बाबा गनुश

गणपा's picture
गणपा in पाककृती
1 Jan 2012 - 6:15 am

सर्व रसिक खवय्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

२०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे. आशा करतो आपल्याला आवडेल.
मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश.
आज त्या पैकी बाबागनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे.
खुबुस वा पिट्टा ब्रेड डीप करण्यासाठी बाबा गनुश हे एक प्रकारच डीपिंग आहे.

साहित्य :

एक मोठं किंवा २ माध्यम वांगी.
३ मोठे चमचे ताहिनी. (भाजलेल्या तिळाची तेलात वाटलेली पेस्ट.)
२ लिंबांचा रस.
२-३ पाकळ्या लसूण
चवी नुसार मीठ.
२-३ चमचे ताजं घट्ट दही (ऑपश्नल)

सजावटीसाठी : ओलीव्हचं तेल, ऑलीव्ह, लाल तिखट, कोथिंबीर.

कृती :


वांग्याला काट्याने टोचे मारून वरून तेलाचं बोट फिरवावं.
निखारे असल्यास उत्तम पण नसल्यास शेगडीवर वांगं भाजून घ्यावं.
(ओव्हन मध्येही भाजता येईल पण त्याला खूप वेळ लागतो साधारण ४५-५० मिनिटे.)


भाजलेलं वांगं गार झाल्यावर वरच साल काढून टाकावं आणि काट्या/चमच्याने वांग्याचा गर मोडून घ्यावा.

एका बाऊलमध्ये ताहिनी आणि लिंबाचा रस फेटून घ्यावा. सुरवातीस फेटताना मिश्रण एकदम घट्ट जाणवेल, पण नंतर हलकेपणा जाणवायला लागेल.

नंतर त्यात आवडी नुसार ताजं दही घालून फेटावं.

वांग्याच्या मोडलेल्या गरावर वरील मिश्रण टाकून त्यात चावी नुसार मीठ लाल तिखट टाकून फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून घ्यावं.

साधारण श्रीखंडाची घनता येईल. वाढताना थोडं ओलीव्ह्च तेल टाकून वरून लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ऑलीव्ह लावून सजवावं.

खबुस किंवा पिटा ब्रेड सोबत डीपिंग म्हणून सर्व्ह करावं.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

1 Jan 2012 - 7:24 am | तुषार काळभोर

नवीन वर्षाची इतकी सुंदर सुरवात!! व्हेज तर व्हेज...२०१२ मध्ये मज्जा आहे खादाडांची!!

(खादाड) पैलवान

पियुशा's picture

1 Jan 2012 - 10:04 am | पियुशा

ओह माय माय :)
belive me सर ,ही रेसेपि मी आताच काही दिवसापुर्विच एका कुकरी शो मध्ये पाहिली होती
तेव्हापासुन करायचा विचार चालु होता ,पण रेसेपी लिहुन न घेता आल्यामुळ बेत टाळत होते ,या बरोबर हमुस खातात ना?
धन्स अ लॉट :)
आता नक्की करुन पाहिन :)

पैसा's picture

1 Jan 2012 - 8:29 am | पैसा

नव्या वर्षाची मस्त सुरुवात! हा भरिताचा भाऊ आपल्याला खूप म्हणजे खूपच आवडला. तिळाची पेस्ट करावी लागेल, पण पीनट बटर वापरून कसं लागेल?

प्रशांत's picture

1 Jan 2012 - 2:27 pm | प्रशांत

भरिताचा भाऊ आवडेश..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2012 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भरिताचा भाऊ आवडेश..

-दिलीप बिरुटे

कौशी's picture

1 Jan 2012 - 8:31 am | कौशी

करायला पण सोपी.. आवडली.

चिंतामणी's picture

1 Jan 2012 - 8:43 am | चिंतामणी

मस्त केलीस रे गणपा.

:) :-) :smile:

(फक्त "१०१२ ची सुरवात एका " ही चूक दूरूस्त कर.)

५० फक्त's picture

1 Jan 2012 - 8:35 am | ५० फक्त

नमस्कार, आणि शाकाहारी पाक्रुबद्दल अतिशय धन्यवाद.

अवांतर ---१०१२ ची सुरवात, वा वा खरंच या पाक्रुमध्ये कालगणना उलटी फिरवायची ताकद आहे,.

प्रचेतस's picture

1 Jan 2012 - 10:13 am | प्रचेतस

जबरदस्त पाकृ. डोळे तृप्त झाले. आता जिव्हा तृप्त व्हायला पाहिजे खाउन.

अभिजीत राजवाडे's picture

1 Jan 2012 - 11:44 am | अभिजीत राजवाडे

माझी आवडती डिश आहे. हमस ची पाकक्रिया हि येऊ द्यात.

हमस ची कृती इथे पहाता येईल.

संजयशिवाजीरावगडगे's picture

1 Jan 2012 - 12:38 pm | संजयशिवाजीरावगडगे

भरिताचा जुळा भाऊ चांगलच आहे !

सुहास झेले's picture

1 Jan 2012 - 12:44 pm | सुहास झेले

मस्त रे गणपा !!!!

जाई.'s picture

1 Jan 2012 - 1:12 pm | जाई.

झकास

प्रभाकर पेठकर's picture

1 Jan 2012 - 2:05 pm | प्रभाकर पेठकर

आमच्या इथे (मस्कतमध्ये) ह्याला मुत्तब्बल म्हणतात. तसेच, हमसला हम्मुस म्हणतात. मला दोन्ही पदार्थ भरपूर आवडतात.
छान पाककृती आणि छायाचित्रे.

सुधीर१३७'s picture

1 Jan 2012 - 2:30 pm | सुधीर१३७

मस्तच......................

अवांतरः नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2012 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त शाकाहारी प.कृ.टाकल्या बद्दल स-मस्त घास/फूसींकडून सलाम :-)

कवितानागेश's picture

1 Jan 2012 - 4:04 pm | कवितानागेश

ऑलिव्हला काही भारतीय पर्याय आहे का?

प्रभाकर पेठकर's picture

1 Jan 2012 - 5:54 pm | प्रभाकर पेठकर

ऑलीव्ह आणि ऑलीव्ह तेल, दोन्ही वस्तू भारतात मिळतात.
ह्यांना पर्याय मिळेल असे वाटत नाही. पण, चवीच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास, तिळाचे तेल वापरावयास हरकत नाही.

मस्त !
शेवटच डेकोरेशन जरा समजावुन सांगाना ,शेवटुन दुसर्‍या फोटोत जे काही आहे ते इतक जवरदस्त दिसत आहे, पण ते मुदी सारख मधे नंतर तो कलर चेंज आणि बाहेर परत ... ( शेफ च सिक्रेट असेल तरी सांगा;०))

एका बाऊलमध्ये बाबा गनुश घेउन काठापासुन १-२ सेंमी अंतर सोडून चमच्याने दाब देत खंदका सारखा आकार दिलाय ज्यामुळे मध्य भागी उंचवटा तयार झालाय. त्या खंदकात थोडस ऑलिव्हचं तेल टाकलय. समोरा समोर चार ठिकाणी काट्याने थोडासा दाब देउन चरे दिलेत. २ चर्‍यांच्या मध्ये एक एक ऑलिव्ह ठेवलं आहे. आणि वरुन थोडं लाल तिखट आणि चिरलेली कोथिंबीर टाकुन सजवलय.

सुनील's picture

1 Jan 2012 - 6:22 pm | सुनील

मस्त पाकृ.

निखारा किंवा गॅस नसेल तर, ओवनमध्ये ४५० डिग्रीवर सुमारे ४५ मिनिटे ठेवल्यास वांगे खरपूस भाजून निघते.

स्वाती२'s picture

1 Jan 2012 - 7:36 pm | स्वाती२

माझा आवडता पदार्थ!

स्वाती दिनेश's picture

1 Jan 2012 - 7:44 pm | स्वाती दिनेश

पाकृ तर आवडलीच आणि फारच छान सजवले आहेस रे ..
स्वाती

चित्रा's picture

1 Jan 2012 - 8:05 pm | चित्रा

सजावट अफलातूनच.

सानिकास्वप्निल's picture

1 Jan 2012 - 9:42 pm | सानिकास्वप्निल

झक्कास !!
नवीन वर्षी मस्तच पाकृ दिलित :)

मन१'s picture

1 Jan 2012 - 9:56 pm | मन१

कै नै, जिभल्या चाटतोय. पाणी सुटलय तोंडाला.
फटु टाकण्यापेक्षा कधी तरी आमंत्रणही देण्याचं औदार्य दाखवावं माणसानं.

मीनल's picture

2 Jan 2012 - 8:30 am | मीनल

काय चालले आहे काय ह्याचे? धोपटून काढा पाहू कुणी तरी याला .
आम्हा महिलांना कित्ती कित्ती inferiority complex येतो!

मृत्युन्जय's picture

2 Jan 2012 - 11:06 am | मृत्युन्जय

ढिंच्या़क ढिच्या़क . परवाच पुण्याच्या फ्लॅग्स मध्ये खाल्ला होता हा पदार्थ. लिमिटेड आवडला होता पण सालं त्या स्टार हाटेलला बी आमच्या गणपासारखी सजावट करता येत नाही. :)

प्रेझेंटेशन जबराच. पदार्थ प्रचंड आवडला नसल्याने (खाल्ला तेव्हा) त्याला थोडे कमी मार्क्स :)

पदार्थ पाहून भयंकर टेसदार असेल अशी खात्री होते आहे.

पाकृचं नाव खतरा आहे..

हे नाव वाचून आधी कोणीतरी:

विवाह, परदेशगमन, संतती, वशीकरण, मूठकरणी
सभी प्रकार की समस्याओंका २४ घंटे में इलाज. मनी बैक ग्यारंटी के साथ..

अशी सर्व्हिस देणारा नवीन बाबा (डोंबिवली स्टेशन के ठीक सामने) असेल असं वाटलं..

प्रीत-मोहर's picture

2 Jan 2012 - 11:39 am | प्रीत-मोहर

मस्तच पाकृ गणपाभौ अ‍ॅस युजुअल :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Jan 2012 - 1:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मस्तच पाकृ गणपाभौ अ‍ॅस युजुअल

जबरा विनोदी प्रतिसाद. हहपुवा ....................
प्रीमो बाई, शब्द जपून वापरा :-)

छोटा अण्णा's picture

2 Jan 2012 - 12:10 pm | छोटा अण्णा

सभासद होण्याच्या साधारण २-३ वर्षा अगोदर पासुन मी तुझ्या पाकक्रुती आवर्जुन बघत आलो आहे. लय भारी असतात. वांग्याचा प्रकार येवढा यम्मी करता येतो ह्याची कल्पना नव्हती.
सभासद झाल्यापासुन माझी ही पहिलीच प्रतिक्रीया आहे.

माझ मि. पा. वर जोरदार स्वागत असो !!!!!!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jan 2012 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

गणपा गणपा गणपा...

गणपा साहेब मस्त पाकॄ जाम मस्त

तुम्हि मिपा वरचे सुपर शेफ आहात.

सुपर शेफ गणपा साहेब ह्यांचा विजय असो.

उदय के'सागर's picture

2 Jan 2012 - 3:04 pm | उदय के'सागर

गणपाशेठ तुम्हि कमाल आहात! नुसती पाकृ च नाहि तर ते सजावट आणि बाकि सगळं कसं एकदम "प्रोफेशनल शेफ " सारखं.... क्या बात!!!

(तुम्हि त्या "मास्टरशेफ इंडिया" मधे जाच हो ... १००% जिंकाल)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Jan 2012 - 4:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्हि त्या "मास्टरशेफ इंडिया" मधे जाच हो ... १००% जिंकाल

असेच म्हणतो... गणपा भौ, घ्याच मनावर आणि मास्टरशेफ ३ ची तयारी सुरु करा.

विनायक प्रभू's picture

2 Jan 2012 - 4:52 pm | विनायक प्रभू

जे आयला गणपा,
भाजलेल्या तिळाची साल कशी काढायची बॉ?

मास्तर मी स्वतः ताहिना/नी घरी बनवलेलं नाही. इथे रेडिमेड मिळाली.
जालावर कुठेसं वाचल होतं म्हणुन तिळ भाजुन आणि सोलून घ्या असं म्हटलय.
पण आता मुद्दाम ताहीनाची पाककृती शोधली.
त्यात तीळ केवळ भाजुन घ्यायला सांगीतले आहेत, (सोलायला नाही. :) )

मस्त पैकी पाककृती आहे. शेवटचा फोटो बघून केक आहे कि काय अशी शंका येते.

बाकी गवि मलाही त्याप्रमाणेच वाटले फक्त बाबा धनुष, म्हटल कोलावेरी चे नवीन काहीतरी केलं की काय

विनायक प्रभू's picture

2 Jan 2012 - 5:17 pm | विनायक प्रभू

धन्यवाद रे गणपा.
तशी कुठल्याही वस्तुच्या साली कशा काढायच्या हे तुला माहीत आहे हे मला माहीती आहे.

शाकाहारी पाकृबद्दल मंडळ आभारी आहे.
हे वांग्याच्या भरतासारखे दिसेल असा अंदाज होता पण हमससारखे दिसते आहे.
चवदार असणार यात शंका नाही. पदार्थ सहज मिळतील. शोधत फिरावे लागणार नाही.;)
पदार्थाचे नाव गमतीदार आहे.

मस्त, चवदार असेलच. करुन बघेन. आणि हो, शाकाहारी पाकृबद्द्ल धन्य.

चतुरंग's picture

3 Jan 2012 - 8:22 am | चतुरंग

रे याचं नाव 'बाबा गणपेश'! ;)

शाखाहारी पाकृ चढवल्याबद्दल आपले खास अभिलंदन करण्यात येत आहे! :)

(हमसप्रेमी)रंगामस

झकासराव's picture

3 Jan 2012 - 11:21 am | झकासराव

-^-

काय जबरी सजावट आहे. :)

तेजल पुरोहित's picture

3 Jan 2012 - 12:40 pm | तेजल पुरोहित

मस्त !!

मदनबाण's picture

3 Jan 2012 - 1:35 pm | मदनबाण

बाबा रे बाबा ! ;)

२०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे.
चला आमच्या सारख्या लोकांसांठी उत्तम बातमी... :)

प्रभो's picture

3 Jan 2012 - 8:19 pm | प्रभो

मस्त रे!!

सुहास..'s picture

4 Jan 2012 - 11:59 am | सुहास..

_/\_

पाषाणभेद's picture

5 Jan 2012 - 12:30 am | पाषाणभेद

फारच छान

sneharani's picture

5 Jan 2012 - 2:19 pm | sneharani

जबरदस्त दिसतेय डिश!
शेवटच्या फोटोमधील सजावट मस्त!
:)

मेघवेडा's picture

5 Jan 2012 - 3:24 pm | मेघवेडा

आयला मला वाटलं गवि म्हणतात तसं "विवाह, परदेशगमन, संतती, वशीकरण, मूठकरणी, सभी प्रकार की समस्याओंका २४ घंटे में इलाज. मनी बैक ग्यारंटी के साथ.." स्टाईलमध्ये गणपानं स्वतःच कुठं डेरा टाकला का काय! :D

पाकृ फस्क्लास! एकदम आवडेश!

मुक्त विहारि's picture

12 Jan 2012 - 4:13 pm | मुक्त विहारि

हे म्हणजे अरब प्रदेशातिल वान्ग्याचे भरित.......

भरिताचे चार मित्र.....

खोबरे, दाणे, लसूण आणि कान्दा .....

हे जर नस्तिल तर वान्ग भाजून काय फायदा.....