लोकहॊ
आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन!
आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे.
.
यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते.
नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे. संपत्तीच्या लोभाने लग्न करणार्या स्त्रीयांपासून संपत्ती कशी वाचवायची, हा प्रश्न कायद्याने कसा हाताळणार हे एक कोडेच आहे.
जाताजाता: सध्या झीमराठीवर एका येऊ घातलेल्या मालिकेची (दिल्या घरी तू सुखी रहा) जाहिरात जोरदार चालू आहे. त्यात एक आई तिच्या मुलीची वेणी घालताना तिला विचारते, "लग्न झाल्यावर सासू तुझे लाड करणार आहे का गं?" त्यावर मुलीने दिलेले उत्तर ऐकून मी थंडगारच पडलो. मुलगी उत्तरते, "सासूच्या नानाची टांग!".
माझी आठवीतली मुलगी मला "सासूच्या नानाची टांग" म्हणजे काय असे रोज विचारून भंडावून सोडते. सध्यातरी तिच्या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकलो नाही. पण महाराष्ट्रातल्या बर्याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती असेल.
कंचुकीदहन आणि स्लट मार्चनंतर स्त्रीमुक्तीचा नवीन अध्याय महाराष्ट्रात "सासूच्या नानाची टांग" या संदेशामुळे उघडेल हे मात्र नक्की!
प्रतिक्रिया
19 Nov 2011 - 12:32 pm | नितिन थत्ते
"डू नॉट फीड द ट्रोल्स" असे अलिकडेच ऐकले.
19 Nov 2011 - 10:13 pm | निवेदिता-ताई
आणी पुरुषांना कशाला पाहिजे.....जागतिक पुरूष हक्क दिन......
इथे भारतात आणी जवळ जवळ सगळीकडे पुरुषप्रधान संस्कॄती असताना ह्या हक्क दिनाची गरजच काय?????
22 Nov 2011 - 6:29 pm | किचेन
स्त्रियांचा असतो मग आपला का नको?
हम भी किसीसे कम नाही वैगरे दाखवायला त्यांनी हा दिवस काढलाय हो!
बाकी दिवस कोणताही असला तरी आई,बहिण,बाईको,बॉस ह्यांच्या हाताच्या लाटण्याचा मार दिवसातुन एकदा तरी गोड मानून खावाच लागतो!
19 Nov 2011 - 2:16 pm | शाहरुख
ही आकडेवारी वैवाहिक कारणांमुळे आत्महत्या केलेल्या विवाहित स्त्री-पुरुषांची आहे का ? तशी मी ही बातमी वाचली होती सकाळी पण विसरलो हे..
19 Nov 2011 - 2:16 pm | शाहरुख
ही आकडेवारी वैवाहिक कारणांमुळे आत्महत्या केलेल्या विवाहित स्त्री-पुरुषांची आहे का ? तशी मी ही बातमी वाचली होती सकाळी पण विसरलो हे..
19 Nov 2011 - 3:19 pm | आत्मशून्य
पुरुषांचा कर्तूत्वाचा आवाका फार मोठा असल्याने लहान सहान कारणाने ते आत्महत्या करणार नाहीतच. तसच जर हे विधान मान्य नसेल, तरीही जोडीदाराचे वागणे हा मूख्य फॅक्टर डावलता येणार नाहीच.
19 Nov 2011 - 3:27 pm | आत्मशून्य
धन्यवाद यूयूत्सू, आपल्यालाही जागतिक पुरूष हक्क दिनाच्या मनःपूर्वक शूभेछ्चा.
एक स्त्रि शिकली तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागू शकते, तेच जर एक पूरूष शिकला तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागण्यापासून वाचू शकते. होय सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो.
भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन संस्थळांवर धागे काढावेत, फेस्बूकवर बेगडी स्त्रिमूक्ती आंदोलन चालवावे, अथवा सरळ व्यवसाय टाकून अब्जाधीश व्हावे,राजकारन करावे, मनोरंजन क्षेत्रात जावे, भारताला प्रगतीपथावर न्यावे किव्हां घरात बसावे असेच पर्याय कायद्याने खूले ठेवले पाहिजेत. तसेच त्या सर्वप्रकारच्या नोकर्या करायलाही हरकत नाही जे काम करणे पूरूषांना शक्य नाही. मी अर्थातच एकतर्फी बन नाहीये, कारण हीच गोश्ट वाइस वर्सा पूरूषांनाही लागू होते.
स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा विषेश फायदा समाजाला/देशाला करून दीला पाहीजे. जि गोश्ट पूरूष आधीपासूनच करत आहेत/ करू शकतात तेच करत बसून सॅचूरेशन वाढवून स्त्रिया जगाचे पोटेन्शीअली फार मोठे नूकसान करत आहेत ही फार खेदजनक बाब होय.
19 Nov 2011 - 3:51 pm | भास्कर केन्डे
होय सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो.
अफलातून मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन!
तुम्हाला देशात नामी वकील म्हणून नाव कमावण्याची संधी आहे हे नक्की. ;)
19 Nov 2011 - 4:43 pm | सन्जोप राव
धन्यवाद यूयूत्सू, आपल्यालाही जागतिक पुरूष हक्क दिनाच्या मनःपूर्वक शूभेछ्चा.
एक स्त्रि शिकली तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागू शकते, तेच जर एक पूरूष शिकला तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागण्यापासून वाचू शकते. होय सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो.
भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन संस्थळांवर धागे काढावेत, फेस्बूकवर बेगडी स्त्रिमूक्ती आंदोलन चालवावे, अथवा सरळ व्यवसाय टाकून अब्जाधीश व्हावे,राजकारन करावे, मनोरंजन क्षेत्रात जावे, भारताला प्रगतीपथावर न्यावे किव्हां घरात बसावे असेच पर्याय कायद्याने खूले ठेवले पाहिजेत. तसेच त्या सर्वप्रकारच्या नोकर्या करायलाही हरकत नाही जे काम करणे पूरूषांना शक्य नाही. मी अर्थातच एकतर्फी बन नाहीये, कारण हीच गोश्ट वाइस वर्सा पूरूषांनाही लागू होते.
स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा विषेश फायदा समाजाला/देशाला करून दीला पाहीजे. जि गोश्ट पूरूष आधीपासूनच करत आहेत/ करू शकतात तेच करत बसून सॅचूरेशन वाढवून स्त्रिया जगाचे पोटेन्शीअली फार मोठे नूकसान करत आहेत ही फार खेदजनक बाब होय.
खलास! शब्द संपले! जय मराठी!
19 Nov 2011 - 5:57 pm | आत्मशून्य
:(
6 Oct 2013 - 10:05 am | balasaheb
19 Nov 2011 - 9:45 pm | आनंदी गोपाळ
धन्यवाद यूयूत्सू,
Submitted by आत्मशून्य on Sat, 19/11/2011 - 15:27.
तुमच्या पदकमलांचा फोटू मिळेल काय?
रोज दर्शन घ्यावे अशी इच्छा आहे!
अहह!
काय ते विचार!
काय ति बुद्धीमत्तेची झळाळी
साक्षात मनू तुमच्या जिभेवर कॅब्रे डान्स आय मीन नृत्य करीत आहे असे वाटले.
19 Nov 2011 - 4:19 pm | ५० फक्त
+१००००० टु आत्मशुन्य, अगदी व्यवस्थित मुद्दा मांडला आहेस, हे नोकरीलाच काय पण शिक्षणाला देखील लागु होते. विशेषतः इंजिनियरिंगला, किती इंजिनियर झालेल्या मुली आपल्या शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात.
'स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा विषेश फायदा समाजाला/देशाला करून दीला पाहीजे. जि गोश्ट पूरूष आधीपासूनच करत आहेत/ करू शकतात तेच करत बसून सॅचूरेशन वाढवून स्त्रिया जगाचे पोटेन्शीअली फार मोठे नूकसान करत आहेत ही फार खेदजनक बाब होय.'' - १०० % आणि हाच मुळ मुद्दा आहे या सगळ्या वादांचा. आपण काहीतरी करुन दाखवु शकतो यापेक्षा जे करत आलेलो आहोत ते जास्त चांगलं कसं करु शकतो यात अक्कल लावली पाहिजे. ना धड नोकरी सांभाळता येते ना घर सांभाळता येतं, आणि मग ऑफिसातली कामं होत नाहीत कारण घरचे व्याप आहेत आणि घरी नीट काही करायला नको कारण ऑफिसचं टेन्शन आहे असं होउन जातं.
19 Nov 2011 - 4:30 pm | किचेन
१००% सहमत! (मी मुलगी आणि इंजिनियर असले तरी देखील) कॉम्पुटर सोडलं तर इतर क्षेत्रातील इंजिनियर मुली ह्या टोटली मुलांवर अवलंबून असतात.स्वतःच्या हाताला ओईल,ग्रीस लागू नये म्हणून किती कित्ती प्रयत्न करतात! एप्रन घालायची हि लाज वाटते ह्यांना.आणि जड जोब उचलत नाहीत,हाताला बर लागली आणि ठेम्भर रक्त आला तरी ह्या तसं तसं रडत बसतात.काम टेबलवर आणून दिलात तरच करील नाहीतर नाही! अस वागण असत ह्याचं!
19 Nov 2011 - 6:11 pm | पिलीयन रायडर
उगच काही माहीती नसताना कशाला लोक बोल्तात हेच मला कळत नाही....
अशा किती जणी पाहिल्या हो तुम्ही?? की नुसतच ऐकलय??
.......
"अभ्यास वाढ्वा....."
शॉप फ्लोअर वर भरपुर काम करुन ग्रीस मध्ये हात घालयला आवडणारी.....
19 Nov 2011 - 10:08 pm | rupali.gaikwad11
स्त्रिहीच स्त्रिचि वैरी असते हे फक्त ऐकल होत.
'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपट पाहीला आहे का??
you must watch it.
20 Nov 2011 - 12:33 pm | वाहीदा
@ किचेन : गप् ग, काहीतरी बोलायचे ! कित्ती मुली अश्या तुमच्या पहाण्यात आहेत ?
(आता किचेन हा आयडी स्त्रीचा आहे हे गृहीत धरुन ) या अश्या स्रीयांमुळेच स्त्री चळवळीला ठेच लागते पण त्याने जास्त काही फरक पडत नाही याची नोंद घ्यावी.
20 Nov 2011 - 3:25 pm | पियुशा
@ किचेन अन ५० फक्त
तुमच्या मताशी असहमत !
कीचेन ताइ
इंजिनियर मुली ह्या टोटली मुलांवर अवलंबून असतात.स्वतःच्या हाताला ओईल,ग्रीस लागू नये म्हणून किती कित्ती प्रयत्न करतात! एप्रन घालायची हि लाज वाटते ह्यांना.आणि जड जोब उचलत नाहीत,हाताला बर लागली आणि ठेम्भर रक्त आला तरी ह्या तसं तसं रडत बसतात.काम टेबलवर आणून दिलात तरच करील नाहीतर नाही! अस वागण असत ह्याचं!
अत्यन्त चुकिच विधान , आमचे हात दिवसभर काळेच असत्तात ,अन बर लागन्याच काय घेउन बसलात इथे कित्ति वेळा बोट देखिल कापतात ,अडी-नडीला तर हातात फाइल घेउन बर सुध्धा मारावी लागते .
काही जणाना कॉतुक असते ,पण त्या ही पेक्षा " एखादी चुक झाली तर तुम्ही चुकिच्या फिल्ड्मध्ये आहात हे तुम्हाला मुद्दाम सान्गनारे महाभागही असत्तात :)
@ ५० फक्त
किती मुली इमाने-इतबारे काम करत्तात?
मला तर वाट्ते मुलीच सिरियसली काम करत्तात ,चुकु नये काही म्हनौन
मुल आपल १०० तला एखादा जॉब चेक करतिल randmaly
अन म्हनतिल झाल ब्वा चेकिन्ग एकदाच ;)
( शॉप फ्लोअरला बोट कापुन घेनारी पियु :) )
20 Nov 2011 - 6:47 pm | ५० फक्त
पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा अँड पि.रा.,
पण सामान्य नियम अपवादानेच सिद्ध होतात हे खरं असावं.
असो, पियुषा, माझं स्टेटमेंट पहा ' किती इंजिनियर झालेल्या मुली आपल्या शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात.' करत असलेल्या नोकरी / व्यवसायात इमानदारी ही मुलीच जास्त दाखवतात हे १००% सत्य आहे पण वर जे बोल्ड केलंय त्याबद्दल काय. वर किचेननं तिचंच उदाहरण दिलंय.
इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता, घरी बसणं किंवा एम्बिए करणं हे बाकीच्या पदवी अभ्यासानंतर सुद्धा करता आलं असतं ना.
20 Nov 2011 - 7:02 pm | गणपा
या बाबतीत आपल्याकडे काही विदा असल्यास आधी तो प्रकाशित करावा अशी मी फक्त ५० यांना विनंती करतो.
20 Nov 2011 - 8:35 pm | पैसा
बाडिस.
21 Nov 2011 - 7:17 pm | बिपिन कार्यकर्ते
+२
५० फक्त यांचे विधान सेक्सिस्ट वाटले. निषेध नोंदवतो.
20 Nov 2011 - 7:24 pm | वाहीदा
इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता,
विधानात एका मुलाची हे शब्द खटकले.
या ऐवजी मग कशाला एका विद्यार्थ्याची / विद्यार्थीनीची सीट घालवता असेही लिहीता येईल .
मला इंजिनियरिंग करुन इतर व्यवसायात (कि ज्याचा इंजिनीअरिंगशी काडिचाही संदर्भ नाही) शिरलेले मुले ही माहीत आहेत.
20 Nov 2011 - 7:30 pm | पिलीयन रायडर
पण अस फक्त मुलीच करतात का?? मग तुम्ही एम.बी.ए च्या अनेक कॉलेज मध्ये इन्जीनिअरिन्ग करुन आलेली मुलं पाहिली नाही का??
आणि घरी बसायचं म्हणाल तर.. माझ्या इन्जीनिअरिन्ग च्या इतक्या मैत्रीणी मध्ये फक्त २ घरी आहेत... ज्यातल्या १ कीच लग्न शेवटच्या वर्शात लग्न लावुन दिलं तरी ती नेटान अभ्यास करुन मस्त % नी पास झाली..पण सासरी नोकरीला विरोध झाला... घरी बसवलं...
२ री अचानक लग्न झालं न अमेरिकेला गेली..तिकडे नोकरी मिळत नाहीये...
मुली मुद्दाम असं वागतात ..... स्त्रियांना अगदी पुरुषां एवढी मोकळिक आहे हवं ते निवडण्याची... मुलं, लग्न, सासरी जाणं हे मुळिच आड येत नाही त्याच्या नोकरीच्या... असं जर का तुला वाट्त असेल तर मात्र तुला आमचं म्हणणं पटणं अवघड आहे...
बर मग ह्या अडचणी आहेत म्हणुन आम्ही घरी बसावं का??
म्हणजे जी मुलगी थोड्या सवलती दिल्यास (बाळंतपणात ३ महिने रजा, मुल लहान असताना work from home, घरुन कामात मदत) मुला एवढी उत्तम , उलट त्या पेक्षा जास्त चांगलं काम करू शकते तिनी घरी बसावं??
आणि लहान मुलांच्या आबाळ होण्या बद्दल बोलाल तर माझी आइ माझ्या जन्माच्या आधी पासुन काम करत होती, थोडी गैरसोय झाली , पण उलट मी व माझी बहीण independent झालो.. आईची कदर खूप आहे आणि इतर घरी जसं घरत असणर्या आयांना हुकुम सोडणे, ग्रुहीत धरणे, "तुला काय कळ्तय??" असली भाषा वापरणे..असं आमच्या घरात कधीही झालं नाही... आमची आबाळ तर दूर उलट आई सर्व बाबतीत घरत बसणार्या बाइ पेक्षा जास्त efficient होती...ती उत्तम संस्क्रुत शिकवते आणि लोकांना त्यामुळे आई बद्दल आदर वाटतो... माझी आई काम करते ह्याचा मला अभिमान आहे...आणि माझ्या मुलांनाही माझा असेल...!
20 Nov 2011 - 8:38 pm | आत्मशून्य
माझी आई हाऊस-वाइफ होती/आहे ह्याचा मला जास्त अभिमान आहे... आणि माझ्या पत्नीचा तो स्वेछ्चेने घेतलेला निर्णय असेल तर माझ्या मुलिंनाही त्याचा अभिमान असेल.
मूळातच बर्याच स्त्रिया काम ह्या पूरूषांपेक्षा वरचढ आहोत हे सिध्द करायच्या सूप्त इर्षा मनात ठेऊन करत असतात. त्यामूळे त्या जे करतात ती कामातील सफाइ न्हवे. तसच सन्माननीय अपवादही असतातच, कधी कधी केनया वेस्टींडीज ला हरवते, बाग्लादेश पाकिस्तानला हरवतो याचा अर्थ त्या बलाढ्य टीम्स आहेत असा न्हवे. मूळात स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा समाजाला विषेश फायदा करून दिला पाहीजे. त्या लायबलेटीज न्हवे तर अॅस्सेट्स म्हणून सिध्द झाल्या पाहीजेत.
किचेन यांच्या कामाचे स्वरूप बघता त्यांचा समाजातील सर्व स्तरातीलच बर्याच लोकांशी, विवीध प्रवृत्तींशी त्यांचा संपर्क येतोच हे सहज कळते. म्हणून त्यांची जाणीव व अभ्यास व्यापक आहे व निरीक्षण सखोल यावर दूमत नाही. त्या सदरील मूद्याकडे वैयक्तीक इगो न्हवे तर सामाजीक प्रवृत्तीच्या अभ्यासाचा चश्मा घालून बघत आहेत. तर त्यांना विरोध दर्शवणारे मात्र अहंकार व स्वतःची प्रवृत्ती इतक्याच तूटपूंज्या शिदोरीवर आपलं मत रेटत आहेत. समाजातील व्यवहारांचे व्यावहरीक पातळीवर असे ज्ञान जोपासणार्या व्यक्तीच्या (स्त्रिच्या) निसंदीग्ध मताला बेगडी विरोध करणारेच आज स्त्रि सबलीकरणाचे खरे विरोधक होय. हे बरं न्हवे.
20 Nov 2011 - 9:07 pm | दादा कोंडके
सहमत आहे... :)
20 Nov 2011 - 9:11 pm | पैसा
________/\________
20 Nov 2011 - 9:31 pm | गणपा
फक्त ५० यांनी विदा पुरवल्यावर उत्तर देण्यात येईल.
आत्मशुन्य वा दादा कोंडके या दोघां पैकी कुणी एकाने दिला तरी हरकत नाही.
20 Nov 2011 - 10:58 pm | दादा कोंडके
पण आमच्या वर्गातल्यांचं उदाहरण देतो.
माझ्या माहिती प्रमाणे, साधारणः
१. १००% मुलं नोकरी/व्यवसाय करत आहेत
२. ७०% मुली नोकरीच करत आहेत
३. लग्न झालेल्या ५०% मुलांच्या बायका नोकरी करत नाहीत
४. १००% मुलींचे नवरे नोकरी/व्यवसाय करत आहेत
आता ह्यावरून मी सहमती दाखवली.
आणि अशाप्रकारे युयुस्तुंचा धागा शतकी वाटचाल करत आहे! :)
21 Nov 2011 - 12:23 am | आत्मशून्य
म्हणजे या मूलीना पोटापाण्यासाठी न्हवे तर चैन व हौस्मौज करायची म्हणून नोकरी हवी. ती सूध्दा समोरच्याच्या पोटावर पाय देऊन. पण यासाठी नोकरी का ? व्यवसाय केला तर समाजाला जास्त हातभार लागणार नाही काय ?
उदा. जसा माझा भाउ वकील आहे तसचं आत्याही वकील आहे, बरेच गृहकलह ती सोडवते (हेच ते जिथे स्त्रियांवर (जास्त करून घरच्यांकडूनच) अन्याय केले जातात चूकीची वागणूक दीली जाते त्यावर कायदेशीर मदत करते/मिळवून देते वगैरे वगैरे व दोषींना गून्हेगार सिध्द करते) ज्याचा मला अत्यंत अभिमानही आहे.
ज्याना फक्त मूलीच आहेत, अथवा दूर्दैवाने परीस्थीती वाइट आहे अशा वेळी स्त्रियांनी नोकरीही जरूर करावी. पण केवळ जास्त मजा करता यावी म्हणून हे वागण योग्य आहे काय ? डॉलरमाज वा कम्यूनीस्ट प्रव्रुत्ती असणार्यांच मत काहीही असो भारतात हे वागणं प्रॅक्टीकल आहे काय ? आपण समाजासाठी काही देणं लागत नाही काय ?
नैतीकतेचा मूद्दा पैसा मिळवत असल्याच्या गूर्मीत सहज दूर्लक्षीला जाइल म्हणूनच यावर कायदेशीर उपायच योजला जावा असं म्हणालो तर मनूचा कॅब्रे काय अंडवेअरच ज्वलन काय... काहीही भंपक विचार केला जातोय. पण आपण भारतीयांच काय , आपण दगड बनलो आहोत काय ? आपली मने इतकी निष्ठूर झाली आहेत काय ? की साधीसंवेदन शीलता, माणूसकी आपण विसरून भौतीकतेपायी एकमेकांच्या पोटावर असा पाय द्यावा ?
21 Nov 2011 - 12:56 am | गणपा
हे तुम्ही कसे काय ठरवलेत?
ज्या ७०% मुली नोकर्या करीत आहेत त्यांच्या नवर्यांबद्दल पण हेच मत आहे का आपलं?
बाकी आपले या धाग्यावरचे ईतर प्रतिसाद पहाता, मी ईथेच थांबतो.
कुणी मुद्दाम घडे पालथे ठेवले असतील तर त्यात पाणी भरण्याचा प्रयत्न करणाराच मुर्ख ठरणार नाही का. :)
21 Nov 2011 - 6:10 am | आत्मशून्य
प्रॅक्टीकल असेल तर माझा विचार वाइस वर्सा अप्लाय करायला माझी हरकत नाही असं आधीच म्हटलं आहे. तसचं मी कूठेही स्त्रियांवर बंधने घालावीत त्यांनी शिकू सवरू नये,उद्योग चालवू नयेत, घराची जबाबदारी उचलू नये, अथवा केवळ घरकामच करत रहावे, चूल्मूलच सांभाळावे, राजकारण करू नये, कर्तूत्वाला बासनात गूंडाळून बसावे असं म्हटलं नाहीये. मला होत असलेला विरोध हा एक तर माझा मूद्दा न समजल्याने, अशूध्द लेखनाने अथवा करायचा म्हणून करायचा याच कारणाने होतोय असचं दीसतयं. जे चूक आहे.
मि फक्त भारतातील पूरूषांच्या पोटावर जी विनाकारण गदा येते आहे त्या विरोधात आवाज उठवत आहे. काही चांगल करायला गेलं तर इथं अण्णा हजारेंना विरोध केला जातो तर माझ्या सारख्या फालतू माणसाची काय कथा ? असो,
माझं लिखाण फार अशूध्द असत म्हणून समजलं नसेल तर वर लिहलेलं निसंधीग्ध करतो की ज्या नोकरी करणार्या मूलीचे नवरे नोकरी करत आहेत त्यांच्यामूळे इतर अशा मूलांच्या पोटावर पाय येत आहे ज्यांची कूटूंम्बे ही केवळ मूलांवरच अवलंबून आहेत म्हणजे थोडक्यात नोकरी करणार्या मूली केवळ ७०% गरजू मूलांच्या नोकर्या खात नसून त्यांच्या ३०% मैत्रीणी ज्यांना करीअरचा माज्/सोस/ आवड अथवा इछ्चा नाही त्यांच्याही (व त्यांच्या फ्यामीलीच्याही) पोटावर पाय देत आहेत, त्यांना अबावश्यक कमीपणा देत आहेत, आयूष्य जगण्यास अडचणी निर्माण करत आहेत. या परीस्थीतीत कायद्याने स्त्रियांना नोकरी करण्यास मनाइ केलीच पाहीजे, कारण पैसा कमावते या गर्वाखाली या मूली नैतीकता म्हणून राजीनामा देणार नाहीत/जॉब सोडणार नाहीत, मग कायद्यानेच हा पेच सोडवावा अशी मागणी करून या असंवेदनशील अन्यायाला वाचा फोडली तर काही चूकतय का ? बर यांचा गर्वही असा की कोयते घेऊन आंदोलन होइल की काय अशी यांची दडपशाही चालू आहे, मग आता या मग्रूरी व विषमतेबद्दल विरूध्द आजच आवाज उठवायला नको काय ?
13 Nov 2013 - 1:05 pm | राजमुद्रा२१
आत्मशून्य, मला तरी सांगा अशी एखादी नोकरी जी हौसमौजेसाठी करतात, मी पण करेन म्हणते.
दुसरी गोष्ट अशी कि मूली त्याच नोकर्या करतात ज्या पुरुष करतात.
21 Nov 2011 - 12:26 am | गणपा
याच कारण विचारलत?
घरची सुबत्ता?
सासरच्या लोकांचा नोकरी न करण्याचा 'प्रेमळ' आग्रह वगैरे?
१००% मधली किती टक्के व्यवसाय करीत आहेत?
७०%. बघा, आकडाच बोलतोय.
उरलेल्या ३०% मधल्या किती लग्न न झालेल्या आहेत?
हे विचारायच कारण असं की हल्ली शिकल्या सवरलेल्या मुली लग्नाआधी स्वतःहुन नोकर्या धरतातच. तीच नोकरी करण वा नकरण हे लग्न झाल्यावर तिचे सासरची मंडळी ठरवतात.
यात नवल ते काय?
अरे आपली पुरुषप्रधान संकृती नाही का?
21 Nov 2011 - 12:32 am | आत्मशून्य
पुरुषप्रधान संकृती न्हवे तर स्त्रियांचा भारतीय समाजाला आर्थीक उपद्रव व पर्यायाने पूरूषांना त्याचे भोगावे लागणारे "क्वान्सिक्वेन्सेस" हा मूद्दा आहे. आणी जो फक्त भारतातील परीस्थीतीशी निगडीत आहे. तेव्हां (बेगड्या) अमेरीकी स्त्रिमूक्तीवादाच्या नजरेतून अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वैयक्तीक उपभोगाच्या विषयाच्या नजरेतून देशावरील संकटाकडे पाहण्यात येऊ नये/मत किमान यापूढे तरी मांडू नये अशी नंम्र विनंती.
21 Nov 2011 - 5:18 am | सेरेपी
हे वरच्या सगळ्याच 'सहमत' वाल्यांनाही. उत्तम चाल्लंय! अजुन येउद्या!
13 Nov 2013 - 12:58 pm | राजमुद्रा२१
गणपा तुम्हला अनेक धन्यवाद. स्त्रीयांची खरी बाजू मांडल्याबद्दल :)
6 Oct 2013 - 12:05 am | विजुभाऊ
अरेरे बिच्चारे "सासूचे नाना"
कसल्या वयात त्याना कायकाय भोगावे लागतय.
सासूची नानी असा शब्द असता तर जरा जास्त सयुक्तिक ठरले असते.
तो काव्यगत न्याय ही झाला असता. सासूच्या नानाला बोलावणे हा काव्यगत अन्याय आहे
21 Nov 2011 - 11:03 am | मैत्र
Generalize करता येईल इतका विदा नाहीये पियुषा / पि. रा. आणि गणपा.
पण अनेक उदाहरणं आहेत आजू बाजूला --
माझ्या बरोबर शिकलेल्या किमान ७-८ तरी मुली ज्या हुशार होत्या (टक्केवारी, एकूण समज, बुद्धिमत्ता) ज्यांनी इंजिनिअरिंग किंवा इतर वैद्यकीय (आयुर्वेदिक / होमिओपॅथी) वगैरे शिक्षण चांगल्या कॉलेजेस मधून घेतलं.
आणि नंतर कुठलेही विशेष प्रयत्न न करता उसगावात मुले वाढवत आहेत. हेही महत्त्वाचेच काम आहे आणि त्यात गौण काहि नाही. पण हे कितपत योग्य आहे?
११- १२वी मध्ये एक ऐच्छिक विषय होता ज्यात वेल्डिंग / फायलिंग / टू व्हीलर मेंटेनन्स करायला लागायचा. काही मुली फक्त मार्क मिळतात सहज आणि हे सगळं काम मास्तर लोक करून देतात म्हणून आल्या होत्या.
आणि त्यांनी त्या चतुराईने मार्कही मिळवले जास्त कष्ट न करता - एकही जॉब पूर्णपणे एकट्याने न करता आणि मग राजरोसपणे aggregate वाढवून electronics किंवा तत्सम विषय घेतले इंजिनिअरिंगला.
त्यातही निम्म्या मुलि अमेरिका / इंग्लंड इथे सेटल्ड आहेत नोकरी न करता...
पियुषा -- आता ३३% आरक्षणातून ज्या मुली प्रॉडक्शन / मेकॅनिकल मध्ये येतात त्यातला १०-१५% तरी त्याच्याशी प्रामाणिक असतात का? वर इतर कोणी म्हटल्या प्रमाणे तुमच्या अपवादातूनच हा नियम सिद्ध होतो आहे...
वस्तुस्थिती नाकारता येत नाही की अजूनही खुप स्वातंत्र्य नाहीये मुलिंना आणि ते बरोबर काम करणार्या शिकलेल्या उत्तम जॉब करणार्या मुलींनाही घरी नवराच काय वडिल / भाऊ आणि आई / सासू यांच्याकडून होणारे अन्यायात्मक निर्णय आणि अनुभव स्वीकारावे लागतात.
पण म्हणून गैरफायदा घेणार्या / काम टाळणार्या / घोकंपट्टी पद्धतीने बारावी पार पाडून कॉलेजात अळं टळं करुन लग्न करून आराम करणार्यांची संख्या नाकारण्याइतकी नक्कीच कमी नाही... त्यामध्ये ज्यांना घरची जबाबदारी आहे अशा मुलांच्या जागा जातात (काही वेळा) हेही खरं आहे..
दुसरा मुद्दा एम बी ए चा -- एक 3 idiots पाहून यावर मत प्रदर्शन करण्यात काहीच अर्थ नाही की इंजिनिअरिंग करुन लोक एम बी ए का करतात? पहिली पदवी अमुकच असावी याचं एम बी ए ला बंधन नाही.
विविध प्रकारचे पर्याय मॅनेजमेंट मध्ये उपलब्ध असतात. इंजिनिअरिंगचं शिक्षण हे अगदी विशिष्ट तांत्रिक ज्ञानापेक्षाही जो aptitude देउ शकते त्यामुळे बरेचदा असे लोक पुढे उत्तम काम करतात.
याच मुद्द्यावर राहायचं तर इतर कुठलिही non-computer / non -IT पदवी असलेल्यांनी तथाकथित आय टी मध्ये अजिबात काम करू नये. पण अशी सुरुवात केली तर भारतीय आय टीला गाशा गुंडाळावा लागेल.
हा अतिशय वेगळा मुद्दा आहे आणि त्याला वरच्या इंटरेस्ट आणि तयारी नसताना पदवी घेऊन नोकरी करायची नाही असे लक्ख सांगण्याच्या पद्धतिशी जोडू नये...
21 Nov 2011 - 1:15 pm | पियुशा
@ ५० फकत ,आत्म्शुन्य
शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात.' करत असलेल्या नोकरी / व्यवसायात इमानदारी ही मुलीच जास्त दाखवतात हे १००% सत्य आहे
चला हे तर मान्य आहे तुम्हाला :)
पण वर जे बोल्ड केलंय त्याबद्दल काय. वर किचेननं तिचंच उदाहरण दिलंय.
तीने जर तिच्याबद्द्ल किन्वा तिच्या पाह्न्यातल्या कुनाबद्द्ल हे मत बनवल असेल तर ते एकतर्फी म्हनता येइल :)
इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता, घरी बसणं किंवा एम्बिए करणं हे बाकीच्या पदवी अभ्यासानंतर सुद्धा करता आलं असतं ना.
घरी बसन्याला कोन कारनीभुत आहे त्यावर डीपेण्ड आहे ते , जर एखाद्या मुलिच लग्न झाल्यावर जर तिच्या सासरच्या लोकानी नोकरिला/करियरला विरोध दर्शवला असेल तर ती काय करनारे मग?
जिथे स्त्री - पुरुष समानताचे धडे गिरवत आहेत तिथे आपण्च आपल्या बायकोने नोकरी करुन मुलान्चा अभ्यास्,स्वयपाक , इतर कामे व्यवस्थित साम्भाळावित असा अट्ट्हास असेल तर कशाला कोन झक मारायला करेन नोकरि ;)
तुम्ही कमवा अन पोसा मग आम्ही करतो M.D.B,S :)
19 Nov 2011 - 4:40 pm | दत्ता काळे
"डू नॉट फीड द ट्रोल्स" असे अलिकडेच ऐकले. - सहमत.
19 Nov 2011 - 5:05 pm | गणपा
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणार्यांची विचारसरणी पाहुन सखेद आश्चर्य वाटले.
19 Nov 2011 - 8:02 pm | पिलीयन रायडर
सहमत....
20 Nov 2011 - 3:41 pm | अनामिका
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणार्यांची विचारसरणी पाहुन सखेद आश्चर्य वाटले
पुर्णत: सहमत.
याच बरोबर मला या सुशिक्षीतांची लाज देखिल वाटली.....
21 Nov 2011 - 1:21 pm | कपिलमुनी
सुशिक्षित आणि सुसंस्कृत या मधे हाच फरक आहे
21 Nov 2011 - 7:46 pm | जाई.
+१००
सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा हा सोयीनुसार बदलतो
19 Nov 2011 - 8:05 pm | सुधांशुनूलकर
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणार्यांची विचारसरणी पाहुन सखेद आश्चर्य वाटले.
असंच मलाही वाटतं.
भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे हा फारच टोकाचा विचार वाटतो.
19 Nov 2011 - 8:12 pm | रेवती
असल्या लेखांचा भयानक कंटाळा आलाय.
19 Nov 2011 - 11:09 pm | नावातकायआहे
सहमत!
20 Nov 2011 - 12:54 pm | तिमा
उडवून लावा असले प्रतिगामी लेख!
20 Nov 2011 - 4:55 pm | धन्या
मुळीच नको. तुम्हाला लोकांचा टाईमपास झालेला पाहवत नाही काय? ;)
एक छान वाक्य आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय... तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही आणि किर्तनाने तो सुधरला नाही. :)
20 Nov 2011 - 9:08 pm | रेवती
असा कसा लेख उडवणार?
मी एक सदस्या म्हणून प्रतिसाद दिला तरी त्याकडे पाहणारे एक संपादिकेने प्रतिसाद दिलाय असंच पाहणार असतील तर आता दुसरा आयडी घ्यावा लागणार.;)
19 Nov 2011 - 9:16 pm | प्रभाकर पेठकर
स्त्री-पुरूष भेदभाव अधोरेखित करून मुद्दाम भांडणे लावून जास्तीतजास्त प्रतिसाद मिळवल्याच्या बेगडी समाधानासाठी काढलेला हा धागा वाटतो आहे.
19 Nov 2011 - 10:58 pm | आत्मशून्य
पण आज पूरूष हक्क दिन आहे ते धाग्यामूळच कळालं. मग म्हटलं फारच सूनंसूनं वाटतयं, तेव्हां हक्क बजावून बघूया अजून काय वाजतय का ते ? म्हणून मग प्रतिसाद प्रपंच केला. :)
20 Nov 2011 - 12:49 am | साती
एवढं शिकून सवरून तुम्हाला मुलीला एवढं समजावता येऊ नये म्हणजे कमाल आहे.
प्रथम एकेका शब्दाचे अर्थ बघू-
सासू- ज्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचे लग्न होते त्याची आई.
नाना- हिंदीत बहुतेकवेळा आईचे बाबा, पण मराठीत बाबा,काका, मोठा भाऊ ,सासरे इ. कोणतीही आदरणीय किंवा नात्याने मोठी पुरूष व्यक्ती.
टांग- पाय . कमरेच्या खुब्यापासूनचा पुढचा पायाचा भाग .
थोडक्यात नवर्याच्या आदरणिय आईच्या एखाद्या आदरणीय पुरूष नातेवाईकाचेही पाय धरून वंदन करायला ती मुलगी तयार आहे असे दिसते. वाहवा, किती उच्च संस्कार.
अर्थात जिची वेणी आईने घालावी लागते अशा मोठे केस असणार्या सालस मुलीवर असेच संस्कार असणार म्हणा.
मालिकेत आपल्य मुलीचा बॉबकट,बॉयकट ब्लोअरने सेट किंवा पर्म करणारी "मम्मी" दाखवली नाहीय्ये यातच सगळं आलं म्हणा.
अत्यंत उच्च संस्कार देणारि मालिका असणार ही. तुम्हीही पहा आणि मुलीलाही रोज दाखवा बरं.
आठवीत म्हणजे बरीच मोठी आहे मुलगी. चौदा वर्षांची तरी असणार. पुरूषांच्या शिक्षणाच्या आणि नोकरीधंद्यांच्या संधी जाऊ नये या विचाराने तिला थोडंफार शिक्षण देऊन चारपाच वर्षांत लग्नकार्य जमवावं लागेल. आत्तापासून वडिलधार्यांना आदर देण्याचे संस्कार झालेच पाहिजेत तिच्यावर.
बाकी जागतिक पुरूषदिनाच्या तुम्हला शुभेच्छा! केवळ आजचा दिवसच नाही तर हा महिनाही पुरूषांसाठी,त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मोव्हेंबर किंवा मुश्टॅक-नोव्हेंबर चळवळीविषयी ऐकलंच असेल तुम्ही. तर तुम्हाला नोव्हेंबराच्या सॉरी, मोव्हेंबराच्याही शुभेच्छा.
20 Nov 2011 - 9:03 am | पैसा
20 Nov 2011 - 3:35 pm | sagarpdy
| सासू- ज्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचे लग्न होते त्याची आई.
पुरुषांनादेखील सासू असते.
------------------------------
बाकी प्रतिक्रियेस +१ !
21 Nov 2011 - 6:29 pm | वपाडाव
वाह्ह !! व्वाह्ह !!
काय एक्स्प्लेनेशन दिलंय....
युयुत्सु, अशाच अजुन शिव्यांचे कलेक्शन येउ द्यात.....
त्यांचेही एक्स्प्लेनेशन होउन जाउ द्या.....
काय म्हंता मंडळी....
21 Nov 2011 - 6:35 pm | मन१
सासू- ज्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचे लग्न होते त्याची आई.
असे काही नाही.
स्त्री चे स्त्रीशी लग्न झाले तर जिच्याशी लग्न झाले तिची आई ही सुद्धा सासूच नव्हे का?
अशी अर्धवट माहिती नका देत जाउ ब्वा.
21 Nov 2011 - 7:10 pm | वाहीदा
स्त्री चे स्त्रीशी लग्न झाले तर जिच्याशी लग्न झाले तिची आई ही सुद्धा सासूच नव्हे का?
तु बरा आहेस ना ?
20 Nov 2011 - 2:04 am | चित्रा
>>पण महाराष्ट्रातल्या बर्याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती >>असेल.
अगदी. अगदी. आम्हाला आमच्या वडिलांनी अगदी नीट समजावून सांगितले होते, लहानपणीच सासूच्या नानाची टांग म्हणजे काय ते.
20 Nov 2011 - 9:24 am | विनायक प्रभू
सिक
20 Nov 2011 - 7:25 pm | योगप्रभू
स्त्री ही स्त्रीचीच नव्हे तर पुरुषाचीही शत्रू असते आणि केवळ पवित्र बायबलमध्ये म्हटले आहे, की 'शत्रूवरही प्रेम करा' म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करायचे इतकेच. एरवी पुरुषांनी स्त्रियांशी कसलाही संबंध ठेऊ नये आणि हेच तत्त्व आपण आपल्या मुलांवर आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर बिंबवले पाहिजे.
20 Nov 2011 - 8:01 pm | प्रभाकर पेठकर
पुरुषांनी स्त्रियांशी कसलाही संबंध ठेऊ नये आणि हेच तत्त्व आपण आपल्या मुलांवर आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर बिंबवले पाहिजे.
हा:...हा:...हा:..कसलाही संबंध ठेवला नाही तर मुले कशी व्हावी? हे तत्त्व मुलांपर्यंत आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचविणे शक्यच होणार नाही.
20 Nov 2011 - 8:19 pm | रेवती
असं कसं?
शत्रूवर प्रेम करा म्हटलय की त्यांनी!;)
21 Nov 2011 - 1:54 am | योगप्रभू
पेठकर,
मुले स्वतः काढलेल्या चित्राखाली जसे इतरांना समजण्यासाठी 'ही गाय आहे' असे लिहितात तसे आता मला प्रतिसादासमवेत कंसात (हा विनोद आहे) असे लिहावेसे वाटू लागले आहे. :)
असो, 'कसलाही संबंध ठेवला नाही तर मुले कशी व्हावी?' असा प्रश्न/शंका आपण विचारताय. अहो, आमच्याकडे अशक्य असे काहीच नाही. हे घ्या स्पष्ट पुरावे..
१) मारुतीचा घाम मगरीने गिळला आणि तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. (संदर्भ - रामायण)
२) पूर्वीच्या काळी पुत्रकामेष्टि नावाचा यज्ञ केला, की अग्निदेवता पायस (खीर) घेऊन येत असे. ती खाल्ल्यावर राण्यांना मुले होत. नंतर तर नऊ महिन्याचा काळही जाचक ठरु लागला (पुरुषांना, की स्त्रियांना ते ठाऊक नाही) म्हणून लोक अग्निदेवतेला म्हणाले, 'डायरेक्ट मूलच दे रे बाबा.' आणि काय आश्चर्य! तीपण सुविधा उपलब्ध झाली (संदर्भ - द्रौपदी आणि धृष्ट्द्युम्न जन्म)
दुसरीकडे बायकाही काही कमी वस्ताद नाहीत. त्यांनाही पुरुषांशी संबंध न ठेवता मुले होऊ शकतात.
१) कुंतीने सहा देवांचे मंत्र म्हणले आणि तिला सहा पोरे झाली. (संदर्भ - महाभारत)
२) पार्वतीने मातीपासून बालक बनवून त्याला सजीव केले (संदर्भ - गिरीजात्मज हा तिने बनवला पुतळा मातीचा, ही गाण्याची ओळ)
३) सती अनसूयेने तर तीन देवांचे एकाच बालकात कॉम्बिनेशन केले (संदर्भ - दत्तजन्म)
21 Nov 2011 - 2:36 am | प्रभाकर पेठकर
असं आहे का? काय करणार तेवढी विनोद बुद्धी मज पामराजवळ नाही.
माझं सामान्यज्ञान, संतती प्राप्ती स्त्री-पुरुष, नर-मादी ह्यांच्या परस्पर साहाय्याशिवाय शक्य नाही, ह्यापलीकडे जात नाही.
'पुराणातील वानगी पुराणात' ह्या उक्तीवरूनही आता विश्वास उडू लागला आहे.
धन्यवाद.
21 Nov 2011 - 9:09 am | धन्या
इथे "वांगी" शब्द न वापरण्यासाठी धन्यवाद काका. :)
20 Nov 2011 - 10:24 pm | राजेश घासकडवी
सर्व पुरुषांना शुभेच्छा. पुरुषमुक्तीच्या चळवळीने जोम धरण्याची गरज आहे हे जागोजाग दिसून येतं आहे.
एक काळ असा होता की पुरुषांची स्त्रियांवर हुकुमत होती. 'पायातली वहाण कशी पायातच हवी' असं ते ठामपणे जाहीर करू शकत असत. खरी मर्दुमकी होती राव त्यांच्याकडे! आताच्या पुरषांमध्ये ही हिम्मत गेलेली दिसते. त्यामुळे कणखरपणे सांगण्याऐवजी भ्याडासारखं 'त्याचं काय आहे, मुलीने इंजिनियरिंग केलं तर एका गरीब बिचाऱ्या मुलाला इंजिनियरिंग शिकण्याची संधी जाते.' आयला, आपण या शर्यतीत मुलींकडनं हरलो हे कबूल करायचं आणि वर मुळूमुळू रडायचं! आणि आम्हाला झेपत नाही म्हणून सरकारने बंदीच आणली पाहिजे वगैरे म्हणायचं. काय वेळ आली आहे आजकालच्या पुरुषांवर! बिच्चाऱ्यांची (अशा बांगड्या भरण्यापासून) मुक्ती झालीच पाहिजे.
अंडरवेअरी पेटवा म्हणावं... मग होईल मुक्ती.
20 Nov 2011 - 10:32 pm | वाहीदा
घासुगुर्जी म-हा-न आहात ___/\___
=)) =))
21 Nov 2011 - 12:39 am | आत्मशून्य
अत्यंत भडकाऊ व शिवराळ बाज असलेलं लिखाण.
सन्माननीय अपवादही असतातच, कधी कधी केनया वेस्टींडीज ला हरवते, बाग्लादेश पाकिस्तानला हरवतो याचा अर्थ त्या बलाढ्य टीम्स आहेत असा न्हवे. स्त्रियांना पायताण समजणार्यांना आम्हीही फाट्यावर मारतोच. पण त्यासाठी कमरेचं सोडून.... मोर्चे काढणार नाही.
मालक, आधी पूरूषांना जाणीव तर होऊन दे हातात बांगड्या भरल्या गेल्या आहेत याची ? नंतर बघू कशी मूक्ती करायची ते. तसही असा "बांगड्या भरणे" हा शब्द प्रयोग करून तूम्ही स्त्रियांचा अपमान केलाच नसता. व पूरूषांची चूकीची प्रतीमाही प्रतीसादातून निर्माण केली नसती. :( बांगड्या भरल्याने स्त्रियांची बूध्दी काम करत नाही हा जावै शोध कोठून लावला ? बांगड्याभरूनही स्त्रिया कर्तूत्व दाखवू शकतातच की त्यात कमीपणा अथवा मर्दूमकी असतेच कूठे . डोक्यावरचा पदरही ढळू न देणारी हातात बांगडी असलेली हिना रब्बानी परराश्ट्र मंत्री आहे ते उगीच का ? लाज काढताय की राव सगळ्या बांगड्या भरणार्या स्त्रियांची. त्यानी इतीहास नाही का घडवला ? मग ?असा अपमान करू नका स्त्रियांचा.
आणी कशाला अंडरवेअरी पेटवायची वरवरची नाटकं करायला सांगताय जर आतला दिवा/ आगच फक्कन विझलेलि अशा लिखाणातून दिसत असेल ? पैज लावतो काही कंपूसोबतच बेगडी स्त्रिमूक्ती दाखवणार्यांनी नाही तूमच्या या प्रतीसादाला दाद दिली तर काहीही हारेन. आणि तरीही त्यांना ही जाणीव नसेल की तूमच्या प्रतीसादाला दाद देताना ते स्त्रियांचा अप्रत्यक्शपणे अपमान करत आहेत. ( आकाशातला देव त्यांच भलं करो).
21 Nov 2011 - 7:04 am | राजेश घासकडवी
काय की ब्वॉ. बलाढ्य टीम्स असत्या तर एक मॅच हरल्यावर भिकेला का लागतील? आणि बांग्लादेशवर पुन्हा हल्ला करून पूर्वी होता तसाच पाकिस्तान सरकारने आपल्या कह्यात ठेवावा अशा मागण्या का करतील?
एकंदरीत तुमचा आक्षेप 'बांगड्या भरणे' हा शब्दप्रयोग वापरण्याला आहेसं दिसतं आहे. अहो, तो तुम्हाला कळेल अशा भाषेत यावा म्हणून लिहिला होता. (ही भाषादेखील गरीब बिच्चाऱ्या पुरषांनीच बनवली आहे) त्याऐवजी क्लैब्य हा शब्दही वापरता आला असता. तोच शब्द आहे असं समजून वाचा माझा प्रतिसाद.
एकंदरीत पुरुषांची चिंताच वाटायला लागली आहे. वीस वर्षांनी जेव्हा मुलं मुलींचं प्रमाण १०० ला ८० असतील तेव्हा किती पोरांना हुंडे देऊन लग्न करावं लागेल. किती मुलांना त्यांचे सासरे हुंडा दिला नाही म्हणून जाळतील... कल्पनेनेच शहारा येतो.
21 Nov 2011 - 8:06 am | आत्मशून्य
आपल्याकडून एका सामाजीक व अर्थशास्त्र विषयक धाग्याला अनावश्यक सांस्कृतीक व भावनीक तथा स्त्रि विरूध्द पूरूष रंग कारण नसताना दिला जातोय. पूरूष हे ताकतीने स्त्रियांपेक्षा बलवान आहेतच. स्त्रियांनी नोकरी केल्यांने पूरूषांच हे सामर्थ्य वर्चस्व संपणारही नाही, अम्रीकेत कामधाम करून पून्हा बेकार बॉयफ्रेंडचा सडकून मार खाऊन त्याला पोसणार्या बर्याच स्त्रियाही आहेतच. म्हणूनच असं भावनीक बनण्यापेक्षा इथे विषय काय चाललाय हे तर समजून घ्यायचे कश्ट घेऊया का?
मूद्दा अशा भारतीयांच्या निश्पाप कूटूम्बीयांच्या आयूश्याबाबद मांडत आहे जे रस्त्यावर येण आपण टाळू शकतो. जर व्यवस्थीत कायदा केला तर. या धाग्यावरील कोणत्याही लिखाणात मी स्त्रियांना तूछ्च समजा, पायताण समजा, बंधनात ठेवा, शिकवू नका असं म्हटलेलं नाहीये. माझे मूद्दे हे नेमके वास्तववादी व जनहीतार्थच आहेत, यात कोणताही स्त्रि-पूरूष भेदभाव नाही. पूरूषाच्या कूटूंबात स्त्रिया येणारच की ? तसच माझी पॉलीसी वाइस-व्हर्सा अप्लाय करायलाही मी हरकत घेतली नाही , पण म्हणून अंडर्वेअर वगैरे जाळायची वेळ येइल असा कोणताही गोड गैरसमज मी बेगडी स्त्रिमूक्तीवाल्यांचा करून देणार नाही.
तसच स्त्रियांनी काम बंद केल तर मनोरंजन सोडलं तर इतर (बहूतांश) क्षेत्रात प्रगती, कामे होणार नाहीत असा भ्रमही कोणाअला नाही. पूरूष हे सर्व सांभाळायला समर्थ होते व आहेतही. पटत नसेल तर स्त्रियांनी त्वरीत राजीनामे द्यावेत व प्रत्य घ्यावा. पूरूषांच स्त्रि विशयक असलेलं प्रेम व आदर या गोश्टीनीच त्याला स्त्रियांना समान संधी द्यायला उद्यूक्त केलं आहे, पण जर यातून काही गैरव्यवस्था तयार होतेय, स्त्रियांचे स्वतःबाबतचे भ्रम वाढत असतील तर पूरूषांनीच त्यासाठी पूढाकार घेतला पाहीजे. नाहीका ?
मी मांडलेल्या मूद्यावर मूळात तूम्ही स्त्रिला कमकूवत का समजत आहात अथवा तीच अबला असं चित्र का उभ करताय हेच स्पश्ट होतं नाहीये. कोणत्याही अबला नारीबद्दल मी इथं काहीही बोललो नाहीये, मि ज्या स्त्रियांबाबत बोलतोय ते व्यवस्थीत लक्षात घ्या व त्यांच्या बाबत तरी किमान तूम्हाला असं समजायला काय हरकत आहे की (त्या) स्त्रि(या) आणी पूरूष समानच आहेत ते ? मग तर जे मी म्हणालो की ज्या सूशीक्षित घरातील स्त्रिया जॉब करतात तेथील पूरूषही जॉब करतात परीणामी हे जॉब कमी कूटूम्बीयांमधे विभागले जात आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात हे योग्य आहे काय (विषेशतः जर कमावती व्यक्ती केवळ पूरूष असेल तर ? ) यातूनच आज सामाजीक विषमता वाढत नाही काय ? Nobody is ready to see the big picture ? या कूटील स्त्रियांच्याकडे असं काय आहे जे जॉब न करणार्या स्त्रियांकडे नाही की ह्या आता आपल्या सारासार विचारबूध्दीवरही निर्वीवाद अंकूश गाजवू पहात आहेत ?
21 Nov 2011 - 12:41 pm | मन१
दर घरामागे(विभक्त कुटुंबामागे) एकच व्यक्ती कमावती ठेवल्याने अधिकाधिक कुटुंबांना रोजगार प्राप्त होइल असे म्हणणे आहे काय? एक उदाहरण घेउन. चर्चा फक्त विवाहित स्त्री आणि पुरुषाबद्दल आहे का?
एक मध्यमवयीन जोडपे आहे,त्यातला नवरा कमावता आहे; त्यांची दोन्ही मुले कमावती व अविवाहित आहेत.
आता, ह्यात एकाच कुटुंबात तिघांनी जॉब केल्याने इतर तीन कुटुंबे निराधार झालीत असे वाटते का? केवळ एकानेच जॉब करावा असे म्हणणे आहे का? नसेल तर दुसरे चित्र देतो, त्यात नक्की काय खटक्ते ते सांगा:-
एक मध्यमवयीन जोडपे आहे,त्यातला नवरा कमावता आहे; त्यांच्या दोन्ही मुली कमावत्या व अविवाहित आहेत.
किंवा
एक मध्यमवयीन जोडपे आहे,त्यातला नवरा कमावता आहे; त्यांचा एक मुलगा व एक मुलगी असे दोघेही कमावते आहेत.
आता ही दोन चित्रे दाखवली तर "बाकिच्या कुटुंबांच्या उत्पन्नावर पोरी चढून बसल्या" असे काहिसे तुमेहे म्हणणार का?
तीन चित्रात नक्की काही फरक जाणवतो का? मला जाणवत नाही. आपण स्प्षट केल्;यास मुद्दा कळेल.
21 Nov 2011 - 7:53 pm | जाई.
२० वर्षे कशाला थांबताय
आताच नँशनल अँव्हरेज १०००मुलांमागे९३३ मुली असे प्रमाण आहे
सुदाम मुंडे सारख्याच्या कृपेने लवकरच आणखी कमी होईल
गुर्जी तुम्ही पेपर नीट वाचत नाही वाटत
नाहीतर इंडीयन एक्सप्रेसमधील हरयाणामधे लग्नासाठी गुजरातेतील मुली आयात ही बातमी नजरेतून सुटली नसती
21 Nov 2011 - 12:32 am | साती
अंडरवेअरी या काय फक्त पुरूषांच्या मक्तेदारीत नाहीत. सबब हा निषेधाचा मार्ग होऊ शकत नाही.
पुरूषांसाठी एक्स्लूजिव जाळायला असं काय बरं असेल?
या बायकांनी लुंगी,स्कर्ट्,पँट,शर्ट्,धोती असं सगळं वापरून पुरूषांसाठी एक्स्क्लूजिव असं काय ठेवलंच नाही हो.
21 Nov 2011 - 12:48 am | आत्मशून्य
प्र.का.टा.आ.
(-प्रतीसादशून्य)
21 Nov 2011 - 12:30 pm | मन१
बायकांनी shaving cream वापरल्याचे अजून ऐकले नाही. तसेच एका कुठल्याश्या जाहिरातीत एक स्त्री लाजलेली आहे, केळावर कुठले तरी आवरण चढवून त्याला झाकत असल्याचे दाखवले होते, जाहिरातीत/पोस्टरवर लाजलेली(का उत्तेजित) स्त्री दाखवली होती, तरी ते प्रॉडक्ट पुरुषांसाठीच होते म्हणे.
तस्मात् स्त्रियांनी सर्वच काही वापरून टाकले असे म्हणणे पटत नाही. स्त्री ही "चांगली स्त्री" झाल्यास उत्तम. स्त्रीचा उगीच "दुसरा पुरुष" बनवू नये.
21 Nov 2011 - 4:57 am | योगप्रभू
पोरांनो,
ह्यो गुर्जी काय बी चिथावनी देतुया. म्हनं अंडरवेअर पेटवा. म्हागाईच्या जमान्यात ७५ रुप्याच्या खाली चांगली अंडरवेर येतीया काय? कशाला उगीच नुस्कानी करुन घेताय? उगा तेच्या नादाला लागलात तर हाय ती बी अंडरवेर हातची जायची.
अंडरवेरचं महत्त्व लई हाय. ती कोनच्या तरी कंपनीची अंडरवेर घातली का गुंडाच्या छाताडावर लाथ घालता येती आन एक सुंदर बाय लगीच आपल्या कमरेभवती हात घालून आपल्याला 'माचो मॅन' आसं म्हनती. जाहिरातीत बगितलं नाय का तुमी?
तसं बगाया ग्येलं तर अंडरवेर न्हाई घातली तर काई ना काई मुक्ती मिळतीच की. मंग ह्यो जाळायचा कुटाना कशापाई करायचा म्हनतो म्या? :)
21 Nov 2011 - 6:55 am | राजेश घासकडवी
हे बघा योगप्रभूजी... तुम्ही उगाच माझ्या वाक्यांच्या अर्थाचा अनर्थ करून लोकांना माझ्याविरुद्ध भडकावू नका. कंचुकीदहनाचा जसा लोकांनी गैरअर्थ काढून स्त्रीमुक्ती चळवळ बदनाम केली तसंच तुम्ही माझ्या विधानांचा गैरअर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात.
जाहिरातीचंच बोलणं चाललंय तर तुम्ही जाहिराती पाहिलेल्या नाहीत का, टॉइंग का मामला है वगैरे? जर सरकारने बायकांना नोकरी करायलाच बंदी घातली तर मग पुरुषांना टॉइंग करता येईल आणि मग न शिकलेल्या, उद्योग नसलेल्या अनेक सुंदरी तुमच्याबरोबर येतील. जर तसं झालं नाही तर मग हे सगळंच बरबाद होईल. टॉइंगही नाही, आणि त्या सुंदरी इंजिनियर होऊन तुमची नोकरी घेणार. मग कशाला तुमच्याबरोबर येतील? तुम्हाला त्या अंडरवेअरींचा काय उपयोग? जाळूनच टाका. असं म्हणायचं होतं.
21 Nov 2011 - 7:29 am | आत्मशून्य
21 Nov 2011 - 11:45 am | योगप्रभू
गुर्जी,
तुमी शिकल्याली मानसं हाय. माजा तुमच्या स्त्रीमुक्तीशी बी संबंध न्हाई आन पुरुषवर्चस्वाशी तर त्याहून न्हाई. मला काळजी अंडरवेरची हाय. 'काळोख फार झाला, पणती जपून ठेवा' आसं कुटल्याशा कवितेत म्हटलं हाय तसं आपलं मला वाटलं का ' म्हागाई लई झाली, चड्डी जपून ठिवा.'
पोरांची काय आन पोरींची काय, माथी भडकावनं लई सोपं आस्तय हो. त्येच तर कारन हाय सोन्यावानी संसाराचा इस्कुट व्हायाचं. जानत्या लोकांनी चार समजुतीचं शब्द सांगून पानी व्हातं करायचं आस्तं. जाऊदे. जाळपोळीच्या राजकारणानं त्रास नेत्यांना व्हत न्हाई. समाजाला भोगावा लागतुया.
आता स्वातंत्र्य आंदोलनात परदेशी कपड्यांची होळी केली आपल्या लोकांनी. फायदा काय? जाळलेलं कपडं गोर-गरीबास्नी दिलं असतं तर त्येवडाच दुवा मिळाला आसता त्यांचा. तवापासून का न्हाय मला आपलं वाटतं, का कापडं जाळणं ह्ये श्रीमंतांच फ्याड हाय. गरीबांनी त्यात पडू नै. :)
21 Nov 2011 - 5:00 pm | सोत्रि
दंडवत हो योगप्रभू !
- (योगप्रभूंचा पंखा) सोकाजी
21 Nov 2011 - 12:02 am | मन१
टू घासुगुर्जी अँड योगप्रभू.
योगप्रभूंचा किमान शब्दात कमाल संदेश देणारा प्रतिसाद पाहून फुटलो,मेलो,पडलोय खाली.
21 Nov 2011 - 11:15 am | प्रभाकर पेठकर
धागाकर्ते श्री. युयुत्सु ह्यांनी धागा सुरु करून नंतरच्या चर्चेत ते कुठेच दिसत नाहिएत. असं का होत असावं? एखादा धागा सुरु करून तो सुरु केल्याबरोबर त्यातील धागाकर्त्याचे स्वारस्य लोप पावावे ह्याचे सखेद आश्चर्य वाटते.
तसेच, धाग्याच्या शेवटास 'महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीचा नविन अध्याय सुरु होईल' ह्या विधानात कौतुक दडलेले आहे की भिती? हे कळत नाही.
स्रियांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जागा अडवल्या म्हणून पुरुषांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आहे हा धडधडीत कांगावा आहे. दहावी-बारावीचे जे निकाल जाहीर होतात त्यात टक्केवारी कमविण्यात मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतल्याचे गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. कॉलेजच्या कुठल्याहि पाठ्यक्रमात प्रवेश घेताना ह्या टक्केवारीलाच महत्त्व असल्या कारणाने जास्त टक्केवारी कमाविणार्या मुली, जास्त मानाच्या समजल्या जाणार्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमात जास्त टक्क्यांनी प्रवेश मिळवितात.
ह्या न्याय्य प्रक्रियेवर मुलांना आक्षेप असेल तर त्यांनी जास्त अभ्यास करून टक्केवारीत मुलींना मागे टाकावे आणि अभियांत्रिकीच्या सर्व जागा अडवाव्या. त्यांना कोणी अडविले आहे का?
अभियांत्रिकी पदवी घेऊन त्याच क्षेत्रात काम करणार्या बहुसंख्य स्त्रिया स्वबळावर पुढे आलेल्या आहेत त्या बद्दल पोटदुखी नसावी. ज्या स्त्रिया अभियांत्रिकी पदवी घेऊन नोकरी व्यवसाय करीत नाहीत त्यांना बहुतेक वेळा त्यांच्या सासरच्यांनी नोकरी करण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात नवरा आलाच. म्हणजे पुरुषच त्यांना नोकरी करू देत नसेल तर इतर पुरुषांनी अशा स्त्रिया पदवी घेऊन घरकाम करीत बसतात असे म्हणणे म्हणजे दुटप्पीपणा आहे. अशा पुरुषांनी 'त्या' पुरुषास आपल्या, अभियांत्रिकी पदवीधारक, पत्नीला घरी बसवून ठेवले ह्या बद्दल खडे बोल सुनविले पाहिजेत. त्यांच्या त्या कृत्यामुळे एक अभियांत्रिकी जागा फुकट गेली असे म्हणावे लागेल. त्या स्त्रिमुळे नाही. ती स्वेच्छेने घरकामात रमलेली नसते.
अभियांत्रिकी पदवी घेऊन भलत्याच क्षेत्रात काम करणार्या तिघा पुरुषांना मी स्वतः ओळखतो. एकाचा, स्त्रियांची अंतर्वस्त्र (ब्रा) बनविण्याचा, कारखाना आहे. दुसरा, स्टेशनरी विकायचा आणि तिसरा उपहारगृहाच्या काउंटरला उभा असायचा.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी हा एकमेव मार्ग नाही. आज, विविध अभ्यासक्रमांच्या जाहिराती पाहता आजच्या मुलांना यशस्वी होण्यासाठी अनेक सन्माननिय अभ्यासक्रम/मार्ग उपलब्ध आहेत.
वर चर्चेत हिरीरीने भाग घेतलेल्या सदस्यांपुढे माझे ह्या विषयावरिल ज्ञान बरेच तोकडे आहे. परंतु, जे मी पाहिले आहे आणि जे माझ्या विचारांना पटले आहे असे मुद्दे मी मांडले आहेत.
धन्यवाद.
21 Nov 2011 - 12:07 pm | पिलीयन रायडर
पण तुमचे विचार इथे काही लोकांना कळतील तरी का हा प्रश्नच आहे..
मुळात स्त्री मुक्ती ही संकल्पनाच फोल आहे... प्रत्येक व्यक्ती "मुक्त" च असतो... असं जोवर त्यानी स्वतः मान्य केलेलं असतं... त्यासाठी दुसर्या कुणाच्या अनुमतीची गरजच काय?
त्यामुळे स्त्री ने काय करावं, काय शिकावं, घरी बसावं की नोकरी करावी हा त्या त्या स्त्री चा प्रश्न आहे.. तिची इच्छा आहे... त्यावर इतर कुणी चर्चा का करावी? करायचच असेल काही तर नवरा बायकोनी मिळुन आपली गरज ओळखुन काय ते ठरवावे..
मी अशी अनेक घरं पाहिली आहेत जिथे बायकोला उत्तम पद मिळत आहे पण नवर्याचे कुठेही बस्तान बसत नाहीये म्हणुन नवरा घरातील सर्व पाहतो, बायकोची जिथे बदली होइल तिथे कुटुंब जाते...
मी असेही घर पाहिले आहे जिथे बाइने आकशवाणी मधील मोठे पद सोडले केवळ नवरा म्हण्तो म्हणुन..मुलांची आबाळ होउ नये म्हणुन्..आणि काही वर्षानी मुले मोठी होउन दुसरी कडे शिक्षणा साठी निघुन गेली, तिला घरकामची अशी आवड नव्हतीच... अता ती कंटाळुन घरात अस्ते..लहान सहान उद्योग करते पण आपण फार मोठी संधी सोडली ह्याची रुखरुख कायम दिसते.. कारण मनापासुन तिला आकशवाणी चे काम आवडायचं...
स्त्री म्हणजे घरकाम आहे पुरुष म्हणजे बाहेरची कामं हे जर समीकरण डोक्यातुन काढुन टाकलं तर स्त्रियांची प्रगती पचवणं जड जाणार नाही!!
21 Nov 2011 - 7:35 pm | रेवती
पण तुमचे विचार इथे काही लोकांना कळतील तरी का हा प्रश्नच आहे..
हेच म्हणायला आले होते.
बाकी एक किडा डोक्यात वळवळतोय.;)
त्या मालिकेतल्या मुली आईत जो संवाद झाला तो त्यांच्या मनीचा नक्कीच नसणार.
संवाद लेखकानं/लेखिकेनं जे लिहून दिलय तेच त्या बोलणार.
युयुत्सु, मुलीला नानाची टांग म्हणजे काय हे खरं खरं सांगा.
काही दिवसांनी ती चुकीच्या ठिकाणी हा 'वाक््प्रचार' ;)वापरून बसली तर गैरसमज व्हायचे.
21 Nov 2011 - 12:35 pm | युयुत्सु
मी चर्चा बारकाईने वाचतोय, पण "सासूच्या नानाची टांग" याचा अर्थ माझ्या मुलीला काय समजावून देऊ याचे उत्तर मात्र अजून मिळाले नाही.
21 Nov 2011 - 12:47 pm | मन१
नुसती "नानाची टांग" ह्याचा अर्थ कळला तरी "सासूच्या नानाची टांग" ह्याचा अर्थ कळू शकेल.
उदा:- जर लहान पोरगी भूताला घाबरत असेल तर तिला म्हणावे, "घाबरू नकोस ग चिमे, धीटपणे उभी रहा.भूतच तुला घाबरून पळेल बघ. भुताच्या नानाची टांग".
किंवा कुणी अनावश्यक वादग्रस्त धागे काढून पुन्हा पुन्हा नाही ते वाद घालायला उचकवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि म्हणावे "तुला हवा असलेला वाद तुझ्या सोयीने घालित बसत नाय ज्जा.तुझ्या नानाची टांग."
21 Nov 2011 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर
"http://www.misalpav.com/node/19803#comment-353678"
तुम्हाला पटो अथवा न पटो इथे (वरील लिंक) उत्तर दिले आहे.
परंतु, तुमच्या अपेक्षित मार्गावर (मुलीला उत्तर काय देऊ?) चर्चा न राहता भरकटत गेली तर मध्ये मध्ये उपस्थिती लावून चर्चा योग्य त्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न आपण केल्याचे दिसत नाही.
21 Nov 2011 - 8:02 pm | दादा कोंडके
हा हा. म्हणजे जगात साधारण ५०% स्त्रिया व ५०% पुरुष आहेत. स्त्रिया कुठलीतरी गोष्ट करू शकत नसतील तर त्याला काही कारणं (जबाबदार व्यक्ती) असतील. त्या कारणांनाही काही कारणं असतील. ही साखळी, पुरुष मध्ये आला की थांबवायची आणि पुरुषांच्या नावाने गळे काढायचे!
बाकी हा धागा मौजमजा म्हणुनच घेतला आहे हे सांगायलाच पाहिजे का? :)
बाकी युयुत्सुराव तुम आगे बढो हम तुमारे पिछे हयच..
21 Nov 2011 - 8:26 pm | प्रभाकर पेठकर
स्त्रिया कुठलीतरी गोष्ट करू शकत नसतील तर त्याला काही कारणं (जबाबदार व्यक्ती) असतील. त्या कारणांनाही काही कारणं असतील. ही साखळी, पुरुष मध्ये आला की थांबवायची
आपल्याला लागेल तो अर्थ काढण्याचे आपले स्वातंत्र्य अबाधित आहे.
21 Nov 2011 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार
'आपल्याला(च) तेवढी किती अक्कल आहे' हे दाखवण्याची स्पर्धा एका धाग्यावर सुरु असल्याचे कळाले, म्हणून डोकावल्या गेले आहे.
छान छान..
धाग्यावर पसरलेल्या अगाध ज्ञानाच्या प्रकाशाने ड्वाले दिपले आमचे.
अज्ञानी
परा
21 Nov 2011 - 6:55 pm | आत्मशून्य
पूरूषांचा हक्काबाबत जागृती होत आहे म्हणायचं ;)
21 Nov 2011 - 2:17 pm | विजुभाऊ
त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे.
या चे मुख्य कारण आहे : विवाहीत पुरुषाना पत्नी असते . विवाहीत स्त्रीयाना पत्नी नसते "
3 Nov 2013 - 10:15 pm | मुक्त विहारि
+ १
21 Nov 2011 - 2:34 pm | गवि
काय मुद्दा होता ते पाहण्यासाठी वरखाली प्रचंड स्क्रोलास्क्रोली करत आहे..
रॉकस्टार बघतानाही इतकी ओढाताण झाली नव्हती..
काय ते कळेपर्यंत शतकाचा हौद भरण्यासाठी आमचेही हे प्रतिसादरुपी पळीभर दूध..
1 Nov 2013 - 4:27 pm | म्हैस
पुरुषांनी घरातली कामं करावीत न मग
तुमच्यात आत्मा तर नाहीच . अक्कल हि शुन्य असल्याचं दाखवून दिलंत . अहो किती जळाल स्त्रियांवर . त्यापेक्षा स्वताच्या कर्तुत्वावर नोकर्या मिळवा न
6 Nov 2013 - 11:06 am | रमेश आठवले
बायकोच्या पणजोबांची तंगडी हे शीर्षक लेखासाठी वापरल्याने घरातच तंगडी तोडली जाण्याची शक्यता आहे. तरी सावध रहा.
6 Nov 2013 - 12:52 pm | उद्दाम
चुकीच्या धर्मात जन्म घेतला,भोगा त्याची फळे.
धर्म बदलावा आणि महामुघल मंत्राचा जप करावा.
अकबराय विद्महे औरंगजेबाय धीमही
तन्नो मुघलः प्रचोदयात
बायकोच कशाला , सासूही सरळ होईल.
13 Nov 2013 - 1:10 pm | प्यारे१
काय ठरलं मग? ;)
हे शंभरीसाठी उगाच्च. :)
धागा नेमका काय आहे ते पुनर्वाचनाशिवाय समजायचं नाही. किंवा चावून (अक्षरक्रम हुकला काय? ) पण समजणार नाही.