बालगीतांची गरज आहे अस कोणाकोणाला वाटत? शेजारचा नुकताच बालवाडीत जायला लागलेला पिंट्या आज शाळेत काय शिकवलं,किवा एखादी कविता म्हणून दाखव अस म्हंटल तर कमेरेचा पट्टा हलवत दाबंग करायला लागला.त्याचा मोठा भाऊ रावण किती डेंजर आहे हे सांगत होता.
परवा डोरेमोन मध्ये योगेतो आणि डोरेमोन हे त्या मुलीला शेपटी आली हे बघून लालेलाल झाले होते! कराटे कीड मध्ये १२ वर्षाचा मुलगा किस करतो? लहान मुलांचे कार्यक्रम खरच लहान मुलांचे राहिलेत का?
दूरचित्रवाणीच्या जाहिराती ह्या पूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा असतात का? कितीही प्रयत्न केला तरी जाहिरातींपासून दूर जाऊ शकत नाही.साबण,पावडर मध्ये उगीचच पूर्ण बोडी दाखवायची काय गरज आहे? मेन्स डीयो, दाढीच क्रीम ई मधल्या मुली तर जास्त भयंकर असतात.
जाहिराती ह्या प्रकाशित होण्या आधी सेन्सोर व्हाव्यात अस वाटत नाही का?
लहानांवर संस्कार करण्याची जबाबदारी हि पूर्णपणे मोठ्यांची आहे.पण मोठे ती जबाबदारी पार पाडतायत का?
जपा निरागसता.
गाभा:
प्रतिक्रिया
2 Jan 2012 - 1:05 am | दादा कोंडके
अहो किचनतै, ह्या* धाग्यासारखं प्रत्येक ओळीमध्ये अंतर ठेवलं असतं तर थोडा मोठ्ठा तरी वाटला असता. :)
असो, आता घाग्याविषयी. हे सगळं आता हाताबाहेर गेलं आहे. कुठं कुठं लक्ष देणार. आत्ताच ई-सकाळ उघडला आणि बाजूला एक जाहिरात आली, त्यामध्ये पोर्नसाईटला लाजवेल असे कपडे घातलेली मुलगी होती. :(
*वि.सु. : संबंधितांनी ह घेणे.
____________________________
2 Jan 2012 - 6:56 am | Pain
त्यात चूक ई-सकाळची नसावी .
सहसा साईटला भेट देणार्या प्रत्येकाला कुठल्या जाहिराती दाखवायच्या हे अल्गोरिदम्स ठरवतात आणि त्यासाठी ती प्रत्येकाचा वेब ट्रॅफिक पाहून निर्णय घेतात.
2 Jan 2012 - 2:47 pm | दादा कोंडके
पुर्वी सकाळवर ऑनलईन गेमच्या जाहिराती यायच्या आता अल्प वस्त्रातल्या मुली विडीयो चॅटसाठी ऑनलाईन असल्याच्या जाहिराती येतात. त्याचा माझ्या वेब ट्रॅफीकशी काहिही संबंध नाही. तसच टॉरेंटच्या साईटस वर सगळ्याच घाणेरड्या अॅड्स येतात त्याचा वेब ट्रॅफीकशी काहिही संबंध नसतो.
5 Jan 2012 - 3:00 pm | पुष्कर जोशी
@ दादा
ह्याच साठी मी add blocker वापरतो अगदी यशस्वी आहेत. त्यात इझी लिस्ट आणि FanBoy लिस्ट आहेत दोन्ही वापरावेत....
@मोदक
त्वरित उपायासाठी Add Blocker ला पर्याय नाही..
Opera, Chrome, Firefox सर्वांसाठी हा उपाय उपलब्ध आहे ... IE माहित नाही ..
TV साठी Add Blocker / Video Mute शोधणारा
5 Jan 2012 - 3:08 pm | दादा कोंडके
मी यासाठी आयईचं फ्लॅश डिसेबल करून पाहीलं, पण मग युट्युब वगैरे साईट साठी परत जाउन एनेबल करावं लागतं.
आयई साठी असलं ब्लॉकर शोधावं लागेल.
5 Jan 2012 - 4:11 pm | पुष्कर जोशी
IE वापरणे कित्येक वर्षापासून सोडले आहे ....(४-५)
आम्ही तर ओपेरा वापरतो बुवा साधे सोपे गतिमान आणि मेल सोबत (Outlook ची गरज नाही)
2 Jan 2012 - 1:53 am | मोदक
थोडे नेटावर शोधा.. कुठे तक्रार करता येईल ते ठिकाण सापडेल.
शास्त्रोक्त (Technical) लढा कसा द्यायचा ते मिपावर सुद्धा सापडेल. ;-)
चला सुरुवात आपल्यापासून करुया.
मोदक.
2 Jan 2012 - 7:05 am | Pain
(तुमच्या) मुलांनी काय पहावे हे तुम्ही आधी पाहून ठरवू शकता पण ते अतिशय वेळखाउ आणि कंटाळवाणे होईल.
जाहिराती जशा सतत असंबद्ध गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात तसे तुम्ही वेळोवेळी ते कसे चुकीचे आहे हे समजावून सांगू शकता, प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उदाहरणाने दाखवून देउ शकता. (म्हणजे हळूहळू जाहिराती सुरु झाल्या की ती चॅनेल बदलायला शिकतील ;) )
शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्स मुलांसोबत पाहू नका.
2 Jan 2012 - 1:45 pm | किचेन
माझ्या बाबाबंनी मला न्यानेस्वारी द्याणेशावारी (कस लिहयच?), आणि हरिपाठ,विवेकानंद ऐकवून आणि त्याचा अर्थ समजावून सांगून मोठ केलाय.आईनी श्यामची आई,विक्रम वेताळ ,इसापनीती ए शिकवलंय.
मला अजूनतरी मुल नाहीयेत,पण जेव्हा होतील तेव्हा काय?त्यांना कस वाढवायचं?तेव्हा तर कदाचित आणखीन प्रोग्रेस झाली असेल.मी नाशणाल जियोग्राफिक आणि दिस्काव्हारीलाच प्राधान्य देते.पण कार्टूनहि मला आवडतात.
पण आता पूर्वीचे मिकी,डोनाल्ड,अलादिन चे एपिसोड्स दिसत नाहीत.शिन चान मधले चेहेरे विचित्र असले तरी ते थोड चांगल वाटत.
2 Jan 2012 - 1:58 pm | गवि
व्याडेश्वर.. व्याडेश्वर...!!!
2 Jan 2012 - 4:05 pm | ५० फक्त
मेलो, ओ शिनचान ही अतिशय खालच्या दर्जाची सिरियल आहे, त्यापेक्षा झिग शार्को, ऑगी आणि झुरळं बघा, सगळ्यात बेस्ट किक बटोस्की, आणि त्यावर मजा म्हणजे त्याला डबिंग आहे रजनीकांतच्या सौथ इंडियन स्टाईलचं. ..
2 Jan 2012 - 6:37 pm | सर्वसाक्षी
<मेलो, ओ शिनचान ही अतिशय खालच्या दर्जाची सिरियल आहे>
आहे नव्हे, होती म्हणा. अलिकडे शिंचानचे अगदीच त्रोटक आणि पचपचित भाग दाखविले जातात.
आणि दर्जाविषयी म्हणाल तर तो काही मालिकांपेक्षा खालचा नसावा.
2 Jan 2012 - 2:31 pm | सर्वसाक्षी
मुलं शहाणी असतात हो. कस वाढायचं ते त्यांना बरोबर समजत. ते तुम्हाला अधिक समजत असा समज करुन घेतलात तर मुलं तो दूर करतीलच, चिंता नको.
2 Jan 2012 - 4:48 pm | विनायक प्रभू
ज्ञानेश्वरी, हरीपाठ, विवेकानंद, श्यामची आई,इसापनिती, विक्रम वेताळ हा उपाय आहे का?
कित्ती छान.
3 Jan 2012 - 9:54 am | पियुशा
शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्स मुलांसोबत पाहू नका
खी...खी...खी.....
ह्या चॅनल्सवर असे काही कार्यक्रम आहेत की मुल तुमच्याकडे शन्का विचारणारायला येनारच नाहीत ;)
3 Jan 2012 - 10:11 am | ५० फक्त
खी...खी...खी.....
ह्या चॅनल्सवर असे काही कार्यक्रम आहेत की मुल तुमच्याकडे शन्का विचारणारायला येनारच नाहीत - अथवा असे काही कार्यक्रम आहेत की, ते पाहुन ज्या शंका मुलं विचारतील त्यांची उत्तरे तुम्हालाही माहित नसतील किंवा यापेक्षा पुर्वीच्या लोकल शंका परवडल्या पण हे ग्लोबल क्वश्चनियर नको अशी अवस्था होईल.
4 Jan 2012 - 11:17 pm | किचेन
आयला, मला तर त्या शंकांचि कल्पना करुनच हसायला येतय!
पियुताई लहान नाहिये.तिनेच मला लिहायला शिकवल.
4 Jan 2012 - 11:23 pm | प्रचेतस
शुद्धलेखनाचे वाभाडे काढणार्या पियुताईंनी तुम्हाला लिहायला शिकवलं हे वाचून डोळे पाणावले.
(चला पळतो आता रूमाल आणून डोळे टिपायला.);)
5 Jan 2012 - 10:42 am | पियुशा
@ वल्ली
एव्ह्डाही काय बाजार उठ्वायला नक्को आहे ;)
तुमचे ड्वाले पानावतील अशीच दिव्य प्रगती करु आम्ही एक दिवस ;)
आमचही एखाद पुस्तक्-बिस्तक निघेल (?)
" मि . पा. वर मराठी कसे लिहाल ;) "
5 Jan 2012 - 10:45 am | मृत्युन्जय
एव्हाना शुद्धलेखन जमायला पाहिजे होते पियुषातै. की अशुद्धलेखनातच मजा वाटते आहे?
5 Jan 2012 - 10:58 am | पियुशा
@ मृत्युन्जय
एव्हाना शुद्धलेखन जमायला पाहिजे होते पियुषातै. की अशुद्धलेखनातच मजा वाटते आहे?
अहो बॉसचा डॉला चुकवुन लिहायला कित्ती कष्ट पडतात तुम्हाला काय माहीती ? ;)
(शुद्ध लिहायला बर्यापैकी जमत्,पण घाइ-गड्बडीत होतात चुका ) :)
5 Jan 2012 - 11:11 am | अन्या दातार
>>शुद्ध लिहायला बर्यापैकी जमत्,पण घाइ-गड्बडीत होतात चुका
घाई-गडबड तुझी की बॉसची? आणि एवीतेवी बॉस तुला विचारतोच ना, झालं का मिपा-मिपा खेळून* वगैरे (भावार्थ लक्षात घ्यावा) मग कसली डोंबलाची गडबड???
* संदर्भः खवउपा
5 Jan 2012 - 1:28 pm | ५० फक्त
आमचही एखाद पुस्तक्-बिस्तक निघेल (?)
" मि . पा. वर मराठी कसे लिहाल "
म्हणजे मिपावर मराठी लिहिलं जाणार नाही तर हिंदी उर्दु इंग्रजी लिहिलं जाईल एवढे वाईट दिवस येतील असा संशय आहे का तुम्हाला ?
4 Jan 2012 - 10:54 am | वपाडाव
पिवशे, तुला उगाच लहान समजतात नै इथली मंडळी....
4 Jan 2012 - 11:11 am | ५० फक्त
पिवशे, तुला उगाच लहान समजतात नै इथली मंडळी....
मा. दाचिपं परदेशागमनुत्सुक श्री. वपाडावजी, हा वरचा साक्षात्कार तुम्हाला कधी आणि कसा झाला याबद्दल काही समजेल काय ?
2 Jan 2012 - 10:04 am | मोदक
>>>>शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्स मुलांसोबत पाहू नका.
+१
एक शंका - मुलांना वाचनाची आवड लावणे हा उपाय होवू शकतो काय..? म्हणजे हे डायरेक्ट सोल्यूशन नसेल तरी इनडायरेक्ट सोल्यूशन नक्की होईल.
(अजून अविवाहीत असलेला ;-)) मोदक
2 Jan 2012 - 12:49 pm | नीलकांत
आमच्या काळात बालचित्रवाणी आणि किलबिल सारखे कार्यक्रम येत असत. आता दुरदर्शन जिवंत आहे की नाही हेच माहिती नाही तेथे त्यावरील कार्यक्रमांची दखल कोण घेतंय असं झालंय.
चॅनलसुरू करायला फार काही लागत नसावे असा अंदाज आहे. कारण कुठल्याही फडतुस कारणाला वाहीलेलं चॅनेल आता दिसायला लागली आहेत.
मुलांना वाचनाची आवड नक्की लावा. आजही चंपक चांदोबा अगदी ठकठक सुध्दा उत्तम निघतं. मराठीत जास्त चित्रकथा नाहीत हिंदीत कॉमीक्स आहेत मात्र ते सुध्दा डायमंड कॉमिक्सचे अपवाद वगळता बाकी लहान मुलांसाठी आहेत की नाही अशी शंका यावी अश्या स्वरूपाचे असतात.
मराठीसोबत हिंदीसुध्दा वाचायचो. अश्याच एका मुलांसाठी प्रकाशित होणार्या बालहंस (जयपुर, राजस्थान) या पाक्षिकाची एक प्रत माझ्या हाती आली. त्यात संपादकांनी पालकांशी संवाद साधला होता, त्यात त्यांनी मुलांचं विश्व आणि त्यांच्या संकल्पना याबाबत पालकांनी कसं वागलं पाहिजे याबाबत अनेक दाखले दिले होते. असे नियतकालीकं मुलांना देऊ शकता. इंग्रजीत बहूदा डिमडिमा नावाचं मासिक आहे.
- नीलकांत
4 Jan 2012 - 11:41 pm | चित्रगुप्त
थोडेसे विषयांतर करून लिहितो आहे...
चंपक चा उल्लेख वाचून आठवले की त्यात मी बरीच वर्षे ' डिंकू ' ही चित्रकथा करत असे. त्याकाळी माझी मुले लहान होती, ती ' डिंकू ' आवडीने वाचायची, त्यामुळे मला नवनवीन गोष्टी रचून चित्रित करायचा हुरुप असायचा. मुले मोठी झाल्यावर माझे डिंकू पण थंडावले.
कुणा मिपाकरांना ' डिंकू ' आठवतो का?
मला माझ्या लहानपणी 'चांदोबा' तर केवळ अद्भुत वाटायचा.
१९५२ पासूनचे मराठी चांदोबाचे अंक इथे वाचता येतीलः
http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
5 Jan 2012 - 12:43 am | मोदक
लिंक बद्दल धन्स..
5 Jan 2012 - 1:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही डिंकू करायचात ?? मला आता नक्की आठवत नाही आहे, कारण बरीच वर्षे झाली, पण हे नाव खूप ओळखीचे वाटत आहे. दोन पानी कॉमिक होते का हो? सेंटर फोल्ड ला एक होते, तेच का? अशीच एक चिकू कि चीकलू नावाच्या हुशार सशाची गोष्ट होती. ती पण खूप आवडायची. राजू आणि छोटी खार पण आठवते.
चंपक ची आठवण येऊन nostalgic झालो आहे. त्याकाळी मी महिन्याचे २८ दिवस चंपक ची वाट पाहत असे. कारण ते एका दिवसात संपायचे, मग पुढील अंकासाठी १४ दिवस वाट पाहणे. चंपकच्या लेखक / चित्रकारांपैकी तुम्ही एक होतात हे ऐकून खूप आनंद झाला. माझ्या बालपणाचा एक हिस्सा झाल्याबद्दल धन्यवाद !!!
5 Jan 2012 - 1:47 am | दादा कोंडके
जुन्या चंपक मधला डिंकू माझा आवडता होता.
खूपश्या चित्रकथा अजुनही आठवतायतात. त्यापैकी एक म्हणजे सडक्या बटाट्याची पोती बाहेर ठेउन देतात ती.
त्या तुमच्या चित्रकथा होत्या हे कळल्यावर खूप जुनं कोणीतरी ओळखीचं भेटल्यासारखं झालं. :)
नंतरचं चंपक मात्र खरच "चंपक" झालं. त्यामानानं ठकठक, छावा छान वाटायचं.
7 Jan 2012 - 12:43 am | रेवती
मला डिंकू आठवतोय.
तुम्ही डिंकू करायचात हे वाचून भारी वाटलं.
चांदोबा, चंपक म्हणजे मेजवानी वाटायची.
तसेच रेडिओवरचे रविवारी लागणारे कार्यक्रम ऐकण्यासाठी जिवाचे कान होत असत.
सगळ्या मुलांची जवळच्या लायब्ररीच्या बालविभागातील सगळी पुस्तके दोनदा तरी वाचून झालेली असायची.
माझ्या मुलाला वाचनाची गोडी फारशी नव्हती म्हणून वाईट वाटायचे पण सुदैवाने त्याच्या पूर्वीच्या एक शिक्षिका चांगल्या होत्या. त्यांनी त्याला चांगल्या वाचनाची गोडी लावली. त्यानंतर आता 'वाचन बास' म्हणायची वेळ आलिये.
2 Jan 2012 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
अशा पालकांनी मुलांना मिपावरती सदस्यत्व घेऊन द्यावे.
आजकाल लहान मुलांसाठी अनेक कथा, कविता इथे निघत आहेत. काही लेखक तर असे लिहितात की, पटकन हे त्यांनी लिहिले आहे, का कोणा गोग्गोड बाळाने असे वाटून जाते अगदी.
ह्या प्रश्नावरती ठाम उपाय म्हणजे मिपाच आहे.
2 Jan 2012 - 1:22 pm | अन्या दातार
आणि याच मिपावर चांदीचे पेले, तुळशीच्या मंजुळा, दारवा यांचे ज्ञान मिळून सर्वांगीण प्रगती होते. लैंगिक शिक्षणाचा तासही होतो, इतिहाससुद्धा खरपूस चवीने चघळला जातो.
मुलांना गणित वगैरे विषय शिकवायलाच काय त्या शाळेचा उपयोग. बाकी सर्व ज्ञान इथे अगदी फुकटात भेटते.
©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º©
2 Jan 2012 - 1:54 pm | हंस
अन्या एक नंबर रे! अगदी माझ्या मनातलं बोललास!!!!!!!!!!!!
2 Jan 2012 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा
©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>> :-D सही रे सही... या मुळे मेल्या गोलो आहे
2 Jan 2012 - 4:35 pm | मन१
बाडिस.
पराच्या सहिचं टराटरा रुपांतर "मरा" असं केल्यानं आता अन्याचे पाय धरा असे म्हणू इच्छितो.
खरा
2 Jan 2012 - 11:41 pm | सूड
©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>>
हा हा हा.....मानलं ब्वॉ. अन्याभौ, नमस्कार....अगदी कोपरापासून. :D
3 Jan 2012 - 12:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा हा !!!!! लय भारी...
सदर आयडीचे सेकंड बेष्ट विडंबन....
दि बेस्ट कुठले ते आठवत असेलच सूड ला ;-)
3 Jan 2012 - 3:20 pm | किचेन
ते सगळ मोठ्यांसाठी होत.आता त्या पिंट्याला मी तुळस घशासाठी चांगली असते एवढाच सांगणार! माजुला काय असते विचारलं तर मुळीच नाव आहे अस सांगेल.
लहान मुल म्हण्जे वैताग नुसता!
3 Jan 2012 - 3:25 pm | गवि
हे काय म्हणायचं आहे?? अर्थ जाऊदे, शब्द काय आहेत?
3 Jan 2012 - 3:56 pm | अन्या दातार
>>अर्थ जाऊदे, शब्द काय आहेत?
=))
बस पता लगतेही आपको खबर कर देंगे ;)
3 Jan 2012 - 7:53 pm | प्रचेतस
माजुला म्हणजे द. आफ्रिकेचे अध्यक्ष गेराल्ड माजोला तर नव्हेत, तसं असेल तर किचेनतैंच्या ओळखी लै मोठ्या ठिकाणी आहेत असे म्हणता येईल.
3 Jan 2012 - 8:23 pm | मोदक
मंजुळा..
सदरच्या प्रतिसादाबरोबरच मी मोडी लिपी, तसेच मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील सांकेतीक शीलालेख यशस्वीपणे वाचून अर्थाचे निरूपण करण्याचे पेटंट घेत असल्याचे जाहीर करत आहे... ;-)
मोदक
3 Jan 2012 - 8:49 pm | मोदक
>>>>माजुला काय असते विचारलं तर मुळीच नाव आहे अस सांगेल.
मंजुळा काय असते (हे) विचारलं तर मुलीचं नांव आहे असं सांगेन
वरील शॉट साठी (http://www.misalpav.com/node/6332 - मोकलाया दाहि दिश्या) येथे नेट प्रॅक्टिस केलेली आहे. :-)
मोदक.
2 Jan 2012 - 5:11 pm | पक पक पक
डॉ.दिवटेंच्या 'ब्रेक अप्'बद्दल बोलत आहात का ..?
2 Jan 2012 - 5:35 pm | ५० फक्त
डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये कोणता विषय आहे ? गणित का भुमिती का इतिहास का भुगोल ?
2 Jan 2012 - 6:07 pm | पक पक पक
डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये कोणता विषय आहे ? गणित का भुमिती का इतिहास का भुगोल ?
ह्या ह्या ह्या ह्या मि पा वर जे विषय असतात त्या बद्दल वर चर्चा चालु होती ,त्या संदर्भात विचारल हो. बाकी गणित्,भुमिती वर काही वाच्ल्याच आठ्वत नाही मिपा वर.
2 Jan 2012 - 9:28 pm | ५० फक्त
मध्यंतरी कोडी सोडवा कोडी सोडवा असले धागे निघत होते की बरेच तेंव्हा तुम्ही नव्हता वाट्टं.
2 Jan 2012 - 9:57 pm | पक पक पक
नाही नव्हतो तेव्हा मि , पण कसली कोडी होती ,गणितातली का भुगोलातली .....नाय आपली एक शंका म्हणून विचारल.
2 Jan 2012 - 10:22 pm | ५० फक्त
अरे अरे, आपल्या आंतरजालीय मराठी वाङमयाला नाविन्यपुर्ण झळाळी देण्या-या कालखंडात मराठी आंतरजालापासुन काही अंतरावर होता हे वाचुन माझ्या दम्रव्यक्षचम्रवातासारख्या कोमला मनावर किती ओरखडे उठले हे तुम्हाला कसे समजणार, असो.
2 Jan 2012 - 10:33 pm | पक पक पक
आंतरजालीय मराठी वाङमयाला नाविन्यपुर्ण झळाळी देण्या-या ........................ 'दम्रव्यक्षचम्रवातासारख्या '
आय्ला ह्ये कसल मराठी कोड हाये भाउ ?
2 Jan 2012 - 10:41 pm | किचेन
'दम्रव्यक्षचम्रवातासारख्या '.....वाचताहि येत नाहिये.तिथे समजणार काय? डोंबल.
2 Jan 2012 - 11:18 pm | पक पक पक
वाचता वाचता वात आला आहे.......
4 Jan 2012 - 11:17 am | मी-सौरभ
जागेवरुन उठा अन् मोकळे होऊन या!!
28 Jan 2012 - 4:06 pm | अप्पा जोगळेकर
एखाद्याच्या ब्रेक-अपची अशी जाहीर चर्चा करणे अयोग्य वाटते.
धाग्याचे नाव वाचले ना. 'जपा निरागसता'
2 Jan 2012 - 5:42 pm | आत्मशून्य
कराटे किड मधिल पोराचं लव्ह इंटरेस्ट व व्हायलन्सची पातळी नक्किच आपल्यासाठी खटकाउ गोश्टी होत्या पण .....
पण लहान मुलं निरागस वगैरे नसतात तर केवळ दुर्लक्षण्याजोगीच असतात ह्यावर ठाम विश्वास आहे... कारण जेव्हां मि लहान होतो तेव्हां वडीलांच्या खिशातुन पैसेही ढापायचो व क्लास टिचरचा मुडदाच पडावा अशी मनापासुन इछ्चाही बाळगायचो... :)
3 Jan 2012 - 10:21 am | प्यारे१
मोठे जबाबदारी पार पाडायला कमी पडतात असं जाणवतंय.
3 Jan 2012 - 2:13 pm | इरसाल
आणि अश्या प्रकारे हा धागा हायज्याक झालेला आहे.
3 Jan 2012 - 8:37 pm | मोदक
"जपा निरागसता" की "लहान मुल म्हण्जे वैताग नुसता..??"
किचेन तै ए चालबे नॉ.
तुम्ही एक कोणती ती साईड फिक्स धरा हो.
आधीच पेट्रोल ने चक्कीत जाळ केला असताना तुमचा धागा वाचताना डोळ्यातून धूर येवू लागला आहे. (ह.घ्या.) :-)
मोदक
4 Jan 2012 - 10:19 am | मराठी_माणूस
"चक्कीत जाळ" हा वाक्प्रचार फारा वर्षानी वापरलेला दिसला . जुन्या आठवणीबद्दल धन्यवाद.
4 Jan 2012 - 11:42 am | वपाडाव
किचेन्तैंच्या घरी बहुतेक दुपट्याचे वास दरवळणार आहेत....
नाहीतर मुलांच्या संगोपनाची काळजी इतक्या आतुरतेने अन एवढ्या लौकर त्यांनी केली नसती....
पुढील वाटचालीस शुभेच्छा.... तब्येतीची काळजी घेणे....
5 Jan 2012 - 3:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद दिल्याने काढून टाकला आहे.
विमे
28 Jan 2012 - 2:25 pm | किचेन
ओय , अस काही नाहीये.शेजारच्या मुलांच्या अधोगतीकडे बघून लिहायची गरज वाटली.जेव्हा आपली मुल होतील तेव्हा त्यांची निरागसता जपण्यासाठी काय करायाल हव हा किडा डोक पोखरत होता म्हणून धागा काढला.
7 Jan 2012 - 12:32 am | मोदक
ह्म्म.. मग काय ठरले शेवटी..? कशी जपायची निरागसता..?
27 Jan 2012 - 11:37 am | सस्नेह
कुणासाठी जपायची ती ? या मुलाना त्याची गरजच नाही.
28 Jan 2012 - 2:18 pm | शेफ चेतन
गरज नाहीये अस तुम्हाला खरच वाटत? जर वाटत नसेल तर आपल्या भावना बोथट झाल्यात याचा हा पुरावा आहे अस समजायला हरकत नाही.ज्या वयात आपण शुम्कारोती म्हणत असू त्या वयात नवीन पिढी सिनेमातल्या खलनायकाचे सवांद म्हणत आहे.खर तर त्यात त्याचं काहीच चुकत नाही, चुकी होते ती मोठ्यांकडून.काही गोष्टी योग्य वयात कळलेल्याच चांगल्या असतात. जस आपण निदान मी तरी भावनाहीन झालोय...खून,बॉम्बस्फोट,खंडणी वगैरे शब्द ऐकून.दोन दिवस थोडासा त्रास होतो.पण नंतर नाही....तसाच या मुलाचं आहे.हि मुलही कदाचित अशीच भावनाहीन होऊन जातील.मोठी होईपर्यंत त्यांच्याही भावना बोथट झालेल्या सतील.मालिकांमध्ये दाखवले जाणारे घटस्फोट, भांडण, कट-कारस्थान रचण हेच प्रत्यक्षात येईल .तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही.आपण त्या पिढीला दोषहि देऊ शकणार नाही करांन त्यांना हे सगळ शिकवणारे आपणच असू.
-------------------------------------------------------------------------------------------
( लेखनासाठी सौ. किचेन यांची मदत घेतली आहे.मी दु आयडी आहे अस समजू नये अशी विनंती.)
-------------------------------------------------------------------------------------------
29 Jan 2012 - 4:11 am | वपाडाव
संस्कार लेखणातुन पाझळत आहेत....
मग बरोब्बर लिहिलंय, तुम्ही लहान असताना शुम्कारोतीच म्हणत असणार.
ह्यावरुन एक म्हण आठवत आहे, "उघड्याजवळ नागडं गेलं अन थंडीनं कडकडुन मेलं"
अहो, आम्ही तुम्हाला काही म्हटलंय का, पण खरी शंका तर त्यांच्या (किचेनतै) आय्डीवरच आहे....
वि.सु./ तळटीप सगळं काही हलक्यातच घ्या...
28 Jan 2012 - 2:24 pm | किचेन
प्र.का.टा.आ.
26 Mar 2012 - 1:05 am | निनाद मुक्काम प...
जपा निरागसता हे शीर्षक आवडले
माझ्या मते निरागस हा शब्द आपण जपला पाहिजे. तो लवकरच ह्या भूतलावरून अंतर्धान पावणार आहे.
बाकी लेखात कीस ह्या शब्दला मुका हा मराठीत अतिषय गोड शब्द आहे. असे आवर्जून सांगतो.
2 Jan 2015 - 7:36 pm | खेडूत
बरोब्बर तीन वर्षांपूर्वीचा हा धागा !
>>> मोठे ती जबाबदारी पार पाडतायत का?
हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे!
2 Jan 2015 - 7:45 pm | बॅटमॅन
पूर्वीचं मिपा राहिलं नाही.
2 Jan 2015 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा
आणि किच्चु तै पण नै (येत नाही) राहिली ( मिपावर) :-/ ... :-/ .. :-/
================================
केंव्हा येणार बरं किच्चू तै...??? अं.... कै कळत्त नै ब्वॉ! :-/