घोषणा

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
3 Feb 2011 - 6:21 pm

घोषणा - हा भाग व्यवस्थापनाकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या घोषणांकरीता आहे. तसेच येथे मिपाच्या आगामी योजनांची माहिती देण्यात येईल. नवीन सोई आणि त्यात सदस्यांना आलेल्या अडचणी ते येथे मांडू शकतात.

आज येथे मिपावरील एक सदस्यं आमोद शिंदे यांना प्रतिबंधीत करण्यात आले आहे अशी घोषणा करण्यात येत आहे.

त्यांचेशी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे. त्यांना याबाबत अधीक काही म्हणायचे असल्यास नीलकांत यांना मेल करावा.

तसेच अन्य सदस्यांनासुध्दा असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिसळपावच्या रोजच्या घडामोडींत संपादकांवर ताशेरे ओढू नयेत. संपादक व व्यवस्थापनाविषयी कुठल्याही जाहीर चेष्टेसाठी सदस्यांना प्रतिबंधित करण्यात येईल.

अन्य काही सदस्यांना सुध्दा व्यवस्थापनाकडून अश्याच सूचना वैयक्तीक पातळीवर दिल्या आहेत. त्यांनी आपले वर्तन सुधारावे. अन्यथा नाईलाजाने त्यांचेवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल.

नवीन सदस्यांसाठी खुलासा:
मिसळपाववर मोकळे वातावरण रहावे आणि सर्वांना येथे सहज वाटावे यासाठी मिसळपावचे संपादक मंडळ कार्यरत असते. काही वेळा काही सदस्यांचे चुकीचे लेख किंवा प्रतिक्रिया ह्या नियमबाह्य वाटल्यास त्या काढल्या जातात. अश्यावेळी त्या सदस्यांना संपादक मंडळाशी संपर्क साधुन त्यांना विचरणा करण्याची मुभा आहे. मात्र संपादकीय कारवाईची अन्य प्रतिक्रियांत चेष्टा करणे योग्य नाही. सध्या काही सदस्यं अशीच संपादकीय कारवाईची चेष्टा आपल्या प्रतिक्रियांत, स्वाक्षरीत किंवा अन्य सदस्यांना सूचना देण्याच्या नावाखाली करतांना दिसत आहेत. त्यांच्यावर सुध्दा कारवाई अपेक्षीत आहे. सदस्यांवर कारवाई करणे हे शेवटचे पाऊल असते. त्यांना त्या आधी अनेक वेळा त्यांचे वर्तन सुधारण्याची विनंती केली जाते. त्यामुळे अन्य सदस्यांनी अशी कारवाई करण्याची वेळ व्यवस्थापनावर येऊ देऊ नये ही विनंती.

- सरपंच

प्रतिक्रिया

अवलिया's picture

3 Feb 2011 - 6:26 pm | अवलिया

अतिशय योग्य आणि स्तुत्य निर्णय.

नीलकांत यांना आमचे सहकार्य असतेच आणि भविष्यात असेल याबाबत खात्री असु द्यावी. अशा प्रकारे नीलकांत यांनी स्वतः जातीने लक्ष घातल्याने आम्हाला आनंद वाटला आहे. लवकरच मिपाचे जूने खेळीमेळीचे स्वरुप दिसु लागेल अशी आमची खात्री आहे.

नीलकांत यांना पाठिंबा !! :)

शुचि's picture

3 Feb 2011 - 8:42 pm | शुचि

सहमत

योग्य निर्णय. नीलकांत, तुला पूर्ण पाठींबा आहे.

टारझन's picture

3 Feb 2011 - 8:54 pm | टारझन

संपादक मंडळ आणि णिलकांत वर भरौसा आहे. त्यांना पुर्ण सहकार्य पुर्वी ही होते / आहे आणि राहिल पण .

एक शंका : 'एखादा' संपादकाचे जर असे वर्तन असेल तर त्या 'एखाद्या'च्या साठी काय धोरण आहे ?

मुक्तसुनीत's picture

3 Feb 2011 - 8:58 pm | मुक्तसुनीत

शंका : 'एखादा' संपादकाचे जर असे वर्तन असेल तर त्या 'एखाद्या'च्या साठी काय धोरण आहे ?

माझ्या अल्प माहितीप्रमाणे कुठलाही सदस्य आचारसंहितेच्या कक्षेबाहेर नाही. जेव्हा एखाद्या लिखाणाबद्दल आक्षेपार्ह काही दिसते तेव्हा संपादकांना कळवण्याची पद्धत आहे. एखाद्या संपादकाचेच लिखाण चुकीचे वाटले तर नीलकांत/सरपंच यांना कळवण्याची सोय आहे.

टारझन's picture

3 Feb 2011 - 9:01 pm | टारझन

:)

Pain's picture

4 Feb 2011 - 6:40 am | Pain

संपादक भेदभाव करत आहेत असे दिसले तर?

नीलकांत's picture

5 Feb 2011 - 10:43 pm | नीलकांत

नीलकांतशी संपर्क साधावा. अन्य कुठेही संपादक म्हणून केलेल्या कृतीचे संदर्भ देऊ नये. एक सदस्यं म्हणून त्यांच्या लेखण आणि प्रतिक्रियेविषयी काहीही विशेष वागणुक नाही. मात्र संपादकांच्या संपादकीय कृतीवर लेख, प्रतिक्रिया किंवा खरडवहीत सुध्दा आक्षेपार्ह्य लिहू नये. सरळ नीलकांतला व्य. नि. करावा.
- नीलकांत

नीलकांत's picture

5 Feb 2011 - 10:43 pm | नीलकांत

नीलकांतशी संपर्क साधावा. अन्य कुठेही संपादक म्हणून केलेल्या कृतीचे संदर्भ देऊ नये. एक सदस्यं म्हणून त्यांच्या लेखण आणि प्रतिक्रियेविषयी काहीही विशेष वागणुक नाही. मात्र संपादकांच्या संपादकीय कृतीवर लेख, प्रतिक्रिया किंवा खरडवहीत सुध्दा आक्षेपार्ह्य लिहू नये. सरळ नीलकांतला व्य. नि. करावा.
- नीलकांत

शाहरुख's picture

3 Feb 2011 - 9:34 pm | शाहरुख

एक छोटी शंका !

मिपावर कोण कोण संपादक आहे ही गोष्ट मिपा धोरणा अंतर्गत गुप्त ठेवण्यात आली आहे का ?

गणपा's picture

3 Feb 2011 - 9:38 pm | गणपा

मुक्तसुनीत
चतुरंग
रेवती
विकास
चित्रा
नंदन
प्रियाली
बिपिन कार्यकर्ते
केशवसुमार
प्राजु
मृदुला
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत
रामदास
छोटा डॉन
निखील देशपांडे

याउपर अजुन कुणी असल्यास जाणकारांनी भर घालावी

शाहरुख's picture

3 Feb 2011 - 10:14 pm | शाहरुख

थँक्स ! मी तो धागा बघितला नव्हता.

आणि मागं २-३ दा विचारले असता उत्तर मिळाले नव्हते.

छत्रपती's picture

3 Feb 2011 - 10:20 pm | छत्रपती

त्यांना याबाबत अधीक काही म्हणायचे असल्यास नीलकांत यांना मेल करावा.

.
.
.

मेल आयडी दया.

नीलकांत's picture

5 Feb 2011 - 10:46 pm | नीलकांत

neelkant[dot]akl[at]gmail[dot]com

बाकी वरच्या लेखात आमोद शिंदेंनी संपर्क साधावा असे म्हटल्यावर ईमेल न देण्याचे कारण त्यांना माझा ईमेल आणि मोबाईल नंबर दोन्ही ठाऊक आहेत हे मला माहिती आहे.
बाकी शाहरूख यांनी काळजी करू नये.

- नीलकांत

कधी कधी मिपावर तांत्रिक अडचणी येतात किंवा इतर काही कारणांनी लिहिता येत नाही, त्यामुळे संपादकांशी संपर्क साधता येत नाही. अशावेळी एखादा इ-मेल आयडी उपलब्ध करून दिल्यास ते सोयीचे ठरेल.

Nile's picture

4 Feb 2011 - 7:08 am | Nile

सभासद न होता ही (किंवा लॉग इन न करताही) अ‍ॅडमिनला इमेल करायची सोय हवी. (हा मुद्दा मी पुर्वीही मांडला होता.)

हा इमेल आयडी
gmail@misalpav.com
असा असावा.

नीलकांत's picture

5 Feb 2011 - 10:49 pm | नीलकांत

नीलकांत.एकेएल्@जीमेल.कॉम वर एका प्रतिक्रियेत हा ईमेल पत्ता दिला आहे तोच सद्या वापरावा.
थोड्या दिवसांनी मिसळपावचा ईमेल देतो.

मिसळपावच्या शेवटी संपर्क असे पान लावण्याचा विचार आहे. मात्र सरळ मेल पाठवता येईल अशी सोय करू नये असा विचार आहे. कारण लोकायत.कॉम वर अशी सोय केल्यावर अनेक कंपण्यांमध्ये ती मेलींग साईट म्हणून बंदी घालण्यात आली. सबब ईमेल पत्ता उपलब्ध करून देण्यात येईल.

- नीलकांत

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2011 - 8:27 am | llपुण्याचे पेशवेll

योग्य निर्णय. स्वागत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Feb 2011 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

एक महत्वाची शंका :-

जेंव्हा एखाद्या आयडीवरती कारवाई होते, तेंव्हा त्या मागचा उद्देश त्या सदस्याला मिपापासून दूर ठेवणे असते, का त्या आयडीला ? कारण उद्या समजा 'परिकथेतील राजकुमार' ह्या आयडीवर कारवाई झाली तर त्या नावाने वावरणार्‍या सदस्याचे नक्कीच नुकसान आहे कारण त्याला मिपाला आणि त्यावरील स्वत:च्या लेखनाला मुकावे लागेल.

ह्याउलट फक्त आणि फक्त मिपावर गोंधळ माजवणे, इतर मिपासदस्यांचा अपमान करणे, खालच्या पातळीवर ताशेरे ओढणे, नविन वाद वाढवणे ह्या साठी 'क्ष' व्यक्तीने 'अबक' आयडीने प्रवेश घेतला असेल आणि तो आयडी ६ महिन्यांनी उडाला तरी त्यात त्या सदस्याचे वैयक्तीक नुकसान काहीच नसेल कारण त्याचे लेखन हे फक्त मिपावर प्रतिसाद रुपात असेल. तो पुन्हा नविन आयडी घेउन गोंधळ घालायला हजर :)

जर सदर गैरवर्तुणूक करणार्‍या व्यक्तीलाच मिपापासून लांब ठेवायचे असेल तर आयपी बॅन करायला काय हरकत आहे ? तसेही सध्या कोणी सर्विस प्रोव्हाइडर्स डायनामीक आयपी उपलब्ध करुन देतच नाहीत. ह्यामुळे अशा सदस्यांना आपसुकच आळ बसेल असे वाटते.

गणपा's picture

4 Feb 2011 - 1:30 pm | गणपा

आयपी बॅन करायच्या पराच्या मताशी सहमत.

छोटा डॉन's picture

4 Feb 2011 - 2:09 pm | छोटा डॉन

सहमती आहे असे म्हणतो.
उत्तम सुचवणी :)

- छोटा डॉन

अवलिया's picture

4 Feb 2011 - 2:12 pm | अवलिया

तसेही सध्या कोणी सर्विस प्रोव्हाइडर्स डायनामीक आयपी उपलब्ध करुन देतच नाहीत.

असहमत. बीएसएनएल ब्रॉडबँन्ड सेवा डायनामिक आयपीचा वापर करुन असते. तसेच इतर देशांतील काही सेवादाते तसे असु शकतात. उच्छाद मांडणारे बहुधा प्रॉक्सीचाच वापर करुन मिपावर येत असतील. सबब आयपी बॅन या पद्धतीने आळा घालणे अशक्य आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Feb 2011 - 2:25 pm | परिकथेतील राजकुमार

असहमत. बीएसएनएल ब्रॉडबँन्ड सेवा डायनामिक आयपीचा वापर करुन असते. तसेच इतर देशांतील काही सेवादाते तसे असु शकतात.

खरे आहे. बीएसएनएल आणि इतर (टाटा / एयरटेल / आयकरा इ.) सेवादाते डायनामिक आयपी उपलब्ध करुन देतात पण त्यासाठी जादा चार्ज लावतात. शक्यतो सर्व कंपन्या व ऑफिसेस डायनामिक आयपीच्या वापरापासून दूर राहतात.

उच्छाद मांडणारे बहुधा प्रॉक्सीचाच वापर करुन मिपावर येत असतील. सबब आयपी बॅन या पद्धतीने आळा घालणे अशक्य आहे.

असे अगदी बोटावर मोजणारे असणार. कारण शक्यतो सर्व ऑफिसेस, कंपन्यात प्रॉक्सी साईटस बॅनच असतात असे वाटते. त्यातुनही सतत प्रॉक्सीवरुन यावे लागणे हि सुद्धा एक शिक्षाच झाली की, आणि असे सतत आयपी (प्रॉक्सी) बदलणारे आयडी लक्ष ठेवायला अजुन सोपे ;)

टारझन's picture

4 Feb 2011 - 2:28 pm | टारझन

डायणॅमिक आय पी सहज उपलब्ध आहे असे वाटते. कारण मी माझे नेट जेंव्हा जेंव्हा डिस्कनेक्ट करुन कनेक्ट करतो तेंव्हा मला नविन आयपी भेटतो. मात्र स्टॅटिक आयपी साठी वेगळा चार्ज पडतो. मिपाकर देवदत्त यांनी त्यांना स्टॅटिक आयपी साठी जादा भार भरावा लागल्याचे पुर्वी झालेल्या चर्चेत सांगितले होते.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Feb 2011 - 2:56 pm | परिकथेतील राजकुमार

न्हाय रे दादा.
आपल्याला फुकटात मिळालाय टाटा कडूण ;)

पण डायनामीक आयपी असला तरी दरवेळी नेट डिस्कनेक्ट करुन पुन्हा रिकनेक्ट करावे लागतेच ना? आणि हे कंपनी ऑफिसेस मध्ये तरी सहज शक्य नाही.

टारझन's picture

4 Feb 2011 - 3:12 pm | टारझन

सहमत आहे .. . तुला फुकट मिळणारंच .. मोठं प्याकेज घेतो ना तु :)
तसाही स्टॅटिक आयपीचा चार्ज नॉमिनलच आहे. ८० रुपये पर मंथ का काही तरी :) अर्थात तो पण आयएस्पी नुसार बदलत असेल म्हणा.

कंपण्यांतही स्टॅटिक आयपी असतो .. बरोबर.

पण घरी नेट वापरणार्‍यांचा आयपी वारंवार बदलत रहातो . डिस्कनेक्ट -रिकनेक्ट हा १ सेकंदाचा जॉब आहे !

नन्दादीप's picture

5 Feb 2011 - 11:45 am | नन्दादीप

आणि तसही...changemyip किंवा तत्सम साईट्स वरून आय.पी. चेंज पण होतो.

मालोजीराव's picture

4 Feb 2011 - 3:05 pm | मालोजीराव

अवलीयांशी सहमत,ज्याला त्रास द्यायचा असतो तो कसाही त्रास देतोच.
यावर उपाय म्हणून मिपाने तांत्रिक सल्लागार सुद्धा नेमावेत.

नीलकांत's picture

5 Feb 2011 - 11:09 pm | नीलकांत

मिसळपाव हा खुला चर्चामंच आहे. येथे होणार्‍या चर्चा सर्वांना वाचायला खुल्या आहेत. मात्र येथे चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा लिहीण्यासाठी सदस्यं होणे आवश्यक आहे. त्यासाठी सदस्यंनाम घेऊन सदस्यं येथे येतात.
येथे आल्यावर आपल्या आवडी नुसार ते लेख लिहीतात किंवा प्रतिक्रिया देतात. अशा वेळी त्यांच्या लेखन किंवा प्रतिक्रिया आवडल्यावर इतर लोक त्यांना प्रतिसाद देतात. अश्या वेळी हा आयडी(सदस्यं नाम) हे एक व्यक्तीमत्व धारण करते. त्या आयडीला लोक आपल्या प्रतिक्रियांत स्थान देतात. शेवटी या समानशीले... आयडींचा एक कंपू होतो. अशी प्रक्रिया आहे.

अश्या वेळी जेव्हा आपले लिखान किंवा प्रतिक्रिया आपल्याला ओळख देतात तेव्हा हा आयडी आपल्याला महत्वाचा होतो. या आयडीवर जर कारवाई झाली तर या आयडीची आजपर्यंतची प्रतिमा वाया जाते. नवीन आयडीने येता येते मात्र मग प्रत्येकाला सांगत सुटावं लागतं की मी कोण ते. त्यामुळे शक्यतो असं सहसा लोक करत नाहीत.

जे लोक त्रास देण्यासाठी येतात त्यांना बॅन करणं व्यवस्थापनाचं काम आहे. ते ते करतीलच. कारण मिपा चांगलं चालण्यासाठीच ते काम करतात.

माझ्या वरच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी मी काहीस सदस्यंनावे येथे देतो. की त्यांची नावे घेतली की त्यांची व्यक्तीमत्वे आपल्यासमोर उभी राहतात. (आयडीची व्यक्तीमत्वे)

विसोबा खेचर
सर्कीट
संजोपराव
अजाणुकर्ण
परिकथेतील राजकुमार
पुण्याचे पेशवे
अवलीया
टारझन
धमाल मुलगा
आनंदयात्री
सहज
चतुरंग
मुक्तसुनीत
रामदास

ही सर्व यांची खरी नावे नाहीत मात्र आपल्याला हे लोक याच नावाने माहिती आहेत. आणि याच नावाने आपण यांचे मित्र, फॅन(पंखे) आहोत. ही मैत्री पुढे जाऊन प्रत्यक्ष फोन किंवा भेटी पर्यंत जाते. मात्र मग प्रत्यक्षात त्यांची नावे हीच उच्चारली जातात असाही अनुभव आहे. अश्यावेळी ज्यांना मिसळपाव माहिती नाही त्यांना ह्या नावाचा संदर्भ लागत नाही. :)

त्यामुळे मिसळपाववर कारवाई ही त्या आयडीवरची असते. आयपी बॅन केला जाऊ शकतो. मात्र सहसा तसे करत नाही. मिसळपाववर एखाद्या सदस्याचे वागणे ठीक नसले आणि त्यामुळे वातावरण बिघडत असेल तर तसे त्या सदस्यास सांगीतले जाते. अनेकदा सांगूनही त्याने न ऐकल्यास शेवटचा उपाय म्हणून त्याला प्रतिबंधीत केल्या जाते. असे करतांना त्याला मिसळपावच्या साहित्यापासून दूर ठेवणे हा हेतू नसतो तर त्याला मिसळपाववर लेखन करण्यापासून दूर ठेवणे हा आहे.

मिपावर अनेक त्रासदायक सदस्यांना अश्या सूचना दिल्या जातात. त्याची जाहीर चर्चा होत नाही. मात्र असं होत राहतं.

- नीलकांत

डावखुरा's picture

6 Feb 2011 - 12:16 am | डावखुरा

मस्त साधक-बाधक चर्चा रंगलीय...

मला एक प्रश्ण आहे. संपादकांना एखादा धागा उडवायला किती वेळ लागतो? कालच सिम कार्डच्या धाग्याने अश्लिलेतेची आणि असभ्यतेची सीमा केव्हाच ओलांडली होती. माझे दोन धागे मात्र एका मिनीटात अप्रकाशीत करण्यात आले. अर्थात ते अप्रकाशीत केले म्हणून माझे काही म्हणणे नाही. ते संपादक मंडळाचे कामच आहे पण मीच तेवढा रडारवर का? मागेही मी जाती-धर्माचा विषय मांडला नसतांपण मला एका मिनीटात रेवती नामक व्यक्तीकडून धमकीवजा विनंती करण्यात आली होती.
बाकी आपले काम चालू द्या. मी माझ्याकडून जमेल तेवढे सहकार्य करीनच.

विवेक वि's picture

22 Oct 2011 - 1:14 pm | विवेक वि

सहमत