आज ऑन लाईन म.टा. वाचताना अजून एका बातमीने लक्ष वेघले. त्या बातमीतील जावईशोध वाचून मी उडालो.
त्यात म्हणले आहे "स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही, असा विचित्र दावा सौदी अरेबियातील 'मजलिस अल-इफ्ता अल-आला' या सवोर्च्च धार्मिक संस्थेने एका अहवालात केला आहे. वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल 'वैज्ञानिक' असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. "
स्त्रियांना वाहन चालविण्यास बंदी घालणारा सौदी अरेबिया हा जगातील एकमेव देश आहे. ही बंदी उठवली, तर काय घडेल, याचा मागोवा घेणारा अहवाल मजलीसने प्रसिद्ध केला आहे
जेद्दा येथे शैमा जास्तनिया ही ३४ वर्षांची महिला वाहन चालविताना आढळल्याने तिला चाबकाचे दहा फटके मारण्याची शिक्षा नुकतीच देण्यात आली होती. त्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
त्या अहवालातील इतर तपशील जरूर वाचा.
आज महीला अवकाश यानातुन अंतरीक्षात सफर करीत आहेत त्याच बरोबर जगाच्या एका भागात अशीसुद्धा अवस्था आहे.
प्रतिक्रिया
4 Dec 2011 - 9:37 am | चिरोटा
डोके फिरवणार्या बातम्या असतात एकेक. डाय्विंग लायसन देताना जी कुमारी नाही अशा स्त्रियांनाच लायसन द्या की मग.
4 Dec 2011 - 9:39 am | सोत्रि
सौदीतल्या ३ महिन्यांच्या वास्तव्याच्या अनुभवावरून सांगतो, तीथे स्त्रियांच्या बाबतीत काहीही होऊ शकते. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे, ह्या पलीकडे तीथे तीला काहीही किंमत नाही.
प़ण एक चांगली गोष्ट म्हणजे तीथे कायदे कडक असल्यामुळे गुन्हेगारी जवळजवळ नाहीच त्यामुळे स्त्रीया तशा सुरक्षीत आहेत.
पण मी तर ब्वॉ ही बातमी ऐकली होती,
:) :lol: :)
- (हाजी) सोकाजी
4 Dec 2011 - 9:43 am | चिंतामणी
=))
=))
=))
5 Dec 2011 - 1:41 am | मोहनराव
:)
6 Dec 2011 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा
काट्यानी काटा काढला... सॉरि सॉरि... वाढला ;-)
अवांतर-भारि व्हिडिओ दाखवल्या बद्दल आभारी आहे,आणी याच कारणास्तव वाचनखुण साठवली गेली आहे. ;-)
4 Dec 2011 - 10:14 am | शिल्पा ब
या देशात नक्की कोणाचा कायदा चालतो? तिथले लोकं इतर कोणत्याही देशांबद्दल काहीच जाणुन नाहीत का? काय हा मुर्खपणा!! आणि इथुन परदेशी गेलेल्या लोकांचं याविषयी काय म्हणणं असतं? जर कोणी आपल्या माहीतीत असेल तर विचारुन आम्हाला सांगा.
नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक वाचल्यावर ईराणमधील काही गोष्टी समजल्या होत्या. :(
4 Dec 2011 - 10:20 am | जाई.
शिल्पातै बिकांनी याबाबतीत माझं खोबार नावाच्या लेखमालेत सुंदर लिहीलय
कृपया कोणीतरी लिँक द्या
माझ्या पीसीत प्राँब्लेम येतोय
4 Dec 2011 - 10:31 am | सोत्रि
शिल्पातै हे घ्या माझं खोबार...
बिकांची अतिशय सुंदर लेखमाला आहे ही.
- (हेच खोबार याचे देहा याची डोळा पाहिलेला) सोकाजी
4 Dec 2011 - 11:05 am | शिल्पा ब
ते केंव्हाच वाचुन झालंय हो!!
4 Dec 2011 - 11:34 am | तर्री
शासन आणि इस्लामिक देशांचे कायदे ह्यांचा तसा काही संबंध नाही .
आपण ह्या अनुभवातुन सावध व्हायला हवे. निधर्मी भारतातील ऊत्तर पूर्वे कडचे एक राज्य एका माजी पंतप्रधानानी "एका" धर्माचे आहे असा दावा केला होता. ह्या "एका" धर्माच्या जागी "दुसरा" धर्म असता तर त्या राज्यात एवाना "असे" कायदे गरजेचे आहेत अशी चर्चा सुरु झालेली असती.
मागच्या आठवड्यात एका धाग्याचा "बालमृत्यु" झालेला पाहिला आहे. माला वाटते तो शिल्पा ब यांचा धागा होता. म्हणून येथेच थांबतो.
6 Dec 2011 - 1:17 pm | गवि
"स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही"
"वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल वैज्ञानिक असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. "
दोन्ही विधानांवर अवाकच झालो होतो. तरीही दोनतीन दिवस वेळ घेतला. मोकळ्या वेळात सर्व प्रकारचे वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, लैंगिक, तांत्रिक, मांत्रिक, रापचिक असे सारे सारे तर्क लावून पाहिले. पण पराभव वाट्याला आला.
कोणत्याही रूटवरुन विचारांना नेऊनही :
१) स्त्रियांनी वाहन चालवणे
आणि
२) ती कुमारी न राहणे, शिवाय अनेक स्त्री अन पुरुषही समलिंगी बनणे.
या दोन चिजांचा संबंध नाही जोडू शकलो... आमची हार धरा.
खेरीज, ही परिस्थिती पाहून उलट वाटतं की अशा ठिकाणी आदुगरच खरोखर किती कुमारी आहेत किंवा किती समलिंगी आहेत याचा खराखुरा सर्व्हे झाला तर जे निकाल येतील ते या नियमकर्त्यांच्या डोक्यात मुंग्या आणणारेच असतील हे नक्की.
6 Dec 2011 - 1:29 pm | अन्या दातार
गवि तुम्हारा चुक्याच!
अहो 'ते' म्हणतील ते विज्ञान. जगात रुढ असलेलं विज्ञान 'त्यांना' मान्य असेलच असे नाही ना.
मूळ गृहितकच चुकीचे धरल्याने तुम्हाला नापास करण्यात येत आहे ;)
8 Dec 2011 - 5:28 am | Pain
हे घ्या अजून....आज फेसबुकवर पाहिले-
http://bikyamasr.com/50403/islamic-cleric-bans-women-from-touching-banan...
8 Dec 2011 - 7:56 am | चिंतामणी
__/\__
8 Dec 2011 - 4:08 pm | चिंतामणी
http://bollywood.bhaskar.com/article/ENT-MM-islamic-cleric-bans-women-fr...
9 Dec 2011 - 12:00 am | नर्मदेतला गोटा
नाही हं ! तिकडे माहिती नाही
पण आपल्याकडे हवीत काही बंधनं.
होण्डा दियो वरून वेगात जाणार्या मुली
कायनेटीक होण्डावरच्या काकवा यांना कुणाचीच पर्वाच नसते
आणि
बाइकवर मित्राला लटकलेल्या पोरी
सगळेच विचार करण्याजोगे --