कुमार केतकरांनी पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेचे दर्शन केले आहे.
त्यांचे वक्तव्य वाचावे.
सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत असा दावा करणे हे फॅसिस्ट प्रवृत्तीचे लक्षण आहे . शंभर टक्के प्रामाणिक फॅसिस्ट व्यक्तीपेक्षा पन्नास टक्के भ्रष्ट राजकारणी आपल्याला चालेल , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बुधवारी केले . समाजसेवक अण्णा हजारे यांचा थेट उल्लेख न करता केतकर यांनी त्यांच्यावर तोफ डागली .
(सवीस्तर बातमी येथे वाचा)
कॉग्रेसने टिम अण्णांवर नेम धरलेला आहेच. "येन केन प्रकारेण" अण्णांचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न चालले आहेत. ही बातमी वाचल्यावर "हे वक्तव्य"सुद्धा याच "गेम प्लॅनचा भाग आहे असे वाटते.
अण्णांनी भ्रटाचारी राजकाण्यांविरूध्द मोहीम चालविली आहे. सर्व राजकारण्यांविरूध्द नव्हे. किंबहुना ही मोहिम "भ्रष्टाचारा विरूध्द" आहे. फक्त राजकिय नेत्यांचे विरूध्द नव्हे. असे असतानासुद्धा कुमार केतरांनी जी वक्तव्य केली आहेत ती कोणाच्यातरी इशा-यावर केली आहेत असे वाटते.
अण्णा आणि टिम सध्या त्यांच्यावर होणा-या हल्यांमुळे (विविध नेत्यांनी केलेला शाब्दीक आणि काहिनी केलेला शारिरीक) बावचळ्यासारखे दिसत आहेत. त्यातच टिम अण्णांच्या सभासदांच्या विवीध वक्तव्याने गोंधळात पडले आहेत. मग ते शांती भूषण असोत अथवा राजेंद्रसींह असोत.
या मोहीमेचे भवितव्य काय? भविष्यात या मोहीमेला यश येणार की नाही?
प्रतिक्रिया
22 Oct 2011 - 10:30 am | चिरोटा
विनामोबदल्यात राजकारणी लोकांची विशेषकरून काँग्रेसवाल्यांची तळी उचलून धरण्यात केतकरांनी नेहमी धन्यता मानली आहे.अण्णा हजारे ,त्यांच्या आंदोलनाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद हे केतकरांच्या पोटदुखीचे कारण आहे.देशभरातून ईतर जेष्ठ पत्रकार,संपादक हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना एका मराठी पत्रकारानेच असे लिहावे हे वाचून वाईट वाटले.
च्या*** फक्त नेहरू,गांधीनीच स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी धडपडायचे काय? आम्ही काय माणूस नाय?
22 Oct 2011 - 10:34 am | मदनबाण
हेच की व्हो. :)
23 Oct 2011 - 1:55 am | निनाद मुक्काम प...
विनामोबदला ?
ह्यावर शब्दावर आम्हाला आपत्ती आहे.
मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात. आणी मोबदला हा काही फक्त पैश्यात मोजला जात नाही.
सामान्य माणूस अहिंसक मार्गाने एवड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला ह्याबद्दल आकस वाटणे साहजिक आहे,
एकेकाळी अत्र्याच्या लेखणीने १९६० साली मराठी माणूस रस्त्यावर आला होता.
ह्यांचे लेख वाचून काही उच्चभ्रू चहाचे पेले रिते करत तावातावाने बंद दालनात चर्चा करणार.
हजारे ह्यांच्या आंदोलनात त्यांच्या विरोधाकातर्फे आपली काही माणसे ह्या आंदोलनात खुसवून त्याला हिसंक वळण ( जे हजारे ह्यांच्या तत्वाविरुध्ध आहे ) करण्याचा प्रयत्न केला नाही ह्यांचे कारण म्हणजे आण्णा गांधींच्या आदर्शाला मानतात पण ते शिवरायांना सुद्धा मानतात .मुलाखतीत रांझे पाटलाचा उल्लेख करतात.
तेव्हा त्यानी आपली चळवळ मुळीच थांबवली नसती.
22 Oct 2011 - 2:12 pm | अनामिका
गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणार्या केतकरांकडून तसे देखिल इतर कुठले मत व्यक्त करतील अशी अपेक्षा नाही..दिगविजयसिंग यांच्याप्रमाणेच केतकरांची सुद्धा बौद्धिक दिवाळखोरी अधोरेखित होतेय या लेखातून्...पारच तोल गेलाय म्हणायचा.?.....यांच्या तथाकथित त्यागमुर्ती काँग्रेसमाता सोनियादेवी यांनी आणि त्यांच्या पित्त्यांनी देश नागरिकांसकट विकून खायचाच शिल्लक ठेवलाय आता...त्यांना इथून जावेच लागले तर इट्लीत आश्रय घ्यायला जागा आहे कुमार कुठे जाणार? की हे देखिल त्यांच्याच बरोबर इटलीत राजाश्रय मिळवायची सोय करतायत?....राज्यसभेच्या उमेदवारीसाठी थोर विचारवंत म्हणवून घेणार्या एका ज्येष्ठ पत्रकाराने इतकी लाचारी पत्करावी.?
दृकश्राव्य माध्यमांच्या वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रात ५०,००० हजार रुपये घेऊन स्वतःची तथाकथित निरपेक्ष मते मांडणार्या केतकरांसारख्या विकाऊ पत्रकारांनी भ्रष्टाचाराविरोधात किंवा पत्रकारितेवर मत मांडणे म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रात आणि देशात निरपेक्ष पत्रकारितेचा पाया घातला अश्या बाळशास्त्री जांभेकर्,गोविंद तळवळकरांसारख्या थोर विभुतींच्या पत्रकारीतेचा अपमान करण्यासारखे आहे.........
22 Oct 2011 - 4:42 pm | आत्मशून्य
टीम अण्णावर चिखफेक होणार हे तर जनतेने या आधीच गृहीत धरले आहे. फार त्रास दीला जाणार हे नक्किच. अण्णांनी फक्त योग्य वेळ येताच पून्हा एकदा आवाज द्यावा मग मूर्खांना कळेल की त्यांना पाठींबा देणार्यांची व्याप्ती तर वाढलेलीच आहे ते. इथं मिपावरही त्यांच्या विरूध्द गरळ ओकणार्यांची कमतरता नाही.. पण ह्यांना पोट्शूळ कशाचा आहे तेच कळत नाही.
22 Oct 2011 - 6:16 pm | विसोबा खेचर
ते काय पण असो, आम्ही सामान्य जन अण्णांच्या सोबत आहोत..
आणि बाय द वे, तसंही बिचारे कुमार केतकर हे सोनियादिवाने आहेत. तेव्हा त्यांचं काय मनावर घेता..?
तात्या.
22 Oct 2011 - 9:19 pm | माझीही शॅम्पेन
अगदी तात्याशी १००% सहमत , सातत्याने कॉंग्रेसशी इमानी माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करणार !!!
22 Oct 2011 - 6:23 pm | स्वर भायदे
ते काय पण असो, आम्ही सामान्य जन अण्णांच्या सोबत आहोत.
22 Oct 2011 - 6:49 pm | विनायक प्रभू
आता कुमार अवस्थेत कायम असलेले दुसरे काय बोलणार?
22 Oct 2011 - 9:58 pm | जागल्या
आण्णा ते आण्णा , केतकर ते केतकर. चालायचच.
23 Oct 2011 - 2:15 pm | चिंतामणी
टिम अण्णांमधून बाहेर काढलेल्या स्वामी अग्नीवेश यांनी अरविंद केजरीवाल यांचेवर निधी स्वतःचे संस्थेकडे वळवल्याचा ( अर्थातच पैसे खाल्ल्याचा) आरोप केला आहे.
आधी किरण बेदी आणि आता अरविंद केजरीवाल. ही बातमी येथे बघा.
आणि येथेसुध्दा बघा.
23 Oct 2011 - 2:37 pm | अविनाशकुलकर्णी
श्री आंण्णा यांच्या मोहिमेचे भवितव्य काय? भविष्यात या मोहिमेला यश येणार की नाही?
काही जणांचे मत आहे की अण्णा प्रामाणिक आहेत मात्र त्यांचा हेकट पणा अजून महाराष्ट्रा बाहेर लोकांना जास्त ठाऊक नसल्याने हिंदी-इंग्लिश मीडिया त्यांच्या प्रत्येक कृत्याला वारेमाप प्रसिद्धी देत आहे..
केजरीवाल बेदी ला तर सरकारने टार्गेट केलेच आहे..रोज त्यांची प्रकरणे बाहेर काढून ही भ्रष्टाचार मोहीम कशी कमकुवत होईल असे सरकार पहात आहे.
प्रशांत भुषण ने आपल्या तोंडाळ पणा मुळे मार खाल्ला..
सरकार बिल आणणार असे जरी म्हणत असले तरी खरच अण्णांना अपेक्षित असलेले मुद्दे त्यात येणार का? बिल संसदेत पास होणार का? हे सारे प्रष्णच आहेत...
काही लोकांना हे आंदोलन घटनेवर प्रहार वाटतो..व त्या मुळे लोकशाही प्रक्रिया धोक्यात येइल असे वाटते..
तर काही विद्वान हि आणी बाणी पुर्विची परिस्थिती आहे असे वर्णन करतात..
अंण्णा मौनात आहेत..आपल्या गावात आल्यानंतर अंण्णा पद्मावती मंदिर जवळच्या गेस्ट हाउस ्मधे रहात होते..पण वास्तुचा दोष असल्याने ते आता यादव माता मंदिर मधे असतात..तिथे त्यांना जादा उर्जा मिळते.।
अंण्णा मौन सोडल्यावर काय भाष्य करतात हे पहाण्या साठी सारेच उत्सुक आहेत..
खर तर आमच्या सारख्या सामान्य माणसाला वसुली हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.
राजकारणी गेंडा स्वामी असल्याने ते जि काही थोडीफार शिक्षा होईल ति भोगतिल..
नंतर लुटलेले पैसे बाहेर काढून आयुष्य आरामात जगतील...
भ्रष्टाचारी लोकांना चाप बसणार का? या कडे जनतेचे लक्ष आहे....
तुका म्हणे उगी रहावे..जे जे होईल ते ते पहावे...
24 Oct 2011 - 10:09 pm | आशु जोग
केतकरांना नावे ठेवण्याची सध्या फैशन दिसत्ये
25 Oct 2011 - 8:30 am | गेंडा
नावे केतकरांना नव्हे त्या प्रवृत्तीला ठेवली आहेत.
ते जर महान असतील तर कसे महान आहेत हे जर सहोदारण स्पष्ट करा की हो.
25 Oct 2011 - 9:04 pm | आशु जोग
गेंडा
तुमचे म्हणणे इतरांपेक्षा वेगळे आहे, बरे वाटले
इथे केतकरांना नावे ठेवणार्यांना तसे सोदाहरण स्पष्ट करायला सांगा
(त्यांना करता येणार नाही)
मी त्यांची अनेक पुस्तके, लेख, प्रस्तावना वाचल्या आहेत
निरनिराळ्या विषयांवरची त्यांची भाषणे ऐकली आहेत. जी अतिशय माहितीपूर्ण आहेत.