राम राम मंडळी, आपले एक जेष्ठ मिपाकर आणि आमचे जेष्ठ मित्र श्री प्रमोद देव यांनी मला फेसबूकवरुन एक चित्र पाठवलं आणि दिव्य मराठीची बातमीही पाठवली त्या बातमीत ई-दिवाळी अंकाची बातमी आहे. विविध मराठी संकेतस्थळांच्या ई-दिवाळी अंकाच्या वैशिष्ट्यांबाबत छापून आले आहे. तसेच न निघालेल्या आपल्या मिसळपावच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्येही छापून आले आहे. मजकूर असा आहे - :)
बातमीचा दुवा
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-e-diwali-magazine-ma...
” मिसळ पाव’च्या ई-दिवाळी अंकात आवाहनाच्या कॉलममध्ये जन्मातलं, मनातलं, प्रेम म्हणजे प्रेम अशी सदरे आहेत. या व्यतिरिक्त देवस्थानाचा जन्म या सदरात धार्मिक व कृषिविषयक सदरांत कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे. एक रम्य संध्याकाळ, दुपट्टय़ाचे कागदावर काढलेले नमुने हे सदरही वाचनीय झाले आहेत.”
तसेच....
मिसळ पाव या ई-दिवाळी अंकात चिंतामणी, जयंत कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी या नवोदित लेखकांनी ‘पुन्हा एकदा अण्णा हजारे’ यात जनलोकपाल विधेयकासाठी झालेले आंदोलन, भ्रष्टाचार, विविध घोटाळ्यांनी झालेला राजकीय हाहाकार यावर भाष्य केले आहे.
तर मिपाकर मंडळी सदरील बातमीवर आपली काय प्रतिक्रिया आहे. करिता हा प्रपंच. :)
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 11:15 am | चेतन सुभाष गुगळे
संपादक मंडळातील ज्येष्ठ सदस्य या नात्याने तुम्ही किंवा दिव्य मराठीचे पत्रकार या नात्याने श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी यांनीच खुलासा करायला हवा.
यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया निदान या क्षणी तरी मी देऊ शकत नाही.
27 Oct 2011 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपावचा दिवाळी अंक काढायचा ठरले असते तर तशी रीतसर घोषणा नीलकांत यांनी ( सरपंचांनी ) केली असती ना ? आम्ही संपादक आणि सल्लागारांनी सर्व मिपाकर लेखकांना अजून लेखन पाठविले की नाही अशी सतत विचारणाही केली असती. केली असती की नाही ? तेव्हा आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक निघालेला नाही. भविष्यात असा अंक काढणे काही अवघड नाही. तुर्तास असा आपला काही ई-दिवाळी अंक निघालेला नाही, हे आपणास कळवू इच्छितो.
श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी यांनीच खुलासा करायला हवा.
यशवंता आता इंदुरात वेब दुनियेत आहेत असे म्हणतात. दिव्य मराठी त्यांनी केव्हाच सोडले आहे. बाकी यशवंत सदरील बातमीच्या निमित्ताने दोन शब्द व्यक्त करील यात काही वाद नाही. :)
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 1:41 pm | यकु
मी काय डोंबल शब्द व्यक्त करणार अशा न घडलेल्या बातमीवर? ;-)
तिथे असतो तर नक्कीच बातमी दुरुस्त केली असती..
हे त्यांनी वाचले तर या बातमीच्या 'उपसंपादकाचा' आज यथोचित सत्कार होईल हे नक्की
तिथे बातम्या 'घडविण्यास' शिकवले जाते एवढेच सांगतो.
बाकी http://www.berkya.co.cc/ हे महाशय इथे रोज अशा संपादकीय डुलक्या लागल्या की फटाके वाजवण्याचे काम करतात.. कुठल्याही पेपरची गय करीत नाहीत ते बरे आहे..
दुवा ऑनलाईन पोर्टलचा आहे.. छापील अंकात छापली असेल तर आणखी मनोरंजक बातमी असेल..
27 Oct 2011 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 6:09 pm | यकु
असं होऊ नये म्हणून मी हफिसात मराठी साईट्स प्रमोट करत असतो..
तिथे होतो तो पर्यंत सहकारी/रिणींना मिपावरचे इरसाल लेख दाखवून खसखस पिकवायचो..
या लोकांना नेहमीची साईट कोणती आणि दिवाळी अंक कोणता याचं ध्यान नाही...
दिसलं की टाकली जागा भरुन..
असो.
संपादकांना समस केलाय.. ते बिचारे म्हणतील एरव्ही चांगल्या गोष्टीसाठी कधी फोन करीत नाही.. टेन्शन द्यायला मात्र करतो..
27 Oct 2011 - 6:32 pm | चेतन सुभाष गुगळे
<< संपादकांना समस केलाय.. ते बिचारे म्हणतील एरव्ही चांगल्या गोष्टीसाठी कधी फोन करीत नाही.. टेन्शन द्यायला मात्र करतो.. >>
संपादक म्हणजे केतकरच ना? मग हे ठीकच आहे. फक्त ते खरंच "बिचारे" आहेत का अशी शंका येते.
27 Oct 2011 - 6:35 pm | वाहीदा
‘मिसळ पाव’च्या ई-दिवाळी अंकात आवाहनाच्या कॉलममध्ये जन्मातलं, मनातलं, प्रेम म्हणजे प्रेम अशी सदरे आहेत. या व्यतिरिक्त देवस्थानाचा जन्म या सदरात धार्मिक व कृषिविषयक सदरांत कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे. एक रम्य संध्याकाळ, दुपट्ट्याचे कागदावर काढलेले नमुने हे सदरही वाचनीय आहेत.
यशवंत,
तुम्ही समस दिला पण, त्यांच्या लेखणीची बोबडी वळलेली दिसतेय.. तुम्ही खुप फायर केले का ?
जन्मातलं, प्रेम म्हणजे प्रेम हे सदर कुठे आहे ब्बॉ ?
देवस्थानाचा जन्म या सदरात धार्मिक व कृषिविषयक सदरांत ..म्हणजे नक्की कुठल्या सदरात , कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे. ??
=)) =))
27 Oct 2011 - 6:57 pm | यकु
नाही.. केतकर नाही.. ते मुंबईत असतात..
स्थानिक संपादक आहेत त्यांना टाकलाय समस
असली काही ना काही लफडी दररोज सुरु असतात.. आणि ते सगळं संपादकांकडे येतं..
पुन्हा बेरक्या आहेच राहिला साहिला.. म्हणून
वाहिदा,
आजच्या अंकात अशी अशी बातमी छापून आलीय.. आणि त्या चुकीच्या बातमीवर लोकांनी ऑनलाईन चर्चा सुरु केलीय असे सांगितले... बातमी लिहीणार्या/रीने वर वर साईट बघितली असेल आणि लिहीलं असेल जे डोक्यात शिरलं तेवढं
मागे एकदा राज ठाकरे गुजरात दौर्यावर गेले तो फोटो छापला तेव्हा कॅप्शनमध्ये राजसोबत उद्धव ठाकरेंच्या पत्नीचं नाव छापलं होतं...
सकाळी कार्यकर्ते येऊन धडकले.
बिल्डींगच्या पायर्यावर कुणी थुंकू नये म्हणून लोक देवाचे फोटो लावतात... ही चांगली युक्ती आहे अशी एक बातमी मागे छापली होती..
सकाळी सनातन प्रभातचे कार्यकर्ते त्यांनी बिल्डीगांमधून जमा केलेले देवादिकांचे फोटो घेऊन आले.. लोक त्या फोटोवरही थुंकले होते...
फार गरमा गरमी झाली...
अशा परिस्थितीत संपादकांनाच सगळ्यांना तोंड द्यावं लागतं..
27 Oct 2011 - 8:41 pm | प्रचेतस
यशवंतराव, संपादकांचे किंबहुना पत्रकारीकेतलेच एकेक किस्से येउ द्यात आत की आता एका स्वतंत्र धाग्याच्या निमित्ताने.
28 Oct 2011 - 7:36 am | शिल्पा ब
है शाब्बास!!! किस्से भारी एत....वेगळा धागा काढा हे प्रेमळ फर्मान.
27 Oct 2011 - 11:16 am | सुहास झेले
सरांनू दिव्य मराठीने दिवे लावलेत हो... माफ करा त्यांना ... ;)
27 Oct 2011 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> कृषिविषयक सदरांत कापूस व धान्य उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली आहे.
मिपावर कृषिविषयक सदर वाचून माझी हहपुवा झाली. :)
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 11:29 am | इंटरनेटस्नेही
आम्ही मिपावर रोजच दिवाळी साजरी करतो - आणी रोजंच मिपाच हे दिवाळी अंकासम असतं. ;)
-
(मिपाकर) इंट्या.
27 Oct 2011 - 11:33 am | वाहीदा
मिसळ पाव या ई-दिवाळी अंकात चिंतामणी, जयंत कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी या नवोदित लेखकांनी ‘पुन्हा एकदा अण्णा हजारे’ यात जनलोकपाल विधेयकासाठी झालेले आंदोलन, भ्रष्टाचार, विविध घोटाळ्यांनी झालेला राजकीय हाहाकार यावर भाष्य केले आहे. शिवाय महिलांसाठी पाककृती, माहेर, सारखी सदरेही वाचायला मिळत आहेत. यासह साहित्य, काव्य, बालकांसाठी बाल निसर्ग, सवंगडी, विरंगुळा या सदरांचा समावेशही करण्यात आला आहे.
यातील काही सदरे जसे - माहेर, बालकांसाठी बाल निसर्ग, सवंगडी, विरंगुळा तर प्रत्यक्ष मिपावर देखील नाहीत .
काहीतरी गौडबंगाल आहे खरे !
27 Oct 2011 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या दोन ओळी आपल्या मिपाकरांबद्दल आहे, ते बरोबर आहे. पण राहीलेल्या दोन ओळी अन्य कोणत्या तरी असलेल्या किंवा नसलेल्या दिवाळी अंकाबद्दल आहे. :)
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 12:22 pm | गणपा
आपल्या संकेतस्थळाच नाव 'मिसळपाव' आहे, दिव्य मराठीवाले बहुतेक 'मिसळ पाव'च्या दिवाळी अंका बद्दल बोलत असावेत. ;)
अधिक खुलासा तेच करु जाणे. :)
27 Oct 2011 - 12:44 pm | मन१
अशा गुप्तांकाबद्दल नवीनच माहिती कळते आहे. :)
*तुम्ही प्रतिसाद नीट न वाचल्यास प्रतिसादकाची जबबदारी नाही*
27 Oct 2011 - 1:05 pm | प्रचेतस
बातमी वाचून हसून हसून फुटलो.
बातमीपण फारच विनोदी तर्हेने दिली आहे.
आता पुढच्या वर्षी नक्कीच मिपा दिवाळी अंक निघायला हवाच.
27 Oct 2011 - 1:43 pm | इंटरनेटस्नेही
हेच म्हणतो, विशेषतः ती लेखकांची यादी म्हणजे तर.. हसुन हसुन पुरेवाट झाली. =))
(सर्व संबंधितांनी हलकेच घ्यावे अशी नम्र विनंती.)
27 Oct 2011 - 1:49 pm | मोहनराव
माझ्या पहिल्यावहिल्या "एक रम्य संध्याकाळ" या धाग्याला एवढे कोणी क्रेडिट देइल असे वाटले नव्हते. ;)
त्या धाग्याचा दिवाळीशी काही संबंधच नव्हता.
बातमी खरीच मजेशीर आहे. हहपुवा!!
27 Oct 2011 - 2:04 pm | इंटरनेटस्नेही
;)
27 Oct 2011 - 3:57 pm | सोत्रि
आवरा ह्यांना कोणीतरी :)
- ( ह्या अंकात लेख न आलेला ) सोकाजी
27 Oct 2011 - 6:26 pm | अनामिक
तुमच्या गाथेचा विशेष उल्लेख व्हायला हवा होता दिवाळी अंकाच्या उल्लेखात. सुधारणा सुचवावी काय पत्रकाराला?
27 Oct 2011 - 7:50 pm | रेवती
संपादकांना तसाही बराच मार मिळतो हे सिद्ध झाले.;)
थोड्यात त्यांना मृदुंगाची उपमा दिल्यासही चालू शकेल.
27 Oct 2011 - 7:56 pm | यकु
अगदी... अगदी..!
पण दिवसभर मन लाऊन केलेली बातमी पानावर लागूनही पेपर छापल्यानंतर ती अदृश्य असते तेव्हा याच मृदंगाची कुर्हाड झालेली असते.. ;-)
27 Oct 2011 - 7:59 pm | रेवती
हा. हा हा.
सहमत.
27 Oct 2011 - 9:15 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
27 Oct 2011 - 11:27 pm | पैसा
पुढच्या वर्षाची बातमी अॅडव्हान्स दिलेय ती. =)) =))