किंगफिशरचे भवितव्य काय?

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
13 Nov 2011 - 1:19 pm
गाभा: 

किंगफिशर या विमान वाहतुक कंपनीने बराचश्या महत्वाच्या मार्गावरील आपलि विमान वाहतुक सेवा स्थगित केली आहे. कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय असून प्रचंड कर्जाच्या विळख्यात अडकली आहे.
माध्यमांच्या अनुसार सध्या किंगफिशर वर सुमारे ७००० कोटि रुपयांचे कर्ज आहे. अन भविष्यातही ते वाढत जाण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत सध्या शेअरबाजारात ह्या स्क्रिप्टचा भाव सुमारे १९ ते २० रुपयाच्या आसपास आहे.
व दिवसेंदिवस तो खाली घसरण्याची शक्यता आहे.

त्या अनुषंगाने काहि प्रश्न पडतात.

१. ह्या कंपनीचे भविष्य काय असेल?
२. किंगफिशर कंपनीला बेल आउट मिळायची शक्यता कितपत आहे?
३. भाव अजून खाली येण्याची शक्यता असल्याने हि स्क्रिप्ट खरेदी करावि काय? - सत्यम सारखी मोठी स्क्रिप्ट देखील खाली आली असताना ब-याच मंडळींनी कमी भावात खरेदि करुन भरपूर नफा कमावला होता.

प्रतिक्रिया

As per the airline's shareholding pattern as on September 30, 2011, the promoters have pledged 90.17 per cent of their holding. These shares are currently worth over Rs 500 crore.

ET

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2011 - 1:46 pm | अत्रुप्त आत्मा

किंगफिशरचे भवितव्य काय?.... टाइट होणार... ;-)

अविनाशकुलकर्णी's picture

13 Nov 2011 - 2:55 pm | अविनाशकुलकर्णी

मल्ल्याला बेल आउट द्या....
शेतकरी मरु द्या

Hrushikesh's picture

14 Nov 2011 - 10:14 pm | Hrushikesh

अविनाश,
मला वाटते कि, जर महाराष्ट्अतिल "जाणत्या साहेबाना" किन्ग फिशर मधे भागिदारि मिळालि तर नक्किच बेल आउट मिळेल.
लवासा ने नाहि आधि बान्ध्काम केले आणि मग परवानगि चे फाल्तु सोप्स्कार पार पाड्ले.
शेतकर्यच्या नशिबि फाशिचा दोरच येणार आणि मल्ल्य्अ अर्धनग्न तरुणि सोबत नाचकाम करणार.

गांधीजीचा चष्मा आणि ताट वाटी विकत घेतली ती भोवतेय हो विजय मल्ल्याला.
जीव अडकला असेल गांधींचा त्यात ;-)

जाई.'s picture

13 Nov 2011 - 3:49 pm | जाई.

_/\_

मोहनराव's picture

13 Nov 2011 - 5:06 pm | मोहनराव

जालावरुन साभार!!

आता बस ढोसत म्हणावं!!

सुनील's picture

13 Nov 2011 - 3:27 pm | सुनील

एअरलाईन बद्दल म्हणताय होय? मला वाटलं बियरबद्द्ल! :)

अन मला वाटले दिपीका पदुकोन बध्दल ! ;-)
भावी सासरेबुवा जर कर्जबाजारी झाले तर दिपीका पदुकोन चे पुढे काय ? अशी चर्चा आमच्या ऑफीसमध्ये ही हल्ली सुरु झाली आहे..

किंगफिश खायला आपल्या आवडत बुआ! ;)
दारू बिरू आपण काय पीत नाही आणि ईमनच प्रवास बी करत न्हायी.त्यामुळ आपल्याला कुठ फरक पडतोय?जरी किंफिषर बुडाली तरी दुसर्या आहेत न!
मला वाटल आपल्याला पक्षाची काळजी हाये! प्राणी मात्रावर प्रेम कराव अस न्हायी का वाटल तुम्हाला?

पैसा's picture

13 Nov 2011 - 4:50 pm | पैसा

त्यांच्या युनायटेड ब्रेवरीजचा जून-सप्टेंबर फायदा २१९१ लाख रुपये आहे. याच प्रमाणात वर्षभर असणार.
http://profit.ndtv.com/news/show/earnings-united-breweries-q2-net-profit...

अविनाशकुलकर्णी's picture

13 Nov 2011 - 5:00 pm | अविनाशकुलकर्णी

दीपिका जेव्हा युवराज सिंग कडे गेली तेव्हा त्याचा फोर्म गेला आणि त्याला भारतीय टीम मधून निघावे लागलेले

ती जेव्हा रणबीर कपूर कडे गेली तेव्हा रणबीर कपूर च्या फिल्म्स फ्लोप व्हायला लागल्या

आता ती मल्ल्या कडे आहे तर त्यांची किंगफिशर एयरलायींस कंपनी एकदम बंद पडायच्या लायकीला आली आहे

माहित नाही ती कॉंग्रेस मध्ये कधी जातेय ?:P :P :P :P
फेबु

ज्या राजेशाही पद्धतीने ती एअरलाइन चालवली जात होती त्यावरून असे होइल असे वाटले नव्हते.
म्हणजे माल्यांच्या दुसर्‍या बिजनेस मधला पैसा (नफा) इथे वापरला जाऊन 'बडेजाव' मिरवला जात असावा असे वाटत होते. पण अखेर 'बडा घर पोकळ वसा' निघाला म्हणायचा.

सद्य स्थितीत भारतात एअरलाइन इंडस्ट्रीचे फार भले होइल असे नाहे. त्यामुळे माल्याला आता किंगफिशर बीयरचाच आधार असेल असे वाटते.

किंगफिशरचे भवितव्य काय ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही पण भवितव्य चांगले व्हावे म्हणुन एक उपाय मात्र आहे.
चला कोण येतय किंगफिशर बीयरचा धंदा वाढवायला? :lol:

- (मोठ्या चोचीचा किंगफिशर) सोकाजी

ज्या राजेशाही पद्धतीने ती एअरलाइन चालवली जात होती त्यावरूनच असे वाटत होते असं म्हणू इच्छितो..

(बंद पडलेल्या एअरलाईन्सचा साक्षीदार) गवि

पिंकस्लिप होल्डरही... :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Nov 2011 - 8:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आयला, तुम्ही किंगफिशरात होतात ? एखादा फर्मास किस्सा असेल तिथला तर सांगा ना.
टीप :- किस्सा स्त्रीपात्र विरहित नसेल तर जास्त बरे ;-)

धमाल मुलगा's picture

13 Nov 2011 - 8:32 pm | धमाल मुलगा

ते 'बंद पडलेल्या' असं म्हणतायत म्हणजे बहुतेक 'सहारा' असेल.

किंगफ़िशरात नाय हो.दहा वर्षांपूर्वी अशीच हलाखीची लाट येऊन अनेक
ए.ला. धडाधड बंद पडल्या होत्या त्यातील एकीत होतो आणि पडझड अगदी स्टेप बाय स्टेप पाहिली होती.ही अत्यंत सेन्सिटिव्ह इंडस्ट्री आहे.एक आठवडा विना पॅसेंजर्स गेला तरी डबघाईला येण्याची वेळ असते.पांढरा हत्ती हो हा धंदा..

Nile's picture

14 Nov 2011 - 3:25 am | Nile

जगभरातल्या बहुतेक सगळ्या एअरलाईन्स लॉसमध्येच असतात*, हा धडा आम्हाला म्यानेजमेंटच्या कालेजात शिकवला गेला होता**. (पण तरी का चालवल्या जातात हा धडा मात्र सिलॅबसला ऑप्शनला होता)

*साउथवेस्ट सोडून. म्हणूनच वॉरन बफेने साउथवेस्ट मध्ये गुंतवणूक केली होती. (नंतर तिनेही लॉस दाखवले, हा भाग निराळा.)

**म्हणजे खराच असणार.

पाषाणभेद's picture

14 Nov 2011 - 4:08 am | पाषाणभेद

कोणतीही कंपनी सातत्याने प्रगतीपथावर असतेच असे नाही. त्यात ट्रेंड्स येणारच. एअरलाईन्समध्ये तो फार वेगात असावा. त्यात गळेकापू स्पर्धा, जागतीक राजकारण आदी फॅक्टर्स जास्त कारणीभुत असावेत. जाणकार विस्लेषण करतीलच.

Nile's picture

14 Nov 2011 - 6:51 am | Nile

कोणतीही कंपनी सातत्याने प्रगतीपथावर असतेच असे नाही.

लॉसमध्येच आणि 'नेहमी प्रगतीपथावर' हे परस्परविरोधी नाही. कोणता ट्रेंड? चढ-उतार आणि नेहमी लॉसमध्ये असणे हे वेगळे आहे.

Think airlines. Here a durable competitive advantage has proven elusive ever since the days of the Wright Brothers. Indeed, if a farsighted capitalist had been present at Kitty Hawk, he would have done his successors a huge favor by shooting Orville down.-Warren Buffett.

प्रदीप's picture

14 Nov 2011 - 6:26 pm | प्रदीप

जगभरातल्या बहुतेक सगळ्या एअरलाईन्स लॉसमध्येच असतात*,......
*साउथवेस्ट सोडून.

ह्या विधानात थोडेफार सत्य आहे पण साऊथवेस्ट ही अमेरिकन विमान कंपनी हा एकच अपवाद नाही. खरे तर साऊथवेस्ट ही ईकॉनॉमिकल एयरलाईन आहे, तिची गणना Mainstream (ह्याला मराठीत नक्की कसे संबोधायचे?)एयरलाईनींत करू नये.

Mainstream एयरलाईन्समधील विशेषतः आशियातील अनेक कंपन्या (उदा. कॅथे पॅसिफिक, ANA, सिंगापूर एयरलाईन्स, चायहा एयरलाईन्स, चायना ईस्टर्न, एतिहाद, एमिरेट्स अशांसारख्या काही कंपन्या) सर्वसाधारणपणे प्रॉफिटमधे असतात (सर्वसाधारणपणे अशासाठी म्हटले की काही क्वार्ट्र्समधे, तर कधीकधी काही वर्षांमधे ह्यातील काही तोट्यातही असतात, विशेषत: २००८ च्या फायनॅन्शियल क्रायसिसपासून ह्यातील वोलॅटॅलिटी वाढलेली आहे, (मुख्यत्वे तेलभावांमुळे व त्यातील हेजिंगमुळे).

आणी ईकॉनॉमिकल विमानसेवा कंपन्यात एयर आशिया ही अग्रेसर आहे, रायनएयरचेही बरे चालले आहे. साऊथवेस्टची गणना ह्या कॅटेगरीमधे व्हावी.

किस्सा स्त्रीपात्र विरहित नसेल तर जास्त बरे Wink

किंगफिशरचा किस्सा (पक्षी: माल्ल्याचा) स्त्रीपात्र विरहित असूच श़कत नाही तरी चिंता नसावी. :)

- (किंगफिशरच्या स्त्रीपात्रांच्या आठवणीत गेलेला ) सोकाजी

किंगफिशर एअरलाईन ने अगदी थोड्या कालावधीत Aviation Industry मधील मार्केट छानपैकी काबीज केले होते.

Total Aggressive Prerformance worth to take note of..

They were the Major Players in the Luxury Airline segments.

मला वाटते २००५ ला ते Aviation Industry मध्ये आले अन २००७ ला त्यांनी एअर डेक्कन विकत घेतली होती की मर्ज केली होती.

विजय मालया हे त्यांचे वडिल विठ्ठल मालया एवढे कर्तबगार नसतील ही
(In 1947, at the age of 22, Vittal Mallya was elected as United Breweries' first Indian director. After a year, he replaced R.G.N.Price as the chairman of the company.)
पण विजय यांची प्रगती ही वाखाणण्याजोगी नक्कीच होती.

सध्या पूर्ण Aviation Industry लाच अवकळा आली आहे तेव्हा किंगफिशर ला याचे फटके बसणे अपरिहार्यच आहे. जर किंगफिशरने Luxury Airline segments मधून बाहेर पडून साधी सर्विसेस दिली तर भवितव्य कदाचित सुधारेल.

अन्या दातार's picture

13 Nov 2011 - 8:42 pm | अन्या दातार

>>जर किंगफिशरने Luxury Airline segments मधून बाहेर पडून साधी सर्विसेस दिली तर भवितव्य कदाचित सुधारेल.

केवळ अशक्य. आजमितीस किंगफिशरसारखी सेवा (Luxury) कोणीही देत नाही. किंबहुना तोच त्यांचा युएसपी आहे

धमाल मुलगा's picture

13 Nov 2011 - 7:13 pm | धमाल मुलगा

विजय मल्ल्या मोठा हिकमती माणूस आहे. उलट्यासुलट्या खेळी खेळून बरोब्बर मार्ग काढेलच. बर्‍याच धंद्यांमध्ये दिवाळखोरी जाहीर करणे/सरकारी-इतर मदत मागणे ह्या गोष्टी कित्येकदा केवळ खर्च पेलवत नाही हा मुद्दा नसून इतर आर्थिक बाबींमधून सुटका करुन घेण्यासाठी केली जाते. इथे तशी परिस्थिती आहे की नाही ते ठाऊक नाही, पण हा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.

मल्याने किंगफिशरला भारतीय विमानवाहतूकीमध्ये सर्वोच्च स्थानावर नेले आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा कंपनीला मदत करायला सरकारने नकार दिलाच तर, इतर -विशेषतः परकीय कंपन्या ह्या निमित्ताने भारतीय विमान बाजारपेठेत चंचूप्रवेश करु शकतील. आणि मल्या नक्कीच त्यासाठी खटपट करेल. तशी परवानगी नसेल तर इतर मार्ग शोधले जातील (उदा. परकीय विमान कंपनीची भारतात भारतीय कंपनी म्हणून शाखा उघडणे किंवा असेच काहीतरी). आज भारतीय बाजारपेठ मिळवण्यासाठी बर्‍याच परकीय कंपन्या प्रयत्नांची शर्थ करताना दिसताहेत, त्यांच्यापैकी विमान वाहतुकीशी संबंधीत असलेल्या कंपन्यांना ही सोनेरी संधी ठरेल.

अवांतरः किंगफिशर एअरलाइन्सने डब्यात गेलेली डेक्कन एअरलाइन्स विकत घेतली, ती चालवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. त्याचं तर हे ओझं नसेल ना? अशी शंका येते.

अतिअवांतरः अभ्या, "माध्यमांच्या अनुसार" ह्याऐवजी "माध्यमांच्या चर्चेनुसार्/बातमीनुसार" हे अंमळ जास्त मराठी वाटते. ;)

ही वेळ साधून वडील मुलाला धंदे की बात शिकवतील.
नाहीतरी नुसतेच मुली फिरवायला पैसे द्यायचे काय? काम कर म्हणेल मुलाला.
फार काही होणार नाही. मार्ग काढल्याशिवाय राहणार आहे का तो बुवा?
असे प्रकार मल्ल्यासाठी काही नवीन नसतील. तशी वेळ आलीच तर कोणाला किंवा कोणाकोणाला हाताशी धरायचे हे माहीत असेलच.

शाहिर's picture

13 Nov 2011 - 11:56 pm | शाहिर

वीकांताला २ किंगफिशर पिउन मदत केलि गेल्या आहे ..

सर्व किंगफिशर प्रेमींनी मदतीचा ग्लास पुढे करावा ही विनंती

श्रीरंग's picture

14 Nov 2011 - 12:07 am | श्रीरंग

बी.पी.सी.एल चे १३०० कोटी थकव्लेस ते दे आधी म्हणाव.
नुकसान सोसत नाही म्हणून तेल कंपन्या आमचे पेट्रोल महाग करतायत.

इंटरनेटस्नेही's picture

14 Nov 2011 - 12:25 am | इंटरनेटस्नेही

मी किंगफिशर वरुन कार्ल्सबर्गवर शिफ्ट झालो त्याचा तर हा परिणाम नसेल?

तेंच्यावाल्या हवाईसुंद्र्या आता कोनत्या इमाइन कंपन्यात जात्याल?

आत्मशून्य's picture

14 Nov 2011 - 5:55 am | आत्मशून्य

शेअरबाजारात ह्या स्क्रिप्टचा भाव सुमारे १९ ते २० आहे.

कोणी अभ्यासक यावर एखादा लेख लिहील काय ? जर का भाव अजून खाली जाणार असेल तर मला मोठी गूतवणूक केवळ याच शेअरमधे करण्याची उत्सूकता आहे. कारण होय सत्यम ने फार भलं केलं माझं, रोजच्या १० पेक्षाही जास्त तास काम करायच्या गरजेतून मोकळ केलं मला(अर्थात कॉग्रेसवाल्यांना हे पहावलं नाही म्हणून त्यांनी महागाइ भडकवली हा वेगळा मूद्दा आहे). लोकांना सत्यमवर खेळलेला जूगार हा जॅकपॉट वाटला पण माझ्यासाठी ती कॅक्यूलेटेड रीस्क होती कारण ऐटीतले सगळे इन्स्/आऊट उलगडणारे तज्ञ लोक्स सोबतीला होते. पण एअरलाइनचं काही कळत नाही, त्यातच यूरोपही गडगडतोय अशा परीस्थीती या एअरलान्सच्या शेअर्सवर रिस्क कितपत घ्यावी ? जर मी सरासरी १५-२० (अथवा कमी) रूपये प्रतीशेअरने माझ्या कूवतीनूसार खरेदी केली तर येत्या १-२ वर्षात कीमान भाव कितपत असेल ?

किंग फिशरमध्ये गुंतवा... ( म्हणजे सत्यममध्ये मिळालेले जातील..)

निखिल देशपांडे's picture

14 Nov 2011 - 9:30 am | निखिल देशपांडे

किंगफिशरच्या फॉलाउट च्या मागे आर. एस. एस चा हात आहे.
किंगफिशरच्या फॉलाउट साठी अमेरीका कारणीभुत आहे.
भारतिय विमान वाहतुक क्षेत्रात परकिय थेट गुंतवणुकीसाठी रस्ता खुला करण्यासाठी काँग्रेस सरकारने रचलेला हा डाव आहे.

पैसा's picture

14 Nov 2011 - 11:27 am | पैसा

म्हणजे मल्ल्या सोडून इतर सर्वांचाच हात आहे म्हणा की!

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 11:30 am | मदनबाण

खी खी खी !
माल्या यांनी अण्णांची भेट घ्यावी ! ;) राखी सावंत पण घेणार होती म्हणे ! ;)

चिरोटा's picture

14 Nov 2011 - 11:55 am | चिरोटा

राहूल बजाज बेलआउट द्यायच्या विरोधात आहेत. शेतकर्‍यांना सबसिडी,मदत दिल्यावर मिडिया अर्थपंडित चिडतात. सरकारने मधे पडू नये म्हणतात. आता त्यांचे तोंड बंद आहे.
मी वर्षाचे ३६५ दिवस काम करतो.सगळ्या हवाई सुंदर्‍यांच्या मुलाखती मीच घेतो म्हणणार्‍या मल्ल्या यांचे गर्वाचे घर खाली आले आहे. बेंगळूरमध्ये प्रेस्टिज बिल्डरबरोबर भागीदारीत असलेले ७२ फ्लॅट्स आता भाड्याने देत आहेत. वडिलोपार्जित ईस्टेटही आता विकायच्या तयारीत आहेत. थोडक्यात टायसूट घालून हातात भीक्षापात्र आहे.
मुक्त आर्थिकव्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते मनमोहन ह्यांना अचानक किंगफिशरच्या प्रेमाचे भरते का आले कळत नाही.
स्वखर्चाने राजेशाही हवाई प्रवासखर्च करणार्‍यांची संख्या निश्चितच रोडावली असावी. मुंबई-दिल्ली प्रवासाला ईतर विमान कंपन्या सरासरी ३,००० रुपये आकारत असताना किंगफिशरचे भाडे ८ ते ९ हजारात असायचे.असे असले तरीही आमच्या सीटस भरलेल्या असतात असे अभिमानाने सांगितले जायचे.
वर म्हंटल्याप्रमाणे विमान कंपनी चालवणे ही कसरत असते. ती फायद्यात चालवणे हे तर त्याहून कठिण. ह्या धंद्यासाठी लागणारे basic material म्हणजे विमान. त्याची किंमतच २००/३०० कोटींच्या घरात असते.हवामान्,सरकारी धोरणे,राज्य/केंद्र सरकारचे कर ह्यागोष्टी काही अंशानी जरी बदलल्या तरी ह्यांच्या नफा तोट्यात काही लाख/कोटींचा फरक एका दिवसात पडतो.

प्रदीप's picture

14 Nov 2011 - 7:25 pm | प्रदीप

वडिलोपार्जित ईस्टेटही आता विकायच्या तयारीत आहेत. थोडक्यात टायसूट घालून हातात भीक्षापात्र आहे.

मल्या ही व्यक्ति व किंगफिशर एयरलाईन्स ही कंपनी ह्या दोन भिन्न entities आहेत,

मुक्त आर्थिकव्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते मनमोहन ह्यांना अचानक किंगफिशरच्या प्रेमाचे भरते का आले कळत नाही

एक मोठे आस्थापन बंद पडत असेल तर सरकारने त्यास कामकाज सुरू ठेवण्यासाठी काही मदत करणे हे साहजिक आहे. कारण अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न ह्यात गुंतलेला असतो. मुक्त अर्थव्यवस्था असल्याने सरकारने अशा कंपनीस स्वतः उचल द्यावी अथवा स्वतःच्या अधिकारात, तसे करण्यास कुठल्याही बँकेस वगैरे भाग पाडावे हे चुकीचे आहे आणि तसे काही सरकारने केल्याचे दिसत नाही.

ह्या धंद्यासाठी लागणारे basic material म्हणजे विमान. त्याची किंमतच २००/३०० कोटींच्या घरात असते

बहुतेक सर्व कंपन्या विमाने लीजवर घेतात. विमाने स्वतः विकत घेऊन ती विमान वाहतूक कंपन्यांना लीजवर देणे हाच काही कंपन्यांचा धंदा आहे. अजून दोन गोष्टी लक्षात घेणे जरूरीचे आहे. ह्या ज्या किंमते जाहीर केल्या जातात त्या लिस्ट प्राईसेस असतात, प्रत्यक्ष विक्री किंमत बर्‍यापैकी डिस्काउंटेड असते. दुसरी स्वतः जरी विमान विकत घेतले तरी त्याची सर्व किंमत एकरकमी द्यावी लागत नाही.

वाहीदा's picture

14 Nov 2011 - 10:21 pm | वाहीदा

माल्या सारख्या प्रायव्हेट कंपनीच्या मालकाने - बड्या मात्तबराने स्वतःच्या चैनी करायच्या अन मग कंपनी दिवाळखोर निघाली की सरकारकडे बेलआऊट मागायचे हे कितपत योग्य आहे ? मला तर हे काही तरी षडयंत्रच आहे असे आता जाणवायला लागले आहे.

सामान्य माणसाला येथे महागाईने ग्रासले आहे अन या अय्याश (मराठी ? ) लोकांचे चोचले सरकारने का बरे पुरवायचे ? सरकारला इंडियन एअरलाईन्स अन एअर इंडियाचे प्रश्न नाही आहेत का सोडवायला ?

सरकार बेलआऊट नक्कीच देणार नाही . पण किंगफिशर ची नीटसर चौकशी का बरे होत नाही ?
त्यांना ज्या कंपनीनी विमाने लिजआउट केली होती ते ही त्यांना ती आता परत मागत आहेत.

असो, जाणकार प्रकाश टाकतीलच !

प्रदीप's picture

15 Nov 2011 - 7:18 pm | प्रदीप

प्रथम हे मान्य करूया की किंगफिशर एयरलाईन्स 'प्रायव्हेट कंपनी' नाही, ती पब्लिक कंपनी आहे, तिचे समभाग स्टॉक एक्श्चेंजवर विकले- खरीदले जातात, तेव्हा त्यांचे व्यवहार गुलदस्त्यात नाहीत, ते जाहीर आहेत.

बड्या मात्तबराने स्वतःच्या चैनी करायच्या अन मग कंपनी दिवाळखोर निघाली की सरकारकडे बेलआऊट मागायचे हे कितपत योग्य आहे

माझ्या ज्या प्रतिसादास आपण उत्तर देत आहात, त्यात मी म्हटले होते तेच पुन्हा इथे लिहीतो: मल्या व किंगफिशर ह्या दोन भिन्न entities आहेत.

बेलाअऊटः म्हणजे नक्की काय हे मला अद्याप समजलेले नाही,. मी स्वतः गेले अनेक वर्षे भारतात रहात नसल्याने ही संकल्पना मला ठाऊक नाही. (बाहेरील जगातही अनेक ठिकाणी -- आणि मी well regulated जागांबद्दल सांगतो आहे--- अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या रहातात, त्याला अनेक बरीवाईट कारणे असतात. काही ठिकाणांत अशा वेळी काही कायद्यांच्या तरतूदींना अनुसरून काही काळ, व काही विशीष्ट शर्तींवर, कंपनीस देणेकर्‍यांपासूब्न 'बचाव' करता येणे शक्य असते. ह्या काळात सदर कंपनीने रेग्युलेटर्सना मान्य अशा तर्‍हेने पुनर्बांधणी करून स्वतःला सावरता येणे शक्य असते. अशा संकटांतून कंपन्या बाहेर सुखरूप पडतातही.. उदा. यूनायटेड एयरलाईन्स्ने काही वर्षांपूर्वी चॅप्टर ८ खाली दिवाळखोरी जाहीर केली होती, त्यातून ते बाहेर आले आहेत. सांगायचा मुद्दा, पब्लिक कंपन्यांची दिवाळखोरी आपल्याला भारतात नवीन असावी, तेव्हा आपण टोकाच्या भूमिका घेतो). तर बहुधा 'बेलाअऊट' म्हणजे सरकारने आता पैशाची मदत करावी अशी विनंति असावी. तसे ह्या कंपनीने म्हटल्याचे कुठेही माझ्या वाचनात आलेले नाही. का ही टर्म काही वर्तमानपत्रे बेजबाबदारीने वापरत आहेत?

मला तर हे काही तरी षडयंत्रच आहे असे आता जाणवायला लागले आहे.

हे अगदी टोकाचे झाले. आता (अ) एयरलाईन्सचा धंदा मुळात बुडितच असतो (ब) हे माहित असूनही काही conglomerates त्या उद्योगात मुद्दाम पडतात तो (क) स्वतःचा नफा मुद्दाम कमी दर्शवण्यास... असे काही असू शकेल का, ह्याची मला कल्पना नाही. तूर्तास तरी आपण त्यांना (जोंवर ह्याविषयी कुणाला काही ठोस माहिती नाही तोंवर) बेनेफिट ऑफ डाऊट देणे चांगले, नाही का?

किंगफिशर ची नीटसर चौकशी का बरे होत नाही ?

अजून कंपनीने दिवाळखोरी जाहीर केलेली नाही. तसे झाल्यास, व त्यातून सुटकेचा मार्ग आपल्या येथे नसल्यास त्यांची चौकशी होईलच. सध्या त्यांची थकबाकी बरीच झालेली आहे, सप्लायर्स व लीजदार त्यांना अजून मुभा देण्यास तयार नाहीत,. तेव्हा ते बँकांशी लोन्स रिस्ट्रक्चरींग करण्यासाठी निगोशिएट करताहेत. ह्या परिस्थितीत चौकशी का व्हावी?

येथे ह्या केसविषयी, तसेच इतर भारतीय विमान वाहतूक कंपन्यांच्या सध्याच्या परिस्थितीवीषयी चांगली माहिती दिलेली आहे.

http://tinyurl.com/co4u5un

ता.क. : 'बेलआऊट' विषयी आताच्या हिंदुस्तान टाईम्सवरूनः "Facing all-round attack from political parties which are opposing any bailout for his airline, Mallya said, "We have not asked for any bailout from government. We have not asked the government to dip into the taxpayers' money. We have never done it, we will never do it."

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 12:09 pm | मदनबाण

मी वर्षाचे ३६५ दिवस काम करतो.सगळ्या हवाई सुंदर्‍यांच्या मुलाखती मीच घेतो म्हणणार्‍या मल्ल्या यांचे गर्वाचे घर खाली आले आहे.

अरेरे होतकरु सुंदर्‍यांना आता मुलाखीतीत फेसळाणारे प्रश्नांना सामोरे जायची संधी मिळणार नाही तर !

थोडक्यात टायसूट घालून हातात भीक्षापात्र आहे.

वा. काय वर्णन केलय ! ;) मद्य सम्राट असेच समोर पाहतोय असं वाटुन गेलं. ;)

राज्य/केंद्र सरकारचे कर ह्यागोष्टी काही अंशानी जरी बदलल्या तरी ह्यांच्या नफा तोट्यात काही लाख/कोटींचा फरक एका दिवसात पडतो.

सहमत... शिवाय विमान इंधनाच्या किमतीचा फटका सोबतीला असतोच...

मृत्युन्जय's picture

14 Nov 2011 - 12:10 pm | मृत्युन्जय

किंगफिशर डुबली यात काही विशेष वाटत नाही. भारतातील कैक बड्या कंपन्या डुबल्या तरी काही विशेष वाटणार नाही. मुळात एक गोष्ट कोणी विचारातच घेत नाही की भारतातील मोठ्या कंपन्यांमधील किती कंपन्यांकडे प्रॉमिसिंग बिझिनेस मॉडेल किंबा बिझिनेस प्लॅन आह? किती लोकांकडे मोठ्या रकमेची कर्जे जस्टिफाय करण्याएवढा चांगला असेट बेस आहे?

कित्येक बड्या कंपन्यांचे शेयर्सचे भाव जस्टिफाय नाही करता येणार. बर्‍याच कंपन्याचा बिझिनेस काय, त्यांचा बिझिनेस प्लॅन का, त्यांचे प्रॉडक्ट काय, त्यांची टॉपलाइन, बॉटमलाइन, एबिट्टा, प्रॉफिट मार्जिन्स काहीही माहिती नसताना केवळ नावामुळे त्या कंपन्यांमध्ये इन्वेस्टमेंट केली जाते. काहीवेळेस इनॉर्गॅनिकली भाव वाढवले जातात आणी सामान्य गुंतवबुकदार या सगळ्या भुलभुलैय्याला बळी पडतो.

कितीतरी बड्या कंपन्यांकडे आहच्या घडीला योग्य बिझिनेस प्लॅन नाही किंवा योग्य ते प्रॉडक्टही नाही किंवा योग्यसा असेट बेसदेखील नाही. या कंपन्या आज ना उद्या डुबणार. त्यामुळे आज लॉस फंडिंग करणार्‍या कंपन्यांचे इंडस्ट्री मार्जिन्स चेक करावेत आणि त्याच्या प्रॉडक्ट्सचा आवाका लक्षात घ्यावा आणि मगच गुंतवणुक करावी. ही माहिती मिळवणे जर शक्य नसेल तर या खेळापासुन चार हात लांब रहावे.

विनायक प्रभू's picture

14 Nov 2011 - 12:18 pm | विनायक प्रभू

आता ह्या पुढे क्यालेंडर काढणार नाहीत.
तेवढीच बचत.

चिरोटा's picture

14 Nov 2011 - 1:08 pm | चिरोटा

आता जुनीच क्यालेंडरे 'बघायची' आणि हौस भागवायची.

विजुभाऊ's picture

14 Nov 2011 - 2:45 pm | विजुभाऊ

सध्या पूर्ण Aviation Industry लाच अवकळा आली आहे तेव्हा किंगफिशर ला याचे फटके बसणे अपरिहार्यच आहे. जर किंगफिशरने Luxury Airline segments मधून बाहेर पडून साधी सर्विसेस दिली तर भवितव्य कदाचित सुधारेल.

किंगफिशर ची सर्विस नेहमीच चांगली राहिली आहे. विमानात बसल्याचा मनस्ताप कधीच झाला नाही. ( स्पाईसजेट मध्ये बसल्यावर बस मध्ये बसल्याचा अनुभव यायचा तसे इथे होत नाही.
भरतात सध्यातरी फ्लाईट्स रिकाम्याजाणे असा अनुभव येत नाही. त्यामुळे किंगफिशर डबघाईस का आली याचे कारण्तेच सांगु शकतील.
किंगफिशर ने दिवाळे काढले तर मात्र आयसीआयसीआय आणि स्टेट बँक याना बराच मोठा फटका बसेल. त्याचापरीणाम बँकांचे व्याजाचे दर वाढण्यात आणि होइल पर्यायाने सर्वच बाबतीत भाववाढ होईल.
अर्थात हे एकट्या किंगफिशर मुळे होईल असे नव्हे. परंतु स्नोबॉल इफेक्ट मुळे हे घडू शकेल.
रीयल इस्टेट वर याचा परीणाम सर्वात शेवटी होईल.
थोडक्यात हे भारतातील मिनी सबप्राइंम आहे असे म्हणायला हरकत नसावी.

धमाल मुलगा's picture

14 Nov 2011 - 3:20 pm | धमाल मुलगा

भाऊ,
संबंध कळाला नाही. जरा इस्काटून सांगा की.

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 3:43 pm | मदनबाण

हेच विचारायचे होते.

भारी समर्थ's picture

14 Nov 2011 - 4:10 pm | भारी समर्थ

ओ भौ, कुणीकडं काड्ली म्हणायची सवारी?
त्या आयशीआश्यायचं (दुसर्‍या तिमाहीतील नि.न.- १५०० कोटी) आन श्टेट (दुसर्‍या तिमाहीतील नि.न.- २८१० कोटी) ब्यॅंकेचं किंगफिशर येरलाईनीत येक्स्पोजर किती है म्हणायचं?
या ब्यांकांच्या टोटल यॅसेटच्या नक्की किती पर्संटेज ही येक्स्पोज्रं आसतील बरं?
बाकी, स्पाईस, इंडिगो आन बर्‍याचशा चार्टर कंपन्या तर खर्च वजा जाता नफ्यात हैत जणू... मग कायचा स्नोबॉल?
तुम तो वो श-रद्द उपाध्येभौसेभी सवाई भविष्यवेत्ता निकले राव...लेकिन वो चच्चाभी ग्रहोंके कॅल्कुलेशन लिये बिना कुच नै बोल्ता....रियल इश्टेटका मिनी सबप्राइम क्यॅल्कुलेशन तुमने किदरसे निकाल्या खावंद?

भारी समर्थ
चु.भू.दे.घे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Nov 2011 - 5:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आडनाव बदलून पवार ठेवलेत की काय हो विजुभाऊ ?
तेच मध्ये अशी भविष्ये सांगून भाववाढ आणि मार्केट वरखाली करायचे. :-)

(वादावादी... आपलं....राष्ट्रवादी) विमे

आडनाव बदलून पवार ठेवलेत की काय हो विजुभाऊ ?

खिक्क ! ख्या खी खी खी... खपलो ! ;)

विजुभाऊ's picture

14 Nov 2011 - 6:03 pm | विजुभाऊ

अहो तसे नाही. मी किम्गफिशर ने दिवाळे काढले तर काय होईल असे म्हणत आहे.

किंगफिशर ची स्टेट ब्यांककडे अन आयसी आय कडे १४ बिलीयन रुपये देणे आहे
( http://online.wsj.com/article/SB1000142405297020432390457703718019388528... )
हे पैसे त्यानी एअर डेक्कन घेताना गुंतवले होते. दोन्ही ब्यांकांचे हात दगडाखाली घट्ट अडकले आहेत.
ब्यांकानी अगोदरच किम्गफिशर ला बाजारातून पैशे उभे करायला सांगितले आहेत साधारण ८ बिलीयन रुपये..
ह्या ब्यांका बुडीत पैसे सामान्य ग्राहकांकडूनच वसूल करणार. त्याचबरोबर इतके पैसे अनुपलब्ध झाल्याने सर्वसामान्याना कर्जे महाग होतील.
त्याच बरोबर किम्गफिशर ला तेलकंपन्याना देणे बाकी आहे . समजा किम्गफिशर बुडीत गेली तर हा बुडीत व्यापार तेल कंपन्या सामन्य ग्राहकांकडूनच वसूल करणार.
शेअर बाजार अगोदरच अत्यंत दोलायमान अवस्थेत आहे. तशातच किंग फिशरमध्ये मुम्बै शेअर बाजारात बँका आणि वित्तीय संस्थांचे मिळून साधारण २३ टक्के भाग आहे.
अर्थात त्यामुळे शेअरबाजारात खेळत्या भांडवलाची तंचाई होइल. त्याचा परीणाम आर्थीक बाजार घसरण्यावर होईल.
अर्थात सब प्राईम मुळे झाले तेवढे नुकसान होणार नाही. म्हणूनच मिनी सब प्राईम असे म्हणालो आहे.
याचा फायदा अर्थातच ज्याच्या दीर्घ ( समान्यतः दीड वर्ष) गुंतवनूकीसाठी हातात खेळते भांडवल आहे त्यानाच होईल.
मी आडनाव किंवा व्यवसाय काहिही बदलले नाही.
जर असे झाले तर काय होउ शकेल एवढेच माझ्या अत्यल्पमति ला कळेल एवढे लिहिले आहे.
( फेब्रूवारी २०१२ मध्ये मार्केट अत्यंत इम्टरेस्टिंग अवस्थेत असेल हे मात्र नक्की )

वाहीदा's picture

14 Nov 2011 - 6:49 pm | वाहीदा

जर एखाद्या व्यापारसंकूलाने / उद्योगसमुहाने / व्यक्तीने दिवाळखोरी जाहीर केली की पाटी पूर्ण नवि कोरी करकरीत करता येते का ?
अन फक्त त्यांना या पुढे कर्ज मागण्यास त्रास होईल इतकेच पण त्यांचे ऐसेटस जाणार नाहीत
As a Debtor, you are even permitted to retain some of your assets to help you begin your new life.

This allows the debtor to climb out of a financial hole, and move on with a clean slate, which is sometimes more economically efficient than requiring the debtor to pay off everything they owe.

bankruptcy makes it very difficult for the debtor to obtain credit in the near future.

असे आज समजले ,
मग असे असेल तर दिवाळखोरी जाहीर करणे हि माल्यांची चाल तर नाही ना ? अन त्याचा बुरदंड सर्व सामान्यांना ??

प्रदीप's picture

15 Nov 2011 - 7:15 pm | प्रदीप

किंगफिशरचे स्टेट बँक व आय. सी. आय. सी. आय. ह्या दोघांकडे मिळून १४ बिलीयन देणे आहे, ते त्यांच्या एकंदरीत दिलेल्या कर्जांपैकी किती टक्के आहे ह्याची माहिती असती तर त्याच्या इंपॅक्टचा अंदाज आला असता. पण ते ह्यांपैकी प्रत्येक बँकेच्या दिलेल्या एकंदरीत कर्जाचा फार भाग असेल असे वाटत नाही. कारण तसे जर असले तर त्या बँकेचे रिस्क मॅनेजमेंट साफ फसले आहे असे म्हणावे लागेल.

आणि समजा यदाकदाचित हे सगळे कर्ज बुडालेच, तर त्या बँका हे पैसे त्यांच्या इतर ग्राहकांकडून वसूल करतील ह्या विधानात, त्यांना इतर बँकांची असलेली काँपिटिशन लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यांनी जर त्यांच्या ग्राहकांना ह्यापूढे देऊ केलेल्या कर्जांचे व्याजदर वाढवले, तर अर्थात ग्राहक इतरस्त्र जातील. तेव्हा तसे टोकाचे काही होण्याची शक्यता कमी.

मुळात, किंगफिशर एयरलाईन्स आता बुडेल व ह्या बँकांनी दिलेली सर्व कर्जे बुडतील हेच थोडे असंभव वाटते. अशा परिस्थितीत आता जे सुरू आहे, त्याप्रमाणेच कंपनी व बॅंका ह्यांच्यात वाटाघाटी होतील. त्यात कंपनीस स्वतः (बहुधा त्यांच्या पेरेंट कंपनीकडून) कॅश इंजेक्ट करण्यास बँका प्रथम उद्युक्त करतील. तसे कंपनीने मान्य केल्यास पुढे त्या डेट रिस्ट्रक्चरींग करतील. कंपनीही सरकारकडून काही सवलती मागेल. उदा. (अन्यत्र गविंनी लिलील्याप्रमाणे) तोट्याचे रूट्स बंद, किंवा कमी सर्व्हिसेबल करण्याची परवानगी.

पैसा's picture

15 Nov 2011 - 7:39 pm | पैसा

बँकाना रिस्क मॅनेज करताना कोणत्याही एका कंपनीला किंवा क्षेत्राला किती प्रमाणात कर्जे द्यावीत यावर बंधने असतात. म्हणजेच अशा कर्जाची जास्तीत जास्त टक्केवारी ठरलेली असते. ३१/०३/२०११ ला स्टेट बँकेची एकूण कर्जे ३५२ बिलियन डॉलर्स होती. म्हणजे यात किंगफिशरचा वाटा किती असेल तुम्ही सहजच काढू शकता.

याशिवाय अशी कर्जे मोठ्या प्रमाणात तारण आणि डायरेक्टर्सची व्यक्तिगत हमी घेऊनच दिली जातात. आता जरी स्टेट बँक आणि आयसीआयसीआय यांची नावं आली असली तरी त्यात इतर अनेक बँका सहभागी असतात. अशा सामायिक पद्धतीने दिलेल्या कर्जाना तारण सामायिक असते. १००% वेळा कर्जाच्या निदान २५% जास्त किंमतीचे तारण घेतलेले असते. शिवाय बॅलन्स शीट तयार करताना अगदी उत्तम स्थितीत असलेल्या कर्जांसाठीही काही प्रमाणात नफ्यातला भाग प्रोव्हिजन म्हणून ठेवलेला असतो.

तेव्हा स्टेट बँक किंवा ICICI या कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातील अशी भीती बाळगायचं काहीही कारण नाही. या वर्षीच्या नफ्यावर काही प्रमाणात परिणाम होईल, पण बँका बुडण्याची सुतराम शक्यता नाही.

प्रदीप's picture

15 Nov 2011 - 8:40 pm | प्रदीप

धन्यवाद. मला जे म्हणायचे होते तेच तुम्ही व्यवस्थित (specific) माहिती देत, व नेमक्या शब्दांत सांगितले आहे.

प्रोव्हिजनः भारतीय बँका सर्वसाधारणपणे चांगल्या दर्जाच्या समजल्या जातात. अलिकडेच S & P ने भारतीय बँकांचे रेटिंग एका नॉचने वाढवले. (त्याचवेळी मूडीजने ते एका नॉचने कमी केले!)

जर एखाद्या व्यापारसंकूलाने / उद्योगसमुहाने / व्यक्तीने दिवाळखोरी जाहीर केली की पाटी पूर्ण नवि कोरी करकरीत करता येते का ?अन फक्त त्यांना या पुढे कर्ज मागण्यास त्रास होईल इतकेच पण त्यांचे ऐसेटस जाणार नाहीत

भारतात एखाद्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर करणे इतके सोपे नाही. त्यामुळे ऐवजी कंपनीने गाशा गुम्डाळणे/पळुन जाणे प्रीफर केले जाते.
व्यक्तीने दिवाळखोरी जाहीर करणे याची उदाहरणे देखेल तशी कमीच आहेत ( उदा: हर्षद मेहता) परम्तु व्यक्तीने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर त्याच्या नावे असलेली सर्व मालमत्ता विकली जाते. तसेच त्या दिवाळखोरीत गेलेल्या व्यक्तीचे राजकीय अधिकारांवर मर्यादा येतात.
भारतात कम्पनीची दिवाळखोरी हा प्रकार मात्र भारतात कधी घडला नसावा असेच वाटते. मुम्बईत इतक्या गिरण्या बंद पडल्या पण कोणत्याही कंपनीने दिवळखोरी जाहीर केली नाही. कदाचित त्यामुळेच गंजत का होईना त्यांच्या अ‍ॅसेट्स अजूनही तेथेच आहेत. तसेच त्यांचे प्रमोटर्स( मालक) ऐटीत रहातात.

आयला,एअरलाईन कंपन्या नेहमीच तोट्यात असतात म्हणजे काय?
अशा परिस्थितीत मग ते व्यवसाय तरी कशाला करतात?
२०० च्या आसपास प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या विमानाचे प्रति आसन सरासरी भाडे जरी
सहा हजार रुपये पकडले तरी एका विमानाने एक जरी भाडे मारले तरी कंडक्टरच्या गल्यात सुमारे बारा लाख रुपये गोळा होतात. हेच विमान दिवसाकाठी किमान चार ते पाच भाडी मारत असेलच. किमान चाळिस एक लाखाचा गल्ला दिवसाकाठी जमा होतच असणार. अर्थात ह्यात टॅक्स,इंधन, विमानतळाचे भाडे व इतर खर्च असतातच.
विमान कर्मचा-यांचा पगार,ओव्हरहेडस,लॉंजेस व इतर ऑपरेशन कॉस्ट हा मासिक खर्च पकडला तरी विमान कंपन्यांना किमान काहि नफा तरी होतच असावा/असणार.

लक्झरी सेगमेंट व नॉन लक्झरी सेगमेंट मध्ये नक्की फरक कळाला नाही.
सिट समोर टिव्ही व विमानात फुकट जेवण ह्या दोन सुविधा सोडल्या तर ह्यात उरतेच काय?
साला एक पण लक्झरी विमानसेवा डोमेस्टिक सेवेत प्रवाशांना विमानात दारु पाजत नाय.
एकाच मार्गावर इंडिगो व किंगफिशर वा जेट ह्यांच्या भाड्यात किमान दिडहजार ते दोन ह्जार रुपयांचा फरक असतोच. म्हणजेच ह्या अधिकच्या सुविधांचे पैसे आधीच ग्राहकाकडून घेतलेले असतातच.

मग ह्यां लक्झरी वाल्यांचीच का लागलीये?
त्यातल्या त्यात किंगफिशरचीच जास्त का लागलीये?

इंडिगो वा जेट अदयाप का बंद पडली नाहिये?

जाणकारांनी ह्या विषयाबद्दल अधिक माहीती दिल्यास वाचायला आवडेल.

अभिज्ञ

धमाल मुलगा's picture

14 Nov 2011 - 11:46 pm | धमाल मुलगा

एव्हढं दळण दळायला लावल्यानंतर आता मूळ मुद्याला हात घातलास होय रे?

आयला,एअरलाईन कंपन्या नेहमीच तोट्यात असतात म्हणजे काय?
अशा परिस्थितीत मग ते व्यवसाय तरी कशाला करतात?

ह्या विषयातली काडीचीही गती नाही, पण प्रश्न मात्र जरुर पडला. असंच जर असेल, तर विमान कंपन्या इतक्या सोयीसुविधा कशा देऊ शकतात? फ्रिक्वेंट फ्लायर्स/बिझनेस क्लास ह्यांना फ्री लाउंज वगैरे वगैरे वेगळंच.
ह्या कंपन्या आर्थिक तोट्यात असतात तर मग त्या कोट्यावधींमध्ये जाणार्‍या विमानांच्या खरेद्या कशा करु शकतात? ह्या कंपन्यांचे शेअर मार्केटमध्ये असलेले शेअर्स नेहमीच दुर्लक्षित असतात का? सतत ते पडेल भावच दाखवत असतात का? गुंतवणूकदार विमान कंपन्यांना दुर्लक्षित करतात का?

किमान चाळिस एक लाखाचा गल्ला दिवसाकाठी जमा होतच असणार. अर्थात ह्यात टॅक्स,इंधन, विमानतळाचे भाडे व इतर खर्च असतातच.

कॉलिंग गवि, कॉलिंग गवि.....गवि धिस इज बेस स्टेशन...रिपोर्ट युअर लोकेशन...कमइन गवि...कमइन गवि...वी गॉट द सिच्युएशन हियर... :)

पाषाणभेद's picture

15 Nov 2011 - 12:34 am | पाषाणभेद

>>>> कॉलिंग गवि, कॉलिंग गवि.....गवि धिस इज बेस स्टेशन...रिपोर्ट युअर लोकेशन...कमइन गवि...कमइन गवि...वी गॉट द सिच्युएशन हियर...

'ओव्हर....' म्हणा म्हणजे ते 'ओव्हर अँड आउट' करायला येतील.

अरे बाबांनो मी एअरलाईन कोसळताना आतून पाहिली आहे. पण मी अर्थशास्त्रीय दृष्टीने ते मांडू शकत नाही.

मी जवळून पाहिलेले काही पॉईंट्स त्या काळात कोसळलेल्या जवळजवळ सर्व नॉन गव्हर्नंमेंट विमानकंपन्यांना लागू होते असं मला वाटतं..

- नको असलेल्या सेक्टर्सवर (रिकामी) विमाने चालवण्याचे सरकारी दडपण ("बघा.. मी माझ्या मतदारसंघ ऊर्फ बालेकिल्ल्यात विमानसेवा आणली..") महिनोन महिने रिकाम्या जाणार्‍या या रत्नागिरी, नाशिक, बारामती, हुबळी, बेळगाव, कोल्हापूर इ इ फ्लाईट्स.. यामुळे इतर चांगल्या सेक्टर्सचा फायदा लीच झाला.

- प्रचंड ऑपरेशनल कॉस्ट..इंधन+ हँगरभाडे+ इतर एअरपोर्ट चार्जेस.. त्यामुळे एकही फ्लाईट मोकळी न जाण्याची निकड.

- मॅनेजमेंट वर पगाराखेरीजचा प्रचंड खर्च (म्हणजे पगार कमीच, पण खोट्यानाट्या कारणांनी मिडल आणि हायर मॅनेजर्सनी कंपनीला लुबाडणे. शिवाय केटरिंग, पायलट आणि होस्टेसचा ट्रान्सपोर्ट वगैरे यांमधे स्वतःच्या लोकांची सोय करुन कंपनीला प्रचंड लुटणे.. ८०० रुपये प्रतिदिवसवाली कार मिळत असताना स्वतःच्या /नातेवईकांच्या गाड्या ८०० पर व्हिजिट बेसिसने लावणे.. इडली वड्याचे ७ रुपयांचे स्नॅक पॅकेट नफा धरुन २० ला देणे शक्य असताना ५० ला देणे इ इ.

- मॅनेजमेंट (पॅसेंजर हँडलर्स आणि बुकिंग एजन्सीज) यांनी प्रचंड ओव्हरबुकिंग करुन ऐनवेळी काउंटर बंद करण्याची घिसाडघाई करुन अनेक पॅसेंजर्सना "नो शो" करणे. त्यामुळे होणार्‍या मारामार्‍या आणि रसातळाला जाणारे रेप्युटेशन..

हे मुद्दे दिलेत त्या क्रमाने इफेक्टिव्ह होते.

आत्ताचे माहीत नाही.. पण किंगफिशरच्या बाबतीत त्यांचा लोड फॅक्टर चांगला होता असे जे म्हणतात ते तितकंसं खरं नसावं. मी स्वतः जेव्हाजेव्हा किंगफिशरने प्रवास केला तेव्हातेव्हा मूळ फ्लाईट कॅन्सल आणि आगेमागेच्या कोणत्यातरी दुसर्‍या फ्लाईटमधे रि-अरेंजमेंट असाच प्रकार होता.. त्यामुळे अनेक फ्लाईट कंबाईन करुन एक नेली की लोड फॅक्टर चांगला दिसू शकतो.. पण कॅन्सल केलेल्या फ्लाईटच्या ऑपेक्सचे काय? फ्युएल वाचले पण क्रूचे पगार? विमानाचे / पार्किंगचे भाडे?

बहूदा एअर डेक्कन विकत घेणं भोवलं.
एका सामान्य माणसांचे विमानप्रवासाचे स्वप्न पुर्ण करणार्‍या उदयोन्मुख कंपनीची पण वाट लावली याने.तिथल्या पुर्वीच्या कर्मचार्‍यांचे पण खुप हाल केले,त्यांचेच शाप लागले असणार.

समंजस's picture

15 Nov 2011 - 6:41 pm | समंजस

जुन्या जाणत्या लोकांनी या राजू (सत्यम फेम), विजय मल्या (किंगफिशर फेम) सारख्यांच्या परिस्थितीला बघून खुप आधीच सांगून ठेवलंय "सगळी सोंगं आणता येतात हो पण पैशाचं सोंग नाही आणता येत".

[अवांतरः वरील सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हे माहित असायला हवं की मल्यांची सरकार सोबत किती गट्टी आहे]

विजुभाऊ's picture

15 Nov 2011 - 8:13 pm | विजुभाऊ

आडनाव बदलून पवार ठेवलेत की काय हो विजुभाऊ ?

किंगफिश्र एअरलाईन्स किंवा विजय मल्ल्या यांचा महाराष्ट्राशी काही एक थेट संबन्ध नसतानाही राष्ट्रवादीच्या अखत्यारीतील सीकॉम ने किंगफिशरचे शेअर विकत घेवून त्याना मदत केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी आहे.
जय बारामती. जय हिंद.
अवांतरः सगळे धागे दोरे बारामतीकडेच कसे धाव घेतात हे गौडबंगाल आहे

दिपक पाटील's picture

15 Nov 2011 - 8:56 pm | दिपक पाटील

खर सान्गू, मला वाटला होता भारतात लोकाना फक्त क्रिकेट आणि सिनेमा कळतो, पण या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर कळाल, "अर्थशास्त्र" पण भारी आहे आपल.....
बाकी, मल्ल्या नाही हरणार हो, इतक्या सहज....