माननिय शिवसेना प्रमुखांची मुलाखत वाचताना या हे मुद्दे लक्ष वेधुन घेतात ....
प्रश्णास उत्तर देताना ते म्हणतात...
दूषित? दूषित हवेमुळे सगळेच त्रस्त आहेत.
- इतर सगळे त्रस्त आहेत. पण मी त्रस्त नाही, तर व्यस्त आहे. या सगळ्यांचं काय
होणार? शेवट काय होणार? इतका हा देश नासवलाय सगळ्यांनी. विशेष करून कॉंग्रेसने.
भयानक केलंय. म्हणजे त्याला काही अर्थच नाही. म्हणून मी नेहमीच सांगत असतो
की, आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल. मग हे
सारं निस्तरणार कोण? हा प्रश्न तुमच्यासमोर येईल.
- असं का वाटतं?
- का वाटतं म्हणजे? तुम्हीच पहा काय चाललंय. लष्करप्रमुखाच्या वयावरून वाद
होतोय आणि कोर्टामध्ये जावं लागतं देशाला त्यासाठी. काय हा देश आहे? कोणाची
अब्रू जातेय? सोनिया गांधींच्या तर अब्रूचा प्रश्नच नाहीय. कारण ती परदेशी
बाई आहे. तिला काय या देशाबद्दल प्रेम असणार? पण तिला जे सगळे हुजरे आणि मुजरे
करताहेत त्याची लाज-शरम कुणालाच नाहीय. काय, त्या बाईचं कर्तृत्व काय? त्यात
तिचं ते दिवटं कार्टं ते? राहुल गांधी. काल नाही जन्मला तर आज पंतप्रधानकी
मागतंय. पंतप्रधानकी म्हणजे काय खेळ वाटतेय यांना? लिलावातली खुर्ची आहे का
ती? सगळंच विचित्र आहे..
लोकसभेतला गोंधळ...अनेक घोटाळे महगाई यानी माणुस त्रस्त आहे..
आपणास हि वाटते का?
आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल
प्रतिक्रिया
8 Jan 2012 - 8:47 pm | रेवती
अकुकाका आम्हाला कामाला लावून स्वत: फिरकणारही नाहीत. सदस्य लढाई करत राहतात. संपादक लक्ष ठेवत राहतात. हे राजकारण आम्ही ओळखलय. ;)
8 Jan 2012 - 9:34 pm | अविनाशकुलकर्णी
मुफ्त हुवे बदनाम हम.. मिपा के प्यारमे
9 Jan 2012 - 2:06 pm | संपत
मला तर परीस्थीति सुधारतेय असेच वाटतय. लोकशाहीवर विश्वास नसलेली शिवसेना आता लोकपालापासुन लोकशाहीला वाचवायला सिद्ध झाली आहे हा केवढा मोठा चमत्कार.
9 Jan 2012 - 2:10 pm | सुहास..
अविकाका रिटर्न्स !!!
9 Jan 2012 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार
सामनातले लेखन इथे आणून का टाकले आहे ?
9 Jan 2012 - 2:35 pm | नगरीनिरंजन
धागाकर्त्याने स्वतःचे मत डिट्टेलवार मांडावे मग आवश्यकता वाटल्यास चर्चा केली जावी अशी नम्र सूचना.
9 Jan 2012 - 4:27 pm | अन्नू
अहो सर्व राजकरणी माण्स एकाच माळेचे मणी कोणाला नावे ठेवणार?
कडु कार्ल ते (कार्ट नव्हे!); या बाजुने खा की त्या बाजुने, कडु ते कडुच शेवटी!
9 Jan 2012 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामनातल्या या मुलाखती पूर्वीही आवडीने वाचायचो आणि आत्ताही वाचतोय. हल्ली मला प्रश्न पडतो की, संजय राऊत हे मा.श्री. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तरही तेच लिहितात की काय..!
एक दोन दिवसापूर्वी त्या इंदु मिलच्या संदर्भात मा.श्री.शिवसेनाप्रमुख म्हणाले दलित बांधवांनी काँग्रेसचा कावा समजून घ्यावा आणि आजच्या मुलाखतीत म्हणतात आरक्षण आरक्षण किती दिवस आरक्षण द्यायचं असं काहीतरी.
बाकी, आता शिवसेनेचा कावेबाजपणा जनतेने ओळखला आहे, आता हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.
-दिलीप बिरुटे
11 Jan 2012 - 3:06 pm | विजुभाऊ
शिवसेना स्वतःच्याच भूमिका किती वेळा बदलणार आहे देव जाणे.
घराणेशाही ला कट्टर विरोध आणि ......
मराठी माणसाचा कळवळा आणि मी मुम्बईकर
11 Jan 2012 - 4:21 pm | चिरोटा
ठाकरे हे पूर्वीपासूनच गेले २० वर्षे दर दसर्याला, महिन्यातून एकदा 'सडेतोड'पणे सांगत आले आहेत.
१)ह्या देशाचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही.
२)अल्पसंख्यांकांचे लांगुलचलन थांबवा.
३)काश्मीर प्रश्न मी एका दिवसात सोडवेन
४)राजकारणी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्यात मग्न आहेत.
५)....पण ह्या देशात हिंदुंना विचारतोय कोण?
६)१०५ हुतात्मे दिले आहेत आम्ही.
७)मुंबई फक्त मराठी,मराठी आणि मराठी माणसाचीच राहील.