गाभा:
मराठीत गेली काहीवर्षे धुमाकुळ घालणा-या "कोंबडी पळाली" या गाण्याची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीलासुद्धा पडली आहे.
मुन्नी बदनाम झाली, शिला की जवानी जनतेने बघीतली, जलेबीबाईची गोडी चाखून झाल्यावर अजून काहीतरी झणझणित पाहीजे असल्यामुळे "चिकणी चमेली" येउ घातली आहे.
हा बघा चमेलीचा धमाका.
कॅट बनली आहे चमेली. याशिवाय रितीक आणि संजुबाबाची उपस्थिती आहे. आता ही चमेली कोंबडीच्या चालीवर आणि तालावर अख्या भारतात धुमाकुळ घालते की नाही हे लौकरच कळेल.
प्रतिक्रिया
17 Dec 2011 - 8:36 pm | देविदस्खोत
कोंबडी प.....ण !!!! घालेल........ घालेल्............आक्शि छान धुमाकूळ घालेल............
17 Dec 2011 - 8:45 pm | आशु जोग
मराठी रॉक्स
अजय अतुल रॉक्स....
17 Dec 2011 - 9:34 pm | पक पक पक
एक तर चिकनी चमेली,त्यात पावशेर घेणार्,मग ति घोंधळ्,राडा,कल्ला ,धुमाकुळ हे प्रकार नाहि करणार तर काय वट पौर्णिमा साजरी करणार......
17 Dec 2011 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा
धमाकेदार बाँबगोळा मारलाय ना बे ...बाकी गान धुमाकुळ घालनार,पन काय बी असो या गान्याचं,ही पोट्टी कुन्या बी गान्यात येकदम बिनधास्त नाचती बे,येकदम बिनधास्त...नो भिडभाड ऑनली तोड-ताड.
18 Dec 2011 - 6:49 am | धन्या
तिजं हिट्टं काका मामा दादा आसं कुनीबी नाय. म्हनून तं हे सगळं करतीया. हॉस्टेलला र्हाणार्या पोरी करतात तसं. ;)
आम्हाला मात्र गाण्याच्या सुरुवातीचे हावभाव अतिशय बिभत्स वाटले. कोरीओग्राफरने हा नाच बसवण्याआधी आमच्या सोनाली बेंद्रेचा "चम चम करता हैं ये नशिला बदन" या गाण्यावरचा नाच पाच पाहीला असता तर चिकन्या चमेलीचं सोनं झालं असतं.
असो. पब्लिक हे कमरेला हिसडे देणंही वेंजॉय करेल. ;)
18 Dec 2011 - 9:43 am | शिल्पा ब
हॅ हॅ हॅ...अवो वाकडे तुम्चा श्टडी उलसाक कमी पडतुया जनु!! तिजा भाव सईफ आली खान अन आय शर्मिला टागोर हाये...उगा आपलं क्याम्पुटरवर लिवता येतंय म्हनुन लागले का कायबी लिवाया? आँ?
18 Dec 2011 - 9:55 am | ५० फक्त
'उगा आपलं क्याम्पुटरवर लिवता येतंय म्हनुन लागले का कायबी लिवाया? आँ?''
एग झॅक टली हे चवि चार तोतुम्हा लाशिल्पातैबैआक्का,
अवो सम बंद काय साइफ आली खन आणि शरमी ल्ला टागुर आणि क्ट रि ना कैपच चा, का उगा कैलासवासी पतौडींच्या पतरिका छापाया टाकल्या त >
विसेश शुच ना - मला कांपुटर वर लियाला येत नाय, उगा आमच्या अज्ञा नाचीला जका ढुन ये.
अवांतर - अतिशय भंगार झालेले आहे हे गाणे, अजय अतुलचा अतिशय हास्यास्पद प्रयत्न, अगदी मराठीतल्या लक्ष्मिकांत अन त्याच्या बायकोनं हिंदित जाउन घरगडी अन भांडेवालीची भुमिका करावी तसं वाट्लं,
18 Dec 2011 - 1:46 pm | शिल्पा ब
आमीबी हेच म्हंतोय...आपलं मत एक्दम बराब्बर जुळता बगा.
लोकं कायबी लिहुन र्हायले तं आपन तेंची चुक सुदारलीच पैजे.
आन तुमचं आवांतर काय जमलं न्हाय बॉ. गानं लय बेष्ट झाल्यालं हाय. म्या तर कवा धरुन त्येच आयकुन र्हायले ना देवा!! आता मराटीतुन कोन हींदीत गेला तर काय तेला भांडेवालाच म्हनाव व्हयं? का खेकड्यावानी करताय राव!!
18 Dec 2011 - 3:07 pm | किचेन
???स्वर्गवासी नबाबांनी दुसर लग्न केल कि सैफ अली खानला काय राखी बांधली कैत्न? बिचारा सैफ ....
हो हि कथ्रीना आहे.पहिले कितीतरी चित्रपटात तिला हिंदीदेखील धड बोलता येत नव्हत.
सैफची बहिण आणि शर्मिलाबींची मुलगी सोहा!
18 Dec 2011 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा
@-तिजं हिट्टं काका मामा दादा आसं कुनीबी नाय. म्हनून तं हे सगळं करतीया. हॉस्टेलला र्हाणार्या पोरी करतात तसं. >>>
<<< तुमी म्हनता त्ये कारन खर न्हाइ...ती थकडं परंदेशात ज्या वातावरनात वाडली ना,त्येचा परिनाम हाय त्यो... अश्लिलतेच्या तिकडच्या शीमा न कक्षा लै येगळ्या हायती...! त्ये म्हनत्यात न्हव का-''जसं खत तशी वाढ'' ;-)
17 Dec 2011 - 9:48 pm | पक पक पक
ह्यो धिंगाणा लै बेक्कार हाये ,पार रातीची झोप घालिवली बयेनं....ह्ये त्या हेलनबै च सेकंड व्हर्जन हाये....
17 Dec 2011 - 10:26 pm | मदनबाण
पौवा नशा आणणारा दिसतोय ! ;)
नेहा पेंडसे ने तर सरळ शिलाच्या आयचा घो अन् मुन्नीच्या नानाची टांग म्हणुन नाच केला आहे. ;)
17 Dec 2011 - 11:08 pm | मराठी_माणूस
इतक्या टीनपाट गाण्याचे कसले कौतुक ? फक्त हींदीत गेले म्हणुन ?
17 Dec 2011 - 11:23 pm | मी_ओंकार
बद्दल मत जाणून घ्यायला आवडेल.
18 Dec 2011 - 9:47 pm | पक पक पक
ह्या गाण्यावर चमेलीन नाचाव, मग आम्हि आम्च मत मांडु...
17 Dec 2011 - 11:45 pm | आशु जोग
मराठी_माणूस
>>इतक्या टीनपाट गाण्याचे कसले कौतुक ? फक्त हींदीत गेले म्हणुन ?
हो हिन्दीवाल्यान्ना इतक्या छपरी मराठी गाण्याचे कौतुक म्हणजे
हिन्दीचा दर्जा काय असेल
18 Dec 2011 - 11:27 am | मराठी_माणूस
बरोबर , टीनपाटच, शीला, झंडु बाम, पप्पु, टल्ली, ढींक च्यॅक, वगैरे वगैरे
18 Dec 2011 - 3:03 pm | देविदस्खोत
?????????? कॅट.......( चमेली) .... सईफ अलि खान तिचा भाऊ ?????????????????????? आणि शर्मिला टागोर तिची आई ??????????????? ये ... बात्....कु....छ हजम नहि हुई ..!!!!!!!!!!
18 Dec 2011 - 3:12 pm | किचेन
मराठीत हे गाण नाचायला भाग पाडत खर पण हिंदीत अतियाय बकवास आहे.२ ओळी ऐकल्या आणि चानेल बदलला
19 Dec 2011 - 10:19 am | हंस
+१
19 Dec 2011 - 9:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही २ ओळी ऐकल्या नसून बघितल्या असतील आणि बघताना बाजूला तुमचे पत्नीवार्ता(!!!) पती बसले असतील. तुम्ही त्यांना डर्टी पिक्चर बघू देत नाही, चमेली कुठून बघू देणार !!! :-)
18 Dec 2011 - 7:32 pm | JAGOMOHANPYARE
छान
19 Dec 2011 - 11:12 am | चिगो
अजय-अतुलनीच केलंय का हे गाणं पण? मला वाटलं, प्रितमने नेहमीप्रमाणे "प्रेरण" घेऊन डल्ला मारला असेल.. त्याचं "जोर का झटका" हे पण एका अहोमिया प्रायव्हेट अल्बममधुन सही-सही उचललं होतं..
बाकी अजय-अतुलने हिंदीत धांगडधिंगा घातल्यापेक्षा मराठीत उत्तम दर्जाची गाणी दिलीत, ह्याचं कौतूक जास्त आहे..
19 Dec 2011 - 11:40 am | सुहास..
१२००० कोटींच्या बॉलीवुड ला
माय-मराठी ची कावड |
अन अग्नी-पथावर च्या चमेली ला
पळालेल्या कोंबडी ची आवड | ;)
19 Dec 2011 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा
कोंबडी पळत पळत
बॉलिवुडमधे गेली
तन-दूरी कतरिना :love: बघुन
कोंबडी च-मेली ;-)
19 Dec 2011 - 11:54 am | दिपक
श्रेया घोसाल ने मस्तच गायलय... बरोबर आनंद शिंदेचा आवाज पाहिजे होता. ;-)
अजय-अतुल एकदम भारी... ह्यातलच देवा श्री गणेशा गाणं ढिनच्यॅक आहे.
19 Dec 2011 - 12:38 pm | गवि
कतरीना आहे का चिकणी चमेली..?? वा वा छान.. उत्तम..