गाभा:
साडेसाती
अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. . इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.
१. साडेसाती आणि शनी
२. साडेसातीची कारणे
३. या कालात काय होते?
४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी?
५. इतर काही धर्मिक उपाय
६. आपले काही अनुभव, किस्से
७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे?
८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम.
९. साडेसाती सत्य की थोतांड
१०. इतर धर्मातील लोकाना साडेसाती लागते का?
असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.
प्रतिक्रिया
3 Dec 2011 - 1:34 pm | jaypal
साडेसाती चालु झाली वाट्टं ;-) (जा.मो.ह.घ्या.)
3 Dec 2011 - 2:14 pm | पैसा
तुमची साडेसाती गेली का? म्हणजे तुमचा पाय बरा झाला का?
3 Dec 2011 - 3:02 pm | JAGOMOHANPYARE
पाय आता बराच सुधारला आहे.
3 Dec 2011 - 2:48 pm | यकु
काय हो जामोप्या,
मायबोली झाली, मीम झालं.. सगळीकडे एकच धागा रूजवताय? तिथे झालेली चर्चा पुरेशी नाही का?
की साडेसातीवर संशोधन हाती घेतलं आहे?
3 Dec 2011 - 2:59 pm | JAGOMOHANPYARE
शनी जसा वेगळ्या वेगळ्या राशीत फिरत असतो, तसा हा धागाही फिरत आहे.
3 Dec 2011 - 3:20 pm | इंटरनेटस्नेही
अरे वा इतक्या नवीन विषयावर चर्चा? क्या बात है!
3 Dec 2011 - 7:00 pm | यकु
हे घ्या.. यांच्याही मागे सध्या साडेसाती लागलेली दिसते
पंखा पडला...शरद पवार बचावले!
3 Dec 2011 - 7:09 pm | मनीषा
माझी साडेसाती पर्मनंट आहे ...
एक संपली कि दूसरी सुरू .
||शनि महाराजांची कृपा ||
4 Dec 2011 - 2:02 pm | युयुत्सु
साडेसाती ही सज्ञा शनीच्या जन्मचंद्रावरून होणार्या भ्रमणाला संबोधण्यासाठी वापरतात. ज्योतिषात चंद्र हा मनाचा, कुटुंबाचा कारक ग्रह मानला गेला आहे. तांत्रिकदृष्ट्या साडेसाती ही पत्रिकेतल्या प्रत्येक ग्रहाची असते. पण जन्मलग्न, जन्मरवि आणि जन्मचंद्र यांच्या साडेसाती विशेष महत्त्वाच्या आहेत. कारण त्या बदल, संघर्ष किंवा स्थित्यंतर दर्शवतात.
ज्या ग्रहाची साडेसाती असेल त्या ग्रहाने अन्य ग्रहांशी जे अंशात्मक योग (भौमितिक रचना) केले असतील तर त्याप्रमाणे अनुभव येऊ शकतात. आपल्या सहवसातील व्यक्तींच्या पत्रिकेतील ग्रह, साडेसातीतील ग्रहाशी त्रासदायक योग करत असेल तर त्रास वाढतो.
साडेसातीतील ग्रह जर इतर ग्रहांशी शुभ योह करत असतील तर साडेसातीत त्रास होत नाही. साडेसातीतील ग्रहाच्या पुढे जर ओळीत जर काही ग्रह असतील तर साडे सातीचा त्रास लांबल्याचा अनुभव येतो. साडेसातीचा त्रास स्वीच बंद केल्यासारखा थांबत नाही. तो हळु हळु नाहीसा होतो.
मी उपाय सांगणारा ज्योतिषी नाही, पण डोके ठिकाणावर राहण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व उपाय अवश्य करावेत.
6 Dec 2011 - 9:50 pm | पक पक पक
तुमचा शनि वक्रि आहे ,त्याला सरळ करा...
6 Dec 2011 - 9:55 pm | पक पक पक
'बचावले' म्हणता मग साडेसाती कशी .........त्याना शनि काहिच करु शकत नाही ,सध्या तेच महाराश्ट्राला वक्रि आहेत....