चायनीज पदार्थ आवडणाऱ्या, भाज्या, भाकरी न खाणाऱ्या मुलांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी पौष्टिक पदार्थ करून पाहा. ......
साहित्य -
दोन वाट्या ज्वारीचे पीठ, कोबी, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची प्रत्येकी एक वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे, मोड आलेले मूग, मटार, भिजवलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, रिफाईंड तेल एक डाव, चवीपुरते मीठ, लसूण- आलं पेस्ट दोन चमचे.
कृती -
आपण भाकरीसाठी जसे पीठ मळतो तसे चवीपुरते मीठ घालून ज्वारीचे पीठ मळावे. सोऱ्याला थोडासा तेलाचा हात लावून त्यात शेवेची जाड ताटली घालून शेव चाळणीवर पाडावी व आपण उकडीचे मोदक वाफवतो त्याप्रमाणे शेव चमक येईपर्यंत वाफवावी. सर्व भाज्या बारीक उभ्या चिराव्यात. कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात नंतर आलं- लसूण पेस्ट घालावी. नंतर सर्व भाज्या घालाव्यात. सर्व भाज्या वाफल्यावर त्यात ज्वारीचे नूडल्स घालावेत. हलक्या हाताने नूडल्स, भाज्या परताव्यात. वरून थोडे चवीपुरते मीठ घालावे. गरम गरम नूडल्स सर्व्ह करावेत.
टिप - अशाप्रकारे आपण नाचणी, मका, तांदूळ, बाजरी या पिठांचेही नूडल्स करू शकतो.
प्रतिक्रिया
24 Jul 2008 - 6:10 pm | विसोबा खेचर
चांगला प्रकार दिसतो आहे! :)
24 Jul 2008 - 6:40 pm | वरदा
मॅगीचा मसाला घातला तर लहान मुलं पटापट खातील असं वाट्टं...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
24 Jul 2008 - 6:52 pm | प्राजु
वा...काय मस्त आहे आयडीया..
योगिताताई, एकदम आवडली गं रेसिपी.. आजच करते आणि तुला सांगते कशी झाली ते.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jul 2008 - 8:39 pm | चित्रा
मस्त दिसते आहे कृती!
चाखून बघायला पाहिजे.
24 Jul 2008 - 8:59 pm | चकली
योगिता ताई,
मस्त आहे पाककृती.. आयडीया आवडली..
चकली
http://chakali.blogspot.com
25 Jul 2008 - 3:10 pm | श्रीमंत दामोदर पंत
मस्त आहे पाककृती..
14 Aug 2008 - 7:06 pm | visshukaka
मस्त आहे हि कल्पना, करुन पाहिलि आहे का कोणि.