रंग आणि शब्दांची धमाल करुन आपल्या भाषेतील असणार्या अनेक शब्दातील रंग असलेला शब्द ओळखू या.
१. एक वाद्य - - - रं ग.
२. एका रागाचे नाव - रंग.
३. मन / अंतःकरण - - रंग.
४. बु ध्दीबळाचा खेळ याचे एक नाव - - रंग.
५. निपुण, कुशल, वाकबगार - रंग -
६. हाताच्या / पायाच्या शेवटच्या बोटाचे नाव - रंग -
७. घोडा - रंग -
८. विष्णु, कृष्ण -रंग --
९. हनुमान --रंग --
१०. त्वचेमधील असणारे द्रव्य रंग--
११. नाट्यगृह रंग---, रंग---
१२. रांगोळीचे चित्र रंग--
१३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंग--
१४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग---
१५. भाताची एक जात -रंग-
: साभार लोकसत्ता.
प्रतिक्रिया
4 Mar 2012 - 11:33 am | मस्त कलंदर
१. एक वाद्य :ज ल त रं ग.
२. एका रागाचे नाव - रंग.
३. मन / अंतःकरण : अंत रंग.
४. बु ध्दीबळाचा खेळ याचे एक नाव - - रंग.
५. निपुण, कुशल, वाकबगार : पा रंग त
६. हाताच्या / पायाच्या शेवटच्या बोटाचे नाव : क रंग ळी
७. घोडा - रंग -
८. विष्णु, कृष्ण -रंग -- (श्रीरंग?)
९. हनुमान: ब ज रंग ब ली
१०. त्वचेमधील असणारे द्रव्य :रं ग द्र व्य
११. नाट्यगृह: रं ग मं दि र, रं गा य त न
१२. रांगोळीचे चित्र: रं गा व ली / रं ग चि त्र
१३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंग--
१४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग---
१५. भाताची एक जात -रंग-
4 Mar 2012 - 3:49 pm | प्रास
२. एका रागाचे नाव सारंग. (अर्थात ही रागिणी आहे)
४. बुध्दीबळाचा खेळ याचे एक नाव चतुरंग.
७. घोडा - रंग - (तुरग?)
८. विष्णु, कृष्ण -रंगनाथ
१३. अनुवाशिंक गुणांचे संक्रमण या मुळे होते रंगसूत्रे?
१४. रंग देण्याच्या कामाची मजूरी रंग---?
१५. भाताची एक जात -रंग-?
4 Mar 2012 - 6:46 pm | अन्या दातार
रंगसूत्रे कि गुणसुत्रे??
4 Mar 2012 - 9:07 pm | प्रास
मुळात गुणसूत्रेच पण कदाचित 'रंग' (वर्ण) या अनुवंशिक गुणांचे संक्रमण 'रंगसूत्रे' करत असावी.... ;-)
5 Mar 2012 - 1:20 am | रेवती
घोडा- तुरंग.
4 Mar 2012 - 4:28 pm | गणपा
मस्त डोकेबाज धागा हो कलंत्रीकाका. :)
5 Mar 2012 - 1:26 am | रेवती
भात- वरंगळ
5 Mar 2012 - 6:45 am | रेवती
रंगार्याच्या कामाचे पैसे- रंगवेतन?
5 Mar 2012 - 6:28 pm | वपाडाव
आज्जी, लैच उत्तरं द्याय लागलीस की... (आता पुढचं काही बोलत नै... नैतर माझ्या पाठीचा रंग लाल करशील)
5 Mar 2012 - 6:41 pm | यकु
माझ्या पाठीचा रंग लाल करशील)
ते रंगलेपन ;-)
करुन टाका..
5 Mar 2012 - 8:19 pm | रेवती
रंगवेतनबद्दल खात्री नाहिये.
5 Mar 2012 - 8:23 pm | प्रास
तुम्ही वप्याच्या पाठीवर तो म्हणतो तसं रक्तवर्णी रंगलेपन केलं तरी आम्हाला चालेल..... ;-)
5 Mar 2012 - 8:26 pm | रेवती
नको नको. लाडका नातू आहे तो.
याशिवाय दाखवण्याच्या कार्यक्रमाला मुलीला समजलं की हा मार खाऊ शकतो तर लगेच पसंती येईल.;)
5 Mar 2012 - 8:33 pm | प्रास
अहो असू द्याकी मग! तेवढाच एक नातू चांगल्या घरी पडायचा.... ;-)
5 Mar 2012 - 11:37 am | प्यारे१
कालच्या दै. सकाळच्या बालमित्र पुरवणी मध्ये हे शब्द्कोडे वाचल्याचे स्मरते आहे.
स्वतःच्या नावावर का खपवल्या जात आहे?
5 Mar 2012 - 3:47 pm | कलंत्री
मी कालच्या लोकसत्ताच्या अंकात हे वाचले आणि उत्तरे यांचा स्त्रोत लोकांना मिळु नये म्हणून संदर्भ टाकला नाही.
बाकी स्त्रोत किंवा साभार म्हणून वर्तमानपत्राचा दाखला देता आला असता.
धन्यवाद.
5 Mar 2012 - 4:15 pm | प्यारे१
तेच. माझं कन्फ्युजन झालं. सकाळ की लोकसत्ता ते!