मोंगलाई बिरयाणी

जागु's picture
जागु in पाककृती
27 Oct 2011 - 11:40 pm

साहित्य :
बासमती तांदूळ १ किलो
मटण किंवा चिकन १/२ किलो
दही ४०० ग्रॅम
अननस १ (गोल चकत्या करुन)
सुके आलू बुखार (७-८)
४-५ कांदे (उभे चिरुन)
बटाटे (उभे कापुन)
लवंग - १६
दालचिनी ८ तुकडे
तमालपत्र ८
वेलची १०
काळीमिरी १६
जिर १ चमचा
मिरची पावडर १ चमचा
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे
हिंग
हळद
मिठ
३-४ चमचे तेल
तुप
गव्हाचे पिठ (मळून)

पाककृती :
१) बिरयाणी करायला घ्यायच्या १ तास आधी तांदुळ धुवुन निथळत ठेवा.

२) चिकन किंवा मटण साफ करुन त्याला दही व वाटण चोळून १ तास मुरवा.

३) एका मोठा पातेल्यात तांदळाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उकळत ठेवा. त्यात मिठ, जिर, ४ वेलची, ४ मिरी, ४ लवंग, २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्र घाला. पाणी उकळले की त्यात तांदूळ टाका. ५-६ मिनीटांनी तांदूळ जरा अर्धवट शिजले की त्यातील अर्धे तांदूळ चाळणीत निथळवत ठेवावेत. नंतर अजुन ३-४ मिनीटांनी उरलेले शिजत आलेले तांदुळ दुसर्‍या चाळणीत निथळवत ठेवावेत.

४) एका भांड्यात तेल टाकून त्यात ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची, २ दालचीनीचे तुकडे, २ तमालपत्र घालून त्यावर कांदा बदामी रंगावर कुरकुरीत शिजवा. असा कांदा शिजवण्यासाठी तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त वापरावे.

५) मुरवलेल्या मटण्/चिकनला हिंग, हळद, मिरची पुड, ८ मिरी, ८ लवंगा, ४ वेलची, ४ दालचीनीचे तुकडे, ४ तमालपत्र, आलुबुखार, उभे चिरलेले बटाटे व २ चमचे तुप घालुन एकत्र करा.

६) बिरयाणी करण्यासाठी एक मोठे टोप घ्या. त्या टोपाला आतून तुप लावा. टोपात चिकनचे मिक्स केलेले मिश्रण पसरून घ्या. पसरलेल्या चिकन्/मटणवर तळलेला अर्धा कांदा टाका. त्यावर अननसाच्या चकत्या लावा.

७) चकत्यांच्या वर कच्चट तांदळांचा थर लावा व त्यावर थोडे तुप पसरवा.

८) राहिलेला अर्धा कांदा ह्या तांदळांवर पसरवा व शिजत आलेला भात ह्या थरावर लावा. परत थोडे तुप पसरवा.

९) टोपावर अगदी व्यवस्थित बसणारे झाकण लावा (हवा बाहेर गेली नाही पाहीजे असे). झाकण वसवून झाकण व टोप जोडणारी कडा गव्हाच्या मळलेल्या पिठाने गोलाकार घट्ट पॅक करा.

१०) टोप पातळ असल्यास पहीली १५ मिनीटे मोठ्या गॅसवर बिरीयाणीचे टोप ठेवा किंवा मिडियम गॅस वर टोप ठेवा मग अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर हे टोप ठेउन अर्धा ते पाऊण तास ही बिरयाणी शिजू द्या. जर निखारे असतील तर तेही झाकणावर ठेवल्यास बिरयाणी अजुन चांगली दम होते.

११) बिरयाणी तयार झाली की टोप गॅसवरुन उतरवून १० मिनिटे ठेवा. मग चमच्याने किंवा कालथ्याने गव्हाच्या पिठाचे आवरण काढा आणि झाकण उघडा. बिरयाणीचा वाफाळणारा दणदणीत वास घरभर पसरुन सगळ्यांना भुक लागेल. मग लगेच वाढायला घ्या. वाढताना मोठा कालथा थेट काली रोवून थरासकट बिरयाणी वाढा.

अर्धी झाली की.

१२) थोडी टेस्ट करा.

अधिक टिपा:
ही बिरयाणी रायत्यासोबत खावी.

ह्या बिरयाणीतील आलूबुखार लहान मुलांना विशेश आवडतात. माझ्या पुतण्याची व श्रावणीची त्या आलूबुखारांवर झुंबड असते.

अननस गोड लागतो थोडा पण भातात त्याची चव किंवा स्वाद मिक्स होत नाही. पण भाताबरोबर खायला चांगला लागतो.

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

28 Oct 2011 - 1:16 am | इंटरनेटस्नेही

_/\_

_/\_

_/\_

चित्रा's picture

28 Oct 2011 - 2:14 am | चित्रा

बिर्याणीची पाककृती फर्मास आहे.
अननस घालून करून बघते.

सुहास झेले's picture

28 Oct 2011 - 2:17 am | सुहास झेले

अहाहाहा..... खपलो _/\_

माझा आवडता खाद्य प्रकार.... जगातल्या कुठल्याही पदार्थाची तुलना मोंगलाई बिरयाणीसोबत होऊच शकत नाही :) :)

कच्ची कैरी's picture

28 Oct 2011 - 12:38 pm | कच्ची कैरी

दिवाळीचे गोड खाऊन कंटाळा आला होता बर वाटल एखादी तिखट पाकृ.वाचुन.

इंटरनेट स्नेही, चित्रा, सुहास, कैरी धन्यवाद.

जाई.'s picture

28 Oct 2011 - 1:25 pm | जाई.

झकास
तोँपासू

चिप्लुन्कर's picture

1 Nov 2011 - 3:47 pm | चिप्लुन्कर

दणदणीत भूक लागली आहे....... पण फोटोनी भागणार नाही ..

तों पा सु

खादाड's picture

3 Nov 2011 - 3:35 pm | खादाड

ताई पातेल्यात खाली बटाट्याच्या चकत्या ठेवल्यातर खाली अजीबात लागत नाहि आणि तव्यावर ठेउन केल्यास डबल सेफ्टी !!

Almonds , Cashewnuts कुठे आहेत ? Saffron अन दुधाचा ही पत्ता नाही .
तुम्ही जी काही छानशी पाकृदिली त्याबद्धल धन्यवाद पण या प्रकाराला बिरयानी म्हणत नाही
हि मोगलाई बिरयानी काय पण हि बिरयानीच नाही . :-(

शाहिर's picture

4 Nov 2011 - 10:57 am | शाहिर

हि मोगलाइ बिर्याणी नक्किच नाही ..
पण

प्रयत्न चांगला आहे . प्रेजेंटेशनही सुंदर !!

मला ही http://www.misalpav.com/node/1308 रेसिपी आवडली होती

वहिदा, शाहिर धन्यवाद. ही नसेल बिर्याणी पण आता आम्ही ह्याला बिर्याणीच म्हणतो. गेले १०-१५ वर्षापासून ही मला माहीत आहे. ह्याची रेसिपी एकदा रेडीओवर लागली होती. ती माझ्या एका वहीनीने लिहून घेतली. तेंव्हा रेडीओवर असेच नाव सांगितले होते.

रेसिपी एकदा रेडीओवर लागली होती. ती माझ्या एका वहीनीने लिहून घेतली. तेंव्हा रेडीओवर असेच नाव सांगितले होते.

सांगणारे हि धन्य अन ऐकणारे हि धन्य ! काय बोलणार ?

ही नसेल बिर्याणी पण आता आम्ही ह्याला बिर्याणीच म्हणतो.
चुकीच्या गोष्टींना योग्य म्हणायचे नसते. (अन खाण्याच्या संस्कृती बाबतीत तर अजीबात नाही ) असो बिर्याणी म्हणजे काय असते हे जाणून घेण्यासाठी मुंबईत असाल तर एकदा दिल्लीदरबार किंवा हॉटेल शालीमारला जरुर भेट द्या. फिर पता चलेगा बिर्यानी किस जायकेदार शय का नाम हैं ... :-)