आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच. इ॑द्रिया॑पलिकडल्या मितिचा अनुभवसुद्धा आम्ही नाकारतो..
विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ?
विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना? हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ?
ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..
गाभा:
प्रतिक्रिया
14 Feb 2012 - 5:22 pm | पियुशा
हम्म्म .........
बात मे दम है लीनाजी ;)
14 Feb 2012 - 5:25 pm | परिकथेतील राजकुमार
14 Feb 2012 - 6:14 pm | अन्या दातार
मी येईपर्यंत पिझ्झासुद्धा मागव रे. आपण एखादा कोरियन किंवा तेलुगु पिच्चर बघू ;)
14 Feb 2012 - 6:16 pm | रमताराम
म्याबी आलूच. छानसं झाड शोधून ठेवा माझ्यासाठी.
14 Feb 2012 - 9:13 pm | हंस
"ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा" एवढे आयाम शिर्षकामध्ये वाचुन मला वाटले एखादा टिकापर मोठा लेख असेल पण हयॅ..... निराशा झाली.
मी येईपर्यंत पिझ्झासुद्धा मागव रे. आपण एखादा कोरियन किंवा तेलुगु पिच्चर बघू
कदाचित त्या चित्रपटांपेक्षा इथला चित्रपट जास्त मनोरंजक होण्याची शक्यता आहे.
15 Feb 2012 - 7:51 am | ५० फक्त
आयला छे छे, घोर निराशा झाली, मला वाट्ट्लंं, जागतिक (याची फोड - जन्मतः + अगतिक) प्रेमदिनानमित्त प्रेम त्रिकोणाची गोष्ट आहे का काय, कसं य हल्ली लोकं ठेवतात पोराची नाव, विज्ञान वगैरे, म्हणुन वाटलं का
एक असते श्रद्धा , एक असतो इश्वर आणि एक असतो विज्ञान असलं काही तरी, असेल मग तो इश्वर का विज्ञान नक्की कोण तरी एक मागासलेलं असतं, ते आयटित असतात , त्यांना स्पयंपाक येतो , त्यांच्याकडे टँका वगैरे असतात , ते समुद्रकिनारी पँटीत उभे राहुन फोटो काढतात, मग हट्टानं भाज्या , गोडा धोडाचं करतात असलं काहीतरी असेल, लेणे बिणे बघायला जात असतील, अॅडजेस्ट करत असतील, आंतरजालावर कसलेही फोटो बघत नसतील, पण अरे अरे सगळा अपेक्षाभंग झाला.
15 Feb 2012 - 10:57 am | सस्नेह
sorry ह॑सजी, खर॑ तर मोठा लेखच लिहायचा होता. पण नवीन मे॑बर असल्याने अजून मराठी ट्॑कणे फास्ट जमत नाही. शिवाय हापीस सुटायची वेळ झाली ना !..
पण चा॑गले प्रतिसाद मिळाले तर लेख जरूर पूर्ण करेन...
15 Feb 2012 - 1:35 pm | गणपा
लीनातै अशी अट नका ठेऊ बॉ.
अहो थोर मिपाकर सांगुन गेलेत की माणसानं नेहमी स्वांतसुखाय लिहित जाव. :)
14 Feb 2012 - 5:26 pm | सुहास..
शिळ्या कढीला उत
14 Feb 2012 - 5:29 pm | दादा कोंडके
ही तर कढीसुद्धा नाही. नुसतच पाणि उकळतय. :)
15 Feb 2012 - 10:59 am | सस्नेह
खर्॑य.. पण कढीप्रेमी अजुनी आहेतच ना...
15 Feb 2012 - 11:57 am | रम्या
>>खर्॑य.. पण कढीप्रेमी अजुनी आहेतच ना...>>
अहं ! अजुनही "शिळी" कढी प्रेमी आहेत याचं आश्चर्य वाटतयं :)
14 Feb 2012 - 5:51 pm | पिलीयन रायडर
"आम्ही म्हणतो म्हणुन" किंवा "का ते विचारायच नाही... आम्ही विचारलं का कधी?" असं कधी वैज्ञानिकाने म्हण्ल्याचे आठवतय का??
मग जर एखादी गोष्ट कुणी ग्रुहितकांसकट सांगत असेल... आणि एखादी "शक्यता" मांडत असेल तर ती स्वीकारण्यामध्ये "विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा" कशी?
डोळे झाकुन विश्वास ठेवणे ही अ॑धश्रद्धा.... मुळात विज्ञान हा एक मार्ग आहे सत्य शोधण्याचा... आणि पुराव्या शिवाय विश्वास न ठेवणे हाच ह्याचा पाया आहे.. मग विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा असं काही असुच कसं शकतं?
कोण? कधी? अहो त्यांना आपलं म्हणणं पटवण्यासाठी प्रयोग करावे लागतात... गणितं माण्डावी लागतात... तरी इतर वैज्ञानिक प्रश्न उपस्थित करु शकतात... त्यांचे खंडन करावे लागते... काय खाऊ वाटला का "गॉड पार्टिकल्स आहे" जाहिर करायला??
कमाल आहे... म्हण्जे आपटले असते तर देव नाही का?? आणि सगळ्या चांगल्या -वाईटाला देवाला जवाब्दार धरणार की काय?
14 Feb 2012 - 7:23 pm | अस्वस्थामा
>>कमाल आहे... म्हण्जे आपटले असते तर देव नाही का?? आणि सगळ्या चांगल्या -वाईटाला देवाला जवाब्दार धरणार की काय?
तेच तर..
विश्वात सगळे व्यवस्थित चालले आहे म्हणे.. मग उल्कापात होतो.. तारे, ग्रह नष्ट होतात हा देव नसल्याचा पुरावा म्हणायचं का ?
आम्हालाच बरोबर म्हणा.. पण पुरावे मागू नका.. प्रश्न विचारू नका.. 'असे का ?' सुद्धा नाही चालणार.. डोके तर चालवूच नका.. प्रसाद उजव्या हातातच घ्या आणि गणपती डाव्या सोंडेचा घ्या..
विज्ञान राहू द्या बाजूला... पण ही जबरदस्ती का या गोष्टीना मान्य करण्याची..?
14 Feb 2012 - 8:46 pm | Nile
हा तुम्हा लोकांच्या मागच्या जन्मी केलेल्या पापाचा पुरावा आहे. देव दयाळु आहे आणि तो शिक्षा देतो.
15 Feb 2012 - 11:14 am | सस्नेह
मुळात विज्ञान खोटे कि॑वा चुकीचे आहे असे लेखात कुठेही म्हटले नाही. विश्वास ठेवणेही चुकीचे नाही. मुद्दा हा आहे की प्रयोग आणि गणिते स्वतः केलेली नसतानाही आपण विश्वास ठेवतो तसे ईश्वरी अस्तित्वावर का ठेवत नाही ? त्याचेही प्रयोग करणारे सा॑गतात ते अनुभवण्याचा प्रयत्न न करताच अ॑धश्रद्धा म्हणून रिकामे होतो.
ग्रह, तारे या॑ची गती निय॑त्रित करण्यार्या शक्तीचा शोध अजूनही विज्ञानाला लावता आला नाही, हे सत्य आहे..
15 Feb 2012 - 11:29 am | sagarpdy
असं कोणी सांगितलं ? देवाने ?
16 Feb 2012 - 2:22 am | शशिकांत ओक
....तार्किक दृष्ट्या ईश्वर सिद्ध होत नाही. हे दाखवून देण्यासाठी बुद्धिवादी पुढील युक्तिवाद करतात. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, कारण त्यानेच हे विश्व निर्माण केले आहे. असे तुमचे म्हणणे असेल तर आम्ही विचारतो की विश्व राहू द्या. तो असला साधा दगड निर्माण करू शकेल का, कि जो त्याला स्वतःला उचलता येणार नाही? निर्माण करू शकतो म्हणत असाल, तर तो दगड स्वतःलाच उचलता येणार नाही? निर्माण करू शकतो म्हणत असाल तर तो दगड स्वतःच उचलू शकत नसल्यामुळे तो सर्वशक्तिमान नाही हे सिद्ध होते. आणि निर्माण करू शकत नाही असे म्हणत असाल तर त्याच्या निर्माणक्षमतेला मर्यादा पडत असल्यामुळे तो सर्वशक्तिमान नाही हे सिद्ध होते.
तात्पर्य, सर्वशक्तिमान ईश्वर असू शकत नाही. तर्काने ईश्वर सिद्ध होत नाही. (त्याचा पडताळा पाहता येत नाही)
ईश्वर अनुभवाचा विषय आहे. ही भूमिकाच ईश्वरवाद्यांची असल्यामुळे बुद्धिवादी या युक्तिवादाने ( हा युक्तिवाद बरोबर असेल तर ) ईश्वरवाद्यांचेच म्हणणे सिद्ध करीत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही! तथापि, हा युक्तिवाद तर्क दुष्ट आहे. यातील दोष असा की येथे भिन्न तार्किक पातळीवरील(Universe of discourse) विधाने एकत्र केली आहेत. जो ईश्वर शून्यातून वस्तू निर्माण करू शकतो, तो ती परत शून्यात नेऊ शकतो. मग ती उचलण्याची मातब्बरी काय, असे त्यास त्याच पद्धतीने उत्तर देता येते....
इति. प्रा गळतगे प्रकरण ७ मधील संदर्भात...
14 Feb 2012 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा
ही फांदी माझी....
चालु द्या
14 Feb 2012 - 7:50 pm | अन्नू
किती चा शो आहे?

14 Feb 2012 - 8:06 pm | JAGOMOHANPYARE
ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत
कुणी सांगितलं? पृथ्वीवर दरवर्षी शेकडो उल्का पडतात.. पण वातावरणाच्या कक्षेत आले की त्या जळून जातात म्हणून दिसत नाहीत... तारे म्हातारे झाले की आजुबाजुचे ग्रहच काय इतर तारेही ओढून गिळून टाकतात.. त्याना कृष्णविवर म्हणतात.. देव कुठे थांबवतो हे सगळे? ( आता युक्तीवाद कराल की नाश करणे हेही देवाचेच काम, म्हणून त्याने केले.. ) आणखी हजारो वर्षानी आपला सूर्यही कृष्णविवर होणार आणि आपल्या पृथ्वीला गिळून टाकणार..
14 Feb 2012 - 9:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही शाळामास्तर आहात का हो?*
बाकी चालू द्या.
*श्रेयअव्हेर - 'म्हैस', पुलं.
15 Feb 2012 - 11:16 am | सस्नेह
खूप इच्छा होती शाळामास्तर होण्याची .जमले नाही. हौस भागवून घेतेय...
15 Feb 2012 - 11:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
या विधानातून तुमचं विज्ञानावर असणारं खरं प्रेम दिसत आहेच. शाळकरी मुलं आणि विज्ञानाभ्यासक, विज्ञानप्रेमींच्या वतीने मी तुमचे आणि सर्वशक्तीमान आणि परमदयाळू भगवंताचे आभार मानते.
माझं शाळामास्तराचं विधान खरंतर जागोमोहनप्यारे यांनी दिलेल्या धडधडीत चुकीच्या माहितीबद्दल होतं. असो. लीना मॅडम, तुमचा वर्ग चालू द्या. मला वर्गात झोपायची सवय आहे. विज्ञानाचा तास सुरू झाला की मी उठेनच.
बा न्यूटना, केप्लरा, आईनस्टाईना, आणि माँड सिद्धांताचे अभ्यासकहो, माफ करा पामरांना!
15 Feb 2012 - 1:47 pm | JAGOMOHANPYARE
माझी माहिती चुकीची असेल तर तुम्ही सत्य माहिती द्या की.. कोण अडवले आहे? उगाच फालतू पाल्हाळ लावण्यापेक्षा योग्य माहिती दिली असती तर जास्त बरे नस्ते का झाले?
वैयक्तिक रोख असलेला मजकुर संपादित.
कृपया वाद विवाद करताना वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत याचे सादस्यांनी भान ठेवावे.
- संपादक मंडळ.
15 Feb 2012 - 1:36 pm | JAGOMOHANPYARE
१. Most meteors are smaller than a grain of sand, so almost all of them disintegrate and never hit the Earth's surfac
http://en.wikipedia.org/wiki/Meteor_shower
२. The primary formation process for black holes is expected to be the gravitational collapse of heavy objects such as stars,
http://en.wikipedia.org/wiki/Black_hole
मी हेच मराठीत लिहिले आहे ना?
15 Feb 2012 - 3:16 pm | विजुभाऊ
सूर्य हा कृष्ण विवर होणार आहे हा सर्वस्वी नवा शोध आहे. तो रेड जायंट होईल असे वाचून होतो.
नवा शोध लावल्याबद्दल जामोप्या यांचे अभिनन्दन
15 Feb 2012 - 3:45 pm | sagarpdy
सध्याच्या वैज्ञानिंक माहितीनुसार सूर्य कृष्णविवर होणार नाही.
एखादा तारा कृष्णविवर होण्यासाठी त्याची त्रिज्या त्याच्या श्वारझचाईल्ड त्रिज्येपेक्षा कमी असावी लागते. (जे सूर्याच्या बाबत सत्य नाही)
त्यामुळे सूर्य प्रथम रक्तवर्णी महाराक्षस तारा होऊन नंतर planetary nebula होऊन मग अखेरीस श्वेतबटू ताऱ्यात रुपांतरीत होईल.
गोष्ट संपली, झोपा आता.
15 Feb 2012 - 4:18 pm | JAGOMOHANPYARE
असे का? बरे बरे..... त्याचा बटू होईल नाहीतर विवर होईल.. आपण नसणार ते बघायला किंवा हे दोन्ही सोडून तेंव्हाच्या संशोधनाने आणखी काय तरी होईल..
पण काहेही झाले तरी पहिले २-३ ग्रह सूर्य खाणार हे नक्की...
बरे झाले तुम्ही सांगितलेत.. मला कळत नव्हते.. नेमके कोणते वाक्य चुकीचे लिहिले?
15 Feb 2012 - 4:16 pm | sagarpdy
ता.क.
देवाच्या मनात आलं तर मात्र सूर्य कृष्णविवर होऊ शकतो
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना.
15 Feb 2012 - 11:51 am | अप्रतिम
बरे झाले ....शाळामास्तर झाला नाहीत...पोरांना काय काय शिकवलं असतं देव जाणे...
15 Feb 2012 - 2:15 pm | पक पक पक
हे ही दिवस जातील.
.
हि देखील एक इश्वरैच्छाच. ;) म्हण्तात ना ते काय ते 'देवाची कर्णी अन् नारळात पाणी'.....:bigsmile:
15 Feb 2012 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
जबर्याच !!
बाकी ही ईश्वरद्वेष्टी अदिती* इथे काय करते आहे ?
*अदिती म्हणजे देवांची माता म्हणे. आता बोला.
15 Feb 2012 - 1:42 pm | गणपा
काय कप्पाळ बोलायच?
बा पर्या तिनं तिच स्वतःच नाव निवडल नाहिये.
असेल तिच्या पालकांची श्रद्धा देवावर. :)
तुमच्या सारख्या झंटलमन लोकांना इतकबी समजु ने?
15 Feb 2012 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
नावाचा अर्थ कळल्यावरती तरी तिने नाव बदलून घ्यायला काय हरकत होती ?
तसेही हलकट, पाशवी, विक्षिप्त, दुर्बिटणीबै, माजोरी, गॉसिप डबल्स पार्टनर.. इ. इ. नावे तिला मिळालेली आहेतच. त्यातलेच एखादे ठेवायचे. ;)
असो....
तुर्तास इथेच थांबतो. नाहितर मला फ्रेंडलिस्ट मधून डिलीट करायची.
बाकी ह्या निळ्याचे खाते अजून चालू आहे, हा देखील एक ईश्वरी चमत्कारच आहे.
15 Feb 2012 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नावंच नव्हे, ही वर्णनं मला फिट्ट लागू आहेत. 'सिंड्रेलाची सावत्र बहिण' हे ही विसरू नकोस.
नाही रे नाही. माझ्याबद्दल खरं बोलणार्या लोकांशी मी मय तर्री करते.
असो. Sagarpdy कृष्णविवरांसंदर्भात तुम्ही दिलेली माहितीही अयोग्य आहे. एकूणच सूर्य या संदर्भात लेखमाला लिहीते आहे त्यात या गोष्टींची माहिती पुढे येईलच. त्यानंतर इतर तार्यांसंदर्भातही लिहीण्याचा विचार आहे. सूर्य या लेखमालिकेचा पहिला भाग इथे आहे. पुढच्या भागांच्या लिंका तिथेच मिळतील.
15 Feb 2012 - 9:59 pm | चेतनकुलकर्णी_85
हि सूर्य ,आकाशगंगा , तारे, ग्रह इत्यादी इत्यादी गोष्टीवर पूर्ण माहिती(चित्र व चलचित्रण सकट ) विकिपीडिया वर उपलब्ध असताना मराठीतून अनुवाद करून छापण्याचे प्रयोजन काय??
किंबहुना ज्या माणसाना अश्या गोषित रस असतो त्यांना अश्या गोष्टी विग्रजीतूनच जाणून घेणे सोपे पडते... :)
15 Feb 2012 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. मी अनुवादक नाही. (वाचकांचं नशीब!)
२. अनुवादित कथासंग्रहाला भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार देते. या वर्षी तो कविता महाजन यांना मिळाला. (दुवा) अनुवाद हे येरागबाळ्याचं काम नाही.
३. अ. ज्यांना इंग्लिश समजत नाही पण मराठी समजतं त्यांच्यासाठी माहिती मराठीतून असण्याला तुमचा विरोध असेल तर एकेकाळचे, संस्कृत सामान्यांपर्यंत पोहोचू न देणारे ब्राह्मण आणि तुम्ही यांच्यात मला फरक दिसत नाही.
आ. सर्वांनाच इंग्लिश येतं, समजतं असं तुम्हाला वाटत असेल तर "केल्याने देशाटन..." वगैरे एकदा डोळे आणि मेंदू उघडे ठेवून आचरणात आणून पहा.
इंग्लिशमधे वाचलेल्या गोष्टी सगळ्यांना समजतातच असं नाही. पुरावा याच धाग्यावर आहे, हा पहा.
४. माहिती उपलब्ध असूनही, संगणक उपलब्ध असणार्या अनेकांपर्यंत ती पोहोचलेली नाही याचाही पुरावा याच धाग्यावर आहे, हा पहा. अगदी विकीपीडीयाची लिंक देऊनही माहिती योग्य पद्धतीने वाचणार्यापर्यंत पोहोचलेली नाही हे इथे मला दिसत आहे.
५. लेखकाला प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेण्याची सोय विकीपीडीयावर नाही. यामधे लेखक आणि वाचक दोन्ही घटकांचा फायदाच होतो. सध्याची मराठीतली, अपवाद वगळता, चांगली लेखकमंडळी अशा प्रकारच्या इंटरॅक्टीव्ह (मराठी?) संस्थळांवर फारशी दिसत नाहीत, या माध्यमाचा पुरेसा फायदा करून घेत नाहीत अशा प्रकारची ओरड तुमच्या कानावर आली नसल्यास हे वाचा. तेव्हा मराठीतून, इंटरॅक्टीव्ह माध्यमाचं महत्त्व मी वेगळं सांगत नाही.
६. वाचनाची सक्ती नाही. पोरं हाकण्याची माझी इच्छा नाही.
अवांतरः मुद्दामच (कारण इथला शेवटचा परिच्छेद) तुमची इतर वाटचाल पाहिली. मिपावर तुम्हांस उज्ज्वल भविष्य आहे. तेव्हा चालू द्या.
15 Feb 2012 - 10:42 pm | चेतनकुलकर्णी_85
तुम्हाला अनेक शुभेच्छा ....अशीच चांगली कामे करत राहा...:)
15 Feb 2012 - 10:46 pm | sagarpdy
१.योग्य सन्दर्भ द्या
२. नाव अगदि योग्य आहे आपले.
15 Feb 2012 - 11:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी या पुस्तकातून शिकले आहे. पण Stellar physics च्या कोणत्याही चांगल्या पुस्तकात हे मिळेल.
मोहन आपटे यांच्या 'सहस्त्ररश्मी' या पुस्तकातही बहुदा याबद्दल माहिती होती. कदाचित "कृष्णविवर अद्भुत खगोलीय चमत्कार" यातही याबद्दल रंजक शब्दांत माहिती असेल. मी हे पुस्तक वाचलेलं नाही, पण आपटे सरांच्या लेखनाबद्दल तेवढी खात्री निश्चित देता येईल. त्यांच्या पुस्तकांची यादी इथे मिळाली.
अवांतरः दुवा योग्य पद्धतीने दिल्यासही भलतीकडे घेऊन जात आहे. मागच्या बाजूने दुरूस्ती आवश्यक आहे.
15 Feb 2012 - 11:19 pm | sagarpdy
"कृष्णविवर अद्भुत खगोलीय चमत्कार" वाचल होत पण ५-६ वर्ष झाली त्याला, नीटसे आठवत नाहीये.
असे करा , योग्य ती माहिती तुम्हिच द्या.
(तुमचे लेख वाचतोच आहे.)
16 Feb 2012 - 12:09 am | Nile
तुमच्या सारख्या हलकट लोकांच्या मानगुटीवर बसण्याकरता भुताखेतांनापण ईश्वरानंच निर्माण केलंय हे विसरू नका!
15 Feb 2012 - 3:57 pm | गवि
खिक्क करुन हसताना कॉफीतले ट्यानिन सांडले कीबोर्डावर.. :)
14 Feb 2012 - 8:08 pm | JAGOMOHANPYARE
विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना? हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ?
दुर्बिण लावा आणि बघा.. विज्ञान कुठे अडवते तुम्हाल?
14 Feb 2012 - 8:11 pm | गणपा
हे विज्ञानवादी बरेच माजले आहेत लेकाचे.
मुद्दे नसले की लागले लगेच झाडावर चढायला नी पॉपकॉर्न खायला.
-देवभोळा(भिता) गण्या.
14 Feb 2012 - 8:25 pm | आदिजोशी
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००
14 Feb 2012 - 8:47 pm | Nile
मी तर म्हणतो हे गल्लेलठ्ठ विज्ञानवादी झाडांवर बसुनही फांद्या तुटत नाहीत म्हणजे देव आहेच. प्रश्नच मिटला!!
14 Feb 2012 - 9:15 pm | हंस
+१
14 Feb 2012 - 8:31 pm | तिमा
'विज्ञानावरील अंधश्रद्धा' हा नवीन वाक-प्रचार आवडला. या अंधश्रद्धेमुळेच आम्ही विज्ञानशाखेला गेलो आणि दु:खी झालो. त्यापेक्षा देवावर श्रद्धा ठेवली असती तर आज किती सुखात असतो. पण आता परतीचे दोर कापलेले आहेत.
कदाचित, २१ डिसेंबरला जर आपल्या सूर्यमालेला कृष्णविवराने गिळले तर आपल्याला सगळ्यांनाच एकदमच 'देवदर्शन' होईल.
15 Feb 2012 - 4:21 pm | इरसाल
तिमासाहेब,
म्हणुनच काल झायरात चाल्ली होती कोणत्याश्या बातमीवाहिनीवर, माउन्ट अबूवाले २१ डिसे. चा हवाला देवून लोकान्ना देवाकडे चला देवाकडे चला म्हणून मागे लागले होते.
14 Feb 2012 - 8:43 pm | चौकटराजा
खरे तर अधुनिक वस्तूनिष्ठ विचारांचे असले म्हण्जे " मागासलेला आहे . याला इंद्रियापलिकड्च्या जगाचे ना भान ना ज्ञान. अरे अनुभूति घ्या...
मोठ्या मोठता संतानी... मुनीनी.... तापसांची ..घेतली होती.तुम्ही काय प्रमेयांचे किडे खाणारे फालतू कीट्क " असे म्हणण्याचीच एक नवी फॅशन
आली आहे. देव व विज्ञानाचे अकारण भांडण लावा, विज्ञान आध्यात्माचे अकारण तांडव मांडा, श्रद्धा व अंधश्रेद्धेची कुस्ती खेळवा हे न नि़काल
लागणीरे वाद आहेत. ज्याला देव आहे असे मानायचे त्याने मानावे. तो मानतो म्हणून काय् देव त्याला वेगळे माप देत नाही. व नास्तिक माणसाचा श्वास काही जन्मत:च संपत नाही. भ्रमात रहाण्याचीही एक मजा असते. ( अज्ञानात आनंद ) व सत्याचा साक्षात्कार होण्याचाही एक
आनंद असतो. ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार दोन्ही आनंद उपभोगावेत .... कसे ??
14 Feb 2012 - 9:27 pm | वपाडाव
मस्त प्रतिसाद....
15 Feb 2012 - 11:47 am | सस्नेह
गो॑धळ कसला..तुम्हाला जे म्हणायच्॑य तेच आम्हाला. कुणी कुणाला क्षुद्र लेखू नये हा मुद्दा.
14 Feb 2012 - 8:50 pm | Nile
विश्वाचं सोडा. रोज सकाळी उठल्यावर आम्हाला बरोबर प्रेशर येतं आणि मग सगळं व्यवस्थित झाल्यावर दिवस कसा सुखरूप जातो!! हा ईश्वराच्या अस्तित्त्वाचा पुरावा नाहीतर काय?
14 Feb 2012 - 9:30 pm | पक पक पक
रोज सकाळी उठल्यावर आम्हाला बरोबर प्रेशर येतं
हि तर गतरात्रीच्या (गतजन्मीच्या चालीत)कर्माची फळ ;) ,अन कर्माची फळ भोगली (टाकली) कि मोक्शप्राप्ती मिळ्तेच की.
थोड्क्यात अर्थ असा की इश्वर सर्वत्र आहे... :bigsmile:
14 Feb 2012 - 9:53 pm | दादा कोंडके
आरं तिज्या मारी आन आमी हिकडं मिश्री लावून लावून थकतो. आम्चा म्हसोबा कुटं गेला म्हनायचा? :)
14 Feb 2012 - 9:59 pm | पक पक पक
'प्रयत्नांती परमेश्वर' :bigsmile:
"प्रयत्न करा फळाची आपेक्शा ठेउ नका..." अस कोणतरी देवच बोलला होता म्हणे.. ;)
15 Feb 2012 - 1:48 am | Nile
मिश्री ऐवजी थोडी देशी लावून पहा, म्हसोबालापण आवडते.
15 Feb 2012 - 11:48 am | सस्नेह
कस॑ बोललात..! एकदम करेक्ट.
14 Feb 2012 - 9:19 pm | मराठे
10 Start Thread on God vs Science
20 GOD GOD GOD
30 SCIENCE SCIENCE SCIENCE
40 Pause for 3 months
50 GOTO 10
14 Feb 2012 - 10:34 pm | sagarpdy
आयला! बेसिक ??!!
14 Feb 2012 - 11:14 pm | मराठे
अगदी.. GW BASIC कारण मूळ प्रश्नही तसाच पुरातन आहे.
15 Feb 2012 - 1:19 am | आनंदी गोपाळ
Beginer's Advanced Symbolic Instruction Code.
बिल गेट्स ला याचं सोर्स कोड मशिन लँग्वेजमधे पाठ होतं म्हणे?? परमेश्वरी अस्तित्वाचा साक्षात पुरावाच तो!
15 Feb 2012 - 1:55 pm | रमताराम
GW BASIC कारण मूळ प्रश्नही तसाच पुरातन आहे.
GW BASIC ला आमचे काही दोस्त 'गँग वॉर' बेसिक म्हणायचे. इथे कित्ती समर्पक वाट्टं नै?
14 Feb 2012 - 10:37 pm | sagarpdy
आयला , बेसिक ??!!!
14 Feb 2012 - 9:24 pm | विजुभाऊ
१) समांतर असणारे रेल्वेचे दोन रुळ एकमेकाना कधी क्रॉस करीत नाहीत हा ईश्वराच्या आस्तित्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा का?
२) विलासराव देशमुख यानी काहिही केले तरी ते हायकमांडच्या मर्जीत रहातात हा ईश्वराच्या आस्तित्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा का?
14 Feb 2012 - 9:58 pm | राजघराणं
तै तुमच्या लेखात २ मुद्दे आहेत :
१)पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो = वेदांवर विश्वास का नाही ?
२)विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१) वेद चार. त्यात प्रामुख्याने देवांची आर्जव आणी विनंत्या आहेत.
लिंक : http://www.sacred-texts.com/hin/
त्यातल्य रुग्वेदातले पहिले पान म्हणते :
1 I Laud Agni, the chosen Priest, God, minister of sacrifice,
The hotar, lavishest of wealth.
2 Worthy is Agni to be praised by living as by ancient seers.
He shall bring hitherward the Gods.
3 Through Agni man obtaineth wealth, yea, plenty waxing day by day,
Most rich in heroes, glorious.
4 Agni, the perfect sacrifice which thou encompassest about
Verily goeth to the Gods.
5 May Agni, sapient-minded Priest, truthful, most gloriously great,
The God, come hither with the Gods.
दैवत स्तुतीशिवाय त्यात काहीही नाही.
त्यातली सारीच पाने चाळून पहा. वेगवेगळ्या देवतांची आर्जवे आणी देवांकडे केलेल्या मागण्या असे त्यांचे स्वरूप आहे. वेदात तत्वज्ञान नाही. प्रक्रुतीची मूलभूत तत्वे कोणती ? ती सत्व, रज, तम आहेत का? याची चर्चा वेदात नाही. वेदांत तत्वज्ञान चा संधीविग्रह वेद + अंत तत्वज्ञान असा होतो. प्रकृतीची मूलभूत तत्वे कोणती ? वगैरे प्रश्नांचे चिंतन उपनिशिदात येते.
उपनिशिदातले हे सर्व चिंतन मौलिक आहे हे खरेच पण त्याचा बराच भाग जडवादाने आणी निरीश्वरवादानेही व्यापला आहे.
सबब शास्त्रद्न्यांवर श्रद्धा ठेवतो वेदातल्या तत्वज्ञानावर नाही असे तुमचे म्हणणे चूक आहे.
अवांतर : बहुतेक माणसे धार्मीक असतात कारण त्यांनी धर्मग्रंथ वाचलेले नसतात - कुरुंदकर
२) विश्व सुरळीत चालले आहे ही तुमची अंधश्रधा आहे. ग्रह तारे एकमेकांवर आदळत नाहीत ? कुणी सांगितले तुम्हाला ?
अधिक माहितीसाठी -
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7...
15 Feb 2012 - 1:45 am | आनंदी गोपाळ
डुप्लिकेट. प्रकाटाआ
15 Feb 2012 - 1:59 am | आनंदी गोपाळ
अनादि काला पासून मानवाला पडत असलेले प्रश्न पुन्हा पडणे स्वाभाविक आहे.
असेल बुवा. पुढारलेपणाच्या लक्षणांत आपण कसली गणती करता नक्की?
श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धेची तुमची व्याख्या काय? हे समजले तर बरे होईल
नस्तित्व हा नवा शब्द आज कळला. हा अनुभव कसा घेतात? कुठे? प्रत्येक वेळी समान अनुभव येतो काय? हा अनुभव घेण्यासाठी कोणती उपकरणे लागतात? असा अनुभव घेणार्या कुणाही दोन महनीय व्यक्तींची मते जुळत का नाहीत? (उदा. मा. मोहम्मद पैगंबर, मा. येशू ख्रिस्त, मा. मोझेस. या तिघांनी ईश्वराचा 'अनुभव' घेतला, ते प्रेषित होते, साक्षात त्याचेच पुत्र वै होते इ. म्हणतात. मग या तिघांनी सांगितलेला इश्वर वेग-वेगळा का?)
अशा प्रकारे जाहीर केलेले गॉड, सैतान, माणूस आदि पार्टिकल्स त्याच प्रकारच्या यंत्राद्वारे कुणालाही, कुठेही, हवे तेव्हा, हवे तितके वेळा निर्माण करून पहाता येतात. येत नसतील तर त्या पार्टिकलचे अस्तित्व सांगणार्यास कान धरून 'चुकलो' म्हणण्यास भाग पाडता येते. असे झाले, तर कुणाच्याच 'वैज्ञानिक श्रद्धा' 'दुखावत' नाहीत. अनुयायी/भक्तगण्/दल/ब्रिगेड/जिहादी/पग्रोमिस्ट्/क्रुसेडर्स इ.इ. चाल करून अंगावर येत नाहीत.
(सत्व, रज, तम इ. "गुण" कुणी बाटलीत भरून अथवा तत्समप्रकारे सिद्ध करील काय? विज्ञान विश्वास मागत नाही. पुरावा मागते. सूर्य्/जयद्रथ. बाप्/श्राद्ध. अशा जोड्या इथे लागतात. श्रद्धा नाही, श्राद्ध मागितले जाते, अथवा पिताश्रींस सामोरे घेऊन यावे लागते.)
जबरदस्ती नाही. कोणताही वैज्ञानिक तुम्हाला मारायला येणार नाही, वा वाळीतही टाकणार नाही. हवे तसे मानू शकता.
हा तुमच्याकडे कुणीच मागितला नाही. जबरदस्ती नाही. ऐश करा.
मुळीच नाकारू नका. आनंदी रहा.
दोन पेग टाकले, किंवा ४ आण्याची भांग खाल्ली, की इंद्रियांपलिकडले अनेकानेक अनुभव येत रहातात.
नाही.
असला विश्वास तुम्ही ठेवत असाल.
कोणताही वैज्ञानिक वा विज्ञानप्रामाण्य मानणारा मनुष्य असा 'विश्वास' ठेवत नाही. तो ते गृहितक मान्य करतो. हवे तेव्हा त्याचे 'प्रूफ' मागण्याचा अधिकार त्याला असतो, व ते प्रूफ मिळेल याची खात्री.
ही बुद्धीभेद करवून घेणार्यांची परिभाषा झाली.
आम्ही याला विज्ञाननिष्ठा म्हणतो.
15 Feb 2012 - 6:51 am | चौकटराजा
@ मराठे , या निमित्ताने मला तुम्ही १९८७ च्या काळात नेलेत.मी जी डब्लू बेसिकवर गणपतीची आरास करण्याचा प्रोग्राम केला होता. रनिंग लाईट सकट. साहेब कटला की हा उद्योग चालायचा. लूप पुन्हा दहाला नेला यात सगळे आले. काही निर्रथक गोष्टीपैकी अशी चर्चा आहे तरीही ती पुन्हा पुन्हा होणारच आहे हे सूचित करण्याचा " बेसिक "स्मार्ट प्रयत्न !
15 Feb 2012 - 1:34 pm | चौकटराजा
@ लीना बाई ,वा वा , आपले एकमतच आहे की ! मला नस्तिक असूनही गणपतीची षोडशोपचार पूजा सांगता येते. फक्त सव्वा रुपया ( नाही नाही दीड रू, कारण ४ आणे आता मिळतच नाहीत ) दक्षणा. मग येत्या गणेश चतुर्थीला गुरूजींचा प्रॉब्लेम सुटला !
15 Feb 2012 - 2:01 pm | रमताराम
आम्हाला एजंट नेमा. सव्वा रुपयाच्या (काळजी नको चार पूजांचे मिळून पाच रुपये होतील, चार आणे सुटे द्यायचा प्रश्न मिटला) हजारो पूजांची कंत्राटे देतो तुम्हाला. आमची 'पूजा कन्सल्टन्सी' फक्त १२५ रु. मधे साग्रसंगीत पूजेचे प्याकेज विकेल. सव्वा रुपया तुमचा उरलेला आमचा सर्विस चार्ज. झकास बिजनेस चालेल बघा.
15 Feb 2012 - 2:58 pm | सुहास..
आमची 'पूजा कन्सल्टन्सी' फक्त १२५ रु. मधे साग्रसंगीत पूजेचे प्याकेज विकेल. सव्वा रुपया तुमचा उरलेला आमचा सर्विस चार्ज. झकास बिजनेस चालेल बघा.
मिरर वर्तमान पत्रातल्या काही जाहीराती आठवल्या ... ;)
बाकी देवाचा पण बिजनेस केलात ना !! देवबाप्पा लागवेल अचे केले तल ;)
15 Feb 2012 - 3:20 pm | कवितानागेश
मजा नाय आली! :(
कुठलीच वाक्ये पुरेशी गमतीदार नाहीत! ;)
15 Feb 2012 - 9:07 pm | रेवती
ही ही ही ही ही.
15 Feb 2012 - 4:39 pm | चौकटराजा
रमतारामजी , आम्हा गुरुजींच्या कौम मधे निम्मे एजंटच असतात. पण लोकाना फायदा व्हावा म्हणून एजंट क्षमस्व ब्वा !
16 Feb 2012 - 4:43 pm | रमताराम
गुरुजींच्या 'कौम' मधे???? तरी सांगत होतो मटा वाचत जाऊ नका म्हणून.
आणि एजंट कुणाला म्हणताय आं? कन्सल्टंट म्हणा, म्यानेजर म्हणा, सर्विस प्रोवायडर म्हणा. काय हे, अगदीच डाउनमार्केट हो तुम्ही.
17 Feb 2012 - 2:13 pm | मूकवाचक
http://www.hinduism.co.za/god.htm
(अवान्तरः डीएनए चाचणीचा आग्रह न धरता आपल्या जन्मदाखल्यावरील सगळा तपशील बरोबर आहे असे मान्य करतो तो सश्रद्ध. असो.)