काय पटत नाही विचारताय?? साहाजिकच आहे तुमचा प्रश्न! अहो मी बोलतोय आपल्या माय-मराठीवरच्या आक्रमणाबद्दल. हे आक्रमणकर्ते कोण? अहो बघा आजूबाजूला.. दिसले का? हे आक्रमणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. नाही पटत? चला तर प्रत्यक्ष उदाहरणंच पाहू...
दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून.
दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते. इतक्या वाईट शिव्या इंग्रजीतून देते, की इंग्रजी कळत असतं तर वाहकानं तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असता.
दृश्य ३ - स्थळ - पाचगणी. दोन लहान मुलांना घेऊन एक जोडपं येतं. मराठी पालक आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती इंग्रजीतून देतात. सांगतात, "दीज आर दि फूटप्रिन्ट्स ऑफ दि पाण्डवाज्...." मुलगा - "हू पाण्डवाज्????"
आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याच मुलांना इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून द्यावी लागावी, हे खरंच दुर्दैवी आहे. हे लहान मुलांशी इंग्रजीतून बोलायचं काय प्रकरण आहे ते नाही बुवा समजलं.
मान्य आहे की इंग्रजी जागतिक भाषा आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर चांगलं भवितव्य आहे वगैरे. पण आपली मराठी जपत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही का??? मी देखील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. मला दिवसभर इंग्रजीतच संवाद साधावा लगतो. पण मी ती इंग्रजी ऑफिसपुरतीच मर्यादित ठेवतो.
मला इतकंच म्हणायचं आहे, की मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं?
प्रतिक्रिया
19 Jul 2008 - 9:57 pm | जयन्त
सही पटले.
19 Jul 2008 - 10:39 pm | प्रियाली
जर आई आणि मुले इंग्रजीतून लीलया संवाद साधू शकत असतील तर इंग्रजीतून बोलतील. आपल्या उदाहरणातील आईला आपल्या मुलांबद्दल कदाचित तसा विश्वास असावा. परंतु, दुकानदाराबद्दल नसावा म्हणून त्याच्याशी इंग्रजाळलेल्या मराठीत. जर ती आईच इंग्रजी माध्यमात शिकलेली असेल तर तिला इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांशी इंग्रजीत संवाद साधणे अधिक जवळीचे वाटेल. किंवा, तसे नसेल आई मराठी माध्यमात शिकली असेल पण आपल्या मुलांचा इंग्रजी भाषेचा पाया पक्का व्हावा असे तिला वाटत असेल तर तिने त्यांच्याशी इंग्रजीत बोलणेही गैर नाही असा तिचा समज असू शकतो.
तसेही कोणी काय बोलावे आणि कोणत्या भाषेत बोलावे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.
तरी, कोणाला हे दृश्य आपल्या घरातून बदलावेसे वाटत असेल तर त्यात गैर नाही. मूळ विषयाशी हे दृश्य थोडेसे का होईना पण संबंधीत वाटले.
हे तर अजिबात कळलं नाही. सदर मुलीने मराठीत शिव्या घालाव्या असं आपण म्हणताय का? की मराठीत इरसाल शिव्या घातल्याने मायमराठी जगणार आहे?
समजा मुलांना पांडव माहितच नसतील तर मराठीत सांगितले काय किंवा इंग्रजीत सांगितले काय? फरक काय पडतो. मुलांनी कदाचित "हू पाण्डवाज्????" ऐवजी मराठीत "पांडव कोण?" असे विचारले असते.
तीनही प्रसंगांचा आणि मराठीवरील आक्रमणाचा फारसा संबंध नाही.
यांत न कळण्यासारखं काय आहे? ज्या पिढीची मुलं आज लहान आहेत ती पिढी स्वतः इंग्रजी माध्यमातून शिकलेली असणे शक्य आहे. जर त्यांना इंग्रजी बोलण्यात धन्यता/ कम्फर्ट/ आवड इ. असेल तर ते आपल्या मुलांशीही इंग्रजीतच बोलणार.
मराठीचे प्रेम, जिव्हाळा वगैरे गोष्टी मराठी कुटुंबात जन्म घेतला म्हणून थोडंच उत्पन्न होतात? त्यासाठी प्रत्येकाच्या पालकांकडून, गुरूजनांकडून आणि त्या व्यक्तिकडून प्रयत्न व्हायला हवेत. पण एखाद्याला हे प्रयत्न करण्याची गरज नाही असेही वाटणे स्वाभाविक आहे. हा ज्याच्या त्याच्या राजीखुशीचा मामला आहे.
मराठीवर आक्रमण केलं आहे ते आपल्या शिक्षण व्यवस्थेने, राजकारण्यांनी, कारकून-बाबू तयार करण्यात धन्य मानणार्या आपल्या वृत्तीने. वरील उदाहरणे केवळ निमित्तमात्र आहेत. इंग्रजी ऑफिसातच ठेवून घरी येण्याचे दिवस मागे पडले आहेत. ज्यांची मुले इंग्रजी शाळांत जातात. फास्टरफेणे न वाचता हॅरी पॉटर वाचतात त्यांच्या पालकांना मुलांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचा अभ्यास घेण्यासाठी तरी का होईना पण इंग्रजी ऑफिसांत ठेवून येणे थोडे कठिण आहे.
इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की या मराठी संकेतस्थळांवर येणारे आणि त्यातील बहुसंख्य मराठी शाळेत शिकलेले असल्याने त्यांची मानसिकता ही इतर सद्यकालीन मराठीजनांपेक्षा वेगळी असणे शक्य आहे. गेल्या २५-३० वर्षांहूनही अधिक काळ शहरांत इंग्रजी शाळांचे बस्तान चांगले बसले आहे. त्यावेळेस इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या पिढीलाच त्यांच्या पालकांनी मराठीची गोडी लावली असती तर आज परिस्थिती थोडी वेगळी दिसली असती कदाचित, पण बहुतेक वेळेला तशी परिस्थिती दिसत नाही. आज त्या इंग्रजी-शिक्षितांची मुलं इंग्रजी शिकत आहेत. (या [संपूर्ण] इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या पालकांपैकी कितीजण मराठी संकेतस्थळांवर येतात हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरावे) म्हणजे दुसरी, तिसरी पिढी..पर्यायाने त्यांना इंग्रजीची गोडी अधिक असणे क्रमप्राप्त आहे. (इथे मी त्यांची बाजू घेते असा गैरसमज न व्हावा पण हे कटु सत्य आहे आणि ते आपण डोळे झाकले म्हणून बघता येणार नाही असे नाही)
पुढे असे की संस्कार हे भाषेशी संबंधीत नसतात. आपले संस्कार आणि संस्कृती मराठीत शिकवले आणि इंग्रजीत शिकवले तर फरक कसा पडतो. पांडवांबद्दल सांगायचे झाले तर ते संस्कृतातच सांगायला हवे कारण मूळ काव्य संस्कृतातील. विचार केला तर मराठी देखील उपरीच ठरते तिथे. परदेशांत अनेक ठिकाणी संस्कारकेंद्रे इंग्रजीत चालतात आणि त्यात अतिशय उत्तम संस्कारांची आणि संस्कृतीची जाणीव करून दिली जाते.
या वाक्याशी १००% सहमत परंतु त्या पुष्ट्यर्थ तुम्ही दिलेल्या उदाहरणांशी फारशी सहमती नाही.
20 Jul 2008 - 3:34 pm | ऋषिकेश
१००% सहमत
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
20 Jul 2008 - 3:48 pm | मराठी_माणूस
जर आई आणि मुले इंग्रजीतून लीलया संवाद साधू शकत असतील तर इंग्रजीतून बोलतील. आपल्या उदाहरणातील आईला आपल्या मुलांबद्दल कदाचित तसा विश्वास असावा. परंतु, दुकानदाराबद्दल नसावा म्हणून त्याच्याशी इंग्रजाळलेल्या मराठीत. जर ती आईच इंग्रजी माध्यमात शिकलेली असेल तर तिला इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांशी इंग्रजीत संवाद साधणे अधिक जवळीचे वाटेल. किंवा, तसे नसेल आई मराठी माध्यमात शिकली असेल पण आपल्या मुलांचा इंग्रजी भाषेचा पाया पक्का व्हावा असे तिला वाटत असेल तर तिने त्यांच्याशी इंग्रजीत बोलणेही गैर नाही असा तिचा समज असू शकतो.
एक मराठि आई आपल्या मुलांशी बोलत आहे . हा मुद्दा लक्षात घ्या. शिकण्याचे माध्यम आणि मातृभाषा ह्यात फरक आहे. मातृभाषेत संवाद साधता येउ नये हे दुर्दैव.
20 Jul 2008 - 4:04 pm | प्रियाली
मराठी आई म्हणजे काय? मराठी कुटुंबात जन्म घेतलेली असे ना. मग, समजा की चोराच्या कुटुंबात एखाद्याने जन्म घेतला म्हणजे चोरीच केली पाहिजे असे आहे का? किंवा डॉक्टरच्या कुटुंबात सर्वांनी डॉक्टर व्हायला हवे का? तेव्हा एखाद्या कुटुंबात जन्म घेतला म्हणजे माणसाने तसेच वागायला पाहिजे असे नाही. आपल्या भाषेबद्दल या आईलाच प्रेम नसू शकेल कारण तिचेच शिक्षण इंग्रजीत झालेले असू शकेल. (पुन्हा, ही तिची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही. ही सत्य परिस्थिती आहे आणि या सत्यपरिस्थितीचे बीज चांगले ३०-४० वर्षांपूर्वीच रोवले गेले आहे. तसेही भाषेच्या प्रेमाबद्दल काय बोलावे हो! काही भाषाप्रेमी शुद्धलेखनाबद्दलही जागरूक असतात, भाषेच्या बाजाबद्दल, लयीबद्दलही जागरूक असतात. मराठी शाळेत जाऊन तुम्ही "एक मराठि आई आपल्या मुलांशी बोलत आहे . हा मुद्दा लक्षात घ्या. शिकण्याचे माध्यम आणि मातृभाषा ह्यात फरक आहे. मातृभाषेत संवाद साधता येउ नये हे दुर्दैव." अशी मराठी कशी लिहिता असे विचारणारे महाभागही मिळतील की तुम्हाला. [बघा! हे माझं चुकीचं मराठी - मिळतील नाही - भेटतील] )
खाली घाटपांड्यांनी म्हटले आहेच जी भाषा तुम्हाला रोजी रोटी देते ती आपोआप शिकली जाते; बोलली जाते हे सत्य सर्वांनी स्वीकारले तर मराठी भाषेवर नेमके आक्रमण कोण करते आहे ते कळून येईल.
22 Jul 2008 - 9:55 am | मराठी_माणूस
भाषा आणि प्रव्रुत्ति मधे गल्लत होत आहे.
चोराच्या कुटुंबात एखाद्याने जन्म घेतला म्हणजे चोरीच केली पाहिजे असे आहे का?
अजिबात नाहि
पण मराठी कुटूंबात जन्म घेतलेल्यानि मराठीत का बोलु नये हे समजत नाहि
आपल्या भाषेबद्दल या आईलाच प्रेम नसू शकेल कारण तिचेच शिक्षण इंग्रजीत झालेले असू शकेल
शिकण्याचे माध्यम हे मातृभाषे वरिल प्रेम कसे काय कमि करु शकते . अशी आई घरातल्या वडिलधार्या मंडळींशि , ज्याना इंग्रजि येत नसेल त्यांच्याशि कसा संवाद साधत असेल
21 Jul 2008 - 10:07 am | बाजीरावाची मस्तानी
येस्स्..प्रियाली..यु आर राईट.......
20 Jul 2008 - 12:52 am | llपुण्याचे पेशवेll
आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याच मुलांना इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून द्यावी लागावी, हे खरंच दुर्दैवी आहे. हे लहान मुलांशी इंग्रजीतून बोलायचं काय प्रकरण आहे ते नाही बुवा समजलं.
मान्य आहे की इंग्रजी जागतिक भाषा आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर चांगलं भवितव्य आहे वगैरे. पण आपली मराठी जपत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही का??? मी देखील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. मला दिवसभर इंग्रजीतच संवाद साधावा लगतो. पण मी ती इंग्रजी ऑफिसपुरतीच मर्यादित ठेवतो.
अगदी पटले बघा..... १००% टक्के पटले.
पुण्याचे पेशवे
20 Jul 2008 - 1:32 am | इनोबा म्हणे
अगदी पटले बघा..... १००% टक्के पटले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
20 Jul 2008 - 6:53 am | विकास
दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून.
न्यूनगंड.
दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते. इतक्या वाईट शिव्या इंग्रजीतून देते, की इंग्रजी कळत असतं तर वाहकानं तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असता.
न्यूनगंड + "अटेंशन डेफिसीट डिसऑर्डर सिंड्रोम" (मराठी सुचक शब्द माहीत नाही!) भरलेला दिसतो. म्हणून सर्वप्रथम आक्रस्ता़ळेपणा करते आणि वर शिव्या देते - इंग्रजीत हा त्यातील न्यूनगंडाचा भाग.
दृश्य ३ - स्थळ - पाचगणी. दोन लहान मुलांना घेऊन एक जोडपं येतं. मराठी पालक आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती इंग्रजीतून देतात. सांगतात, "दीज आर दि फूटप्रिन्ट्स ऑफ दि पाण्डवाज्...." मुलगा - "हू पाण्डवाज्????"
परत न्यूनगंडच. उठसूठ इंग्रजी बोलायचे जर आपण संकेतस्थळावर टाळतो, नित्यनवीन शब्दसंग्रह तयार करायचा प्रयत्न करतो तर सर्वसाधारण मराठी पालकांना इंग्रजीत मुलांशी - ते ही महाराष्ट्रात बोलायची गरज आहे असे वाटत नाही. बाकी इंग्रजीत बोलत असाल तर पांडवाज म्हणणे पटते, पण जेंव्हा केवळ इंग्रजांना उच्चारता आला नाही म्हणून त्यांनी तयार केलेला शब्द जेंव्हा भारतीय इंग्रजीत बोलताना खरा उच्चार सोडून वापरतात तेंव्हा खेद वाटतो: हा शब्द आहे गंगा म्हणायच्या ऐवजी "गँजीझ" असे म्हणणे (Ganges gænʤiːz )
तरी देखील कोणी काय बोलावे हा ज्याचात्याचा प्रश्न असे मी मानतो. पण जर वरील टिका करायची असेल तर सर्वप्रथम आपण त्या टिकेतील व्यक्तींप्रमाणे वागत नाही ना हे जाणीवपूर्वक पहातो आणि टाळतो:
आमच्या मुलीला अगदी तान्ही असताना तिच्या गोर्या ज्यूईश डॉक्टरकडे नेहेमीच्या चाचण्या आणि लशी टोचायला नेले असताना. तिने (डॉक्टरने) विचारले की आमची भाषा कुठली. नाव आणि कुठे बोलले जाते वगैरे सांगीतल्यावर तिने आम्हाला आम्ही काय करणार वगैरे न विचारता सांगीतले/सल्ला दिला की तुम्ही तिच्याशी तुर्तास मराठीतच बोला. नंतर ती इंग्रजी आपोआप बोलू लागेल आणि मातॄभाषा आल्यावर इतर भाषा येणे पण सोपे जाईल. अर्थात आम्ही तेच करणार होतो आणि आमचा अनुभव दोन्ही भाषासंदर्भात चांगला आहे. आमच्या माहीतीतील एक मराठी-गुजराथी जोडपे आहे ज्यांचा मुलगा मराठी, गुजराथी आणि इंग्रजी बोलतो. मराठी-इंग्लीश जोडप्यांची मुले दोन्ही भाषा बोलतात. हे सर्व होते कारण त्यात न्यूनगंड नसतो उलटे आपल्याला दोन भाषा येतात ही जमेची बाजू धरली जाते.
20 Jul 2008 - 9:38 am | मनिष
विकासचा प्रतिसाद आवडला आणि पटला.
21 Jul 2008 - 8:32 am | प्राजु
विकास यांचे मत पटले.
माझा अनुभव :
माझ्या मुलाला इथे शाळेत घालताना, त्याला इंग्रजी अजिबात येत नव्हते. म्हणून मी घरी त्याला थोडे थोडे इंग्रजी शिकवू लागले. किमान शाळेत गेल्यावर शिक्षकांना शू साठी जायचे आहेत हे कसे सांगावे ते तरी शिकवले. घरी उत्तम मराठी बोलतो. काही ठिकाणी खून पाडतो शब्दांचा पण आम्ही त्याला समजावून सांगतो. शाळेत आणि इतर ठिकाणी वावरल्यामुळे तो इंग्रजीही उत्तम बोलतो. मराठी लोकांत मराठीच बोलतो इतकेच नव्हे.. तर घरी येणार्या अमराठी लोकांशी हिंदीतून बोलण्याचा तो प्रयत्नही करतो..
त्याला नाचरे मोरासारखी बरीच मराठी बालगीते पाठ आहेत..
भाषा ही १००% संस्कारांवर अवलंबून असते , मग तुम्ही कोणत्याही देशांत, प्रांतात किंवा शहरात असा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jul 2008 - 6:59 am | धोंडोपंत
दाजीबांच्या विचारांशी १००% सहमत. आमच्या मनातले लिहिलेत.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
20 Jul 2008 - 7:50 am | डॉ.प्रसाद दाढे
तुम्ही तिच्याशी तुर्तास मराठीतच बोला. नंतर ती इंग्रजी आपोआप बोलू लागेल आणि मातॄभाषा आल्यावर इतर भाषा येणे पण सोपे जाईल.
एकदम सहमत! थोडेसे विषया॑तर करतो पण चारशे वर्षा॑पूर्वी (१५७८) आपल्या देशात यावर झालेला एक प्रयोग आठवला, सम्राट अकबराने केलेला. 'गू॑गा महल!'
अकबराच्या दरबारातल्या कर्मठ मुल्ला-मौलवी॑नी असे विधान केले की उर्दू, हि॑दी वगैरे भाषा हीन आहेत व अरेबिक भाषाच सर्वश्रेष्ठ आहे. कारण कुराण त्या भाषेत आहे व अल्लाची ती भाषा आहे, डिव्हाईन आहे, वगैरे. अकबराने त्या॑ना ह्याचा पुरावा मागितला. मौलवी॑चे म्हणणे असेही पडले की नवजात अर्भकाला आपण उर्दू बोलायला शिकवितो म्हणून ते उर्दू बोलू शकते अन्यथा ते (बाय डिफॉल्ट) अरेबिकच बोलले असते! विचारी अकबराने हे मान्य करायचे साफ नाकारले आणि एक प्रयोग करायचा ठरविले. वीस अर्भका॑ना त्या॑च्या आई-बापा॑कडून विकत घेण्यात आले. त्या॑ना वस्तीपासून दूर बा॑धलेल्या एका धर्मशाळेत ठेवण्यात आले जिथे कुठलाच सुस॑स्कृत मानवी आवाज पोहोचणार नाही. त्या तान्ह्या मुला॑च्या कानावर एकही शब्द पडणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली. जिभा बा॑धलेल्या दूध आया ठेवण्यात आल्या. चार वर्षा॑नी (१५८२) अकबरानी त्या जागेस भेट देऊन पाहणी केली ते॑व्हा ती सर्व मुले मुकी झाली होती आणि अर्थातच अरेबिक बोलू शकत नव्हती! त्या घराला मग गू॑गा महल असे नाव पडले. ह्यान॑तर अकबराने त्या मौलवी॑ची पुष्कळ टि॑गल-टवाळी केली :)
हा प्रयोग क्रूर होता पण यातून अकबराची प्रयोगशीलता दिसते.
20 Jul 2008 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा दाढे साहेब,
भाषा ही सहचार्याने येते यासाठी 'गूंगा महलचे' उदाहरण जब्रा आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
20 Jul 2008 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे
दृष्य हे आपण आपल्या मनोपटलावर चित्रित करत असतो. प्रत्येकाचा हा कॅनवास निराळा आहे. त्या जागी मी असतो तर काय केलं असतं ?असा गृहितकी प्रश्न जेव्हा आपण विचारतो त्यावेळी आपण आपला पिंडासकट स्वतःला प्रस्थापित करत असतो. इतिहासातले प्रश्न उकलताना आपण स्वतःला त्याकाळात, त्या भुमिकेत, त्या समाजरचनेत स्वतःला नेणे हे खरंच अवघड आहे. आपण तिकडे आजच्या चष्म्यातुनच पाहतो कारण ते सोयीच असतं.
इंग्रजी बोलणे हे सुसंस्कृत व सुशिक्षित पणाचे लक्षण मानले जाते. योग्य का अयोग्य हा विषय निराळा आहे. अनेक भाषा सहज पणे बोलता येणं ही बाब सहजसाध्य नाही. एखादी भाषा सतत ऐकणे आणी बोलणे यातुनच ते शक्य होते. पर्यायी भाषा जेव्हा तुम्हाला उपलब्ध असते त्यावेळी तुम्ही तुम्हाला सुलभ वाटणार्या पर्यायाचा आधार घेता.
प्रसाद दाढेंनी चांगले उदाहरण दिले आहे. त्याच बरोबर समजा एकच भाषा येणारे प्रौढ यांच्यावर प्रयोग केला; उदा. फक्त मराठी येणारे व अन्य भाषेचा गंधही नसणारे लोकांना इंग्रजी किंवा फ्रेंच भाषिक प्रदेशात एकटेच टाकले तर काय होईल? त्यांना ती भाषा येईल का? किति काळात आत्मसात करतील? त्यांच्यात न्युनगंड येईल का?
माझ्या मते एखाद्या भाषेशिवाय तुम्हाला पर्यायच नसतो त्यावेळि तुमची ती भाषा विकसित व्हायला सुरवात होते.
जे लोक सहज पणे अनेक भाषा बोलतात त्यांच्या विषयी माझ्या मनात असुयायुक्त आदर असतो. कारण मला ते जमत नाही. पण मला तशी करण्याची इच्छा असते. मग माझ्या मनात न्युनगंड तयार होतो. त्यातुन बाहेर पडण्यासाठी मग जी धडपड असते त्यातुन अशी दृष्य तयार होतात. न्युनगंड झाकण्यासाठी मग अहंगड तयार होतो. अज्ञान,अडाणी पणा , आडमुठेपणा यात फरक आहे. अज्ञानात सुचकता आहे, अडाणीपणात भाबडेपणा आहे तर आडमुठेपणात बेफिकिरी आहे.
जी भाषा तुम्हाला रोजी रोटी देते ती आपोआप शिकली जाते; बोलली जाते.
प्रकाश घाटपांडे
20 Jul 2008 - 4:28 pm | अवलिया
मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं?
मावशीच्या श्रीमंतीची लक्तरे बाजाराच्या वेशीवर टांगायला सुरवात झाली आहे ती तुम्ही कदाचित दुर्लक्षित केली असल्यास परत नीट बघा. अमेरिकेचे (व त्याचबरोबर इंग्लड्चे) हाल सुरु झाले आहेत; त्यामुळे भविष्यात अमेरिकेत नोकरी करायला जाणे हे काळ्यापाण्याच्या शिक्षेसारखे समजले गेले जाइल असाच आमचा होरा आहे. अर्थातच आंग्ल भाषा आलीच पाहीजे ही गरज नाही.
जी भाषा तुम्हाला रोजी रोटी देते ती आपोआप शिकली जाते; बोलली जाते.
प्रकाश घाटपांडेंनी जीवनाचे तत्व सांगितले आहे;
काल संस्क्रुत... पाली.... प्राक्रुत .... महाराष्ट्री.... आज इंग्रजी ......उद्या कदचित इराणी किंवा रशियन किंवा चीनी किंवा हिब्रु आपल्याला आत्मसात करावी लागु शकते....
काय सांगावे तुमची आमची मराठी किंवा संस्क्रुत सुद्धा यात धरता येईल (देव पाण्यात ठेवायला काय हरकत आहे ? )
मराठीला खरा धोका हिंदीकडुन आहे कारण इंग्रजी न बोलु शकणारा मराठी माणुस पट़कन हिंदीत संभाषण चालु करतो तसेच हिंदीतील शब्द मराठीत वापरतो
बदल काय घडेल हे सांगणे कठीण ... पण बदल निश्चित आहे...
नाना
20 Jul 2008 - 5:51 pm | विकास
मराठीला खरा धोका हिंदीकडुन आहे कारण इंग्रजी न बोलु शकणारा मराठी माणुस पट़कन हिंदीत संभाषण चालु करतो तसेच हिंदीतील शब्द मराठीत वापरतो
दुर्दैवाने, वरील विधान १००% पटते असेच म्हणावे लागत आहे! :)
20 Jul 2008 - 4:54 pm | शिप्रा
विकास ने छान लिहिले आहे..पटले..
अजुन एक विचार आला कि मि युरोप मध्ये पाहिले कि तेथिल लोकांना आपल्या मुलांशि इग्लिश भाषेत बोलायचि गरज भासत नाहि...किंवा आपल्याशिपण ति लोके स्वतच्याच भाषेत बोलतात आपल्याला कळाले नाहि तरि..मग आपल्याला (बहुतेक करुन मराठी लोकांना :P ) अशि गरज का भासते? :( आणि आई हि शाळा असते असे म्हणतात्..मग आई इंग्लिश भाषेत बोलल्यावर मुलाने मराठी कोणाकडुन शिकायचे? :( जास्त करुन परदेशात असु तर..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
20 Jul 2008 - 6:14 pm | विजुभाऊ
मराठी घरात जर मराठी भाषा बोलली गेली तर मुले आपोआपच मराठी बोलतात.
माझ्या घरात आम्ही मराठी व गुजराती तेवढ्याच सहजतेने बोलली जाते.
मराठीला जर वाचयचे असेल तर सर्वप्रथम हिन्दीचे आक्रमण थांबवले पाहिजे.
मराठीला गिळंकृत करणारे जर कोणी असेल तर ती आहे हिन्दी भाषा.
जोवर तळागाळातला माणुस रोजच्या व्यवहारात इंग्रजी वापरणार नसेल तोवर तरी आपण ३.५% कोणती भाषा बोलतो त्याचा काहीच फरक पडणार नाही.
मुलाना मातृ भाषा आलीच पाहिजे.
त्यासाठी पालकानी त्यांच्याशी मातृभाषेत संवाद केलाच पाहिजे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
21 Jul 2008 - 6:46 pm | llपुण्याचे पेशवेll
मराठी घरात जर मराठी भाषा बोलली गेली तर मुले आपोआपच मराठी बोलतात.
माझ्या घरात आम्ही मराठी व गुजराती तेवढ्याच सहजतेने बोलली जाते.
मराठीला जर वाचयचे असेल तर सर्वप्रथम हिन्दीचे आक्रमण थांबवले पाहिजे.
मराठीला गिळंकृत करणारे जर कोणी असेल तर ती आहे हिन्दी भाषा.
जोवर तळागाळातला माणुस रोजच्या व्यवहारात इंग्रजी वापरणार नसेल तोवर तरी आपण ३.५% कोणती भाषा बोलतो त्याचा काहीच फरक पडणार नाही.
मुलाना मातृ भाषा आलीच पाहिजे.
त्यासाठी पालकानी त्यांच्याशी मातृभाषेत संवाद केलाच पाहिजे
वाक्य अन् वाक्य पटले विजुभाऊ तुमचे. मातृभाषा आहे ती प्रत्येकाने शिकलीच पाहीजे. त्याबाबत तडजोड करता कामा नये असे वाटते. त्यामुळे "जी भाषा रोजीरोटी देते ती शिकली जाते" ही मराठी माणसाच्या क्षीण झालेल्या अस्मितेमुळे कोणीही बाहेरचा माणूस येऊन मराठी शिकत नाही हे सत्य स्वीकारायचे नसल्यामुळे काढलेली पळवाट आहे असे मला वाटते. बंगालमधे जाऊन बघा भाषिक अस्मिता काय असते ते कळेल. बंगालात इंग्रजीमाध्यमातून शिकलेली मुले इंग्रजीइतकेच बंगाली वाङमय वाचतात. पण तेच प्रमाण इंग्रजीमाध्यमातून शिकलेल्या मराठी कुटुंबात जन्मलेल्या मुलांच्या बाबतीत अत्यल्प आहे.
पुण्याचे पेशवे
20 Jul 2008 - 7:08 pm | धोंडोपंत
मराठी भाषेच्या वापराच्या विरोधात मराठी संकेतस्थळावर मराठी माणसांचे विचार वाचून आम्ही आश्चर्यचकित झालो.
माय मराठी माते! तू अमृताला पैजेने जिंकणारी आहेस. पण आज तुझ्याच घरात तुझ्याच लोकांकडून तुझ्याबद्दल काय लिहिले जाते आहे ते ऐक.
आपला,
(उद्विग्न) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
20 Jul 2008 - 7:33 pm | प्रियाली
कटु सत्य हे असेच असते त्यामुळे चकित होण्याची गरज नसावी. ते जर ऐकायचे नसेल तर दुसरे आपल्यापेक्षा न्यून आहेत हे समजून आपल्या कम्फर्ट झोनमध्ये रहावे किंवा योग्य नस ओळखून त्यावर निर्णय घ्यावा.
वर विकास यांनी त्यांच्या डॉक्टरबद्दल सांगितले. परंतु अमेरिकेतील सर्वच डॉक्टर असे सांगतात असे नाही. अनेक डॉक्टर मुलांना फक्त इंग्रजी शिकवा. नाहीतर, डेकेअर, शाळेत ते एकटे पडून एकलकोंडे होतील असेही सांगतात आणि सुरूवातीला असे होताना पाहिले आहे. (व्यक्तिशः मुलांना एकच भाषा शिकवणे मला पटत नाही. लहान मुले एकाहून अधिक भाषा सहज आत्मसात करतात.) तसेच, लहान मुलांना मराठी शिकवणे आपल्या हातात असते. ती मोठी झाल्यावर त्यांनी कोणत्या भाषेत करावे हे आपल्या हातात नसते.
जसे, आज मूल २-३ वर्षांचं आहे ते आपल्या आईवडिलांशी मराठीतून बोलेल. कदाचित, आपल्या ज्येष्ठांशी मराठीतून बोलेल. परंतु शाळेत जाऊ लागल्यावर आपल्या मराठी मित्रमैत्रिणींशी मराठीत बोलेल असे सांगता येत नाही. याचे कारण, मित्रमंडळींच्या संगतीत मूल जी भाषा बोलते (म्हणजे शाळेत) तीच भाषा सहसा संवादासाठी वापरते. उद्या मोठं झाल्यावर तिला/ त्याला जसा जोडीदार मि़ळेल आणि त्या कुटुंबाची जशी भाषा असेल तशीच भाषा आपल्या मुलांसाठी वापरेल.
आणि हे केवळ मराठी लोकांचं होतं आहे असे चर्चेत म्हटले आहे ते कोणी सांगितलं? भारतात सर्वत्र हीच रड आहे. मराठी शाळांत शिक्षण घेणे हे कमीपणाचे आहे. व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही असा (गैर)समज जेव्हा लोकांच्या डोक्यात उत्पन्न झाला तेव्हाच या सर्वाची सुरूवात झाली. त्यामुळे आज इतक्या वर्षांनी एखाद्या व्यक्तिवर टिका करणे गैरलागू आहे. ही टिका संपूर्ण समाजाच्या विचारसरणीवर व्हायला हवी कारण ती करण्यार्यातले बहुसंख्य आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतच धाडतात.
21 Jul 2008 - 12:05 pm | छोट्या
कसं असतय प्रियालीताई..
भाषा हे एक प्रमुख साधन असते आपली माणसं ओळखण्यासाठी.
इंग्रजी शिकण्याबाबद वाद नाही, पण आपल्याच लोकांत जर आपलीच भाषा येत नसेल तर... धोब्याच्या कुत्र्यासारखी हालत होते.
काही प्रमाणात तुम्ही म्हणताय तशी हालत असु शकेल, पण ज्यांना स्वतःलाच धेडगुजरे व्हायचे आहे त्यांच्या बाबतीत काय बोलणार? आणि ज्यांची मातॄभाषा (आईची भाषा) च इंग्रजी आहे ती मुले मराठी कशी असतील?
इंग्रजी शिकण्याचे खुप मार्ग आहेत... पण मराठी शिकण्यासाठी आईसारखे दुसरे माध्यम नाही...
आणि तुम्ही जर त्याचे समर्थन करत असाल तर, त्याहुन दुसरे दुर्भाग्य नाही!!!
21 Jul 2008 - 12:26 pm | सुनील
मला वाटते की प्रियालीताईंनी फक्त वस्तुस्थिती सांगितलेली आहे. त्याचे समर्थन केले आहे असे दिसत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jul 2008 - 2:04 pm | प्रियाली
:? वस्तुस्थिती म्हणजे समर्थन असते का?
की सर्व मराठी माणसे मराठी असल्याने मराठी शाळांत जाऊन घरात मात्र फाडफाड इंग्रजी बोलतात असे लोकांना वाटू लागले आहे?
21 Jul 2008 - 2:58 pm | छोट्या
समजा की चोराच्या कुटुंबात एखाद्याने जन्म घेतला म्हणजे चोरीच केली पाहिजे असे आहे का? किंवा डॉक्टरच्या कुटुंबात सर्वांनी डॉक्टर व्हायला हवे का? तेव्हा एखाद्या कुटुंबात जन्म घेतला म्हणजे माणसाने तसेच वागायला पाहिजे असे नाही.
जर आई आणि मुले इंग्रजीतून लीलया संवाद साधू शकत असतील तर इंग्रजीतून बोलतील.
जर त्यांना इंग्रजी बोलण्यात धन्यता/ कम्फर्ट/ आवड इ. असेल तर ते आपल्या मुलांशीही इंग्रजीतच बोलणार.
याला इंग्रजी चे समर्थन नाही म्हणायचे तर दुसरे काय?
वस्तुस्थिती वस्तुस्थिती म्हणुन जो ठो ठो सुरु आहे ती तरी वस्तुस्थिती आहे काय?
किती % लोंकाची गोष्ट करता तुम्ही?
की मराठी लोकं फक्त शहरातच रहातात असं वाटायला लागलय आता.
21 Jul 2008 - 3:15 pm | प्रियाली
हीच तर वस्तुस्थिती आहे कारण लोक हेच करत आहेत.
मी टक्केवारी काढलेली नाही. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही शोधून काढावी.
मला शहरातील लोक माहित आहेत. तुम्हाला गावातील माहित असतील तर त्यांच्याबद्दल स्वतंत्र प्रतिसाद लिहा.
21 Jul 2008 - 3:25 pm | छोट्या
लहानपणी एक हत्ती आणि ९ कि १० आंधळ्यांची गोष्ट वाचली होती. ती आठ्वली अचानक.
त्यात ना प्रत्येक आंधळ्यांला हत्तीचे जे जे अवयव हाती येत होते, त्याला तो तसाच वाटत होता...
मग शेवटी एक डोळस माणूस येउन त्यांना खरी वस्तुस्थिती सांगतो... असच काहीस होतं...
शेवटी आपल्या त्रिज्येबाहेर लोकांना समजत नाही हेच खरं.
21 Jul 2008 - 6:03 am | नि३
मराठी भाषेच्या वापराच्या विरोधात मराठी संकेतस्थळावर मराठी माणसांचे विचार वाचून आम्ही आश्चर्यचकित झालो.
-----१००% सहमत
प्रियाली ताई ची प्रतीक्रिया वाचुन खर सांगु खुप वाईट वाटल .....ह्म्म .. असो
---नितिन.
21 Jul 2008 - 6:14 am | ईश्वरी
>>मराठी घरात जर मराठी भाषा बोलली गेली तर मुले आपोआपच मराठी बोलतात.
विजूभाऊंशी सहमत.
>>अनेक डॉक्टर मुलांना फक्त इंग्रजी शिकवा. नाहीतर, डेकेअर, शाळेत ते एकटे पडून एकलकोंडे होतील असेही सांगतात आणि सुरूवातीला असे होताना पाहिले आहे.
असे डॉक्टर सांगतात हे माझ्या तरी पाहण्यात वा ऐकीवात नाही. मुले अनुकरणप्रिय असतात. लहान वयात त्यांच्या कानावर पडणारी भाषा ती सहज आत्मसात करू शकतात.
दोन वर्षापूर्वी माझी मुलगी पण तान्ही असताना तिच्या अमेरिकन डॉक्टर नी आम्हाला सांगितले होते की इंग्लिश बरोबर तुमची मातृभाषा ही तिच्याबरोबर संवाद साधताना वापरा.
माझ्या मुलीशी आम्ही मराठी मध्येच बोलतो . आणि मला अशी अजिबात भीती नाही की ती शाळेत जाऊ लागल्यावर इंग्लीश समजत नाही म्हणुन एकलकोंडी होईल. माझी मोठी मुलगी पहिल्यांदा अमेरिकन शा़ळेत गेली त्यावेळेस आम्ही शाळेच्या मुख्याध्यापि़कांबरोबर व तिच्या वर्ग शिक्षिकेबरोबर याबाबतीत बोलली होतो. त्यांना आम्ही सांगितले होते की आम्ही घरी इंग्लीश बोलत नाही , वेगळी भाषा बोलतो. पण त्यांनी आम्हाला हेच सांगितले की मुले या वयात एखादी भाषा पटकन शिकतात. मुलीला इंग्लीश भाषेची अडचण फारशी भासणार नाही. आणि झालेही तसेच. ती त्या शाळेत व्यवस्थित रूळली.
माझे तरी असे मत आहे की मातृभाषा आलीच पाहीजे आणि आईवडीलांनी तरी आपल्या मुलांशी त्या भाषेत बोलावे. (जरी आईवडीलांचे शैक्षणिक माध्यम इंग्लीश असले तरी)
ईश्वरी
21 Jul 2008 - 6:19 am | प्रियाली
असे सांगणारे डॉक्टर भेटले आहेत. अर्थात, त्यांनी डॉक्टरांचे म्हणणे मानले नाही ही गोष्ट वेगळी आणि त्यांनी ती मानावी असेही मी सुचवत नाही.
परंतु, एक लक्षात घ्या तुमचे जे मत आहे ते इतरांचे मत असावे असे काही नाही आणि असे मत नसणारे समाजात अधिक आहेत याला मराठी भाषेचे दुर्दैव मानायला हरकत नाही.
बाकी, घरात जी भाषा बोलली जाते ती मुले बोलतात. अगदी एक नाही, तर चार भाषा बोलतात. माझ्या मुलीलाही मराठी, इंग्रजी आणि हिंदी व्यवस्थित कळतं आणि बोलता येतं.
काही लोकांना वर उद्विग्नता आली आहे, दु:ख झालं आहे माझे प्रतिसाद वाचून. त्यांना प्रतिसाद कोणाबद्दल आहे आणि त्याचा आशय काय हेच समजलेले नाही. :( ज्यांना आपली भाषाच समजत नाही ते तिला काय राखणार कप्पाळ!
असो.
21 Jul 2008 - 8:26 am | ईश्वरी
>>परंतु, एक लक्षात घ्या तुमचे जे मत आहे ते इतरांचे मत असावे असे काही नाही
परंतु हे माझेच मत आहे आणि हे मी त्या वाक्याच्या सुरवातीलाच म्हटले आहे. माझे मत इतरांचेही मत असावे असे मी कुठेच म्हटले नाही. आणि तसे सांगण्याचा हेतूही नाही.
ईश्वरी
21 Jul 2008 - 8:19 am | पक्या
आईने आपल्या मुलांशी मातृभाषेत संवाद साधावा ह्या मताशी मी पण सहमत आहे. त्यामुळेच प्रियालीताईंचा प्रतिसाद मलाही आवडला नाही.
>>काही लोकांना वर उद्विग्नता आली आहे, दु:ख झालं आहे माझे प्रतिसाद वाचून.
मला वाटते प्रियालीताईंच जरा जास्त उद्विग्न झाल्या आहेत .
>>ज्यांना आपली भाषाच समजत नाही ते तिला काय राखणार कप्पाळ!
हे बोलणं जरा जास्तच झालयं.
तुमच्या भल्यामोठ्या प्रतिसादातील आशय बर्याच जणांना समजला नसेल तर तुमचे मत्/आशय तुम्ही लो़कांपर्यंत पोहचवण्यात कमी पडलात असेही असू शकते.
21 Jul 2008 - 1:49 pm | प्रियाली
अगदी बरोबर बोललात. काय आहे की लोकांना आवडणारा प्रतिसाद द्यायला हवा होता मी. सत्यपरिस्थिती काय हो? डोळे बंद केले, झापडं लावली की सत्य कसं दिसणार? ते सत्य दाखवलं म्हणून तर प्रतिसाद आवडला नाही अनेकांना. असो, तो आवडावा म्हणून लिहिलेलाही नाही याची खात्री बाळगा.
मला वाटतं माझ्या प्रतिसादातील आशय अनेकांना समजला आहे. ज्यांना तो समजला नाही त्यांना उदाहरणादाखल आलेल्या वरील माणसांचे असे का झाले असावे यांत रूची नसून "मी माझ्या मुलांशी कसा वागतो" हे सांगण्यात रूची आहे किंवा वस्तुस्थिती बघायचीच नाही आहे.
बाकी तुमचंही म्हणणं बरचसं खरं आहे. मूळ लेखावर कोणतीही टिप्पणी न करता, लोकांचे असे का होते आहे हे न पाहता "मी मुलांना मराठी शिकवते. माझी मुलं मराठी बोलतात. मराठी विश्वात सारं काही आलबेल आहे" असा प्रतिसाद दिला असता तर तो अनेकांना कळला असता.
21 Jul 2008 - 2:46 pm | विकास
मला वाटतं माझ्या प्रतिसादातील आशय अनेकांना समजला आहे. ज्यांना तो समजला नाही त्यांना उदाहरणादाखल आलेल्या वरील माणसांचे असे का झाले असावे यांत रूची नसून "मी माझ्या मुलांशी कसा वागतो" हे सांगण्यात रूची आहे किंवा वस्तुस्थिती बघायचीच नाही आहे.
हा प्रतिसाद माझ्या आधीच्या वरील प्रतिसादास पण असू शकतो म्हणून थोडक्यात त्या बद्दल आणि इतर त्याच पद्धतीच्या वरील प्रतिसादांबद्दलः
"मी माझ्या मुलांशी कसा वागतो" इतके सांगणे असा कोता अर्थ नाही तर जो एक न्यूनगंड इंग्रजीच्या बाबतीत ठेवून स्वतःची भाषेकडे दुर्लक्ष करण्यापर्यंत जातो त्याची काही गरज नसते हे अनुभव म्हणून सांगण्याचा प्रयत्न होता. त्यात जसा माझा अनुभव होता/आहे तसाच इतरांबद्दल सांगितलेला पण आहेच (मराठी-गुजराथी आणि मराठी-इंग्रजी जोडप्यांची मुले).
वर चित्राने म्हणल्याप्रमाणे असे देखील अनेक पाहीले आहेत ज्यांच्याबाबतीत त्यांना इंग्रजी चांगले येते अशातला भाग नसतो. तसे मी कॉलेजात गेल्यावर पाहीले आहेत ज्यांचे नाधड इंग्रजी (माध्यमात शिकून) उत्तम होते ना धड मराठी... हे अर्थातच अपवाद सोडल्यास विशेष करून मराठी कुटूंबांत, अमराठी नाही. आता कोणी म्हणेल की मराठी माध्यमात जाऊन मराठी चांगले येते असे कुठे आहे. पण प्रश्न इंग्रजीवर चुकीचा भर देऊन काही विशेष चांगले होते असे नाही इतकेच निरीक्षणांवरून वाटते.
आता मी अगदी आत्ता आत्ता अनुभवलेले दुसरे एक उदाहरण... एका सार्वजनीक ठिकाणी अमेरिकेत एक साठीच्या घरातील साडीतील, दागीने, कुंकू इत्यादीने सजलेली बाई भेटली. तिला तीच्याकडे असलेला मोबाईल काही कारणाने वापरता येत नव्हता आणि कॉलिंग कार्ड कसे वापरायचे ते समजत नव्हते. तिने मला आधी इंग्रजीत विचारले की कार्ड कसे वापरायचे म्हणून (इंग्रजी येथे योग्यच होती), कारण त्यांना त्यांच्या मुलाशी संपर्क करून त्या कुठे आहेत हे सांगायचे होते. मी माझा मोबाईल त्यांना दिला आणि म्हणालो की करा याच्यावरून. त्या संभाषणात त्यांना मी मुंबईचा वाटलो आणि त्यांनी विचारले की तू मराठी आहेस का? म्हणले हो. मग प्रेमाने अस्खलीत मराठी बोलू लागल्या. पण नंतर मुलाला फोन लावून दिल्यावर त्याच्याशी मात्र १००% इंग्रजीतच! "धिस जेंटलमन वॉज काईंड इनफ..." अर्थात येथे त्यांचा न्यूनगंड तेंव्हा नव्हता. पण कुठेतरी इतके नक्की वाटले, की भारतात जेथे कुठे त्या राहील्या तेथे मुलाला वाढवताना इंग्रजीवर भर दिला आणि आता मुलगा, असे दिसतंय की मराठी बोलणे टाळतच असावा...आता परत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यावर तेंव्हा निरीक्षण करून सोडून दिले पण माझा मला प्रश्न नक्की पडला की असा स्वभाव तयार करण्याची काही गरज आहे का?
रोजी रोटीचाच प्रश्न असता तर विचार करा की मध्यप्रदेशात, गुजराथेत बडोदा प्रांतात आणि इतरत्र त्या त्यावेळेस रोजीरोटीकरताच गेलेल्या आपल्यामाणसांना परभाषिक प्रातांत त्यांची भाषा आत्मसात करत असताना देखील स्वत:च्या भाषेबद्दल प्रेम आणि आस्था कशी राहीली. आज येथे माझ्या अवतीभवती अनेक आहेत जे असे भारतातील विविध प्रांतात पिढ्यान पिढ्या स्थायीक झालेल्या मराठ कुटूंबातील आहेत - त्यांना तेथील राज्यभाषा, मराठी आणि नंतर अर्थातच इंग्रजी अस्खलीत येते, कशाबद्दलच आकस नाही, किंबहूना प्रेमच आहे. गुजराथी समाजात केवळ बनीयाच नाही तर अगदी चांगले मोठे डॉक्टर्स आणि इतर प्रथितयश व्यावसायीक पाहीले आहेत - त्यांच्याकडे इंग्रजी अर्थातच चांगले येते पण तितकेच चांगले, जेंव्हा घरात इंग्रजीची अतिरीक्त गरज नसते, तेंव्हा गुजराथी पण वापरात असते.
मूळ मुद्दा असा राहतो की आपण जी कुठली भाषा शिकतो त्यातील वाड्मय शिकतो का? काही नवीन विचार समजून घेतो का? नाहीतर कशाचाच काही उपयोग नाही... इंग्रजीचा अथवा मराठीचापण...आज बर्याचदा "फाडफाड इंग्रजी फाडणारे" जे वरील (चर्चेच्या सुरवातीच्या) तीन उदाहरणात सांगीतलेत त्यांना म्हणूनच आपल्याला या शिवाय पर्याय नाही अशा भितीने पछाडलेले असते असे वाटते.
मराठीत आपण बोलायचे अथवा मुलांना शिकवायचे, याचा अर्थ आपण "गर्वसे कहो हम मराठी है" ("उप्स" हे हिंदीत लिहीले :) ) असे म्हणावे असा नाही. म्हणून या चर्चेच्या सुरवातीस जी काही उदाहरणे दिली गेली त्यात "त्या माणसांचे असे का झाले असावे" याचे कारण शोधताना "बॉटमलाईन" उत्तर केवळ "न्यूनगंड" असेच द्यावे लागते आणि नकळत न्यूनगंडाने जेंव्हा असा समाज पछाडला जाणे हे काही चांगले लक्षण वाटत नाही.
21 Jul 2008 - 3:05 pm | प्रियाली
केवळ तुमचाच नाही पण अनेकांचा. मूळ विषय सोडून प्रत्येकजण मी काय करतो, परदेशात राहून मराठी कसा जपतो हे सांगतो आहे आणि लेखातील प्रश्न भारतात का उद्भवले याकडे काणाडोळा करतो आहे याची मजा वाटली. असो, मूळ विषय केवळ न्यूनगंड असे मला वाटले नाही.
हे मला समजतं पण इतरांच्या सर्व गोष्टी न्यूनगंड म्हणून बाद करताना (त्या न्यूनगंड असण्याबद्दल माझे काही म्हणणे नाही) असा विषय निघाला की परदेशातील पालक किती हिरिरिने आम्ही आमच्या मुलांना मराठी कसे बोलायला शिकवतो आहोत हे सांगायला पुढे येतात नाही (मीही अनेकदा हे केलं आहे म्हणून यावेळेस वेगळा विचार.) याला आपला न्यूनगंड म्हणायचा की बडेजाव? ;) ह. घ्या.
तुम्हीच सांगा. विचार केलात तर उत्तर मिळेल. हिंट्स देते: रोजीरोटीसाठी या प्रांतात लोक किती वर्षांपूर्वी गेले? त्यांच्या शिक्षणाचे माध्यम काय होते? त्यांचे पालक आणि ते स्वतः कोणत्या माध्यमात शिकले होते? आणि या संस्थानांचे शासक कोण होते? (देव करो आणि अमेरिकेला मराठी राष्ट्राध्यक्ष मिळो ;) )
हुश्श! हे माहित असल्याबद्दल लाख धन्यवाद. घरी मराठी बोलून आणि शिकवून मराठी येईलच असे नाही. (हे सार्वत्रिकरण नाही. काही पालक अतिशय जागरूक असू शकतात आणि ते आपल्या पाल्यांबाबत असे करूही शकतील) मराठी बोलणे म्हणजे मराठी वाचणे, लिहिणे, साहित्य आणि काव्याची जाणीव असणे नाही आणि भारतात मराठी दुसरी किंवा तिसरी भाषा तीही यत्ता १०-१२ पर्यंतच शिकवली गेली तर भविष्यात ती टिकून राहणेही कठिण. तेव्हा घरात मुलांशी मराठी बोलणारे आपण आणि सर्वत्र इंग्रजीतून संवाद साधणारे इतर पालक यांत खूप खूप मोठा फरक नाही.
21 Jul 2008 - 3:10 pm | छोट्या
मराठी बोलणे म्हणजे मराठी वाचणे, लिहिणे, साहित्य आणि काव्याची जाणीव असणे नाही.
त्रिवार हा हा हा!!!
घरी मराठी बोलून आणि शिकवून मराठी येईलच असे नाही. अजुन एकदा =)) =)) :H
21 Jul 2008 - 3:58 pm | विकास
केवळ तुमचाच नाही पण अनेकांचा. मूळ विषय सोडून प्रत्येकजण मी काय करतो, परदेशात राहून मराठी कसा जपतो हे सांगतो आहे आणि लेखातील प्रश्न का उद्भवले याकडे काणाडोळा करतो आहे याची मजा वाटली. असो, मूळ विषय केवळ न्यूनगंड असे मला वाटले नाही.
माझे सुरवातीचे वाक्य लिहीले त्यावरून सोयीस्कर अर्थ काढला की मी अथवा इतर "परदेशात मराठी कसे जपतो" यावर लिहीतो म्हणून पण त्या खालील पुढचे वाक्य वाचले नाही अथवा ते महत्वाचे वाटले नाही...
"मी माझ्या मुलांशी कसा वागतो" इतके सांगणे असा कोता अर्थ नाही तर जो एक बर्यन्यूनगंड इंग्रजीच्या बाबतीत ठेवून स्वतःची भाषेकडे दुर्लक्ष करण्यापर्यंत जातो त्याची काही गरज नसते हे अनुभव म्हणून सांगण्याचा प्रयत्न होता. त्यात जसा माझा अनुभव होता/आहे तसाच इतरांबद्दल सांगितलेला पण आहेच (मराठी-गुजराथी आणि मराठी-इंग्रजी जोडप्यांची मुले). तसाच अजून एक मुद्दा डॉ़क्टर्स (जे हार्वर्डसारख्या ठिकाणी शिकवतात पण) शास्त्रीय दृष्टीकोनातून काय सांगतात हा पण मुद्दा होता.
येथे परदेशात मराठी जपण्यासाठी म्हणून कोणी काही करत नाही आहे तर त्या आपल्या भाषा आहेत असे मनातून वाटत असल्याने आपसूक - ओढून ताणून नव्हे - वापरत आहोत. आणि ते करण्यामुळे नाधड आमच्या (अथवा आमच्या मुलांच्या) इंग्रजीत व्यत्यय येतो ना मराठीत. बर्याचदा मराठीकडे दुर्लक्ष अथवा उगाच इंग्रजीत बोलण्याच्या पद्धतीत त्याला पर्याय नाही असा न्यूनगंड असतो असे मला वाटते. म्हणूनच त्या संदर्भात नंतर गुजराथी बनीया आणि त्यांच्यातीलच डॉक्टर्स आणि इतर प्रथितयश व्यावसायीकांचे उदाहरण दिले आहे. तेच चायनीज संदर्भात आणि काही अंशी पंजाबी लोकांसंदर्भात बोलू शकतो. त्यांना न्यूनगंड नसल्याने स्वतःची आणि इंग्रजी भाषा येतातच आणि रोजीरोटीसाठी नुसती इंग्रजी म्हणत नाहीत.
तुम्हीच सांगा. विचार केलात तर उत्तर मिळेल. हिंट्स देते: रोजीरोटीसाठी या प्रांतात लोक किती वर्षांपूर्वी गेले? त्यांच्या शिक्षणाचे माध्यम काय होते? त्यांचे पालक आणि ते स्वतः कोणत्या माध्यमात शिकले होते?
मुद्दा किती वर्ष/पिढ्यांपूर्वी गेले हा नाही आहे तर रोजीरोटीसाठी गेले आणि तरी त्यांना प्रश्न आला नाही हा आहे. आणि आत्ताच्या पिढीतील जे मला माहीत आहेत ते सर्व इंग्रजी माध्यमातूनच शिकलेले आहेत. पण त्यांना ना मराठीचे वावडे ना इंग्रजीचे ना गुजराथी अथवा हिंदीचे...
हुश्श! हे माहित असल्याबद्दल लाख धन्यवाद.
हे मला माहीत आहे हे समजून घेतल्याबद्दल आभार! पण म्हणून चर्चेचा मूळ मुद्दा बदलत नाही... उगाच कारण नसताना मराठी येत असून फाडफाड इंग्रजी अथवा मुंबईत हिंदी बोलण्याचे कारण नाही असेच मला वाटते. त्यात मला न्यूनगंडच दिसतो आणि न्यूनगंड ठेवून विकास (म्हणजे मी नाही!) होतो असे मला वाटत नाही.
21 Jul 2008 - 4:50 pm | प्रियाली
मूळ लेखावरून विशेषतः पहिल्या आणि तिसर्या उदाहरणावरून (दुसरे नेमके काय आहे ते अद्याप कळलेले नाही) मराठीकडे दुर्लक्षच होत असेल असे ठाम सांगता येत नाही. जसे तुम्ही तुमच्या पाल्याशी घरी मराठीत बोलता तसे त्या पालकांनी आपल्या मुलांशी रस्त्यावर इंग्रजी बोलायचे असे ठरवले असेल तर? कशावरून ते घरात मराठी बोलत नसतील? लेखक याबाबत काहीही स्पष्टीकरण देत नाही.
असं का होतं की आम्ही आमचे अनुभव सांगताना इतर कसे चुकीचे हे दर्शवत राहतो?
असेल पण मग कदाचित मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या तोंडून आपसूक इंग्रजी निघणार नाही आणि त्याची उत्तरे तुम्ही इंग्रजीत देणार नाही याची खात्री देता येईल काय? अनेकांनी आपण मुलांना मराठी शिकवतो, गाणी-गोष्टी शिकवतो असेच लिहिले आहे. त्यात काहीही गैर नाही, मीही हेच करते परंतु मग इंग्रजी माध्यमात जाणार्या आपल्या पाल्याला पालकांनी "ट्वींकल ट्विंकल लिटल स्टार" शिकवले आणि ते समजा तुम्ही कधी ऐकले तर तेवढ्याशा लहान कृतीवरून तुम्ही त्यांचे न्यूनगंड काढाल का? कशावरून ते नाच रे मोराही शिकवत नसतील. (गाणी केवळ उदाहरणांदाखल घेतली आहेत.)
अहो मग मूळ लेखातून या लोकांना मराठीचे वावडे आहे हे कुठे समजते? केवळ काही लोक काही ठिकाणी इंग्रजी संभाषण करत होते इतकेच सांगितले आहे ना. त्यापैकी कोणी "शी काय ती मराठी" किंवा "आम्ही नाही हो आमच्या मुलांना मराठी शिकवत" असे म्हटलेले नाही. हे लोकही कदाचित इतरत्र अनेक वेळेला मराठी बोलत असतील नाहीतर महाबळेश्वरला भेटलेल्या, बसमध्ये दिसलेल्या आणि बाजारात भेटलेल्या माणसांची मातृभाषा मराठी आहे हे लेखकाला कसे कळले?
हेच आणि मला त्यात न्यूनगंड दिसत नाही. जाणीवेचा अभाव दिसतो. आपली भाषा मराठी आहे किंवा ती शिकून आपला झाला तर फायदाच आहे, नुकसान काहीही नाही ही जाणीव लोकांच्या मनातून नाहीशी होत चालली आहे आणि याला कारणीभूत आपली शिक्षणव्यवस्था, (आता परदेशात कारकूनी करण्याची ;) ) आपली स्वप्नं कारणीभूत आहेत.
22 Jul 2008 - 5:26 am | पक्या
>>जसे तुम्ही तुमच्या पाल्याशी घरी मराठीत बोलता तसे त्या पालकांनी आपल्या मुलांशी रस्त्यावर इंग्रजी बोलायचे असे ठरवले असेल तर? कशावरून ते घरात मराठी बोलत नसतील? लेखक याबाबत काहीही स्पष्टीकरण देत नाही.
अहो पण लेखकाने ही घटना रस्त्यावर अनोळखी व्यक्तींच्या बाबतीत पाहीली असेल तर तो त्या व्यक्ती घरात मराठी बोलतात की नाही ह्याचे कसे काय स्पष्टीकरण देऊ शकेल. हा मुद्दा गौण आहे.
इथे मुद्दा हा आहे की मराठी माणसाने जास्तीत जास्त व शक्य तिथे मराठी बोलायला हवे. आणि आईवडील हे काम आपल्या मुलांच्या बाबतीत व्यवस्थित करू शकतात. त्या मुलांचा व आईचा 'इंग्रजीचा सराव' हा हेतू नसेल तर त्यांनी फक्त घरातच का रस्त्यावर ही मराठी बोलायला हवे ..जर त्यांची मातॄभाषा मराठी असेल तर आणि मराठी नसेल तर जी काय त्यांची मातॄभाषा असेल त्यात बोलायला हवे. इंग्रजीचा आधार कशाला हवा?
>>मूळ विषय सोडून प्रत्येकजण मी काय करतो, परदेशात राहून मराठी कसा जपतो हे सांगतो आहे आणि लेखातील प्रश्न का उद्भवले याकडे काणाडोळा करतो
मला नाही वाटत की ज्यांनी आपले अनुभव कथन केले त्यानी मूळ प्रश्नाकडे कानाडोळा करण्याच्या हेतूने व स्वतःचा बडेजाव मिरवण्याच्या दृष्टीने ते केले. परदेशातील आया आपल्या मुलांशी आजूबा़जूच्या इंग्लीश वातावरणातही त्यांना मराठी शिकवायचा प्रयत्न करतात , घरातील सर्व एकमेकांशी मराठी मध्ये बोलतात हे वाखाणण्याजोगेच आहे. आणि हाच अनुभव इतरांना कथन केला तर त्यात हेच सांगण्याचा हेतू दिसून येतो की मराठी बोलण्याची सवय आईवडीलांनीच आपल्या मुलांना लहानपणापासून लावली तर मुलेही छान मराठी बोलू शकतात. ह्यात मला तरी कुठेही बडेजावाचा हेतू दिसत नाही.
22 Jul 2008 - 5:32 am | प्रियाली
गौण कसा? त्याने एक प्रसंग पाहिला, माणसे अनोळखी होती. नेमके असेच होते वगैरे माहित नव्हते आणि निष्कर्ष कसा काढला? त्याने काढला तो काढला इथल्या सर्वांनीही कसा काढला? कदाचित आई बाहेरच्या जगात मुलांना काय बोलावे याचे धडे देत होती असे का वाटले नाही. मला वाटतं फारशी माहिती नसताना लोकांना दुसर्यांची उणीदुणी काढायला आवडतात - गॉसिपिंग करायला आवडतं आणि आम्ही नाही हो त्यातले हे सांगायला आवडतं, त्यातलाच हा एक प्रकार असावा.
मराठी माणसाने जरूर मराठी बोलायला हवे. परंतु त्या आईवडिलांनाच मराठी येत नसेल तर काय कराल? हेच कधीचे सांगते आहे की याची सुरूवात काल-परवा नाही झालेली. जर आई वडिलांनाच जाणीव नसेल तर मुलांना कशी यायची? त्यांचा समज इंग्रजी ही एकच भाषा उपयोगाची आहे असा होतो आणि तो न्यूनगंडापेक्षा वेगळा आहे.
आहे ना पण विषय परदेशांत मुलांना मराठी शिकवण्याबद्दल नाही आहे. भारतात लोक असे का वागत आहे त्याबद्दल आहे. बडेजाव मिरवत नाही हे जसे तुम्ही सांगता तसे इतरही कदाचित न्यूनगंडाने असे करत नसतील हा संशयाचा फायदा तरी का देत नाही?
22 Jul 2008 - 12:34 pm | पक्या
>> आहे ना पण विषय परदेशांत मुलांना मराठी शिकवण्याबद्दल नाही आहे. भारतात लोक असे का वागत आहे त्याबद्दल आहे. बडेजाव मिरवत नाही हे जसे तुम्ही सांगता तसे इतरही कदाचित न्यूनगंडाने असे करत नसतील हा संशयाचा फायदा तरी का देत नाही?
बरोबर आहे विषय परदेशांत मुलांना मराठी शिकवण्याबद्दल नाहीचे मुळी. पण 'आता तुम्हीच सांगा' या शीर्षकाखालील प्रतिसादात 'बडेजावा' बद्द्ल आपण लिहील्याने त्या अनुषंगाने तो प्रतिसाद मी लिहीला आहे. (ह.घ्या आपण लिहीले आहेच तरीही तो मुद्दाही बाहेर आलाच आहे तर त्यावर ही चर्चा व्हावी एवढाच हेतू ).
चर्चा भारतातील लोक असे का वागत आहे ह्यावरच चालू आहे. आणि त्याच अनुषंगाने जर परदेशातील लोक आपल्या मुलांना मराठी शिकवण्याच्या प्रयत्नात आहेत तर भारतातील मराठी लोकांना तर तो प्रयत्न करणे जड जाऊ नये अशा आशयाचा मुद्दा मांडला गेला आहे. आई ईंग्रजी माध्यमात शिकली असेना का ती मुलांशी केव़ळ तिचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे म्हणुन मुलांशी मराठी बोलू शकत नाही वा बोलत नाही ...हे काही पटत नाही . महाराष्ट्रातील अमराठी लोकांना ही चांगले मराठी येते.(जे नव्याने महाराष्ट्रात आले आहेत ते सुद्धा दोनेक वर्षात चांगले मराठी बोलायला शिकतात हे मी स्वत: पाहीले आहे.) मातृभाषेत बोलण्याविषयीची जाणीव ही मातृभाषेवरील प्रेमाने आणि अभिमानानेच निर्माण होते. म्हणजे अभिमान आहे प्रेम आहे तरी जाणीव मात्र बोथट झाली असे कसे होईल?
जास्तीत जास्त आणि शक्य तिथे मराठी बोलायला हवे.
21 Jul 2008 - 2:48 pm | पक्या
>>जर आई आणि मुले इंग्रजीतून लीलया संवाद साधू शकत असतील तर इंग्रजीतून बोलतील. आपल्या उदाहरणातील आईला आपल्या मुलांबद्दल कदाचित तसा विश्वास असावा.
इथे तुम्ही या माणसांचे असे का झाले हे सांगत आहात . पण ही १०० % वस्तुस्थिती नाहीये. ह्यात मराठी बोलताना वाटणारा कमीपणा , भर लोकात इंग्रजी बोलल्याने मिळणारी (खोटी ) प्रतिष्ठा , मला छान इंग्रजी येते/ आम्ही छान इंग्रजी बोलू शकतो हे दाखवण्याचा अट्टाहास वगैरे कारणे पण असू शकतात. आणि ती बहुतांश असतात. मुले काय त्यांना मराठी तुन संवाद साधण्याची लहानपणीच सवय लावली तर ती पण नक्कीच मराठी छान बोलतील.
कोणत्या भाषेतून बोलायचे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असला तरी वरील कारणांसाठी मातृभाषा सोडून इंग्रजी चा आधार घ्यावा हे काही पटत नाही.
हा जर मुलांना इंग्रजी संवादकौशल्य शिकवायचे आहे , इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे तर ती माऊली जे काही करत आहे ते योग्य असावे .
तुम्ही पूर्णपणे सत्यपरिस्थिती मांडली नाहीत असे वाटल्याने तुमचा प्रतिसाद आवडला नाही असे लिहीले होते.
21 Jul 2008 - 2:54 pm | प्रियाली
असू शकतात ना आणि त्याबद्दल आम्ही नेहमीच चर्चा करतो. वरील उदाहरणात असेच झाले आहे असे लेखक म्हणतो आहे का? जर तो म्हणत नसेल तर तसेच झाले असे समजून का चालायचे? नाण्याला दुसरी बाजू नसू शकेल का?
हे तुम्हाला पटत नाही, व्यक्तिशः मलाही पटत नाही पण अनेकांना ते पटत असावे ना (म्हणजे ते बरोबर असे नाही)
आता कसं बोललात!
लेखाची दुसरी सत्य बाजू मांडली आणि ती मूळ लेखाच्या अनुषंगाने आली. जे मुद्दे नेहमीच मांडतो ते पुन्हा पुन्हा मांडत का बसायचे? प्रतिसाद आवडण्यासाठी लिहिला नव्हता हे आधीच सांगितले.
22 Jul 2008 - 4:55 am | पक्या
>> असू शकतात ना आणि त्याबद्दल आम्ही नेहमीच चर्चा करतो. वरील उदाहरणात असेच झाले आहे असे लेखक म्हणतो आहे का? जर तो म्हणत नसेल तर तसेच झाले असे समजून का चालायचे? नाण्याला दुसरी बाजू नसू शकेल का?
तुम्ही (सर्वात पहिल्या प्रतिसादात) मुद्दे माडताना जी वस्तुस्थिती दाखवली आहे त्यावरून तिचे तुम्ही समर्थनच करताय असे प्रथमदर्शनी वाटत आहे. इतर मुद्द्यांवर चर्चा जरी आधी झाली असली तरी जेव्हा नव्याने चर्चेला तोंड फुटते तेव्हा सर्व मुद्दे चर्चेत आले पाहीजेत . कारण आधीची चर्चा ताजी नाहीये (ती चर्चा होऊन बरेच दिवस झाले आहेत.). . आधीचे मुद्दे सर्वांच्याच लक्षात असतील असे गृहित धरता कामा नयेत. पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडायचे नसतील तर इथे ते मुद्दे जिथे चर्चिले गेले आहेत त्या चर्चेचा दुवा देण्याची सोय आहे की. निदान त्या चर्चेचा दुवा तरी द्यायला हवा होता.
मी वर दिलेली कारणे लेखातील माणसांच्या वागण्याबाबत असू शकतात हे तुम्ही पण मान्य करता .
"जर आई आणि मुले इंग्रजीतून लीलया संवाद साधू शकत असतील तर इंग्रजीतून बोलतील." या तुमच्या वाक्यातूनच असे वाटते की त्यांना एकमेकांशी बोलताना मराठीपेक्षा इंग्रजी जास्त जवळची वाटते. आणि त्यामुळेच या त्यांच्या वर्तनास मी सांगितलेली वरील कारणे आहेत हे म्हणण्यास पूर्णपणे वाव आहे. उलट मी म्हटले आहे इंग्रजीसंवाद कौशल्या मुलांना यावे वा त्याचा सराव व्हावा हा हेतू असेल तर मग ते वर्तन योग्य वाटते. पण हा मुद्दा तुम्ही कुठे आधी मांडलात?
>>प्रतिसाद आवडण्यासाठी लिहिला नव्हता हे आधीच सांगितले.
प्रतिसाद आवडण्यासाठी लिहायचा असतो असे कोणीही म्हटले नाही. त्यामुळे ते सांगायची गरज ही नाही. तरीही प्रतिसाद लिहिणार्यास वाचकाला तो प्रतिसाद आवडला की नाही हे सांगण्यास कसलेही बंधन नाही.
22 Jul 2008 - 5:17 am | प्रियाली
मला भासली नाही परंतु द्यायला हवे होते हे बरोबर. मिपावर अनेक नवे सदस्य आहेत त्यामुळे ते जुन्यांची पार्श्वभूमी जाणून असतात असे नाही. मुद्दा मान्य!
अगदी हेच सांगते आहे. जर आईलाच इंग्रजी जवळची वाटत असेल तर ती मुलांशी इंग्रजीतच बोलणार ना! यांत समर्थन इ. नाही केवळ वस्तुस्थिती आहे.
मला काय सांगायची गरज आहे हे मी लिहित असल्याने मी ठरवते.
22 Jul 2008 - 5:51 am | पक्या
>>अगदी हेच सांगते आहे. जर आईलाच इंग्रजी जवळची वाटत असेल तर ती मुलांशी इंग्रजीतच बोलणार ना! यांत समर्थन इ. नाही केवळ वस्तुस्थिती आहे.
पण आईला तरी इंग्रजी जवळ्ची का वाटावी? तिची मातॄभाषा मराठी असेल तर तिने मुलांशी बोलताना इंग्रजीचा आधार का घ्यावा? याचाच अर्थ तिला मराठीचा अभिमान नाहीये असा सहज निघू शकतो. मला हेच म्हणायचे की इथे वस्तुस्थिती तुम्ही पूर्णपणे मांडली नाही.
22 Jul 2008 - 5:57 am | प्रियाली
जाणीव आणि हाच मुद्दा मी पहिल्या आणि बाकीच्या प्रतिसादांत मांडला आहे. अभिमान असण्यासाठी प्रेम असावे लागते. प्रेम केवळ तुम्ही मराठी कुटुंबात जन्मला म्हणून निर्माण होत नाही तर घरच्यांनी ते निर्माण करावे लागते.
अहो, आईचंच शिक्षण इंग्रजीत झालं असेल, तिच्या पालकांनी तिलाच प्रेम लावलं नसेल तर ती मुलांना काय प्रेम लावणार? आ़ज भारतात अनेकांना इंग्रजी जवळची का वाटते? टिव्ही, रेडियोवर इंग्रजाळलेलं मराठी का ऐकू येतं? कारण केवळ न्यूनगंड नाही. लोकांच्या जाणीवा मेल्या आहेत. मराठी आपली मातृभाषा आहे याचा त्यांना काही फरक पडत नाही.
असे अनेक लोक मी पाहिले आहेत. ते इंग्रजी माध्यमातून, कॉन्व्हेंट्समधून शिकले आणि आज त्यांची मुले शिकत आहेत. त्यांना आपण कशाला तरी मुकतो आहोत याची जाणीवही नसते. इथे अभिमान अजिबात नाही. त्यांच्या जाणीवा बोथट झालेल्या आहेत.
21 Jul 2008 - 8:26 am | चित्रा
मुंबई-पुण्याकडील अनेक मराठी तरूण आई-बाप इंग्रजी भाषिक शाळांतून शिकले असतात हे एक सत्य आहे, त्यामुळे जरी मराठी दिसत असले तरी त्यांना इंग्रजीच सोपे जात असू शकते. असे असले तरी ज्या शब्दांसाठी पर्यायी साधे मराठी शब्द आहेत, ते अनेकदा त्यांना माहिती असू शकतात. त्यामुळे बाकी काही नाही तर निदान ती भाषा जशी आहे तशी तगावी म्हणून जशी येईल तशी वापरायला हरकत नसावी. मराठी शाळांमधून शिकून इंग्रजी हौसेखातर बोलणार्यांची संख्या मुंबई-पुण्याकडे कमी नसावी. फक्त प्रचलित मराठीत "काकी, काकू, मावशी, आत्या, मामी", किंवा, "काका, मामा" असे अनेक शब्द वापरता येऊ शकतात तेव्हा अनेक मराठी मुलांना "आंटी", "अंकल" असे शब्द वापरताना पाहून आश्चर्य वाटते. पण तरीही हे वरवरचे फरक (अंतरंग मूळ सारखेच) असे मी समजते.
त्यापेक्षा कोणती भाषा बोलत आहात यापेक्षा जर इंग्रजी बोलत असताना नुसताच अहंकार बळावत असला, आणि त्यामुळे इंग्रजी न समजणार्या इतर मराठी भाषिकांपेक्षा आपण कोणी वेगळे आणि श्रेष्ठ आहोत असे वाटत असले तर ते अधिक कठीण..! अनेकदा मला वाटते, इंग्रजी बोलायला आपण शिकतो, पण सुंदर इंग्रजी तरी लिहीणारे किती कमी आहेत.. आणि तेही असले तर त्यात मराठी कितीजण आहेत? गेली अनेक वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार्या असंख्य शाळा असूनही सध्या ही स्थिती दिसते ती कशामुळे असावी? महाराष्ट्रात भाषेबद्दलची अनास्था केवळ मराठीबद्दल नाही आहे, ती इंग्रजीबद्दलही असावी अशी मला शंका आहे.
21 Jul 2008 - 12:21 pm | सुनील
१८९८ साली जर्मन चान्सेलर बिस्मार्क ह्याला काही पत्रकारांनी विचारले की २०व्या शतकातील जगावर प्रभाव टाकणारी सर्वात महत्वाची घटना (event) कुठली असेल. एका क्षणाचाही विलंब न लावता बिस्मार्क उत्तरला - "अमेरिकन लोक इंग्रजी बोलतात ही".
वरकरणी अगदी साध्या सोप्या वाटणार्या ह्या वाक्यात फार मोठा अर्थ दडला आहे.
१७-१८ व्या शतकात युरोपातील अनेक देशांतून असंख्य लोक अमेरिकेत येऊन स्थाईक झाले. डच लोकांनी न्यू यॉर्क परिसरात वस्ती केली (न्यू यॉर्कचे पूर्वीचे नाव न्यू अम्स्टरडॅम असेच होते). स्कॅन्डेनेवियन मंडळीना मिनेसोटा जवळचे वाटले (हवामानामुळे असावे!) तर फ्रेन्च लुइझियानात स्थिरावले. येताना ही सगळी मंडळी आपापली भाषा आणि संस्कृती घेऊनच आली होती. सुरुवातीच्या १-२ पिढ्यांनी आपापल्या भाषा टिकवल्यादेखिल असतील, पण पुढे मात्र सरमिसळ झाली. आणि ह्या सरमिसळीतूनच पुढे "गोरा अमेरिकन" हा प्राणी जन्माला आला.
आज सॅन फ्रान्सिस्कोतील एखादा लोम्बार्डो किंवा लॉस एन्जेलीसमधिल एखादा श्मिड्ट हे केवळ नावापुरतेच इटालियन वा जर्मन उरले आहेत! त्यांची खरी ओळख ही गोरा अमेरिकन हीच!
मनात विचार येतो - जर ह्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी आपापल्या भाषा टिकवल्या असत्या तर आजची अमेरिका बनली असती? की अमेरिका ही युरोपचीच एक प्रतिकृती झाली असती?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jul 2008 - 4:17 pm | अनिल हटेला
शेवटी आपल्या त्रिज्येबाहेर लोकांना समजत नाही हेच खरं.
विकास आणी छोट्या !!!!!
सहमत !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
21 Jul 2008 - 6:32 pm | सुचेल तसं
चर्चा चांगलीच रंगली आहे....:-)
मला मंगला गोडबोलेंचं "आणि मी..." आठवलं. त्यात पु.लं.वर एक छान लेख आहे. त्यात लेखिकेनी पु.लं.वर असणारी त्यांची भक्ती, त्यांच्या लिखाणाची शैली इत्यादि बाबींवर लिहीलं आहे. लेखाच्या अंतिम टप्प्यात, लेखिकेनी अशी काळजी व्यक्त केली की आमच्या पिढीचं हे पु.ल. प्रेम, त्यांच्या लिखाणातील ताकद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल की नाही? त्यांची काळजी अगदी बरोबर होती. कारण बरेचसे मराठी लेखक कालानुरुप विस्मरणात गेले. पण पु.लं. सारख्या लेखकाचं लिखाण हे कुठल्याही वयातल्या, पिढीतल्या व्यक्तिला नेहेमी आवडत राहिल. मी जेव्हा "व्यक्ति आणि वल्ली" पहिल्यांदा वाचलं, तेव्हा त्याचं पहिलं प्रकाशन होऊन किमान तीन दशकं तरी उलटुन गेली होती. पण मला त्या पुस्तकानी प्रचंड भुरळ घातली. माझे चुलत/आत्ये भाऊ, बहिणी ह्यांना कुणालाही (सगळे मराठी माध्यमातले होते तरीही) वाचनाचं वेड लागलं नाही. जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की, ह्याचं १००% श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. त्यांनी मराठी पुस्तकं वाचायला, निबंध स्पर्धेत भाग घ्यायला मला नेहेमी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे लहानपणापासुनच माझ्या मनात मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण झालं. जर मला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत टाकलं असतं तर मराठी वाचनाची एवढी आवड निर्माण झाली असती की नाही ह्याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे पालक ह्या भुमिकेतुन त्यांनी त्यांचं काम चोख बजावलं होतं. आता पुढच्या पिढीच्या मनात मराठीबद्दल आवड उत्पन्न करायची जबाबदारी निश्चितच आपली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की इतर भाषा शिकायच्याच नाहीत.
आजकाल बव्हंशी मुलं इंग्लिश माध्यमात शिकतात. कदाचित ती काळाची गरज असेल. पण त्यांना आपल्या मराठी भाषेची, संस्कृतीची, इतिहासाची माहिती करुन देणं हे आपलच काम आहे. त्यानंतर जर त्यांना त्यात गोडी उत्पन झाली तर आनंदाची गोष्ट आहे आणि नाही झाली तरी आपल्याला एवढं समाधान राहिल की आपण प्रयत्न तर केले.
१००% शुद्ध मराठी बोलणं आजच्या काळात फार अवघड आहे. मधुन मधुन हिंदी, इंग्लिश शब्द येणारच. त्यात काही वावग नाही. पण एवढी काळजी घेतली पाहिजे की उलट परिस्थिती तर होत नाहीयेना... परवा मराठी सारेगमपा पाहिलं आणि छान वाटलं की नव्या पिढीतल्या मुलांना मराठी गाण्यांची आवड आहे. एक तर गुजराती (पटेल) मुलगी आली होती आणि तिनी अगदी शुद्ध मराठीत दोन गाणी म्हटली.
अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे संदिप-सलीलच्या कार्यक्रमांनी सगळ्या पिढीतल्या लोकांना मराठी कवितांची आणि गाण्यांची गोडी लावली. अगदी वय वर्षे ८ पासुन ते ८० पर्यंत सर्व वयोगटातील लोक (ह्यामधे इंग्लिश माध्यमातील मुलं सुद्धा आलीच...) ह्या कार्यक्रमाला तुफान गर्दी करतात. "कविता" हा प्रकार मला आधी अगदी अगम्य वाटायचा. पण संदिपच्या कविता एकल्यावर वाटलं की - अरे आपल्यालाही कविता कळू शकतात. त्याच्याच नाही तर इतर कवींच्या देखील (बा.भ.बोरकरांची "संधीप्रकाशात अजुन जो सोने तो माझी लोचने मिटो यावी" ही कविता संदिप-सलीलच्या कार्यक्रमात एकल्यापासुन एकदम आवडायला लागली.)
ह्यासारखे कार्यक्रम नक्कीच मराठीला जिवंत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रश्न आहे तो फक्त आपल्या सहभागाचा.
http://sucheltas.blogspot.com
21 Jul 2008 - 6:40 pm | विकास
प्रतिसाद आवडला. यात काही महत्वाचे मुद्दे आहेत जे येथे मराठीच्या बाजूने अथवा चर्चेच्या सुरवातीच्या मूळ उदाहरणात ज्यांना काहीतरी चुकले आहे असे वाटते त्यांना मांडायचे आहेत - त्यात अर्थात मी पण आहेच :)
22 Jul 2008 - 10:46 am | विसोबा खेचर
मला इतकंच म्हणायचं आहे, की मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं?
खरं आहे तुमचं म्हण्णं
आपला,
(मराठी) तात्या.
22 Jul 2008 - 12:39 pm | पक्या
वा तात्या, थोडक्यात पण चांगला प्रतिसाद दिलात.
22 Jul 2008 - 12:39 pm | गणा मास्तर
विनाकारण इंग्रजी बोलणे बिलकुल पटत नाही. पण आपला समाज आहे गतानुगतिक. 'स्टेटसच्या'खोटया कल्पनेपायी इंग्रजीचे महत्व अनाठायी वाढत आहे. इंग्रजीचे महत्व कोणी नाकबुल करणार नाही, पण त्यापायी मायबोलीला डावलणे कितपत बरोबर?
लोक मराठीत बोलणे टाळतात याची मला वाटलेली कारणे
१ इंग्रजीमाध्यमातुन शिक्षण.
मराठी माध्यमातुन शिक्षण घेउन आपले भले होणार नाही, इंग्रजी कधीच येणार नाही असा हल्ली सरसकट सगळेच विचार करतात.
खरेतर द्विभषिकत्व अवघड नाही, पण मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजी संभाषणा कौशल्य शिकवले जात नाही. (अर्थात काही अपवाद आहेत)
२ भाषेबद्दल प्रेम नाही.
मायबोलीचा अभिमान, प्रेम नसणे. मराठीवाचुन अडत नाही मग कशाला मराठी शिका, बोला असा विचार करणारे पुष्कळ. यातच काही लोकांना इंग्रजीतुन बोलणे 'स्टेटस सिंबॉल' वाटते.
३. हिंदीचे आक्रमण
परप्रांतीयांची वाढती संख्या, हिंदीतील विविध वाहिन्या आणि चित्रपट यामुळे दोन मराठी माणसे एकमेकांना भेटली तरी हिंदीत बोलतात, विशेषकरुन मुंबईत.
आता यावर मला वाटत असलेले उपाय
१ मराठीमाध्यमातुन शिक्षणाचे महत्व पालकांना पटवुन देणे.मराठी माध्यमाच्या शाळांत चांगले इंग्रजी संभाषणा कौशल्य व श्रवण कौशल्य शिकवणे. ( विलेपार्लेच्या मिनल परांजपेचा 'फंक्शनल इंग्लीश' हा कार्यक्रम सर्व शाळांत राबवायला हवा). लोकसत्ताच्या सहसंपादीका शुभदा चौकर यांची 'मित्र मराठी शाळांचे' ही संघटना पालक प्रबोधनाचे चांगले काम करत आहे, अशा संस्थाना मदत करणॅ.
२ मराठीबद्दल प्रेम आपुलकी निर्माण करणे. लग्न , वाढ्दीवस अशा प्रसंगी मराठी पुस्तके भेट देणे, मराठी नाटके चित्रपट पहाणे.
३.परप्रांतीयाशी बोलताना मराठीतुन बोलणे, म्हणजे ते लोकही अपरिहर्यतेने मराठी शिकतील. (अर्थात राक्षसीपाणा अपेक्षित नाही)
मराठी भाषा टिकावी समॄद्ध व्हावी असे इथल्या सगळयांनाच वाटते. मग आपण याबाबतीत काहीतरी विधायक का करु नये?
वेगवेगळे उपाय का सुचवु नयेत. तर मग मराठीच्या संवर्धनासाठीचे तुमचे विचार सांगा बरे.
23 Jul 2008 - 2:58 am | विकास
येथे असलेला अनिकेत केदारींचा (क्षमस्वचा) प्रतिसाद आणि त्यावर मी लिहीलेला खालील प्रतिसाद कोठे गेले?
तुमचा दोनदा प्रकाशित झालेल्या प्रतिसादातील एक प्रतिसाद मी आत्ताच अप्रकाशित केला आहे. त्यात जर काही वेगळे होते जे आपल्याला येथे असायला हवे असे वाटले तर येथे अथवा खरडीने/व्य. नि. ने कळवा आणि मी तो प्रकाशित करेन अथवा काही काळाने तो मिटवून (डिलीट करून) टाकेन.
धन्यवाद
विकास
22 Jul 2008 - 3:25 pm | नाखु
दै सकाळ मध्ये एक सुंदर सदर आहे "या पाटीमागे दडले काय?"
यात एक पाटी होती "पूना" नाही पुणे म्हणा..
पाटीकारास एकाने (श्री दुबे) नी विचारले काय फरक पडतो ?????
ऊत्तर दिले "तुम्हाला डुबे /डोबे " म्हटले तर चालेल का ?
स्वातन्त्र्य जरुर असावे पण मातॄभाषेचा न्युनगंड असु नयेच...
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
23 Jul 2008 - 3:50 am | पिवळा डांबिस
वरती मिपावरच्या ज्ञानी आणि अनुभवी मंडळींनी आपापले विचार मांडले आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर काय बोलणार? तसेच सध्या महाराष्ट्रातल्या मराठी मंडळींची याबाबत काय स्थिती आहे हे तेथे हजर नसल्याने आम्हाला फर्स्टहँन्ड माहिती नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित नाही.
पण एक मराठी माणूस म्हणून आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे.
आमचा एक इंग्लंडात रहाणारा मराठी मित्र आहे. त्याने एका चिनी मुलीशी लग्न केले आहे. (हे काल्पनिक नाही, सत्यकथा आहे!) त्यांना इंग्लंडातच झालेला एक मुलगा आहे जो बाहेर अस्खलित इंग्रजी वातावरणात (ऑक्सफर्ड) वाढतो आहे. आता पालक म्हणून आपल्या मुलाच्या हिताचा जर प्रथम विचार करायचा तर त्यांनी आपल्या मुलाला कोणती भाषा शिकवण्यावर भर द्यायला हवा?
मँडरिन, मराठी की इंग्रजी?
कुणी याल का, सांगाल का?
पटवाल का या अडाण्याला?
23 Jul 2008 - 4:46 am | ईश्वरी
>>मुलाच्या हिताचा जर प्रथम विचार करायचा तर त्यांनी आपल्या मुलाला कोणती भाषा शिकवण्यावर भर द्यायला हवा? मँडरिन, मराठी की इंग्रजी?
अगदी अशीच नाही पण साधारण अशी एक केस माझ्याही पहाण्यात आहे. माझी येथिल (यू एस. ) एक मैत्रिण तेलगू भाषिक आहे. तिचा नवरा तमीळ भाषिक आहे. त्यांची मुलगी (वय ७ ) तेलगू , तमीळ आणि इंग्लीश या तिन्ही भाषा उत्तम जाणते व बोलते. ती आईशी बोलताना तेलगू बोलते आणि वडीलांशी तंमीळ्. अजून एक मैत्रिण जी मराठी आहे पण नवरा तमीळ आहे त्यांची मुलगी (वय २ वर्ष) मराठी आणि इंग्लीश दोन्ही समजते आणि बोलायचा प्रयत्न करते. मैत्रिणीला तमीळ अजिबातच येत नसल्याने घरात तमीळ बोलले जात नाही. पण मैत्रिण मात्र मुलीशी मराठी बोलते आणि वडील इंग्लीश. (उलट वडीलच आता आईमुलीचा मराठी संवाद ऐकून ऐकून थोडेफार मराठी समजू लागले आहेत.)
याच धर्तीवर डांबीस काकांच्या मित्राचा मुलगा आईवडीलांच्या भाषा बोलू / समजू शकेल अर्थात घरात त्या भाषा सतत त्याच्या कानावर पडल्या तर .
ईश्वरी
23 Jul 2008 - 2:00 pm | सैरंध्री
मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका.
सहमत आहे.
सैरंध्री
23 Jul 2008 - 4:56 pm | मराठी_माणूस
जे प्रसंग वर्णन केले आहेत , ते महराष्ट्रातिल आहेत असे वाटते. इथे तरि मराठि माणसानि मरठित बोलावे हि अपेक्षा करणे चुकिचे नाहि. परदेशातल्या समस्यांचि इथे गल्लत होत आहे.
23 Jul 2008 - 11:07 am | llपुण्याचे पेशवेll
जे प्रसंग वर्णन केले आहेत , ते महराष्ट्रातिल आहेत असे वाटते. इथे तरि मराठि माणसानि मरठित बोलावे हि अपेक्षा करणे चुकिचे नाहि. परदेशातल्या समस्यांचि इथे गल्लत होत आहे.
अगदी सहमत.
पुण्याचे पेशवे
28 Jul 2008 - 1:41 am | दनिलेश
आपण इथे कितिही चर्चा केली तरी शेवटी वेळ आल्यावर तसेच वगतो...... नको तिकडे "इन्ग्लिश" वापरतो........ आपल्या मुलान्ना "इन्ग्लिश" शाळेत पाठवतो......... आणी उरलेल्या वेळेत "इन्ग्लिश" नको म्हणून चर्चा करतो......