सुकट-मसाला

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
12 Dec 2011 - 12:29 am

साहित्यः
१ वाटी सुकट (सुकी-करंदी) डोके काढून, पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवावी. (खारटपणा कमी होईल)
भिजवून ठेवलेली सुकट पाणी निथळून, हाताने दाबून किचन /पेपर टॉवेल वर पसरवावी.
२ मोठे कांदे बारीक चिरून.
१ टोमॅटो बारीक चिरून किंवा ३-४ आमसुले किंवा १ टेस्पून चिंचेचा कोळ.
दीड टेस्पून आले+लसुण+ हिरवी मिरची पेस्ट
१ टीस्पून हळद
२-३ टीस्पून लाल-तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१-१/२ टीस्पून धणेपूड
१-१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीप्रमाणे
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथंबीर
तेल

.

पाकृ:

प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे. मीठ घालून कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतणे.

.

त्यात आले+लसुण+ हिरवी मिरची पेस्ट घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत चांगले परतणे.

.

आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालणे व तो मऊसर शिजेपर्यंत परतणे.

.

त्यात हळद, लाल-तिखट, धणेपूड व गरम-मसाला घालून सर्व एकत्र करावे.

.

त्यात सुकट घालावी आणी सगळं एकत्र करावे. मध्यम आचेवर झाकून शिजवावी.

.

तयार झाली की त्यावर कोथंबीर घालून गरमा-गरम तांदळाच्या किंवा कुठल्याही भाकरीबरोबर खायला सुरुवात करावी :)

.

असेच सुके बोंबील, सुका जवळा घालून बनवता येतं.

प्रतिक्रिया

कौशी's picture

12 Dec 2011 - 1:20 am | कौशी

छान रेसिपी आणि फोटो पण मस्त!!!

प्रभाकर पेठकर's picture

12 Dec 2011 - 1:25 am | प्रभाकर पेठकर

मस्तं पाककृती. अभिनंदन.

ह्यात आमसुलं घातल्यास जास्त चांगली चव येते असा अनुभव आहे.

तसेच, ह्यात बटाट्याच्या मोठ्या फोडी घातल्या तर पुरवठ्याला चांगले होते.

गणपा's picture

12 Dec 2011 - 1:44 am | गणपा

तसेच, ह्यात बटाट्याच्या मोठ्या फोडी घातल्या तर पुरवठ्याला चांगले होते.

+१ सहमत.

पावसाळ्यात जेव्हा ताजे मासे कमी येतात तेव्हा या सुकवलेल्या मास्यांचाच आधार असतो. :)

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2011 - 11:12 am | पिवळा डांबिस

मस्त पदार्थ, अभिनंदन!
हे आणि पटणीची भाकरी, क्या बात है!!!!
करंदीपेक्षा सुका जवळा ही माझी वैयक्तिक आवड (कच कमी लागते)!
आंबटपणासाठी सोलं जास्त चांगली लागतात या पदार्थात, पेठकरकाकांशी सहमत!
पुरवठ्याच्या बटाटा अ‍ॅडिशनबद्दल माहिती नाही कारण उन्हाळ्याच्या अखेरीला ढीगभर जवळा, करंदी आणि बोंबील घेऊन ठेवायची आमच्या घरात प्रथा आहे! बाबा म्हणत, "खा तिच्यामायला!!!"
:)

पियुशा's picture

12 Dec 2011 - 12:37 pm | पियुशा

@ पि.डा
पटणीची भाकरी, काय प्रकार आहे हा ?

प्रभाकर पेठकर's picture

12 Dec 2011 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या तुटपुंज्या माहिती नुसार 'लाल तांदळाची' भाकरी.

कधीतरी माझ्या घरी ये.. पटणीची फर्मास भाकरी खायला घालतो.. :)

- पिंगू

अन्या दातार's picture

13 Dec 2011 - 9:31 am | अन्या दातार

तु काय पटणी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहेस काय? ;)

प्रचेतस's picture

12 Dec 2011 - 11:13 am | प्रचेतस

ही पाकृ बघून ५० फक्त यांना खूपच आनंद झाला असेल. अगदी तो तरी नाही तरी त्याच्यासारखाच दुसरा दिसला आहे आता.

पानकोबिच्या भाजीत जीव आणणारा पदार्थ !! रस्सम भात एरा ह्म्म्म्म !!!:)

५० फक्त's picture

12 Dec 2011 - 12:09 pm | ५० फक्त

+१ टु वल्ली, बाकी मांसाहार आणि मत्स्याहार करत नसल्याने, चवीबद्द्ल लिहायचा अधिकार नाही,

बाकी गरम तेलात बारीक चिरुन टाकलेला कांदा गुलाबि डावाने गुलाबी होईपर्यंत भाजणे हा प्रकार फार रोमँटिक वाटला,

सुहास झेले's picture

12 Dec 2011 - 12:54 pm | सुहास झेले

मस्त :) :)

जबर सानिका.एकदम मस्त. फार म्हणजे फारच आवडले, सहीच..........
हिला आम्ही अंबाडी सुकट म्हणतो.बटाट्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे टाकून जाम भारी लागते.बरोबर तांदळाची भाकर .
गणपा, प्रपेकाका नि पिडाकाकांशी प्रचंड आणि भयानकरित्या सहमत.(हा नवीन शब्दप्रयोग )
घरात आता फक्त सुकी वाकटी आणि सुके बोंबील पडलेले आहेत.काय करावे बरे................
वाकटीचे कालवण कि बोंबील, वांगे, बटाटे टाकून खिचडी कि बोंबलाचे कालवण ("घराला आणि गोठ्याला कोणते छप्पर वापरावे हेच काळात नाही बघ" च्या चालीवर)

विशाखा राऊत's picture

12 Dec 2011 - 8:12 pm | विशाखा राऊत

:)

काही जण जवळा,कोलिम किंवा करदी आधी खरपुस भाजुन घेतात व मग भिजवतात. हे भाजणे कशासाथी असावे?

स्वाती२'s picture

15 Dec 2011 - 1:10 am | स्वाती२

मस्त फोटो!

मयुरपिंपळे's picture

16 Dec 2011 - 10:52 pm | मयुरपिंपळे

कस काय हे एवढ छान जमत ?