बुरगुंडा (बरमुडा) आन आकूडकी कापलेली प्यँट (थ्रीफोर्थ)

सू डोकू's picture
सू डोकू in काथ्याकूट
19 Jan 2012 - 11:53 pm
गाभा: 

मंडळी रामराम,

आप्ले म्हन्ने थोडक्यात सांगा या यस्टी स्ट्यँडवर चौकशीच्या खिडकीवर ल्हेल्यानुसार आमी आमचं म्हन्नं आपनापुडं थोडक्यात मांडतो,

परवाच आमी मंबयला गेलो व्हतो तवा तितं येक दिवस आमच्या मित्राकडं मुक्काम पडल्यानं आमाला पुर्षांनी घरात कोन्ते कपडे घालावे ह्याईषई प्रश्न पडला. गावी आल्यावर लै टकुरं खाजवून ठरवलं की, मिसळपावच्या गाडीवर आन्ना, दादा, नाना, मामा, काका, मास्तर, गुर्जी, वकील ह्यासारकी लै बुद्दीमान आन इच्यारवंत मंडळी बसलेली (पडीक) असत्यात तवा त्यास्नीच ईच्यारावं म्हनून ठरवून टाकलं. (आता आमचं ह्ये रिकार्डींग व्हताना कुनीतरी मधे बोलत व्हतं त्याचं बोलनं जे हाय तेच कंसात आलयं ह्ये ध्यानात घ्यावं.)

१) आमच्या मित्रानं रातच्याला बुरगुंडा (बरमुडा) घातला व्हता. वाळलेल्या लाकडासारक्या टंगड्या समद्याला दावत त्यानं आमाला नाक्यावरच्या पानवाल्याकडं पान खाऊ घालाया न्हेलं.

२) त्येच्या पोरानं टाचंपास्नं इतभर टंगड्या उघड्या टाकनारी प्यँट (थ्रीफोर्थ) घातली व्हती.

आता आमचे सवाल आशे हायत की,

१) घरात आन् भायेर जाताना पुरुष मानसांनी बाया मानसान्ला लाज वाटल आशे टंगड्या उगड्या टाकनारी कापडं वापरावी का? (टंगड्या बी लै नमुन्याच्या उदा. वाळक्या लाकडावनी, काळ्या, पांडऱ्या, जाडजूड मुसळावानी, पात्तळ बांबूवानी, केसाळ आस्वलावानी) ह्ये आस्ले उल्टी (ओकारी) येनारे टंगडी पीस बायामानसास्नी दाकवन्यासाटी ही बुरगुंडा म्हंजी आर्दी चड्डी धालायची का? त्येचा नेमका फायदा काय?

२) आकूडकी कापल्याली प्यँट (थ्रीफोर्थ) घालन्यात नेमका फायदा काय गुडग्यापास्नं येक ईतभर खालपरेंत टंगड झाकायचं आन टाचंपास्न येक ईतभर वर उगडं बी ठिवायचं ह्येज्यातला नेमका फायदा कुनी आमाला सांगल का? का कापडं मिळत नसल्येल्या आपल्या देश्यातल्या इतर लोकान्ला कापडं मिळावं म्हनून आपनं आशी लांडी प्यँट धालून काटकसर करायची का?

३) ह्या बुरगुंड्याचं आन त्या आकूडक्या कापलेल्या प्यँटीच येवडच जर लै कौतुक वाटत आसल तर हापीसला, कामावर जाताना का न्हाईत घालत? तवा कुनाची लाज वाटती का? फुलप्यँटीवर आर्दा श्यर्ट घालनारे लोकं हैत, तसं बुरंगुंड्यावर आन आकूडक्या कापलेल्या प्यँटीवर लांब भायाचं श्यर्ट (फुलशर्ट) फ्यॅशन म्हनून घालायला काय हारकत हाय?

४) आंग झाकनारी लुंगी किंवा पूर्न उंचीची नाईट प्यँट घालनारे लोक मागासल्येले असत्यात का?

मंडळींनो आमच्या प्रश्नाची उत्तरं देन्याचा प्रयत्न करावा.

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

20 Jan 2012 - 12:07 am | वपाडाव

वावावा..... सुरेख विचार मांडलेत....
आता उत्तर द्यायला मी बी टकुरं खाजिवतो अन मंग सांगतो तुमास्नी....

मोदक's picture

20 Jan 2012 - 12:35 am | मोदक

| = I love to kill, especially time =

सू डोकू is a very good option. ;-)

शिल्पा ब's picture

20 Jan 2012 - 12:59 am | शिल्पा ब

आसल्या कपड्यास्नी फेशन म्हनत्येत. तुमच्यावानी खेड्यातल्या यड्याला न्हाय कळायचं ते!! आन घातलं तरी बी शोबायचं न्हाय.

सू डोकू's picture

20 Jan 2012 - 1:16 am | सू डोकू

खेड्यातल्या येड्यानं आसली च़ड्डी घातली की त्यो दादा कोंडके आन् शेरातल्यानं घातली की ती फ्यॅशन? दादा कोंडक्यानी लै वर्शापूर्वीच ही तुमची फ्यॅशन वापरुन जुनी करुन टाकलीय.

आन् येवडं कौतुक वाटतयं तर हापीसात, कामावर जाताना घालून जायला लाज का वाटती?

अन्या दातार's picture

20 Jan 2012 - 1:28 am | अन्या दातार

खेड्यातल्या येड्यानं आसली च़ड्डी घातली की त्यो दादा कोंडके आन् शेरातल्यानं घातली की ती फ्यॅशन?

आन् येवडं कौतुक वाटतयं तर हापीसात, कामावर जाताना घालून जायला लाज का वाटती?

लाज नव्हे, ते फॉर्मल या सदरात मोडत नाही म्हणून कुणी वापरत नाही. जर कंपनीने परवानगी दिली तर वापरु कि हापिसात बी.

संपादित

कृपया लोकांच्या श्रद्धास्थानांशी खेळुन भावना दुखवू नये.

शिल्पा ब's picture

20 Jan 2012 - 6:39 am | शिल्पा ब

आत्ता गं बया!! हापिसात कुनी निस्त्याच हाप चड्डीवं जैल का वो? ते हापिस आस्तया...भायेर जातानी घालत्यात न्हवं!! मंग? आन तुमी कोन वं ठरीवनारे?

पाषाणभेद's picture

20 Jan 2012 - 6:57 am | पाषाणभेद

ठिक आहे नको ते बरम्युडा ऑफीसात, पण धोतर, लुंगी ला ऑफिसात काय हरकत आहे? विचार करा की आयटीतले प्रोफेशनल्स धोतर, गांधी टोपी घालून दररोज कामावर येतात ते. :-)

पैसा's picture

20 Jan 2012 - 8:49 am | पैसा

चेनैमधे लुंगी हा फॉर्मल ड्रेस आहे.

सु डोकु यांचे बुरगुंडा आणि आकुडकी हे शब्द लैच आवाल्डे! पन ह्ये आमचेच कोनीतरी भाऊ दुसरी कापडं घालून आल्यात असं वाटतंय.

प्रीत-मोहर's picture

20 Jan 2012 - 10:21 am | प्रीत-मोहर

आक्शी बरुबर बघा

आमच्या चेन्नैत लोकं लुंगी नेसुन येत्यात की हापिसात.

आन

सु डोकु यांचे बुरगुंडा आणि आकुडकी हे शब्द लैच आवाल्डे! पन ह्ये आमचेच कोनीतरी भाऊ दुसरी कापडं घालून आल्यात असं वाटतंय.

हेच्याशी लै वेळा शमत .

अन्या दातार's picture

20 Jan 2012 - 11:13 am | अन्या दातार

आमच्या चेन्नैत लोकं लुंगी नेसुन येत्यात की हापिसात.

यावरुन नक्की काय बोध होतो मंडळी??? ;)

वपाडाव's picture

20 Jan 2012 - 4:23 pm | वपाडाव

आम्हाला एवढंच माहीत आहे की लुंगी लौकर फेडता येते... बोध-बिध गेलं चुलीत...
******************
And I don't know what I know?

मी-सौरभ's picture

20 Jan 2012 - 6:14 pm | मी-सौरभ

लुंगी लौकर फेडता येते

स्वतःच्या वैषयिक आवडी निवडी अश्या संस्थळावर उघडपणे मांडू नयेत रे ;)

आमच्या ऑफीसमध्ये अर्धे लोक उन्हाळ्यात हाफ / थ्री फोर्थ पँट आणी वर हाफ शर्ट, टिशर्ट कींवा अगदी बनियान टाईप काहीतरी घालुन येतात. (काही महीला / तरुणी यापेक्षाही कमी कपडे घालुन येतात). पायात चप्पल पासुन बुटांपर्यंत काहीही असते. हीवाळ्यात थंडीपासुन वाचण्यासाठी पुर्ण अंग झाकले जातील असे कपडे वापरतात. तेव्हा तुमच्या प्रश्णांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे.

बाकी कुणी कुठे कसे कपडे वापरावे आणी त्या कपड्यांना काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे.

पक पक पक's picture

20 Jan 2012 - 6:26 pm | पक पक पक

हॅ हॅ हॅ हॅ....कस का होइना तुमच्या हापिसात लोक कपडे घालतात हे महत्वाच..

मराठमोळा's picture

20 Jan 2012 - 8:12 am | मराठमोळा

लेख फारच संकुचित दृष्टीतून आणि दुसर्‍याची मापं काढण्यासाठी लिहिला आहे असे दिसते.

तुम्ही स्वतः घरात आणि घराबाहेर कोणते कपडे वापरता आणि त्याचे फायदे काय आहेत हे आधी स्पष्ट करा मग दुसर्‍यांच्या कपड्यावर्/शरीरावर टिप्पणी करा/ प्रश्न उपस्थित करा. आणि हो तुमच्या "टंगड्या ""वाळक्या लाकडावनी, काळ्या, पांडऱ्या, जाडजूड मुसळावानी, पात्तळ बांबूवानी, केसाळ आस्वलावानी" आहेत की कशा आहेत आणि त्या पाहून तुम्हाला स्वतःला किंवा ईतरांना उल्टी (ओकारी) येनारे प्रकार झाले आहेत क हेही स्पष्ट करा. मग आम्ही उत्तरे देऊ.

विसुनाना's picture

20 Jan 2012 - 11:36 am | विसुनाना

आधुनिक कालमान आणि भारतातील हवामान या दोन्ही पद्धतीने विचार केल्यास अर्धी चड्डी/बर्म्युडा हे पोषाख चुकीचे आहेत असे वाटत नाही.

याला आधार म्हणजे - दक्षिणेत तथाकथित अंग झाकणारी लुंगी मध्यातून दुमडून वर घेऊन उघड्या चड्डीसारखी कमरेला खोचायची फारच जुनी प्रथा आहे. तसेच धोतर हा प्रकारही काही फारसा 'बंदिस्त' नाही याची ग्वाही धोतर वापरणारे देऊ शकतात. अर्ध्या चड्डीबद्दल बोलायचेच तर ( ...तर बोलायलाच नको) आमच्या आजोबांच्या तरूणपणात अर्धी चड्डी 'इन थिंग' होती. पांडू हवालदार अर्धीच चड्डी घालत असे. आजही आर.एस.एस.चा उल्लेख अर्धी चड्डीवाले असा केला जातो.

हां, आता भोके पडलेला बनियन आणि चट्टेरी पट्टेरी पायजमा हा पुरुषांचा घरातील गणवेश असावा असा कायदा सरकारने केल्यास तोच घालण्याची सक्ती करता येईल. (हल्ली सर्व प्रगत/प्रगतीशील देशांमधील सरकारे बिनडोक कायदे करतच आहेत. त्यात एकाची भर.)

***
या लेखाचे लवकरच (बहुतेक स्त्रीलिंगी) विडंबन होईल (आणि माझ्या या प्रतिसादाचेही) अशी खात्री आहे.

दादा कोंडके's picture

20 Jan 2012 - 3:16 pm | दादा कोंडके

याला आधार म्हणजे - दक्षिणेत तथाकथित अंग झाकणारी लुंगी मध्यातून दुमडून वर घेऊन उघड्या चड्डीसारखी कमरेला खोचायची फारच जुनी प्रथा आहे.

पण अजून एक पुस्ती. लुंगी नुसती वर खोचून चालत नाही. तर त्याच्या खालून ढगळी चड्डीदेखील बाहेर आली पहिजे! :)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

२) आकूडकी कापल्याली प्यँट (थ्रीफोर्थ) घालन्यात नेमका फायदा काय गुडग्यापास्नं येक ईतभर खालपरेंत टंगड झाकायचं आन टाचंपास्न येक ईतभर वर उगडं बी ठिवायचं ह्येज्यातला नेमका फायदा कुनी आमाला सांगल का? का कापडं मिळत नसल्येल्या आपल्या देश्यातल्या इतर लोकान्ला कापडं मिळावं म्हनून आपनं आशी लांडी प्यँट धालून काटकसर करायची का?

आमची एक मैत्रिण असेच काय काय घालत असते. आम्हाला देखील हाच प्रश्न पडला आहे. ;)

प्रीत-मोहर's picture

20 Jan 2012 - 12:13 pm | प्रीत-मोहर

मग तिला डायरेक्ट इच्चाराय्च की. हाकानाका

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

मग तिला डायरेक्ट इच्चाराय्च की. हाकानाका

पोरगी डोक्यात अंमळ अधू असेल तर हाणायची धरून. ;)

पैसा's picture

20 Jan 2012 - 12:46 pm | पैसा

तो आमच्या गोव्यातला फॉर्मल ड्रेस आहे. माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं होतं, की सौंदर्यफुफाट्याच्या आसपास 'कालशांव' घालून फिरू नकोस म्हणून....

पोरगी डोक्यात अंमळ अधू असेल तर हाणायची धरून >>>

अजुन शंका आहेच की अंमळ रात्री ची कमी पडली ;)

अवांतर : कृपया अवांतर गप्पासाठी खरडफळा वा वही वापरावी ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

कृपया अवांतर गप्पासाठी खरडफळा वा वही वापरावी

म्हणजे ? हा खरडफळा नाही ?

का त्यान्ला कश्या तंगड्या बघाया आवडतात आन तश्या प्यांटी घालाव्या.

काय म्हंता?

आमची प्रेरणा: "कपडे उतरवण्या इतका उत्साह दुसर्‍या कुठल्याच कामात वाटला नाही" इति थत्तेकाका (नाटकातले). त्यामुळे आम्हाला असले प्रश्न पडत नाहीत. शेवटी वस्त्रच ती शरीरा सारखी ती कधीतरी उतरवायचीच आहेत. ;) (आहे की नाही आध्यात्मिक अँगल)

@रामदास स्वामींना* ट्रेंड सेटर आणि व्हिजनरी म्हणले पाहिजे

लै हशिवलं राव. तुमी रामदास स्वामींचा टाकल्याला फोटू बगून (माफी आसावी स्वामीजी) आमाला आमचा त्यो मित्र बुरगुंड्याआयवजी स्वामीसारक्या लंगोटीमदी पानवाल्याच्या दुकानी आमला घिवून हुभा आसल्याला दिसला!(ई-मॅजिनींग) तोंडात पान, यका हातात शिग्रेट आन दुसऱ्या हातानं पैशे भायेर काडायला लंगोटीत कुटं खिसा हाय का बगत व्हता. (@भायेर जातानी घालत्यात न्हवं!! आसल्या कपड्यास्नी फेशन म्हनत्येत. तुमच्यावानी खेड्यातल्या यड्याला न्हाय कळायचं ते!! आन घातलं तरी बी शोबायचं न्हाय.)

@जर कंपनीने परवानगी दिली तर वापरु कि हापिसात बी.

तुमची कंपनी पर्वानगी दिल का न्हाय ते म्हाईत न्हाई, पन आप्ल्या मायबाप सर्कार्न पोलीसदादान्ला खाकी बुरगुंडाच हापिशल ड्रेस म्हनून नेमला व्हता. पन काय झाल म्हाईत न्हाई, त्येंनी बी सर्कारला भांडून फुलप्यँटीचा ड्रेस मागून घेतला.

@बाकी कुणी कुठे कसे कपडे वापरावे आणी त्या कपड्यांना काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे.

ह्ये उत्तर आगदी बरुब्बर हाय. धा पैकी धा गुन. टाळ्या!!! आमाला आवडल्यालं आन येकदम समर्पक उत्तर ते ह्येच!

@तुम्ही स्वतः घरात आणि घराबाहेर कोणते कपडे वापरता आणि त्याचे फायदे काय आहेत हे आधी स्पष्ट करा मग दुसर्‍यांच्या कपड्यावर्/शरीरावर टिप्पणी करा/ प्रश्न उपस्थित करा. आणि हो तुमच्या "टंगड्या ""वाळक्या लाकडावनी, काळ्या, पांडऱ्या, जाडजूड मुसळावानी, पात्तळ बांबूवानी, केसाळ आस्वलावानी" आहेत की कशा आहेत आणि त्या पाहून तुम्हाला स्वतःला किंवा ईतरांना उल्टी (ओकारी) येनारे प्रकार झाले आहेत क हेही स्पष्ट करा. मग आम्ही उत्तरे देऊ.

आमी बगा टंगड्या झाकनारी कापडं वापरतो. त्याजे फायदे म्हंताल तर बायामानसान्ला लाज वाटायचा प्रस्नच येत न्हाय. आन आमी बुरगुंडा वाप्रत नस्ल्यानं आमच्या टंगड्या आजून तरी पब्लिक प्रापर्टी म्हनून घोशित झालेल्या न्हाईत. त्यामुळं त्या बगून कुनाला बी उल्ट्या झालेल्या न्हाईत. आता यवडा समदा आब्यास करुन तुमी उत्तर देनार म्हंजी लैच उशीर व्हईल, तवा तुमाला आता उत्तरं देन्यातून सूट. तुमी उत्तर न्हाय दिलतं तरी चालंल.

समस्त इच्यारवंत इद्वान मंडळीनू,
आमचा सरळ प्रश्न हुता की, ह्या बुरगुंड्याचा आन आकूडक्या कापलेल्या प्यँटीचा नेमका फायदा काय? दुर्दैवानी यकानी बी ह्याज उत्तर दिलचं न्हाई. तवा आता आमीच टकुरं चालवून ह्याज्यातले फायदे काय आसत्याल त्याजा आंदाज लावलाय, त्यो ह्यापरमाने
@बुरगुंडा वापर्न्याचे फायदे.....

१) वायूविजन (वाऱ्याच्या प्रवासाला लागनारा येळ कमी व्हत आसलं)
२) भूतदया (दानं खायला पाकरं कन्सांवर बसत्यात तसं डासान्ला बसायला टंगड्या उगड्या ठिवता येत आसत्याल)
३) (आरोग्यप्राप्ती) पचन नीट व्हत आसल, त्यामुळं पोट साप व्हत आसलं
४) (यॅडव्हान्स आनंद) सकाळच्या पारी फिरायला आन यायाम करायला गेल्याचा आनंद बुरगुंडा घातल्यानं रात्री पान खातानाच मिळत आसलं.
५) (पब्लीशीटी) बायामानसान्ला लाज वाटत आसली तरी आपल्याला न वाटून घ्येता आप्ल्या टंगड्या पब्लिक प्रापर्टी म्हनून झ्याईर करता येत आसत्याल.
६) (ल्हान पन देगा देवा) हापचड्डी घालून साळत कसं जात हुतो, त्यो आनंद पुना घेता येत आसल.
ईत्यादी ईत्यादी

@आकूडकी कापल्याली प्यँट....

ह्यजे फायदे काय ह्येच नेमकं कळना. ह्ये धड पूर्न बी न्हाई आन आर्द बी न्हाई. टाचापास्न येक यीतभरच उगडं ठिवल्यानं काय फायदा हुत आसलं बर? ह्यो येक मोटा शंशोदनाचा ईषय ठरलं. तरी बी आसत्याल आशे काई फायदे...
१) (सामाजिक बांदीलकी) देश्यातल्या लै लोकान्ला कापडं ल्यायला मिळत न्हाईत, तवा आपुनच आशी जरा जरा काटकसर केली तर तेन्ला कापड मिळायला मदत हुत आसलं.
२) (टाकाऊत्नं टिकाऊ) घरातल्या जुन्या प्यँटी टाकून देन्याऐवजी पुंदा आनी वापरात आन्ता येत आसत्याल.
३) बूटात घातल्यालं पायमोचे दिसायसाटी उपेग व्हत आसल.
छ्या, जाऊ द्या आमाला तर ह्याज्यातले लै ज्यादा फायदे लक्ष्यात यिनात.
भौ तुमी बगा बरं आजून टकुरं चालवून सुचत्यात का आजून काई फायदे.

पँट्स असं केलंत तर बरं होईल. बाकी चालू द्या !!

कपिलमुनी's picture

21 Jan 2012 - 12:55 pm | कपिलमुनी

रामदास स्वामींचा फोटो या कारणासाठी बघून वाईट वाटले

अविनाशकुलकर्णी's picture

21 Jan 2012 - 2:40 pm | अविनाशकुलकर्णी

रामदास स्वामींचा फोटो या कारणासाठी बघून वाईट वाटले

मलाहि...

याचा निषेध !
संबंधीतांनी जाहिर माफी मागावी.
संपादकांनी असला अचरट धागा आणि त्यातील अवमानकारक उल्लेख ताबड्तोब काढून टाकावेत.
टवाळकी करताना काहीतरी मर्यादा असावी.. आपल्या क्षुद्र करमणुकी साठी राष्ट्रपुरुषांच्या नावाचा उल्लेख करताना शरम वाटायला हवी.

सू डोकू's picture

21 Jan 2012 - 8:11 pm | सू डोकू

आम्ही रामदास स्वामी यांच्या उल्लेखाबद्दल जाहीरपणे व बिनशर्त माफी मागत आहोत. रामदास स्वामी यांचा अवमान करण्याचा हेतू यांत निश्चितपणे नव्हता व नाही हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम रामदास स्वामी यांची व आपणा सर्वांचीच माफी आम्ही मागत आहोत. आपण सर्व सूज्ञ आहात, त्यामुळे उदार मनाने आम्हाला क्षमा करताल अशी अपेक्षा करतो.

पेरले तैसे उगवते/ बोलले तैसे उत्तर येते/
तरी मग कर्कश्श बोलावे / ते काय निमित्ते ?
*****
माणुस हेंकाड आणी कच्चे/ मान्य करावे तयाचे /
येणे प्रकारे बहुतांचे / अंतर राखावे//
****
वेडे करावे शहाणे /तरि च जिणॅ श्लाघ्यवाणे /
उगे च वादंग वाढवणे /हे मूर्ख पण //
*****