एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे.
परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते.
सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला.
अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला.
मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?'
वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)
प्रतिक्रिया
17 Mar 2012 - 3:34 pm | गणपा
यावर कसला काथ्याकुट अपेक्षीत आहे याचा लेखक महाशयांनी म्या पामरासाठी खुलासा करावा. ;)
मनीच्या बाता : गण्या लेका जागा हो. लै फटाकं वाजणार हैत. :)
17 Mar 2012 - 3:41 pm | यकु
आमच्या सगळीकडच्या मित्र मैत्रिणींचा प्रश्न आहे..
हा महाराष्ट्राच्या एकतेचा, मराठीच्या अस्मितेचा आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि जगभरात पसरलेल्या मराठी माणसांच्या जालीय अस्तित्त्वाचा प्रश्न आहे
आणि आज काय ती निवड करायची वेळ आली आहे
तर मग
आजच्या १७ तारखेच्या निवडणुकीला मतदान केंद्रात जा.
प्रेमानं विहीरीकडं एकदा बघा, समुद्राकडं एकदा बघा.
मशीनवर समुद्राच्या चिन्हावरचं बटण दाबा किंवा शिक्क्याचा ठसा मारा
घरी या.
तुमच्या मुला लेकरांना समुद्रात लोटण्याची तयारी करा.
येत्या पाच दिवसात त्यांना समुद्राच्या पाण्यात भिजवून, समुद्र गोठल्याच्या काळात त्याच समुद्राच्या मीठात खारवण्याची जबाबदारी हा सोत्रि घेतोय !!!!
17 Mar 2012 - 6:01 pm | धन्या
तुमचे डावपेच आम्हाला कळतात बरं कमोड अभिजन. ;)
तुम्ही आता पुढारलात. तुमची प्रगती झाली. तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणू लागलात. कमोड वापरु लागलात. पण म्हणून काय ज्या भारतीय बैठकीवर काल परवापर्यंत तुम्ही तुमच्या विचारांचा निचरा केलात त्याला आज तुम्ही नांव ठेवायला निघालात?
17 Mar 2012 - 6:19 pm | यकु
ते काही असो !
तुम्हा कातडीसोलू लोकांचं या विहीरीत काही खरं नाहीय. ;-)
फार झालं. तुम्हाला शिक्षणं दिली, सवलती दिल्या एवढंच काय स्वतःच्या मुली सुद्धा दिल्या ( काही आपण होऊन हात धरूनही गेल्या ) - तुमचे जुने धंदे सुटत नाहीत.
आणि तुम्ही तेच तमाशे रोज करता.
तुम्ही तिकडे समुद्रावर जा आणि तिकडे तुमची लक्तरं वाळू घाला, भिजत घाला जे काय करायचं आहे ते करा. एवढा प्रचार चालू आहे तो ऐका, जे काय दारू - मांस- मच्छी मागायची असेल तर मागा, किंवा आणखी सवलती घ्या आणि तुम्ही तिकडे जाच!
तिकडे सगळं मोकळं मोकळं आहे - जिकडे घाण करायचीय तिकडे करुन ठेवा जागा असे पर्यंत. मग तिथूनही तुम्हाला फुटावं लागेलंच - नाहीतर मग तीच अभिजनांच्या खुशमस्कर्या सेवेची वैचारिक महारकी पुन्हा करावी लागेल किंवा तिथेही पुन्हा लढे द्यावे लागतील. जा त्याची तयारी करा.
17 Mar 2012 - 7:56 pm | यकु
बाकी या पुजाविधी सांगून पोटार्थी आयुष्य गेलेल्यांना इंटरप्रिटेशन मागाहून करण्याची कधीपासून सवय लागली?
च्यायला कमाल आहे - शॅमेलियनलाही हे कौशल्य जमत नसेल.
हे पूर्वी म्हणे जगाला कळण्याआधी कशाचाही अर्थ सांगायचे..
यांनी धर्मग्रंथ लिहीले - हजारो वर्षे समाजाचा बुद्धीभेद करीत जगत गेले.
काळ बदलला तसे यांच्या पार्श्वभागी रट्टे बसले आणि मग यांच्या खोपडीत मुक्त विचार, स्वातंत्र्य, समानतेचे वारे घुसले.
एवढंच काय, बापजाद्यांनी केलेली पापं आपल्या माथ्यावर नकोत म्हणून याच पुजाविधी सांगणार्यांच्या पुढच्या आवृत्त्यांनी हजारो वर्षे शोषणाचे साधन असलेला देवच रद्द करून टाकला. इथे अस्तित्वच धोक्यात आल्यावर कसला देव आणि कसलं काय? वरून बुद्धीला देवाचं अस्तित्व पटत नाही म्हणून बुद्धीवादी नास्तिक हा मुखवटा मिरवायला मोकळे.
यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी यांचे मुखवटे फाडले पाहिजेत आणि जाब विचारला पाहिजे.
त्यामुळं आजकाल जगाला आधी अर्थ सांगू देतात होय ? बरं.
म्हणजे नंतर ईश्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान असा सगळ्यांनाच पसंत पडेल तो अर्थ सांगायचा.
छान.
17 Mar 2012 - 3:43 pm | sneharani
बाकी काथ्या काढला आहेच तर तो कुटला जाणारच असं दिसतेय!! ;) विकांताला धागा टाकला तरी शंभरी नक्कीच ! ;)
18 Mar 2012 - 8:51 am | सूड
समुद्र म्हटला तरी तो खार्या पाण्याचा. विहीरीतल्या गोड्या पाण्याची सवय झालेल्या प्राण्यांना समुद्राचं पाणी कितपत मानवलं असतं याबद्दल शंका येतेय. आणि कथेत विहीरीच्या प्रश्नाला समुद्राने उत्तर दिलेलं दिसत नाही, त्या अर्थी हा मृत समुद्र असावा.
अवांतर: ही कथा समुद्रातल्या पापलेट, हलवा, सुरमई किंवा गेला बाजार मांदेलीशी झालेल्या चर्चेचे फलित असल्याचा वास येतोय.
19 Mar 2012 - 4:10 pm | मी-सौरभ
हे वाचून मला ती करकोचा आणि माश्यांची कथा आठवली.
समुद्रातून आलेले अन समुद्राचा गौरव करुन आपल्याला तिकडे नेणारे वाटेत त्यांची भूक भागवायला आपल्याला खाऊन टाकणार याचा काय भरवसा??
17 Mar 2012 - 4:31 pm | पैसा
तुम्ही दारवा कुठे असलेल्या प्राण्यांना देणार आहात?
19 Mar 2012 - 6:13 pm | सोत्रि
पैसातै,
विहीरीच्या काठावर बसून प्यायची आणि समुद्रकिनार्यावर बसून प्यायची कॉकटेलं / दारवा वेगवेगळ्या असतात. मला दोन्ही प्रकारांची माहिती आहे. ;)
त्यामुळे ज्याला ज्या प्रकारची दारवा हवी आहे त्या प्रकारची दारवा माझ्या 'कॉकटेल लाउंज' मध्ये संग्रही आहे, चिंता नसावी. :)
- (विवीध दारवा संग्राहक) सोकाजी
19 Mar 2012 - 6:26 pm | पैसा
मला लोकांच्या लिक्विड डायटची चिंता लागली होती! ;)
19 Mar 2012 - 6:45 pm | सोत्रि
तु किनै पैसातै,
तुझा आयडी बदलून चिंता'मनी' ठेव बै. भारीच चिंता तुला लोकांची ;)
- ('तुम्ही' वरून 'तु' वर आलेला) सोकाजी
19 Mar 2012 - 6:51 pm | पैसा
चिंता करिते विश्वाची! सगळ्यात मोठी चिंता पैशांची, म्हणून आयडीत बदल नाही.
मी काय पैशांची विहीर खणली नाहीये!!
19 Mar 2012 - 7:25 pm | सोत्रि
चिंता'मनी' मधला मनी हा पैशासाठीच होता गं!
मनी वर 'कोटी' केली होती. इथे कोटीवरही कोटीच आहे.
सगळं कसं ना तुला इस्कटून सांगावं लागतं.
- (कोटीबाज) सोकाजी
19 Mar 2012 - 6:32 pm | परिकथेतील राजकुमार
बेडकांनी प्यायच्या आणि शार्क माशांनी प्यायच्या येगयेगळ्या असत्यात का हो ?
कोळी
परा
19 Mar 2012 - 6:40 pm | सोत्रि
तर व्हं पाव्हनं, तसंच असतया!
तुमास्नी कंची हवी म्हणायची ?
- (कलाल) सोकाजी
19 Mar 2012 - 6:41 pm | पैसा
बेडकानी प्यायली की शार्कला आपोआपच मिलंल ना! यवरां म्हायत नाय तुकां?
19 Mar 2012 - 6:47 pm | धन्या
आमी भटजीबुवाना म्हनलं व्हत़ं की जरा धीर दम धरा. गडी मान्सं गावाकडं गेल्याती. परत आली की बगा कसं हीरीचं पानी भसाभसा पाटाला जातंय ते.
हितं तं पान्याची काय बातच नाय. समदी दारवांची बात करत्येत. पीक लय टरारुन येईल बगा.
19 Mar 2012 - 6:49 pm | वपाडाव
बेडकानी प्यायली ऐवजी बेरकानी पिली हवं होतं....
18 Mar 2012 - 8:46 am | अत्रुप्त आत्मा
17 Mar 2012 - 7:38 pm | तिमा
माज्या 'हिरीला' इंजन बसवा!
18 Mar 2012 - 10:28 am | धन्या
हीरीला इंजन कवाच बसवून झालंय दादा. मजूर मानसं सुटीपायी गावाकडं गेल्याती. जरा दम धरा. मजूर मान्सं परत आली की बगा पाटाला कसं भसाभसा पानी जातंय ते.
18 Mar 2012 - 3:50 pm | अत्रुप्त आत्मा
@मजूर मान्सं परत आली की बगा पाटाला कसं भसाभसा पानी जातंय ते.>>> धनाजी रावांशी आमी हंड्रेड परशेंट सहमत... लै कटाळा आलाय बगा...ह्ये विहिर,,बेडुक,,,समुद्र,,,शंख आनी शिपल्यांचा ..अपल्या..मि.पा.वरचा दंगा कमी हाय का..? तर त्यात ही फुक्काची भरं... धनाजीराव तुमी येक गानं लिवा बगू...ग्येल्या येळ सारखं... कडक... थांबा नायतर,,,,आदी या नस्त्या व्यापाचा मीच पिट्टा पाडतो जमल तसा... तुमी आक्शी लै कामात हाय ना... पन तरी या येळ काढुन तिकडं बी,,जरा हातभार लावाया... कारन तुमच्या विना लावनी,मंजी वाळुत सोडल्यालं पानी. ;-) ... या मंग ...आमी होतो म्होरं
http://www.misalpav.com/node/21055 या हिकडच्या लिंकिंग रोडवरुन... ;-)
18 Mar 2012 - 6:57 pm | धन्या
आवो तसं न्हाई भटजीब्वॉ...
सन्वार रैवारीही सुशिक्शीत मान्सं रजा घेत्याती, घरी आराम करत्याती. सोम्मॉर उज्याडूंदया, मग बगा कसं इंजन चालू करुन ह्या हीरीचं पानी बगा कसं भसाभसा पाटाला घालत्याती.
18 Mar 2012 - 8:58 am | नगरीनिरंजन
अवघड पेच टाकला आहे सोकाजींनी. ;-)
असो. लहान बेडकांना विहीरीत आणि समुद्रात दोन्हीकडे काहीच धोका नसतो असे स्वानुभवावरून वाटते.
बाकी यानिमित्ताने आमच्या एका मित्राच्या तीन खोल्यांच्या घराचे नाव गणेश 'प्रासाद' आहे ते आठवले.
18 Mar 2012 - 10:26 am | धन्या
बर्याचशा गोष्टी या मानण्यावरच असतात अशी थोरा-मोठयांची शिकवण आहे. मानलं तर भानामती आहे मानलं तर नाही. स्त्रीयांचा जालावरचा वापर पुरुषांइतकाच वाढला म्हणजेच स्त्री पुरुष समानता आली हे सुद्धा आपल्या मानण्यावर किंवा न मानण्यावर अवलंबून आहे.
21 Mar 2012 - 5:22 pm | किचेन
आता परत सगळे इथे येतील भांडायला.....
ती विहीर...तो समुद्र,
बायांची मत: विहिरीचा आकार लहान म्हण स्त्रीलिंगी, समुद्राचा आकार मोठा म्हणून.............;)
बाप्यांची मत: समुद्र खारा म्हणून लगेच तो का? ........;)
विहीर विचारी समुद्राला....अरे हे काय....ती विचारतीये..म्हण्जे तिला माहित नाहीये...म्हण्जे ती अज्ञानी...म्हणून विहीर स्त्रीलिंगी!
18 Mar 2012 - 1:04 pm | पियुशा
हम्म.............
समुद्रात फार फार तर दोन - तीन दिवस खेळायला मजा वाटते, पण त्या खार्या पाण्याने "तहान" थोडीच भागवली जाणार आहे म्हणुनच खारावलेल्या पाण्यापेक्षा गोडया पाण्याची विहीर च बरी आहे असे नम्रपणे नमुद करु ईच्छीते :)
( अर्थात हे माझ वैयक्तिक मत आहे ) :)
18 Mar 2012 - 1:26 pm | नावातकायआहे
'जलाशयातले' खारे पाणी विहिरीत झिरपुन विहिर 'बाटली ' नाही म्हणजे झाले.
आम्ही आपले विहिरीत बरे....
ड्रांव.. ड्रांव
18 Mar 2012 - 6:43 pm | स्पंदना
माका येक समजुन सांगा, ह्ये समुद्रातल प्राणी फिरुन आमच्या हिरीत का येत्याती जर तित येव्हढी मज्जा हाये तर? ऑ? जावा की म्हणाव गप गुमान तिकडच त्वांड करुन अन काय आसल ती मज्जा बी करा, उगा पिरपिर लावायची हित्त येउन. ह्यॅअव अन त्यॅव.
18 Mar 2012 - 8:44 pm | स्मिता.
काय हो सोत्रि, जुना दारवांचा धंदा सोडून नवीन कंत्राटं घ्यायला सुरुवात केलीये की काय? ;)
18 Mar 2012 - 9:59 pm | मोदक
द्रवीडचा आदर्श घेतला आहे का..? त्याने टेस्ट मध्ये सलग ४ इनींगमध्ये सेंच्यूरी मारली होती..
१०० + प्रतिसादांची खात्री असलेला हा दुसरा धागा. ;-)
22 Mar 2012 - 11:01 pm | मी-सौरभ
प्रतिसाद क्रमांक १००
23 Mar 2012 - 11:31 pm | मोदक
मी पण पोपट विकत घेवून साईड बिझीनेस टाकावा म्हणतो.. ;-)
19 Mar 2012 - 12:27 am | विश्वनाथ मेहेंदळे
लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा मुद्दा करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते..... विहीर काय किंवा समुद्र काय, दोन्ही गोष्टी म्हणजे जग नव्हे. तिथे जावे, मनसोक्त पोहावे आणि बाहेर पडून खऱ्या जगात मन रमवावे. विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते. (काही काळ मी स्वत: पण त्यातून गेलो आहे). विहीर आणि समुद्र ही करमणुकीची साधने आहेत. ती तितकीच असू द्यावी.
19 Mar 2012 - 1:10 am | आत्मशून्य
.
19 Mar 2012 - 5:09 am | यकु
विमे,
एकतर तुम्हाला पूर्ण पार्श्वभूमी माहित नाही किंवा तुम्ही दोन्हीकडे 'यूज अॅण्ड थ्रो' एवढाच विचार करताय.
विहिर आणि समुद्र ही करमणूकीची साधने असली तरी तुमचा कुठला ना कुठला भाग इथे जगतोय.. भाग कसला, इथे येता तेव्हा तुम्ही आभासी रूपात असेल पण पूर्णच्या पूर्णच इथे जगता की तोही आभास असतो? हे मधलं माध्यम फक्त आभासी आहे आणि तिकडे बसलेले तुम्ही आणि इकडे बसलेला मी खरे आहोत आणि खर्याच जगात बसून खर्याच जगात मन रमवतो आहोत असे मला वाटते. हे जे तुम्ही वर मत व्यक्त केले आहे ते करमणुकीसाठी केले आहे का? ते मत खर्या लोकांनी वापरायचे की इथे सगळे आभासी लोक आहेत?
इथे चर्चिल्या जाणार्या गोष्टी, इथून मिळणारा आनंद, इथे होणारे वाद, इथून मिळणारी उपयुक्त माहिती, इथली शेअरींग हे सगळं खरं आहे की आभास आहे? हे सगळं होताना कुणा बावळटाला इथे येऊन इथल्या लोकांना बेडूक आणि या जागेला विहिर मानण्याचा आणि तसे इथेच म्हणून दाखवण्याची खूमखूमी असेल तर या एकत्र येण्याच्या जागेवर प्रेम करणार्या सगळ्यांनी आपापल्या परीनं ती कशी चुकीची आहे हे सांगायला हवं की नको.
तुम्हाला आलेली कीव वगैरे विचारात घेत नाही, तुम्हीच त्यावर पुन्हा विचार करा.
विसू : प्रचंड सामर्थ्य यावेळी दोस्ती खात्यावर फाट्यावर मारले आहे, तेवढे तुम्ही चुकते कराल ;-)
19 Mar 2012 - 1:53 pm | धन्या
साधारण सात आठ महिन्यांपूर्वी असंच एका मुद्द्यावरुन वातावरण तापलं होतं. नव्हे, ते आम्हीच जनजागृतीसाठी तापवलं होतं. पण आमचे काही मित्र मात्र त्या मुद्दयावर भलतेच शिरेस झाले. आव्हाने प्रती-आव्हाने झाली. आम्हाला फक्त लोकांना सावध करण्यात रस असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर जाऊन त्या आव्हानांचा पाठपुरावा करण्यात काहीच स्वारस्य नव्हतं. झालेल्या चर्चेतून योग्य तो बोध घेऊन प्रत्येकाने वागावे असं आमचं मत होतं. त्यामुळे आम्ही त्या प्रकारातून माघार घेतली.
परंतू आमचे त्यावेळचे माघार घेणे आमच्या एका हुशार मित्राला पटले नाही. "तुमच्याकडे फक्त महिती आहे, ज्ञान नाही" अशा खास पुणेरी शब्दांत आमचा उद्धार झाला. आम्ही म्हटले तसे तर तसे.
आम्ही मिपावर चार घटका विरंगुळा मिळावा म्हणून येतो. शक्य झालं तर थोडीफार बौद्धिक खाजही भागवून घेतो. नुकत्याच झालेल्या स्त्रीपुरुषसमानतेवरील चर्चेप्रमाणेच काही सामाजिक विषयांवर दोन चार पॅराग्राफ खरडून आपण सामाजिक क्रांतीकार्यास फार मोठा हातभार लावला म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.
पण ते एव्हढंच. जालावर आम्हाला अगदी जीवाभावाचे मित्र मिळाले यात वादच नाही. पण तरीही आमचा जालावरचा वावर आणि आमचं खरं आयुष्य या गोष्टी पुर्णपणे वेगळ्या आहेत याची जाणिव मात्र सतत आमच्या मनात असते.
यकु, थिंक अबाऊट इट. :)
19 Mar 2012 - 2:12 pm | कवितानागेश
"आभास देखिल खराच असतो आणि खरे सगळे शेवटी आभासीच असते" असे थोडक्यात सोप्पे सांगायचे सोडून किती शब्द वाया घालवलेत! :P
19 Mar 2012 - 2:23 pm | यकु
>>>> "आभास देखिल खराच असतो आणि खरे सगळे शेवटी आभासीच असते" असे थोडक्यात सोप्पे सांगायचे सोडून किती शब्द वाया घालवलेत
------ हे खरंय की तसा फक्त आभास होतोय? :p :p :p :p : p
19 Mar 2012 - 2:40 pm | धन्या
चांगदेव पासष्टी अर्थात ज्ञानदेवांनी चांगदेवाला लिहिलेल्या पासष्ट ओव्यांच्या पत्रामधील पहिली ओवी काहीशा अशाच अर्थाची आहे.
हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो.
19 Mar 2012 - 3:19 pm | कवितानागेश
स्वतः परमात्मा दाखवतोय तर बघावा की आभास मजेत!
नावे ठेउ नयेत आभासाला. :P
19 Mar 2012 - 3:34 pm | यकु
आम्ही कसची नावं ठेवतोय?
परमात्मा तोही आभासच दाखवतोय.
आणि परमात्मा जर आभास दाखवतोय तर आमच्यासारख्या किड्यांच्या प्रकाशानं कितीसा उजेड पडणार आहे हे माहित आहे हेवेसांनल :)
उलट फार जाळ होतोय असं वाटलं तर समजा की आम्ही पण परमात्म्यानं केलेल्या निर्मितीचा भाग आहोत, आणि जाळ होत असेल की आग, आम्ही त्याला काही करु शकत नाही.
परमात्मा महान आहे.
:)
19 Mar 2012 - 3:50 pm | धन्या
जोपर्यंत प्रलयकाळ येत नाही तोपर्यंत तुमचे हे भास आभासाचे खेळ चालू दया.
एकदा का कयामत आली की मग सगळीकडे पाणीच पाणी होईल. मग तिथे ना विहीर असेल ना समुद्र. सारे विश्वच जलमय झालेले असेल. खारेपणाच्या आणि गोडेपणाच्या सीमा एकमेकांत विरुन गेलेल्या असतील. आणि मग श्रीवटेश जगाला पुन्हा नव्याने जन्म देतील...
तोपर्यंत चालू द्या.
19 Mar 2012 - 3:53 pm | यकु
ॐ शांती: शांती: शांती:
हरि ओम् हरि ओम्
19 Mar 2012 - 4:14 pm | प्यारे१
बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा टाईपला ते सांग! मी चोप्य पस्ते केलाय.
बाकी विहीरीतल्या प्राण्यांकडं येऊन माझा तथाकथित समुद्र किती अगाध, सर्वसमावेशक, किती बहुविध परंपरांचा पाईक, मतांचा आदर करणार इ.इ. जाहिरात करणं आणि पुन्हा मला विहीर आवडत नाहीच हो, या विहीरीतल्या जीवांचं कल्याण करण्याची इच्छा आहे असा साळसूद पणाचा आव आणणं.
याच्या जोडीला, परवा परवा पर्यंत विहीरीच्या पाण्यात राहून, विहीरीतल्याच इतर 'बेडकां'ना खाऊन उपजीविका करणारे पाणसर्प आज तथाकथित समुद्राची जाहिरात करताना पाहून अम्मळ भरुन आलं. :)
ते ॐ कसा टाईपला ते सांग बरं.
19 Mar 2012 - 4:20 pm | यकु
आमच्या कुंपणीच्या इनहाउस किबोर्डात आहे ब्वॉ!
जालीय युनिकोडमध्ये कसा येतो ते माहित नाही.
19 Mar 2012 - 4:39 pm | प्रचेतस
कॅपिटल मध्ये AUM टाइप करून येईल ते.
19 Mar 2012 - 4:22 pm | यकु
प्रकाटाआ
20 Mar 2012 - 12:43 pm | चिगो
>>जोपर्यंत प्रलयकाळ येत नाही तोपर्यंत तुमचे हे भास आभासाचे खेळ चालू दया.
म्हंजी, ह्या डिसेंबराच्या २१ तारखेला ही कटकट संपणार म्हणायची.. ब्वॉर्र, २२ ला बघू मग..
19 Mar 2012 - 4:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे
एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." हे वाक्य "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात सतत तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." असे वाचले जावे.
आता विहीर, समुद्र सोडून थेट मुद्द्यावर येतो. चर्चा वेगवेगळ्या संस्थळांबद्दल चालू आहे ना ? तर आता ऐक. मी जास्त करून मिपा वर असलो तरीही इतर ४ संस्थळांवर माझा हाच आयडी आहे. तिथे मी अधून मधून जात असतो. आता मी मिपावर जास्त रमतो याचा अर्थ मिपा हेच सर्वोत्तम संस्थळ आहे आणि बाकीची टाकाऊ आहेत असे मी मानायलाच पाहिजे असे नाही, माझ्यापुरते मिपा हे या क्षणाला सर्वात सुटेबल आहे हे आणि इतकेच सत्य आहे.
यु ट्यूब च्या कुठल्याही व्हीडीओ वर जा किंवा TOI च्या एखाद्या बातमीवर. जर ती बातमी किंवा व्हीडीओ खान त्रयीन्पैकी कुणाशी संबंधित असेल तर त्यांचे पंखे तिथे कुत्र्या मांजरांसारखे एकमेकांवर तुटून पडलेले दिसतील, मग कोण जास्ती चांगला आहे, कोण हिट आहे, कोण सुपरस्टार आहे अशा स्वतःच्या जीवनाशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यावरून एकमेकांची आईबहिण काढत असतात. हे केवळ एक उदाहरण दिले, अशीच अजून दहा पण देऊ शकतो. पण त्यातला प्रकार इथे होऊ नये असे वाटते.
दुसऱ्या संस्थळावर चिखलफेक करून काय होणार? बाकी काही झाले किंवा नाही झाले तरी आपलेच हात चिखलात बरबटून जातील इतके नक्की. शिवाय मला खात्री आहे की उपरोल्लेखित अनेक संस्थाळांचे मालक/चालक हे व्यक्तिगत जीवनात एकमेकांचे मित्र आणि हितचिंतक असतील त्यामुळे असल्या प्रकारात त्यांना वैयक्तिक रीत्या रस नसणार. जे संस्थळ चांगले असेल, लोकांना भावेल ते टिकेल, बाकीची टिकणार नाहीत. शिवाय प्रत्येकाने आपली वेगळी जातकुळी ठेवली तर एकत्र ही त्यांचा विकास होईल की. या पेक्षा जास्त एनर्जी या विषयावर घालवण्यात काही हशील नाही असे माझे सुस्पष्ट मत आहे.
इतके बोलून माझे चार शब्द संपवतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
19 Mar 2012 - 4:55 pm | प्यारे१
प्रश्न दुसर्या संस्थळाला कोण काय म्हणतंय त्यापेक्षा संस्थळ सदस्यांना काय म्हटले जात आहे याचा आहे ना वि मे?
आपण जो विचार करतो तो आणि तोच बरोबर आहे आणि आम्ही ज्या संस्थळावर वावरतो तेच चांगले (ते का निर्माण झाले, त्याचं मू ळ कारण काय इ.इ. सगळं सध्या बाजूला ठेवू) या भावनेतून इतरेजनांना कमी लेखणं कितपत योग्य आहे?
21 Mar 2012 - 12:01 am | विश्वनाथ मेहेंदळे
कुणी लेखले कमी तर लेखुदे रे. त्यांनी तू आणि मी काही कमी होणार नाही. मुद्दा वाढवण्यात काय point आहे ? दुर्लक्ष हा सगळ्यात वाईट अपमान असतो असे म्हणतात म्हणे. दुर्लक्ष कर झाले.
मी दोन्ही कडच्या संचालक-संपादकांपैकी किमान एकेकाला व्यक्तिश: ओळखतो. स्वभावात: कुणीही वाईट नाही आणि त्यांच्या मनात एकमेकांबद्दल आदरभाव आहे. अशा वेळेला आपण भांडणे म्हणजे..... (शिवाय दोन्ही कडच्या सदस्यांचा इंटरसेक्शन सेट बराच मोठा आहे.)
19 Mar 2012 - 4:56 pm | सोत्रि
विमे,
तुमचा आधिचा प्रतिसाद आणि हा प्रतिसाद, अगदी अशीच संतुलित प्रतिक्रिया अपेक्षित होती.
तुमचे प्रतिसाद वाचल्यावर आज मला मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान दाटून आला आहे. छाती अंमळ दोन इंच फुगली आहे आणि (पोट एक इंच आत गेले आहे*) अभिमानाने.
माझे मत तर असे आहे की कसलीही तमा न बाळगता ज्या पाण्यात आवडेल त्या पाण्यात मनसोक्त डुंबायचे, उगा गोष्टींचे अबडंबर माजवण्यात काही मजा नाही. चार घटका विरंगुळा म्हणून आंजावर यायचे असते. आभासी जग आणी सत्य जग ह्यात एक थीन लाईन असते, ती समजून आभासी जगाला किती महत्व द्यायचे ह्याचे तारतम्य असले की पाणी कुठलेही असो डुंबायला मज्जा येतेच. काय म्हणता ?
- (छाती अभिमानाने फुगलेला) सोकाजी
* तरीही पोट छातीपेक्षा पुढेच आहे :(
21 Mar 2012 - 12:09 am | विश्वनाथ मेहेंदळे
कसचं कसचं !!! ठांकू बरे का !!!
म्हणजे एका प्रतिसादाला एक इंच छाती बाहेर आणि अर्धा इंच पोट आत असे प्रमाण पडले.
आज अजून दोन संतुलित (;-)) प्रतिसाद दिले आहेत. वरील प्रमाणाप्रमाणे अजून टोटल ३ इंचांचा फरक पडला पाहिजे. मग तरी होईल ना छाती पोटापेक्षा पुढे ? ;-)
19 Mar 2012 - 5:03 pm | यकु
>>>>>>एक सुधारणा:- "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." हे वाक्य "विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात सतत तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते." असे वाचले जावे.
----------- सतत विचार वगैरे काही चालू असत नाही. इथले रहिवासी इथून भांडणं करुन निघून गेले ते कसे आहेत, काय करताहेत ते पाहिलं जातं अधूनमधून. ते तिथेही इथल्या आठवणींनी झोपेत बडबडताना दिसतातच आणि इकडे येऊन चिमटे पण काढून जातात.. मग असा एखादेवेळी विचार करावा लागतो. पण तुम्हाला वाटत असेल सतत तिकडचा विचार चालू असतो तर तिकडे नजर सुद्धा टाकणार नाही.
>>>>>>आता विहीर, समुद्र सोडून थेट मुद्द्यावर येतो. चर्चा वेगवेगळ्या संस्थळांबद्दल चालू आहे ना ? तर आता ऐक. मी जास्त करून मिपा वर असलो तरीही इतर ४ संस्थळांवर माझा हाच आयडी आहे. तिथे मी अधून मधून जात असतो. आता मी मिपावर जास्त रमतो याचा अर्थ मिपा हेच सर्वोत्तम संस्थळ आहे आणि बाकीची टाकाऊ आहेत असे मी मानायलाच पाहिजे असे नाही, माझ्यापुरते मिपा हे या क्षणाला सर्वात सुटेबल आहे हे आणि इतकेच सत्य आहे.
-------- सहमत आहे. मिपाला सर्वोत्तम मानावं किंवा मानू नये असा कुठे मुद्दा आहे. पण नसत्या भ्रमातही रहायला पाहिजे असंही नाही ना?
>>>>>> यु ट्यूब च्या कुठल्याही व्हीडीओ वर जा किंवा TOI च्या एखाद्या बातमीवर. जर ती बातमी किंवा व्हीडीओ खान त्रयीन्पैकी कुणाशी संबंधित असेल तर त्यांचे पंखे तिथे कुत्र्या मांजरांसारखे एकमेकांवर तुटून पडलेले दिसतील, मग कोण जास्ती चांगला आहे, कोण हिट आहे, कोण सुपरस्टार आहे अशा स्वतःच्या जीवनाशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यावरून एकमेकांची आईबहिण काढत असतात. हे केवळ एक उदाहरण दिले, अशीच अजून दहा पण देऊ शकतो. पण त्यातला प्रकार इथे होऊ नये असे वाटते.
-------- हाहाहा.. बास का.. असलं काही होत नाही. अशी खडाखडी काही मिपाला नवीन नाही. इथे कुणाचीही आईबहीण काढली गेलेली नाही. घाबरण्याचं काहीच कारण नाही.
>>>>>> दुसऱ्या संस्थळावर चिखलफेक करून काय होणार? बाकी काही झाले किंवा नाही झाले तरी आपलेच हात चिखलात बरबटून जातील इतके नक्की. शिवाय मला खात्री आहे की उपरोल्लेखित अनेक संस्थाळांचे मालक/चालक हे व्यक्तिगत जीवनात एकमेकांचे मित्र आणि हितचिंतक असतील त्यामुळे असल्या प्रकारात त्यांना वैयक्तिक रीत्या रस नसणार.
-------- ज्या चालक/मालकांनी इथे अभिव्यक्तीसाठी आणि ज्या पठडीतील अभिव्यक्तीसाठी स्थळ उपलब्ध करुन दिलंय त्या पठडीत इथले सदस्य व्यक्त होत आहेत. कुणी रेषा ओलांडत असेल तर त्याचं काय करायचं आणि कुणी करायचं हे कोण ठरवणार असतील ते ठरवतील.
>>>>>> जे संस्थळ चांगले असेल, लोकांना भावेल ते टिकेल, बाकीची टिकणार नाहीत. शिवाय प्रत्येकाने आपली वेगळी जातकुळी ठेवली तर एकत्र ही त्यांचा विकास होईल की. या पेक्षा जास्त एनर्जी या विषयावर घालवण्यात काही हशील नाही असे माझे सुस्पष्ट मत आहे.
--------- माझंही हेच मत आहे. :)
20 Mar 2012 - 11:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ते वाक्य व्यक्तिश: तुझ्या बद्दल नव्हते रे. एकूणच दोन्ही ठिकाणी चाललेली चर्चा पाहून तसे लिहिले. कदाचित प्रतिसाद तुझ्या प्रतिसादाला असल्याने तसे वाटत असेल तर आय माय स्वारी :-) अरे पण खरेच सांगतो, असे नमुने पाहिले आहेत. बोलू कधी तरी. सांगेन तपशील. :-) आणि तू तिथे जाऊ नकोस असे मी अजिबात म्हणणार नाही. जरूर जा.
अरे म्हणूनच "त्यातला प्रकार" असा जनरल उल्लेख केला होता. तिथे तर अगदीच खालच्या स्तरावर उतरतात. मिपा किंवा कुठल्याही संस्थळावर तसे प्रतिसाद २ मिनिटे टिकणार नाहीत . मी भावनेबद्दल बोलत आहे. संस्थळे माणसांनी जवळ यावे म्हणून बनवली गेली ना, मग त्यांचा वापर करून द्वेष का वाढवावा ? असो, आपली काही मते तरी जुळली आहेत या बाबतीत. ;-)
20 Mar 2012 - 11:57 pm | यकु
यास्स स्सार! बरीच.
:)
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, नभात भरला दिशात उरला वगैरे वगैरे वगैरे ;-)
19 Mar 2012 - 1:39 pm | माझीही शॅम्पेन
छे !!! सध्या हाफिसातून समुद्रावर जायला बंदी असल्याने गड्या आपली विहीरच बरी (विमे नी अधिक प्रकाश टाकावा अशी विनंती)
शेवटी अस्सल गोड पाणी विहिरितकच मिळत , काही (की बरेच) प्राणी दोन्ही कडे पडिक असतात अस ऐकून आहे.. तरीही
कधीही समुद्र ना पहिलेली माझीही शॅम्पेन :)
19 Mar 2012 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार
लेख अजून टिकला आहे ? मला वाटले पंख लागले असतील आतापर्यंत.
असो...
बाकी विहिरीची प्रायव्हसी पॉलिसी आणि समुद्राची प्रायव्हसी पॉलिसी, विहिरीतला कंपू आणि समुद्रातला कंपू, विहिरीतला दारुडा समाज आणि समुद्रातला दारुडा समाज, विहिरीतली लोकशाही आणि समुद्रातली लोकशाही इ. इ. काहीच भाष्य नसल्याने लेख वाचताना निराशा झाली.
आणि हो, तळे राखील तो पाणी चाखील ही ओळ पण ह्यात का नाही ?
असो बदलीन.
19 Mar 2012 - 4:12 pm | कवितानागेश
हे सगळे सखोल अभ्यासाचे विषय आहेत.
त्यासाठी विदा गोळा करावा लागेल. :(
बाकी दारुड्या समाजाचा विदा सोत्रिंजवळ असल्यास ते लवकरच एक तुलनात्मक आभ्यासाचा विचारप्रवर्तक पेपर मांडतील.
19 Mar 2012 - 4:19 pm | प्यारे१
>>>लेख वाचताना निराशा झाली.
अभ्यास कमी पडत असेल त्यांचा.
मार्गदर्शन करा की त्यांना.
तुमचा दांडगा अभ्यास आहे ना? ;)
19 Mar 2012 - 1:08 pm | निश
खर तर विहिर, मोठा जलाशय व समुद्र ह्यात जीव जगतात..
ह्यातल प्रत्येका मध्ये जीव जगतात, वाढतात , आपापल्या भल्या बुर्या जाणिवा जोपासतात. त्या मुळे प्रत्येकाचच महत्व आहे.
19 Mar 2012 - 5:26 pm | गणपा
सोत्री पोहायला येत नसेल तर क्लास लावा.
गेला बाजार फ्लोटर बाळगा पाण्यात उतरताना. :)
19 Mar 2012 - 5:34 pm | सोत्रि
पट्टीचा (नाडीची नव्हे) पोहणारा आहे मी.
सगळ्या पाण्यात व्यवस्थित पोहू शकतो आरामात अगदी दमछाक न होता. उगाच नाही...
- (पट्टीचा पोहणारा) सोकाजी
20 Mar 2012 - 7:52 pm | मृगनयनी
सोत्रि'जी..लय भारी लेख!!!!! आवडल्या गेला.... :)
या पहिल्याच्च वाक्याला फुटल्या गेले आहे!!!!! ;) ;) ;) ठ्ठोSS ठ्ठोSSS ठ्ठो ठ्ठोSSSSS...
=)) =)) =)) =)) =)) पण व्यास *अर्धवट* असेल... तर त्याची त्रिज्या होते ना!!!!! =)) =)) =)) =))
विहीरीतले काही बेडूक स्वतःला उच्चभ्रू समजत असल्याने कम्पूबाजांव्यतिरिक्त इतर जणांना तुच्छ लेखत असत. अर्थात हे हुच्चब्रूत्व फार दिवस टिकले नाही... विहीरीतल्या अनेक जणांनी या हुच्चब्रूंना योग्य ती जागा दाखवून दिल्याने यावेळी मात्र त्यांचे काहीच चालू शकले नाही.. मग खोट्या अहन्कारापोटी आणि त्यांच्या अवास्तव मागण्या मान्य न झाल्याने या कुपमन्डूकांची गच्छंती अटळ झाली..
पण स्थलांतरित प्राणी कितीही कूपमन्डूक वृत्तीचे असले.. तरी विहिरीचे मन मात्र खूप्प मोठ्ठे असल्याकारणाने त्यांच्या बाबतीत विहिरीने अजूनही "आओ जाओ विहीर तुम्हारी" अशी भूमिका ठेवलेली आहे.
तसेच या बेडकांच्या लेखांना प्रतिक्रिया पाडणारे लोक्स तिकडे जलाशय उर्फ समुद्रात कमी असल्याने किन्वा तिकडे सगळेच्च जण स्वतःला "हुच्चब्रू" समजत असल्याने मध्यंतरी या कूपमन्डूकांची स्थिती मन्गळावरच्या पाण्यासारखी झाली होती... (पक्षी: बघायलाच्च कुणी नाही... ;) ) त्यामुळे विहिरीकडे न येण्याची शपथ घेतलेली असूनसुद्धा त्यांना परत विहिरीकडे येऊन लेख पाडावे लागले.... असो...
आजकाल असेही ऐकीवात आले आहे, की जलाशय उर्फ "लाल समुद्रा"तल्या काही "क्ष" हुच्चब्रूंना म्हणे "ज्ञ" हुच्चब्रूंचा त्रास होत असल्याने हे "क्ष" हुच्चब्रू आता नवीन जलाशयाच्या शोधात आहेत!!! (लाल रन्ग यासाठी की... ज्योतिषशास्त्रानुसार मन्गल ग्रहाचा रन्ग लाल आहे!!! ;) ;) ;) ;) )
20 Mar 2012 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तांबडा समुद्र. Red sea ला मराठीत तांबडा समुद्र म्हणतात. तोच तो, सौदी आणि येमेनच्या दक्षिण पश्चिमेला असणारा समुद्र, जो आफ्रीकेच्या उत्तर पूर्वेला येतो.
ज्योतिषातच कशाला, प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि मंगळ दोघेही लालच दिसतात. सध्या मंगळ सूर्यास्ताच्या सुमारास पूर्व क्षितीजावर असतो. संधी मिळाल्यास बघून घ्या. जवळजवळ संपूर्ण रात्रभर मंगळ आकाशात दिसतो आहे. शिवाय अलिकडेच मंगळ पृथ्वीच्या जवळही येऊन गेला.
20 Mar 2012 - 8:15 pm | मृगनयनी
प्रत्यक्ष डोळ्यांनीही शनी आणि मंगळ दोघेही लालच दिसतात.
:) शनि हा नुसत्या डोळ्यांना दिसू शकतो.... हे आम्हांस आत्तापर्यन्त ठाऊकच नव्हते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार "शनि" ग्रहाचा रन्ग "काळसर निळा" आहे.
सध्या मंगळ सूर्यास्ताच्या सुमारास पूर्व क्षितीजावर असतो. संधी मिळाल्यास बघून घ्या
सान्गितल्याबद्दल धन्यवाद!
आम्ही दोनेक महिन्यांपासून पश्चिमेस "गुरु" आणि ":शुक्र" युती रोज बघतो. अर्थात हे दोन्ही ग्रह आकाशात लवकर सापडतात..
बाकी मन्गळाचे अजून वर्णन सान्गितल्यास आम्हांस तो सापडणे सोपे जाईल!! :)
शिवाय अलिकडेच मंगळ पृथ्वीच्या जवळही येऊन गेला.
अरे वा!!!... शेवटी "मन्गळ" हा भूमिपुत्रच आहे... आणि "पृथ्वी" म्हणजे भूमितत्वच आहे! त्यामुळे मुलगा आईजवळ आल्याचा सर्वतोपरी आनन्द आम्हांस झाला आहे!! :)
* लाल समुद्राचा आणि मन्गळाचा काही शात्रीय / भौगोलिक सम्बन्ध असल्यास जरूर सान्गावा. :)
20 Mar 2012 - 8:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
होय तर. नुस्त्या डोळ्यांनी दिसणारा शनी हा सर्वात लांबचा ग्रह आहे. त्याच्या पुढचे युरेनस आणि नेपच्यून (मराठी नावं?) साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. युरेनस फारच क्वचित थिअरेटीकली डोळ्यांनी दिसण्याएवढा तेजस्वी असतो, पण मुंबई-पुण्यातून किंवा कोणत्याही इतर शहरांतून तो साध्या डोळ्यांना दिसणं कठीण आहे.
गुरू आणि शुक्र १३ मार्चला एकमेकांच्या सर्वात जवळ होते (भासमान). २५-२६ तारखेच्या आसपास चंद्रही त्यांच्या जवळ दिसेल. गुरू, शुक्र आणि चंद्र युती डोळ्यांना छानच दिसेल. शुक्र आणि गुरू हे दोन तेजस्वी ग्रह आणि त्यातून डोळ्यांना निळसर पांढरे दिसतात त्यामुळे शोधायला सोपे असतात. मंगळ सूर्यास्तानंतर पूर्वेला दिसेल, गुरू-शुक्र दिसत आहेत त्याच्या अगदी विरूद्ध दिशेला. त्या बाजूच्या आकाशात एवढा लालसर रंगाचा तारा नाहीच, त्यामुळे सूर्यास्तानंतर पूर्व क्षितीजाजवळ जी लाल वस्तू दिसेल तो मंगळ. दुर्बिणीतून पाहिल्यास फार काही वेगळं दिसणार नाही. शनी किंचित पिवळट तांबडा दिसतो आणि दुर्बिणीतून पाहिल्यास शनीची कडीही दिसतात. आता अमावस्या जवळ येते आहे, त्यामुळे चंद्रप्रकाश नसताना इतर अवकाशस्थ गोष्टी सहज सापडतील.
तांबड्या समुद्राला तांबडा का म्हणतात यावर म्हणे अजून शास्त्रज्ञांचं एकमत नाही. मंगळाचा लाल रंग त्याच्यावर असणार्या लोहाच्या (फेरस का फेरिक आठवत नाही) ऑक्साईडमुळे, थोडक्यात गंज चढल्यामुळे आहे. तो दर सव्वादोन वर्षांनी पृथ्वीच्या जवळ येतोच.
20 Mar 2012 - 9:10 pm | मृगनयनी
खूपच्च सुरचित आणि महत्त्वपूर्ण माहिती! आवडलं!!!.. :)
एक शन्का:- रात्रीच्या वेळेस मन्गळाचा लाल रन्ग- काळा किन्वा ब्राऊनिश दिसतो का? की तो फक्त सूर्यास्ताच्या वेळीच सुस्पष्ट लाल रन्गाचा दिसू शकतो...?
दुर्बिणीतून शनि व त्याची कडीही नक्कीच पाहू!! :)
२५-२६ तारखेला चन्द्र, शुक्र, गुरु युतीही पाहायला आवडेल! अशीच युती मागे जानेवारी एन्डिन्गला पाहिली होती. तेव्हा गुरु आणि शुक्र दोघेही मेष राशीत होते. आता गुरु १५ मे'पर्यन्त मेषराशीतच असेल आणि शुक्र १४ मार्चला मीन राशीत आलेला आहे. त्यामुळे कदाचित अजून दीडदोन महिने तरी गुरु शुक्र युती आपल्याला पाहायला मिळेल.
* नेपच्यूनला मराठीत "वरूण" म्हणतात. नेपच्यून'ला पर्जन्याची देवता मानतात. ज्यांच्या पत्रिकेत नेपच्यून उच्चीचा आणि जलराशीत असतो... त्यांना गूढशास्त्रात (उदा.- ज्योतिष, हिप्नॉटिझम, लोलकविद्या... इ.) गती असून त्यात ते बरीच प्रगती करतात आणि प्रसिद्धीसही येतात. :)
* सौजन्यसप्ताहाच्या शुभेच्छा! :)
20 Mar 2012 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही. मंगळाचा रंग अॅम्बियण्ट (मराठी?) रंगाप्रमाणे बदलताना दिसत नाही. कोणत्याही अवकाशस्थ वस्तूचा रंग पृथ्वीच्या वातावरणामुळे बदलत नाही, अपवाद सूर्य आणि चंद्र.
गुरूच्या शेजारी पाहिलंत तर अश्चिनी नक्षत्रातले (=मेष रास) तीन तारे, गुरूच्या उत्तरेला जवळच दिसतील. हे तीन तारे मिळून चमच्यासारखा आकार दिसतो. साधारण असा:
.............................०
.............
...
...
..
०.........०
० या जागी तारे आहेत; असा साधारण आकार अश्विनी नक्षत्रात दिसतो. मीन राशीतले तारे फिकट आहेत. त्यात मज्जा नाही.
21 Mar 2012 - 12:03 pm | मृगनयनी
ह्म्म्म.... अश्विनी नक्षत्राचे तीन तेजस्वी तारे आहेत.... तसेच त्याशेजारी थोडेसे कमी तेजस्वी व अश्विनी'च्या तार्यांच्या बर्यापैकी उलट्या आकारात असलेले भरणी नक्षत्राचे ३ तारे दिसतात. अर्थात ते अश्विनी'च्या तार्यांइतके तेजस्वी नसतात.
तसेच मीन राशीत रेवती नक्षत्राचे साधारणतः ३२ तारे तर उत्तराभाद्रपदा नक्षत्राचे ३ तारे असतात. पण ते अत्यंत फिकट असल्याने दुर्बीणीतूनदेखील त्यांचा पान्ढुरका पुन्जका दिसतो! आपण म्हटल्याप्रमाणे
त्यात मजा नाही.
अश्विनी नक्षत्र हे "केतू"चे तर भरणी नक्षत्र हे "शुक्रा"चे मानतात. तसेच मीन राशीचा राशीस्वामी जरी "गुरु" असला तरी मीन राशीतला "शुक्र"हाही उच्चीचा मानला जातो. एखाद्या कुन्डलीत लग्नी मीनेचा शुक्र असेल, तर त्या व्यक्तीचे अनेकांशी प्रेमसम्बन्ध असू शकतात. पण लग्न मात्र एकाशीही होत नाही. आणि जरी महत्प्रयासाने झाले, तरी ते २ महिन्याहून अधिक काळ टिकू शकत नाही. तसेच अशी व्यक्ती अत्यंत सुन्दर व स्वतःची वेगळी ओळख जपणारी असते.
उदाहरण द्यायचे झाले तर अभिनेत्री- रेखा.
21 Mar 2012 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार
वरील संभाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे.
दुर्लक्षित पँथर तर्फे माननीय अदिती ह्यांना एक नऊवारी साडी, नथ, सत्य साईबाबांची दिव्य अंगठी आणि 'भांगेतील तुळस' ह्या चित्रपटाची व्हिसीडी देऊन गौरवण्यात येत आहे. तर माननीय मृगनैनीजी ह्यांना 'गॅलो' ची एक झिन्फाडेल वाईन, सिक्स पॉकेट जीन्स आणि 'न सांगता अंधश्रद्धा सोडवा' ह्या कार्यक्रमाची मेंबरशीप देऊन गौरवण्यात येत आहे.
हे संभाषण वाचून फटाक्यांच्या आशेने आलेल्यांच्या पदरात काटे पडल्याने त्यासर्वांना एकेक हनुमान चड्डी व स्त्री असल्यास शिफॉनची साडी देऊन सांत्वन करण्यात येत आहे.
धन्यवाद.
परादास आठवले
अध्यक्ष संस्थापक
दुर्लक्षित पँथर
मिसळपाव शाखा
21 Mar 2012 - 1:16 pm | जाई.
_/\_
21 Mar 2012 - 1:25 pm | यकु
पराशेठला कुणीतरी फोन करा!!!
चक्क आयडी हॅक झालाय. ;-)
हा आवाज बिलकुल ओळखीचा नाहीय.
शब्द तर बिलकुलच नाहीत.
नक्की पुण्यातूनच ऑपरेट होताय ना?
21 Mar 2012 - 1:35 pm | श्रावण मोडक
च्यायला, हे बेणं सुधरायचं नाही.
_/\_
यकु, फोन केला. "आप जिस नंबरसे संपर्क करना चाहते हो, वो फिलहाल संपर्कक्षेत्रसे बाहर है. कृपया थोडी देर बाद संपर्क करे..." !!
21 Mar 2012 - 1:38 pm | यकु
=)) =)) =))
हम्म.
दीड वाजलाय फक्त श्रामो ऽ!
चला आता पराशेठचे कॅरेक्टरच हॅक करावे म्हणतो.
काय मजा येईल तिच्यायला ;-)
21 Mar 2012 - 1:36 pm | सुहास..
भाषण वाचून आम्हाला अगदी गलबलुन आणि भडभडून आले आहे. >>.
आम्हाला ही, आशा काळे नवयुगात आणि सई ताम्हणकर ब्लॅक अॅन्ड व्हाईट जनरेशन मध्ये जावुन एकमेकांशी गप्पा मारत आहेत असे वाटुन गेले ;)
21 Mar 2012 - 1:37 pm | sneharani
परादास आठवले'जी _/\_ स्विकारा!!हसून हसून पुरेवाट झाली!!!
21 Mar 2012 - 1:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !!!
21 Mar 2012 - 2:09 pm | मृगनयनी
सौजन्य सप्ताह असल्या कारणाने आम्ही यावेळी काही न बोलणेच्च उचित ठरेल... :)
ऑलरेडी इयर एन्डिन्ग आणि अप्र्राईझलचे टेन्शन आहे.... :| :|
बाकी काडीलाव्या पर्याला _/\_ ;)
आणि बाकी आमच्या सर्व सुहृदांना- पक्षी : प्यारे'जी, सुहास'जी, स्नेहाराणी'जी... सगळ्यांनाच _/\_
अर्थात काही झाले... तरी आपली मैत्री आणि युती कायम राहील... व आमची मूलतत्वे ( पक्षी: बेसिक मूल्ये)
देखील त्यान्च्या जागी अढळ आहेत... :)
गुरु-शुक्र युतीचा विजय असो!!! जय भीम.. जय अर्जुन ...जय बिभिषण ...जय परशुराम !
22 Mar 2012 - 9:53 am | मूकवाचक
_/\_
इथली जुगलबंदी वाचून पडोसन मधले 'एक चतुर नार' आठवले.
(ये सूर किधर गया जी, अय्यो फिर भटकाया, हम छोडेगा नही जी, हम पकडके रखेगा जी ...)
21 Mar 2012 - 8:53 pm | Nile
वरील वाक्याचा उत्तरार्ध सवयीप्रमाणे "..वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली" असा वाचला. ;-)
पर्यासारख्यांवर अशी ओळ लिहण्याची वेळ यावी हे पाहून मला एक मिपाकर म्हणून शरम वाटली हे जाता जाता नोंदवतो!
21 Mar 2012 - 9:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नथ, सत्य साईबाबांची दिव्य अंगठी आणि 'भांगेतील तुळस' ह्या चित्रपटाची व्हिसीडी योग्य पॅकेजिंग आणि मार्केटींग करून विकल्यास येणार्या पैशात उच्चभ्रू कॅब्रेने सुव्हिन्यूच्या (३.१४)२ बाटल्या आणि त्याबरोबर खायला फ्रेंच चीजचे (३.१४)२ डबे येतील. नऊवारी साडी कापून त्यात सामान्य आकाराचे पाच-सात ड्रेसेसही मावतील. डील डन.
अवांतरः भरणी नक्षत्रात माझी आवडती गुरूत्वीय भिंग सिस्टम आहे. भरणी नक्षत्र अश्विनीच्या उत्तर-पूर्वेला, समद्वीभुज त्रिकोणासारखं दिसतं, जोकरच्या टोपीसारखं.
22 Mar 2012 - 1:24 am | मन१
ठार झालोय.
22 Mar 2012 - 3:00 pm | किचेन
हे तुम्ही तयार्र केलेलं चित्र कागदावर उतरवून आणि होकायंत्र घेऊन टेरेसवर गेले होते.काय बी दासाल न्हाही.सगळे तारे सारखेच. लाल मंगल्वागैरेही दिसलं नाही.हे सगळ तुम्ही दुर्बिणीतून बघितलं काय? :(
या आधीही एकदा कॉलेजमध्ये असताना सकाळमध्ये एक लेख यायचा आणि त्याप्रमाणे आकाशच चित्रही यायचं.तो नकाशा दिशा जुळवून डोक्यावर धरून बघायचा.तसं हि काही वेळा केल होत.पण तेव्हाही काही दिसलं नाही. :(
पण आकाशातले एका रेशेतले तीन तारे मला नेहमी दिसतात.त्यांना काहीतरी नाव पण आहे.
o
o
o
पण मुंबईच्या आणि हैदराबादच्या तारांगणात सगळ नीट बघितलाय.
22 Mar 2012 - 9:10 pm | स्मिता.
अगदी अगदी!!
मीसुद्धा असाच प्रयत्न करून पाहिला पण मला तर तारेही दिसले नाहीत. आकाशात सगळा धूसरपणा दिसला.
तू कसंकाय पाहिलंस गं अदिती? इथे नीट तपशीलवार सांगशील का?
22 Mar 2012 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सध्या सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात पहाल तर दोन तेजस्वी, पांढरे ठिपके दिसतील. (सूर्यास्तानंतर अर्ध्या तासात पश्चिम दिशा ओळखायला शक्यतोवर त्रास होऊ नये.) संधीप्रकाशातही गुरू आणि शुक्र दिसतात. त्यातला पश्चिम क्षितीजाजवळ जो दिसतो आहे तो गुरू. शुक्र त्यापासून साधारण ८-१० अंशावर असेल. आकाशात १ अंश म्हणजे किती?
हात ताणून लांब करा आणि डोळ्यांसमोर धरा. एका बोटाची जाडी म्हणजे एक अंश. सूर्य आणि पौर्णिमेच्या चंद्राचा व्यास अर्धा अंश एवढा असतो. हात ताणून उभा धरल्यास अंगठा आणि करंगळीतलं अंतर म्हणजे साधारणतः ५-६ अंश. एक वीत ताणल्यास साधारण २० अंश. क्षितीजापासून ध्रुवतारा मुंबई-पुण्यातून एक वीत अंतरावर, ~ १८ अंशावर दिसतो.
गुरू आणि शुक्र ओळखण्यात गडबड होणार नाही असं वाटतं. (संध्याकाळी दुकानं, जॉगिंग ट्रॅक ऐवजी रम्य ठिकाणी फिरायला गेल्यास तिथे बरेच लोकं आकाशात गुरू-शुक्राकडे बघताना दिसतात. त्यावरून एक अंदाज.) गुरूकडे तोंड केल्यास त्याच्या उजव्या बाजूला (उत्तरेला), साधारण २-३ अंशांवर अश्विनी नक्षत्र दिसते. हे तारे साधारणतः ध्रुव तार्यापेक्षा थोडेसे अधिक तेजस्वी आहेत. भरणी नक्षत्रातले तारे (आडव्या जोकरच्या टोपीसारखे, समद्विभुज त्रिकोण) त्याहीपेक्षा फिकट आहेत.
साधारण सूर्यास्तानंतर अर्धा-पाऊण तासाने मंगळ पूर्व क्षितीजावर दिसतो आहे. किंचित पिवळट लाल रंगाचा तारा त्या बाजूला आकाशात नाही. प्रदूषण जास्त असेल तर पिवळा रंग जास्त दिसेल. पण माणसा-माणसाला जाणवणारे रंग वेगळे असतात. त्यामुळे रंगांच्या नावांच्या बाबतीत जरा सावध असणे उत्तम. सध्या मी ही अॅक्टीव्हली पॉप्युलरायझेशन करत नसल्यामुळे मलाही थोडं खोदकाम करूनच बघावं लागेल कोणते ग्रह कोणत्या नक्षत्र/राशीत आहेत ते.
(स्मिता, तुझ्याकडे आकाशात ढग नाहीत ना याची खात्री करून घे. ;-) ढगांतून ग्रह-तारे बघायचे असतील तर एकत्रच बघू, फ्रेंच चीज आणि वारूणी मलाही आवडतात.)
23 Mar 2012 - 4:21 pm | स्मिता.
डिट्टेलवार माहितीकरता धन्यवाद! कॉलेजात असताना काही हौशी लोकांनी 'अॅस्ट्रॉनॉमी क्लब' सुरू केला होता तेव्हा २-४ वेळा रात्री उशीरापर्यंत थांबून अवकाश निरिक्षण केलंय, पण तेवढंच.
गुरू-शुक्र ओळखता येतात (आकाशात तेवढेच दोन तेजस्वी ग्रह दिसतात). बाकी नक्षत्र किंवा तारकासमूह म्हणशील तर मृग नक्षत्र, समद्विभुज त्रिकोण (तो भरणी नक्षत्रात असतो ते आता कळलं) आणि सप्तर्षी सोडल्यास बाकी काही ओळखता येत नाही.
(इकडे आकाशात केव्हाही ढग असतातच. पण सध्या वसंतातली छान गुलाबी थंडी असल्याने 'ढगातून' तारे बघायला वेलकम!)
22 Mar 2012 - 9:17 am | अर्धवट
>>पण व्यास *अर्धवट* असेल... तर त्याची त्रिज्या होते ना!!!!!
कोटी बरी आहे. पण याआधी ऐकली आहे.
बाकी बरेच काही बोलायचे होते पण पर्यानं आधीच हनुमानचड्डी देउन आमची अडचण करून ठेवली आहे.
तेव्हा असो.
आपल्या मताचा आदर आहेच. शुभेच्छा..
सोकाजींची जालीय राजकारणातील अल्पावधीतच केलेली प्रगती नेत्रदीपक आहे असे जाताजाता नोंदवतो. ;)
20 Mar 2012 - 8:55 pm | यकु
चला, कुणीतरी त्या ' निरागसता जपा सप्ताहाची ' नांदी वाजवा बरं पटकन!
धमालदादा बारामतीकरांनी फेटा वगैरे बांधून डफासहीत मंचावर येण्याची विनंती करण्यात येते..
धमालदादा बारामतीकर.. अटेंशन प्लीज.
21 Mar 2012 - 12:46 pm | प्यारे१
निरागसता की सौजन्य रे यकु?
ट्यार्पी कसा वाढायचा रे अशानं?
सासू म्हणे सुनेला, नको स्वयंपाक करु, दमली असशील.
सून म्हणे सासूला, करते की मी, तू तरी किती कामं करशील!
.
.
.
.
हे असं गोग्गोड एखाद दिवस ठीक हो!
भांडा सौख्यभरे... पावर्ड बाय यकु इन्दोरवाले ;)
21 Mar 2012 - 12:58 pm | यकु
प्यार्या,
तुझ्या पाठीवर एकामागून एक 'दोन' लाटण्यांचे वळ उमटायला काहीच हरकत नाही ;-)
असू दे की काय असायचं ते..
तु बी लय ताणतो राव..
(शांतीदूत) शेंबडा यक्कू
3.14 मिनिटांची समझौता सुपर एक्स्प्रेस स्टेशनवर येत आहे .. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून दूर उभे रहावे.. ;-)
21 Mar 2012 - 4:05 pm | सूड
>>3.14 मिनिटांची समझौता सुपर एक्स्प्रेस स्टेशनवर येत आहे .. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून दूर उभे रहावे..
येवढं स्पेसिफिक टायमिंग ?? एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ??
21 Mar 2012 - 4:10 pm | स्पा
__/\__
येवढं स्पेसिफिक टायमिंग ?? एक्स्प्रेस सेंट्रलची म्हणायची का वेस्टर्नची ??
=))
=))
=))
सुड्क्या
लैच माजलास बे पुण्याला जाऊन
किती बाजार उठवशील
21 Mar 2012 - 4:21 pm | सूड
म्हणजे ? यात काय बाजार उठवला मी ? हल्ली एक्स्प्रेसची चौकशी करायची पण सोय नाही. काय दिवस आलेत.
>>लैच माजलास बे पुण्याला जाऊन
त्याला 'पुण्यकविषय' म्हणायचं, अभिमान हवा. पुणं बोलून स्टेटस घालवू नकोस. बाकी माजण्याचे कॉपीराईट्स मुंबैकरांकडे नाहीत अशी बातमी मिळते.
21 Mar 2012 - 5:19 pm | मोदक
भावना पोहोचल्या :-)
21 Mar 2012 - 5:32 pm | गवि
हार्बरची.
21 Mar 2012 - 5:37 pm | प्यारे१
तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी.... ;)
21 Mar 2012 - 6:28 pm | सूड
>>तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी....
ते जे मेगाब्लॉक वैगरे होतात ते म्हणे प्रवाशांच्या सोयीसाठी असतं. खरंखोटं बघायला कोण जातंय म्हणा. ;)
22 Mar 2012 - 12:43 pm | मदनबाण
तरीच सारखा सारखा मेगाब्लॉक तरी नाही तर डिले तरी....
ते जे मेगाब्लॉक वैगरे होतात ते म्हणे प्रवाशांच्या सोयीसाठी असतं. खरंखोटं बघायला कोण जातंय म्हणा.
खीक्क खीक्क खीक्क ! ;)
हा धागा "जनजागॄती "करणारा दिसतोय ! ;)
चला माझ्या मिपा ग्रहावरच्या ३ घटीका संपलेल्या दिसत आहेत.पुढची घटीका येई पर्यंत...
नारायण ! नारायण ! ;)
जाता जाता :- अगं मॄग्गा तुला उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण ठावुक असेलच नै ? ;)
22 Mar 2012 - 1:17 pm | मृगनयनी
मदनबाण'जी... :)
हा धागा सौजन्यपूर्ण जनजागृती करणारा आहे.. :) ;) ;)
आंणि उथळ पाण्याला कितीही खळखळाट असला... तरी ते "उथळ" असल्यामुळे (पर्यायाने ते जास्त खोल नसल्याने) जास्तीत जास्त गुडघ्यापर्यन्तच येते... त्यामुळे याचा एक फायदा असा.. की यामध्ये "बुडण्याची" शक्यता अजिबात नसते. तसेच अश्या पाण्यात आपण अनेक खेळ खेळू शकतो.. उदा.: पकडापकडी, विषामृत, आन्धळी कोशीम्बीर, रन्गपन्चमी, इ... तसेच अश्या पाण्यात "लन्गडी" खेळण्याचा अनुभव काही औरच असतो...
अर्थात समुद्राची मजा जरी या पाण्याला नसली.. तरी एकदा या पाण्यात खेळायला लागल्यावर या पाण्याचा खळखळाट आपल्याला सुमधुर आणि हवाहवासा वाटतो....
अजून एक फायदा... म्हणजे असे पाणी कुठेही अॅव्हेलेबल होते... किन्वा आपण स्वतःच एखादा छोटासा टॅन्क बान्धून किन्वा स्विमिन्ग पूल बान्धून त्यात गुडघ्यापर्यन्त पाणी सोडू शकतो...
मला अश्या पाण्यात धुळवड खेळायला खूप आवडते... :) ... कारण धुळवडीच्या दिवशी सगळ्या प्रकारचे रन्ग "एक" होऊन जातात....
बाकी मदनबाण... तू मिपा'ला ग्रह सम्बोधून तसेच स्वतःला नारदाच्या ठिकाणी प्रस्थापित करून "नारायण नारायण" म्हटल्यामुळे माझा तुझ्याप्रतिचा आदर वाढलेला आहे.... कारण नारदाचे प्रत्येक विधान हे पुढे घडणार्या घटनांची नान्दी असते!!!!! :) :)
23 Mar 2012 - 7:43 am | निनाद मुक्काम प...
समुद्र मंथन करून काही गाळीव उच्चभ्रू रत्ने निघाली अशी कथा कलियुगातील पुराणात वाचली होती.
दुर्दैवाने ह्या रत्नांची पारख करणार्या दर्दी जोहरी वाचक वर्गाने अवतार समाप्ती घेतल्याने ह्या रत्नांना काचेच्या मण्यां सोबत नाइलाजाने संगत करावी लागते.
आणि असंगांची संगत म्हणजे प्राणाशी गाठ हि म्हण माहित असून सुद्धा हा धोका पत्करून ते विहिरीकडे धाव घेतात
23 Mar 2012 - 5:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नक्की कुणाची विकेट काढता आहात ?? ;-)
23 Mar 2012 - 7:45 pm | निनाद मुक्काम प...
तुम्ही बुआ फारच स्पष्ट वक्ते आहात: असा प्रश्न खुलेआम विचारला-
क्लास आणि मास ह्या प्रवृत्ती आभसी जगतात शिरल्याने अनेक जण मूक वाचक बनणे पसंत करतात
कालांतराने ह्या भूतलावर विरंगुळा आणि मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्याने मराठी संस्थळ बहिष्कृत करतात:
तेव्हा सदर प्रतिसाद जुने स्कोर सेटल करण्यासाठी नसून व्यक्तीशः कोणाविरुद्ध नसून त्या प्रवृत्तीसाठी होता:
कोणाला राखी तर कोणाला करन जोहर ;थापर आवडतात:
एकमेकांच्या आवडीचा सन्मान केला तर क्लास आणी मास
समुद्र आणि विहीर ह्यांच्यातील फरक आपोआप मिटेल:
नाहीतरी आजच्या जमान्यात सिनेमा गृहात बाल्कनी आणि स्टोल इतिहास जमा झाले आहे:
या चिमण्यांनो ;परत फिरा रे असे आवर्जून सांगावेसे वाटते:
25 Mar 2012 - 4:49 pm | मितभाषी
झाले बहू, होतील बहू, परन्तू या सम हा (ही)
मिसळपावची सर सध्या आंजावर असलेल्या एकाही मराठी साईटला नाही एवढे छातीठोकपणे सांगू शकतो.
बाकी चालू द्या.