भरत नाट्यम

राजघराणं's picture
राजघराणं in काथ्याकूट
8 Feb 2012 - 6:42 pm
गाभा: 

भरत नाट्यम चे कुणी जाणकार आहेत काय इथं?

१) सुत्रल अधवु विषयीची माहिती -
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Adavus
http://onlinebharatanatyam.com/2009/05/sutral-adavu-in-bharatanatyam/

सुत्रल अधवु मधे Alapadमa , Katakamukha , Pataka , Shikhara या मुद्रा येतात असे विकी म्हणतो.
या मुद्रांतून विविध भाव व्यक्त होउ शकतात.

विशिष्ट अधवु मधे येणार्या हस्तमुद्रांचा क्रम आणी अर्थ ठरलेला असतो काय ?

प्रतिक्रिया

भरतनाट्यम हा एक व्यायाम प्रकार असावा असे ज्ञान आम्हाला एका मिपाकराच्या खवमधून नुकतेच झाले आहे.

याचा काही उपयोग होतो का बघा तुमच्या प्रश्नांसाठी:

http://www.themgmgroup.com/Sangeet%20Academy%20(MAHAGAMI).html

http://www.mahagami.org/

आमच्या गावात कधीकधी बोर्ड लागलेले दिसायचे. तुम्हाला जे हवंय ते हे नसेल तर आधीच स्वारी सांगून ठेवतो !

राजघराणं's picture

8 Feb 2012 - 7:22 pm | राजघराणं

दादा ते कथ्थक आणी ओडीसी विशयी हाय.. भरत नाट्यम नाय

राजघराणं'जी

तुम्ही दिलेल्या लिन्क्स आणि वीडीओ'ज खूप छान आणि माहितीपूर्ण आहेत. भरतनात्यमविषयी बेसिक माहिती नक्कीच त्यातून मिळते.
"भरतनाट्यम" हा एक सर्वांगसुन्दर व्यायाम देखील आहे.
पताका, त्रिपताका, अर्धपताका, सूचि, अर्धसूचि, मृग, पुष्प, मत्स्य, गोमुख, पद्म इ.हस्तमुद्रा, भरतनाट्यममध्ये असतात... कौतुकम्, जयतिस्वरम, नटराजस्तुती इ अर्चनप्रकारातून भरनाट्यमच्या इतरही विविध मुद्रा, ताल उलगडत जातात.
भरतनाट्यममधून व्यायाम कसा होतो, याची थोडक्यात माहिती देणारा हा माझा एक लेख :-
लिन्क :-
http://www.saamana.com/2011/May/21/Link/FULORA1.HTM

आपल्याकडे कुणाला शास्त्रशुद्ध भरतनाट्यम शिकायचे असल्यास जरुर क्लास लावावा. पूर्णपणे शिकण्यासाठी साधारण ५-६ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामध्येच "परीक्षा"ही इन्क्लुड असतात. त्यानन्तर "अरन्गेत्रम" झाल्यानन्तर "गुरुदक्षिणा" दिल्यानन्तर भरतनाट्यम पूर्ण होते. :)

राजघराणं's picture

8 Feb 2012 - 8:17 pm | राजघराणं

पण मुद्दा वेगळा आहे.

कराटे च्या काथा प्रमाणे किंवा, रागा मधील स्वरांप्रमाणे ....... विशिष्ट अधवु मधे येणार्या हस्तमुद्रांचा क्रम आणी अर्थ ठरलेला असतो काय ?

चित्रा's picture

9 Feb 2012 - 6:00 am | चित्रा

अशा प्रकारचे प्रश्न विचारताना अशी थोडी अपेक्षा असते की हे प्रश्न प्रश्नकर्त्याला का पडले याबद्दल काही विवेचन व्हावे. माहिती करून घेण्यासाठी प्रश्न जरी विचारले तरी ते अकस्मात उद्भवलेले नसावे. सूत्रल अडव हे बर्‍यापैकी नृत्य जमायला लागल्यावर शिकवले जाते. मधूनच सूत्रल अडवचा काय प्रश्न पडला असा मलाच प्रश्न पडला. असो.

भरतनाट्यममधील हस्तमुद्रांचा अर्थ साधारण ठरलेला असतो, पण क्रम का ठरलेला असावा याबद्दल कल्पना नाही. जसे आपण नमस्कार करताना दोन्ही हात समोरून जोडतो तसेच नृत्यामध्ये काही क्रियांचे क्रम ठरलेले असावे. भरतनाट्यम लयबद्द. तालबद्ध आणि परंपरेचे पालन करणारा नृत्यप्रकार असल्याने क्रम ठरलेले असले तरी आश्चर्य वाटायला नको. मुद्रांना अर्थ आहेतच. जसे पताक मुद्रेचा वापर अनेकदा आशीर्वादासाठी (किंवा तथास्तु म्हणणार्‍या) देवतांचे चित्रण करण्यासाठी केला जातो. अलपद्म हे अनेकदा कमळाचे फूल उमलल्याप्रमाणे असलेली मुद्रा आहे. बाकी तुम्हाला हे संकेतस्थळ माहिती आहेच.

http://onlinebharatanatyam.com/2007/09/alapadma-hand-gesture-mudra/

नगरीनिरंजन's picture

9 Feb 2012 - 9:35 am | नगरीनिरंजन

भरतनाट्यममध्ये नृत्य आणि नृत्त असे दोन प्रकार असतात.
नृत्यामध्ये अभिनय आणि भावमुद्रांचा समावेश असतो. त्यात या हस्तमुद्रांचा वापर करून वस्तू आणि भावभावना दाखवल्या जातात.
नृत्त म्हणजे शुद्ध नाच असतो आणि तालावर त्या त्या आडवुमध्ये ठरलेला पदन्यास केला जातो.
माझ्या माहितीप्रमाणे आडवुमध्ये पदन्यास ठरलेला असला तरी नृत्यातल्या हस्तमुद्रा आणि नृत्तामध्ये येणारे आडवु यांचा क्रम ठरलेला नसतो. त्यांचा वापर कसा करायचा हा नर्तकीच्या/नर्तकाच्या कौशल्याचा भाग असतो.

चित्रा's picture

10 Feb 2012 - 4:16 am | चित्रा

>आडवुमध्ये पदन्यास ठरलेला असला तरी नृत्यातल्या हस्तमुद्रा आणि नृत्तामध्ये येणारे आडवु यांचा >क्रम ठरलेला नसतो. त्यांचा वापर कसा करायचा हा नर्तकीच्या/नर्तकाच्या कौशल्याचा भाग असतो.

बरोबर. नृत्यातील हस्तमुद्रा आणि अडवुंचा क्रम ठरलेला असतो असे म्हणायचे नाही. पण एका प्रकारातील हस्तमुद्रा आणि त्यावेळी होणारा पदन्यास हा ठरलेला असतो. उदा. नाट्टडवचे प्रकार काही ठरलेले प्रकार आहेत. नाट्टडव प्रकार एक, दोन असे आठ प्रकार मला माहिती आहेत. (मला करता येत नाहीत, मात्र करणार्‍याला ते बरोबर करत आहेत का नाही हे सांगता मात्र येते. :) त्यात ठराविक पद्धतीने हालचाली होतात. ता हत झुम तरी ता, तत हत झुम तरी तै, .. इ. बोलही ठरलेले आहेत.

कधीकधी मला भरतनाट्यम अतिशय गणिती नृत्यप्रकार वाटतो. सिमेट्री वगैरे अतिशय महत्त्वाची. असो.

आम्हांस यातलं काही म्हणता काही कळत नसलं तरी अशा प्रकारची
नृत्यं आआमच्या अर्चना जोगळेकरसारख्या गोड मुली करतात
तेव्हा खूप आवडतात. बाकी काहीही मुद्रा करेनात का.. आपण पहात रहावं.

एका कोणत्याश्या प्रकारात चेहरा जणू शाडूने लेपल्यागत चिकट्ट थर दिलेला
असतो..

या थराच्या आणि अंगावर चढवलेल्या ढालसदृश कवचाच्या आत आमची गोड अ.जो. आहे की कोणी पंडित अमुक महाराज आहेत हे कळणं बाहेरुन कठीण होतं.

यामुळे "नर्तक- नर्तकी" हा भेद नष्टहोतो आणि तस्मात त्यातील
आमचा रस ही.

प्यारे१'s picture

9 Feb 2012 - 10:19 am | प्यारे१

काका हे कुचिपुडी आहे हो... (शब्द नीट वाचा बरं ;) )

५० फक्त's picture

9 Feb 2012 - 10:37 am | ५० फक्त

अहो, काकांचे पुतणे, ते यक्षगान आहे.

बाकी अर्चना जोगळेकर बाबत गविंशी सहमत, निवडुंग पाहिल्यावर बरेच दिवस माझ्या मनात बायको ही अर्चना जोगळेकर सारखीच असावी असा पक्क ग्रह होता, पण ..... असो.

अर्चना जोगळेकरांच्या एका नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला हल्लीच, तुम्ही पाहिला का ओ गवि. ?

बाकी अर्चना जोगळेकर बाबत गविंशी सहमत, निवडुंग पाहिल्यावर बरेच दिवस माझ्या मनात बायको ही अर्चना जोगळेकर सारखीच असावी असा पक्क ग्रह होता, पण ..... असो.

आता हे सर्व बोलायला फार फार उशीर झाला आहे. तेव्हा मूग गिळण्यात आले आहेत.

अर्चना जोगळेकरांच्या एका नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला हल्लीच, तुम्ही पाहिला का ओ गवि. ?

ती दहा वर्षं अमेरिकेत की कुठेशी राहून अधिकच सुंदर होऊन आलेली दिसते. पहायलाच हवा सिनेमा आता तिचा.

पान पसंदवाली "शादी और तुमसे.. कभ्भी नही" वाली अदा आठवते का?

दोन तरुण तुर्कांचे भावविमोचक संवाद वाचून हृदय भरुन आले. ड्वाले पाणावता पाणावता राहिले.

कुचिपुडी की यक्षगान की कुचिपुडीमध्ये यक्षगान कोणी सांगू शकेल काय??
२२५ किलोचा पोशाख घालून ३.२५ मीटरचा घेर असलेला पायघोळ नी १.५ मीटरचा पिसारा कुचिपुडीमध्ये असतो असे ऐकिवात आहे...!

शुद्धीपत्रकः (नुकत्याच हाती आलेल्या 'विमे'पीडियानुसार) वरील नृत्य कुचिपुडी नसून कथकली हे आहे.
तरी प्रत्येक 'कुचिपुडी' शब्दाऐवजी 'कथकली' वाचावे. ( हे कसेही वाचावे ;) )

५० फक्त's picture

9 Feb 2012 - 12:19 pm | ५० फक्त

ती दहा वर्षं अमेरिकेत की कुठेशी राहून अधिकच सुंदर होऊन आलेली दिसते. -

अच्छा म्हणजे हल्ली मुलिंना सुंदर बनवायचं काम भवानी मातेनं अमेरिकेत ऑफ शोअर केलंय वाटतं. (संदर्भ - हरितात्या - पुलदे)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Feb 2012 - 11:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

काका, पुतणे आणि इतर,
ते कथकली आहे. केरळातला नृत्यप्रकार आहे. करायला अतिशय अवघड समाजला जातो. याचा संपूर्ण मेकप हा नैसर्गिक वस्तूंपासून बनला असतो. यात चेहऱ्याच्या हावभावांना खूप महत्त्व आहे. (बस, इतकेच माहित आहे तूर्तास)

यक्षगान हा कर्नाटकातला प्रकार आहे. वेशभूषा आणि रंगभूषा सारखी दिसत असली तरी जातकुळीत बेसिक फरक बराच आहे म्हणे.

मृगनयनी's picture

10 Feb 2012 - 3:56 pm | मृगनयनी

ह्म्म... "तो" नृत्यप्रकार "कथकली" हा आहे. केरळमध्येच त्याचा उगम झाला. इतर शास्त्रीय नृत्यप्रकारात म्हणजे- भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथक, कुचिपुडी, ओडिसी, मणिपुरी यामध्ये आणि कथकली या नृत्यप्रकारात एक महत्वाचा फरक असा आहे, की "कथकली" हा नृत्यप्रकार फक्त आणि फक्त पुरिषांनीच करायचा असतो. यामधील स्त्रीपात्रे देखील पुरुषच रन्गवतात. तसेच "कथकली" हा काहीसा उग्र नृत्यप्रकार आहे. श्रीलन्केत देखील हा नृत्यप्रकार लोकप्रिय आहे.

गवि's picture

10 Feb 2012 - 4:26 pm | गवि

"कथकली" हा नृत्यप्रकार फक्त आणि फक्त पुरिषांनीच करायचा असतो.

रस न वाटण्याचं रहस्य उलगडलं..

चिरोटा's picture

9 Feb 2012 - 1:46 pm | चिरोटा

च्यामारी. सगळच डो़क्यावरून. तुम्ही नाचा. आम्ही बघतो.