राम राम मंडळी,
दिवसेंदिवस मिपावर नवीन लेख आणि प्रतिक्रिया यांचा ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. परंतु हा ओघ इतका भरभर आहे की वाचायला टाईमच भेटत नाय! :)
कामधंद्यापायी टाईमच भेटत नाय हे एक, आणि सवडीने वाचू म्हटलं तर नवीन लेख आणि प्रतिक्रियांचा ट्रॅफिक अजूनच जॅमच होत रहातो! :)
तर मंडळी, तूर्तास आमच्यापुढे असा प्रश्न आहे की या ट्रॅफिक जॅमचं करयचं काय? एवढं सगळं वाचायचं कधी अन् केव्हा? :)
कुणी काही उपाय सुचवेल का? :)
आपला,
(मिपा पोलिसांच्या वाहतुक शाखेचा) हवालदार तात्या. :)
ता क - सदर चर्चाप्रस्ताव हा विरंगुळा सदरातला आहे. माझी मुख्य तक्रार मिपावरील ट्रॅफिक ही नसून मला ते सर्व वाचायला वेळ मिळत नाही अशी व इतकीच आहे! :) वरील प्रस्तावातील "अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे" हे वाक्य कृपया लक्षात घ्यावे ही साधी अपेक्षा! :)
प्रतिक्रिया
14 Jul 2008 - 4:17 pm | विसोबा खेचर
अर्थात, मध्येच हा काथ्याकूट टाकून आम्ही या ट्रॅफिक जॅमला हातभारच लावला आहे हा भाग वेगळा! :)
14 Jul 2008 - 4:20 pm | मनस्वी
फ्लायओव्हर बांधा :)
म्हणजे आवडीचे लेख सॉर्ट करून आधी वाचा.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
14 Jul 2008 - 4:21 pm | विसोबा खेचर
केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा.
हे मस्त! :)
आपला,
तात्यानंद!
14 Jul 2008 - 4:22 pm | मदनबाण
फ्लायओव्हर बांधा
=)) =)) =))
मदनबाण.....
14 Jul 2008 - 4:25 pm | ब्रिटिश टिंग्या
आयडीया चांगलीये....पण खरं पाहता लेखापेक्षा त्याला आलेले प्रतिसाद वाचण्यात जास्त वेळ लागतो.....
आपला,
(मिपाच्या वाहतुक शाखेचा एक सामान्य हवालदार) टिंग्या
14 Jul 2008 - 4:29 pm | विजुभाऊ
मिपा वर हल्ली बरेच लेखन होत आहे . मंडळी लिहिती झालीत.
काहितरी कॅटेगरी वगैरे केलेत तर लेखांचा शोध लौकर करत येईल.
बरेच लोक लिहितात/ विषयही भरपूर आहेत. त्यामुळे जरा उशीर केला तर तो लेख मागे पडतो
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jul 2008 - 4:37 pm | प्रियाली
:D
आता पळते नाहीतर मार मिळेल. ;) ह. घ्या बरं का!
14 Jul 2008 - 4:49 pm | मनस्वी
लायसन्स!
नको! म्हणजे माझे कोणतेच लेखन येणार नाही कधी मिपावर : )
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
14 Jul 2008 - 7:27 pm | छोटा डॉन
लायसेन्स मिळवायचे म्हणजे काही तरी सिद्ध करावे लागेल, कुठलीतरी चाचणी द्यावी लागेल ...
की त्या व्यक्तीच्या "वाटचाली" वर अवलंबुन लायसेन्स देता येईल ...
असे असल्यास "नव्या सदस्या" बद्दल काय ?
चाचण्या काय असाव्यात ?
"सुदलेखणाची चाचणी "असेल तर आम्हाला बास बाबा ...
छोटा डॉन
केस कापण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ विचार करण्यात सत्कारणी लाउन व्हिव्हेकानंद व्हा !!!
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Jul 2008 - 5:07 pm | केशवसुमार
प्रशासकीय अनुमती लावा.
;;) मी अगदी हेच म्हणणार होतो..
(हेच म्हणतो)केशवसुमार
अवांतर : तात्याशेठ मुद्दा पटला बरका :B
स्वगतः हा विचार ट्राफिक वाढवण्या पुर्वी करायला हवा होता.. :> अता भोग आपल्या कर्माची फळे.. >:P आणि सगळेच लेख आणि प्रतिक्रिया वाचल्याच पाहिजे असे थोडे आहे.. :W आणि आधी ते क्रमशः लिखाणावर बंदी घाला
14 Jul 2008 - 7:02 pm | विजुभाऊ
आणि आधी ते क्रमशः लिखाणावर बंदी घाला
नाराज नाराज नाराज :( आमच्या डाम्बीस गुरुनी सांगितलेला तो क्रमशः चा मंत्र आम्ही जपणार केसुशेठ.
::::पिडां काकाचा क्रमशः चा मंत्र जपणारा विजुभाऊ
(उतु नको मातु घेतला वसा टाकु नको)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jul 2008 - 4:40 pm | आनंदयात्री
मिपावरचा पडिक, मिपाचा बहाद्दुर (गुरखा या अर्थाने) अशी आमची एकेकाळी त्रैलोक्यात ख्याती होती. पण आता एवढे प्रचंड लिखाण येते की आमच्या आवाक्यातुन बरेच सारे सुटलेले असते, काय करावे या विचाराने आम्हाला पछाडलेले आहे. बघा अजुन धनंजयरावांची एक कविता वाचायचीच राहिलिये. दु:ख याचे की असे काही उत्तमोत्तम साहित्य सुटलेय हातुन, जसे रामदास काकांचे पिसी जेसी, बरं रोजच्या लिखाणाचा रेटा एव्हढा असतो की जुने काढुन वाचावे की नविन गमती जमती वाचाव्यात अशी गोची होत रहाते अन हे दुष्टचक्र चालुच रहाते.
एक उपाय आहे,
काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल.
म्हणजे कविता असो वा कथा असो वाचायच्या तर आहेतच हो पण जरा सबुरीने घ्या की राव, दिसामाजी एक दोन कविता टाकल्या तर वाचकवर्गाला पण त्याचा योग्य आस्वाद घेता येतो ना. अशा अतिशयोक्तींना जनरल डायरांकडुन वेळोवेळी समज मिळावी अशी कामना करतो.
आपलाच,
आंद्या हैवान (खफ नाम) उर्फ आंद्या उर्फ आनंदयात्री
सदस्य
मिसळपाव डॉट कॉम.
14 Jul 2008 - 4:52 pm | मनस्वी
सिग्नल!
सिग्नल मिळाल्याशिवाय पुढचा लेख टाकता येणार नाही!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
14 Jul 2008 - 4:47 pm | चाणक्य
हेच म्हणतो. तात्या, एखाद्या सभासदाने कुठलेही साहित्य प्रकाशित केले की किमान १-२ दिवसांनतरच त्याला नविन साहित्य टाकता येइल असं काही करता येइल का? अर्थात, हा नियम प्रतिक्रीयांना लागू नसेल
14 Jul 2008 - 5:02 pm | चतुरंग
भारंभार प्रसवणार्या लोकांना कुटुंबनियोजनासारखा 'लेखननियोजनाचा सल्ला' व्यनितून द्यावा असे वाटत आहे.
लेखकांनी एकाच दिवशी खूप लिखाण प्रसिद्ध करण्यापेक्षा ते लिहून साठवून ठेवावे - ही सोय 'मिपा'वर आहे. किंवा साध्या टेक्स्ट फाईलमधेही 'मिपा'वरुन कट - पेस्ट करुन ठेवता येते.
आणि थोड्या दिवसांच्या अंतराने प्रसिद्ध करावे म्हणजे ते लिखाण भडीमार ह्या सदरात मोडणारे ठरत नाही.
अनेक कविता ह्या अक्षरशः बसून 'पाडलेल्या' आहेत हे कळते. कृपया तसे करु नका. कविता लिहा. ती नीट मुरु द्या, वाचा, त्यावर थोडा विचार करा आणि मग यथावकाश टाका. घाई का? चांगले असेल तर प्रतिसाद मिळेलच हे नक्की.
दुसरे असे की काथ्याकूटसाठी मनात विषय आला की लगेच उघडला धागा असे न करता त्या विषयावर खरेच काही चर्चा घडू शकेल का ह्याचा ठोस विचार असला तर धागा उघडावा. नाहीतर कित्येक धागे हे पेपरात बातमी वाचली आणि इकडे कट्-पेस्ट करुन दुवा टाकला आणि ह्याबद्दल तुमचे मत काय इतकेच असते?? धागा सुरु करणार्याने त्याचे/तिचे मत आधी द्यावे मग त्यावर चर्चा घडू शकते इ.
(स्वगत - रंगा, तूही विडंबने टाकायची घाई करु नकोस रे, पाडलेल्या कवितांचा कच्चा माल कितीही हवाहवासा वाटला तरी सबुरीने घेत जा! ;))
चतुरंग
14 Jul 2008 - 5:37 pm | अमोल केळकर
वरील प्रतिसादांशी सहमत
ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी आता इथुन पुढे फक्त एकदाच स्वतःची गाडी काढायची आणी इतर दिवशी इतरांच्या गाडीतुन जायचे असे आजपासुन ठरवतो.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
14 Jul 2008 - 5:40 pm | आनंदयात्री
आम्हीही केळकर साहेबांशी सहमत. आम्ही पण अशीच प्रतिज्ञा करतो.
14 Jul 2008 - 5:50 pm | विजुभाऊ
लिहिणारांवर प्रशासकीय ( मेलो आता) बन्धने कशाला आणता.लिखाण आणि प्रतिसाद हे तर संस्थळाम्ची जान आहेत.
त्यापेक्षा लिखाण जर नीट कॅटेगराईज करता आले तर वाचणाराला जे वाचायचे आहे तेच तो वाचेल.( माझी पंचाईत होईल्..मला सगळेच वाचायचे असते)
देशाची लोकसंख्या हे देशाचे ओझे आहे असे न मानता तो एक चांगला रीसोर्स आहे. हे मान्य केल्याने चिन बराच पुढे गेला.
मिसळपाव वर लिहिणारे लोक हे त्याचे वैभव आहे
जेव्हढे जास्त लोक तेव्हढे जास्त लिखाण
जेव्हढे जास्त लिखाण तेव्हढे जास्त विषय
जेव्हढे जास्त विषय तेव्हढी जास्त वाचक संख्या ( हळुहळु वाढेल)
जेव्हढी जास्त वाचक संख्या तेव्हढे जास्त लिखाण
वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे.
( हां रोखायचे असल्यास अन्य ठि़काणचे इथे पुन्हा पोष्ट करणार्यांवर बन्धने घाला)
पुन्हा मेलो आता
:::::::::::::::मिसळपाव खेरीज अन्यत्र कोठेही न लिहिणारा विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jul 2008 - 6:11 pm | आनंदयात्री
एका घरावर धान्य वाळत टाकले होते. तिथे बाजुला झाडांवर बर्याच चिमण्या रहात होत्या, मग एक चिमणी आली दाणा घेउन गेली. परत एक चिमणी आली दाणा घेउन गेली, अन मग एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.
.
.
.
.
..
.
एक चिमणी आली दाणा घेउन गेली.
उद्या मी हीच गोष्ट कावळ्याबरोबर सांगेन. अन परवा अजुन कोणत्या पक्ष्यासाठी.
14 Jul 2008 - 6:35 pm | मनस्वी
आनंदयात्री गोष्ट खूपच सुरेख!
अजून येउदेत!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
14 Jul 2008 - 8:20 pm | श्रीकृष्ण सामंत
विजुभाऊजी बरोबर मी सहमत आहे. लेखन ही एक स्फुर्ती आहे,निर्मिती आहे.ज्याला जेव्ह्डे लिहिता येईल तेव्हडे लिहु द्दा.ज्याला जेव्हडे वाचता येईल तेव्हडे वाचू द्दा.घडता घडता घडेल ते घडेल.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Jul 2008 - 11:05 pm | विसोबा खेचर
लिहिणारांवर प्रशासकीय ( मेलो आता) बन्धने कशाला आणता.
कुणी बंधने आणली आहेत? विजूभाऊ, माझा गंमतीतला प्रस्ताव नीट वाचा आधी आणि मगच अशी बेजबाबदार विधाने करा ही विनंती!
तात्या.
14 Jul 2008 - 6:54 pm | मुक्तसुनीत
संस्थळावरचा ट्रॅफिक ज्यॅम म्हणजे लोकप्रियतेची पावती. "मॉडरेशन" असणे आता अत्यावश्यक बनत चालले आहे. यावर लिखाण कमी करा अशा प्रकारची उपाययोजना मला अयोग्य , काहीशी घातक वाटते. काही सुचणारे उपाय :
१. जास्त विभाग .
२. प्रत्येक विभागावर नेमून दिलेले मॉडरेटर्स
३. लेखनपूर्व परवानगी हा प्रकार नको (मी पळून जाईन इथून )
४. लेखनोत्तर मॉडरेशन्स च्या काही आचारसंहिता :
१. आक्षेपार्ह मजकूर एकदम उडवू नये. लेखक/लेखिकेला सूचना करावी. थोडा वेळ द्यावा. अर्थात यालाही अपवाद असणार्या गोष्टी असतीलच. अर्वाच्य , अपमानजनक , जातीपाती-धर्मावरचा किंवा सरळसरळ शाब्दिक हिंसा
असणारा मजकूर त्वरित उडणारच !
२. उपरोक्त उदाहरणांव्यतिरीक्त "आक्षेपार्ह" काय हे ठरवून घ्यावे.
३. प्रत्येक विभागीय मॉडरेटरला सर्वाधिकार द्यावेत. प्रत्यक्ष तात्यासुद्धा त्या अखत्यारीच्या खालीच येतील अशी व्यवस्था असावी :-)
४. मॉडरेटर्स ही देखील माणसे आहेत. ते चुका करू शकतात, त्याच प्रमाणे त्याना आपले काम करायला वेळात वेळ काढावा लागतो हे लक्षात ठेवावे.
५. जगभर पसरलेले सदस्य लक्षात घेता शक्यतो प्रत्येक विभागावर २-२ मॉड्स नेमावेत. १ आशियामधला ; १ युरप्/अमेरिकेतला.
६. मॉडरेटर्स नी पोस्टस एकदम उडवू नयेत; पण चुकीच्या विभागतले पोस्टस हलवण्याची मुभा असावी. बर्याचदा अनेक धागे एका विषयावर असतात. धागे "मर्ज" करण्याची (म्हणजे सगळ्याना एका विषयात बांधण्याची ) मुभा असावी. याच न्यायाने , विषयांतर होत चालले असेल तर ५-६ पोस्टस एका नवीन धाग्यात टाकण्याची मुभाही मॉडरेटर्स ना असावी.
14 Jul 2008 - 7:05 pm | अवलिया
सहमत
नाना
14 Jul 2008 - 7:21 pm | छोटा डॉन
आता जास्त विभाग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ?
समजा ते केले तर त्याचा "ट्रॅफीक" थांबण्याशी संमंध कसा येतो ?
काही लोकांना लेख टाकण्याशी मतलब असेल तर त्या "विभागा" चा रोल काय असेल ? प्रत्येक विभागाचा प्रत्येक आठवड्याचा कोटा ठरलेला असेल का ?
होय असल्यास प्राधान्य कुणाला मिळेल ?
ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय "जास्त विभागा" ही संकल्पना तेवढी क्लिक होनार नाही ....
बाकी "प्रशासकीय परवानगी नसावीच" याच्याशी सहमत ...
जर प्रत्येक भागाला वेगवेगळे "मॉडरेटर्स" नेमले तर त्यांची नावे जाहीर करावी लागतील.
ते एकदा झाले की त्यांच्यावर "खरडी आणि व्यनींचा" पाऊस सुरु होईल, त्यात त्यांची स्वतःची वैयक्तीक कामे आहेतच की. यात जर काही कारणाने "एखाद्या लेखाला प्रकाशित व्हायला उशीर" झाला तर त्या "मॉडरेटर" च्या नावाने ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थेतीत काय ?
अजुन एक गोष्ट म्हणजे, ही मोडरेटर लोकं म्हणजे मिपावरची गाजलेली , समंजस, हुशार व्यक्तीमत्व असणार आहेत. त्यांच्यावर आलेल्या ह्या "जादा जबाबदारीमुळे" त्याचे लिहण्याचे "नैसर्गीक कौशल्य" झाकोळले जाण्याची शक्यता नाही का ? तसे झाल्यास आम्हाला काही "चांगल्या लेखाला" मुकावे लागेल.
सध्या पण ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की ज्याम्च्यावर जबबदारी आहे त्यांना स्वतःचे लेखन करायला वेळ कमी मिळतो ....
याला उपाय काय ?
हे मॉडरेटर नेमताना त्याचे "नॉर्म्स" काय असणार ? मतदान होणार की घेतलेला निर्णय हा अंतिम राहिल ....
**** माझा उपाय ****
कुठल्याही लेखावर तो इथे "असावा की नसावा" असे मतदान करता यायला हवे.
जसे आपण ऑर्कुटवर "स्पॅम" घोषीत करतो त्या प्रकारे .
एका ठरावीक संख्येची "नको" मते पडली की लेख उडवावा ...
आता ह्यात "ठेवणीतल्या व फेक आय.डी." ची रिस्क आहे पण मतदान कोन करते ह्यावर हा निर्णय घेता येईल ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Jul 2008 - 7:35 pm | मुक्तसुनीत
आता जास्त विभाग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ?
समजा ते केले तर त्याचा "ट्रॅफीक" थांबण्याशी संमंध कसा येतो ?
काही लोकांना लेख टाकण्याशी मतलब असेल तर त्या "विभागा" चा रोल काय असेल ? प्रत्येक विभागाचा प्रत्येक आठवड्याचा कोटा ठरलेला असेल का ?
होय असल्यास प्राधान्य कुणाला मिळेल ?
ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय "जास्त विभागा" ही संकल्पना तेवढी क्लिक होनार नाही ....
जास्त विभाग करण्याचे सोपे कारण : डीव्हाईड अँड मॅनेज. खूप सामान झाले तर तुम्ही विभागणी करता , खूप काम आले तर प्रायॉरिटीज ठरवता , एका प्रॉजेक्टवर अनेक लोक वेगवेगळ्या मॉड्युल्स् वर काम करतात, तेच उदाहरण इथेही. त्यामुळे ट्रॅफिक थांबत नाही (थांबवायचे नाही आहे ! ) , पण रेग्युलेट होईल. काही लेखक विभागाच्या बाबतीत गोंधळलेले असतील तर मॉड्स त्यांचे पोस्टस हलवू शकतील. कोटा कसला नि कशाकरता ते समजले नाही. त्यामुळे प्राधान्यही नाहीच. "मॉड्स" जे पोस्ट आधी येईल ते आधी पाहतील.
जर प्रत्येक भागाला वेगवेगळे "मॉडरेटर्स" नेमले तर त्यांची नावे जाहीर करावी लागतील.
ते एकदा झाले की त्यांच्यावर "खरडी आणि व्यनींचा" पाऊस सुरु होईल, त्यात त्यांची स्वतःची वैयक्तीक कामे आहेतच की. यात जर काही कारणाने "एखाद्या लेखाला प्रकाशित व्हायला उशीर" झाला तर त्या "मॉडरेटर" च्या नावाने ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थेतीत काय ?
आताची परिस्थिती लक्षात घ्या. एकच माणूस सगळे वाचतो. निर्णय घेतो. त्यावर सगळा ताण , सगळी नैतिक जबाबदारी आहे, निर्णय घेण्याची , ते अमलात आणण्याची कामगिरी त्याच्यावरच. हेच आपल्याला अनेक लोकांमधे विभागून द्यायचे आहे.
अजुन एक गोष्ट म्हणजे, ही मोडरेटर लोकं म्हणजे मिपावरची गाजलेली , समंजस, हुशार व्यक्तीमत्व असणार आहेत. त्यांच्यावर आलेल्या ह्या "जादा जबाबदारीमुळे" त्याचे लिहण्याचे "नैसर्गीक कौशल्य" झाकोळले जाण्याची शक्यता नाही का ? तसे झाल्यास आम्हाला काही "चांगल्या लेखाला" मुकावे लागेल.
सध्या पण ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की ज्याम्च्यावर जबबदारी आहे त्यांना स्वतःचे लेखन करायला वेळ कमी मिळतो ....
याला उपाय काय ?
तुमच्या कंपनीत अनुभवाने, कौशल्याने थोडी उजवी कामगिरी करणार्यांचे काय करतात ? त्यांना त्यांचे त्यांचे काम करू देतात, त्यांच्या जबाबदार्यांमधे काही वाढ होते की नाही ? आणि वाढीव जबाबदार्या ते लोक आपले काम सांभाळून पूर्ण करतात की नाही ? याची उत्तरे तुम्हीच शोधा. तुम्हाल तुमच्या वरच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील !
हे मॉडरेटर नेमताना त्याचे "नॉर्म्स" काय असणार ? मतदान होणार की घेतलेला निर्णय हा अंतिम राहिल ....
हां ! हा अगदी योग्य प्रश्न. इथे मोठी चर्चा होणे शक्य आहे.
**** माझा उपाय ****
कुठल्याही लेखावर तो इथे "असावा की नसावा" असे मतदान करता यायला हवे.
जसे आपण ऑर्कुटवर "स्पॅम" घोषीत करतो त्या प्रकारे .
एका ठरावीक संख्येची "नको" मते पडली की लेख उडवावा ...
आता ह्यात "ठेवणीतल्या व फेक आय.डी." ची रिस्क आहे पण मतदान कोन करते ह्यावर हा निर्णय घेता येईल ....
क्षमा करा. तुमचा उपाय मला अव्यवहार्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा , गोंधळात भर पडेल असा वाटला. प्रत्येक पोस्टवर मतदान करायचे ? कुणीकुणी ? किती काळ ? आणि त्याचे काउंटींग करण्याची काय सोय ? डॉन राव , तुमच्याकडून याहून जास्त व्यवहार्य सूचना आम्हाला अपेक्षित आहे :-)
14 Jul 2008 - 8:02 pm | छोटा डॉन
येस, ते "डिवाईड & मॅनेज" ही जबरदस्त आयडीया आहे, कुठेही ती क्लिक व्हायलाच हवी ...
पण यामुळे लेखांचे योग्य वर्गीकरण हा एकमेव फायदा मला दिसतो आणि तो नक्की आहेच ...
पण हे नुसते वर्गीकरण करुन फायदा नाही, ते मुखपॄष्ठावर वेगळे दिसले पाहिजे तरच काही त्याचे चीज होईल ...
सध्याही "वर्गीकरण" आहेच की, फक्त जरा ते जास्त "स्ट्रीक्टली केले आणि मांडले" तर नथिंग लाईक थॅट !!!
कोटा म्हणजे "एका ठराविक काळात एका ठरावीक विभागात किती लेख यावेत " याबद्दल एक "सर्वमते" ठरवलेला आकडा ...
हा जर ठरवला तर "पाऊस" पडणे कदाचित बंद होईल. हा "कोटा" पर "पर्सनही" ठरवता येईल ....
नाहीतर "क्वालीटीचे साहित्य" असे "पीठ पाडल्यासारखे" प्रसवता येत नाही, ते आतुन यावे लागते त्यामुळे त्याला काहीच धोका नाही ...
उलट काही "रतिबा"सारखे जे साहित्य आज येते त्याला निश्चित "आळा बसेल" ....
बाकी तुमच्या "मोडरेशन चे काम विभागुन "घेण्याला सहमत ...
अनुभवाबरोबर जबाबदारी वाढते व ती पुर्ण करण्याची प्रेरणा त्याला आतुनच मिळते हे सुद्धा मान्य. त्यामुळे मी "प्रतिभा झाकोळुन" जाण्याचा मुद्दा" मागे घेतो ...
बाकीच्यांचे या मुद्द्यावर काय मत आहे हे विचारले पाहिजे ....
बाकी मी त्या मतदान पद्धतीचे अजुन समर्थन करतो. प्रत्येकावर मत दिलेच पाहिजेच असे नाही.
फक्त जे बहुसंख्य लोकांना "अनावश्यक" वाटते त्याला काय हरकत आहे. शिवाय मी म्हटल्याप्रमाणे "मत कोण देतो " यालाही वेटेज असावे ...
"ऑर्कुटवरही आपण सरसकट मतदान करत नाही, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे आपण अपले मत वापरु शकतो ..."
जर "१० मॉडरेटर्स" असतील तर आपण ह्या "मतदानाचा हक्क इतर अजुन ५० " जणांना देऊ, त्यांनीही "कंपल्सरी केलेच" पाहिजे असे नाही, तो आपल्या "सद्सदविवेकबुद्धीचा" प्रश्न आहे. एकदा एक "ठरावीक नको" चा आकडा गाठला की झाला निर्णय ...
>>तुमच्याकडून याहून जास्त व्यवहार्य सूचना आम्हाला अपेक्षित आहे
याबद्दल धन्यवाद ...
विचार करतो आहे, लवकरच मत सांगेन ...
मिपाच्या उज्वल भविष्यासाठी आमचा हात नेहमी मदतीला पुढे राहिल ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Jul 2008 - 7:31 pm | चतुरंग
आणखी एक सूचना - महिन्यातून फक्त एकच दिवस नवीन लेखन प्रकाशित करायला, (लिहायला नाही, फक्त प्रकाशित करायला) जर स्थगिती आणली -(हा दिवस कोणता ते कौल घेऊन ठरवता येईल) - तर आधी प्रसिद्ध झालेले लेखन योग्य वर्गवारीत नेणे किंवा इतर संपादन ह्यासाठी अवधी मिळू शकेल असे वाटते.
(अर्थात टेक्निकली हे कितपत शक्य आहे हे मला माहीत नाही, नीलकांत?)
चतुरंग
14 Jul 2008 - 7:38 pm | मुक्तसुनीत
पण एकच लेख एका महिन्यात ? का ? म्हणजे इथे रेशनिंग सिस्टीम आली की ! जर का सर्व्हर/मेम्मरी इत्यादि रिसोर्सेस कडून तसा प्रश्न येत नसेल तर असे रेशनिंगच्या मी विरोधात आहे.
14 Jul 2008 - 7:40 pm | चतुरंग
लेख प्रकाशित करायला सर्व सदस्यांना महिन्यातून फक्त एक दिवस स्थगिती - फ्लो कंट्रोल साठी.
चतुरंग
14 Jul 2008 - 7:55 pm | मुक्तसुनीत
>>> लेख प्रकाशित करायला सर्व सदस्यांना महिन्यातून फक्त एक दिवस स्थगिती - फ्लो कंट्रोल साठी.
यात स्पाँटेनिटी निघून जाईल. पर्यायाने स्थळाची लोकप्रियता अचानक कमी होईल. मी माझ्या उदाहरणावरून सांगतो आहे. आपण मेहनतीने म्हणा, थोड्याशा उत्साहाने म्हणा , काही लिहीले आणि ते प्रसिद्ध व्हायला एक महिना लागणार असेल , तर माझ्यातली हवा लगेच निघून जाईल. :-)
14 Jul 2008 - 9:50 pm | चतुरंग
लेखन एक महिन्याने प्रसिद्ध करा असे मी म्हणत नाहीये.
महिन्यातून फक्त एक दिवस कोणतेच लेखन प्रकाशित करु नका म्हणजे ह्या एका दिवसापुरता प्रकाशित साहित्याचा प्रवाह आटेल आणि संपादनाला अवसर मिळेल (बाकी संपूर्ण महिनाभर सर्व आहे तसेच चालू राहील.)
चतुरंग
14 Jul 2008 - 10:19 pm | मुक्तसुनीत
:-)
14 Jul 2008 - 7:57 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
"मुक्तसुनीत " यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
14 Jul 2008 - 10:12 pm | कोलबेर
हे अशक्य आहे. स्वानुभवातून सांगतो. कोणतेही मॉडरेशन हे श्री. तात्या (मालक) ह्यांचा शब्द अंतिम मानून लावले तरच यशस्वी होईल.
(एक्स मॉडरेटर ) कोलबेर
14 Jul 2008 - 10:28 pm | मुक्तसुनीत
म्यान प्रोपोझेस , गॉड डीस्पोझेस ! आम्ही प्रस्ताव मांडला ; त्यातील कलमे स्वीकारावीत/नाकारावीत ही श्रींची इच्छा ! :-)
14 Jul 2008 - 7:35 pm | प्रियाली
करता येईल.
मुखपृष्ठ बदलायचे. त्यावर फक्त महत्त्वाच्या घडामोडी ठेवायच्या. तिथून -
चर्चा
काव्य
साहित्य
पाककृती
कौल
इ. चे दुवे द्यायचे. इच्छुक सभासद आपल्याला हव्या त्या दुव्यावर टिचकी मारतील. अशा रितीने एकाच पानावर येणारा रेटा कमी होईल. जो तो आपल्या आवडीनुसार आपल्या विभागात नांदेल.
14 Jul 2008 - 7:43 pm | विजुभाऊ
इतरत्र प्रसिद्ध झालेले लिखाण इथे प्रसिद्ध करणे टाळु शकलो तर थोडी गर्दी कमी होईल.
इथे काही लेख / पाक कृतीतर इतरत्र इतर लेखाकानी लिहुनही प्रसिद्ध झाले आहेत त्याचे काय.
इथे लिहिणाराना लिहु नका / कमी लिहा अशी बन्धने घातली तर नाईलाजाने वेगळ्या संस्थाळावर लिहायला जावे लागेल .
मिपावर कमी लिहा/ लिहु नका हा मिसळ पाव साठी निगेटेव्ह/ नकारात्मक इफेक्ट ठरेल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jul 2008 - 7:46 pm | मुक्तसुनीत
विजुभाऊ ! तुमचे एकूण एक मुद्दे मान्य आहेत. त्यावरची उपाययोजना म्हणून मी वर काही सूचना केल्या आहेत. जमल्यास त्या पहा. त्याता काही चुकीच्या वाटल्यास विरोध करा/नव्या सूचना द्या असे मी विनवितो.
14 Jul 2008 - 7:56 pm | आशिष सुर्वे
माझे असे मत आहे की 'लेख', 'कविता', 'मतप्रदर्शन', ईत्यादीवर बंधन नसावे.
लिहूद्यात की प्रत्येकाला हवे तेवढे!
नदीला आपण असे तर सांगत नाही ना की: 'बये, एवढी वाहू नकोस गं... मी एवढे पाणि नाही पिऊ शकत!'
वाहू द्यात 'मराठी ची नदी' अखंड आणि करुदे तिला महाराष्ट्र सम्रुध्द!
14 Jul 2008 - 8:43 pm | विजुभाऊ
कसलीच जबाबदारी न घेता माहिती न देता जे http://www.misalpav.com/node/2548 ; http://www.misalpav.com/node/2456
http://www.misalpav.com/node/1642 ; http://www.misalpav.com/node/2515
अशासारखे धागे सुरु करतात त्याबद्दल काय आणि कोण बोलणार
या असल्या धाग्यातुन नक्की काय मिळते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jul 2008 - 9:00 pm | अभिज्ञ
सर्वप्रथम एक चांगला विषय सुरु केल्याबद्दल तात्या तुमचे अभिनंदन.
मला सुचलेले मुद्दे हे असे.
१.कोणाच्याही दोन पोस्टस मध्ये किमान ४ दिवसाचे अंतर असावे.
२.एखादे साहित्य हे जर लागोपाठ दोन दिवस प्रतिसादशुन्य असेल तर ते आपोआप आर्किव्ह मध्ये जावे.
३.एखादे साहित्य ,सर्व प्रतिसाद -उत्तरे ह्यानंतर आपोआप सात दिवसाने आर्किव्ह मध्ये जावे.
(येवढे करुनहि जर मंडळी ऐकत नसतील तर मात्र रामबाण उपाय आहे-वर्गंणि चालू करा.आपोआप ट्रॅफिक कमी होइल. B) :D
मराठी माणुस भुताला भीत नाहि इतका वर्गणिला घाबरतो. ---अतिशय ह.घ्या.)
अभिज्ञ.
14 Jul 2008 - 9:04 pm | प्रियाली
आता पुढील भयकथा वर्गणीवर. ;)
(गरीब) प्रियाली.
14 Jul 2008 - 9:59 pm | प्रमोद देव
वर्गणी-बिर्गणी काही नको. हवे तर ४-४ आणे काढा आणि म्हशीला टपावर टाका.....झंप्या दामले.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
14 Jul 2008 - 10:21 pm | केशवसुमार
म्हैस..देवशेठ,
डारेक्ट ३रीतली शिवी... शिव शिव शिव...
काय हे .. म्हैस
आपण नसत खपून घेत्ले हे..
( शिव शिव )केशवसुमार
14 Jul 2008 - 11:05 pm | विसोबा खेचर
हा धागा जरा अंमळ जास्तच सिरियस झाला आहे/होतो आहे असं वाटतंय!
मी 'मिपावर ट्रॅफिक जॅम होतो आहे' हे केवळ गंमतीने म्हटलेलं आहे. माझी कुणाविषयीही काहीही तक्रार नाही! लोकांनी इथे भरभरून लिहावं असंच मला वाटतं!
कृपया कुणीही, कोणतेही भलते गैरसमज पसरवू नका ही विनंती!
हा काथ्याकूट मौजमजा व विरंगुळा या सदरात आहे हे कृपया सर्वांनी लक्षात घ्या... :)
तात्या.
14 Jul 2008 - 11:14 pm | सर्किट (not verified)
माझ्या मनात एक नवीन आयडिया आली आहे.
"आपापसात" असे सदर सुरू करून, मिसळपावाचा उल्लेख झालेले लेख / कविता / कट्ट्यांची आमंत्रणे / कट्ट्यांची वर्णने / सदस्यांच्या लग्नाचे / वाढदिवसांचे / दारूच्या बैठकींचे इत्यादि सर्व लिखाण समजा त्या सदरात टाकले, तर येथील साहित्यप्रेमींना त्यांना आवडणार्या साहित्याचा अनिर्बंध आस्वाद घेता येईल.
- (कल्पक) सर्किट
15 Jul 2008 - 2:03 am | प्राजु
एक सुधारणा..
नवे सदर जरूर चालू करावे आणि मुख्य पृष्ठावर दिसावेही पण त्याला नाव आपापसांत नको. कारण आपापसात फक्त भांडणेच होतात असं माझं मत आहे..(बाकी कुणाचं वेगळं असू शकतं.) त्याला नाव.. " आम्ही जमतो तेव्हा" हे किंवा यासारखे नाव असावे..
ज्यांना जे वाचायचं आहे ते , ते वाचतच असतात आणि प्रतिक्रियाही देत असतात. आणि ट्रॅफिक जाम होतो आहे याचा अर्थ मिपा उत्तरोत्तर लोकप्रिय होत आहे असाच आहे.
तात्या, यांत इतका काथ्याकूट करण्यासारखे काय आहे हो?? तुमचा वेळ जात नाहिये का? आणि हा धागा सुरू करून कशाला ट्रॅफिक अडकवला??
- (सर्वव्यापी) प्राजु
15 Jul 2008 - 5:50 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
"मी 'मिपावर ट्रॅफिक जॅम होतो आहे' हे केवळ गंमतीने म्हटलेलं आहे. माझी कुणाविषयीही काहीही तक्रार नाही! लोकांनी इथे भरभरून लिहावं असंच मला वाटतं!"
हे आपलं लेखन वाचून मला खूपच बरं वाटलं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Jul 2008 - 11:48 pm | ऋषिकेश
इथलं लिखाणं-ट्रॅफिक कमी होईल असं काहि करू नका ही विनंती!
ज्यांना जे लिहायचं आहे ते लिहु द्या.. ज्यांना वाचायचय त्यांना ते वाचू द्या! असं एका हव्याहव्याश्या मर्यादेत हवं ते करता येणारं हे एकमेव संस्थळ आहे ते तरी आहे तसेच ठेवा हो !प्लिज :)
हे काहि केवळ "स्थितप्रज्ञ" लोकांच्या तथाकथित उच्च साहित्याला वाहिलेलं स्थळ नव्हे. घरात आपण जसं कोणत्याही विषयावर एका मर्यादेत बोलतो तसंच हे आहे. घरातील प्रत्येक जण अभ्यासपूर्ण/उच्च साहित्य-मुल्याचे बोलेलच असे नव्हे. इतर स्थळांच्या उच्च साहित्यमुल्यांचं दडपण इथे नसतं म्हणून तर प्रत्येक जण इथे काहितरी लिहितो. मग ते कधीकधी कैच्या कै का असेना... हे स्थळ प्रत्येकाला लिहितं करतो हेच मिपाचं यश आहे;) आणि ते टिको अशी सदिच्छा!
तात्या,
तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू ;) (ह. घ्यालच)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
14 Jul 2008 - 11:51 pm | चतुरंग
तात्या,
तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू (ह. घ्यालच)
हे एकदमच आवडलं! ;)
(स्वगत - अनुष्का वहिनींना मराठी येतं का? :? )
चतुरंग
15 Jul 2008 - 1:05 am | टारझन
तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू (ह. घ्यालच)
बोला कोण तयार आहे २० रुपये रोजी आणि १ कोप च्या वर वाचावाची( बा'चा बा'ची नाव्हे) करायला ?
जल्ला ... वर्गणीचा ऊपाय लई बेस.... पहील्या ३० ओळी फुकट,,,मग दर ओळीवर १० रुपये. अबबं नको. ते क्रमशःवाले ट्राफिक जामच करतील मग !
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
साईडबिजनेसः आम्ही रॉकेटचे सुट्टे पार्ट होलसेल भावात ईकतो
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
20 Jul 2008 - 7:56 pm | देवदत्त
माझेही तेच हाल आहेत. आधीप्रमाणे मिसळपाव हॉटेलात पडीक राहता येत नाही. ;)
(आमच्या हॉस्टेल मधील काही मुले नेहमी सर्वात आधी मेस मध्ये जाऊन बसायची. खाण्यासाठी किंवा टीव्ही बघण्यासाठी. त्यांना मग एक मुलगा भट्टी (जसपाल भट्टी नव्हे, किचनमधील चुलीप्रमाणे) म्हणत असे.)
एवढे लेख/प्रतिक्रिया येत आहेत की संध्याकाळी येऊन बघावे तर लक्षात असलेला लेख २ ३ पाने मागे गेला असतो. आणि नवीन लेख वाचून, मग जमल्यास प्रतिक्रिया देण्यात मागील लेख विसरून जातो :(
सध्या तर सर्वात वर असलेल्या लेखनाचेच वाचन प्राप्त होते.
अर्थात हे चांगलेच आहे म्हणा. असेच वेगवेगळे लेखन येऊ द्यात.
आम्हालाच विचार करावा लागेल सर्व वाचन कसे करावे ते :)
मिपाचा RSS Feed दुवा आहे का? असल्यास काय? जेणेकरून थेट मिपावर न येता वेगळ्या प्रकारेही येथील लेखनांचा मागोवा घेता येईल.