मुंबईत धुवाधार पाऊस..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
28 Jul 2008 - 3:38 pm
गाभा: 

मुंबईत सकाळपासून जोरदार वार्‍यांसह धुवाधार पाऊस!

बोरिवली, दहिसर विभाग, पाण्याने भरला. त्या भागातील बरीचशी घरे पाण्याने भरलेली आहेत. जवळजवळ ४ ये ५ फूट पाणी घरात शिरलेलं आहे.

मालाड आणि अंधेरी परिसरातदेखील पुष्कळ पाणी साचलं आहे. जोरदार वार्‍यासह सतत पाऊस सुरू आहे! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत.

मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या!

आपला,
(२६ जुलै २००५ ची मुंबई पाहिलेला मिपाकर) तात्या.

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 3:43 pm | मनस्वी

मुंबई-मिपाकर काळजी घ्या.

आज रात्रीची आजतक सबसे तेज ची ब्रेकींग न्यूज नक्की! अमिताभच्या घरात पाणी शिरले!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 3:46 pm | आनंदयात्री

सबसे तेज ची ब्रेकींग न्यूज नक्की! अमिताभच्या घरात पाणी शिरले!

ठ्ठोsss ठ्ठोsss ठ्ठोsss !!!

=)) =)) =))

एडिसन's picture

28 Jul 2008 - 3:52 pm | एडिसन

बच्चन फॅमिली सध्या अमेरिकेत नाचत फिरतेय..बातमीत जरा बदल करूया..बच्चनच्या कुत्र्याला थंडी भरली.. =)) =))
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

श्रीमंत दामोदर पंत's picture

28 Jul 2008 - 3:44 pm | श्रीमंत दामोदर पंत

मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या!

आणि जमेल तशी माहिती देत रहा........

आपली खुशाली कळवा......

मनिष's picture

28 Jul 2008 - 3:53 pm | मनिष

मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या! आपली खुशाली कळवा!
तसे माझे आणि पावसाचे फार सख्य नाही, पण वीजटंचाई, पाणीटंचाईपेक्षा पाऊस बरा! :)

पडणार्‍या पावसाला बघून जर फक्त भिजलेले क्षण आठवले, तर स्वतःच्या रसिकतेची स्तुती करू नका; कबूल करा की तुमच्या आयुष्यात गरीबी, गळती-कच्ची घरे आणि असुरक्षितता खर्‍या अर्थाने तुम्ही अनुभवलीच नाही!

- (गळती-कच्ची घरे आणि असुरक्षितता अनुभवलेला) मनिष

विजुभाऊ's picture

29 Jul 2008 - 11:28 am | विजुभाऊ

पडणार्‍या पावसाला बघून जर फक्त भिजलेले क्षण आठवले, तर स्वतःच्या रसिकतेची स्तुती करू नका; कबूल करा की तुमच्या आयुष्यात गरीबी, गळती-कच्ची घरे आणि असुरक्षितता खर्‍या अर्थाने तुम्ही अनुभवलीच नाही!


त्या असुरक्षिततेही तुम्हाला जर भिजलेले क्षण आठवले तर स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही खर्‍या अर्थाने आयुष्याचा आनन्द उपभोगता आहात

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मनिष's picture

29 Jul 2008 - 11:31 am | मनिष

त्या असुरक्षिततेही तुम्हाला जर भिजलेले क्षण आठवले तर स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही खर्‍या अर्थाने आयुष्याचा आनन्द उपभोगता आहात

:)

अन्जलि's picture

28 Jul 2008 - 3:56 pm | अन्जलि

आता कचेरितुन घरि कसे पोचाय चे हा मोठा प्रश्न आहे बघुया बाहेर पड्ल्यावर काय काय होते ते. तुम्हि सगळे मिपाकर आहातच सोबतिला मग काहि काळजि नाहि. नाहि का! धमु तुझे काय? बिचारा पहिलाच पाउस अनुभव्तोय मुम्बै मधला. आम्हि २६/७/५ ला अनुभव घेत्लाय एकदा.

धमाल मुलगा's picture

28 Jul 2008 - 4:31 pm | धमाल मुलगा

:(

आज हापिस लवकर सुटतंय.
४:४५ लाच बस येणार आहेत.

मी लै लै घाबरलोय.
मला फक्त कुत्र्यासारखं पोहता येतं...जास्तवेळ नाही :(

पाहुया काय होतंय.

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 4:44 pm | आनंदयात्री

>>मी लै लै घाबरलोय.

हट साला .. त्यादिवशी रात्री त्या दोघा बैला एवढ्या पंजाब्यांना फटाफट कानफटात मारल्यास ते रे .. तु कब डरना यार ??

>>मला फक्त कुत्र्यासारखं पोहता येतं...जास्तवेळ नाही

ठ्ठोssssssssssssss

=)) ... काय बोलशील बाबा .. नेम नाही !!

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 4:46 pm | मनस्वी

धम्या घाबरू नकोस! जा बिनधास्त.. काही होणार नाही!
मुंबईकर बांधव आहेतच मदतीला.
:)

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

टारझन's picture

28 Jul 2008 - 5:17 pm | टारझन

अगं मनस्वी .. म्हणूनच तर तो जास्त घाबरतोय....
आणि पोहायच म्हणजे कोणत्या पाण्यात ... ईईईई... धम्या नैसगिक मिनरल पाण्यात पोहणार .. मज्जा मज्जा ...
घाबरू नकोस .. मी पण असाच पोहत पोहत असा चालो होतो.. अचानक माझ्या मागे शार्क मासा लागला .. मी पुढ... मासा मागं ..
मी पुढं .... मासा मागं ..... आता मासा मला झडप घालून पकडणार ..तेवढ्यात काहीतरी झाल .. माश्यांन व्ह्याआआआक केलं, मासा पळून गेला आणि मी वाचलो ... मग मी अजून पोहत पुढे गेलो .. मला एक पाणीपुरीची गाडी दिसली .. मी मस्त २-३०० पाणीपुर्‍या हाणल्या .. आणि पोहत पोहत घरी आलो..

(अफ्रिकेचा काका) कु.ख.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2008 - 3:00 am | llपुण्याचे पेशवेll

अरे पाणीपुरीला पाणी मुबलक होते पण पुरीतले सारण कमी म्हणून त्या पाणीपुरीवाल्याने शार्क माशाचे सारण भरले पुरीत. तो मासा काही पळून नाही गेला. :)
(कुबड्याच्या मागोमाग पोहत आलेला)
पुण्याचे पेशवे

पश्चिम बोरिवलीत नव्याने काँक्रीटीकरण झाल्याने वाचलो!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनिष's picture

28 Jul 2008 - 10:22 pm | मनिष

धम्या पर्फेक्ट आहे, पोहत वगैरे नाही जावे लागले...:)
पाऊस ओसरलाय म्हणे!

प्राजु's picture

28 Jul 2008 - 10:31 pm | प्राजु

मिपाकरांना माझी विनंती, काळजी घ्यावी स्वतःचीच नव्हे तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींची सुद्धा. जपून रहावे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मित्र जयन्त's picture

29 Jul 2008 - 12:20 pm | मित्र जयन्त

समस्त मुम्बइकर

पावसचा आनन्द घ्या आणि त्याबरोबर काळजी पण घ्या ..

जयन्त
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आजुन सुन्दर बनवायच आपण .......

भोचक's picture

29 Jul 2008 - 5:50 pm | भोचक

च्यायला तिकडे धमाल पाऊस पडतोय. इकडे इंदूरमध्ये लहान मुलगा मुतल्यासारखा पाऊस पडतोय. साला मुसळधार पावसाचाही एक आनंद असतो.

(लहानपणी गावात गळत्या घरात भांडी ठेवून ठेवून तो पाऊस अनुभवलेला)
भोचक