आज प्रत्तेक जण facebook/twitter/orkut वापरतो. बर्याच ऑफिसमध्ये हि site block करण्यात आली आहे. त्यामुळे हि अधिकृत मार्गाने वापरता येत नाही.
तसे अनधिकृत मार्ग अनेक आहेत. माझ्या office मध्ये पण हि बंद आहे. हि website अधिकृतपणे कोणालाही संशय नयेता उघडायची कशी ह्यासाठी मी बराच काळ आंतरजाला वर शोध घेत होतो.
शेवटी ह्याचा उपाय सापडला आहे. ती इथे देत आहे. त्यचा तुम्हालाही बराच उपयोग होईल.
मला एक website सापडली आहे ज्या वर आपण आपले facebook/twitter/orkut connect करू शकतो. एकदा connect झाले कि आपल्याला ह्या site चे उप्डते इथे दिसतील.
तर अश्या बर्याच website आहेत. पण मला hootsuite हि site जास्त आवडली. मी सगळ्या website च्या लिंक इथे देतो आहे.
Threadsy
Myweboo
Hootsuite
Spredfast
MediaFunnel
CoTweet
Seesmic
Netvibes
TweetDeck
Brizzly
प्रतिक्रिया
7 Jan 2012 - 5:20 pm | प्रचेतस
तुम्ही सतत गैरमार्गाचा अवलंब करत असता असे आढळून आले आहे.
काल तुम्ही पेठकर काकांची पाकृ चोरून मिपावर टाकली.
ऑफिसमध्ये तुम्ही फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर चोरूनच पाहता असे वर तुम्हीच नमूद केले आहे. पण ऑफिसमध्ये असले धंदे करत बसू नका, फायरवॉलमध्ये सगळे रेकॉर्ड होत असते. कधीतरी अंगाशी येईल.
7 Jan 2012 - 8:00 pm | तुषार काळभोर
येईल!!
जरा सांभाळून!
(च्यायला! इथे आमच्याइथे ११-१२वीची पोरंपण किरकोळ मोबाईल वापरुन ऑनलाईन असतात. ऑफिसचं इंटरनेट लागतंय कुणाला?)
28 Feb 2014 - 9:32 pm | लॉरी टांगटूंगकर
कंपन्या डायरेक्ट हाकलतात असल्या प्रकारावर्. दादाच्या कंपनीत एकाने भलत्यावेळेला हजार प्रिंटस काढल्या म्हणून हाकललेला.
7 Jan 2012 - 6:04 pm | अत्रुप्त आत्मा
+++++++++111111111 टु वल्ली...
अवांतर-च्यायला हाही कुणाल गांजावालाच निघाला...
7 Jan 2012 - 6:20 pm | चिंतामणी
म्हण्जे काय????????? :~ :-~ :puzzled:
7 Jan 2012 - 6:39 pm | सूड
upDate हो , जसं चोप्य पस्ते तसंच उप्डते !!
7 Jan 2012 - 7:04 pm | चिंतामणी
मला upDate केल्याबद्दल धन्यु.
28 Feb 2014 - 6:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या वेबसाईट्स ला प्रॉक्सी अॅक्सेस वेबसाईट्स असे म्हणतात. आपलं फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा, खासगी मेल्स म्ह्णा अश्या गोष्टी प्रॉक्सी गेटवे वापरुन उघडणे अजिबात सुरक्षित नाही. तसेच वर वल्लीनी नमुद केल्याप्रमाणे अग्निभिंतीमधे आपल्या वापराच्या नोंदी होत असतात.
अश्या प्रॉक्सी च्या वापरातुन फिशिंग, कि-लॉगींग असे प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. त्यापेक्षा मस्त पैकी फोन वर ह्या गोष्टी वापरणे कधीही श्रेयस्कर.
1 Mar 2014 - 6:48 pm | अमोल मेंढे
कंट्रोल अल्टर + डीलीट दाबुन टास्क मॅनेजर उघडा.. प्रोसेसेस मध्ये EMLPROXY ही प्रोसेस बंद करा...सगळ्या बॅन साईट्स ओपन होतील
1 Mar 2014 - 6:58 pm | साळसकर
यापेक्षा ज्या ऑफिसमध्ये फेसबूक अलाऊड आहे अश्या ऑफिसेसचीच यादी येऊ द्या की राव, तेवढेच काही पापगुन्हाअपराध केल्याची टोचणी देखील नाही म्हणाला, कशाला हवेय ते आपल्याच कॉम्प्युटरकडे चोरासारखे दबदबकतकत बघणे. अचानक कोणी पाहिले की मग लई तारांबल उडते.
1 Mar 2014 - 7:21 pm | मृगजळाचे बांधकाम
आम्ही सरकारी हापिस वाले किती सुखी आहोत,वाट्टेल ते बघतो आंतरजालावर.............
2 Mar 2014 - 11:29 am | मंदार दिलीप जोशी
कृपया हापिसात असले धंदे करु नका. ऑफिस हे असे ठिकाण आहे जिथे जितके सरळ वागता येईल तितके वागावे.
2 Mar 2014 - 12:03 pm | आदूबाळ
+१
2 Mar 2014 - 12:53 pm | आत्मशून्य
.
2 Mar 2014 - 1:40 pm | उदयन
माझ्या ऑफिसात माझ्यासाठीच नेट लावले आहे.. त्यामुळे प्रश्नच नाही..!!!
2 Mar 2014 - 2:06 pm | माहितगार
माझा एक बॉस एकदा कॉम्प्युटरवरचा पत्त्याचा गेम खेळत होता समोर डायरेक्टर आला डायरक्टरकडे कॉम्प्युटरवरची पाठ होती तरीही डायरेक्टर हा पत्ता तो पत्ता अचूक सांगून निघून गेला. माझा बॉस विचारात पडला त्याच्या बॉसला पत्ते एवढे अचूक कसे कळले ? (माझ्या बॉसच्या डोळ्यावरच्या चष्म्याची करामत होती :) ) नियम हवेतच तरीही एच आर कौशल्य अधिक महत्वाचे.
2 Mar 2014 - 3:40 pm | भाते
इतका सगळा ऊपद्वयाप करण्यापेक्षा आजकाल बहुतेक कार्यालयांमध्ये वाय-फाय असते. आयटीतल्या एखाद्याला मस्का लाऊन त्याला वाय-फाय संकेताक्षर एकदाच आपल्या भ्रमणध्वनीवर जतन करून द्यायला सांगायचे. बहुतेक नविन भ्रमणध्वनीमध्ये वाय-फाय सुविधा असते.
मी हापिसात सबंध दिवस वाय-फाय वरूनच माझ्या भ्रमणध्वनीवर चेपु, खाजगी मेल तपासतो. आता याची नोंद अग्निभिंतीमधे होते का ते माहित नाही, तेव्हा कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मिपा मात्र मला माझ्या हापिसात बिनधास्त वापरायला मिळते हे माझे नशिब! :)
2 Mar 2014 - 3:50 pm | आत्मशून्य
दिवसभर तुमचा फोन वायफायवर चालु असतो की अधुन मधुन कनेक्ट करता कामा पुरते? संभाळुन, स्मार्टफोन वायफायला कनेक्ट केलात तर पीसी/लॅपटॉप त्या अक्सेस्पॉइंटवर कनेक्ट करुन ब्राउजिंग करता येत नाही असा अनुभव आहे.. अर्थात तुम्ही मस्का मारुन तुमच्यासाठी स्पेशल की ( वाय-फाय संकेताक्षर ) घेतली असेल तर तसा प्रश्न नाही. अथवा नवीन हार्डवेअरमधे असा काही दोष नसल्यास माहिती नाही.
अग्निभिंतीमधे नोंद होतच असणार जर ते वायफायही फिल्टर करत असतील तर.
2 Mar 2014 - 10:44 pm | मृगजळाचे बांधकाम
खाजगी जॉब वाले जळतात; सरकारी हापिस वाल्यांवर,जळू नका हो चाकरमानी!