गूगल translate कारनामा

किरन कदम's picture
किरन कदम in काथ्याकूट
3 Mar 2012 - 11:36 am
गाभा: 

नमस्कार मित्रानो ,
मी गूगल translation वरती काम करत होतो .
सहजपणे मी हे राम type केले तर ,इंग्लिश मध्ये Jesus म्हुणुन निकाल दाखवला.
मी चकित झालो.याला काय म्हणावे ?चूक कि मुदामून चूक करणे .
हि चूक सुधारण्य साठी कुठे तकरार करता येते.
माझा हे पहिले लेखन आहे .
काही चुकले तर माफ करा.
आपला मित्र
kk

Googleimage

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2012 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

....

कपिलमुनी's picture

3 Mar 2012 - 2:52 pm | कपिलमुनी

अशी कोणती "खंग्री" प्रतिक्रिया दिलीस की स्वताच काढली ??

( वाचायचं राहून गेला ना :()

कॉमन मॅन's picture

3 Mar 2012 - 12:01 pm | कॉमन मॅन

मी हे राम type केले तर ,इंग्लिश मध्ये Jesus म्हुणुन निकाल दाखवला

गुगल यंत्र हे अधिक करून ख्रिस्ती धर्मीयांच्या ताब्यात आहे, हे याचे एक कारण वाटते. एकूणच आधुनिक प्रगत तंत्रज्ञान हे सारे विदेशी लोकांच्या हातात आहे आणि ती मंडळी बहुतांशी ख्रिस्ती धर्मीय आहेत, त्यामुळे रामाच्या ऐवजी येशू असे येणे हे साहजिकच वाटते.

आपण आपले बसूया राम राम करत..! आणखी काय?!

असो..

जय श्रीराम!

चौकटराजा's picture

3 Mar 2012 - 12:17 pm | चौकटराजा

गुगलला कुणीतरी अध्यामिक गुरू मिळालेला दिसतोय .
राम , रहीम, जिसस, सारी एकाच देवाची निरनिराळी रूपे आहेत बरं मंडळी तर...... आता सर्वांचे एक भजन गाउ !
राम इसा एकच आहे
बुद्ध रहीम एकच आहे......

शिल्पा ब's picture

3 Mar 2012 - 12:44 pm | शिल्पा ब

आपण " हे राम" म्हणुन उसासे टाकतो तसे इंग्रजीत "जीजस" म्हणुन टाकतात.
नुसतंच राम, कृष्ण वगैरे टाईपलं तर असा रीझल्ट येत नाही.

पटण्याजोगे प्रतिपादन. आभारी आहे..

संपत's picture

3 Mar 2012 - 1:55 pm | संपत

पूर्वी काही इंग्रजी सिनेमा वाहिन्या हिंदी सब टायटल्स दाखवायच्या. त्यावेळी 'oh f*' चे भाषांतर हिंदीत 'हे राम / हे भगवान' व्हायचे. गुगलने उलट भाषांतर केले नाही हे आपले नशीब.. (गुगल 'ओह बकवास' असे भाषांतर करते.)

रानी १३'s picture

3 Mar 2012 - 2:24 pm | रानी १३

पण हे राम type केले तर ,इंग्लिश मध्ये he ram दाखवला
http://translate.google.co.in/translate_t?hl=&ie=UTF-8&text=he+ram&sl=hi...

कपिलमुनी's picture

3 Mar 2012 - 2:48 pm | कपिलमुनी

मराठी मधून हे राम टाईप केला आहे

महेशकुळकर्णी's picture

3 Mar 2012 - 2:35 pm | महेशकुळकर्णी

तुम्ही jesus शब्दावर क्लिक केली (alternate translation) तर O Rama, Hey Ram, if Hey Ram असे पर्याय येतात...

जय श्रीराम

-------------------------

- महेश

गणपा's picture

3 Mar 2012 - 3:03 pm | गणपा

हाय राम = Hi Ram
उफ़ राम = Oops RAM
ओह राम = Oh Rama

बाकी तुमचच चुकलं.
हे राम ऐवजी 'जय श्री राम' टंकायला हव होत. (बघा बर टंकुन.)

कालच कुठेस वाचलं की म्हणे गांधीजींच त्यांच्या मृत्युपश्चात अमेरिकेत कुठल्याश्या चर्चमध्ये त्यांच धर्मांतर करुन त्यांना खिस्र्ताव केल. त्या पार्शभुमीवर गुगलने त्याच अखेरचे शब्द 'हे राम' = Jesus केल असाव.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2012 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा

@कालच कुठेस वाचलं की म्हणे गांधीजींच त्यांच्या मृत्युपश्चात अमेरिकेत कुठल्याश्या चर्चमध्ये त्यांच धर्मांतर करुन त्यांना खिस्र्ताव केल. त्या पार्शभुमीवर गुगलने त्याच अखेरचे शब्द 'हे राम' = Jesus केल असाव. ---^---^---^---

यात गुगलचा काय संबंध? गुगल फक्त ट्रान्स्लेशनची फॅसिलिटी पुरवते.. पण शब्दार्थ तर इतर लोकान्नीच पुरवलेले असतात ना?

दादा कोंडके's picture

4 Mar 2012 - 12:05 am | दादा कोंडके

होना.

लोकान्ला एकतर फुकाट भाषांतर करून हवं असतं. आता तन्ला काय शब्द द्यायचाय आन काय द्यायचा नाय ते त्यांची प्रायवेट गोस्ट हाय, समजले काय, क क क किरन.