आमच्या कडे येनार्या एका इजिप्शियन पाहुण्याचा ( जो आमचा या धंद्यातील भागीदार आणि त्या जागतिक कंपनीचा मालक आहे ) शाल देऊन महाराष्ट्रीय पद्धतीने सत्कार करायचा आहे.
हा सत्कार आमच्या जर्मन कंपनीच्या जागतिक प्रमुखाकडून एका वाहनाच्या अनवेलींग ( अनावरण/ उदघाटन ) कार्यक्रमात करायचा आहे.. पत्रकार .. झगमगाट .तृतीय पृष्ठी..वगैरे असणार आहे..
कार्यक्रम पुण्यनगरीतच ( हल्ली चाकणलाही पुणेच म्हणतात) आहे.. आणि ही भन्नाट कल्पना एका सानुनासिक एकारांत पुणेकराची असल्याने त्याला अनेक तात्विक आयाम आहेत.
प्रश्न असा आहे की...
अशा सत्काराच्या कार्यक्रमाला शाल नेमकी कसली असावी?
आपल्याकडे सत्काराच्या म्हणून मिळणार्या शाली या पंचाच्याच आकाराच्या असतात. दुकानात विचारल्यावर ( दुकान पुण्यातील आहे ) सत्काराच्या शाली या अशाच असतात असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्यात आले.
शाल या विषयावर गुगलून पाहीले पण शाल आणि सत्कार असा विषय मिळत नाही.
शाल ( महावस्त्र) आणि सत्कार हा प्रकार नेमका केव्हा सुरु झाला असावा? त्यामागची भूमिका काय असावी? यातून आदर व्यक्त होतो की प्रेम ? की नुस्ताच शिष्टाचाराचा उपचार ? अन्य प्रांतात / देशात अशी प्रथा आहे का?
या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास " शाल नेमकी कसली असावी?" याच्या जवळपास जाता येईल असे वाटते.
माझ्या एका अमराठी मित्राला थोडी चकचकीत असावी असे वाटते ..( निदान फोटु तरी बरे येतील ही त्याची माफक अपेक्षा! )
मिपाकरांनी ही प्रश्नाचे उत्तर धुंडालण्यास मदत करावी.. म्हणून हा चर्चा प्रस्ताव !
प्रतिक्रिया
7 Mar 2012 - 10:01 am | इरसाल
बाठांकडे तपास करावा.
रंगांची चोइस मिळ णार नाही.
7 Mar 2012 - 10:21 am | सूड
तेच सत्काराची शाल असं सांगूच नका ना ! तुम्हाला पसंत पडेल ती घ्या; तसाही पाव्हणा फिरंगी आहे त्यामुळे घेतल्या गोष्टीत खुसपटं काढायची शक्यता नाही.
7 Mar 2012 - 10:21 am | सूड
तेच सत्काराची शाल असं सांगूच नका ना ! तुम्हाला पसंत पडेल ती घ्या; तसाही पाव्हणा फिरंगी आहे त्यामुळे घेतल्या गोष्टीत खुसपटं काढायची शक्यता नाही.
7 Mar 2012 - 10:21 am | सूड
तेच सत्काराची शाल असं सांगूच नका ना ! तुम्हाला पसंत पडेल ती घ्या; तसाही पाव्हणा फिरंगी आहे त्यामुळे घेतल्या गोष्टीत खुसपटं काढायची शक्यता नाही.
7 Mar 2012 - 10:24 am | प्रास
एखादी गोष्ट तीन वेळा सांगितल्याखेरीज ती ठासून सांगितल्यासारखे वाटत नाही का तुम्हाला? ;-)
7 Mar 2012 - 10:27 am | सूड
तर वो !
7 Mar 2012 - 10:23 am | नितिन थत्ते
शाल अशी हवी की तिचा त्या पाहुण्यास काही उपयोग करता येऊ नये.
7 Mar 2012 - 10:27 am | सुहास..
शाल अशी हवी की तिचा त्या पाहुण्यास काही उपयोग करता येऊ नये. >>>
=)) =)) =)) =))
अनुभव का हो थत्ते च्चच्चा
@ विटेकर , त्या पेक्षा पगडी का देत नाही ? पुणेकर पगडी घालतात सत्काराप्रित्थर्त, सन्मान म्हणुन !!
7 Mar 2012 - 10:30 am | अन्या दातार
पगडी म्हणजे टोपीच ना एक प्रकारची? ;)
7 Mar 2012 - 10:37 am | सुहास..
पगडी म्हणजे टोपीच ना एक प्रकारची? >>>>
;)
7 Mar 2012 - 10:40 am | चिंतामणी
>>>आपल्याकडे सत्काराच्या म्हणून मिळणार्या शाली या पंचाच्याच आकाराच्या असतात. दुकानात विचारल्यावर ( दुकान पुण्यातील आहे ) सत्काराच्या शाली या अशाच असतात असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्यात आले.
हे वाचल्यावर हेतु विषयी शंका आली.
बाकी चांगल्या प्रकारची आणि फिरंगी पाहुण्याला देण्याजोगी शाल मिळण्याची पुण्यात खूप ठिकाणे आहेत. त्या दुकानदाराने तुमच्या दर्शनाने तुम्ही काय कराल हे ताडुन असे उत्तर दिले असावे.
असो. पुण्यात रहाणार आणि पुण्याला त्याच बरोबर पुणेकरांवर शेरेबाजी करणारी जी जमात आहे त्यात एकाची भर पडली असे म्हणतो.
तुर्तास एव्हढेच.
7 Mar 2012 - 11:23 am | मी-सौरभ
खिशाला चाट बसणार नसेल तर एखादी पश्मिना शाल द्या.
फॅब इंडिया ला भेट दिल्यास उपयोग होईल असे वाटते.
7 Mar 2012 - 3:00 pm | JAGOMOHANPYARE
आमच्या आईचं भजनी मंडळ म्हातारं झालं.. रिटायर होणार्याला शाल द्यायची असं ठरवून काही लोकाना शाली दिल्या.. पण शाल मिळाली की थोड्याच दिवसात संबंधित लोक 'राम' म्हणू लागले.. त्यामुळे शाली घालायचा प्रकार बंद झाला. सध्या सगळे लोक अजुन ठणठणीत आहेत.
7 Mar 2012 - 3:04 pm | विजुभाऊ
शाल मिळाली की थोड्याच दिवसात संबंधित लोक 'राम' म्हणू लागले.
अरे वा. आंबोळ्याच्या कंदीलानंतर आता या शाली आल्या
7 Mar 2012 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
कुठलीही घ्या, फक्त 'शालीन' घ्या म्हणजे झाले.
8 Mar 2012 - 9:37 am | बटाटा चिवडा
एखाद्याला अन्न, वस्त्र आणि निवारा दिला असता तो त्याचा सर्वात मोठा सत्कार, असे मानले असता...
एखाद्या कार्यक्रमात पाहुण्यांना 'शाल व श्रीफळ' देऊन त्यांचा सत्कार करण्याची जी पद्धत आहे ती समर्पक आहे असे दिसून येते ..
कारण, श्रीफळ (नारळ) म्हणजेच अन्न (नारळाची चटणी अथवा खोबऱ्याच्या वड्या करता येतात), शाल म्हणजेच वस्त्र ..या वस्तू देऊन आपण मान्यवरांचा सत्कार करू शकतो..
एवढा शाल व श्रीफळ ( अन्न व वस्त्र ) देऊन सत्कार करणारी व्यक्ती ही नक्कीच आपल्या मनात 'घर' करून राहते.. म्हणजेच झाला 'निवारा' ....
अशा प्रकारे त्या व्यक्तीचा अन्न, वस्त्र आणि निवारा देऊन सत्कार करण्याची प्रथा पडली असावी..
इतिहास बनत नसतो, इतिहास घडवावा लागतो.. :D
14 Mar 2012 - 9:51 am | विटेकर
तार्कीक आणि सुसंगत आहे.
वास्तविक या अनुषंगाने अधिक चर्चा व्हावी असे अपेक्षित होते .. पण तसे फारसे झाले नाही!
अस्तु |
21 Mar 2012 - 12:59 am | बटाटा चिवडा
'म्हणणे पटले'.. या दोनच शब्दांत माझ्या 'ऐतिहासिक' विश्लेषणाला आपण जो मौलिक दुजोरा दिलात, हे पाहूनच माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले की हो राव....आता अजून काय बोला...!!
8 Mar 2012 - 9:50 am | मराठी_माणूस
शाल नव्हे महावस्त्र म्हणा (प्रेरणा:पुल)
8 Mar 2012 - 3:34 pm | आनंदी गोपाळ
मध्यंतरी कुठेतरी महामहोपाध्यायांचा श्रीफळ व अंगवस्त्र देऊन सत्कार केल्याचे सुसंवादिकेने जाहीर केल्याचे आठवते??
10 Mar 2012 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार
कुठे आणि कोण करतं म्हणे असे सत्कार ?
10 Mar 2012 - 2:13 pm | अनुरोध
तश्या औरंगाबादच्या हिमरु शाली प्रसिध्ध आहेत बघा.... नाहितर सौरभ यांनी सांगितलेल्या कश्मिरी पण अहेतच...
14 Mar 2012 - 10:07 am | विटेकर
शेवटी शालार्पण सोहळा पार पडला ! पाहुण्यांना शाल आवडली. ( हा त्यांच्या सौजन्याचा भाग ही असावा ) अरबी समाजात पर्यायाने इजिप्त मध्येही अशी वस्त्रार्पणाची पद्दत असते आणि त्यातून आपलेपणा आणि आदर ( affection & respect )प्रकट होतो अशी महिती ही त्यांनी खासगीत सांगितली.
इथे फोटु टाकायचा होता पण फोटु काढण्यापूर्वी च शालार्पण झाले !
शाल सेवटी फॉब इंडिया मधून घेतली.. रुपये १६०० /- !
(पण च्यायला बायकोनी घरी म्हणुन जी खरेदी केली त्याची चाट मात्र आमच्याच खिषाला ! बेगानी शदि में अब्दुला दिवाना! )
मिपाकरांच्या सहकार्यांबद्दल धन्यवाद
श्री. जागो मोहन प्यारे ...
पाहुणा सुखरुप पणे नाईल् च्या तीरावर पोचला... अजून ( तरी) जीव आहे!-
बरे -वाईट झाल्यास मात्र माझी धडगत नाही! माहीत असताना शाल दिली म्हणून 'सदोष मनुष्यवधाचा" गुन्हा दाखल होईल!
बाय -द- वे शालार्पणानंतर साधारण किती दिवस वाट पहावी लागते? म्हणजे "सेफ"किती दिवसांनी म्हणावे ?
14 Mar 2012 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार
शिलार्पणानंतर किती दिवस वाट पहावी लागेत ते माहिती आहे. शालार्पणाबद्दल माहिती नाही.