मुगाच्या डाळीचा हलवा
साहित्य : २ वाट्या मुग डाळ , २ वाट्या साखर ( पिठीसाखर ) , काजू १०-१२, बदाम १०-१२ , मनुके २०-२५ तूप अर्धी वाटी ( साजूक असेल तर उत्तम ),इलायची पावडर अर्धा छोटा चमचा , दुध अर्धी वाटी (ऑप्शनल)
कृती : मुगाची डाळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात किमान दोन तास भिजत घाला , नंतर डाळ कोरडी करून मिक्सिमध्ये दरदरीत वाटून घ्या ,(अगदी पुरणासारखी केली तर हलवा गिचका लागतो )
एका कढईत २ चमचे तूप घाला ,त्यात डाळीचे मिश्रण घाला ,कमी आचेवर हलवत राहा , गाठी होऊ देऊ नका
( याला हलवा का म्हणतात हे तुम्हाला हळूहळू कळेलच ) ;)
मिश्रणाचा कलर लालसर सोनेरी होईपर्यंत हलवण्याचे काम चालू द्या , साधारण २०-२५ मिनिट तरी लागतात डाळ छान परतायला ,मग हवा तसा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत हाताचे मसल्स एकदम टाईट झालेलं असतील
असो
आता मिश्रण हळूहळू मोकळे होवून तूप सोडू लागले की मिश्रणात साखर घाला ,साखर वितळू लागली कि हलवा मोकळा अन सैल होऊ लागतो ,आता एका वाटीत ४ चमचे साजूक तूप गरम करा त्यात मनुके , इलायची पावडर , काजूचे ,बदामाचे काप तळून घ्या ,हलव्यावर ओता ,हलवा पुन्हा एकदा ढवळून घ्या
,हुश्श ....... आता तुम्ही घामाघूम झाला असलाच ,आधी फ्रेश व्हा थंड थंड संध्याकाळी गरम गरम हलवा खाऊन थंडी एन्जॉय करा :)
( टीप हलवा जर जास्ती कोरडा वाटला तरच दुध घाला ,(काही लोक यात खवा / मावा घालतात )
प्रतिक्रिया
13 Dec 2011 - 11:18 am | स्पा
चान चान
एकदम टेस्टी दिसतोय हलवा
बाकी
हवा तसा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत हाताचे मसल्स एकदम टाईट झालेलं असतील..
सारख्या वाक्यांनी बहार आली :)
13 Dec 2011 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय लाईनमारू प्रतिसाद ;)
लाईनगुरु
परा
चान चान
आईने आजकाल सगळे पदार्थ शिकवायला सुरुवात केलेली दिसते. चहापोहे कार्यक्रम कधी सुरु?
13 Dec 2011 - 4:01 pm | कपिलमुनी
पराला काहीतरी आवडला म्हणायचा
13 Dec 2011 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार
कसलं कसलं ..
अहो हा पियुशा आयडी मुलीचा आहे म्हणे, आणि त्यात ती परवा 'मी सुंदर आहे दिसायला' असे म्हणत होती. म्हणून आपला खडा मारून ठेवला झाले ;)
आपण कुठे मागे राहायला नको.
13 Dec 2011 - 11:19 am | प्रास
सकाळी सकाळी मस्त भूक चाळवलेली आहे, पियुबैंनी!
मूगाच्या डाळीचा हलवा, वेलची घातलेला आपल्याला आवडतोच पण ते ऑप्शनल दूध अंमळ जास्त टाकून त्याची बनलेली खीर सुद्धा आपल्याल आवडते.
पियुबै सुग्रण हैत असं वाटतं, केलेल्या पदार्थांची चव घेता आली तर कन्फर्मेशनही देता येईल ;-)
13 Dec 2011 - 1:50 pm | अन्या दातार
पदार्थ आहे हा (हे जनरल विधान हं!)
पाकृबद्दल बोलायचे झाल्यास तूप जरा कमीच वाटतंय. अजुन थोडं जास्तच असतं तर बरोबर झाले असते.
प्रासभौ म्हणतात तेच अनुमान, त्याच कंडीशनसह.......... ;)
13 Dec 2011 - 6:05 pm | चिंतामणी
>>>>पाकृबद्दल बोलायचे झाल्यास तूप जरा कमीच वाटतंय.
वाटतय नाही. कमी आहेच.
एव्हढ्याश्या तुपात दोन वाट्याचा हलवा करून दाखवण्याचे आव्हान देत आहे. ;) ;-) :wink:
हा हलवा/शिरा साजुक तुपात थबथबलेलाच हवा.
18 Dec 2011 - 7:49 pm | श्रीयुत संतोष जोशी
जितकी डाळ तितकं तूप हवंच .
डाळ तूप साखर मावा हे प्रमाण १:१:१:१ असे हवे.
13 Dec 2011 - 6:28 pm | वपाडाव
केलेल्या पदार्थांची चव घेता आली तर कन्फर्मेशनही देता येईल
येइच तो बोलता हय ना मै.... हाताची चव कधी कळणार काय माहिती....
वेटींग फॉर हुर्डा......
13 Dec 2011 - 7:36 pm | अन्या दातार
लेका हुर्डा खाणार आहेस की तिचा हात? ;)
14 Dec 2011 - 11:55 am | वपाडाव
तिच्या हातचा हुर्डा.....
14 Dec 2011 - 12:19 pm | प्रचेतस
:) :) :)
13 Dec 2011 - 12:00 pm | इंटरनेटस्नेही
वा वा चान चान!
14 Dec 2011 - 9:46 am | मृगनयनी
पियु.... खूपच गोड्ड्ड दिस्तोये गं... हलवा.
एका जैन मित्राकडे साजूक तुपाने थबथबलेला भरपूर सुका मेवा घातलेला मूगाचा "शिरो" खायचा योग आला होता... त्याची आठवण झाली... :)
13 Dec 2011 - 12:20 pm | नगरीनिरंजन
हलवा चांगला दिसतोय.
पण मारवाडी लोकांच्या लग्नात करतात तो तुपाने थबथबलेला मुगाचा शिरा काही औरच असतो.
13 Dec 2011 - 6:36 pm | सानिकास्वप्निल
तुपाने थबथबलेला मुगाचा शिरा अहाहा काय झक्कास लागतो :)
13 Dec 2011 - 12:23 pm | आत्मशून्य
चवदार प्रकरण दिसतयं....
13 Dec 2011 - 12:48 pm | michmadhura
माझा खूप खूप आवडता हलवा आहे हा, थॅन्क्स पियु.
13 Dec 2011 - 12:48 pm | सुहास झेले
व्वा व्वा... तोंडाला पाणी सुटले :) :)
13 Dec 2011 - 1:13 pm | निवेदिता-ताई
असेच म्हणते...... :)
13 Dec 2011 - 2:25 pm | गणपा
काय पियुबै जोरात तयारी चालू आहे. ;)
13 Dec 2011 - 2:58 pm | sneharani
काय पियुबै जोरात तयारी चालू आहे. ;) ;)
असेच म्हणते ;)
13 Dec 2011 - 2:58 pm | स्मिता.
पियु, एकदम जोरात तयारी चालूये शिरा-पोह्यांची! मूगाचा शिरा मस्त दिसतोय.
मला आधी आवडायचा पण एकदा ऑफिसाच्या पार्टीत अति-अति गोड आणि तूपात थबथबलेला शिरा खावून अगदी शिसारी बसलाय :(
13 Dec 2011 - 3:02 pm | प्रास
पुढच्या पार्टीतला तूपाने थबथबलेला मूगाचा शिरा (हलवा) आमच्याकडे पोहोचता करावा.....
:-)
13 Dec 2011 - 4:59 pm | स्मिता.
आता त्या कंपनीत नाहिये... पण पुढे असा शिरा (हलवा) पुढ्यात आल्यास आपल्याकडे सस्नेह पोहोचता केला जाईल :)
13 Dec 2011 - 6:06 pm | प्रास
..................................... शेवटी आम्हाला आंबे खाण्याशी मतलब! ;-)
14 Dec 2011 - 9:25 am | प्यारे१
का का काका असं लिहीताय?
पूर्ण वाक्य लिहा. अर्थाचा अनर्थ होतोय. ;)
14 Dec 2011 - 10:05 am | प्रास
प्यारे काका, इथे झाडांची संख्या मोजण्याचाच संदर्भ आहे. आणखीही काही असतंय का हो......?
:-)
13 Dec 2011 - 3:08 pm | विशाखा राऊत
अरे वाह लगेच केलास पण :)
मस्तच दिसत आहे.
13 Dec 2011 - 3:15 pm | जाई.
छान
मस्तच ग
आता पाकृ खूप झाल्या
ते परतीच्या वाटेवर कधी पूर्ण करणार
13 Dec 2011 - 3:51 pm | प्रास
पियुबै पुन्हा 'परतीच्या वाटेवर' यावयाच्या असतील तर 'बाबा प्रासजी बंगम्हाराष्ट्री' या पोचलेल्या बुवांकडून मोरपिसाच्या कोळशातील रसमाणिक्याचा ताईत बनवून त्यांच्या डाव्या दंडावर बांधावा लागेल.
खर्च - रु. ४२०/-
आम्ही पे-पाल मधून रक्कम स्विकारतो.
आमची कुठेही शाखा नाही.
:-)
13 Dec 2011 - 4:09 pm | अन्या दातार
बाबा प्रासजी बंगम्हराष्ट्री यांचे बंगाली व्हेंडर ;)
(आमच्याकडे सर्वप्रकारचे ताईत, गंडे, दोरे किरकोळ दरात घाऊकमध्ये मिळतील)
--आस--
13 Dec 2011 - 4:10 pm | अन्या दातार
बाबा प्रासजी बंगम्हराष्ट्री यांचे बंगाली व्हेंडर ;)
(आमच्याकडे सर्वप्रकारचे ताईत, गंडे, दोरे किरकोळ दरात घाऊकमध्ये मिळतील)
--आस--
13 Dec 2011 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा
@-(आमच्याकडे सर्वप्रकारचे ताईत, गंडे, दोरे किरकोळ दरात घाऊकमध्ये मिळतील)>>>
<<< आणी आंम्ही ते रास्त दरात अभिमंत्रित करुन देऊ ;-)
आपलाच-अत्रुप्त आत्माराम भट (ताईत/ गंडे /दोरे-पुजा करुन देणाsssर...)
13 Dec 2011 - 3:58 pm | उदय के'सागर
व्वा! छानच... गोड विशेष आवडत नाहि पण "मुग डाळिचा हलवा/शिरा" अपवाद. जरुर करुन बघितला जाईल.
आणि विशेष धन्यवाद, कारण गेल्या तिनहि पाकृ मासाहारी होत्या त्यामुळे नविन पाकृ चे धागे येऊनहि हिरमोड झाला (अर्थात त्या पाकृ हि कौतुकास्पदच होत्या)
13 Dec 2011 - 4:03 pm | कपिलमुनी
मला गोड आवडता ..
विकांती प्रयत्न केला जाईल बनविण्याचा..
13 Dec 2011 - 4:09 pm | मन१
पाकृ वीकांतास करून पाहिल्या जाईल.
उत्तम झाल्यास आमच्याकडूनच संपवण्यात येइल अन्यथा लेखिकेसच खायला पाथवून दिल्या जाईल.
13 Dec 2011 - 10:40 pm | ५० फक्त
'पाकृ वीकांतास करून पाहिल्या जाईल.
उत्तम झाल्यास आमच्याकडूनच संपवण्यात येइल अन्यथा लेखिकेसच खायला पाथवून दिल्या जाईल.''
नका तेवढे कष्ट कशाला घेताय लेखि केला पाठवुन द्यायचे, आम्हाला बोलवा नाहीतर अजुन एक कट्टा करु आणि संपवुन टाकु.
13 Dec 2011 - 9:32 pm | सुधांशुनूलकर
हा माझा सर्वात आवडता पदार्थ. त्यामुळे माझ्या वाढदिवशी हमखास बनवतो. आम्ही त्यात खवा घालतो.
हा (बहुधा) मूळचा मध्य प्रदेशातला पदार्थ असावा
काही ठिकाणी त्यात इतकं तूप घालतात की वर इंचभर तवंग साचतो.
13 Dec 2011 - 10:35 pm | ५० फक्त
ओ नाव बदला आधी धाग्याचं,
बिन तुपाचा मुगाचा शिरा नाहीतर डायटर्स मुग शिरा असलं नाव ठेवा उगा, मुगाच्या शि-याला बदनाम करु नका, मग नंतर बघु प्रतिसाद वैग्रे.
14 Dec 2011 - 1:34 am | कौशी
आवडता पदार्थ्..करून बघणार.
14 Dec 2011 - 3:00 am | पिंगू
अर्धी वाटी तुपात दोन वाट्या मूगडाळीचा हलवा.. ये तो बहुत नाईन्साफी है रे पियू.. :D
- पिंगू
14 Dec 2011 - 4:53 am | रामपुरी
इलायची म्हणजे काय???
14 Dec 2011 - 9:53 am | अमृत
एकबी फटु दिसुन नाय राहिला.... जागुतैंच्या धाग्यावरचे सम्दे फटु दिसत्यात... नक्कि काय कारण असावं????
येत्या विकांताला नक्किच करणार हि पाकृ...
अमृत
14 Dec 2011 - 1:13 pm | मदनबाण
वा... :)
ट्वीटीला भज्यां बरोबर हलवा देखील करता येतो तर ! ;)
बाकी मूगाचा हलव्या बद्धल मी चकली तायला विचारणा केल्याचे स्मरते...चकली तायच्या साईटीवर (बहुधा मराठी) सुंदर पाकॄ दिली आहे. :)
(रबडी प्रेमी) ;)
14 Dec 2011 - 1:22 pm | ५० फक्त
अबब अबब अबब ' चकली तायच्या साईटीवर (बहुधा मराठी) सुंदर पाकॄ दिली आहे.' ह्यावरुन एका संगीत नाटकाचे नाव आठवले मला....
14 Dec 2011 - 4:28 pm | पक पक पक
पदार्थ आवडला........छान आहे...
20 Dec 2011 - 10:35 pm | क्रान्ति
छानच आहे पाकृ.
इकडे कुठल्याही कार्यक्रमाच्या जेवणावळीत [शुद्ध मराठीत बफे ;) ] हा पदार्थ हमखास असतो. [अगदी भरपूर तूप, खवा घालून केलेला.] :)
20 Dec 2011 - 10:46 pm | पैसा
पण खूप जड. मुंबईत एकदा कुणाच्या तरी लग्नात हा हलवा मी जन्मात पहिल्यांदा खाल्ला. मोठी चूक म्हणजे बाकी काही खायच्या आधी खाल्ला. नंतर डोकं सुद्धा जागच्या जागी ठप्प! आणखी चवीपुरती म्हणून चटणीसुद्धा खाऊ शकले नाही त्या हलव्यानंतर.