सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
14 Jun 2008 - 4:56 pm | नन्या
प्रख्यात लेखक दिवगन्त सुहास शिरवळकर याचे मानसपुत्र मन्दार पत्वर्धन आनी फीरोज ईरानी या विषयी माहीती आहे का?
मी.पा. करानो अशुधलेखना बद्दल माफी असावी.
14 Jun 2008 - 11:55 pm | मनिष
फिरोज इराणी सध्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालवतोय...'मी कशी रिकाम्या रस्त्यांवर ब्यूक चालवायचो' हे सांगत असतो. मंदार पटवर्धनांनी पुण्यात पटवर्धन बागेत गाला घेतला आहे आणि आंबा, पोह्याचे पापड, मिरगुंड, मेतकूट इ. चा व्यवसाय करतात. वयोमानाप्रमाणे त्यांना जास्त बोलता येत नाही व स्मृतीभ्रंशही झाला आहे असे कळते.
14 Jun 2008 - 11:59 pm | भडकमकर मास्तर
मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालवतोय... रिकाम्या रस्त्यांवर ब्यूक ....आंबा, पोह्याचे पापड, मिरगुंड, मेतकूट ....व स्मृतीभ्रंशही .
=)) =)) =))
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Jun 2008 - 1:49 am | फटू
हे कुठे असतात याची काही कल्पना नाही बाबा... पण आम्ही अकरावी बारावीला असताना या दोघांनी आम्हाला अक्षरशः वेड लावलं होतं... पुढं अभियांत्रिकीला आलो आणि हे वेड खुपच कमी झालं. अगदी नाहिसंच झालं...
सुशिंची अजुन खुप पात्र आठवतात. उदाहरणार्थ, दारा बुलंद, मधुर, सलोनी, स्वराज राजदा...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
16 Jun 2008 - 12:55 pm | उदय सप्रे
सुहास शिरवळकर "दिवंगत" कधी झाले?मला खरंच माहिती नाहि.....
माझे अतिशय आवडते लेखक.....
त्यांचे एक पुस्तक वाचले होते त्यात सावी तल्यारखान हे एक असेच टारगट व्यक्तिमत्व त्यांनी रंगवले होते.
त्यांच्या "कोसळ" सारख्या कादंबर्याही सुंदर आहेत .....
बाय द वे , सुशि बध्दल पप्रश्नच नाही.काकोडकर वाचले की वाटती आपण कुणीतरी "वाशी च्या भाजी मंडईतील भाजी विकेच आहोत की काय !".....म्हणजे ....उदा. तिच्या मांड्या केळीच्या गाभ्यासारख्या वगैरे.....
नन्याभाऊ, खरच आमचे सुशि दिवंगत झालेत?
5 Jan 2012 - 1:28 pm | चिगो
>>नन्याभाऊ, खरच आमचे सुशि दिवंगत झालेत?
नन्याभाऊच्या ऐवजी मी उत्तर देतोय ह्यासाठी सॉरी.. पण होय, सुशि दिवंगत झालेत. आता जवळजवळ नऊ वर्षे झालीत त्यांना जाऊन.. :-(
3 Aug 2019 - 12:17 am | अजय सोनार
कृपया सावी तल्यारखान हे पात्र असलेले पुस्तक कुठले आहे हे सांगाल का? खूप इच्छा आहे ते पुस्तक पुन्हा वाचायची पण नाव विसरून गेलो आहे.
14 Jun 2008 - 5:10 pm | विजुभाऊ
फिरोज ईराणी हा निळ्या डोळ्यांचा गोरापान हीरो.
त्याची ब्यूक गाडी जोरात चालवतो.
त्याचे वर्णन जी ए नी केले असते तर ते असे काहीसे केले असते
" भूक लागल्यावर सागर तळाशी साचलेल्या शेवाळी राशीतुन एखादा शिंपला काढावा..तो साफ करताच तो शिंपला नसुन मोती आहे हे कळावे अन खाण्याची वासना संपुन जावी तसे काहीसे त्याच्या निळसर डोळ्यांकडे पाहुन वाटत होते.
एखाद्या श्वापदाने अधाशासारखे भक्ष्याकडे पहावे तसे त्याचे डोळे समोरच्या इसमाच्या शुष्क डोळ्यात पहात होते.
थोड्या वेळाने त्यानेच घसा खाकरुन विचारले..शांतता गढुळली....कुठेतरी आत शेवाळी तरंग तात्पुरता दूर झाला.त्या अरण्या शांततेत त्याला स्वतःचाच आवाज दूरवरुन विहिरीच्या तळातुन आल्या सारखा भासला..."
..........सुशी आणि जी ए एकाच वेळी वाचु शकणारा विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jun 2008 - 5:23 pm | भडकमकर मास्तर
मस्त जमलंय हे विजुभौ...
असंच अजून येउद्या...
...
शिरवळकरांचं " बरसात चांदण्यांची " मला आवडलं होतं....(दहावीत वाचलं होतं... आता नीट आठवत नाही पण छान वाटलं होतं इतकंच आठवतंय...)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Jun 2008 - 9:05 am | प्रणित
शिरवळकरांचं
दुनियादारी पण छान आहे.
" बरसात चांदण्यांची " तर मस्तच आहे.!!!
15 Jun 2008 - 10:18 am | मेघना भुस्कुटे
वा! काय मस्त विषय!
15 Jun 2008 - 7:27 pm | बकुळफुले
सुशी पुण्यात भाजी आळीत रहातात्..ते सध्या तेथे अमर विश्वास आणि फिरोज ईराणी ला अनुक्रमे कांदे-बटाटे आणि पडवळ/भोपळा उचलायला बसवतात
16 Jun 2008 - 8:37 am | सचीन जी
मी सुशिंचा जबरदस्त पंखा आहे. त्यांच्या पुस्तकातल्या पात्रांप्रमाणेच सुशि एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते.
मी त्यांना भेटलो होतो, मनमुराद गप्पा मारल्या होत्या आणि त्यांच्या कविताही ऐकल्या होत्या.
त्यांची आणखी काही चांगली पुस्तके - कोवळीक, जाता येता, मधुचंद्र, झुम.
बॅ. अमर विश्वास मालिका तर धमालच. ( अर्ल स्टॅनले गार्डनरच्या पेरि मेसनची नक्कल असली तरी ).
बाकी काही पात्रं -
बॅ. अमर विश्वास मालिका - बॅ. दिक्षीत, जज्ज केसर, डिटेक्टिव गोल्डी, ई. लाल
दारा बुलंद मालिका - मधुर, सलोनी
मंदार पटवर्धन मालिका - रमि
( उरलेली नावं आठवंत नाहीत. काही खरं नाही गड्या , बंगळुरात आल्यापासुन मराठी वाचन बंद आहे. सोलापुरला गेल्यावर
सगळा बॅक लॉग भरुन काढला पाहीजे)
मराठमोळा सचीन जी
16 Jun 2008 - 10:18 am | ऋचा
मी सु.शि. ची सगळी पुस्तकं वाचली आहेत.
त्यातुन मला अशी वेगअळी आवडलेली अशी बाजुला नाही काढता येत आहेत.
मला ती सगळी आवडतात.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
16 Jun 2008 - 1:08 pm | काळा_पहाड
सु.शिं.ची सगळी नाही पण अनेक पुस्तके वाचली. झपाटल्यासारखी वाचली. ते वयच तसे होते. लायब्ररीअन रोज दोनदा तोंड बघुन वैतागला होता. सुवर्णमहोत्सवी 'झुम' मात्र पक्की लक्षात राहिली. तेव्हा पिण्याचे वय नव्हते तरीही. कदाचित त्यामुळेच.
काळा पहाड
16 Jun 2008 - 1:23 pm | चावटमेला
महाविद्यालयीन जीवनात सु.शिं. च्या पुस्तकांनी अक्षरशः वेड लावले होते.
दुनियादारीची किती पारायणे केली हे सुद्धा आठवत नाही.
माझ्या एका मित्राकडे तर सु.शिं. च्या पुस्तकांचा खजिनाच होता.
16 Jun 2008 - 7:45 pm | अविनाश ओगले
लोकप्रिय लेखक. साहित्यिक कार्यक्रमानिमित्त बेळगावला आलेले असताना एक दिवस माझ्या घरी मुक्कामाला होते. रात्रभर मित्रमंडळी जमवून चिक्कार गप्पा मारल्या होत्या. त्यांची दुनियादारी, समांतर ही पुस्तके मला आवडतात. ते मुंबईला एका चित्रपटाच्या काही कामानिमित्त गेले असताना बहुधा हृदयविकाराने अकस्मात गेले. एका नव्या माध्यमात प्रवेश करता करता ते गेले याचे खूप दु:ख झाले. ते आणि प्रकाश संत थोड्याच दिवसाच्या अंतराने गेले. त्यावेळी म.टा. मध्ये मोनिका गजेंद्रगडकर यांचा या दोघांबद्दलचा लेख एकाच चौकटीत प्रकाशित झाल्याचे आठवते.
16 Jun 2008 - 8:19 pm | संदीप चित्रे
मंडळी ...अगदी आवडीचा विषय सुरू केलायत.
माझ्या सुदैवाने सुशिंना बरेचदा भेटता आले. खूप गप्पा करता आल्या. एक - दोनदा काही कारणाने त्यांचे मार्गदर्शनही मिळाले.
माझ्या ब्लॉगवर (www.atakmatak.blogspot.com) 'दुनियादारी' हा लेख आहे. शिरवळकरांच्या चाहत्यांनी लेख वाचून अभिप्राय कळवला तर आनंद होईल :)
------------------------------
त्यांची मुख्य पात्रं आणि सहकारी --
-- दारा 'बुलंद' (सलोनी (बहीण), बादल, मधुर, शीतल)
-- बॅ. अमर विश्वास (मोहिनी, गोल्डी (उजवा हात), गोल्डीच्या बायकोचं नाव आत्ता लगेच आठवत नाहीये !)
काही मोजक्या पुस्तकांत, रात्रीच्या वेळी, डोळ्यांना बुरखा लावलेला अमर विश्वास 'रातोंका राजा' म्हणून पुरावे शोधायला निघायचा !)
-- फिरोज इराणी
-- मंदार पटवर्धन (रश्मी, डॅनी (उजवा हात), शिल्पा (डॅनीची बायको), कमिशनर केतकर (रश्मीचे मामा))
-------------------------------
माझ्या आठवणीप्रमाणे --
'टेरिफिक' ह्या पुस्तकात फिरोज खुनाच्या आरोपात गोवला जातो आणि अमर त्याला सोडवतो.
'शॅली..शॅली' एकदम मस्त मसाला पुस्तक आहे
पास्कल हा फिरोजचा नं. एकचा शत्रू
'टोपाझ' हे फिरोज इराणीचं पहिलं पुस्तक (त्यात फिरोजच हिंदी सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम करायचा असं लिहिलंय)
-------------------------------
अजून काही चांगली पुस्तकं:
'कल्पांत', 'सॉरी सर', 'क्षणोक्षणी', 'असीम', 'ओ गॉड', 'प्रयास', 'दुनियादारी', 'बरसात चांदण्याची', 'झूम', 'समांतर'...
ही यादी पूर्ण नाहीये !!!
-------------------------------
(सुशिंचा एसी ) संदीप
17 Jun 2008 - 10:05 am | धमाल मुलगा
है शाब्बास रे नन्या :)
सुशि म्हणजे च्यायला आमचा जीव की प्राण!
त्यांचं एक "हाय ओल्ड फ्रेन्ड्स" सोडलं तर बाकी सगळी वाचून झालीयेत...पण पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात :)
मास्तर, द्या टाळी...मीही दहावीतच वाचलंय ते :) खरं तर 'बरसात चांदण्याची' हे तेव्हाच वाचायला हवं....एकदम कथानायकाच्या भुमिकेत शिरायला होतं...
दुनियादारी पहिल्यांदा वाचावं तर ते शाळा सोडून नुकतेच कॉलेजात जायला लागल्यावर....काय जब्बरा फील येतो...आहाहा!!!
संदीपभाऊ,
कमिशनर केतकर मंदार पटवर्धनचे मामा, रश्मीचे नै कै :)
आणि डॉ.चक्रवर्ती रश्मीचे बाबा!
इन्स्पेक्टर दिनेश सायगल फिरोजचा मित्र.
असीम, सॉरी सर, समांतर...ह्म्म्म्म्म.....नुसत्या आठवणींनीच मला लायब्ररीत जाऊन बसावसं वाटायला लागलंय.
अरे,
बॅ.अमर विश्वास असलेलं ते पुस्तक कोणतं रे ज्यात अर्ध्या विझलेल्या मिणबत्तीवरुन अमर खुनाचा शोध लावतो? "सॉरी सर" च का?
बाकी, एके काळी दारा बुलंद पेश्शल पण लै वाचायचो :)
जेसलमेरचं वाळवंट, दाराचं गाव 'साम', जेसलमेरचा जुगाराचा अड्डा....फिरोजचं 'बैदूल', अमर विश्वासची डनहिल सिगारेट, डॅनीची रेसर पॉन्टेक... आयला....काय काय आठवतंय की अजुन :)
- धमाल बुलंद विश्वास.
17 Jun 2008 - 10:12 am | विजुभाऊ
अर्ध्या विझलेल्या मिणबत्तीवरुन
माताय.... सुशी असले ही लिहितात होय रे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
17 Jun 2008 - 10:35 am | धमाल मुलगा
=)) =)) =))
अहो एकदा चुकुन झाला असेल त्यांच्याकडून प्रमाद. म्हणून का असं शेवाळी अक्षरांतल्या स्वाक्षरीनिशी रक्तगाभुळल्या पिपासूसारखे धाऊन का येता? ;)
17 Jun 2008 - 11:09 am | मनिष
=))
5 Jan 2012 - 1:41 pm | चिगो
>>अरे,
बॅ.अमर विश्वास असलेलं ते पुस्तक कोणतं रे ज्यात अर्ध्या विझलेल्या मिणबत्तीवरुन अमर खुनाचा शोध लावतो? "सॉरी सर" च का?
क्या ये धमुभौ? ऐसी गुस्ताखी? "सॉरी सर" म्हंजे ती ठरकी बॉसकडे भलत्याच पोरीला पाठवण्याची कादंबरी.. तिच्यावरुन एका ढाप्याने हिंदीत एक पिक्चरही काढला होता, पण लै म्हंजे लैच पानीकम होता साला..
17 Jun 2008 - 11:54 am | अनिल हटेला
खरये!!!!!
सुशि म्हणजे अक्षरशः जादू !!!!
आपला पण वीक पॉइन्ट बरका?
दुनियादारी पासुन ते तलखी ,बरसात चान्दण्याची,कित्ती आणी कशी नाव यार !!!!!!!!
जबरदस्त लेखक !!!!!!
मिसीन्ग सुशि !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
17 Jun 2008 - 11:54 am | अनिल हटेला
खरये!!!!!
सुशि म्हणजे अक्षरशः जादू !!!!
आपला पण वीक पॉइन्ट बरका?
दुनियादारी पासुन ते तलखी ,बरसात चान्दण्याची,कित्ती आणी कशी नाव यार !!!!!!!!
जबरदस्त लेखक !!!!!!
मिसीन्ग सुशि !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
17 Jun 2008 - 11:54 am | विजुभाऊ
शेवाळी अक्षरांतल्या स्वाक्षरीनिशी रक्तगाभुळल्या पिपासूसारखे धाऊन का येता
अरे बापरे या इथे तर मला जी एंची बरीच प्रतिरूपे दिसतात
( कल्पना करा धमाल त्याच्या सगळ्या खरडी जी एंच्या भाषेत देतोय्.......आणि त्याच्या हनुवटीखाली कण्ठाच्या बाकदार भागाची भागाची जोरदार हालचाल झाली....शुभ्र कपोताने छती फुगवुन गुटर्र करावे तशा पत्रावर ब्लेडघासणार्या आवाजात त्या निशःब्द वातावरणाचा भंग करत एक आवाज अनासायास निघाला ज..ह..ब..ह..रा... हा)
एक प्रतिरूप विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
17 Jun 2008 - 1:49 pm | भडकमकर मास्तर
निशःब्द वातावरणाचा भंग करत एक आवाज अनासायास निघाला ज..ह..ब..ह..रा... हा)
किंवा
किंवा
17 Jun 2008 - 2:22 pm | धमाल मुलगा
=))
आज धमाल्या गिर्हाईक का? चालू द्या.....चालू द्या!!!!
9 Jul 2008 - 3:48 am | बबलु
मंदार पटवधन ला २००५ मधे भेट्लो होतो. तो LIC एजंट आहे भवानि पेठेत.
फीरोज ईराणि वडा-पाव व भेळेची गाडि चालवतो.
31 Dec 2011 - 1:03 pm | मृगनयनी
सुहास शिरवळकर आणि माझे वडील स्कूलमेट होते. :) भारत हायस्कूल (सध्याचे कटारिया हायस्कूल) मध्ये ते दोघे होते. ८वी नन्तर माझ्या वडिलान्नी "मॉडर्न"ला अॅडमिशन घेतली. सुहास'जी माईट बी तेव्हा मॅट्रिक झाले होते.
शाळेत असल्यापासूनच त्यान्ना स्टोरी रायटिन्ग'चा छन्द होता. १०-१२ वर्षान्पूर्वी सुहासजीन्चे दुर्दैवी निधन झाले. :|
31 Dec 2011 - 1:34 pm | स्पा
सुहास शिरवळकर आणि माझे वडील स्कूलमेट होते.
आयला भारी :)
31 Dec 2011 - 12:43 pm | स्पा
छान माहिती मिळाली :)
31 Dec 2011 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
या निमित्ताने आमचे परम मित्र श्री रा.रा. परीकथेतील राजकुमारराव साहेब यांना आम्ही नम्रतेची विनंती करतो की त्यांनी सुशिंच्या चारही हीरोंना एकाच कथेत गुंफण्याचा जो विडा उचलला होता तो पुर्ण करावा.
राखी सावंत... जाउदे, लवकर लिहा,
1 Jan 2012 - 3:59 am | असुर
नन्याभाऊ,
भन्नाट या पराजीराव पराशेठ राजकुमार यांच्या होतकरू कादंबरीच्या पहिल्या भागात मी सुशिंच्या नायकांची ओळख लिहायचा एक प्रयत्न केला होता. तो वाचून पहा.
आवडल्यास सुशि वाचालच ही खात्री. न आवडल्यास आमच्या लेखणीला चार प्रेमळ शिव्या देऊन सुशि वाचावेत ही विनंती! :-)
--असुर
1 Jan 2012 - 11:30 am | सुहास..
अगदी हेच म्हणायला आलो होतो ..
भन्नाट वाचा च !!
2 Jan 2012 - 7:23 pm | मी-सौरभ
पुढचा भाग मंदाकिनी ने सोडल की लिहील असे वात्तेय ;)
5 Jan 2012 - 2:20 pm | सोत्रि
मूळ एकोळी धागा आणि आचरट प्रश्न ह्या गुस्ताखीबद्दल केवळ धागा सुशिबद्दल आहे म्हणून माफ केले गेल्या आहे.
प्रतिसाद वाचून भरून आले आहे. मला मराठी वाचनाची गोडी सुशिमुळेच लागली. मी त्याचे वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे 'सालम'.
सुशिची 'ज्वाला' नावाची अर्धवट राहिलेली आणि त्याच्या मुलाने तशीच प्रकाशित केलेली कादंबरी माझ्याकडे आहे. रमल विद्येवर आधारित चंद्रकांता ह्या हिन्दी मालिकेशी मिळते जुळते असे कथानक आहे.
सुशि मात्र ग्रेटच होता ( :( ). त्याचे पुस्तक वाचताना मित्रांशी गप्पा मारतो आहोत असे वाटायचे इतकी भाषाशैली ग्रेट होती. त्याला अहो जाहो संबोधने म्हणजे सुशि कळलाच नाही ह्याची जाणीव करून देण्यासारखे आहे.
असो, नन्या सुशिची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद रे मित्रा !
- (सुशिच्या आठवणीने भरून आलेला) सोकाजी
3 Aug 2019 - 8:26 am | बोलघेवडा
सुशि शनिवार पेठेत राहायचे. आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये. एकदा गणपतीच्या आरतीला त्यांना बोलवल होत. दिसायला अत्यन्त देखणे होते आणि मोठा जाड काळया काड्यांचा चष्मा वापरायचे. हा माणूस कोणी विशेष आहे हे त्यांच्या कडे पाहून जाणवायचे.
त्यांच्या कडे एक छोटी "बॉबी" दुचाकी होती. बऱ्याचदा त्यावरून फिरताना दिसायचे. असा अत्यंत उमदा मनाचा लेखक आमच्या शेजारी राहतो याचा आम्हाला फार अभिमान वाटायचा / वाटतो.