गाभा:
ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
स्वातंत्रवीर सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर ( क्रांतीवीर श्री गणेश दामोदर सावरकर) यानी ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व या नावाचे एक पुस्तक लिहिले होते. येशू ख्रिस्त हा हिंदु, तमिळ ब्राह्मण होता असे त्याना संशोधनात आढळले म्हणे.
या पुस्तकाचे डॉ. पी व्ही वर्तक यानी इंग्रजीत भाषांतरही केलेले आहे. जिसस द ख्रिस्त वॉज अ हिंदु या नावाने .jesus the christ was a hindu
http://www.drpvvartak.com/photogallery.asp यात अदर फोटो गॅलरीत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.
http://www.theindianbooks.com/books.php?id=39266
या पुस्तकांबाबत कुणाला माहिती आहे का? येशू हा खरोखरच हिंदु होता का?
प्रतिक्रिया
24 Oct 2011 - 11:13 am | मदनबाण
येशू हा खरोखरच हिंदु होता का?
ह्म्म्,माहित नाही ! पण बरेचसे हिंदू मोठ्या संख्येने ख्रिस्ती होत आहेत मात्र.
24 Oct 2011 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा
सत्यं वदाऽ धर्मँ चराऽ...
धर्मातलं चरचरीत सत्य मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...
24 Oct 2011 - 11:31 am | वेताळ
कशी काय आली बुवा.ख्रिस्त किंवा पैगबंर हे पुर्वीचे हिंदुच होते. महान धर्माला कंटाळुन त्यानी इतर धर्माचे शोध लावले.
24 Oct 2011 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
9 Aug 2012 - 9:03 pm | आबा
:)
24 Oct 2011 - 11:44 am | नेत्रेश
जगातील सर्वच लोक जन्मतः हिंदुच असतात. नंतर ते बप्तिस्मा, वगैरे घेउन आपला धर्म बदलतात. :)
24 Oct 2011 - 12:16 pm | मदनबाण
पैगबंर हे पुर्वीचे हिंदुच होते.
काही दिवसां पूर्वी जालावर विक्रमादित्य विषयक वाचन करत होतो... असेच वाचन करता करता एक नविन गोष्ट वाचनात आली,ती म्हणजे सौदी अरेबियात असलेल्या काबात राजा विक्रमादित्याचे काही गोल्ड स्क्रीप्ट्स मिळाले होते.
पी.एन.ओक यांची काबा थेअरी देखील सापडली,ती अजुन वाचायची बाकी आहे.
काबा द हिंदू टेंपल असे गुगलल्यावर बरीच माहिती सापडले.
वाचकांसाठी काही दुवे :--
http://answers.yahoo.com/question/index?qid=20091214130908AAjO9GE
http://en.wikipedia.org/wiki/P._N._Oak
जाता जाता :--- एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली... हिंदू देवळाला प्रदक्षिणा घालतात,पण मुस्लीम लोक तसे मशिदीच्या बाबतीत किंवा इतर कुठल्या दर्गा वगरै ला प्रदक्षिणा घालताना दिसत नाहीत्.पण काबात ते फेर धरुन गोल फिरतात, उलट्या प्रदक्षिणा ७ वेळा घालतात ! (त्याला तवाफ असे काहीसे म्हणतात) असे का असावे बरं ?
24 Oct 2011 - 12:15 pm | शिल्पा ब
युट्युबवर मी बरेच " मध्यपुर्वेतील लोक आर्य आहेत" , " हिंदु हेच आर्य" वगैरे बघितलंय त्यातलाच प्रकार.
ख्रिस्त जर हिंदु होता तर ज्यु हे पुर्वी हिंदु होते असाही अर्थ होतो...पण गंमत म्हणजे हिंदु नावाच धर्म अस्तित्वातच नव्हता. सिंधु नदिच्या काठी राहणारे लोक त्याचेच नंतर हिंद- हिंदु झालं.
हिंदु धर्मात कोणताही धर्मग्रंथ नाही, प्रेषित नाही, कोणतेही बंधनं नाहीत. जे बंधनं आपल्याला माहीत आहेत ते मुस्लिम, इंग्रजी आक्रमणानंतर आलेले आहेत...निश्चित माहीती माहीतगार सांगतीलंच.
24 Oct 2011 - 12:23 pm | विजुभाऊ
शिल्पा तै हिंदुंच्यात भुते/मृतात्मे वगैरे संकल्पना देखील नव्हत्या. त्या देखील पश्चिमेकडून झालेल्या आक्रमणानंतर आल्या.
24 Oct 2011 - 1:05 pm | अजातशत्रु
चालू द्या....
सर्वांना शुभेच्छा "दिपावलीच्या"
(कसाब अन अफझल गुरुही पुर्वाश्रमीचे हिंदू होत :) )
24 Oct 2011 - 1:53 pm | चिरोटा
पुस्तक वाचायलाच हवे.तामिळ ब्राम्हण होता तर त्याचा जन्म कुठला? बेथ्लेम्,रोमन साम्राज्य की सेलम, मदुराई? की त्याचे पूर्वज टॅमब्रॅम होते?
24 Oct 2011 - 7:59 pm | lakhu risbud
तामिळ ब्राम्हण ...........................
त्याची नाडीपट्टी नक्कीच असणार.येशू ने स्वतःच लिहून ठेवली असेल बाब्बा. Calling विंग कमांडर शशिकांत ओक over & out.
24 Oct 2011 - 2:46 pm | मैत्र
वर्तक म्हणजे तेच ना ते मंगळावर बागेत फिरून येणारे?
मस्तच.. कोण म्हणत होतं की मराठीत चांगलं लेखन होत नाहि म्हणून ??
24 Oct 2011 - 5:09 pm | JAGOMOHANPYARE
हो तेच वर्तक.. योगमायेने सूक्ष्म शरीर घेऊन मंगळावर फिरून आलेले वर्तक.. वो वर तक गये थे.. :)
पण हे पुस्तक मात्र बाबाराव सावरकरांचे आहे, डॉ. वर्तक यानी फक्त भाषांतर केले आहे.
24 Oct 2011 - 5:18 pm | दिगम्भा
गोपाळ विनायक नव्हे हो, ते
गणेश दामोदर सावरकर होते.
अर्थात पुस्तक त्यांनीच लिहिले आहे किंवा कसे ते माहीत नाही.
24 Oct 2011 - 6:01 pm | JAGOMOHANPYARE
हो. बरोबर... गणेश दामोदर सावरकर असेच हवे.. आता दुरुस्ती कशी करायची?
24 Oct 2011 - 5:25 pm | दादा कोंडके
आवो येका शबुदवरून भांडान होउ लालय, आन तुमी खंप्लीट बुकाचं सांगताव.
29 Oct 2011 - 12:20 am | भास्कर केन्डे
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. आता त्यात जन्माच्या गुढाची भर पडली असे दिसते. :)
या व्यतिरिक्त तो भारतात येउन गेला असे म्हणणारे काही तज्ञ आहेत तर तो केवळ येऊन गेलाच नव्हे तर पुन्हा आला आणि इकडेच मेला असे म्हणनारे सुद्धा काही आहेत.
माझ्या भावाने एका पुस्तकातला संदर्भ दिला होता त्यातील आशय असा - येशू भारतात येऊन तक्षशीला वगैरे मोठमोठ्या विद्यापिठातून आणि गुरुकुलातून शिकला. त्याला लक्षात आले की येथे आपण जन्मभर रहिलो तरी आपल्याला विषेश असे महत्व मिळणार नाही कारण इथे आपल्यापेक्षा महान अभ्यासू लोक ठिकठिकाणी आहेत. आणि म्हणून त्याने अविकसित अशा मध्यपुर्वेकडे आणि युरोपाच्या दिशेने आपला मार्ग पकडला. तिकडे जाऊन त्याने शिकलेले ज्ञान लोकांना शिकवायला सुरु केले आणि नावारुपास येऊ लागला. त्याने सांगितलेले ज्ञान पुढे बायबल स्वरुपात आले. त्यामुळे बायबलातील सुत्रे ही भगवतगीतेचेच अपूर्ण+बदललेले भाग असल्यासारखी वाटतात असे लेखकाने काही संदर्भ्/श्लोक देऊन सांगितले होते. त्या पुस्तकात अजून बरेच काही होते पण बालपणी वाचललेले असल्याने संदर्भ व्यवस्थित लक्षात नाहियेत. एक मात्रा आहे - त्या पुस्तकात तो भारतातच जन्मलेला होता असे कुठे म्हटल्याचे आठवत नाही. आणि पुन्हा ते पुस्तक कुठे गेले ते समजले नाही.
याव्यतिरिक्त अहमदिया चळवळीतल्या मिर्झा गुलाम अहमद यांचे "Jesus in India" पुस्तक आहे. त्यात त्यांचे म्हणने आहे की येशू काश्मिरात मेला. ख्रिस्ती लोक येशू मेला म्हणून म्हणतात तो म्हणे येशू नव्हताच. काश्मिरात त्याची कबर सुद्धा आहे म्हणे. आता बोला!
येशू मेला होता आणि तो पुन्हा भेटायला आला असे चर्चचे म्हणने आहे. याचा सारासार अर्थ काढायचा झाला तर येशू जिवंत होता आणि मारला गेला तो दुसराच कुणीतरी. त्याकाळी येशूचे फोटो प्रसिद्ध करायला संगणक व वृत्तपत्रे तर सोडाच, त्या समाजात पोस्टर्स सुद्धा लावण्याची व्यवस्था नसावी असे वाटते. अशा कोलाहलात चुकून (वा कारस्थानाने सुद्धा) कुणाला तरी येशू समजून बळी दिलेला असू शकतो.
8 Aug 2012 - 1:07 pm | पुण्याचे वटवाघूळ
अरे हा लेख इथे पण आहे वाटते. या लेखाच्या कॅटेगरीमध्ये "संस्कृती धर्म इतिहास वाङ्मय संदर्भ माहिती" बरोबरच "विनोद" असेही लिहिले असते तर ते अधिक योग्य झाले असते.
8 Aug 2012 - 7:13 pm | मन१
लेख वर आलाच आहे, तर इतरत्र दिलेली प्रतिक्रिया पेष्टावतोय.
तुम्ही बायबल(जुना करार+ नवा करार) वाचलत?(मिळेल त्या भाषेत)
हे सगळे लफडे एका गोष्टीमुळे होते आहे ते म्हणजे नव्या करारात ख्रिस्ताचा उल्लेख आहे ख्रिस्तजन्मापासून ते त्याच्या बाराव्या वर्षापर्यंत.
वय वर्ष १२ ते २८-३० जीझसचा काहीही उल्लेख नाही. गायब झालेले जोसेफ सुताराचे बारा वर्षाचे पोर अचानक तिशीला टेकल्यावरच रंगमंचावर पुन्हा प्रकटते ते ज्ञानी,तत्वज्ञ्,साक्षात्कारी वगैरे होउनच.
त्यामुळे ह्या १८ वर्षांबद्द्ल कल्प्नाशक्तीला व हवेतल्या तर्कांना फुल्ल स्कोप आहे.ह्यातले विकिवरचे http://en.wikipedia.org/wiki/Lost_years_of_Jesus हे पान उपयुक्त ठरावे.
http://en.wikipedia.org/wiki/Mormonism इथे म्हटल्याप्रमाणे जीझस हा फार पूर्वी तत्कालिन जगाला ज्ञात नसलेल्या अमेरिकेला दर्शन देउन गेला होता!!
कित्येक आधुनिक मुस्लिम नवधार्मिक समजुतींनुसार इस्लामचे महंमदाच्यापूर्वीचे प्रवक्ते भारतात येउन गेले. त्यांनी सांगितलेला पवित्र संदेश भारतीयांनी पार विद्रूप करून वेगळ्याच रुपात लिहिला, तो म्हणजे भारतीयांची मूर्तीपूजा व वेद. त्याचा मूलाधार हा महंमदापूर्वीचे प्रेषितच होते!!(१,२४,००० हा प्रसिद्ध प्रेषितांचा आकडाही ते लग्गेच तोंडावर फेकतात.)
थोडक्यात हल्ली सर्वच नवधार्मिक लोक आमचा धर्म मूळ्,शुद्ध वगैरे होताच, व इथूनच दुसरीकडे गेला. पण थोडासा बदललेल्या व छेडछाड केलेल्या रुपात प्रचलित झाला हे अहमिकेने सिद्ध करु पाहतात. सर्व बाजूंनी भरपूर वाद्-विवाद व व्यर्थ श्रम होतात. ही थिअरीसुद्ध त्यातीलच एक वाटते आहे.
भाषांतील साम्ये, आहारविहारातील तुरळक साम्ये ह्यांनी ठाम तर्काप्रत येणे म्हणजे गंमतच आहे. कुणी हेच संबंध वापरुन जीझस काश्मीरला येउन गेला म्हणतो, कुणी म्हण्तो तो पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरात राहिला, कुणी म्हणतो तो तिबेटला जाउन बौद्ध तत्वज्ञान शिकून आला, आणि आता हे:- तामिळी ब्राम्हण प्रकरण. ह्या सर्वांस म्हणतात conspiracy theory. असलेल्या अंधारावर कल्पनांचे इमले चढवण्याचा हा उद्योग आहे.
पूर्वी सात्-आठ वर्षापूर्वीपर्यंत मीही असल्या प्रकारांनी फार प्रभावित वगैरे होत असे.नंतर समजले सिद्ध करायचेच तर काहीही करता येइल.
(हो. का ही ही. "मराठी वाङ्मयाचा गाळिव इतिहास" ह्यात पुलंनी "टपाल" ह्या प्राकृत शब्दापासून "पोस्ट" हा शब्द कसा आला ते "सप्रमाण" सिद्ध केले आहे!)
कालच माझ्या कंपनीत पुस्तक प्रदर्शनातील सात्-आठशे पानांचे पु ना ओक ह्यांचे धम्माल पुस्त्क फुक्टात वाचून काढले.त्यांच्या म्हणण्यानुसार आमचे थोर पूर्वज भारतातच नव्हे तर सर्वत्र पसरले होते्ए सर्वत्र म्हणजे मला पामराला पाक्-अफगाण्,नेपाळ म्यानमार किम्वा कंबोडिया वगैरे वाटले. पण ओक काकांनी नुसते शब्द शब्द वापरून दक्षिण अमेरिकेतील माया इंकाही कसे आर्य आहेत्,उत्तर अमेरिकेतील रेड इंडिअन्स कसे आर्य आहेत्,चीन्-जपान, सर्व स्कँडिनेविअन देशही कसे वैदिकच आहेत हे सांगायला सुरुवात केली. अरे समुद्राबाहेर राह्णार एसगळेच वैदिक होते असा निश्कर्ष काढायचा का? तुम्हाला वाचायचे असेल तर वाचा खुशाल. झंडु बामचा खप वाढेल तितकाच
अर्थात आधी इतका टायपून टायपून प्रतिसाद दिला आणी नंतर जाणवलं की जामोप्यांची शैलीच मुळात खोचक आहे आणि धागा मुद्दम उफासत्मक काढलाय.आणि काडी टाकून दिल्यानंतर नुसतीच मज्जा ते बघताहेत.
8 Aug 2012 - 8:37 pm | आंबोळी
धागा मुद्दम उफासत्मक काढलाय.आणि काडी टाकून दिल्यानंतर नुसतीच मज्जा ते बघताहेत.
मनोबांना झालेल्या साक्षात्काराबद्दल त्यांचे अभिनंदन!!!
हा सक्षात्कार जामोप्याला हिरीरीने प्रतिसाद देणार्या सर्वांना लवकरच होवो ही त्या सर्वधर्मिय जगन्नीयांत्याचरणी प्रार्थना!!!
8 Aug 2012 - 10:49 pm | आनंदी गोपाळ
पण ते जामोप्या नामक रसायन तुम्हाला उमजेल तर मज्जा येईल.
हिरीरीचे प्रतिसाद येण्यासाठी नेमक्या नसेवर बोट ठेवून साद घालण्याची त्यांची हुनर सहजी येत नाही सायबा!
(आनंदाने जामोप्या फ्याण झालेला) आनंदी गोपाळ
8 Aug 2012 - 10:22 pm | पुण्याचे वटवाघूळ
हो अगदी. व्हॅटिकन सिटी म्हणजे वेदवटी, कॅन्टरबरी म्हणजे कृष्णकुटी इतकेच काय तर क्रिश्चिअॅनिटी म्हणजे कृष्णनीती अशा प्रकारचे उल्लेख त्या पुस्तकात होते. मला वाटते पु.ना.ओकांच्या त्या पुस्तकाचे नाव "भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका" की तत्सम काही होते. वाचून खूप मनोरंजन झाले होते. तसेच प.वि.वर्तकांनी पाताळ म्हणजे अमेरिका हे छातीठोकपणे म्हटले आणि इतकेच काय तर सूक्ष्मदेहाने आपण गुरू आणि इतर ग्रहांवर जाऊन आलो आहोत असाही दावा केला. त्यांना एकदा मला सांगायचे आहे-- गुरू/शनीचे सोडा माझ्या घरी कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे त्यांनी सांगावे.
9 Aug 2012 - 12:07 am | वीणा३
एकदा एका देवळात गेले असताना तिथे आपल्या नेहमीच्या देवांबरोबर दक्षिणेकडचे आणि उत्तरेकडचे बरेच देव होते. त्यातल्या कित्येकांची नावंहि माहित नव्हती. खाली त्यांच्या माहितीत लिहिलं होतं कि विष्णूचा अवतार, शंकराचा अवतार, कोणाचीतरी बहिण कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी अंश. अपोआप हात जोडले गेले.
मनात आला कि ऋषीमुनी ज्यांनी हा हिंदू धर्म बनवला, पसरवला ते खरच खूप हुशार असावेत. देवासाठी कोणी भांडू नये म्हणून सगळ्यांची एकमेकांशी अशी नाती जोडून टाकली कि सगळे देव सगळ्यांनाच आपले वाटावेत. कोणालाही तुमचा देव वाईट आमचेच तेवढे चांगले असं सांगितलं नाही. बाकी पद्धती ज्याच्या त्याच्या राहू दिल्या. कुठे देवाला नैवेद्य म्हणून मोदक दाखवतात तर कुठे मासे तर कुठे बकरा कापतात. कुठल्या तरी छोट्या गावातला एखादा छोटं दगड पण कोणाचा तरी अवतार असतो. बहुतेक कुणावरही श्रद्द्धा ठेवा पण ठेवा असाही विचार असेल कदाचित.
कधी कधी तर वाटत कि जेंव्हा हिंदू धर्म तयार होत होतं तेंव्हा त्यांना ख्रिस्चन धर्म बद्दल आणि जीजस बद्दल कळलं असत तर येशू च्या हातात पण एखादा त्रिशूल किंवा सुदर्शन चक्र देऊन कोणाचा तरी अवतार बनवून टाकला असत.
9 Aug 2012 - 4:36 pm | बॅटमॅन
हेच खरंय!!! सांस्कृतिक एकीकरणाची अशी खतरनाक क्लृप्ती त्या आधीच्या ऋषीमुनींनी काढलीये की आपण त्यांचे फ्यान हौत.
आयला तुम्ही मनकवड्या आहात की काय ????? माझ्या अग्ग्ग्ग्ग्गदी मनातला विचार आहे हा :) प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी एके ठिकाणी सहीसही हेच म्हटले होते तेव्हापासून हा विचार मनात रुतून बसलाय अगदी.
9 Aug 2012 - 8:29 pm | वेताळ
येशु खिर्स्त- यशोदा कृष्ण
अपभ्रंश केला युरोपियन लोकानी.
वैदिक लोक सर्व जगात पसरले होते पण डायनोसॉर प्रमाणे ते नष्ट झाले,शिल्लक आहेत ते आता फक्त भारतात राहतात.