टीन एजर्स आणि एस टी डी

स्वाती२'s picture
स्वाती२ in काथ्याकूट
29 Dec 2011 - 5:49 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी.
गेल्या महिन्यात माझ्या मुलाच्या टीमने टीन एजर्स आणि एसटीडी या विषयावर वाय प्रेस साठी स्टोरी केली. इंडियानापोलिस स्टार या न्युज पेपरच्या ब्लॉग मधे ही स्टोरी उपलब्ध आहे.

http://blogs.indystar.com/ypress/2011/12/17/in-battle-against-stds-denia...

इथे शाळेत सेक्स एज्युकेशन अगदी सुरुवातीपासून आहे तरीही एकंदरीत समज गैरसमज थक्क करणारे! आकडेवारीही काळजी करायला लावणारी. भारतातही मॉर्निंग आफ्टर पिल्सचा वाढता वापर बघता एस टी डी चा धोका लक्षात घेतलाच जात नाहिये असे वाटले. या विषयावर सतत संवाद असणे खूप गरजेचे. म्हणून टीन एजर्सनी टीन एजर्ससाठी केलेल्या या स्टोरी बद्दल इथे सांगावेसे वाटले.

प्रतिक्रिया

मन१'s picture

29 Dec 2011 - 5:55 pm | मन१

दुवा इथून उघडत नाहीये.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.

स्वाती२'s picture

29 Dec 2011 - 6:05 pm | स्वाती२
आत्मशून्य's picture

29 Dec 2011 - 6:14 pm | आत्मशून्य

There’s a lot of 18-year- olds, 19-year-olds who get diagnosed with HIV, probably a lot more than you think.

अत्यंत अस्वस्थ करणारं वाक्य आहे. एकुण लेखच अस्वस्थ करणारा आहे. सुरक्षित रहायला काहि उपाय आहे का ?

चित्रा's picture

29 Dec 2011 - 8:13 pm | चित्रा

मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे लेख लिहीला आहे. खूप माहिती मिळाली. हा प्रश्न तसा अवघडच आहे. आई-वडिलांशी म्हणावे तसे स्पष्ट बोलणे नसल्याने तसेच मिडल स्कूलमध्ये मुलांवर थोडी कमी बंधने आल्यानेही असेल, किंवा त्या वयात नैसर्गिक ऊर्मी अतिप्रबळ ठरत असल्याने आणि त्यात भर म्हणून संधी असल्याने असेल पण अनेक मुले या वयातच सेक्शुअली अ‍ॅक्टिव होतात असे दिसते.

लेखात सांगितलेल्या उपायांखेरीज आपण अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे मुलांचा या वयातला वेळ बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या मानसिक चक्रात अडकल्याने कसा जातो ह्यावरूनही बोलू शकतो. कदाचित अनेक मुलांना ह्या विषयावरून बोललेले आवडणार नाही (कधीकधी आवडत नाहीच), अशा भितीने आईवडिल बोलत नाहीत. मुलांना आवडले नाही तरी आईवडिलांनी मुलांना आपल्या वेळेचे आपण काय करत आहोत यावरून वेळीच जागरूक करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. त्यासाठी आईवडिलांनी स्वतःलाही थोडीफार शिस्त लावणे महत्त्वाचे ठरते.

छान लेख. तुमच्या मुलाचे आणि त्याच्या टीमचे अभिनंदन.

पैसा's picture

29 Dec 2011 - 8:37 pm | पैसा

हेच आणि असेच म्हणते.

गवि's picture

29 Dec 2011 - 10:53 pm | गवि

लेखात सांगितलेल्या उपायांखेरीज आपण अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे मुलांचा या वयातला वेळ बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या मानसिक चक्रात अडकल्याने कसा जातो ह्यावरूनही बोलू शकतो.

- १

वेळ या फ़ॅक्टरला त्या वयात आणि फेजमधे असलेल्या पोरांच्या महत्व असतं का?
उगाच असं वेळेचं काहीतरी ठसवून इफ़ेक्ट काय आणि कसा होणार?

चित्रा's picture

30 Dec 2011 - 1:21 am | चित्रा

उगाच?! असो. मुलांना वेळेचा सदुपयोग कर असे म्हटलेले आवडत नाही हे मी वर म्हटलेलेच आहे. पण बॉयफ्रेंडच्या ध्यासात इथे अमेरिकेत मुलींचा किती वेळ जातो, त्यावरून टेक्स्ट करणे, काळजी करणे हे प्रत्यक्ष होताना पाहिलेले आहे. बॉयफ्रेंड हवाच अशा बाहेरील दबावात उमलत्या वयात अडकल्याने मुलांची/मुलींची वर्षेच्या वर्षे वाया जातात हे नक्की.

ज्यांचे आईवडिल वेळेचे महत्त्व जाणवून देण्याचा प्रयत्न करतात, त्यांची पोरे पुढील आयुष्यात बरेच काही करून जातात असे दिसते. मुलांना "नॅगिंग" न होता, किंवा बंधनात अडकलो आहोत असे न वाटता हे कसे सुचवावे याबद्दल बोलता येईल. पण केवळ मुलांना त्याचे विशेष पडलेले नसते म्हणून या सर्वात किती वेळ जातो याबद्दल शब्दही न काढणे योग्य ठरणार नाही असे वाटते.

पाषाणभेद's picture

30 Dec 2011 - 1:55 am | पाषाणभेद

एक उत्सूकता म्हणून विचारतो, राग नको.
तिकडे 'गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड पाहिजे' असल्या छोट्या जाहिराती असतात काय? नसल्यास त्याची ऑनलाईन इडीशन काढावी म्हणतो.

चित्रा's picture

30 Dec 2011 - 2:39 am | चित्रा

गंमत वाटते तर वाटू द्या बापडी. पण आधीच बरेच एक्सपर्ट वीडिओ आहेत यूट्यूबवर.. !

http://www.youtube.com/watch?v=OmgR_A1qdAg&feature=related
मिडलस्कूल म्हणजे आपल्याकडची सहावी ते आठवीची साधारण वर्षे.

पाषाणभेद's picture

30 Dec 2011 - 2:52 am | पाषाणभेद

गंमत नाय हो, उत्सुकता. बाकी इशय एकदम सिरीयस आहे हे मान्य आहे हो. असलेच लोण इकडेही पसरत चालले आहे. नवीन टेक्नॉलॉजी नष्ट करून पुन्हा नव्याने दुनीया रिसेट करावी लागेल यावर उपाय करण्यासाठी.

एक उत्सूकता म्हणून विचारतो, राग नको.
तिकडे 'गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड पाहिजे' असल्या छोट्या जाहिराती असतात काय? नसल्यास त्याची ऑनलाईन इडीशन काढावी म्हणतो. >>>>

=)) =)) =)) =))

लई हसलो ..खरच गंमतच आहे , ते ही कशासाठी तर त्या करिता :( असो ..सस्कांर नावाची एक गोष्ट कन्ट्रोल करते ब्वा भारतामध्ये, बाकी आंजा ला अमेरिकन रडारड नवीन नाही .

http://www.loksatta.com/lokprabha/20111230/metkut.htm

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Jan 2012 - 1:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सस्कांर नावाची एक गोष्ट कन्ट्रोल करते ब्वा भारतामध्ये, बाकी आंजा ला अमेरिकन रडारड नवीन नाही .

स्वदेस मधला मुनिसर आठवला. झोपलेल्याला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. असो....

अवांतर :- भारतातील प्रबळ संस्कारांचा खरडीय परिपाक (त्याला आध्यात्मिक बेस पण होता म्हणे) अख्ख्या आंजा ने पाहिला होता काही महिन्यांपूर्वी, त्याची जाता जाता आठवण झाली.

माफ़ करा.
"उगाच" या शब्दाने एक वेगळा टोन आला. मी तो शब्द मागे घेतो. माझा मूळ उद्देश हा "संवादा"ला रिडिक्यूल करण्याचा नसून थेट जी भीती आहे ती मुलांना सांगावी असा आहे. आडून आडून "वेळ" वगैरे असे सत्य पण न पटू शकणारे मुद्दे वेगवेगळ्या भाषेत ठसवण्यापेक्षा एड्स,एसटीडी यांविषयी बोलावे.त्याचसोबत एकूण लहान वयात रिलेशनशिप्सच कशा वाईट किंवा निरुपयोगी आणि अमुक वयानंतर मात्र त्या "सुंदर" असे पॅरेडॉक्स सोयीसाठी तयार करण्या ऐवजी सरळ जी काळजी घ्यायला हवी त्यावर बोलावं. किंवा मुलामुलींची टीनेज रिलेशन्स हेच याचे मूळ आहे याची खात्री असेल तर ते तोडण्यासाठी वेळ,अभ्यास,करियर अशा टँजंट न मारता रोगाची स्पष्ट भीती दाखवावी.
पोरांना अमुक प्रकारे न सांगता तमुक प्रकारे सांगितलं की त्यांना आपला उद्देश मुळी लक्षातच येत नाही हा भाबडेपणा आपण पालक अजून कितीकाळ करत राहणार? कसेही सांगा टीनेजर्स अंतस्थ हेतू एका फ़टक्यात ओळखतात.

मला वाटतं, टीनेजर्स घडा पालथा मारुनच बसलेले असतात. पालथ्या घड्यावर पाणी ओता किंवा दूध किंवा मध.. आत शिरणे कठीण.
पण घडा फ़ुटू शकतो ही जाणीव स्पष्ट केली की घड्याला आपोआप कान फ़ुटतात आणि तो सुलटा होतो.. :)

प्रभाकर पेठकर's picture

30 Dec 2011 - 11:25 am | प्रभाकर पेठकर

गवि साहेब,
चित्रा आणि तुमच्यातला वरील संवाद वाचला. मला वाटतं दोघेही बरोबर आहे. प्रत्येक पाल्याची संस्कार स्विकारण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जणांना थेट संवाद पचतो तर काही पाल्य थेट संवादाने बिथरतात. मुलांना तुमच्या बोलण्यातील उद्देश पुर्णपणे कळत असतो हे सत्यच आहे. आपल्या पाल्याला कशाप्रकारचा संवाद आवडतो, समजतो हे ओळखून मित्रत्त्वाचे नाते निर्माण करून (मी पालक आहे आणि मी सांगतो ते ऐकच.. हा हेका टाळून) संवाद करावा असे मला वाटते.
माझा मुलगा दहावीत असताना पुढील शिक्षणासाठी भारतात आला तेंव्हा एक दिवस त्याच्या सोबत मी एच्. आय्. व्ही आणि एड्स संबंधी बोललो होतो. मलाही संकोच वाटला होता परंतु तो संवाद गरजेचा होता. तेंव्हा त्याला ह्या विषयातील काही गोष्टी माहित असल्याचे (आंतरजालाचा वापर, मित्रांमधील संवाद) गृहीत धरून ह्या संबंधातली भयानकता अधोरेखित केली होती. तसेच, कुणाच्या आग्रहाला, चिथावणीला बळी न पडता आपले शरीर आणि आयुष्य ह्यांचा आदर करावा असे त्याच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा काही उपयोग झाला असावा असे जाणवते आहे.

विषय नाजूक पण तितकाच (किंवा त्यापेक्षा कितीतरीपट जास्त) गंभीर आहे. संवाद आणि संस्कार फार महत्वाचे ठरतात.

मित्रत्त्वाचे नाते निर्माण करून (मी पालक आहे आणि मी सांगतो ते ऐकच.. हा हेका टाळून) संवाद करावा असे मला वाटते.

मित्रत्वाच्या नात्यात थेट संवादच असतो. आडून आडून, कलाकलाने, युक्तीप्रयुक्तीने नव्हे.

पहिल्यापासूनच जे आहे ते आणि तसं असा संवाद ठेवला की कोणत्याच वयात संवादात बोळा बसत नाही आणि मी पालक , मी शहाणा, तू पाल्य, तू अजाण असा भाव डेव्हलप होत नाही....

अशी उदाहरणं पाहिली आहेत आणि निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.

प्रतिसाद आवडला..

प्रभाकर पेठकर's picture

30 Dec 2011 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

मित्रत्वाच्या नात्यात थेट संवादच असतो. आडून आडून, कलाकलाने, युक्तीप्रयुक्तीने नव्हे

मित्राशी बोलतानाही नाजूक विषय कौशल्याने हाताळावे लागतात, असे माझे मत आहे. बाकी, आपल्या मतांचाही आदर आहे.

रोगावरून बोलायचे नाही असे म्हटलेले नाही. टँजंटही मारायचे सुचवण्याचेही मनात नव्हते.

रोगांबद्दल त्यांना शाळेतूनही कळते, आपल्याकडूनही कळते/कळावे. पण पिअर प्रेशर बद्दल बोलताना आईवडिलांचा, शाळेतला स्पष्टपणा कमी पडतो असे वाटते. रोगाने शरीराचे काय होते याची छायाचित्रे दाखवता येतात, पण प्रेशरला बळी पडलेल्या मुलांच्या प्रश्नांचे चित्र तयार करणे अवघड असते. रोग कशाने होऊ शकतो हे माहिती असूनही काही मुलांना आपल्यापर्यंत ह्या रोगाची बाधा येणारच नाही असे वाटत असते हेही स्वाती२ यांनी दिलेल्या लेखातून दिसून येते. तसेच ह्या सर्वात वेळ घालवूनही आपण परिक्षेत पहिले येऊ, आपल्या भविष्यातील प्रगतीला धक्का लागणार नाही, असा फाजील आत्मविश्वासही असतो. आणि कधीकधी या सर्वातून जाऊन मुले तावून सुलाखून बाहेर पडतात, अनुभवांची शिदोरी कुठच्याही अनुभवातून मिळते, ती महत्त्वाचीच असते, फक्त ती किती मोबदल्यात हा प्रश्न आहेच.

असो. या अवांतराबद्दल दिलगीर आहे.

अवांतर काही नाही.. विषयाशी संबंधित आणि उपयोगी असेच प्रतिसाद तुम्ही दिले आहेत. मी म्हटलेलंही तुमच्या म्हणण्याला छेद देण्यासाठी नसून फक्त संवादाच्या पद्धतीबद्दल एक आणखी विचार मांडण्यासाठी आहे. एरवी ते तुमच्या म्हणण्याला पूरकच आहे.. (पालक या रोलमधूनच आहे..)

प्रतिसादाबद्दल आभार..

मूकवाचक's picture

30 Dec 2011 - 9:25 am | मूकवाचक

सहमत.

शाहिर's picture

29 Dec 2011 - 8:41 pm | शाहिर

डॉ . च्या विषयावर घाला..

विषय काळजीचा आहे हे मात्र नक्की

मॉडर्न चाइल्ड सायकॉलॉजी वैग्रे काहिही म्हणत असो पण

पण हे आपल्याला पटलं.
निव्वळ लैंगिक शिक्षणच नको त्या जोडीला मुलांवर पालकांची नजर हवीच.

पाषाणभेद's picture

29 Dec 2011 - 11:44 pm | पाषाणभेद

मोबायील फ्वान आल्यापास्न एशटीडी कमी झाल्यात. लायन नाय अन काय नाय.

आत्मशून्य's picture

30 Dec 2011 - 1:49 am | आत्मशून्य

ते खरयं पन सगलेच व्हायब्रेटर मोड वर अस्तिल याचि क्कै खात्रि ?

इन्दुसुता's picture

30 Dec 2011 - 6:47 am | इन्दुसुता

अतिशय गंभीर विषय. मावशी म्हणून भाच्यांशी या विषयाची केलेली चर्चा आठवते. त्यांना सुद्धा आई - बाबांपेक्षा लहान ( म्हणजे जनरेशन गॅप कमी म्हणून ) मावशी बरोबर बोलतांना मोकळेपणा जाणवला असावा.
मला स्वत:ला ( आणि माझ्या भावालाही .... एकाच वेळी :( )माझ्या आईनी आम्ही पाचवी सहावीत असताना अ‍ॅनॅटॉमी व फिजियॉलॉजी विषयी जुजबी माहिती दिली होती... त्यानंतर आठवीत असतांना शाळेत पुर्ण माहिती मिळाली आणि त्याच उन्हळ्यात सुट्टी साठी आलेल्या ( डॉक्टर ) ताईनी माझ्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.

मला आलेल्या अनुभवावरून मला वाटते की आईवडिल व मुले जरी या बाबतीत एकमेकांशी बोलण्यास फारशी उत्सुक नसतिल तरी कुटुंबातील अन्य वडील मंडळीनी देखिल या बाबतीत मुलांशी चर्चा केल्यास मुलांचे शंका निरसन होण्यास मदत व्हावी व त्याच वेळी किंवा ईतर वेळी मन मोकळे करण्यास एक विश्वास निर्माण व्हावा.

विकास's picture

30 Dec 2011 - 8:10 pm | विकास

मावशी म्हणून भाच्यांशी या विषयाची केलेली चर्चा आठवते.

ही एकंदरीत आजच्या काळातली तॄटी आहे. भारतात अथवा भारताबाहेर काही अंशी अधुनिक म्हणून तर काही अंशी अर्थकारण-सामाजीक बदल आणि त्यातून तयार झालेल्या परीस्थितीमुळे It takes a village to raise a child असे राहीलेले नाही. केवळ आईवडीलांचे मुलांनी ऐकायचे हे होऊ शकत नाही, की प्रत्येक वेळेस प्रत्येक केस मधे इच्छा असली तरी आई-वडील तसा वेळ देऊ शकत नाहीत. एकच गोष्ट आईवडीलांकडून (सतत) ऐकण्याऐवजी इतर कुणा वडीलमाणसाकडून ऐकली तरी ऐकणार्‍याच्या दृष्टीकोनात फरक पडू शकतो.

अमेरीकेसंदर्भात भारतीयांसारख्या स्थलांतरीतांना तर त्याचा विशेष त्रास होऊ शकतो. कारण अनेकदा जवळपासच काय या खंडप्राय देशात रक्ताच्या नात्याचे कोणीच नसते. आता बर्‍याच ठिकाणी भारतीय वस्ती वाढल्याने, रक्ताने नाही तरी संबंधाने मावश्या-काका वाढलेले आहेत. कधी काळी भारतात शेजारी पण हक्काने एकमेकांच्या मुलांना हक्काने सांगू शकायचे. पण आता तसा शेजारही कमी होत चालला आहे... जिव्हाळ्याच्या अभावी, हक्काने इतरांच्या मुलांना सांगणे आणि त्या मुलाने आपले ऐकणे हे होणे अवघड होऊ शकते, यात कुणाचा दोष नाही, फक्त वस्तुस्थिती आहे.

थोडक्यात लहान वयात शारीरीक संबंध, त्यातून उद्भवणार्‍या समस्या-रोग हा मुलाच्या वाढीच्या एका महत्वाच्या टप्प्यातील प्रश्नाचा केवळ एक गंभीर भाग आहे. मुलाला कसे वाढवावे कसे बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे त्याने/तिने जावे, त्यासाठी विचार करावा, इत्यादीची केवळ योग्य दिशा कशी द्यावी हा प्रश्न आहे.

इन्दुसुता's picture

30 Dec 2011 - 9:46 pm | इन्दुसुता

<< मावशी म्हणून भाच्यांशी या विषयाची केलेली चर्चा आठवते. >>

ही अलिकडील काळातीलच वस्तुस्थिती आहे. फिजिकल प्रेझेन्स याची तेव्हढी गरज असू नये आजकाल कारण टीन एजर्स सुद्धा वाढ्लेल्या कनेक्टिव्हिटी मुळे सतत कनेक्टेड असतातच ... फक्त ते कुणाशी कनेक्टेड असतात ( मित्रमैत्रिणी, भाऊ बहिणी किंवा अन्य ) आणि त्यांचे त्या व्यक्तींशी किती विश्वासाचे नाते आहे , यावर ते वरील विषयावर संवाद साधू शकतील की नाही हे अवलंबून असावे.
प्रत्यक्ष जवळ नसताना संवाद शक्य नाही ( अगदी नाजुक विषयावर देखील ) हे स्वानुभवामुळे मला तरी मान्य नाही. शिवाय भारताबाहेरील अथवा दूर असलेल्या नातेवाईकांची सुद्धा भेट होतेच, त्यावेळी वेळ काढून हे संवाद सहज शक्य होऊ शकतात.
असो, हे विषयाला धरून असेल तरी मुद्दा वेगळा आहे.
विषय गंभीर आहे हे सर्वांना मान्य आहे, त्याबद्दल टीन एजर्स शी बोलणे आवश्यक आहे हे देखिल सर्वांना मान्य आहे. पण त्यांच्याशी कुणी, केव्हा आणि कसे बोलावे यावर सध्या चर्चा सुरू आहे. शाळांमधून मिळणारी माहिती उपयुक्त असली तरी पुरेशी नसावी, समवयस्कांमधे केलेला संवाद कदाचित चुकीची माहिती देऊ शकेल ... मग यावर तोडगा काय?
( त्याच अनुषंगाने मी माझा अनुभव वानगी दाखल दिला होता... तो ही एक पर्याय ठरू शकतो म्हणून) .
मुलांशी बोलावयाची सुरुवात मोठ्यांनी करावी .. अवघड वाटले तरीही ; यावे दुमत नसावे. मुलांनी प्रश्न विचारण्याची वाट बघू नये असे वाटते. वर स्वाती२ यांनी जो वयोगट ( १०वर्षे ) संवादा साठी निर्देशित केला आहे त्याच्याशी सहमत. त्यांच्या धर्म/ संस्कृति यात न आणण्याच्या मुद्याशीही सहमत. मात्र विषय पाल्य आणि पालकांपुरता मर्यादित नसुन ती जबाबदारी शेअर्ड आहे यावर माझे मत ठाम आहे.

शिल्पा ब's picture

30 Dec 2011 - 11:23 am | शिल्पा ब

मुलांना या गोष्टी कशा सांगाव्यात याविषयी कोणी मार्गदर्शन करेल का? अवघड जागेचं दुखणं आहे खरं!!

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2011 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे श्री. सुभाष गुगळे काका हे खरे द्रष्टे म्हणायला हवेत. लहानपाणापासून त्यांनी आमच्या चेतन सरांवरती अगदी बारीक लक्ष ठेवलेले होते.

वयात आलेल्या मुलीलाच नव्हे तर मुलाला देखील जपायला हवे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत्
प्राप्‍ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्

ह्या पलिकडे अजून काय बोलणार? भारतीय संस्कॄती महान का हे अशा वेळी कळते. आपल्याकडे जे आहे ते नीट समजून न घेता खोट्या चकमकाटाच्या मागे धावलं की परिणाम चांगले होतील कसे?

स्वाती२'s picture

30 Dec 2011 - 7:08 pm | स्वाती२

सर्व प्रतिसादकांचे आभार!
@शिल्पा_ब लहान मुलाना समजेल अशा सोप्या भाषेत सुरुवातीपासून संवाद ठेवावा. आपण अवघडलेपण दाखवले की मुलांनाही हे काहीतरी वेगळे आहे असे वाटते. तसेच धर्म,संस्कृती वगैरे भानगड संवादात आणू नये. त्यामुळे रिबेल करण्याची शक्यता वाढते. जेंडरलेस मैत्रीवर भर असावा. माझ्या मुलाला मी तो १० वर्षांचा असताना 'Asking about Sex' हे Joanna Cole चे पुस्तक दिले. यात अतिशय सोप्या शब्दात माहिती दिली आहे. शरीरात बदल होण्याआधीच या बदलांबद्दल, मानसिक आंदोलनांबद्दल माहिती असेल तर मूल गडबडून जात नाही. हे सगळे नॉर्मल आहे आणि या वाटचालीत आम्ही आई-बाबा तुझ्या बरोबर आहोत असा विश्वास मुलाला दिला की पीअर प्रेशर मुळे होणारे बरेचसे प्रश्न सुटतात.

मदनबाण's picture

30 Dec 2011 - 9:36 pm | मदनबाण

टीन एजर्स आणि एस टी डी
पहिल्यांदा जेव्हा ह्या लेखाचे शिर्षक पाहिले तेव्हा वाटलं चावट संवाद करणार्‍या मंडळींसाठी वर्तमान पत्रात ज्या फोन नंबरच्या जाहिराती येतात त्या विषयी काही लिहलेय की काय ! नंतर लेखिकेचे नाव वाचल्या नंतर ती शंका मिटली ! ;)
असो...
चांगला विषय आहे, तुमच्या मुलाचे कौतुक करावेसे वाटते की या संबंधी त्याने विचार तर केलाच, पण तो विचार त्याने इतरां पर्यंत देखील पोहचवला.
अमेरिकेचा विचार केला तर स्वैराचार हा कळसाला पोहचलेला दिसतो,शाळकरी मुलांच्या मधील स्वैराचार हा तिथला चिंतेचा विषय ठरला आहे.
जेव्ह्या "त्या" वयात मन वेगळ्याच विश्वात असते तेव्हा एसटीडी चे धोके गंभीर बनतात !
एक गोष्ट लक्षात घेणे फार महत्वाचे आहे ती म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या पॉर्नोग्राफिक कंटेन्ट पैकी 89% हे फक्त अमेरिकेत निर्माण होते,दर ३९व्या सेकंदला अमेरिकेत एक पॉर्न व्हिडीयो तयार केला जातो.यावरुन एक लक्षात येते की या देशातली नैतीक मुल्ये किती खालच्या पातळीवर गेली आहेत ! आणि त्यामुळेच एसटीडी ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.सध्या अमेरिकेत ग्रुप सेक्स चा ट्रेंड आहे ! (संदर्भ :--- http://goo.gl/U6SSU )
स्वाती२ यांच्या मुला सारखा विचार करणारी किशोर मुले फार कमी असावीत असे वाटते कारण "संस्कारांचा आभाव"
पार्टी ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि याचे लोण आता आपल्या हिंदुस्थानात देखील पोहचले आहे.
या पार्टी ड्रग्स मधेली काही तर इतकी भयानक आहे की ज्या मुलीवर अत्याचार होते ते तिला कळत देखील नाही,कारण हे ड्रग्स स्मॄती नष्ट करतात ! मुलींनी पार्टीज मधे ड्रिंक्स घेणे टाळले पाहिजे कारण बर्‍याच वेळा या ड्रिंक्स मधुनच ड्रग्सचा डोस दिला जातो,मुलांची गोष्ट विचारात घेतली तर त्यांनाही धोका आहेच.
काही मोहक क्षणांमुळे संपुर्ण आयुष्य नष्ट होते... आणि म्हणुनच किशोर अवस्थेतील मुलांना पालकांनी या बद्धल सांगुन जागरुक केले पाहिजे.
बाकी गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंडच म्हणाल तर हल्ली आमच्या कॉलनीतल्या मुली १ रु.ची अनेक नाणी हातात घेउन फोनबुथवर गुलुगुलु गप्पा मारताना दिसतात ! त्यांना बॉय फ्रेंड असण्याचा "अभिमान"असतो.गप्पात देखील तीच चर्चा !

काळ इतका बदललाय ? की संस्कॄती बदलत चाललीय ?

चित्रा's picture

30 Dec 2011 - 10:15 pm | चित्रा

अमेरिकन वि. भारत असा संस्कृतींचा सामना नाही.. अमेरिकन घरांत संस्कार होत नाहीत हे चुकीच्या माहितीवर आधारित आहे. फरक एवढाच आहे की लग्नापर्यंत योनिशुचितेच्या, ब्रह्मचर्याच्या कल्पना अनेक संस्कृतींमध्ये नसल्याने तुम्हाला जो स्वैराचार वाटतो तो अनेकांसाठी सहज कामभावनेचा आविष्कार असतो.

कामभावनेची तुम्ही दिली आहेत तशी काही उदाहरणे आपल्याकडील काही पंथांच्या विशिष्ट प्रथांमधून दिसून येतील. उदा.घटकंचुकी.
जसे या प्रथेमुळे समस्त भारतियांना कामपिसाट, किंवा स्वैराचारी ठरवणे चुकीचे ठरेल तसेच समस्त अमेरिकन मुलांमध्ये स्वैराचार पसरला आहे असे विधान धाडसी आणि घोर चुकीचे ठरेल. नैतिक मूल्ये केवळ कामभावनेचा आविष्कार कसा आणि किती वेळा होतो, यावरून ठरतात असे नाही. स्टेशनांवर व्यक्तींना कामभावनेने प्रेरित होऊन धक्के मारणे, त्यांना जातायेता विशिष्ट नावांनी संबोधणे ही खास भारतात आढळून येणारी अनैतिकता आहे.

तेव्हा "आपण आणि ते" असले मुद्दे आपण बाजूलाच ठेवूया.

मदनबाण's picture

30 Dec 2011 - 10:57 pm | मदनबाण

अमेरिकन वि. भारत असा संस्कृतींचा सामना नाही..
असहमत... कारण वरील प्रसंग किंवा लिहलेला लेख हा अमेरिकन भुमीत घडत असलेल्या घडनांमुळेच आहे. हिंदुस्थानात असे घडत नाही असे मला अजिबात म्हणायचे नाही पण तुलना केल्यास इथल्या घटना त्यामानाने कमीच आहे.

फरक एवढाच आहे की लग्नापर्यंत योनिशुचितेच्या, ब्रह्मचर्याच्या कल्पना अनेक संस्कृतींमध्ये नसल्याने तुम्हाला जो स्वैराचार वाटतो तो अनेकांसाठी सहज कामभावनेचा आविष्कार असतो.
शुचिता म्हंणजे शुद्धपणा ! ज्यांना लैंगिक भुक ही शुद्धते पेक्षा जास्त महत्वाची वाटते त्यांना काय फरक पडणार ? (इथे पुरुषांनी स्वैराचार केला तर चालतो असे अजिबात नाही.)
विवाह हे आपल्या संस्कॄतीत बंधन आहे आणि संस्कार देखील त्यामुळे शुचितेला महत्व असणे यात गैर ते काय ?

अमेरिकन घरांत संस्कार होत नाहीत हे चुकीच्या माहितीवर आधारित आहे.
अमेरिकन हिंदुस्थानी व्यतिरिक्त लोक आहेत,त्यांच्या विषयी माझे मत आहे. पार्टीला जातोस तर काँडम घेउन जा असे सांगणारे पालक हिंदुस्थानात दिसतील असे मला वाटत नाही.

कामभावनेची तुम्ही दिली आहेत तशी काही उदाहरणे आपल्याकडील काही पंथांच्या विशिष्ट प्रथांमधून दिसून येतील. उदा.घटकंचुकी.
जसे या प्रथेमुळे समस्त भारतियांना कामपिसाट, किंवा स्वैराचारी ठरवणे चुकीचे ठरेल तसेच समस्त अमेरिकन मुलांमध्ये स्वैराचार पसरला आहे असे विधान धाडसी आणि घोर चुकीचे ठरेल.
तसे असते तर वरचा लेख लिहलाच गेला नसता, परंतु वर्गात शिक्षक नसतान ग्रुप सेक्स करणारी मुले अमेरिकेत आढळुन आलेली आहेत.स्वैराचार हा धर्म देश यांना बांधील नसतो... कुठेही असला तरी तो गैरच आहे आणि त्याचे समर्थन होउ शकत नाही !

स्टेशनांवर व्यक्तींना कामभावनेने प्रेरित होऊन धक्के मारणे, त्यांना जातायेता विशिष्ट नावांनी संबोधणे ही खास भारतात आढळून येणारी अनैतिकता आहे.
सहमत...

तेव्हा "आपण आणि ते" असले मुद्दे आपण बाजूलाच ठेवूया.
माझ्या प्रतिसादाचा रोख तसा नाही, परंतु त्यांच्यात आणि आपल्यात संस्कॄतीचा मोठा फरक आहेच.

मुद्देसूद उत्तर,आवडले.हे घटकंचुकीचे एकच उदाहरण फ़ारवेळा दिले जाते.आणि अनिष्ट प्रथांमधे सती.
दोन्ही फ़ार्फ़ार आउटडेटेड झाल्या तरी,एखाद्या उदाहरणावर बोट ठेवून भारतीय पण असेच असं म्हटलं जातं.
इथे काही आलबेल आहे असं मुळीच नव्हे,पण अमेरिकन प्रश्नांचे मूळ शोधू जाता एकदम डिफ़ेन्स घेतला जातो.मी चित्राताईंविषयी म्हणत नाहीये हे आवर्जून सांगतो.तिथल्या भारतीयांना अमेरिकन संस्कृती एकदम अविष्कार,स्वातंत्र्य इ इ वाटायला लागतं.अरे पण मग त्याच्यासोबतच हे इतर प्रश्न आलेत ना? त्यांचे सोल्युशन काढतानाही प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणायचं नाही..??

मूकवाचक's picture

31 Dec 2011 - 1:06 pm | मूकवाचक

अवान्तरः ओशो वगैरेनी पाश्चात्य लोक कामवासनेचा 'सहज स्वीकार' करतात आणि आमचे लोक मात्र दमित असतात, बसमधे धक्के मारतात असे लॉजिक(?) प्रसिद्ध केलेले होते. असली टाळ्याखाऊ वाक्ये वाचताना बसमधे धक्के मारल्याने एस. टी. डी चा प्रसार होत नाही, फार तर खरूज वगैरे होउ शकते याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते हे लक्षात येत नाही. स्त्री/ पुरूषानी मनपसन्द जोडीदाराशी रत व्हावे आणि नन्तर फार तर 'डुश' घ्यावा, सन्सर्ग झाल्यास प्रतिजैविके घ्यावीत. आता विज्ञानामुळे गर्भारपणाचा धोका नाही, त्यामुळे विवाहसन्स्था कालबाह्य ठरते असले 'द्रष्टे', 'विद्रोही' वगैरे वगैरे विचार त्यानी मान्डले. त्याच सुमारास एच. आय. व्ही. बद्दलची माहिती ज्ञात झाली. त्यामुळे हे 'भगवानश्री' इतके टरकले, की त्यान्च्या आश्रमातल्या स्वामी, मा वगैरे पब्लिकवर सहज स्वीकार वगैरे सगळे सोडून देऊन दुसर्या टोकाची आणि हास्यास्पद अशी काटेकोर बन्धने लादलेली होती. असो.

लंबूटांग's picture

31 Dec 2011 - 1:22 am | लंबूटांग

>>कारण वरील प्रसंग किंवा लिहलेला लेख हा अमेरिकन भुमीत घडत असलेल्या घडनांमुळेच आहे.
लेखिकेने लिहीले आहे की तिचा मुलगा अमेरिकेतल्या शाळेत जातो. तर तो भारतातल्या घटनांबद्दल कसे काय लिहील?

>>तुलना केल्यास इथल्या घटना त्यामानाने कमीच आहे.
कमीच म्हणजे? घडतच नाहीत असे तर नाही ना. आणि आपल्याइथे कितीतरी गोष्टी चोरीछुपे चालतात इथे जरा उघडपणे एवढाच फरक. जर घटना कमी असतील तर मग morning after pills चा खप वाढण्याचे काय कारण असावे बरे?

>>शुचिता म्हंणजे शुद्धपणा ! ज्यांना लैंगिक भुक ही शुद्धते पेक्षा जास्त महत्वाची वाटते त्यांना काय फरक पडणार.
हा दृष्टिकोनातला फरक झाला. सेक्स हा अशुद्ध असतो हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत झाले. आपणाकडे काही विदा आहे का की भारतात किती लोक शुचित असतात लग्नाआधी?

>>अमेरिकन हिंदुस्थानी व्यतिरिक्त लोक आहेत,त्यांच्या विषयी माझे मत आहे.
हे आपल्याइथे अमेरिकन संस्कृतीबद्दल अनेक गैरसमज आहेत त्याचेच एक उदाहरण. येथील सर्वसाधारण मध्यमवर्गीय पालकही आपल्या इथल्या मध्यमवर्गापेक्षा फार काही वेगळे शिकवत नाहीत.कोणताच पालक आपला पाल्य कितीजणांबरोबर झोपतो हे अभिमानाने मिरवत नाही.

नुकतेच एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त येथील एका अमेरिकन कुटुंबाकडे राहणे झाले. त्यांच्या मुलीचा बॉयफ्रेंड ख्रिसमस निमित्ताने घरी राहायला आला होता तर तिच्या आईने त्याला माझ्या बरोबर guest room मध्ये झोपायला सांगितले - पलंग नव्हता दुसरा तर जमिनीवर. तुम्ही बाहेर राहून काय करता ते करा माझ्या घरात चालणार नाही असा एकंदरीत त्या माऊलीचा सूर होता.

>>पार्टीला जातोस तर काँडम घेउन जा असे सांगणारे पालक हिंदुस्थानात दिसतील असे मला वाटत नाही.
सर्व अमेरिकन पालक असे करतात असे कोणी सांगितले? मी लेख वर वर चाळला पण असे कुठेही मला तरी लिहीलेले दिसले नाही. आणि लेखाचा उद्देश सेक्स करण्यास उत्तेजन देणे असा नसून त्यात काय धोके आहेत आणि काय सावधानता बाळगणे गरजेचे आहे हे सांगणे आहे आणि पालकांमधे आणि मुलांमधे हा संवाद घडल्याने कसे पुढील धोके टाळता येऊ शकतील हे सुचवणे आहे.

>>वर्गात शिक्षक नसतान ग्रुप सेक्स करणारी मुले अमेरिकेत आढळुन आलेली आहेत.
हे जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात आणि संस्कृतीत घडू शकते. आपल्याइथेही हे घडू शकते आणि आपली अब्रू कशाला चव्हाट्यावर आणा म्हणून प्रकरण दाबूनही टाकले जाऊ शकते.

सेक्स ही एक नैसर्गिक भावना आहे आणि फरक इतकाच आहे की अमेरिकेसारख्या देशात त्याबद्दल शाळेत शिकवले जाते तर भारतात अजूनही सेक्स एज्युकेशनला काही सनातनी संस्था विरोध करतात.

लेखिकेला भिती इतकीच आहे की इथे सर्व काही शाळेतच शिकवून जर का इतके गैरसमज असतील तर भारतात जिथे अजूनही ह्या विषयावर उघड्पणे बोलले जात नाही तिथे तर किती जास्ती धोका असेल.

>>स्वैराचार हा धर्म देश यांना बांधील नसतो... कुठेही असला तरी तो गैरच आहे आणि त्याचे समर्थन होउ शकत नाही !

सहमत. हेच म्हणतो.

@गवि

प्रॉब्लेम तर आहेच पण आपल्या संस्कृतीमुळे आपल्या इथे काही असे नाहीच आहे आणि अमेरिकेत सगळीकडे असेच आहे ह्या म्हणण्याला विरोध आहे.

>>अमेरिकन प्रश्नांचे मूळ शोधू जाता एकदम डिफ़ेन्स घेतला जातो.

असे नाही आहे तर आपल्याइथे बरेच गैरसमज असतात ते दूर करण्याचा प्रयत्न असतो बरेचदा.

जसे मी ही इथे बर्‍याच जणांना सांगतो की arranged marriage च केले पाहिजे असे भारतीय संस्कृतीत कुठेही लिहीलेले नाही आणि तिथेही boyfriend girlfriend असतात. हे केवळ एक उदाहरण झाले.

मदनबाण's picture

31 Dec 2011 - 10:16 am | मदनबाण

>>कारण वरील प्रसंग किंवा लिहलेला लेख हा अमेरिकन भुमीत घडत असलेल्या घडनांमुळेच आहे.
लेखिकेने लिहीले आहे की तिचा मुलगा अमेरिकेतल्या शाळेत जातो. तर तो भारतातल्या घटनांबद्दल कसे काय लिहील?
तेच तर मी म्हणतोय लेख हा अमेरिकन शालेय किशोरवयीन मुलांच्या बद्धल आहे,हिंदुस्थानी किशोर वयातील मुलाबद्धल नाही. चित्रा ताईंनी मला दिलेल्या प्रतिसादात म्हंटले आहे की अमेरिकन वि. भारत असा संस्कृतींचा सामना नाही.. त्याला प्रतिउत्तर आहे ते विधान.

शुचिता म्हंणजे शुद्धपणा ! ज्यांना लैंगिक भुक ही शुद्धते पेक्षा जास्त महत्वाची वाटते त्यांना काय फरक पडणार.
हा दृष्टिकोनातला फरक झाला. सेक्स हा अशुद्ध असतो हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत झाले. आपणाकडे काही विदा आहे का की भारतात किती लोक शुचित असतात लग्नाआधी?
मी कुठेही सेक्स अशुद्ध आहे असे म्हंटले नाही,पण लग्नाआधी आपल्या संस्कॄतीत त्याला मान्यता नाही.
विदा मागण्याचा उद्देश समजला नाही ! (स्त्री असो वा पुरुष लग्नाआधी संबंध ठेवणे आपल्या संस्कॄतीत गैर मानले जाते.स्त्रीयांसाठी योनिसुचिता आहे मग पुरुषांसाठी काही का नाही ? पण जर तसे असते तर स्त्रीयांनीही पुरुषांच्या शुचितेचा आग्रह धरलाच असता.) जर लग्न करताना व्यसनाधिनता आहे की नाही हे पहायले जाते तर स्त्री-पुरुषांनी लग्ना अगोदर शरीर संबंध प्रस्थापित केले होते का ? असा पश्न विचारला जाणे चुकीचे कसे ? जुन्या काळी लग्न पत्रिकांमधे एमुक व्यक्तीचा तमुक व्यक्तीशी शरीर संबंध प्रस्थापित करण्यात येणार आहे अशी वाक्यरचना असायची.मुळात माझे सर्व प्रतिसाद फक्त किशोर वयीन मुलांना दॄष्टीसमोर ठेवुनच लिहले गेले आहेत.त्यामुळे योनिशुचितेच्या, ब्रह्मचर्य,घटकंचुकी हे मुद्दे या किशोरवयीन गटाला लावुन पाहणे योग्य वाटत नाही.

हे आपल्याइथे अमेरिकन संस्कृतीबद्दल अनेक गैरसमज आहेत त्याचेच एक उदाहरण. येथील सर्वसाधारण मध्यमवर्गीय पालकही आपल्या इथल्या मध्यमवर्गापेक्षा फार काही वेगळे शिकवत नाहीत.कोणताच पालक आपला पाल्य कितीजणांबरोबर झोपतो हे अभिमानाने मिरवत नाही.
नुकतेच एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त येथील एका अमेरिकन कुटुंबाकडे राहणे झाले. त्यांच्या मुलीचा बॉयफ्रेंड ख्रिसमस निमित्ताने घरी राहायला आला होता तर तिच्या आईने त्याला माझ्या बरोबर guest room मध्ये झोपायला सांगितले - पलंग नव्हता दुसरा तर जमिनीवर. तुम्ही बाहेर राहून काय करता ते करा माझ्या घरात चालणार नाही असा एकंदरीत त्या माऊलीचा सूर होता.
तुम्ही बाहेर राहून काय करता ते करा माझ्या घरात चालणार नाही असा एकंदरीत त्या माऊलीचा सूर होता.
तुमच्या वरील विधानात विरोधाभास आहे,बाहेर व्यभिचार केला तर चालतो ! पण माझ्या घरात चालणार नाही ! ही कुठल्या सुसंस्कॄतपणाची लक्षणे ? हे असले संस्कार ?

सर्व अमेरिकन पालक असे करतात असे कोणी सांगितले? मी लेख वर वर चाळला पण असे कुठेही मला तरी लिहीलेले दिसले नाही. आणि लेखाचा उद्देश सेक्स करण्यास उत्तेजन देणे असा नसून त्यात काय धोके आहेत आणि काय सावधानता बाळगणे गरजेचे आहे हे सांगणे आहे आणि पालकांमधे आणि मुलांमधे हा संवाद घडल्याने कसे पुढील धोके टाळता येऊ शकतील हे सुचवणे आहे.

लंबुटांग तु अत्यंत घाईने किंवा उत्तेजित होउन वाचन केलेस किंवा फक्त तसा विचार करुन प्रतिसाद लिहला आहेस असे वरील विधान वाचुन वाटते.
असे पालक अमेरिकेत नाहीत का ? ते आधी स्पष्टपणे सांग मला. लेखाचा उद्देश मला पुर्णपणे कळला असुन ही अमेरिकन किशोरवयीन मुलांची समस्या आहे,आणि ह्या सर्व समस्यांना जबाबदार तेथील लयाला गेलेली समाज व्यवस्था आहे. मुले जे डोळ्यासमोर दिसतात त्याचेच अनुकरण करतात... आणि ज्या देशात स्वैराचार इतका माजला आहे तिथे त्याचे किशोर वयीन मुलांवर परिणाम होणारच !
माझे प्रतिसाद शांतपणे वाचलेस तर धोके टाळण्या बाबत मी काय सुचवले आहे,ते नजरेस येईल.

हे जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात आणि संस्कृतीत घडू शकते. आपल्याइथेही हे घडू शकते आणि आपली अब्रू कशाला चव्हाट्यावर आणा म्हणून प्रकरण दाबूनही टाकले जाऊ शकते.
हे अत्यंत बेजबाबदार विधान आहे, अमेरिकेत घडले त्याबद्धल तू एक शब्द बोलायला तयार नाहीस ?

जसे मी ही इथे बर्‍याच जणांना सांगतो की arranged marriage च केले पाहिजे असे भारतीय संस्कृतीत कुठेही लिहीलेले नाही आणि तिथेही boyfriend girlfriend असतात. हे केवळ एक उदाहरण झाले.
boyfriend girlfriend हे आपल्या संस्कॄतीचे फलीत आहे की पाश्चात्य ?

शिल्पा ब's picture

31 Dec 2011 - 11:30 am | शिल्पा ब

<<<तुमच्या वरील विधानात विरोधाभास आहे,बाहेर व्यभिचार केला तर चालतो ! पण माझ्या घरात चालणार नाही ! ही कुठल्या सुसंस्कॄतपणाची लक्षणे ? हे असले संस्कार ?

व्याभिचार म्हणजे नक्की काय? इथे(खरं तर इथेच काय कदाचित मुस्मीम देश सोडुन सगळीचकडे) बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यात बहुतेकदा शारीरीक संबंध असतातच. लोकं लग्न न करतासुद्धा एकत्र राहतात त्यालासुद्धा तुम्ही व्याभिचार म्हणत असाल तर म्हणा बॉ!!

आता आपल्याच घरात आपल्याच लेकीने बँग होउ नये अशीच कोणत्याही आईची लग्न होउन गेलेल्या मुलीबद्दल सुद्धा इच्छा असते, कारण तिच्यासाठी "ती" अजुनही चिमुकलं बाळंच असते.

बाकी, भारतात/ हिंदुस्थानात अमेरीकेची घुसखोरी होण्याआधी लग्नाआधी मुलं - मुली शारीरीक संबंध ठेवतच नव्हते हे (बिटवीन द लाईन) वाचुन अंमळ करमणुक जाहली.

जगात कुठेही मध्यमवर्गीय मानसिकता साधारण सारखीच असते, अन स्वतःच्या मुला/ मुलींबद्दल चिंता तिच असते हे आपलं आमचं एक मत.

मूकवाचक's picture

31 Dec 2011 - 12:32 pm | मूकवाचक

बाकी, भारतात/ हिंदुस्थानात अमेरीकेची घुसखोरी होण्याआधी लग्नाआधी मुलं - मुली शारीरीक संबंध ठेवतच नव्हते हे (बिटवीन द लाईन) वाचुन अंमळ करमणुक जाहली.
- दोन समाजात तुलना करणारे विचार तौलनिकदृष्ट्या 'शेडस ऑफ ग्रे' असे न बघता 'बायनरी' (एक नाही तर शून्य) अशा पद्धतीने वाचले जातात हे बघून अंमळ आश्चर्य वाटले.

पाश्चात्य सभ्यतेचा प्रभाव वाढण्याआधी लैन्गिक स्वैराचाराचे बेजबाबदारपणे उदात्तीकरण करण्याकडे भारतीय मानसिकता फारशी झुकलेली नव्हती असे काहीसे बिटवीन द लाईन वाचायला हरकत नाही. असो.

शिल्पा ब's picture

31 Dec 2011 - 1:28 pm | शिल्पा ब

अहो साहेब, मी इथे कुठेही स्वैराचाराचे उदात्तीकरण केलेले पाहीले नाही. आता दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणे हा सभ्यपणा मानत नाहीत त्यामुळे कोणी समजा काही संबंध ठेवत असेल अन ते माहीत झालं तरीही स्वत:ला त्रास होईपर्यंत किंवा ते बेकायदेशीर आहे असे निदर्शनास आल्याशिवाय कोणी काही बोलत नाही.

बाकी अगदी काळं पांढरंच बोलायचं म्हंटलं तर चालु द्या.

व्याभिचार म्हणजे नक्की काय?
नैतिकतेची चाड /तमा न बाळगता केलेले आचरण म्हणजे व्यभिचार.थोडक्यात सत्-असत् विवेक बुद्धी गहाण ठेवुन केलेले आचरण.

आता आपल्याच घरात आपल्याच लेकीने बँग होउ नये अशीच कोणत्याही आईची लग्न होउन गेलेल्या मुलीबद्दल सुद्धा इच्छा असते, कारण तिच्यासाठी "ती" अजुनही चिमुकलं बाळंच असते.
म्हणजे जगाच्या पाठीवर लेक कुठेही बँग झालेली त्या सुसंस्कॄत मातेला चालेल काय ? इतरत्र असताना ती सुजाण मुलगी आणि घरी असली तर बाळ ?

जगात कुठेही मध्यमवर्गीय मानसिकता साधारण सारखीच असते, अन स्वतःच्या मुला/ मुलींबद्दल चिंता तिच असते हे आपलं आमचं एक मत.
सर्वच पालकांना आपल्या पाल्याची काळजी असते, अगदी प्राणी सुद्धा त्यांच्या पिलांची काळजी करतात !
परंतु "संस्कार" आणि "विवेक" हा मुनुष्य प्राण्याला उमजतो.

आता दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणे हा सभ्यपणा मानत नाहीत त्यामुळे कोणी समजा काही संबंध ठेवत असेल अन ते माहीत झालं तरीही स्वत:ला त्रास होईपर्यंत किंवा ते बेकायदेशीर आहे असे निदर्शनास आल्याशिवाय कोणी काही बोलत नाही.

अत्यंत स्वार्थी विचार ! ज्या समाजात आपण राहतो त्याच्याशी आपली बांधिलकी असते,त्या समाजाचे काही नियम असतात...शिवाय आपण ही समाजाचाच भाग असल्याने समाजाला "चांगल्या" गोष्टी देणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्त्यव्य असते.मग दुसर्‍याचे घर जळते ना ! आपल्या घराला तर आग लागत नाही ना ! असला विचार कोत्या मनोवॄत्तीचे दर्शन घडवतो.

बास... मी आता इथेच थांबतो,वाद घालण्यासाठी मी प्रतिसाद देत नाही,आणि मूळ विषया पासुन मला वाचकांना भरकटावायचे नाही.

जाता जाता :--- व्यभिचाराची मानसिकता

लंबूटांग's picture

1 Jan 2012 - 2:16 am | लंबूटांग

धागा हायजॅक होऊ नये म्हणून हा शेवटचा प्रतिसाद.

मी कुठेही सेक्स अशुद्ध आहे असे म्हंटले नाही,पण लग्नाआधी आपल्या संस्कॄतीत त्याला मान्यता नाही.

माझी समजण्यात काही चूक झाली असेल पण ज्यांना लैंगिक भुक ही शुद्धते पेक्षा जास्त महत्वाची वाटते त्यांना काय फरक पडणार हे वाक्य वाचून मला तरी असेच वाटले.

पण लग्नाआधी आपल्या संस्कॄतीत त्याला मान्यता नाही.

कोणत्या संस्कृतीत मान्यता आहे? आपल्या इथेही उच्च मध्यमवर्गीयांमध्ये हे सगळे प्रकार चालतातच. संस्कृतीत मान्यता नाही असे म्हणताच चोरी छुपे करण्याकडे कल दिसतो आणि ते जास्ती धोकादायक आहे.

जर लग्न करताना व्यसनाधिनता आहे की नाही हे पहायले जाते तर स्त्री-पुरुषांनी लग्ना अगोदर शरीर संबंध प्रस्थापित केले होते का ? असा पश्न विचारला जाणे चुकीचे कसे ?

असा प्रश्न विचारला जाणे चूक आहे असे मी तरी कुठे म्हटलेले नाही. बाकी व्यसनाधीनता आणि विवाह्पूर्ण लैंगिक संबंध हि analogy अंमळ मजेशीर आहे.

तुमच्या वरील विधानात विरोधाभास आहे,बाहेर व्यभिचार केला तर चालतो ! पण माझ्या घरात चालणार नाही ! ही कुठल्या सुसंस्कॄतपणाची लक्षणे ? हे असले संस्कार ?

शिल्पा ब यांनी म्हटल्याप्रमाणेच ह्यात व्यभिचार कुठे आला? ती केवळ एकाच पार्टनर बरोबर संबंध ठेवत असेल तर? ते उदाहरण केवळ ह्याच साठी दिले होते कि येथेही सर्वसामान्य पालक लैंगिक संबंधांना उत्तेजन देत नाही अथवा तुझाच शब्द वापरला तर संस्कार करत नाही. ते बाहेर काय करत असतील ह्यावर तिच्या आईचा काहीच control नाही. शक्यही नाही जेव्हा ती शिक्षणासाठी घरापासून शेकडो मैल दूर राहते आहे. म्हणूनच म्हटले बाहेर काय करत असाल ते करा. तिच्या आईने नाही सांगितले तर एक तर ती ऐकणार नाही अथवा खोटे बोलेल जे आणखीनच वाईट.

असे पालक अमेरिकेत नाहीत का ? ते आधी स्पष्टपणे सांग मला.

असे म्हणजे कंडोम ठेवा सांगणारे? मला माहित नाही. असतीलही. भारतात नाहीत असे खात्रीलायक म्हणू शकता?

ह्या सर्व समस्यांना जबाबदार तेथील लयाला गेलेली समाज व्यवस्था आहे.

परत तेच. येथे कोणीही समर्थन करत नाही. फक्त सेक्स म्हणजे काहीतरी चोरी छुपे करण्याची गोष्ट आहे असे इथे मानत नाहीत एवढाच फरक.

अमेरिकेत घडले त्याबद्धल तू एक शब्द बोलायला तयार नाहीस ?

काय बोलावे अशी इच्छा आहे? मी असे म्हणत नाही की ते बरोबर आहे पण एवढेच म्हणायचे आहे की सरसकट पणे अमेरिकन संस्कृतीच अशी आहे हे म्हणणे बेजबाबदार विधान आहे.

boyfriend girlfriend हे आपल्या संस्कॄतीचे फलीत आहे की पाश्चात्य ?

कल्पना नाही. एवढा इतिहासाचा अभ्यास नाही. पण त्यात वाईट काय आहे हे मला माहित नाही.

खाली शिल्पा ब यांनी म्हटल्याप्रमाणे

अहो साहेब, मी इथे कुठेही स्वैराचाराचे उदात्तीकरण केलेले पाहीले नाही. आता दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणे हा सभ्यपणा मानत नाहीत त्यामुळे कोणी समजा काही संबंध ठेवत असेल अन ते माहीत झालं तरीही स्वत:ला त्रास होईपर्यंत किंवा ते बेकायदेशीर आहे असे निदर्शनास आल्याशिवाय कोणी काही बोलत नाही.

ह्याला प्रत्युत्तर म्हणून

अत्यंत स्वार्थी विचार ! ज्या समाजात आपण राहतो त्याच्याशी आपली बांधिलकी असते,त्या समाजाचे काही नियम असतात...शिवाय आपण ही समाजाचाच भाग असल्याने समाजाला "चांगल्या" गोष्टी देणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्त्यव्य असते.मग दुसर्‍याचे घर जळते ना ! आपल्या घराला तर आग लागत नाही ना ! असला विचार कोत्या मनोवॄत्तीचे दर्शन घडवतो.

??

शिल्पा ब ह्यांनी म्हटल्याप्रमाणे इथल्या समाजात खाजगी आयुष्यात नाक खुपसणे सभ्यपणा मानत नाहीत. हा समाजाचा नियम आहे आणि मला तरी तो आवडतो. ह्यात वाईट काय आहे? आपल्या पार्टनर बरोबर सेक्स करणे म्हणजे समाजाला वाईट गोष्टी देणे कसे?

बाकी विवाहपूर्व संबंध वगैरे वैयक्तिक बाबी झाल्या आणि तो लेखाचा विषयही नाही.

असो मी प्रतिसाद देण्याचे कष्ट इतक्यासाठीच घेतले की अमेरिकन संस्कृती व्यभिचाराला उत्तेजन देते हे म्हणणे खटकले. इथे गेली काही वर्ष राहिल्याने जे काही बघितले आहे त्यात मला तरी असे काही दिसले नाही.

इथेच थांबतो.

चित्रा's picture

1 Jan 2012 - 4:51 am | चित्रा

माझा संपूर्ण प्रतिसादच अवांतर असू शकतो. तसे वाटल्यास काढून टाकला तरी हरकत नाही.

@मदनबाण -

"असे पालक अमेरिकेत नाहीत का ? ते आधी स्पष्टपणे सांग मला. "
तुम्ही कोणत्या पालकांबद्दल असे म्हणत आहात? माझ्या पाहण्यात असे काँडोम घेऊन जा सांगणारे अमेरिकन पालक नाहीत. जेव्हा असे सांगितले जाते तेव्हा मुले लैंगिक व्यवहार करत आहेत ह्याची कल्पना असलेले पालकच केवळ असे सांगत असतील, ते सुद्धा मूल करतेच आहे ना लैंगिक व्यवहार मग निदान त्याला शारिरीक आजार तरी नकोत अशा विचाराने. मुळात मुलांशी स्पष्ट बोलण्याची भिती वाटणे हे कारण असते. ते चुकीचे आहे हे वरील लेखातून आलेच आहे, वेगळे सांगायचे कारण नाही.

तुम्ही म्हणता - "अत्यंत स्वार्थी विचार ! ... आपण ही समाजाचाच भाग असल्याने समाजाला "चांगल्या" गोष्टी देणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्त्यव्य असते.मग दुसर्‍याचे घर जळते ना ! आपल्या घराला तर आग लागत नाही ना ! असला विचार कोत्या मनोवॄत्तीचे दर्शन घडवतो".

हे मान्य आहे. पण याचा अतिरेक झाला की आपल्याला मान्य होत नाही ना? म्हणजे उदा. एखाद्याची उपासनापद्धती, दैवते इ. ठरवण्याचे स्वातंत्र्य आपण मान्य केले आहे. पण ज्या लोकांना मनापासून वाटते की देवतांच्या, बुवा-ताईंच्या मागे लागून समाजाचे नुकसान होते आहे, अशा समाजाचे प्रबोधन करावे, तो चुकीच्या मार्गाने चालला आहे, चुकीच्या पद्धतीने नादी लागतो आहे, नको तेथे पैसे उडवत आहे (उदा. दारू, सिगारेट इ.) आणि ते मध्येमध्ये लुडबुड करतात, श्रद्धास्थानांना धक्के देतात. त्यांच्या अशा दबावाला अनेकदा आ़क्षेप घेतला जातो/घेतला गेला आहे याची अनेक उदाहरणे अगदी याही संकेतस्थळावरची दाखवता येतील. याचे कारण लोकांनी काय करावे याचे स्वातंत्र्य आपण काही प्रमाणात मान्य करत असतो. असे असताना लैंगिक व्यवहार कसे असावेत याबद्दल दबाव किंवा सुचवण्या आजूबाजूने शेजार्‍यांकडून, आल्या तर ते स्वातंत्र्य, खाजगीपणा अमान्य केल्यासारखे होईल. मुलांना वाढवताना शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी हा विचार योग्य आहे, पण त्याचाही अतिरेक नको. आईवडिलांकडून किंवा मुलांचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तींकडून सूचना आल्यास ते अधिक उपयुक्त ठरते.

वरील सारख्या लेखांचे वैशिष्ट्य हेच आहे की असे लेख आपल्याला विचार करायला भाग पाडतात, अमूक केले तर काय होऊ शकते आणि तमूक केले तर काय होऊ शकते याबद्दलची माहिती हाती ठेवतात. तुमचे निर्णयाचे स्वातंत्र्य त्यात अध्याहृत धरलेले असते. मला हा पर्याय पटतो. शेजार्‍याच्या मुलांवर ल़क्ष ठेवून दबाव आणण्यापेक्षा त्याच्या हाती योग्य माहिती ठेवण्याचा हा पर्याय मला अधिक योग्य वाटतो. माझ्या घरातील व्यक्तीशी बोलताना मी जेवढी थेट माहिती देईन, किंवा थेट लुडबूड करेन तेवढी लुडबूड मी शेजार्‍याच्या घरात करू शकणार नाही. तेव्हा हे असे पर्याय उपलब्ध आहेत हे चांगले आहे.

यापुढची पायरी म्हणजे दोन पर्याय उपलब्ध असताना सारासार विचार (तुम्ही वर विवेक म्हटले आहेच) करून योग्य निवड करण्याचे शिक्षण किंवा मानसिकता आईवडिलांनी, शाळेने रुजवावी.

तुमचा दुसरा प्रश्न -"जर लग्न करताना व्यसनाधिनता आहे की नाही हे पहायले जाते तर स्त्री-पुरुषांनी लग्ना अगोदर शरीर संबंध प्रस्थापित केले होते का ? असा पश्न विचारला जाणे चुकीचे कसे ?"

अजिबात चुकीचे नाही. पण शुचिता आणि अक्षतयोनी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एका किंवा अधिक निरोगी पुरुषांबरोबर किंवा स्त्रियांबरोबर संबंध आल्याने शारिरीक शुचितेला धक्का लागत नाही असे माझे मत आहे. मानसिक व्यवहारांत शारिरीक जवळीकेचे परिणाम दिसणे अगदी शक्य आहे. पण या चर्चेचा मुख्य प्रश्न एस टी डी म्हणजे शारिरीक परिणामांशी निगडीत आहे.

एकनिष्ठता हा उपयुक्त गुण आहे, पण कधीकधी त्याचे अवाजवी स्तोम माजवलेले असते. पूर्वी आमच्या आजोबांच्या वयाचे लोक आपल्या कंपनीसाठी कामे करीत ते एकाच कंपनीशी एकनिष्ठ असत, आता लोक अनेक जॉब बदलतात. पतीपत्नींमधील किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमधील एकनिष्ठता ही नोकरी करणार्‍याच्या एकनिष्ठतेपेक्षा वेगळी नक्कीच आहे. पण जसे नोकरी सोडल्यानंतर तू मागील कंपनीशी एकनिष्ठ आहेस, माझ्याशी नाही, असे पुराव्याखेरीज म्हणणे जसे योग्य ठरणार नाही तसेच तू मागील स्त्रीशी एकनिष्ठ आहेस, माझ्याशी नाही असे काही पुराव्याखेरीज म्हणणे योग्य नाही. मागील संबंधांमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवणे हे गैर नसावे.

"नैतिकतेची चाड /तमा न बाळगता केलेले आचरण म्हणजे व्यभिचार.थोडक्यात सत्-असत् विवेक बुद्धी गहाण ठेवुन केलेले आचरण.

हे मान्य आहे. पण आपण किशोरवयातील मुलामुलींबद्दल बोलत असलो तर त्यांना व्यभिचार कळत नाही. त्यांना ते जे काही करतात, त्याचे परिणामही कळत नाहीत. अमेरिकन मुले या बाबतीत पीअर प्रेशरला चटकन बळी पडतात असे आपण म्हणू शकतो, पण अनैतिकता हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे असे समजणे योग्य नाही.

@ गवि, प्रश्नाला प्रश्न जरूर म्हणावे. अमेरिकेत हा प्रश्नच नाही असे माझे मत नाही. मदनबाण यांनी एक विधान केले आहे ते असे की "यावरुन एक लक्षात येते की या देशातली नैतीक मुल्ये किती खालच्या पातळीवर गेली आहेत ! " आपण आज जालावर टाईम्स ऑफ इंडिया उघडून पहिल्या पानावर पाहिले तर कोणी असे म्हणावे का "बघा ज्या देशातील महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असे सॉफ्ट पोर्न म्हणावे असे फोटो असतात, त्या देशातील नैतिक मूल्ये किती खाली गेली असतील!"

तर असे सरसकट काही नसते. आपण माध्यमांमधून जे ऐकतो ते केवळ झरोक्यातून बघण्यासारखे असते. प्रत्यक्ष पाहिल्यावर असे दिसते की माणसे सर्वत्र सर्व प्रकारची सापडतात.

इन्दुसुता's picture

1 Jan 2012 - 6:34 am | इन्दुसुता

<<मुलांना वाढवताना शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी हा विचार योग्य आहे, पण त्याचाही अतिरेक नको. आईवडिलांकडून किंवा मुलांचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तींकडून सूचना आल्यास ते अधिक उपयुक्त ठरते. >>

वरील वाक्य माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद आहे असे जाणवले ... असेच मला म्हणावयाचे असल्याने दुमत नाही.

>>शेजार्‍याच्या मुलांवर ल़क्ष ठेवून दबाव आणण्यापेक्षा त्याच्या हाती योग्य माहिती ठेवण्याचा हा पर्याय मला अधिक योग्य वाटतो. माझ्या घरातील व्यक्तीशी बोलताना मी जेवढी थेट माहिती देईन, किंवा थेट लुडबूड करेन तेवढी लुडबूड मी शेजार्‍याच्या घरात करू शकणार नाही. तेव्हा हे असे पर्याय उपलब्ध आहेत हे चांगले आहे. >>

शेजार्‍यांच्या मुलांवर लक्ष ठेवून दबाव आणणे ... असे मी कुठेही लिहिलेले नाही, तसे मला अभिप्रेत नाही ... मी फक्त घरातील किंवा सर्व साधारण पणे ज्यांना कुटुंबिय म्हट्ल्या जाउ शकते अश्यांकडे निर्देश केला होता.
नेहमी प्रमाणे चर्चा भारतिय v अनिवासी या मुद्दयावर अडकली तेव्हा आणखी प्रतिसाद न देण्याचेच ठरवले होते.. पण माझ्या मुद्याचा विपर्यास होउ नये येव्हढ्यासाठी हे टंकन श्रम.

<<वरील सारख्या लेखांचे वैशिष्ट्य हेच आहे की असे लेख आपल्याला विचार करायला भाग पाडतात, अमूक केले तर काय होऊ शकते आणि तमूक केले तर काय होऊ शकते याबद्दलची माहिती हाती ठेवतात. मला हा पर्याय पटतो. >>

खरे आहे.

लंबूटांग's picture

2 Jan 2012 - 7:49 am | लंबूटांग

धन्यवाद चित्राताई. मला जे काही सांगायचे होते तेच तुम्ही नेमक्या शब्दात सांगितलेत.

काही लोक वेषांतर करुन आल्याचा सशंय येतो आहे ;)

स्वातीताई २, धन्यवाद.
तुझ्या मुलाचे कौतुक वाटले.
नुकत्याच झालेल्या भारतवारीत माझा मुलगा आजारी पडल्याने त्याला आमच्या डॉ. कडे घेऊन गेले होते.
त्यांच्याशी गप्पा (तब्येतीच्या) मारताना त्यांनीच मुलाशी आता या विषयावर बोलायला हळूहळू सुरुवात करा म्हणून सुचवले आहे. तू सुचवलेले पुस्तक मिळवते आणि मुलाला वाचायला देते. गर्लफ्रेंड्/बॉयफ्रेंड या प्रकरणात मुलाने तणावग्रस्त होवून वेळ वाया घालवू नये असे मनापासून वाटते. भारतातही मुले व मुली लवकर वयात येत असल्याची (व आणखीही धक्कादायक) माहिती डॉ. नी दिली.