दुधिया हलवा ---

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
11 Mar 2012 - 9:54 pm

साहित्य -- एक छोटा कोवळा दुधी भोपळा, एक लिटर दुध, दोन चमचे साजूक तूप,
पाच टे.स्पून साखर किंवा आवडीप्रमाणे, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड.

कॄती -- प्रथम भोपळ्याच्या साली काढून घ्या. खिसून घ्या. आता कढईमध्ये तूप घाला व त्यावर
भोपळा खिस घालून चांगला परतून घ्या व आता त्यामध्ये दूध घाला, गॅस बारीक करा, आता तुमचे काम फक्त येताजाता ते ढवळत रहाणे. तुमचे काम तुम्ही करु शकता, मिपावर येउन गप्पा मारु शकता.कारण हे तयार व्हावयास जवळ जवळ एक तास तरी जातो.
आता हे दुध आटत जाउन त्याचा छान खवा बनू लागतो. वेगळा खवा घालायची जरुरीच नाही.
दुध पुर्ण आटले की त्यात साखर, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड घालून पुन्हा
थोडावेळ परतुन घ्या.

hlawa1

हा झाला आपला दुधी हलवा तय्यार.

halawa2

प्रतिक्रिया

तर्री's picture

11 Mar 2012 - 9:57 pm | तर्री

चंद्रोदय नुकताच झाला आहे. पोटात कावळे ओरडत आहेत. म्हटले दुधी हलवा पहावा. तर फोटो दिसत नाहीत.
पाकृ तर आवडतीच.

जब्बरदस्त ,खतर्नाक पाककृती ... :) आवड्ली आहे.
एक शंका खिस परतुन त्यात दुध घातल्यावर जर मिपावर गप्पा हाणत बसलो तर दुध उतु जाणार नाही का...?

निवेदिता-ताई's picture

11 Mar 2012 - 10:43 pm | निवेदिता-ताई

अरे दूध उतू जाऊ नये म्हणूनच गॅस बारीक करायचा....आंणी त्यात उलथने घालूनच ठेवायचे.
पण गप्पा हाणताना मधूनच तिकडेही लक्ष द्या नाहीतर आपला हलवा जळगावला जायचा...:)

पक पक पक's picture

11 Mar 2012 - 10:53 pm | पक पक पक

धन्यवाद...... :)

पक पक पक's picture

11 Mar 2012 - 10:15 pm | पक पक पक

आहाहा फोटु आले वा वा
:tongue: :tongue: :tongue: :tongue:

तर्री's picture

11 Mar 2012 - 10:23 pm | तर्री

खत्रा. काजु/बेदाणे घालून च्या मारी ! खल्लास !!

पिंगू's picture

12 Mar 2012 - 12:37 am | पिंगू

कधी येऊ हलवा खायला?

- (आमंत्रणाच्या प्रतिक्षेत) पिंगू

सानिकास्वप्निल's picture

12 Mar 2012 - 7:08 am | सानिकास्वप्निल

मस्त माझा आवडता :)

अमृत's picture

12 Mar 2012 - 9:17 am | अमृत

पण नैवद्याइतका का बनवलात तै? इसमे मेरा क्या होगा? :p :-p :tongue:

पुढील विकांताला नक्कीच बनवला जाईल.

अमृत

Pearl's picture

12 Mar 2012 - 11:45 pm | Pearl

मस्त पा.कृ. :-)
माझी आवडती स्वीट डिश.
मी सुद्धा असाच बनवते दुधी हलवा. फक्त तूपावर पहिल्यांदा थोडा काजू परतते आणि मग त्यात खिसलेला दूधी टाकते. त्यामुळे तळलेला काजू नंतर छान शिजतो आणि टेस्टी लागतो.

सांजसंध्या's picture

14 Mar 2012 - 2:07 pm | सांजसंध्या

मस्तच दिसतंय.