रामसेतूचा वाद

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in काथ्याकूट
27 Oct 2007 - 10:53 am
गाभा: 

रामसेतूवरून उफाळलेला वाद आता संपला आहे, असे दिसते.
दसर्‍याच्या आसपास सोनिया गांधींनी कुठल्याशा रामलीलेतल्या राम-लक्ष्मणाची पूजा केली, आणि वाद धुवून टाकला.
मग असे वाद आधी उकरण्यामागचे राजकारण कुणी (ज्याला यावर काही मत असेल, तो) समजावून सांगू शकेल का?
रामाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न जमून गेला असता, तर, अयोध्येतल्या जन्मभूमीपासून सुरू झालेले प्रश्न गुपचूप मितवता आले असते, असे तर नसेल?

प्रतिक्रिया

दिनेश's picture

27 Oct 2007 - 12:31 pm | दिनेश

या किवा अशा विषयांवर मला मत असल्यानेच लिहित आहे,कृपया गैरसमज नसावा.

राम----रामजन्मभूमी---- आणि आता रामसेतू! सगळा कोंबड्या (म्हणजे जनता! इथला सदस्य नव्हे.)झुंजवण्याचाच प्रकार..
नवीन काहीच नाही.आत्तापर्यंत अशा गोष्टीत वेळ,पैसा आणि श्रम(जनतेचा आणि राजकारण्यांचाही) वाया दवडला नसता तर खचितच भारताची प्रगती अजून २ स्टेप पुढे गेली असती.

परंतु ह्या गोष्टींपेक्षा इतर अनेक गंभीर समस्या भारतासमोर असताना जनतेने (आणि हाटेलात येणार्‍यांनीही)आपला वेळ असे विषय मांडून व्यर्थ दवडू नये ही अपेक्षा.

(लोकशाहीत मते मांडण्याचा अधिकार असण्याचे समर्थन करणारा )दिनेश

उदय ४२'s picture

27 Oct 2007 - 6:42 pm | उदय ४२

दिनेशराव म्हंत्यात त्ये बराबर हाय.आता मोदी बद्द्ल तहलका सुरु आहे.(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

विसोबा खेचर's picture

28 Oct 2007 - 9:35 am | विसोबा खेचर

जय जय राम कृष्ण हरी!

चालू द्या...

हरिप्रसाद's picture

23 Nov 2007 - 8:58 pm | हरिप्रसाद

सहज आंतरजालात भ्रमण करत असताना एक मस्त कविता मिळाली.
"मिसळपावच्या" रसिकांसाठी साभार .............

जय जय श्री राम
श्री राम जी के भक्त है
रोम रोम में राम जी बसें है
हनुमान नही पर राम भक्त हैं
राम हमारे रोम रोम हैं ।
सच (!) कहते हैं कुछ विद्वान (?)
राम नही इतिहास में हैं !

हां, राम इतिहास नही हो सकते !
वो तो सदा बर्तमान रहे हैं ।
भूत में भी विद्यमान रहे हैं
हर इंसां के दिल में रहे हैं ।

बर्तमान में भी उनका अस्तित्व
छाप अमिट आदर्श व्यक्तित्व ।
भविष्य में भी हर पल रहेंगे
हर जीवन के पूज्य रहेंगे ।

अयोध्या, लंका, पंचवटी,
मिथिला,किषकिंधा, जनकपुर,
शबरी, अत्रि, मार्कण्डेय आश्रम,
धनुषकोटि, चित्रकूट, रामेश्वर ।

पग - पग पर मिलते राम पग
फिर भी कहते राम नही हैं ।
देख उठा कर भारत भू की
मुट्ठी भर मिट्टी यहां की ।

कण - कण में तुम्हे राम मिलेंगे;
फिर भी दिखें न राम तुम्हें तो,
आकर सीना चीर के देखो -
हर दिल में तुम्हें राम दिखेंगे ।

राम - राम जप तर गये कितने
राम बसा मन पाया स्वर्ग ।
राम रमा है अखिल जगत में
मोक्ष बस राम नाम संसर्ग ।

राम - सेतु धरोहर अपनी
क्यों न करें हम पुनरुद्धार ।
नवजीवन दे राम सेतु को
कर लें अपना भी उद्धार ।

रामराजे's picture

24 Nov 2007 - 10:04 am | रामराजे

राममंदिर किंवा रामसेतु च्या विषयावर वाद उकरुन काढणे म्हनजे पुन्हा ये रे माझ्या मागल्यातलाच प्रकार आहे. असे विषय हे काही लोकांचे राखीव कुरण असल्याने आपण त्याच्यावर काथ्याकुट करुन उपयोग नाही.