उद्दामपणा

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
22 Dec 2011 - 8:54 am
गाभा: 

पैसा आणि राजकीय पाठबळ असले की काय काय होउ शकते याचे उदाहरण काल बघायला मिळाले.

एक्सप्रेस हायवे जवळ बांधण्यात आलेल्या गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमचे काल उद्घाटन करण्यात आले. वाहतुकीसाठी एक्स्प्रेस वेला कोठेही छेद न देण्याचा नियम स्टेडियमसाठी मात्र वाकविण्यात आला आहे .

एव्हढ्यावरच हे थांबले नाही. गहुंजे गावाजवळ एक्स्प्रेस वे वरील दुभाजक फोडण्यात आला . तेथून खासगी बस व मोटारी स्टेडियमच्या बाजूला राँग साईडने नेण्यात आल्या .

एक्सप्रेस वे वरील वाहतुक ही वेगाने होत असते. यात जर काही दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?? यासाठी कुठल्या अधीका-यांनी परवानगी दिली होती? परवानगी न घेताच हे कृत्य केले असेल तर त्याबद्दल काय कारवाई होणार?

पैसा आणि राजकीय पाठबळामुळे आलेला हा उद्दामपणा आहे. याबद्दल कारवाई होण्याची शक्यता धुसरच वाटते.

ही बातमी येथे वाचा.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

22 Dec 2011 - 9:20 am | मराठी_माणूस

हा कोणता एक्सप्रेस हायवे आणि हे गहुंजे गांव कूठे आहे ?

"बातमी येथे वाचा." यावर क्लिक करायचे कष्ट घेतले असते तर कदाचीत कळले असते.

मराठी_माणूस's picture

22 Dec 2011 - 9:34 am | मराठी_माणूस

ती लिंक उघडत नाही

श्रीरंग's picture

22 Dec 2011 - 9:32 am | श्रीरंग

कोणतेही नियम, कोणतीही घटना, यापेक्षा क्रिकेट मोठे आहे हे कधी बरं समजणार या लोकांना? क्रिकेट ईज अवर रिलीजन, यू ईडीयट!! घुसवल्या चार गाड्या विरुध्द दिशेने, तर काय बिघडलं??

sagarpdy's picture

22 Dec 2011 - 9:40 am | sagarpdy

+१

प्रभाकर पेठकर's picture

22 Dec 2011 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

मराठी माणसाची "टिपीकल" प्रतिक्रीया.
प्रेषक चिंतामणी गुरुवार, 22/12/2011 - 09:32.

"बातमी येथे वाचा." यावर क्लिक करायचे कष्ट घेतले असते तर कदाचीत कळले असते.

चिंतामणी साहेब,
चर्चेचा विषय मांडताना विषयाशी निगडीत सर्व मुद्दे आपण मांडण्याचे अपेक्षित आहे. ते आपण केले नाहीत. बातमी वाचून प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर बातमीत सर्व काही दिले आहे आपण तो सर्व तपशील इथे देण्याची गरजच नव्हती. नुसती बातमीची लिंक देऊन ह्या बातमी बद्दल आपले काय मत आहे असे विचारायचे.

ह्यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की, कोणी तपशील विचारल्यावर वरील प्रतिक्रिया देऊन, मराठी माणसाच्या प्रतिक्रियेस 'टिपिकल' असे संबोधून, (मराठी माणसास विनाकष्ट सर्व काही हवे असते असे सुचवून) आपणही काही उद्दाम पणा करतो आहोत असे वाटत नाही का?

राग नसावा.

चिंतामणी, अशी डेव्हिएशन्स कधीकधी जॅम वाचवण्यासाठी आवश्यकही असतात. इथे नेमकी काय स्थिती होती ते कळणं कठीण आहे.. पण डिव्हायडर तोडून पलीकडून एक लेन मोकळी करणं काहीवेळा फायद्याचंही ठरतं. ट्रॅफिक पोलीसांनी ही स्टेप घेतली असेल तर मला काही हरकत दिसत नाही, कारण आपले ट्रॅफिक पोलीस कितीही खाबू असले तरी जॅम सोडवण्याच्या त्यांच्या कपॅसिटीविषयी मला अत्यंत कौतुक वाटत आलं आहे.

सतत पोलीस उभा राहून प्रवाह कंट्रोल्ड असेल तर बहुतेक वेळा अशा पर्यायी मार्गिका सुरक्षित असतात.. कायदा किंवा अन्य कशापेक्षाही इथे वाहतूक न अडकणे महत्त्वाचे असते.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2011 - 11:13 am | llपुण्याचे पेशवेll

कायदा किंवा अन्य कशापेक्षाही इथे वाहतूक न अडकणे महत्त्वाचे असते.
बरोबर आहे. म्हणून कायदा तोडून केलेल्या डेव्हीएशन पाळताना कोणी मेले तर त्याचे आम्हास काही वाटत नाही. शेवटी वाहतूक न तुंबणे हे एकच महत्वाचे. डिव्हायडर तोडून राँग साईडने गाड्या नेण्यासारखा सोपा मार्ग अवलंबून नये याचे आश्चर्य वाटते. हे म्हणजे ढिसाळ नियोजनात सुधारणा करण्याऐवजी कायदे तोडण्यावर भर देण्यासारखे आहे. आधीच भारतात कायदे पालनाच्या नावाने बोंब.
असो.

अहो.. मरत नाही हो कोणी जर पोलीसांनी ठरवून डायवर्शन्स काढली असतील तर..

एक बाजू पूर्ण मोकळी आणि दुसरी तुंबलेली अशा वेळी पोलीस बर्‍याचदा हा मार्ग अवलंबतात.. तेव्हा नियंत्रितरित्या आणि सावकाशच जातात गाड्या.. अशा तुंबळ परिस्थितीत स्पीड घेण्याची फाफ तर अपघात कुठून व्हायला ?

एखाद्या जागी जर नियमावर बोट ठेवून वाहतूक साठू दिली तर अधिक गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. परिस्थिती तिथे उभा राहून पाहणारे पोलीसच सर्वात चांगले जज्ज असतात अशा वेळी...

असं म्हणायचं होतं .. "मेले तरी काही वाटत नाही "वगैरे म्हणजे एकदम फारच बुवा...

गवी, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. पण मला वाटतं, इथे एखद्यादिब्वशी वाहतुकीची झालेली गैरसोय, यापेक्षा गैरसोयीमागील कारण हा चर्चेचा मुद्दा असावा. आता गहुंजे येथील स्टेडीयमचे काम पूर्ण झाले आहे म्हणजे तिकडे सामने होतच राहणार. प्रत्येक सामन्याच्या वेळी वाहतुक व्यवस्थेला असे वेठीस धरले तर ते कितपत योग्य आहे?
स्टेडीयम बांधण्यापूर्वी हे समजले नसेल काय? बीसीसीआय च्या मुजोरीचे आणखीन एक उदाहरण आहे हे.

नगरीनिरंजन's picture

22 Dec 2011 - 3:27 pm | नगरीनिरंजन

तुमचं लॉजिक पटलं नाही. एवढं मोठं स्टेडियम बांधलं तर या निर्लज्ज लोकांना एक फाटा फोडून फ्लायओव्हर किंवा अंडरपास नाही बांधता आला? सरकारनेही परवानगी देताना अशी काही अट नाही घातली किंवा स्वतःच असं काही का केलं नाही?
कोणत्याही वाहतूक अधिकार्‍याला असा दुभाजक फोडायची परवानगी देण्याचा अधिकार नसेल अशी माझी खात्री आहे.

चिंतामणी's picture

22 Jan 2012 - 9:27 am | चिंतामणी

हे वाचा.

हे होणारच होते. म्हणूनच त्यावेळी बातमीचा मागोवा घेतला होता. त्यावेळी "डायवर्शन्सला" पाठिंबा देणा-यांनी प्रतिक्रीया द्यावी.

"बडे बडे रास्तोंपे ऐसी छोटी छोटी घटनाये होती रहती है" अश्या स्टाइलने प्रतिक्रीय देउन विषयाचे गांभीर्य कमी करू नये.

गवि's picture

22 Jan 2012 - 9:43 am | गवि

:-(

क्षमस्व.

धाग्या वरुन अशी समजूत झाली होती की एका दिवसासाठी
पोलीस देखरेख असताना ततात्पुरती
अरेंजमेंट झाली होती.

नगरीनिरंजन's picture

22 Jan 2012 - 10:16 am | नगरीनिरंजन

त्यावेळी "डायवर्शन्सला" पाठिंबा देणा-यांनी प्रतिक्रीया द्यावी.

त्यांनी प्रतिक्रिया देऊन काय होणार? दुभाजक फोडणार्‍याला शासन होईल अशी आशा करणेसुद्धा मूर्खपणा आहे.

चिंतामणी's picture

22 Jan 2012 - 11:09 pm | चिंतामणी

त्यांनी प्रतिक्रिया देऊन काय होणार?

हा प्रश्ण बरोबर आहे.

परन्तु ज्यांनी विषयाविरूध्द प्रतिक्रीय लिहील्या त्यांना वस्तुस्थीतीची जाणीव झाली की नाही हे त्यांनी प्रतिक्रीया लिहील्यावरच कळेल असे मला वाटले.

तुमच्या भावना पोहोचल्या आहेत हे नक्की.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jan 2012 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या भावना पोहोचल्या आहेत हे नक्की.

नेहरीन ह्यांच्या भावना देखील काळजाला भिडल्या आहेत.

शिल्पा ब's picture

22 Dec 2011 - 12:49 pm | शिल्पा ब

कैच्या कै!!!
वाटेल ते कारण असेल म्हणुन काय जनतेच्या पैशाने बांधलेला फ्रीवे(?) डॅमेज (?) करुन मग वाहतुक वाकडीतिकडी करुन न्यायची का? कमाल झाली तुमची पण.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2011 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार

'कोणत्याही धर्माविरुद्ध टिका / टिपणी करणारे लेखन मिपावर करू नये' असा नियम असताना हा धागा अजून इथे पाहून आश्चर्य वाटले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Dec 2011 - 4:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गल्ली चुकलं काय वो ??

क्रिकेट भारताचा धर्म आहे हो.

चिंतामणी's picture

22 Dec 2011 - 11:46 am | चिंतामणी

अ‍ॅप्रोच रोडसाठी खर्च किती आहे हे कोणी आधीच्या बातम्या वाचल्या असत्या तर ते कळले असते. पुण्याकडे आणि मुंबईकडे जाण्यासाठी जो रस्ता करायचा आहे त्याची रू.२० कोटी आहे. ओव्हर ब्रिज करून तो एक्सप्रेस वेला जोडायचा आहे.

मोठ्या तोंडाने हा विस कोटी खर्च करू म्हणणारे म.क्रि.संघटनेच्या अध्यक्षांचे हे उदगार येथे वाचा.

डिव्हाडर तोडुन रॉंगसाइडने गाड्या नेणाचे समर्थन करणा-यांनी ही बातमी जरूर वाचावी.

डिव्हाडर तोडुन रॉंगसाइडने गाड्या नेणाचे समर्थन करणा-यांनी ही बातमी जरूर वाचावी..

चिंतोपंत, अहो, तात्पुरते उपाय म्हणून ठीक असं म्हणायचं आहे.. तुमचा मुद्दा खोडत नाहीये.. कायमस्वरुपी उपाय / रस्ता हाच अंतिम उपाय आहे.. तो होईतोवर म्हणून एखाद्या मोक्याला (उद्घाटन वगैरे..) नीट मॅनेज केले तर चालावे असा अर्थ आहे.

समर्थन नव्हे.. फक्त एका केसमुळे हे जितकं काळं वाटतं तितकं नाही इतकंच..

जाऊ दे... डिव्हायडर तोडून चर्चा भलतीकडे जाण्यापेक्षा ब्रेकच मारतो कसा...

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2011 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

ते टॅक्स, टोल वैग्रे भरणारे बघून घेतील ;) आपल्याला काय पडलय ?

अविनाशकुलकर्णी's picture

22 Dec 2011 - 12:47 pm | अविनाशकुलकर्णी

श्री चिंता ना गहुंजे गावाची एव्हढी चिंता का?
जिमखाना क्लब ची तिथे शाखा आहे का?
पिण्याी सोय कशी आहे?

चिरोटा's picture

22 Dec 2011 - 1:01 pm | चिरोटा

+१. तिकडे १ बी. एच. के केवढ्याला मिळेल? म्हणजे बाल्कनित बसून पीत मॅच बघता येईल.

एव्हढ्या लांब बोंबलत कोण जाणार?

असो मला चिंता आजची आहे. तुमचा अजून फोन नाही आला म्हणून.

सिलेब्रेशन आजच आहे की नंतर ?) ;) ;-) :wink:

भीमाईचा पिपळ्या.'s picture

22 Dec 2011 - 3:03 pm | भीमाईचा पिपळ्या.

चिंतामनी फारच चिंता करता बॉ तुम्ही.
सत्ता नि अधिकार यांचा तुम्हालाही पोटशूळ आहे नविन माहीती मिळाली.
बाकी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
लवकर मोठे व्हा. :D

चिंतामणी's picture

22 Dec 2011 - 3:19 pm | चिंतामणी

>>>चिंतामनी फारच चिंता करता बॉ तुम्ही.
चिंतामणी (शुध्द लिहायला शिका)
मला योग्य वाटते मी करणार. तुम्ही प्रतिक्रीया द्यायलाच पाहीजे असे नाही.

>>>सत्ता नि अधिकार यांचा तुम्हालाही पोटशूळ आहे नविन माहीती मिळाली.
मस्तवालपणाचा राग आहे. तुमच्याकडे याला पोटशुळ म्हणत असावेत.

>>>>बाकी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
योग्य त्या दिवशी द्या.

>>>लवकर मोठे व्हा.

आपल्याकडे (निदान आमच्याकडे) लहानांनी मोठ्यांना आशीर्वाद द्यायची पध्दत नाही.

इंटरनेटस्नेही's picture

22 Dec 2011 - 3:40 pm | इंटरनेटस्नेही

सदर केसचा दोन्ही बाजुंनी विचार व्हायला हवा. एक्सप्रेसवे असो की आणखी कुठला रस्ता, पोलिस त्यांना हवे तसे डायव्हर्शन करु शकतात. (माहितीचा सोर्स मागु नये, मिळणार नाही.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Dec 2011 - 5:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इंट्या, तू नसतात तर कसे झाले असते रे आमचे?

इंटरनेटस्नेही's picture

22 Dec 2011 - 6:23 pm | इंटरनेटस्नेही

त्याचं उत्तर तुम्हालाच माहित. ;)

देविदस्खोत's picture

22 Dec 2011 - 7:29 pm | देविदस्खोत

खरंय ...!!!!!! तुमचे म्हणणे पट्तेय, तुमच्या सात्त्विक संतापाचा उद्रेक समजतोय........ पण समाजातील विविध घटकांचे अनियंत्रित, निरंकुश, वागणे.. बघितल्यावर असे वाट्ते.. "हे ..असंच चालणार !........"

तिमा's picture

25 Dec 2011 - 5:26 pm | तिमा

अहो, त्यांनी हायवेवरच स्टेडियमचे अतिक्रमण करुन हायवेचे कायमचे डायव्हर्जन केले नाही हे नशीब समजा!
ब्रिटिशांनंतर ज्यांनी प्रथमच 'थंड हवेची ठिकाणे' निर्माण करायला सुरवात केली आहे त्यांच्यावर टीका करता ?

चिंतामणी's picture

25 Dec 2011 - 5:32 pm | चिंतामणी

:bigsmile: