आकांक्षा पुढती इथे...

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
14 Jul 2008 - 8:10 am
गाभा: 

http://www.misalpav.com/node/2474
आजकाल ऑफीसमध्ये मी सर्व प्राण घातक शस्त्रे माझ्यापासून लांब ठेवतो.पेन , पेन्सील, पेपर नाईफ वगैरे.पालक मंडळी भेटायला येतात.त्यांची मुक्ताफळं ऐकल्यानंतर माझ्या मनात आत्मघातकी विचार येऊ नयेत म्हणून.
मला एक पालक भेटलेआणि मला म्हणाले " मी माझ्या मुलाला न्युरॉलॉजीस्ट करणार आहे."मी दचकलो. मग एक शिरस्ता म्हणून दहावीचे मार्क विचारले.उत्तर आले "फर्स्ट क्लास." सर्वात आधी ऑफीसच्या खिडक्या बंद आहेतयाची खातरजमा करून घेतली.
सुमारे अर्धा तास फर्ड्या इंग्रजीमध्ये मानवी ब्रह्मदेवाशी चर्चा होत असताना चिरंजीव फर्स्टक्लासचे मेडल म्हणून मिळालेल्या मोबाईल वर बिझी होते. कुतुहुल म्हणून किंमत विचारली. सत्तावीसहजार रुपये. सर्व संभाषणात हे साहेब (विद्यार्थी) निर्वीकार आणि मख्ख होते. दहावीचे मार्क आणि त्याचा करीयरशीसंबंध नाही या विधानाचा विपर्यास. देवच भले करो त्या भावी न्युरॉलॉजीस्टच्या पेशंटचे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दहावी पास चे प्रमाणपत्र मिळून नंतर आय.टी. आय. सारखे कोर्सेस करून उपजिवीका मिळण्यासाठी म्हणून परिक्षेचे केलेले पातळीकरण मला स्वताला योग्य वाटते.
७८% निकाल लागल्यानंतर कट ऑफ वर जाणार हे माहिती असताना फकत मोजक्याच टॉप कॉलेजचा प्रेफरंसचा बालीश हट्ट अनाकलनीय आहे.जास्तीतजास्त अर्ज भरून बेटरर्मेंटची वाट बघा हा पवित्रा निदान पुढच्या वर्षी पालकांनी घ्यावा आणि काळजीमुक्त व्हावे असा माझा सल्ला असेल.

अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले अगदी ज्युनीयर कॉलेज केव्हांही चांगले.

प्रतिक्रिया

गणा मास्तर's picture

14 Jul 2008 - 11:03 am | गणा मास्तर

चांगला विषय आहे

मनिष's picture

14 Jul 2008 - 11:32 am | मनिष

ह्या गोष्टींचा विचार केला आहे का तुम्ही?

(१) सगळ्यात महत्वाची म्हणजे मार्क्स बुद्धिमत्ता दाखवतीलच असे नाही. कमी मार्क्स अनेक (ज्यातील कित्येकांचा शिक्षकांनी विचारही केला नसतो) कारणांमुळे मिळू शकतात.
(२) १० वीचे मार्क्स आणि १२वीचे मार्क्स यात जमीन-आसमानाचा फरक आहे. शिवाय २ वर्षाचा कालावधी आहे तो वेगळाच.
(३) आता हेच उदाहरण बघू -- फर्स्ट क्लास म्हणजे ६०% मार्क्स तरी असतील असे गृहीत धरु. १० वीत भाषा, इतिहास, भूगोल असे बरेच विषय असतात. ज्या विद्यार्थ्यांना हे आवडत नाही पण शास्त्र किंवा गणित किंवा ह्या दोन्हीतही चांगली गती असते, ते विद्यार्थी सायन्स ला गेल्यास त्यांची टक्केवारी बरीच वाढू शकते. शिवाय मेडिकल साठी फक्त PCB चे मार्क्स ला प्राधान्य असते.

शिक्षक कित्येक वेळा केवळ टक्केवारीला बुद्धिमत्ता/कॅलिबर समजतात, एवढेच नव्हे तर हिरहीरीने तो मुद्दा/विचार हे एखादे त्रिकालाबाधित सत्य असल्याचे मांडतात. दुर्दैवाने अशा त्यांच्या रिमार्क्समुळे काही विद्यार्थी आयुष्यातुन उठतात. शिक्षक म्हणजे चुकिचा मुद्दा ठामपणे सांगणारी व्यक्ती हे पुलंचे वाक्य किती विदारक सत्य आहे हे परत एकदा जाणवले. देव अशा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचे भले करो.

अवांतर - 'त्या विद्यार्थ्याला' विज्ञानातही कसे कमी मार्क होते वगैरे सबबींनी विषयांतर करता येईल, पण माझा मुळ मुद्दा तो नाही.

संजय अभ्यंकर's picture

14 Jul 2008 - 7:50 pm | संजय अभ्यंकर

प्रभू साहेब आपण एका चांगल्या विषयाला सुरुवात केलीत.

१०वी व १२वी चे मार्क आणी त्या विद्यार्थ्याची बुध्धिमत्ता यांचा संबंध, याचे मला अनादिकाला पासुन कोडे आहे.
आपल्या शिक्षणपद्धती बद्दलहि अनेक प्रश्न आहेत.
मि.पा. वासी या विषयावर प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 10:01 pm | चतुरंग

बरीच जुनी गोष्ट आहे १९८० मधली वगैरे असेल. १० वीत बोर्डात आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती ऐकण्यासाठी जायचे म्हटल्यावर मला 'लै भारी' असा फील आला होता. अतिशय उत्साहाने मी तिथे गेलो (मी स्वतः आठवीत होतो). मला वाटते १० विद्यार्थी होते त्यातले एक-दोघे सोडले तर कोणाला साधी स्वतःची नीट ओळखही करुन देता आलेली आठवत नाही. चाचरत, तोंडातल्या तोंडात बोलत होते. एवढे मार्क मिळवूनही त्यांच्यात कुठेही वेगळा आत्मविश्वास मला दिसला नाही. तेव्हाच माझी मार्कांच्या स्पर्धेतली उत्सुकता संपली! मार्कांच्या पलीकडेही किंबहुना कित्येक वेळा मार्कांच्याच पलीकडे जग असतं जे जास्त महत्त्वाचं असतं हे खरं!

चतुरंग

वरदा's picture

15 Jul 2008 - 11:18 pm | वरदा

खरं तर मार्कांवरुन काहीच ठरत नाही पण सगळ्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीया त्याच मार्कांवरुन चालतात ना...
मग जरी तुम्ही हुशार असलात आणि कमी मार्कस मिळाले तर त्याच एका ज्युनिअर कॉलेज साठी मारामारी करण्यापेक्षा साध्या घराजवळच्या कॉलेजला जाऊन चांगला अभ्यास करावा ना हेच म्हणायचय लेखकाला

अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले अगदी ज्युनीयर कॉलेज केव्हांही चांगले
अगदी खरं काका.. नाहीतरी कॉलेजमधे अभ्यास होतच नाही क्लास मधेच होतो मग कशाला त्या कॉलेजसाठी मारामारी?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

ह्या बाबतीत, आपण तुमच्याशी सहमत..

आणखी एक मुद्दा:
आपण बहुसंख्य लोक, कमी अथवा अर्ध अर्हताप्राप्त लोकांसाठी काम करतो.
बहुसंख्य कंपन्यांचे मालक / प्रवर्तक हे वरील गटात मोडतात.

परंतु ते कं. चे मालक असतात, कारण शिक्षण कमी असले तरी त्यांच्या जवळ व्यवहार ज्ञान असते.
ह्या व्यवहार ज्ञानाच्या बळावर ते मोठ मोठाले उद्योग उभे करतात.

भारतीय शिक्षण पद्धती, कामगार निर्माण करते, स्वतंत्र विचार करणार्‍या व्यक्ति नव्हे, हे माझे मत बर्‍याच विचारांती तयार झाले आहे.
आपण भारतीय, जगाला विविध स्तरावर काम करणारे कामगार पुरवतो.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश, उच्चकोटिचे संशोधक, खेळाडू, नवीन प्रकारचे व्यवसाय तयार करणारे प्रवर्तक क्वचितच निर्माण करतो, हे आपल्या शिक्षण पद्धतीचे अपयश आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 11:58 pm | चतुरंग

तुमचे म्हणणे बर्‍याच अंशी बरोबर आहे.
मुलांची स्वतंत्र विचार करण्याची सवय आपल्याकडे फार लवकर, लहानपणीच मारुन टाकली जाते त्याचा हा परिपाक असावा असे वाटते.
'नसते प्रश्न विचारु नकोस, सांगतो ते कर!' ह्या शिक्षणाच्या धाटणीमुळे वेगळा विचार खुंटतो, नाविन्य संपतं.

मध्यंतरी एक अमेरिकन आंत्रप्रोनर, 'बो पीबडी' याचे 'लकी ऑर स्मार्ट' हे पुस्तक वाचनात आले. ह्या छोटेखानी पुस्तकात त्याने फारच रंजक आणि उद्बोधक माहिती दिली आहे. आपल्या ठरीव साच्यातल्या संकल्पनांना त्याने मस्त तडे जातात!

चतुरंग

वरदा's picture

16 Jul 2008 - 12:05 am | वरदा

'नसते प्रश्न विचारु नकोस, सांगतो ते कर!'
हे मी ऐकायची नाही म्हणून मी सगळ्यात वाईट विद्यार्थीनी होते माझ्या शाळेत आता माझ्या एका लांबच्या ताईची मुलगी त्याच शाळेत जाते ती म्हणाली तिथले शिक्षक अजून सांगतात आपल्या शाळेत एक भयंकर मुलगी होती तिने कधीच कुणाचं ऐकलं नाही...सतत प्रश्न असं का आणि तसं का...तुम्ही असं करु नका म्हणून्...काय बोलणार सांगा...
कधीकधी वाट्टं या भारतवारीत जाऊन भेटावं त्या शिक्षकांना आणि सांगावं किती चुकीचं शिकवताय ते..पण कुणास ठाऊक काही उपयोग होईल का..:(
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

संजय अभ्यंकर's picture

17 Jul 2008 - 12:30 am | संजय अभ्यंकर

चतुरंगजी धन्यवाद!

हे पुस्तक मिळवून जरूर वाचेन.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अपयश नसून
१) फसलेल्या लोकसंख्या नियोजनाचे
२) आपमतलबी राजकीय धोरणाचे
३) अतिमर्यादित दृष्टीकोनाच्या पालकांचे
४) केवळ अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणार्‍या समाजाचे

ह्या सर्वांचे सामूहिक अपयश म्हणावे लागेल

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 11:02 am | विसोबा खेचर

शालेय व कॉलेजच्या शिक्षणाला अती महत्व देऊ नये!

मयुरयेलपले's picture

17 Jul 2008 - 12:43 am | मयुरयेलपले

आधिच आम्हाला कालेजात जायचा उल्लास त्या तुम्हि हे म्हणताय "शालेय व कॉलेजच्या शिक्षणाला अती महत्व देऊ नये!" (आम्च्या वर्गात तर पोरि पण नाहित) मग आम्हि कालेजात जावुन करू काय...
तुम्हि एखादि पदवि अभ्यासक्रम सुरु करा मिपा मार्फत "घर बसल्या पदवि"...(हं.घ्या.)

आपला मयुर

संजय अभ्यंकर's picture

17 Jul 2008 - 12:56 am | संजय अभ्यंकर

या विषयावर एक आठवण सांगू इच्छितो:

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात प्रशिक्षणासाठी गेलो होतो.
प्रशिक्षण संगणकाने नियंत्रित केलेल्या यंत्रांच्या दुरुस्ती संबंधी होते.
दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणात, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी) लेखी परिक्षा घेतली गेली.

परिक्षेची वैशिष्ट्ये पुढिल प्रमाणे:

परिक्षा ऑब्जेक्टिव पद्धतीची होती.
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय होते. केवळ एका चपखल पर्यायावर खुण करायची होती.
उत्तरे लिहिताना पुस्तके वाचुन उत्तर लिहायची मुभा होती.
यंत्र चालवून, त्यातील संगणका वरचे मेनू वाचून उत्तरे लिहिण्याची मुभा होती.
उत्तरे लिहिताना प्रशिक्षकाशी चर्चा करण्याची मुभा होती.
अगदीच उत्तर सुचत नसेल तर प्रश्नपत्रिका हॉटेलात बसुन (पुस्तके वाचून) शनिवार-रवीवार सुट्टीत सोडवायला परवानगी होती.
उत्तर पत्रिका सोमवारी सकाळ पर्यंत प्रशिक्षका कडे सोपवणे बंधन कारक होते.
चुकिच्या उत्तरास उणे मार्क होते.

इतके करुनही, उत्तरे लिहिताना घाम फुटला. कारण प्रत्येक प्रश्नाचे चारही पर्याय योग्य उत्तरास पात्र होते.
परंतु केवळ एकमेव पर्याय जो की अत्यंत योग्य होता तो निवडण्यासाठी, परिश्रमपुर्वक यंत्र पुन्हा पुन्हा चालवून, पुस्तक वारंवार पिंजुन ते यंत्र मुळातुन समजावून घ्यावे लागले.

पाश्चात्य देशातील शिक्षन पद्धतीची झलक पहावयास मीळाली.

परदेशातुन येणारे तंत्रज्ञ, आमच्या पेक्षा कमी शिक्षीत असुनही, आपापल्या क्षेत्रात वाकबगार का असतात, याचे उत्तर तेव्हा मिळले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

17 Jul 2008 - 1:09 am | चतुरंग

परीक्षा ही तुम्ही 'पास की नापास' हे ठरवण्यासाठी नसून तुम्हाला तो विषय किती समजला आहे हे जाणून त्यात सुधारणा करण्यासाठी असते हे तत्त्व ह्यात अधोरेखित होते!

चतुरंग