अत्रुप्त आत्मा
@-अतृप्त आत्म्याने झपाटलेला प्यारे१ >>>
दुष्टं/कुटिल/कपटी. 
अता जर का छळलस..तर इकडनं
20 Mar 2012 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार
लेख झकास आहे. काही कोट्या उच्च आहेत. पण.....
पण तुमचे आणि आमचे वाद असल्याने तुमच्या प्रत्येक लेखाला भिकार म्हणणे, त्याला भरकटवणे किंवा निदान त्याचे विडंबन पाडणे हे ओघाने आलेच. त्यामुळे हे लेखन अतिशय भिकार आणि टूकार आहे असे मत नोंदवतो. तसेच हे लेखन काड्या सारणारे आहे असे देखील मत जाता जाता व्यक्त करतो.
आणि हो लवकरच आम्ही ह्या लेखाचे विडंबन 'टमरेल साउंड : स्वच्छतागृह मालकाचे आणि रुबाब भंग्यांचे' सादर करूच.
20 Mar 2012 - 7:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या मताबद्दल आदर आहे. पण
हे डान्राव* प्रॉमिस का खरं प्रॉमिस?
*डान्राव आजकाल आंजावर दिसत नाहीत म्हणून बिनधास्त लिहून टाकलं.
20 Mar 2012 - 6:47 pm | निश
माका वाटता, सोत्रि साहेब तुमचो हे वांदो करतत .
तुमचा लिखाण कसा तर पाण्या सारखा असा.
जो रंग मिळता त्यात, पाणी त्या रंगाचा दिसता. (हय रंगीत पाण्याचो कोणी ही दुसरो काही समजुन घेउ नकात).
त्यात पाण्याचो नाही तर रंगाचा दोष असता. पण ह्यांका समजाउक कोण जातला ?
ऊगीच कॉकटेल लाउंज म्हणुन लेख लिहुन तुमचो वांदो करतत.
आमचे आउस बापुस आमका उगाच आरडतत अरे दारु पिउ नकात ता बरा नसता लोकांचा घर मोडता दारु मुळे.
चांगला नसा ता. पण त्यांका काय माहीत हयसर शि़कलेले लोका दारु वर लेख लिहुक लागले असा.
पहिले लोका चांगले विचार असणारे लेख वाचुक बघत, आता ति लोका दारु वरचे लेख वाचुक लागले असत व दारुचो ग्लास हातात घेतलेले फोटो देउक लागले असत. ह्यांका पुढारलेले म्हणतत.
असो तुमचो दारु पुराण चालु रवान दे. म्हंजे काय तर पुढली पिढी दारुबाज होतली.
20 Mar 2012 - 6:52 pm | यकु
लेख उत्तम. खूप हसू आले..
पण उगाच नेहमीचे कुजकट प्रतिसाद पाहून खरोखर वाईट वाटले.
एखादा लहान मुलगा कुणी त्याच्याकडंच काही हिसकावून घेतंय, तेव्हा आरडा ओरडा करील तसे हे प्रतिसाद वाटतात.
विहिरीच्या सामयिक मालकीवरुन खटले चालवण्यात, तिच्या खटल्याचे काय झाले वगैरे गफ्फा हाणण्यात काही लोकांना पहिल्यापासूनच इंटरेस्ट असतो. जालीय विश्वात सुद्धा ते हेच करतात हे पाहून शरम वाटली.
असो. इथे कुणीतरी काही त्याच्या मालकीचं मानून बसला आहे ही कल्पना नव्हती. मुक्त अंतर्जालात सगळी दुनिया डेअरिंग करुन गोंधळ घालत असताना कुणी फक्त जुन्या पठडीतच 'फॉल बॅक' होते, त्याला इतर काही मोकळेपणा सुचू शकत नाही याचा खरोखर खेद वाटतो.
20 Mar 2012 - 10:17 pm | jaypal
कॉकटेल बरोबर चखणा म्हणुन तरीदार मिसळ कशी लागेल याचा विचार करतोय