जोडींया स्वर्गमें ...

सुहास..'s picture
सुहास.. in काथ्याकूट
28 Jan 2012 - 3:24 pm
गाभा: 

हेतु : सहज टीपी
नेनेंबाईंनी मध्यंतरी झुल्यावर बसुन एक कमेंट केली होती, कल्पना करतो आहे की त्यावर मान्यवरांच्या कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या !! ;) अर्थात आमच्या चेपुकर मित्रांनी यातल्या काही वाचल्या असतीलच

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

दादा कोंडके : हिच्यामायला !! म्हण्जी देवाला बी ' जोड्या जुळवा ' अस प्रश्न असतो म्हणा की ! बाकी येव्हढ्या जोड्या जुळवताना पार घोडा लागत असेल, म्हणजे हिकडन तिकड फिरायसाठी .
************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

मक्या अनासपुरे : आस्स हाय कां ते ! पर ने ने म्हणत- म्हणता तुम्ही आण-आण, म्हणजे मला पिक्चर मदी आण कश्या काय म्हणायला लागला वं मॅडम..हे म्हणजे ' स्वर्गात जोड्या आनं पिक्चर मदि खोड्या ' असे झाले आहे.

*****************************************************************

माधुरी दिक्षीत :सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

राजशेखर : जोड्या कुट लावायच्या तिथ लावा, पण लावायची आस्सल तर सांजच्यांला वाड्यावर यायच ! नायतर ईज्जारीत पाय रहाणार नाय !!

**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

निळु फुले : मग आमी कुट म्हटल आमच्या घरात लागत्यात ते .

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

ओळखा पाहु : नंही नंही दया ! ये बहोत बडा रॅकेट लगता है, तुम एक काम करो, अभी के अभी मरके स्वर्गलोक में जावो, वहाँ छान-बिन करो ! और सारा रिपोर्ट डॉ. साळुंखे के पास भेजो .........(ईन्विस्टिगेशन संपल्यावर एक हात कमरेवर, दुसरा आकाशाकडे , समोर समस्त देवलोक्स, मान खाली घातलेला ईंद्र सर्वात पुढे आणी त्याला उद्देशुन) ...नब्बे प्रतिशत गलत-सलत जोडींया बनायी तुम लोगों ने , तुम्हे तो फांसी होगी ! फासी !!

*************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

महागूरू : हे बघ माधुरी, मी बॉलीवुड मध्ये बाल-कलाकर असलो तरी मी तुला खुप सिनीयर आहे आणि या ईथे मी महागूरू आहे, म्हणुन जोड्या कुठे ही बनल्या तरी सगळ्यात हिट जोडी कूठली हा फैसला मी करणार आहे कारण ईथे महागूरू मी आहे, तु झुल्यावर असलीस तरी मी सिट वर आहे आणि मी ..........आणि मी.........आणि मी.........................आणि मी................... ( विग सावरायला निघुन गेले आहेत )

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

भावोजी ऊर्फ आदेश बांदेकर : एकदम बरोब्बर !! दहा पैंकी दहा गुण मिळत आहेत तुम्हाला, आता आपण पैठणी साठी वळताहोत दुसर्‍या प्रश्नाकडे !! सांगा .............................

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

रजनी अण्णा द बेस्ट : ( सप्प...सप्प...सप्प . ) पण मुळात स्वर्ग च मी बनविला आहे .

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

जयश्री गडकर : ( महाप्रचंड रडवेला स्वर) आम्हा तमासगिरांच्या कसल्या आल्यात जोड्या व ताय !! बोर्डावर नाचण हिच काय आमची ती जोडी.

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

डॉ. श्रीराम लागु : हम्म ! (एक लांबलचक पॉज)....जोड्या !! ( पुन्हा एक लांबलचक पॉज)...जोडी जमली तरी (पॉज)......ती ( गालांची पेटन्ट थरथर) टिकली पाहिजे !!

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

अलका कूबल ( समोर डोळे पुसण्यासाठी टावेल घेवुन महिलावृंद ) : मला नाही माहीत ताई , माझी जोडी कुठे ही लागली तरी...तरी...तरी ....मला एक ' माहेरची साडी' दे !!

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

विथ रिसपेक्ट,अशोक सम्राट : (हातवारे स्वर्गात चौकौन बनवत) , आम्ही कुट काय म्हटल मग त्याला, जिथ बनवायच्या तिथ बनवा, पण ' बनवाबनवी ' करून ' धुम-धडाका ' करत ' धोबी-पछाड ' आम्हीच करणार !!

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

दिलीप प्रभावळकर : डोळे बघ ...डोळे बघ !! ही ही ही ......डोळे बघ ...डोळे बघ !! तु काय जोड्या बणवणार...मीच पछाडतो आज तुला !!

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

ईन्सपेक्टर महेश जाधव : (हाता ची मुठ आपटत ) डॅम इट !! तरीच मी लक्ष्या ला सांगत होतो की .........चित्रपट संपला.

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

स्वप्नील जोशी : आम्ही पुणेकर कमी बोलतो आणि मोजकं बोलतो, या सगळ्या वाक्यात 'बनती' मुळे घोळ आहे, आमच्या इथे मुळात बनवत नाही कोणाला !! आमच्या इथ 'मुळा नदी ' आहे, पण म्हणुन आम्ही मूळा कुठे खातो !! पण आम्ही सगळ्यांना बनवितो......बनव हा शब्द मुळात.......

**************************************************************************

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

स्वता वाश्या : जबरा !! काय सेन्टेस मारलेस ग !! तुझा फॅन होतो (मूळ पुणेकर अर्थ : काय भंगार सेन्टेस आहे) चल थोडी ट्यार्पी मिळेल मला या वाक्याने ;)

प्रतिक्रिया

प्रद्युमॅन लै भारी डॉल्या समोर हुबाच रार्‍हला.
=))

पण हे काथ्याकुटात काय म्हणून टाकल बे?

स्पा's picture

28 Jan 2012 - 3:31 pm | स्पा

=))
=))
=))

आता खाली मिपाकरांची पण नाव होऊन जाऊ द्यात

मृगनयनी's picture

28 Jan 2012 - 3:39 pm | मृगनयनी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

लय भारी!.. मस्तच्च!!!!!! :)

महागुरुंचे विग सावरणे स्पेशली आवड्ल्या गेल्या आहे!!!! ;)

रमताराम's picture

28 Jan 2012 - 3:46 pm | रमताराम

खुद्दा वाश्याच्या प्रतिक्रियेबाबत असहमत.

अवांतर: सध्याच्या वाश्याच्या सहीवरून काही 'वेगळाच' प्रतिसाद अपेक्षित होता. पण सिब्बलबाबा मिपाला 'कंटेट सेन्सॉर करा नाहीतर सायट बंद करू' अशी धमकी देतील म्हणून लिहित नाही.

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2012 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर

सगळेच प्रतिसाद (चि. माधुरीस इतर कलाकारांनी दिलेले) मस्त आहेत.

फक्त, तथाकथित 'महागुरू' स्पर्धक स्त्रियांना 'अगं-तुगं' करीत नाहीत. 'अहो-जाहो' करतात.

सानिकास्वप्निल's picture

28 Jan 2012 - 4:01 pm | सानिकास्वप्निल

महागुरुंचा प्रतिसाद उत्तम आहे
ह ह पु वा
Smiley

sneharani's picture

28 Jan 2012 - 4:10 pm | sneharani

मस्त!!
=)) =)) =))

पाषाणभेद's picture

28 Jan 2012 - 4:30 pm | पाषाणभेद

मिपावरचे कॅरॅक्टर्स कसे बोलतील या वाक्याला?

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

किचेन: कै च्या कैच.मग आम्ही काय इथे वेळ जात नाही म्हणून वधु वर सूचक केंद्र उघडलंय. ;)

************************************************************************************

>>किचेन: कै च्या कैच.मग आम्ही काय इथे वेळ जात नाही म्हणून वधु वर सूचक केंद्र उघडलंय.

ते आता आम्ही कसं सांगणार !! ;)

मिपावरच्या समस्त एलिजिबल व एडिटेबल बॅचलरांचा एकच प्रतिसाद

- ****यला, मग आम्ही काय झक मारायला भाज्या अन पुलाव करुन इथं फोटो टाकतोय का ?

मोदक's picture

29 Jan 2012 - 1:29 am | मोदक

>> किचेन: कै च्या कैच.मग आम्ही काय इथे वेळ जात नाही म्हणून वधु वर सूचक केंद्र उघडलंय.

अहो ताई, जोड्या वर स्वर्गात बनल्या, तुम्ही खाली फक्त गाठींची टोके एकत्र आणायची. :-)

तोच तर प्रोब्लेम आहे. आयला एवढी दर वेळेस दोन टोंकांची गाठ मारताना नवऱ्याच नाव उखाण्यात घ्यावं लागत.आता सारख सारख महादेवाच्या पिंडीवर बेल वाहून पाठ दुखायला लागलीये.कुणीतरी नाव ( माफ करा),उखाणा सुचवा रे/ ग.
आजकालची मुलही लई भारी भारी उखाणे घेतात.

श्रावण मोडक's picture

30 Jan 2012 - 2:07 pm | श्रावण मोडक

हे घ्या... ;) आणि करा सुरवात.

स्मिता.'s picture

28 Jan 2012 - 5:57 pm | स्मिता.

=)) =))
सिआयडी आणि महागुरूंची प्रतिक्रिया आवडली.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jan 2012 - 8:24 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! लैच भारी! डॉ. लागू वगैरे मस्तच.

मैत्र's picture

28 Jan 2012 - 8:32 pm | मैत्र

सगळेच टोले मस्त... पण महागुरू सगळ्यात बेष्ट :)

महागुरु आणि स्वप्नील जोशीची प्रतिक्रिया आवडल्या गेली आहे.

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

प्रभू मास्तरः जोड्या नुसत्या जुळून चालत नाही. शेत जोडीनेच नांगरावं लागतं.

प्राजु's picture

29 Jan 2012 - 1:11 am | प्राजु

मस्तच!!

टुकुल's picture

29 Jan 2012 - 10:44 am | टुकुल

आवडल रे..

--टुकुल

पैसा's picture

29 Jan 2012 - 11:06 am | पैसा

=)) हाहाहा!
झुल्यावरच्या नेनेबॆ दुसर्याच आठवल्या एकदम!

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
परा: थोडक्यात जोडी जमायची असेल तर स्वत: मरावे लागणार !

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
डॉणराव: उदाहरणार्थ कशावरुन? काही विदा उपलब्ध आहे का? तूर्तास जरा गडबडीत आहे.. ‍सविस्तर प्रतिसाद लवकरच..

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
तात्या : जियो माधुरी! बाझवला हे आधी आम्हाला माहित असतं तर रौशनीचा स्वर्गातला पत्ता काढला नसता का?

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.‍
नितिन थत्ते: (आकाशाकडे पहात काहीतरी आठवून) सध्या गप्प रहायचे ठरवले आहे.

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
धमाल मुलगा: खीक् ! खरंय बर्का मिसेस नेने.. आमची जोडी लागल्यापासून हे कर्म नक्कीच कोण्‍या मानव प्राण्‍याच्या हातून घडलेलं नाही अशी खात्रीच झालीय. तर सांगत काय होतो..

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
अवलिया, यॉर्कर फेम (इ.मृ.आयडीस शां.दे.): अच्छा, नेनेंपूर्वी लागलेल्या जोड्यांबद्दल काय म्हणणं आहे आपलं?

लगेच आठवले तेवढे लिहीले, आता बाकीचे प्रतिसादकांनी लिहावेत..

गणपा's picture

30 Jan 2012 - 2:36 pm | गणपा

+१
=))

मी-सौरभ's picture

30 Jan 2012 - 3:20 pm | मी-सौरभ

आवडेश

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2012 - 10:09 pm | बिपिन कार्यकर्ते

+३

=))

शुचि's picture

30 Jan 2012 - 11:16 pm | शुचि

+४ =))

जाई.'s picture

30 Jan 2012 - 11:43 pm | जाई.

+५
=)) =))

पैसा's picture

30 Jan 2012 - 11:27 pm | पैसा

हे पण भारीए! याचा कोणीतरी शेप्रेट धागा करा रे! बाकीचे यशस्वी कलाकार जमेल तशी भर घालतीलच!

स्पा's picture

30 Jan 2012 - 2:42 pm | स्पा

प्र का टा आ

कपिलमुनी's picture

30 Jan 2012 - 5:06 pm | कपिलमुनी

दया , स्वर्ग का दरवाजा तोड दो !!

सुहास झेले's picture

30 Jan 2012 - 6:03 pm | सुहास झेले

हा हा हा ... जबरा रे... महागुरू आणि सीआयडी प्रचंड आवडले :) :)

यशवंता, अजून येऊ देत :) :)

अमोल केळकर's picture

30 Jan 2012 - 6:17 pm | अमोल केळकर

हा हा हा , भट्टी मस्त जमलीय :)

अमोल केळकर

जाम आवडले..

बांदेकर भावोजी, सीआयडी, महागुरु विशेष खास..

मेघवेडा's picture

31 Jan 2012 - 12:55 am | मेघवेडा

हा हा हा! तुफान! प्रद्युमन् दोल्यांसमोर उभाच राहिला अगदी! बेष्टंय रे! श्टँडप कॉमेडीसाठी जबरा पोटेण्शियलवाला माल आहे. :)

मूकवाचक's picture

31 Jan 2012 - 10:58 am | मूकवाचक

=))