सुपरबॉल स्पेशल - ओनियन रिंग्ज

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
6 Feb 2012 - 5:40 am

यावर्षी सुपरबॉल इंडियानापोलिसच्या लुकस ऑइल स्टेडियममधे खेळला जातोय. त्यामूळे पार्टीचा उत्साह वेगळाच!
यावर्षी पार्टीसाठी - ओवन बेक्ड ओनियन रिंग्ज!

साहित्यः
१/२ कप लो फॅट दही
१/२ कप ब्रेड क्रंब्ज
१/२ कप कॉर्न मिल
२ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम)
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा तिखट
थोडे तेल
तेलाचा स्प्रे

कृती :
ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा.
कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात.

एका बोल मधे १/२ कप दही काट्याने फेटून घ्यावे. दुसर्‍या बोलमधे कॉर्नमिल, ब्रेडक्रंब्ज, तिखट, मीठ एकत्र करावे. यातील निम्मे मिश्रण बाजूला ठेवावे.
कांद्याची रिंग दह्यात बुडवावी. सगळ्या बाजूने दही लागले की काट्याने उचलून ब्रेडक्रंब्जच्या मिश्रणात टाकावी. बोल हलवून मिश्रण रिंगला लावून घ्यावे. दुसर्‍या कोरड्या काट्याने रिंग उचलून तयार ट्रेवर ठेवावी.


अशा सगळ्या रिंग्ज ट्रेवर लावाव्या.

साधारण एका कांद्यानंतर मिश्रणात गुठळ्या होतात. असे गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे आणि बाजूला ठेवलेले मिश्रण वापरायला घ्यावे. रिंग्जवर तेलाचा स्प्रे मारून ट्रे तापलेल्या ओवनमधे १५-१७ मिनिटे ठेवावा.
गरम गरम रिंग्ज बियर बरोबर सर्व कराव्या.

प्रतिक्रिया

छान पाकृ!
शेवटचा फटू आणि शेवटचे वाक्य मनाला गुदगुल्या करणारं.;)
आत्ता प्रतिसाद टाईप करताना टिव्हीवर बर्गर किंगची अनियन रिंगांचीच झायरात चालू आहे.

कितीतरी दिवसांपासून माझ्या मनात होतं की ही पाककृती घरी करावी आणि मिपावर टाकावी. तुम्ही टाकल्याबद्दल अभिनंदन.

येत्या विकांती वेळ मिळाल्यास ह्या पाककृतीचे भारतीय चवीचे व्हर्जन टाकण्यात येईल.

- पिंगू

कपिलमुनी's picture

6 Feb 2012 - 7:55 am | कपिलमुनी

शेवटची ओळ आवडली ..

पण "गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे " हे कय आमच्या काटकसरी मनाला पटले नाही

सुहास झेले's picture

6 Feb 2012 - 8:14 am | सुहास झेले

वाह वाह......अप्रतिम !!!

विसोबा खेचर's picture

6 Feb 2012 - 10:59 am | विसोबा खेचर

लय भारी.. :)

जाई.'s picture

6 Feb 2012 - 12:14 pm | जाई.

पाककृती आवडली

डीप फ्राय केलेल्या ओनियन रिंग पेक्षा हा पर्याय बरा वाटतो. :)

अश्याच प्रकारे कांदाभजी करायची पद्धत असेल तर कळवा रे कुणी तरी. ;)

>>अश्याच प्रकारे कांदाभजी करायची पद्धत असेल तर कळवा रे कुणी तरी

काय चेष्टा करता गणपाभौ !

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2012 - 8:11 pm | बिपिन कार्यकर्ते

चेष्टा नाय बे! त्ये गनपा काय पन करतंय! सोत्ताच करून दावंल त्यो येक दिवस!

तेच म्हणायचंय हो, गणपाभौने अशा रेशिप्या विचारणं म्हण्जे आनपूर्णेन भाजीला फोडणी कशी द्यायची विचारल्यासारखं आहे. ;)

काही म्हणा, चेपुवरचे फटु बघून वाटतंय की,
गणपा साडी नेसून (बनवाबनवीच्या सचिनसारखा शंतनु'चा' बायको 'सुधा' बनून) भाजीला फोडणी देताना भारीच वाटेल....!

सानिकास्वप्निल's picture

6 Feb 2012 - 7:14 pm | सानिकास्वप्निल

छान आहेत ओनियन रिंग्ज, अशा प्रकारे करुन बघते :)
बीयर बॅटरमधल्या ओनियन रिंग्ज पण छान लागतात ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2012 - 8:14 pm | बिपिन कार्यकर्ते

हा प्रकार फार पूर्वी एकदा खाल्ला होता. करून बघावा एकदा!

प्राजु's picture

6 Feb 2012 - 9:30 pm | प्राजु

खल्लास!

निवेदिता-ताई's picture

7 Feb 2012 - 1:14 pm | निवेदिता-ताई

मस्तच.

स्वाती२'s picture

7 Feb 2012 - 6:19 pm | स्वाती२

धन्यवाद!

कुंदन's picture

7 Feb 2012 - 6:24 pm | कुंदन

लै भारी पाकृ.
ओव्हन नसल्याने आगामी उन्हाळ्यात करुन बघावा लागेल. ;-)

पैसा's picture

7 Feb 2012 - 10:23 pm | पैसा

सांडगे का?

पैसा's picture

7 Feb 2012 - 10:24 pm | पैसा

पण भज्याना पर्याय वगैरे नव्हे. भजी म्हणजे भजी आणि रिंग्ज म्हणजे रिंग्ज!

परिकथेतील राजकुमार's picture

9 Feb 2012 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

गरम गरम रिंग्ज बियर बरोबर सर्व कराव्या.

बियरची पाककृती कुठे आहे ?

जागु's picture

9 Feb 2012 - 2:18 pm | जागु

वा मस्त.