नरकयातना

मनस्वी's picture
मनस्वी in काथ्याकूट
28 Jul 2008 - 12:06 pm
गाभा: 

देवगाव (ता. नगर) येथील या चिमुरडीच्या नशिबात पुन्हा आशेचे किरण खुलू शकतात; परंतु सुमारे एक लाख रुपयांच्या शस्त्रक्रियेनंतर. आर्थिक मदत मिळाली तरच या शस्त्रक्रिया होऊ शकतात. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर पुण्यातील 'रुबी हॉल' मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
तेथे डॉक्‍टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो. समाजाने हातभार लावला, तर तिचे जीवन पुन्हा फुलू शकेल.

सकाळमध्ये ही बातमी वाचनात आली. लोक यथावकाश आपापल्या परीने मदतीचा हात देतीलच.
पण मनात एक प्रश्न उभा रहातो की अशा असहाय्य रुग्णांसाठी, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत का नाही होउ शकत? का निधी उपलब्ध होईपर्यंत वाट पाहिली जाते? या ७-८ वर्षाच्या मुलीने जिला आपल्याला नक्की काय झाले आहे, निधी म्हणजे काय, तो कधी गोळा होईल, हे माहितही नसेल.
दात्यांना आवाहन करण्याचा हा मार्ग ठीक आहे, पण का असे इलाज अशा खरोखर गरजू रुग्णांवर तातडीने (/मोफत) केले जात नाहीत?

मला यातील पूर्ण ज्ञान नाही. जाणकारांनी कृपया विचार मांडावेत.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 12:45 pm | आनंदयात्री

आपल्याकडे विमा काढला जात नाही. विम्याला आपला समाज अजुनही बचतीचा एक मार्गच समजतो. त्या मुलीचा लहानपणीच विमा काढला गेला असता तर असे झाले नसते. खरेतर परिस्थिती गरीब असल्यामुळे हा मुद्दा इथे गैरलागु ठरतो तरीपण दारिद्र्यरेषेखालच्या व्यक्तीच्या अपत्यांना सरकारतर्फे ते मुल सज्ञान होउपर्यंतचा विमा दिला गेला पाहिजे.

>>अशा खरोखर गरजू रुग्णांवर तातडीने (/मोफत) केले जात नाहीत?

हॉस्पिटल कसे करणार मोफत उपचार ? सत्यसाइबाबांच्या हॉस्पिटल मधे असे फुकट उपचार केले जातात असे ऐकुन आहे.

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 12:51 pm | मनस्वी

हॉस्पिटल कसे करणार मोफत उपचार ?

का नाही करु शकत?

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 2:09 pm | आनंदयात्री

पैसे कोण देणार उपचारांचे ?
आपल्याला रोज या गोष्टी पहायची सवय नसते म्हणुन आपण कळवळतो अन अश्या अपेक्षा करतो, पण त्यांच्या साठी हे रोजचेच आहे.

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 5:45 pm | मनस्वी

उपचारांचे पैसे म्हणजे काय असते? डॉक्टरांची फी, ऑपरेशन थिएटर मध्ये वापरल्या जाणार्‍या मशिनरीज् आणि इतर वस्तूंची फी, वॉर्डात ऍडमिट केल्यावर कॉटचे आणि सेवांचे भाडे, औषधांचा खर्च आणि काय असेल ते..
संस्था वगैरे मदत करतीलच, पण तोपर्यंत त्या जीवाचे काय?
माझा प्रश्न इतकाच आहे की अशा रुग्णांसाठी काही सेवा मोफत / विना मोबदला / माफक दरात नाही का होउ शकत?

हॉस्पिटलकडे अशा संस्थांचे कॉन्टॅक्ट्स असतील तर बरे नाही का होणार. त्या खेड्यातील आईवडिलांना काय माहित की स्वयंसेवी संस्था म्हणजे काय, निधी काय.. जर अशा केसेस हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या लक्षात आल्यास पटापट सुत्रे हालून रुग्णावर लवकर उपचार होउ शकतात आणि हॉस्पिटललाही उपचाराच्या माफक फी ची हमी राहिल.

अगदी तो निधी उभा राहीपर्यंत का बरं वाट पहावी ऑपरेशनची.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

अवलिया's picture

28 Jul 2008 - 5:47 pm | अवलिया

"In a world that has begun to believe that financial profit is the only religion, sometimes not wanting money is more frightening to capitalist society than acts of terrorism." - अरुंधती रॉय

नाना

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2008 - 5:44 pm | प्रकाश घाटपांडे


सत्यसाइबाबांच्या हॉस्पिटल मधे असे फुकट उपचार केले जातात असे ऐकुन आहे.


लातुर मधील एका तरुण मुलाची किडनी पुट्टीपुर्तीच्या हॉस्पिटल मध्ये काढली होती. हे मी सदर मुलाच्या तोंडातुन पत्रकारांसमोर ऐकलेली कथा आहे. ती चित्रलेखा मध्ये ही आली होती. बापाच्या किडनीच्या आजारात मुलाला किडनी द्यावी लागली .मुलाने आश्रमात सेवा केली.
बाप नंतर वारला. मुलाने नंतर जेव्हा एक्स रे काढला त्यावेळी बापाची एक किडनि गायब व याची एक गायब. हे प्रेत उकरुन काढुन काढलेल्या पोस्टमार्टेम वरुन सिद्ध झाले. मुलगा कोर्टात लढला. हारला. जजच सत्यसाईबाबाचे भक्त निघाले. ७-८ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे.
अगदी साधा मुलगा होता. प्रकरण बंद.
प्रकाश घाटपांडे

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 5:47 pm | आनंदयात्री

एकावे ते भयंकरच !
हेच बाबा ते लिंबु बिंबु काढतात ना हवेतुन ?
त्या संध्यानंद फेम न्युज चॅनेल वाल्यांना काही ब्रेकिंग न्युज नाही मिळाली की ते दाखवत असतात नेहमी.

नारदाचार्य's picture

28 Jul 2008 - 5:58 pm | नारदाचार्य

यात भयंकरच काय आहे? ही त्यांची ख्याती तशी जुनी आहे. प्रकाशरावांनी सांगितली ती छापून आलेली वृत्तकथा आहे. त्याहीआधी तिथं असे प्रकार घडले आहेत. नव्हे, त्यातूनच ते उभं राहिलं आहे. इथं पुण्यातल्या अलीकडेच नावारुपास आलेल्या एका रुग्णालयात मोफत उपचार कशासाठी होतात ठाऊक आहे का? परदेशातून मान्यवर तज्ज्ञांना इथल्या डॉक्टरांच्या ज्ञानार्जनासाठी पाचारण केले जाते तेव्हा या मोफत उपचारांची व्यवस्था असते. आलं लक्षात काही? हे मोफत उपचार मग त्या सरकारी अटींत बसवले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील डॉक्टरांशी त्यासाठीचं नेटवर्क उभं आहे.

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 6:15 pm | आनंदयात्री

>>यात भयंकरच काय आहे?

किडनी काढुन घेणे भयंकर नाही ??? का फक्त भुताच्याच गोष्टी भयंकर असतात ?

नारदाचार्य's picture

28 Jul 2008 - 6:29 pm | नारदाचार्य

मालक, ते भयंकरच आहे. पण भयंकरानं भयंकर केलं यात भयंकर आहे असे म्हणण्यासारखे काय, इतकेच आमचे म्हणणे आहे. सैतानाकडून संताच्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल? तेव्हा तो सैतानासारखाच वागला तर त्यात धक्का बसण्याजोगे काही नसते. धक्का बसला तर त्या सैतानाचा उपाय करणं अवघड ठरतं. धक्का बसून न घेता विचार केला तर सैतानाचा उपाय करता येतो, असं आम्हाला म्हणायचं आहे. आमच्या आधीच्या शब्दांतून ते व्यक्त होत नसेल तर क्षमस्व.

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 7:25 pm | आनंदयात्री

गैरसमज झाला. क्षमस्व.

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 12:47 pm | विसोबा खेचर

या ७-८ वर्षाच्या मुलीने जिला आपल्याला नक्की काय झाले आहे, निधी म्हणजे काय, तो कधी गोळा होईल, हे माहितही नसेल.

हे मात्र खरं आहे.

असो, आजच यथाशक्ति मदत पाठवून मी माझा खारीचा वाटा उचलतो!

(व्यथित) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2008 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

ही बातमी इंग्रजी मधून कुठे प्रकाशित झाली आहे का? मला आमच्या कार्यालयात काही लोकांना दाखवता येईल.

बिपिन.

नारदाचार्य's picture

28 Jul 2008 - 5:48 pm | नारदाचार्य

खरे तर, ट्रस्टच्या स्वरूपात असणाऱ्या (आणि काही सरकारी मदत वगैरे मिळालेल्या अशा अटींना आधीन असणाऱ्या) प्रत्येक हॉस्पिटलवर गरजू आणि गरीब रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था असते. किमान कागदावर तरी. त्यातून हे उपचार होऊ शकले पाहिजेत. तसे होत नाहीत कारण त्याविषयी एकूणच जनतेत अज्ञान असते. आणि जे त्याविषयी ज्ञानी असतात ते गरजू नसतात, पण लाभ उठवतात. याच बातमीतील रुग्णालयासंबंधात अशाच मुद्यावर एक आंदोलनही झालेले आठवते. या विशिष्ट प्रकरणात नेमके उपचार का होऊ शकले नाहीत याचा खुलासा केवळ पैसे नाहीत हा असू शकत नाही. त्या दृष्टीने त्या बातमीमागची बातमी काढली पाहिजे. त्या रुग्णालयामध्ये अशा मोफत उपचाराची सरकारी अट आहे का, असल्यास त्यानुसार हे उपचार का झाले नाहीत हे तपासले तर बऱ्याच बाबींचा खुलासा होऊ शकतो.