शे॑गदाण्याच्या वड्या.

सस्नेह's picture
सस्नेह in पाककृती
21 Feb 2012 - 10:35 am

साहित्य : २ वाट्या शे॑गदाणे
अर्धी वाटी तीळ
अर्धी वाटी किसलेले खोबरे
२ वाट्या किसलेला गूळ
२ चमचे तूप
वेलचीपूड २ चिमटी
शे॑गदाणे व तीळ वेगवेगळे भाजून कूट करून घ्यावे. मग इतर सर्व साहित्य एकत्र करुन चा॑गले कुस्करावे. २-२ डाव खलबत्त्यात कुटून घ्यावे. चा॑गला मुद्दा (आमच्या कोल्हापुरी भाषेत ) झाला पाहिजे इतपत. मग ताटाला तुप लावून वडया थापाव्या. ६ तासान्॑तर कापाव्या.

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

21 Feb 2012 - 10:49 am | पक पक पक

त्याला चिक्की म्हण्तात्,आमच्या लोणावळ्याला लै भारी मिळ्ते...

सस्नेह's picture

21 Feb 2012 - 3:14 pm | सस्नेह

नाही नाही. चिक्की ही गूळ तापवून केली जाते. ती चिवट कि॑वा कडक लागते. वडी वरील पद्धतीने केल्यास (व चा॑गली जमल्यास) तो॑डात टाकली की विरघळते. फोटो अप्लोड करायची प्रोसीजर शिकावी लागेल मग करीन.

पक पक पक's picture

21 Feb 2012 - 3:53 pm | पक पक पक

नाही नाही. चिक्की ही गूळ तापवून केली जाते.
.

चुकल चुकल आगाउ पणा बद्द्ल माफी असावी..... ;)

गवि's picture

21 Feb 2012 - 3:54 pm | गवि

सहमत..

यात पाकाचा भाग नाहीये.. त्यामुळे ही चिक्की नव्हे.. मऊ असली तरी शेंगदाणे भाजून घेतल्याने काहीशी खमंग अशी लागते. कुठेशी खाल्ल्याचं आठवतं.. याच धर्तीवर संक्रांतीला तिळकुटाची मऊ वडी मिळते (बिनपाकाची-बिनकडक अशी..)

वपाडाव's picture

21 Feb 2012 - 7:16 pm | वपाडाव

फोटो अप्लोड करायची प्रोसीजर शिकावी लागेल मग करीन.

इथे पहा... गंपाने लिहिलेला फोटो अपलोड करण्यास मदतीचा धागा ...
मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

धन्यवाद ! फोटो अपलोड करायचे तर समजले. पण तोपर्यन्त वड्या सगळ्या फस्त झाल्या ! आता पुन्हा केल्यावर फोटो काढीन...

चिरोटा's picture

21 Feb 2012 - 12:47 pm | चिरोटा

छान. फोटो टाकायला हवा होता.
पक पक पक, मगन चिक्कीत शेंगदाणा कुटलेला असतो?मला नाही वाटत.
वडी वेगळी आणि चिक्की वेगळी.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2012 - 1:03 pm | अत्रुप्त आत्मा

@मगन चिक्कीत शेंगदाणा कुटलेला असतो?मला नाही वाटत.>>>

पदार्थ करतानाचे फटू पायजे...नाय तर ग्वाड नाय लागत....बघायला ;-)

शेंगदाणा चिक्की दोन प्रकारची मिळ्ते एक 'शेंगदाणा क्रश' यात कुटाचीच चिक्की बनवतात,अन दुसरी तुकडा अस्लेली शेंगदाण्याचे दोन तुकडे (पाकळ्या) असलेली....

चिक्कीचा विषय निघाला आहे म्हणून..

लोणावळ्यात ओरिजनल मगनलालच्या दुकानात (स्टेशनातून बाहेर पडले की डाव्या हाताला ५ मिनिटे चालत) "रोज काजू" (Rose Kaju) नावाचा अप्रतीम फ्लेवर मिळतो. काजूच्या चिक्कीवर ड्राय गुलकंद पसरलेला असतो.

ही चिक्की आणी गरम गरम दूध.. अहाहाहा..

(फक्त ही चिक्की आणण्यासाठी बर्‍याचदा लोणावळ्याला जाणे व्हायचे) :-)

मला नाही वाटत.
वडी वेगळी आणि चिक्की वेगळी.

मग जा कोर्टात , अन ठोका फिर्याद आमच्या विरुध्...... ;)

चिरोटा's picture

21 Feb 2012 - 1:30 pm | चिरोटा

भलताच क्रश झालाय आपला मगनलाल चिक्कीवर.

पक पक पक's picture

21 Feb 2012 - 1:39 pm | पक पक पक

:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

सानिकास्वप्निल's picture

21 Feb 2012 - 4:38 pm | सानिकास्वप्निल

छान !

निवेदिता-ताई's picture

21 Feb 2012 - 10:29 pm | निवेदिता-ताई

सुंदर...अश्शी जिभेवर विरघळणारी वडी हवी....तो.पा.सु.