मराठी विश्वकोष जालावर सादर

यकु's picture
यकु in काथ्याकूट
27 Oct 2011 - 4:40 am
गाभा: 

आत्ता म.टा. वर विश्वकोश जालावर सादर झाल्याची बातमी वाचत होतो. तिथूनच मराठी विश्वकोषाची साईट उघडली. पण मध्येच म.टा. वरची बातमी कुठे गेली कुछ पता नहीं. त्यामुळे विश्वकोषाच्या साईटवरुन अध्यक्षांचे मनोगत चोप्य-पस्ते केले आहेत.

मराठी विश्वकोष आता जालावरही उपलब्ध झाला आहे. सध्या एक खंड उपलब्ध दिसतो; लवकरच इतरही उपलब्ध होतील अशी सूचनाही आहे.
मराठी विश्वकोष जालावर उपलब्ध झाल्याने मराठीतील संदर्भ शोधण्याचे काम फारच सुलभ होईल. लवकरच पूर्ण खंड जालावर पडोत ही अपेक्षा.

||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||

घराघरात विश्वकोश'

(एक ऐतिहासिक दस्तऐवज)

प्रिय वाचकहो ! ,
'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच.

पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासानाच्या वतीने मराठी विश्वकोश) त्यांचा ६ सीडींचा ४५० ग्रॅम वजनाचा सीडी संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) अशा १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेले) २०,१८२ पाने समाविष्ट केली. जी संगणकावर कधीही बघता येतात. ह्यासाठी संगणक तज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.

घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत त्या स्वरुपात महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. तेही युनिकोडमध्ये, सीडॅकच्या सहकार्याने. विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो १ ते १६ खंडांचा ज्ञानाचा खजिना तयार केला तो आता ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तरी त्याचे महत्त्व कालातीत आहे आणि म्हणूनच इतिहासाच्या या सोनेरी खुणा आपण जतन करीत आहोत. भविष्यात पर्याप्त स्वरुपातील (अपडेटेड) विश्वकोशही याच माध्यमातून जगास स्वतंत्रपणे व मोफत अर्पिला जाईल. आज घराघरात इंटरनेट पोहोचले आहे. घराघरात संगणक आहेत. आपण त्यावर ज्ञानाचा खजिनाच उमलत्या पिढीस उपलब्ध करुन देत आहोत. त्यापैकी आजमितिस पहिला खंड युनिकोडमध्ये जसा आहे त्याच स्वरुपात तयार आहे. चित्रांसकट. जो शब्द हवा त्यावर क्‍लिक करा. सर्व माहिती उपलब्ध! तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार हे विश्वकोशाचे ब्रीद आहे. यानंतर प्रतिमास १ खंड असे १५ महिन्यात डिसेंबर, २०१२ पर्यंत संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून सीडॅकच्या सहकार्याने विश्वकोश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल. अर्थात् त्याने ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाहीच. पण केव्हाही, कुठेही हा ज्ञानमित्र उपलब्ध होतोय हीच आनंदाची बाब. माननीय डॉ. जयंत नारळीकर, विजया वाड, स्‍नेहलता देशमुख, अरुंधती खंडकर, रा.ग.जाधव, भालचंद्र नेमाडे यांनी या प्रकल्पास व्हिडिओ शुभेच्या दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दस्तावेज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच जगास मोफत अर्पण होत आहे. 'घराघरात विश्वकोश' ह्या आमच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in किंवा www.marathivishvakosh.in असा आहे.

आपली,
डॉ. विजया वाड,
अध्यक्ष विश्वकोश निर्मिती मंडळ

http://www.marathivishwakosh.in/ वरून साभार

प्रतिक्रिया

विकास's picture

27 Oct 2011 - 7:30 am | विकास

स्वागतार्ह प्रकल्प! येथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

सुहास झेले's picture

27 Oct 2011 - 11:45 am | सुहास झेले

एकदम स्तुत्य उपक्रम. इतर खंडाची वाट बघतोय. यशवंता धन्स रे माहितीबद्दल... :)

मेघवेडा's picture

27 Oct 2011 - 5:46 pm | मेघवेडा

असेच म्हणतो. अत्यंत स्पृहणीय उपक्रम आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2011 - 9:30 pm | बिपिन कार्यकर्ते

बातमी पोचवल्याबद्दल धन्यवाद!

प्रास's picture

28 Oct 2011 - 6:14 pm | प्रास

यकुशेठ,

मध्यंतरी शिवतीर्थावरच्या कोणत्यातरी सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने भरलेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये पूर्वी अनेक वर्ष उपलब्ध नसलेले विश्वकोशाचे पहिले पाच खंड मिळाले आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व १८ खंडांच्या सीडींचा सेटही मिळाला. सीडींवर मराठी विश्वकोश कधी उपलब्ध होईल असं वाटलंच नव्हतं पण पहिल्या पाच खंडांच्या पुनर्प्रकाशनाइतकाच सीडींची उपलब्धी हा देखिल आश्चर्याचा सुखद धक्का होता. तेव्हाच कधी ना कधी विश्वकोश आंतरजालावर दिसेल याची कल्पना आलेली पण सरकारी खाक्याची माहिती असल्यामुळे त्याचीही इतक्या लवकर कार्यवाही होईल असं वाटलं नव्हतं.

उरलेले खंडही लवकरात लवकर प्रकाशित व्हावे आणि जनसामान्यांनीही सीडींचा आपल्या घरी संग्रह करावा अशीच अपेक्षा आहे.

प्रत्येक मराठी घरात मराठी विश्वकोश आणि संस्कृतिकोश असायलाच हवा या मताचा मी आहे.

पुन्हा एकदा या प्रकल्पाला शुभेच्छा!

:-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2011 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व १८ खंडांच्या सीडींचा सेटही मिळाला.
पत्ता मिळेल काय ? घेईन म्हणतो.

बाकी, बातमी माहिती होतीच पण मिपावर माहिती डकवल्याबद्दल यकुचे आभार......!

-दिलीप बिरुटे

प्रास's picture

28 Oct 2011 - 7:12 pm | प्रास

नमस्कार बिरुटे काका,

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा पत्ता खालील प्रमाणे आहे -

सचिव, म. रा. म. वि. नि. मं.
रवीन्द्र नाट्य मंदिर,
दुसरा मजला, सयानी मार्ग,
प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५

दूरध्वनि क्रमांक - ०२२ २४२२९०२०

दुरुस्ती - सीडींच्या सेट मध्ये प्रकाशित झालेले विश्वकोशाचे १७ खंड उपलब्ध आहेत. १८ वा खंड आधीच प्रकाशित झालेला मात्र तो 'मराठी व्यावहारिक शब्दकोश' स्वरुपात असल्याने त्याचा समावेश या सीडींच्या सेट मध्ये केला नसल्याचे संबंधितांनी त्या संदर्भात मी विचारल्यावर मला सांगितले होते.

नक्की घ्या. महादेव शास्त्रींचा संस्कृतिकोशही घ्या. मला स्वतःला विश्वकोशापेक्षा मराठी संस्कृतिकोशाचा जास्त उपयोग झालाय आणि १० खंडांचा हा संस्कृतिकोश सहज उपलब्धही आहे.

:-)

प्रास..
आम्ही महाराष्ट्र शासनाच्या शब्दकोशांचे निष्ठावान फॅन आहोत..
शासन व्यवहार शब्दावली..
प्रशासनिक वाक् प्रयोग..
क्षेत्रनिहाय (लै दिवसांनी लिहीला हा शब्द) पारिभाषिक शब्दकोश .. हे शब्दकोश किमतीने स्वस्त
आणि शेकडो वर्षांपासुन वापरात असलेल्या कित्येक इंग्रजी शब्दांना शासनमान्य असणारे अस्खलीत मराठी शब्द पहायचे असतील तर या शब्दकोशांना पर्याय नाही..

तुम्ही विश्वकोशाचे अख्खे खंड विकत घेतले म्हणजे हॅट्स ऑफ..
एकदा हाताळुन पहायला येईन.. :)

प्रास's picture

28 Oct 2011 - 11:48 pm | प्रास

मुंबईत केव्हाही आलात तरी आम्हाला सेवेचा मौका द्या.

:-)

उपयुक्त माहिती इथे दिल्या बद्धल धन्यवाद. :)

पैसा's picture

29 Oct 2011 - 8:06 pm | पैसा

माहितीसाठी धन्यवाद!